Friday 31 July 2020

डाॅ.अजय मोरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती व्हावी या मागणीसाठी स्वराज्य चित्रपट संघटनेसह राज्यभरातून विविध क्षेत्रातील संस्थांचा जाहीर पाठिंबा ..!

डाॅ.अजय मोरे यांची विधानपरिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून नियुक्ती व्हावी या मागणीसाठी स्वराज्य चित्रपट संघटनेसह राज्यभरातून विविध क्षेत्रातील संस्थांचा जाहीर पाठिंबा ..!
    
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील सुप्रसिद्ध अष्टविनायक कला अकॅडमिचे संस्थापक तथा विविध क्षेत्रांतील जाणकार असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डॉ. अजय मोरे यांना विधान परिषदेवर आमदार करण्याची मागणी संपूर्ण महाराष्ट्र मधून अनेक चित्रपट संघटना, सामाजिक संघटना , प्रोडक्शन , कलाकार , यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे, राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेवर लवकरच विविध क्षेत्रातून १२ विधानपरिषद सदस्यांची नियुक्ती होणार आहे. त्यातील एक जागा हि कला क्षेत्रातील व्यक्तींसाठी आहे .        
      कलाकारांच्या हक्काचा माणूस म्हणून डॉ अजय मोरे यांच्याकडे पाहिलं जात. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपट नाट्य क्षेत्रातील कलाकार, पडद्यामागील कलाकार , तंत्रज्ञ यांच्या साठी डॉ अजय मोरे निस्वार्थ हेतूने निरंतर काम करत आहेत,अष्टविनायक कला अकॅडमीच्या माध्यमातून अनेक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम अजय मोरे यांनी केले आहे, ते स्वतः अभिनेते, लेखक , दिग्दर्शक, निर्माता आहेत, कलाकारांचे प्रश्न वेळोवेळी शासन दरबारी मांडण्याचं काम त्यांच्या माध्यमातून चालू असते, त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. अनेक संस्था संघटनांमध्ये ते कार्यरत आहेत, स्वराज्य चित्रपट संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख म्हणूनही ते काम करत आहेत. कोरोना महामारीच्या काळात कलावंत तसेच पडद्यामागील काम करणारे तंत्रज्ञ् यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती त्यादरम्यान त्यांनी अनेक ठिकाणी कलाकारांना धान्य किट तसेच जेवणाची व्यवस्था केली. 
     तसेच सर्व कलावंताचे प्रश्न घेऊन योग्य रीतीने प्रभावी पद्धतीने शासन दरबारी मांडून कलावंतांच्या बाजूने त्यांचा न्याय हक्काचा लढा लढण्यासाठी डॉ.अजय आत्माराम मोरे गेल्या अनेक वर्षांपासून कला सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहे व आपल्या हक्काचा कलाकार आपले प्रश्न मांडण्यासाठी  राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती व्हावी यासाठी महाराष्ट्र भरातून अनेकांनी मागणी केली आहे तसेच अनेकांचा व्यक्तिगत पातळीवर पाठिंबा मिळत आहे.
    कला व सांस्कृतिक क्षेत्रातील प्रश्नाची जाण असणाऱ्या व सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव झटणाऱ्या लेखक, दिग्दर्शक, निर्माता डॉ.अजय आत्माराम  मोरे यांना  विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्त केल्यास नक्कीच सर्व कलाकारांचे प्रश्न मार्गी लागतील ,आज कला क्षेत्रातील सदस्य पदावर कला व सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्ती घेतल्यास नक्कीच चित्रपट व नाट्य क्षेत्राला याचा फायदाच होईल असे स्वराज्य चित्रपट संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रकाश यादव यांच्या सह विविध सामाजिक धार्मिक संघटना आणि अनेकविध क्षेत्रातील मान्यवरांचे ठाम मत आहे.

रोहा तांबडी बलात्कार व हत्या प्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालविण्याच्या दृष्टीने 'पालकमंत्री आदिती तटकरे' यांनी घेतली गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट !

रोहा तांबडी बलात्कार व हत्या प्रकरणी खटला जलदगती न्यायालयात चालविण्याच्या दृष्टीने 'पालकमंत्री आदिती तटकरे' यांनी घेतली गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट !


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या रोहा तालुक्यातील मौजे तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर दिनांक  २६ जुलै रोजी बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. मानवतेला काळीमा फासणार्या या अत्यंत निंदनीय आणि घृणास्पद प्रकरणामुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरला होता. सदर घटनेचा सर्व समाजातील सर्व स्तरातून निषेध व्यक्त होऊन संपूर्ण रायगड जिल्ह्यातील नागरिकांच्या मनात या अमानवीय घटनेविषयी चीड निर्माण होऊन सर्व नागरिकांच्या भावना संतप्त झाल्या होत्या. 
     सदर घटनेची पालकमंत्री या नात्याने गंभीर दखल घेऊन कु.आदिती तटकरे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची मंत्रालयात व्यक्तिश: भेट घेतली आणि त्यांना  या घटनेतील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या नराधमांना अत्यंत कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याच्या दृष्टीने गृह विभागाकडून आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर व्हावी, याकरिता पत्रान्वये विनंती केली आहे.

कोकणात गणेश उत्सवासाठी लवकरात लवकर एस टी सेवा सुरु करा" - अनंत हुमणे !!

"कोकणात गणेश उत्सवासाठी लवकरात लवकर एस टी सेवा सुरु करा" - अनंत हुमणे !!


ठाणे - गणेश उत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे. मुंबई व पुणे सारख्या शहरात राहणारे चाकरमणी हे आपापल्या गावी गणपती उत्सवासाठी जात असतात. गणपती उत्सव हा पारंपारिक पध्दतीने कोकणात साजरा केला जातो. कोकणात प्रत्येकाच्या घरोघरी गणपतीची मूर्ती आणली जाते. कोकणात ५ ते १० किलोमीटर अंतरावरुन गणपतीमूर्ती आणाव्या लागतात. चाकरमानी नोकरी धंद्यानिमित्त शहरात असल्याने गावात वयोरुद्ध व्यक्ती राहतात तर काही घरे बंद असून मुंबई-पुणे सारख्या शहरातून ते आपल्या गावी जातात यामुळे त्यांना स्व:ता गावी जाऊन गणपती उत्सवाची तयारी करावी लगाते. ते गावी गेल्याशिवाय त्यांच्या घरी गणपती सण साजरा होऊ शकत नाही.

परंतु या वर्षी कोरोना सारखा घातक विषाणुचा संसर्ग वाढत असल्याने मुंबई व पुणे अशा ठिकाणी अनेक लोक अडकून आहेत.अशा काळात त्याना गावी जाण्यासाठी पास सुद्धा उपलब्ध होऊ शकले नाही. आणि जे गावी गेले त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. ४ महिन्यांहुन अधिक काळ लॉकडाउन असल्यामुळे सामान्य लोकांकडे  पैसे सुद्धा राहिलेले नाहीत त्यामुळे ते खासगी कार घेऊन सुद्धा जाऊ शकत नाहीत.म्हणून आता तरी किमान गणपती उत्सवासाठी तरी त्यांना सुखरूप त्यांच्या मूळगावी जाता यावे. त्यासाठी सरकारने योग्य ती व्यवस्था करावी.

गणेश उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे,परंतु शासनकडून स्पष्ट निर्णय होत नसल्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबई, रायगड,बोरिवली,अशा अनेक शहरात राहणाऱ्या कोकणवासीयांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. हा निर्णय वेळीच झाला नाही तर कोकणवासीयांचा संयम तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर कोकणवासीय मोठ्या झुंडीने कोकणात जायला निघतील त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती जास्त प्रमाणात आहे.आज पर्यंत सरकारच्या आदेशाचे पालन करुन जनता सहकार्य करीत आहे. त्यामुळे आता त्यांना गावी जाण्यासाठी लवकर लवकर एस.टी सेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी पोलीस सेवा संघटनेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख अनंत हुमणे यांनी निवेदनाद्वारे केली आहे

रक्षाबंधन एका पवित्र नात्याचा उत्सव !!

रक्षाबंधन एका पवित्र नात्याचा उत्सव !!


भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घ्यायची या संकल्पनेचे प्रतीकात्मक सांस्कृतिक रूप म्हणजे रक्षाबंधनाचा सण. सोमवारी, ३ ऑगस्ट रोजी यंदा रक्षाबंधनाचा हा सण आहे. श्रावणातल्या या महत्त्वाच्या सणामागे विविध कहाण्या प्रचलित आहेत. प्रदेशागणिक कहाण्या बदलल्या तरी आपल्या माणसाला प्रेमाच्या रेशीमबंधांनी जखडून ठेवायचे, ही कल्पना मात्र सगळीकडे समान आहे.  रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो म्हणून प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. रक्षाबंधन सणाप्रमाणे दक्षिण भारतात कार्तिक महिन्यात काíतकेय सण असतो. या दिवशी बहीण आपल्या भावास जेवण देऊन त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते व भाऊ तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला ‘पोवती पौर्णिमा’ असेही म्हणतात. कापसाच्या सुताच्या नवसुती करून तिला आठ-बारा किंवा चोवीस गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांचे आवाहन करून हे पोवते प्रथम देवास वाहून नंतर तसलीच पोवती कुटुंबातील माणसांच्या मनगटावर बांधली जातात.

