वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक !
मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 50 नुसार वाहनांस बसविण्यची तरतूद आहे. तसेच रस्ते व महामार्ग मंत्रालय नवी दिल्ली यांच्या जीसएआ 1162 (HSRP) दि. 01.12.2018 व दि. 06.12.2018 नुसार दिनांक 01.04.2019 पासून उत्पादित होणाऱ्या सर्व नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
त्यानुसार दि.01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनां HSRP व तिस-या नोंदणी चिन्हांचे स्टिकर लावणे याकरीता https://transport.maharashtra.gov.in/1035/Home या वेबसाईटवर सर्व वाहनधारकांनी दि.31 मार्च 2025 पूर्वी नोंदणी करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून कनण्यात आले आहे.
तसेच दि.01.04.2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनां HSRP व तिसऱ्या नोंदणी चिन्हांचे स्टिकर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक कार्यालयामध्ये आवश्यक असणाऱ्या किमान HSRP बवसविणाऱ्या केंद्राना मान्यता देण्यात आली आहे. सदर जुन्या वाहनांना HSRP बसविण्यासाठी परिवहन विभागाने तयार केलेल्या HSRP पोर्टलवर दि.31 मार्च 2025 पर्यंत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दि.01.04.2019 पूर्वी नोंदणीकृत मोटार वाहनांसाठी वर नमूद केलेल्या अधिकृत HSRP उत्पादकांकडून वाहनांवर बसविण्यात आलेले HSRP हेच केवळ वैध मानले जाईल आणि वाहन पोर्टलवर अद्ययावत केले जाईल. इतर कोणत्याही HSRP निर्मात्याकडून / पुरवठादारकडून बसविलेल्या HSRP मोटार वाहन कायदा आणि नियमांच्या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाईसाठी पात्र असतील.
No comments:
Post a Comment