रक्षाबंधनाची सुरुवात केव्हा झाली, याबद्दल निश्चित पुरावा नाही; पण त्याविषयी अनेक आख्यायिका आहेत. वैदिक काळात पूर्वी देवदानवांच्या युद्धात दानवांच्या शक्तीपुढे देवांचे काही चालत नसे. दानवांचा राजा वृत्रासुर याने देवांचा राजा इंद्र याला युद्धाचे आव्हान दिले. इंद्र आपले वज्र घेऊन युद्धास निघाला. त्या वेळी इंद्राला विजय मिळावा म्हणून त्याची पत्नी शची हिने विष्णूकडून मिळालेला एक दोरा (राखी) इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला त्या युद्धात विजय मिळाला व त्याचे गेलेले वैभव प्राप्त झाले. त्या दिवशी श्रावण पौर्णिमा होती. तेव्हापासून त्याची स्मृती म्हणून मनगटावर राखी बांधण्याची पद्धत सुरू झाली आणि हा रक्षाबंधनाचा सण सुरू झाला असे म्हणतात.

पौराणिक काळातील अशीही एक कथा आहे. दैत्य राजा बलीकडे विष्णू आला तेव्हा शुक्राचार्यानी बळीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधले. रक्षासूत्रापासूनच पुढे राखीची प्रथा आली असावी. द्रौपदीने आपला भरजरी पितांबर फाडून कृष्णाच्या करंगळीवर चिंधी बांधली आणि कृष्णाने तिचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले अशी कथा आहे. सुभद्रा ही जरी कृष्णाची सख्खी बहीण असली तरी द्रौपदी आणि कृष्णाचे बंधूप्रेमाचे अप्रूप दिसून येते.

सिकंदर जेव्हा हिंदुस्थानावर(भारत) चाल करून आला, त्या वेळी तो झेलम नदीच्या किनारी पोहोचला. तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. तेथे झेलम नदीच्या किनारी सावित्री नावाची एक स्त्री राखीची पूजा करून जलदेवतेला अर्पण करीत होती. हे दृश्य पाहून सिकंदर आश्चर्यचकित झाला. त्याने सावित्रीला राखीसंबंधी विचारले. सावित्रीने राखीचे महत्त्व सांगितले आणि त्याच्या मनगटावर बांधली. त्यांचे बहीण-भावाचे नाते निर्माण झाले. पुढे सिकंदराने पोरस राजावर चाल करून त्याला कैद केले. ही घटना पोरसाची सख्खी बहीण सावित्रीला कळताच, ती तत्परतेने सिकंदराकडे आली आणि तिने त्याला रक्षाबंधनाची आठवण करून दिली. सिकंदरला ती पोरसाची बहीण आहे हे कळताच त्याने तिची क्षमा मागितली व पोरसाला कैदेतून मुक्त केले आणि त्याचे राज्य परत दिले. याची बरीच उदाहरणे आहेत.

 राखी बांधताना बहिणीने म्हणावे – येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल॥ (दानवांचा राजा बली यांच्या हातात दैत्यगुरू शुक्राचार्य यांनी जशी रक्षा (राखी) बांधली होती तशीच ही राखी मी तुझ्या हातात बांधत आहे.) राखी बांधताना बहीण आपल्या भावाला सुख, शांती, दीर्घायुष्य लाभावे, अशी मनोमन प्रार्थना करते.

रक्षाबंधन म्हणजे बहीण-भावाच्या उदात्त, पवित्र प्रेमाचा अखंड वाहणारा झरा. काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण आपल्या यजमानाला, मुलगी वडिलांनासुद्धा राखी बांधते. आपल्यापेक्षा श्रेष्ठ, बलवान, समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन हीच यामागची भावना आहे.  ‘राखी’ हा शब्द रक्ष या संस्कृत धातूपासून झाला आहे. याचा अर्थ ‘रक्षण कर’ – ‘राख म्हणजे सांभाळ’. कुठल्याही कर्तबगार, धाडसी शूरवीराने याचक, दुर्बल, वृद्ध, आजारी, असहाय, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे. हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे. हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वत: सर्वाना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गíभत अर्थ धर्माचे रक्षण करणे हाच आहे, असे पूर्वी मानत असत. धर्म म्हणजे धारणा करणारा. समाज, देश धारणेसाठी सर्वाचे रक्षण करणे हा याचा अनुस्यूत अर्थ आहे.

ठाणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच सर्व सामान्यांच्या मदतीकरिता अग्रेसर !!

ठाणे जिल्ह्यातील प्रहार जनशक्ती पक्ष नेहमीच सर्व सामान्यांच्या मदतीकरिता अग्रेसर !!


सध्या उल्हासनगरात वाढती रुग्ण संख्या तसेच ह्या आजाराविषयी मनात असलेली भिती व प्रशासनाकडून मिळत नसलेले योग्य मार्गदर्शन यामुळे सर्व सामान्य नागरिकांची परवड सुरूच आहे.
योग्य उपचाराकरिता उल्हासनगर महापालिकेतील अपुरी व्यवस्था यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष, ठाणे जिल्हा वेळोवेळी आवाज उचलीत आहे अर्जांच्या माध्यमातून आयुक्तांना वेळोवेळी जाणीव करून दिली, तसेच कुठे रुग्णांवर अन्यायकारक बिल लावले तिथे जाऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून त्याला न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केले आहेत व करत आहेत.
असेच उल्हासनगर शहरातील एक रहिवासी सुनील बळीराम घोरपडे सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटल मध्ये औषध उपचारासाठी दाखल झाले सुरवातीला त्यांच्या कडून १०,०००/- रुपये अनामत रक्कम म्हणून घेतले व त्यांना महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत दाखल करून घेतले व त्यांना २२ जुलै २०२० रोजी ६७,०००/- बिल देऊन डिस्चार्ज देण्यात आला पण त्यांची परिस्थिती गरिबीची असल्याने त्यांच्या कडे ती रक्कम भरण्यास पैसे नसल्याने त्यांना  वाढीव दोन दिवस ठेवून घेतले तर यांनी उधारी करून आणखी १०,०००/- रुपये भरले त्यावेळी त्यांना डिस्चार्ज दिला, पण रुग्ण सुनील बळीराम घोरपडे महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत दाखल असल्याने त्यांनी अन्याय विरुद्ध लढणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील यांच्या कडे आपली तक्रार नोंदवून जे वीस हजार सत्य साई प्लॅटिनम हॉस्पिटलने अन्याय कारक रित्या घेतले ते परत करावेत अशी मागणी केली.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील व सचिव सुनील शिरीषकर यांनी याची दखल घेत आयुक्तांना पत्र देत सुनील बळीराम घोरपडे यांचे पैसे परत देऊन सदर हॉस्पिटल वर कारवाई करावी असे नमूद केले आहे.
सुनील बळीराम घोरपडे यांनी यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे आभार व्यक्त केले आहेत.

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कोळेवाडी प्रकल्प ग्रस्तांना खावटीचे वाटप !!

आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते कोळेवाडी प्रकल्प ग्रस्तांना खावटीचे वाटप !!    
 
   
मुरबाड, (मंगल डोंगरे) :
मुरबाड तालुक्यातील कोळेवाडी बारवी प्रकल्पातील 108 पीडितांना 5 महिन्याची पावसाळ्यात उदरनिर्वाह करण्यासाठी औद्योगिक महामंडळाकडून देण्यात येणा-या खावटीचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते  वाटप करण्यात आले., 

  यावेळी आमदार किसन कथोरे ,पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ ,ठाणे जिल्हा परिषद नवनिर्वाचित समाजकल्याण सभापती नंदाताई उघडा, माजी उपसभापती अनिल घरत,सामाजिक कार्यकर्ते नागेश बांगरा, एम. आय. डी. सी. अधिकारी उपस्थित होते

  यावेळी आमदार किसन कथोरे यांनी कोळेवाडी च्या सद्यस्थितिच्या परिस्थिती ची पाहणी केली , मागील वर्षी या वाडीला बेटाचे स्वरूप आले होते, बारवी धरणाची उंची वाढविल्या मुळे या वाडी तील कुटूंबाना स्थलांतरित करायचे आहे. मात्र पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित असल्याने या परिसरातील कुटुंब आहे त्याच परिस्थितीत आहे , मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने बारवी धरणात सद्यस्थितीत 50टक्के च पाणी साठा आहे .त्यामुळे आज मितीस ह्या कुटूंबाना कुठलाही जीवघेणा प्रवास करावा लागत नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले .

Thursday 30 July 2020

रायगड जिल्ह्यातील विळा-भागाड MIDC मधील पोस्को कंपनी बनली कोरोनाचे केंद्र - स्थानिकांचे आरोग्य धोक्यात ! कंपनी माहिती दडवत असल्याचा कामगार नेते रमेश जाधव यांचा दावा !!

रायगड जिल्ह्यातील विळा-भागाड MIDC मधील पोस्को कंपनी बनली कोरोनाचे केंद्र -  स्थानिकांचे आरोग्य धोक्यात ! कंपनी माहिती दडवत असल्याचा कामगार नेते रमेश जाधव यांचा दावा !! 


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात असलेल्या पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी मुले स्थानिक ग्रामस्थ चिंतेत आज दिनांक २५/७/२०२० रोजी पोस्को कंपनीत 20 कोरोना संसर्गित रुग्ण सापडले आहेत. या आधी सुद्धा 7 ते 8 रुग्ण पोस्को कंपनीत सापडले आहेत. एवढं होऊन सुद्धा कंपनी अद्याप सुरू आहे कंपनी मध्ये आज सुद्धा 1500 च्या आसपस लोक आत मध्ये आहेत आणि रोजचे 300 ते 400 लोक रोज कंपनीत माणगांव रोहा पेन वरून ये जा करत आहेत. मोठ्या लोकाचे कंपनीवर हात असल्याने प्रशासन दुर्लक्ष करत आहे असे कळते.तरी रिपब्लिकन कामगार सेना पोस्को व्यवस्थापन विरोधात प्रशासनाला जाब विचारणार आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये जे भीतीचे वातावरण पसरले आहे. त्या वर शासनाने उत्तर द्यावे या करिता पाठपुरावठा करणार आहे. वेळ आली तर आंदोलन करावे लागले तर तेही करणार. पण कोणत्याही परिस्थितीत कंपनीला स्थानिक गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ करून देणार नाही. असे रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश प्रमुख तथा कामगार नेते रमेश जाधव यांनी म्हटले आहे.

कल्याण पंचायत समिती कोणासाठी? घोटसई येथील शेतकर्‍यांचा संतप्त सवाल, गैरसोयीचा कळस!

कल्याण पंचायत समिती कोणासाठी? घोटसई येथील शेतकर्‍यांचा संतप्त सवाल, गैरसोयीचा कळस!


कल्याण (संजय कांबळे) पंचायतराज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कल्याण पंचायत समितीवर खरेच लोकांचे राज्य आहे का असा प्रश्न उपस्थित  करण्यामागे कारण देखील तेवढेच गंभीर आहे. घोटसई येथील बळीराजाने चक्क पंचायत समिती कोणासाठी? असा प्रश्न त्यांना आलेल्या अनुभवावरून उपस्थित केला आहे
या बाबत सविस्तर माहिती अशी की कल्याण तालुक्यातील घोटसई गावातील प्रगतीशील शेतकरी जयवंत किसन मगर यांची अनखरपाडा येथील पेट्रोल पंपाच्या मागे सुमारे दोन एकर च्या आसपास शेतजमीन आहे.


गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना कृषी विभागाच्या एकाही योजनेचा लाभ मिळावा नाही. पण त्यांनी कधीही तक्रार केली नाही. परंतु लाॅकडाऊण मुळे परिस्थिती गंभीर असतानाही कशीतरी भात पेरणी केली. पिकही चांगले आले. पण पावसाने उघडिप दिल्याने चिंता वाढली. त्यातच त्यांना युरिया खते व इतर औषधे मिळेनात. यांची तक्रार करण्यासाठी व शेतकऱ्यांना कोणत्या योजना आहेत. काही सवलती आहे का हे विचारण्यासाठी ते सकाळी १२ते १च्या दरम्यान कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या कार्यालयात गेले होते. मात्र तेथे गेले तर कार्यालय बंद,
या बाबतीत मगर यांनी चौकशी केली तर कल्याण पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असल्याचे समजले. ही बैठक किती वेळ चालेल हे सांगता येणार नाही असे ही त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे बसायचे कोठे? पिण्याचे पाणी कोठे आहे. लघुशंकेसाठी कोठे जायचे यांची माहीती घेतल्यावर मात्र त्यांचा संताप अनावर झाला. त्यामुळे ही पंचायत समिती आहे का? ही फक्त पदाधिकाऱ्यांसाठी आहे का असा प्रश्न उपस्थित केला. येथे सर्वसामान्य नागरिकांना, शेतकऱ्यांना काय जागा आहे की नाही. असा उध्विघ्न सवाल करून ते निघून गेले.
तसे पाहिले तर कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहसा ग्रामीण भागातील लोक कल्याण ला येत नाहीत. परंतु कधीतरी वर्षे, सहामहिन्यातून एकदा येणाऱ्या बळीराजाची पंचायतराज व्यवस्थेबाबत असे मत असेल तर ते नक्कीच भूषणावह नाही. 
सध्या कल्याण पंचायत समितीवर शिवसेनेची सत्ता आहे असे सेनेचे पदाधिकारी सांगतात. तसे बॅनर देखील लावण्यात आले आहेत. परंतु स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की 20टक्के राजकारण आणि 80 टक्के समाजकारण सेना करते. पण तसे कल्याण पंचायत समितीच्या परिसरात वातावरण आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. नागरिकांना ग्रामपंचायतीकडून न्याय नाही मिळाला तर ते पंचायत समितीला खेटे मारतात. पण तेथेही असे प्रकार होणार असल्यास तालुक्यात पंचायतराज आहे का असा प्रश्न विचारला जातोय. का केवळ ठेकेदारासाठी व कामे मिळविण्यासाठी कल्याण पंचायत समितीचा वापर केला जातो अशी शंका मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने व्यक्त केली. 

प्रतिक्रिया "मी कित्येक वर्षे कल्याण पंचायत समिती मध्ये पाय ठेवला नाही, अद्याप पर्यंत कृषी विभागाची एक  योजना आमच्या कडे आली नाही. परंतु आता खते, कीटकनाशके किंवा इतर काही शेतकऱ्यांसाठी आहे का याची माहिती घेण्यासाठी कृषी विभागात आलो होतो पण ते बंद होते" - जयवंत मगर, शेतकरी घोटसई. 
" असे घडणार नाही पण तसे झाले असेल तर मी ताबडतोब या बाबतीत संबंधितांना विचारतो "-रमेश बांगर, उपसभापती, कल्याण प स, 
 

स्वाभिमानी पक्षाचे आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांनी घेतली प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील यांच्या पत्राची दखल !

स्वाभीमानी पक्षाचे आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांनी घेतली प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील यांच्या पत्राची दखल !


उल्हासनगर : प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील व सचिव सुनील शिरीषकर, तसेच कार्यकर्ते यांनी २० जुलै २०२० रोजी पालिका आयुक्तांना निवेदन दिले व उल्हासनगर महानगर पालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने आरोग्य सुविधांची कमतरता होत असून त्याचा फटका पालिकेच्या हद्दीतील सर्व सामान्य रुग्णांना जाणवत आहे, म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या. त्यात नवी मुंबई महानगर पालिकेने ज्या प्रकारे वाशी रेल्वे स्टेशनच्या येथील सिडको प्रदर्शन सेंटर ताब्यात घेतले, त्याच धर्तीवर उल्हासनगर पालिकेने ५०० बेडचे नवीन कोविड सेंटर उभारणी करावे.

१. प्रत्येक खाजगी रुग्णालयाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेले रिकाम्या बेडची माहिती रोजच्या रोज दर्शनी भागात लावणे बंधनकारक असावे.

२.राज्य सरकारने कोविड उपचार करण्यासाठी ठरवून दिलेले दर रूग्णांच्या महितीकरिता उपलब्ध करून देणे.

३.मनपा हद्दीतील खाजगी रुग्णालयाने डिपॉजिटच्या नावाखाली रक्कम जमा करण्यास सांगून लोकांची आर्थिक लूट करत आहे त्याला पायबंद करण्यात यावा व संबधित रुग्णालयावर नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी.

४.अनेक ठिकाणी रुग्ण पॉजिटिव सापडत असताना ज्या प्रकारे रुग्णाच्या संपर्कात आलेल्या संशयीत व्यक्तीचे ट्रेसिंग झाले पाहिजे तसे होताना दिसत नाही, म्हणून संबधित अधिकाऱ्यांना सूचना देवून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्वी प्रमाणे करणाचे आदेश द्यावेत.

५.पालिकेच्या हद्दीतील रुग्णांना कोविड व्यतिरिक्त आजारासाठी तत्काळ बेड उपलब्ध करून देणे.

६.महात्मा फुले जनआरोग्य योजनेची कडक अंमलबजावणी करून गरजू आणि गरीब लोकांना त्यांचा फायदा देण्यात यावा.

७.बेड उपलब्ध करून देण्याची जबाबदारी शासनाने घ्यावी.

८.उल्हासनगरातील साई प्लॅटिनम हाॅस्पिटल महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून वगळावं. तिथे आजवर केलेल्या कोविड उपचारांचं वत्यांनी दिलेल्या आजवर पर्यंतच्या बिलाचे लेखा परीक्षण व्हावे .

९.वैद्यकीय आस्थापना अधिनियम तातडीने लागू करावा. उपचारांवरील खर्चाचं नियमन करावे .

या मागण्या रास्त व जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेच्या असल्याने ‌त्याची तातडीने दखल घेऊन स्वाभिमानी पक्षाचे आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांनी आयुक्त, उल्हासनगर महानगर पालिका यांना सदर अर्जावर अंमलबजावणी करण्यास सांगितले नाहीतर आंदोलन उभे केले जाईल असे म्हटले आहे.

ठाणे जिल्हाध्यक्ष अॅंड स्वप्निल पाटील व सचिव सुनील शिरीषकर यांनी प्रहार जनशक्ती पक्ष हा पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चु कडू यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रश्र्नांची नेहमीच दखल घेऊन त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत राहिल, तसेच आमदार देवेंद्र महादेवराव भुयार यांचे सुध्दा आभार व्यक्त केले.

"०९ ऑगस्ट २०२० महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक करणार आमरण उपोषण"! _*-ऑटोरिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृति समिती , महाराष्ट्र्र राज्यच्या प्रमुख प्रतिनिधींच्या बैठकीत झाला निर्णय...*_

"०९ ऑगस्ट २०२० महाराष्ट्रातील ऑटोरिक्षा चालक करणार आमरण उपोषण"!

   _*-ऑटोरिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृति समिती , महाराष्ट्र्र राज्यच्या प्रमुख प्रतिनिधींच्या बैठकीत झाला निर्णय...*_

कल्याण, : ऑटोरिक्षा टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य च्या प्रमुख प्रतिनिधींची आज सायंकाळी आठ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. या बैठकीमध्ये  सर्वानुमते पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे -

*_गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्रातील ऑटोरिक्षाचालक-मालक हे त्यांचा व्यवसाय बंद असल्यामुळे तथा कोणत्याही उत्पन्नाचे साधन उपलब्ध नसल्यामुळे मेटाकुटीस आले आहेत. अशा परिस्थितीत या ऑटोरिक्षा चालकांना महाराष्ट्र शासनाने तातडीने आर्थिक मदत देऊ करावी, अशा प्रकारची निवेदने क्रांती कृती समितीच्या माध्यमातून शासनास देण्यात आली आहेत. परंतु, शासनाने ही बाब  गांभीर्याने घेतलेली नाही. ह्याबाबत तमाम ऑटोरिक्षा चालक मालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.  याच कालावधीमध्ये महाराष्ट्रातील आठ ऑटोरिक्षा चालकांनी  आत्महत्या केली आहे.  कित्येक ऑटोरिक्षाचालक हे नैराश्येमध्ये जगत आहेत. अशा परिस्थितीत ऑटो रिक्षा चालकांना वाचविण्यासाठी  ठोस भूमिका घेणे महत्त्वाचे आहे. त्याकरीता आज सायंकाळी आठ वाजता झालेल्या ह्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सर्वांनमते निर्णय घेण्यात आलेला आहे की, दिनांक ०९ऑगस्ट २०२० रोजी  प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करून आंदोलन करावे. महाराष्ट्रातील तमाम चालक मालक त्यांच्या सर्व संघटनांना निवेदन करण्यात येते की, आपण सदरचा संदेश आपल्या विभागांमधील सर्व ऑटोरिक्षा चालक -मालकांपर्यंत पोहोचविणे आणि दिनांक ०९ ऑगस्ट २०२० रोजी संपूर्ण देशामध्ये "क्रांती दिन" म्हणून साजरा केला जातो तो आपण "ऑटोरिक्षा क्रांती दिन"म्हणून साजरा करणार आहोत. त्या निमित्ताने हे आमरण उपोषण आंदोलन आपण करणार आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी, सर्वांनी ह्या आंदोलनात सहभागी व्हावे ही विनंती, धन्यवाद!_*

*ऑटोरिक्षा चालकांचा प्रमुख मागण्या :*

*_१. प्रत्येक ऑटोरिक्षा चालकास लॉकडाऊन कालावधीतील प्रत्येक महिन्याकाठी रु. ५०००/- ची आर्थिक मदत शासनाने द्यावी._*

*_२.आत्महत्याग्रस्त ऑटोरिकहचालकांच्या प्रत्येक कुटुंबास रु. १०,०००/- ची मदत ताबडतोब शासनाने द्यावी._*

*_३. ऑटोरिक्षाचालकांना कर्जमाफी मिळावी._*

*_४.ऑटोरिक्षा चालकांना कोविड योद्धा म्हणून घोषित करून त्यांना रु.५० लाखांचे विमा कवच जाहीर करावे._*

*_५. घोषित केलेल्या कल्याणकारी मंडळाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी._*

आपले ,
*कासम मुलाणी-* नवी मुंबई
  9892191925

*श्रीकांत आचार्य-* पुणे 9822500511

*त्रिंबक स्वामी -* लातूर 9225469999

*डी. एम. गोसावी -* मुंबई 9082787803

*सौ. अश्विनी मोरे -* ठाणे 9933598612

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आरोपींना पकडून, अपहरण झालेल्या मुलीची सुखरूप सूटका करण्यास मुंब्रा पोलिसांना यश......

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आरोपींना पकडून, अपहरण झालेल्या मुलीची सुखरूप सूटका करण्यास मुंब्रा पोलिसांना यश......


ठाणे, अमित जाधव : दिनांक 4 फेब्रुवारी 20 रोजी मेस्को स्कूल मुंब्रा कौसा या शाळेमध्ये गेलेली अल्पवयीन मुलगी न मिळून आल्याने तक्रारदार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला गेला होता .मोबाईल लोकेशन द्वारे आरोपीला पकडणार याची  माहिती मिळताच लोकेशन बंद करून  आरोपीने  इंस्टाग्राम आयडी  चा वापर करित ईचितांशी संपर्क करीत आहे याची माहिती मिळून पोलिस निरीक्षक शहाजी शेलके यांनी सायबर सेल व पोलिस उपायुक्त  परिमडंल१ यांची मदत घेऊन इंस्टाग्राम कंपनी कडे सातत्याने पाठपुरावा करून संशयित ईश्टांग्राम आयडी चा वापर झालेल्या आरोपिच्या सभांवीत लोकेशन बाबत माहिती मिळवून तन्विर अहमद आजीज उद्दीन शेख व इम्तियाज आली लियातक आली व अबित मजिद शेख , माजीज अजीज शेख, फर्जाना माझीज शेख, जावेद माझीज शेख, वरील सर्व जळगाव उस्मानिया पार्क येथून दी.28 जूलै 2020 रोजी  अटक करून अपहरण केलेल्या मुलीची सुखरूप सुटका केली.
सदर कारवाई मा.श्री. विवेक फणसाळकर पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा.श्री सुरेश मेकला पोलीस सहआयुक्त, मा.श्री अनिल कुंभारे अप्पर पोलीस आयुक्त मा.श्री सुभाष बोरसे पोलीस उपायुक्त परिमंडळ१ ठाणे, मा.श्री सुनील घोसाळकर सहाय्यक पोलीस आयुक्त कळवा विभाग वरिष्ठ पोलीस पोलीस निरीक्षक मुंब्रा पोलीस स्टेशन श्री मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि शहाजी शेळके पो.शी योगेश पाटील म.पो.शी पाताडे त्यांनी केली असून तांत्रिक मदत व विश्लेषणात सायबर सेल कार्यालय तिल सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल भंडारे, पो.ना नामदेव वार गुडे,पो.शी समाधान माळी यांनी मोलाची भूमिका पार पडली आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक शहाजी शेळके करीत आहे.


जि.प. प्रा. शाळेत मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी सेमी इंग्लिश मधून 10 वी त प्रथम !!

*जि.प. प्रा. शाळेत मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी  सेमी इंग्लिश मधून  10 वी त  प्रथम !!


मुरबाड (मंगल डोंगरे ) हल्ली समाजातील प्रत्येकाला जिवन जगायला सरकारी नोकरी,फिरायला सरकारी गाडी,राहायला सरकारी बंगला हवा असतो.मात्र सर्वकाही सरकारी सुविधांची अपेक्षा करणा-यांची मुलं सरकारी जिल्हा परिषद शाळेत शिकवायला नको असतात.त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे खुद्द जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकच असतात. गोरगरीबांची मुलं ह्यांच्या देखरेखी खाली सरकारी शाळेत शिकवली जातात.पण याच शिक्षकांची मुलं इंग्रजी माध्यमातून ,काँन्व्हेट मधून शिकली पाहिजेत. म्हणून याच शिक्षक मायबापाचा अट्टहास असतो.परंतु या शापित शब्दाना तिलांजळी देत,मुरबाड तालुक्यातील धानिवली गावचे शिक्षक असलेल्या नितीन दामोदर राणे या शिक्षकांने खरा इतिहास घडवला आहे.ते स्वतः जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक असुन त्यांनी  आपल्या शैक्षणिकतेची सत्वपरीक्षा स्वतःच घेण्याचे ठरविले.आणि आपण ज्या शाळेवर गोरगरीब,आदिवासींच्या मुलांना शिकवितो,त्याच शाळेत,त्याच विद्यार्थ्यां सोबत आपल्या लाडक्या मुलाला शिकविण्याचे ठरविले. आणि इयत्ता. पहिले ते 4 थी  पर्यंत शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी  संख्या असलेल्या फणसोली कातकर वाडी येथे शाळेत घातले.तिथे 4 पर्यंत शिक्षण घेवून पुढे त्यानंतर हाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी इयत्ता पाचवीला मुरबाड च्या न्यु इंग्लीश स्कूल मध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून शिकु लागला.आणि नुकताच हाती आलेल्या दहावीच्या निकाला मध्ये तो सेमी इंग्रजी माध्यमात घवघवीत यश मिळवून न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.या विद्यार्थ्यांचे नाव आहे ओमकार नितीन राणे,राहणार मुरबाड शेजारील धानिवली गावचा तो रहिवासी असुन त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे  सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.
   ओमकार राणे ला इयत्ता दहावीत .92.60 ℅.....  गुण मिळाले आहेत.  त्याची शैक्षणिक वाटचाल हि,    जि. प .प्रा. शाळा फणसोली(कातकरीवाडी) येथुन झाली आहे.तिथे तो इ. 1ली ते 4थी पर्यंत शिकलेला विद्यार्थी कु. ओमकार नितीन राणे हा 10वी सेमी 92:60 % ने न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड मध्ये प्रथम आला.. 
विशेषतः आज इंग्लिश मिडीयम चं फॅड चालू आहे. बरेचशे शिक्षक हे खेडे पाड्यात राहणारे व आपल्या गावातील शाळेवर नोकरी करणारेच,पण त्यांच्या मुलांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळावं म्हणून जिवाचा आटपिटा करत तालुक्याच्या किंवा आणखी मोठ्या शहरात स्थलांतर करतात.जर आपली मुलं आपण असलेल्या खेड्या पाड्यातील जि.प.मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण घेऊ शकत नाहीत. हि खात्री त्या जि.प.शिक्षक पालकांना नसेल, तर गोरगरीबांच्या,आदिवासींच्या मुलांना हे शिक्षक दर्जेदार शिक्षण देत असतील काय?हा प्रश्न निर्माण होतो.परंतु श्री नितीन दामोदर राणे व सौ अर्चना नितीन राणे ह्या शिक्षक दांपत्याने दोघे ही प्राथमिक शिक्षक असताना ... आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत दाखल केलं..आणि  आज त्याच ओमकार ने चांगलं यश संपादन केलं आहे...हा आपल्या विद्यादानावर असलेला आपला विश्वास खरा ठरवला आहे.
      प्रत्येक शिक्षकाने आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत दाखल करायला हवं त्याने इतर पालकांचा ही मराठी शाळेकडे पाहण्याचा कल नक्कीच बदलेल... 
      हाच  आदर्श प्रत्येक शिक्षकाने घ्यावा.अशी अपेक्षा जि.प.प्राथमिक शिक्षक नितीन राणे गुरुजी व अर्चना राणे मँडम  यांनी आमचे मुरबाड तालुका  प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे.

लोकनेते दीपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित् डीबीएन ठाणे जिल्ह्याचे विविध उपक्रम !!

लोकनेते दीपकभाऊ निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित् डीबीएन  ठाणे जिल्ह्याचे विविध उपक्रम !!


कल्याण (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) व दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते दीपकभाऊ निकाळजे यांचा 27 जुलै वाढदिवस अखंड महाराष्ट्रभर covid-19 बाबत शासनाचे सगळे निर्देश पाळून साजरा होत आहे. यात दीपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना ठाणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली लोकनेते दीपक निकाळजे यांच्या वाढदिवसानिमित्त माता रमाई बुद्ध विहार नांदिवली कल्याण पूर्व जिल्हा ठाणे येथे वृक्षारोपण,  शैक्षणिक वस्तूंचे वाटप, रेशन धान्य वाटप, मास वाटप, आरसीजिकल अल्बम थर्टी व कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या असे उपक्रम राबविण्यात आले. सदर कार्यक्रमाला  संत रोहिदास समाज प्रबोधन मंडळ महाराष्ट्र राज्याचे प्रमुख कार्यवाह अँड.दिलीप वाळंज, कल्याण डोंबिवली महानगरपालिका पतसंस्थेचे अध्यक्ष, कामगार नेते प्रशांत गायकवाड, ,रिपाई ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष मंगेश जाधव, रिपाई कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष धर्मा वक्ते, जिल्हा सचिव प्रशांत बनसोडे, युवक जिल्हाध्यक्ष सुमित माने ,कल्याण शहराध्यक्ष संजय जाधव, डी बी एन संघटना कल्याण-डोंबिवली जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड, कल्याण  शहराध्यक्ष (आरोग्य विभाग) डॉ विशाल निकाळजे,  कल्याण संघटक  कुशल निकाळे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. डी बी एन संघटना ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष मनोज बेळमकर ,ठाणे जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप शेट्टी, जिल्हा सचिव विनोद शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दीपक कांबळे, ठाणे जिल्हा ग्रामीण कार्याध्यक्ष अनिल धनगर ,ठाणे जिल्हा संघटक शरद डोंगरे ,ठाणे जिल्हा ग्रामीण सहसचिव संदीप जाधव, जिल्हा कोशाध्यक्ष चिराग आनंद ,ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर मोरे, जिल्हा उपकार्याध्यक्ष दीपक मोरे, जिल्हा कायदे विषयक सल्लागार  ऍड .सतीश सावंत ,जिल्हा कार्यालय संपर्कप्रमुख सचिन भोईर ,जिल्हा संघटक प्रदीप जावरकर, जिल्हा सल्लागार दिलीप पुंडे, जिल्हा संघटक मंदार वाघमारे ,ठाणे जिल्हा ग्रामीण संघटक आनंद वीर, ठाणे जिल्हा सहसचिव ज्ञानेश्वर  हिवाळे,  अंबरनाथ तालुका संघटक मोहन सलाटे, कल्याण-डोंबिवली  शहर जिल्हा कार्याध्यक्ष मनोज गायकवाड ,कल्याण शहराध्यक्ष अक्षय गायकवाड ,माता रमाई बुद्ध विहार कमिटीचे सल्लागार  अपेक्षा वानखेडे दळवी  ,अध्यक्षा कल्पना चव्हाण,  नरेश चव्हाण  ,मुकुंद कदारे, भंडारे तसेच दीपक सरोदे , शुद्धोधन  डोंगरे  यांनी सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. डी बि एन संघटना ठाणे जिल्हा सहसचिव पदी ज्ञानेश्वर हिवाळे तर अंबरनाथ तालुका संघटक पदी मोहन सलाटे यांची नियुक्ती ठाणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांनी यावेळी केली कोविड नाईन्टीन बाबत शासनाने दिलेल्या निर्देशांचे पालन करून कोरोणा वर मात करा असे सांगून दीपकभाऊ निकाळजे यांना ठाणे जिल्ह्याच्या वतीने वाढदिवस च्या शुभेच्छा सदर वाढदिवस सोहळा व सामाजिक उपक्रमाचे आयोजक  ठाणे जिल्हा अध्यक्ष मिलिंद वानखेडे यांनी दिल्या आलेल्या मान्यवरांचे आभार बुद्ध विहार कमिटीचे सल्लागार अपेक्षा वानखेडे- दळवी यांनी मानले

सोमवार दिनांक 27.07.2020 रोजी नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या संस्थेच्या महिलांची नागरिकांच्या लाईट बिलाच्या तक्रारी संदर्भात MSEB ऑफिसला भेट.!

सोमवार दिनांक 27.07.2020 रोजी नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनायझेशन या संस्थेच्या महिलांची नागरिकांच्या लाईट बिलाच्या तक्रारी संदर्भात MSEB ऑफिसला भेट.!


खेड ( प्रतिनिधी ) : -
लॉकडाऊन नंतरच्या काळात नागरिकांना भरमसाठ लाईट बिल आले आहे. मुळातच मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यात मीटरचे रीडिंग झाले नसल्यामुळे आणि जून महिन्यात मीटरचे रीडिंग झाले आणि आता भल्या मोठ्या रकमेची बिले नागरिकांना येत आहेत. त्यामुळे खेड येथील नागरिक त्रस्त झाले आहेत विशेषतः महिला वर्ग ..आणि संतप्त महिला वर्गाने नॅशनलिस्ट कंझ्युमर प्रोटेक्शन ऑर्गनयझेशनच्या महिलांना संपर्क साधला. 
नागरिकांच्या या तक्रार निवारणार्थ या सर्व महिलांनी खेड MSEB office ला भेट देऊन नागरिकांना बिल कपात व्हावी असे निवेदन दिले तसेच नागरिकांनी तक्रार अर्ज दिला.
श्री.गावडे , श्री.झाडे आणि श्री. कुलकर्णी या सर्व शाखाधिकारी कडे चर्चा केली त्यातून समाधान पूर्वक माहिती मिळाली तसेच MSEB office मधून छान सहकार्य मिळाले 
मुळातच बिलात स्थिर आकार शुल्क Rs.100, वीज वाहन शुल्क , मीटर रीडिंग नुसार येणारी रक्कम आणि ह्या वरील सर्व रकमेवर येणारे 16%  शुल्क अश्या प्रकारे बिलची एकूण रक्कम नमूद केली जाते, उपरोक्त उपयोगी माहिती सर्व अधिकाऱ्यांकडून मिळाली 
तसेच 9.8.2020 या तारखेपर्यंत बिल भरल्यास 2% डिस्काउंट मिळणार आहे अन्यथा आपण हेच बिल 3 टप्प्यात म्हणजे जुलै महिन्यापासून येणाऱ्या तीन महिन्यात भरू शकतो, अशीदेखील सविस्तर माहिती सर्व पदाधिकारी महिलांना mseb ऑफिस मधून मिळाली.
तसेच दिनांक 1.4.2020 पासून प्रत्येक युनिट मध्ये दरवाढ झाली असून त्याबाबत ही या संस्थेच्या महिलांनी नाराजगी दर्शविली आहे.
नागरिकांना बिलात येणारे वीज वाहन शुल्क, आणि 16% वीज आकार शुल्क कमी करण्यात यावेत , यासाठी या संस्थेच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांकडून ऊर्जा मंत्री आणि पालक मंत्र्यांना निवेदन देण्यात येईल आणि त्यांच्याडून येणाऱ्या अपेक्षित बदलासाठी काही काळ वाट बघावी लागेल.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्षा सौ.सायलीताई कदम, सौ पूजा तलाठी. तालुका अध्यक्ष सौ.मीनल गांधी, शहर अधयक्ष दनिश्ता नाडकर , प्राची तोडणकर, प्रीती चिखले, रोशनी बाविस्कर आदी महिला उपस्थित होत्या.

जि.प. प्रा. शाळेत मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी सेमी इंग्लिश मधून 10 वीत प्रथम !!

जि.प. प्रा. शाळेत मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी सेमी इंग्लिश मधून 10 वीत प्रथम !!


मुरबाड (मंगल डोंगरे ) हल्ली समाजातील प्रत्येकाला जिवन जगायला सरकारी नोकरी,फिरायला सरकारी गाडी,राहायला सरकारी बंगला हवा असतो.मात्र सर्वकाही सरकारी सुविधांची अपेक्षा करणा-यांची मुलं सरकारी जिल्हा परिषद शाळेत शिकवायला नको असतात.त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे खुद्द जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकच असतात. गोरगरीबांची मुलं ह्यांच्या देखरेखी खाली सरकारी शाळेत शिकवली जातात.पण याच शिक्षकांची मुलं इंग्रजी माध्यमातून ,काँन्व्हेट मधून शिकली पाहिजेत. म्हणून याच शिक्षक मायबापाचा अट्टहास असतो.परंतु या शापित शब्दाना तिलांजळी देत,मुरबाड तालुक्यातील धानिवली गावचे शिक्षक असलेल्या नितीन दामोदर राणे या शिक्षकांने खरा इतिहास घडवला आहे.ते स्वतः जि.प.प्राथमिक शाळेचे शिक्षक असुन त्यांनी  आपल्या शैक्षणिकतेची सत्वपरीक्षा स्वतःच घेण्याचे ठरविले.आणि आपण ज्या शाळेवर गोरगरीब,आदिवासींच्या मुलांना शिकवितो,त्याच शाळेत,त्याच विद्यार्थ्यां सोबत आपल्या लाडक्या मुलाला शिकविण्याचे ठरविले. आणि इयत्ता. पहिले ते 4 थी  पर्यंत शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी  संख्या असलेल्या फणसोली कातकर वाडी येथे शाळेत घातले.तिथे 4 पर्यंत शिक्षण घेवून पुढे त्यानंतर हाच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी इयत्ता पाचवीला मुरबाड च्या न्यु इंग्लीश स्कूल मध्ये सेमी इंग्रजी माध्यमातून शिकु लागला.आणि नुकताच हाती आलेल्या दहावीच्या निकाला मध्ये तो सेमी इंग्रजी माध्यमात घवघवीत यश मिळवून न्यू इंग्लिश स्कूल मध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला आहे.या विद्यार्थ्यांचे नाव आहे ओमकार नितीन राणे,राहणार मुरबाड शेजारील धानिवली गावचा तो रहिवासी असुन त्याच्या या घवघवीत यशाबद्दल त्याचे  सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.
   ओमकार राणे ला इयत्ता दहावीत .92.60 ℅.....  गुण मिळाले आहेत.  त्याची शैक्षणिक वाटचाल हि,    जि. प .प्रा. शाळा फणसोली(कातकरीवाडी) येथुन झाली आहे.तिथे तो इ. 1ली ते 4थी पर्यंत शिकलेला विद्यार्थी कु. ओमकार नितीन राणे हा 10वी सेमी 92:60 % ने न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड मध्ये प्रथम आला.. 
विशेषतः आज इंग्लिश मिडीयम चं फॅड चालू आहे. बरेचशे शिक्षक हे खेडे पाड्यात राहणारे व आपल्या गावातील शाळेवर नोकरी करणारेच,पण त्यांच्या मुलांना चांगल्या क्वालिटीचं शिक्षण मिळावं म्हणून जिवाचा आटपिटा करत तालुक्याच्या किंवा आणखी मोठ्या शहरात स्थलांतर करतात.जर आपली मुलं आपण असलेल्या खेड्या पाड्यातील जि.प.मराठी माध्यमातून दर्जेदार शिक्षण घेऊ शकत नाहीत. हि खात्री त्या जि.प.शिक्षक पालकांना नसेल, तर गोरगरीबांच्या,आदिवासींच्या मुलांना हे शिक्षक दर्जेदार शिक्षण देत असतील काय?हा प्रश्न निर्माण होतो.परंतु श्री नितीन दामोदर राणे व सौ अर्चना नितीन राणे ह्या शिक्षक दांपत्याने दोघे ही प्राथमिक शिक्षक असताना ... आपल्या मुलाला जिल्हा परिषद शाळेत दाखल केलं..आणि  आज त्याच ओमकार ने चांगलं यश संपादन केलं आहे...हा आपल्या विद्यादानावर असलेला आपला विश्वास खरा ठरवला आहे.
      प्रत्येक शिक्षकाने आपल्या पाल्याला जिल्हा परिषद शाळेत दाखल करायला हवं त्याने इतर पालकांचा ही मराठी शाळेकडे पाहण्याचा कल नक्कीच बदलेल... 
      हाच  आदर्श प्रत्येक शिक्षकाने घ्यावा.अशी अपेक्षा जि.प.प्राथमिक शिक्षक नितीन राणे गुरुजी व अर्चना राणे मँडम  यांनी आमचे मुरबाड तालुका  प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना व्यक्त केली आहे.

गौरी गणपती सणा निमित्त कोकणात येणाऱ्या गणेशभक्तां करिता आवश्यक त्या सोईसुविधा मिळण्यासाठी प्रयत्नशील -'पालकमंत्री आदितीताई तटकरे'.

गौरी गणपती सणा निमित्त कोकणात येणाऱ्या गणेशभक्तां करिता आवश्यक त्या सोईसुविधा मिळण्यासाठी प्रयत्नशील -'पालकमंत्री आदितीताई तटकरे'.


       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) आगामी गौरी-गणपती सणाकरिता मुंबईहून गणेशभक्त आपापल्या गावी कोकणात यायला लागतील. त्यांना योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी सांगितले. 
      पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांना याविषयी पत्रान्वये विनंती केली आहे. बरेचसे गणेशभक्त हे एसटी प्रवासानेच कोकणात येतात. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या व्यक्तींसाठी स्थानिक प्रशासनाने विलगीकरणाचे दिवस निश्चित करून कोकणात येणाऱ्या व्यक्तीने दिनांक ०७ ऑगस्ट २०२० पूर्वीच आपल्या गावी यावे,असे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर अद्याप एसटी  प्रवासासंदर्भात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा कोणताही निर्णय झालेला नाही तसेच येणाऱ्या गणेश भक्तांना ई- पास मिळण्यासंदर्भात आणि खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून अवाजवी भाडे आकारणी या गैरसोयीलाही सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यापुढे राज्य परिवहन मंडळाची बस सेवा हाच एक उत्तम पर्याय आहे. यामुळेच पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांना या संदर्भात लवकरात लवकर योग्य निर्णय घेण्याविषयी पत्रान्वये विनंती केली आहे.

Wednesday 29 July 2020

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर !!ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुका अव्वल,94 .43 ℅ लागला निकाल,,!

दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर !!ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालुका अव्वल,94 .43 ℅ लागला  निकाल,,!


मुरबाड (मंगल डोंगरे ) : आज आँनलाईन जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात मुरबाड तालुका ठाणे जिल्ह्यात अव्वल ठरला असुन ,तालुक्याचा निकाल 94.43 ℅ इतका लागला आहे. '43 शाळांपैकी  15 शाळांचे निकाल लागले  100 %'
       मुरबाड तालुक्यात एकूण 43 माध्यमिक शाळा असुन ,आज जाहीर झालेल्या निकालात तब्बल 15 शाळांनी 100 ℅ निकाल लावत बाजी मारली आहे.,फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या 10 वी च्या परीक्षेत तालुक्यातुन  एकूण 4807 ,विद्यार्थ्यांनी फाँर्म भरले होते.त्यापैकी 4794 विद्यार्थ्यानी प्रत्यक्षात परीक्षा दिली होती.त्यात आज आँनलाईन जाहीर झालेल्या निकाला मध्ये 4527 विद्यार्थी हे यशस्वीपणे पास झाले असुन, 267, विद्यार्थी नापास झाले आहेत. 
        ज्या शाळांचे निकाल 100 ℅ लागले आहेत.त्यामध्ये अभिनव विद्यामंदिर कासगाव,शासकिय माध्यमिक शाळा मोरोशी,शासकीय माध्यमिकआश्रम शाळा मुरबाड, माध्यमिक विद्यालय सरळगाव,माध्यमिक शाळा.दहिगाव,महाराष्ट्र मिलिटरी स्कुल तळवली (बा)प्रेरणा विद्यालय मुरबाड, सरस्वती विद्यालय, सायले,माध्यमिक आश्रम शाळा माळ,नवज्योत शाळा खापरी, अनुदानीत आश्रम शाळा तळवली(बा )स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडियम मुरबाड, विसडम इंग्लिश स्कूल मुरबाड, एस.व्ही. शेट्टी स्कुल मुरबाड, व टिळक स्काँलर अँकेडमी मुरबाड अशा शाळांचा समावेश आहे.आजचा हा दहावीच्या परीक्षेचा निकाल पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थी व शिक्षकांनी घेतलेली अपार मेहनत व परीश्रम दिसुन येत आहेत. या यशाबद्दल तालुक्यातील सर्वच स्तरातुन यशस्वी विद्यार्थी, पालक आणि गुरुजनांचे कौतुक होत आहे.

सिग्‍नल शाळेचा विद्यार्थी दशरथ पवारला दहावीत ६६ टक्‍के !!

सिग्‍नल शाळेचा विद्यार्थी दशरथ पवारला दहावीत ६६ टक्‍के !!


ठाणे, दि. २९ :दोन वर्षांपुर्वी दहावीच्या  निकालात सिग्नल शाळेच्या दोन मुलांनी उज्वल यश संपादन केले होते यावर्षी शाळेचा एक विदयार्थी दहावीत होता त्‍याने देखील ६६ टक्‍के मिळवत सिग्नल शाळेच्या यशाची कमान अधिक उंचावली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पुलाखाली राहून दशरथने हे यश संपादीत केले आहे.
समर्थ भारत व्यासपीठ व ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन हात नाका पुलाखाली राहत असलेल्या व महाराष्‍ट्रातील दुष्काळी भागातील स्थलांतरीतांच्या मुलांसाठी सिग्‍नल शाळा हा अभिनव उपक्रम पाच वर्षांपुर्वी सुरू झाला. दोन वर्षांपुर्वी या शाळेतील दोन विदयार्थी दहावी उत्तीर्ण झाले. आज दहावीचा निकाल जाहीर झाला त्‍यात सिग्‍नल शाळेचा दशरथ जालिंदर पवार हा विदयार्थी ६६ टक्‍के गुण मिळवुन दहावीची परिक्षा उत्तिर्ण झाला. महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळ सभापती विकास रेपाळे, शिक्षण विभागाचे उपायुक्‍त मनिष जोशी यांनी सातत्याने दिलेल्या प्रोत्साहनामुळे दशरथ पवार याला हे उज्‍वल शैक्षणिक यश संपादित करता आले.
दशरथ जालिंदर पवार याचे आई आणि वडील हे अनेक वर्षांपासुन सिग्‍नलवर गजरा विकण्याचा व्यवसाय करतात. सिग्नल शाळा सुरू झाल्‍यानंतर दशरथ शाळेत दाखल झाला. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शाळा झाल्यानंतर आई-वडिलांना गजरे विकण्यास मदत करणे आदी कामे करून उशीरा रात्री पर्यंत अभ्यास करून दशरथने दहावीत ६६ टक्‍के कमवीले. यापुढे त्याला तंत्रशिक्षण घेण्याची इच्छा असुन त्या दृष्टीने समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीने त्याच्या भविष्यातील उच्च शिक्षणासाठी देखील सहाय्य करणार आहे. 
सिग्नल शाळेच्या प्रकल्प प्रमुख आरती परब, शिक्षिका प्रियांका पाटील, संगिता एलल्ला, सुप्रिया कर्णीक, पौर्णीमा करंदीकर, सुमन शेवाळे, सौ. अवचट मॅडम यांच्या सहकार्याने दशरथ हे शैक्षणिक यश प्राप्त करू शकला.

*पनवेल मनपाने ५०० बेडचे सुसज्य कोरोना रुग्णालय उभारावे, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*...

*पनवेल मनपाने ५०० बेडचे सुसज्य कोरोना रुग्णालय उभारावे, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*...


पनवेल (अण्णा पंडित) : कोरोना महामारीच्या काळात पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय वगळता शासकीय रुग्णालय नसल्याने नागरिकांची उपचारासंदर्भात तारांबळ उडत आहे. देशात कोरोना संकटाने थैमान घातले असतानाच नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांसाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. 


ज्या खाजगी रुग्णालयांशी मनपाने करार केले आहे, तेथे किती बेड शिल्लक आहेत याची लोकांना माहिती मिळत नाही. ती माहिती रुग्णालयांत दर्शनी भागात प्रसिद्ध करण्याची मागणीही केली आहे. त्याचबरोबर कोरोना आजाराच्या उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार खाजगी रुग्णालयांना शुल्क आकारण्यास सांगावे, तसेच अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पनवेल मनपाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष गवस, कामगार संघटनेचे चंद्रकांत उत्तेकर, नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर, सुनील शिरिषकर, रोहित देखणे, राहुल तेलंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Tuesday 28 July 2020

कोरोना संकटातही शिक्षक -विद्यार्थी संवाद ठेवणारे शिक्षक-भालचंद्र गोडांबे !!

कोरोना संकटातही शिक्षक -विद्यार्थी संवाद ठेवणारे शिक्षक-भालचंद्र गोडांबे !! मुरबाड ( मंगल डोंगरे ) :
   गेले चार महिने संपूर्ण जगभर कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. जगच ठप्प झालेले पाहायला मिळाले . उद्योग ,व्यवसाय ,व्यापार ,शिक्षण ,सर्वच बंद. महाराष्ट्र शासनाने दहावी -बारावीच्या परिक्षा घेऊन बारावीचा निकाल घोषित केला . दहावीचा निकाल आज लागणार आहे  परंतु नविन शाळा प्रवेश व प्रत्यक्ष अध्यापन कधी सूरु करायचे याबाबत शासन ठाम भूमिका  घेताना दिसत नाही. दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या १५ जून पासून सूरु होतात परंतु कोरोना संकटात ते शक्य नसल्याने आॕनलाईन अध्यापनात  अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .कारण ग्रामीण भागात तर अनेक पालकांकडे मोबाईल फोनच उपलब्ध नाहीत. तर काही ठिकाणी नेटवर्क नसतो. आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात एका घरात दोन ते तीन मुले असतील तर वडिलांच्या एका फोन वर कसा अभ्यास करायचा अशा एक ना अनेक तांत्रिक अडचणी या आॕनलाईन शिक्षणात येत आहेत. शिवाय अनेक दिवस विद्यार्थ्यांचा शिक्षणाशी संपर्कच तुटलेला आहे. 
      ना वह्या ना दप्तर ना पाटी ना पेन्सिल अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा, त्यांच्यात शाळेबद्दल ,शिक्षणाबद्दल ओढ निर्माण व्हावी . विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत म्हणुन मुरबाड शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा नं.२ येथिल प्राथमिक शिक्षक भालचंद्र गोडांबे यांनी घरी न बसता गेली पंधरा दिवस इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शासनाचे नियम पाळत सामाजिक अंतर राखून विद्यार्थी व पालकांशी संवाद साधून अभ्यासाबाबत चौकशी व मार्गदर्शन करत आहे. लाॕकडाऊन मधे त्यांनी सूरू केलेल्या  स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.तर विद्यार्थ्यांना ही त्यांच्या भेटीने प्रत्यक्ष शाळेत असल्या सारखेच वाटत आहे.मात्र सरकार शाळा सुरु करण्या संदर्भात कधी ,काय ,आणि कसा निर्णय घेईल. हे मायबाप सरकारच जाणे.पण आम्ही आमचे विद्यार्थी, पालकां सोबत असलेले नाते हे अखंडपणे जोपासण्याचा  प्रयत्न करत राहु.असे मत भालचंद्र गोडांबे सर हे ठामपणे सांगत आहेत.

कल्याण मुरबाड महामार्गाला जोडणारा मोहिली मोहने पुलावर चोरटय़ांचा डल्ला, सरक्षक लोखंडी पाईप गायब!

कल्याण मुरबाड महामार्गाला जोडणारा मोहिली मोहने पुलावर चोरटय़ांचा डल्ला, सरक्षक लोखंडी पाईप गायब!


कल्याण (संजय कांबळे) शहापूर टिटवाळा या परिसरातील वाहने कल्याण मुरबाड महामार्गावर येण्यासाठी तसेच कल्याण, कर्जत तालुक्यातील वाहनांना नाशिक हायवेवर सहज जाता यावे यासाठी कित्येक कोटी रुपये खर्च करून मोहने मोहिली-पावशेपाडा कांबा हा पुल उल्हास नदीवर बांधला खरा परंतु तो वाहतूकीसाठी सुरु होण्या अगोदर या पुलाच्या संरक्षक लोखंडी पाईप चोरटय़ांनी काढून धुम ठोकली त्यामुळे आता हा पुल धोकादायक झाला आहे.टिटवाळा, शहापूर, पडघा, भिवंडी या परिसरातील वाहने नागरीकांना कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर कर्जत, मुरबाड या शहरात ये जा करने सहज व सोपे व्हावे यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे देखरेखीखाली मोहने - मोहिली ते  पावशेपाडा कांबा असा उल्हास नदीवर दोन ते तीन वर्षांपुर्वी पुल बांधण्यात आला आहे. दत्त कन्स्ट्रक्शन यांनी याचा कामाचा ठेका घेतला असून सुमारे ५ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. नदीच्या दोन्ही तिरांना जोडेल इतके काम पूर्ण झाले आहे. परंतू कांबा पावशेपाडा बाजुकडिल एका जागा मालकाने यास विरोध केला आहे. अगदीच कोर्टात केसेस केल्या आहेत. त्यामुळे पुढील काम थांबले आहे.
पुलाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पुलावर संरक्षक खांब उभे करून त्याला लोखंडी पाईप लावण्यात आले होते. परंतू चोरटय़ांनी यावर डल्ला मारला असलेचे दिसून येते. दोन्ही बाजूच्या पाईपा काढून नेल्या आहेत. तर ज्या निघाल्या नाही. त्या वाकवल्याचे दिसत आहे हा सर्व प्रकार लाॅकडाऊण च्या काळात केला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
हा पुल वाहतूकीसाठी चालू झाला तर म्हारळ वरप कांबा पावशेपाडा रायते मोहने, अंबिवली, बल्याणी, उंबार्णी, मानवली, घोटसई, वासुद्री, खडवली टिटवाळा आदी गावातील नांगरिकाना ये जा करण्यासाठी खूपच फायदेशीर ठरला असता. यामुळे वेळेचा व पैशाचा अपव्यय होणार नव्हता. सध्या या पुलाची दुरावस्था पाहून हा लवकर सुरू होईल असे मुळीच वाटत नाही. कारण उदाशीण प्रशासन आणि मजबूत तक्रारदार यामुळे मोहने मोहिली पावशेपाडा कांबा हा कल्याण नगर या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा पुल हा या परिसरातील दिवा स्वप्न ठरू नये हीच अपेक्षा! 

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुरबाडमध्ये शरद पवारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध!

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने मुरबाडमध्ये  शरद पवारांच्या वक्तव्याचा जाहीर  निषेध!   


  * जय श्रीराम नामाची २०००  पत्रे मुरबाडमधून शरद पवारांना पाठविली  *   


मुरबाड {   मंगल डोंगरे } राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट  रोजी होणाऱ्या अयोध्येतील संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या  श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर " मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येणार नाही "  या  रामनामावर केलेल्या वक्तव्याचा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशाने , भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल  पाटील व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड तालुक्यातील भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण, मुरबाड तालुका व मुरबाड शहर यांच्या संयुक्त विद्यमाने डाकघर मुरबाड कार्यालया जवळ  जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला . ५ ऑगस्टला संपूर्ण दिवसभर शरद पवारांनी श्रीराम नामाचे महत्व जाणावे, तमाम रामभक्तांच्या अपार भक्तीला पोहचलेली ठेच त्यांच्या लक्षात यावी व त्यांनी त्या दिवशी संपूर्ण दिवसभर रामनामाचा जप करावा यासाठी भाजपा युवा मोर्चा, ठाणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने यावेळी २०००  श्रीराम नामाची पत्रे पाठविण्यात आली . यावेळी उपस्थित सर्व  कार्यकर्त्यानी  जय श्रीराम , जय श्रीराम असा जयघोष करून संपूर्ण मुरबाड शहरात श्रीराममय वातावरण निर्माण केले होते . यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजपा मुरबाड शहर अध्यक्ष सुधीरभाई तेलवणे, नगराध्यक्षा छाया चौधरी, पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ, माजी नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर, जयवंत कराळे सर,  माजी नगरसेवक मोहन दुगाडे, तुषार जोशी,  संतोष चौधरी आदी  उपस्थित होते.  या निषेध कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीणचे सरचिटणीस जयवंत हरड,  उपाध्यक्ष , युवा मोर्चा ठाणे जिल्हा ग्रामीण निलेश पष्टे,   युवा मोर्चा तालुकाध्यक्ष हरेश खापरे, मुरबाड शहर अध्यक्ष मुकेश विशे, जगदीश पष्टे, सागर कार्ले, गणेश गोंधळे, अरुण गायकर , निलेश गायकर यांनी केले होते .

शिरवली येथील नवीन इमारतीचे उपाध्यक्षांच्या हस्ते उदघाटन !

शिरवली येथील नवीन इमारतीचे उपाध्यक्षांच्या हस्ते उदघाटन !


मुरबाड (मंगल डोंगरे ):
    विध्यार्थ्यांना घडविण्यासाठी तसेच शिक्षणाचा विस्तार व्हावा या उद्देशाने शिक्षण क्षेत्रात नवीन क्रांती घडविण्यासाठी जिल्हा परिषद मार्फत नवीन योजना आणून विध्यार्थ्यांना शैक्षणिक द्रुष्ट्या  सक्षम बनविणार असे उद्गार ठाणे  जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती सुभाष पवार यांनी काढले आहेत.ते मुरबाड तालुक्यातील शिरवली येथील दोन नवीन वर्गखोल्या उदघाटन समारंभात उदघाटक म्हणून बोलत होते.
   ठाणे जिल्ह्यातील विध्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आपली धडपड असल्याचेही त्यांनी नमूद केले.उपाध्यक्ष पदाचा कार्यभार हातात घेतल्यानंतर शाळांना शौचालयसाठी वीस हजार रुपये,शाळांना संरक्षण भिंत आणि मोडकळीस आलेल्या 300 शाळांना सुमारे 16 कोटी दुरुस्तीसाठी आणि 22 कोटी नवीन वर्गखोल्याना निधी दिला.जिल्ह्यातील सर्व शाळा या सीसीटीव्ही कक्षेत आल्या पाहिजेत तसेच स्पर्धा परीक्षेतही मुलांची गुणवत्ता दिसून यावी त्या दृष्टीने आपला प्रयत्न चालु असल्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.मुरबाड तालुक्यातील कोरोना रुग्ण आटोक्यात आल्यास शासनाचा आदेश न आल्यास जिल्हा परिषद मार्फत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
    शिक्षणाबरोबर समाजकल्याण योजना,शेष फंड,3054,5054 या योजनातुनही तालुक्याच्या विकासासाठी निधी देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.यावेळी सभापती श्रीकांत धुमाळ,स्थानिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामभाऊ दळवी,मा.उपसभापती अनिल देसले, जि प सदस्य किसन गिरा,सरपंच हौसाबाई बांगारा,विस्तार अधिकारी लंबाते,संजय घागस, जगन घागस,रमेश घागस आदींसह शिक्षक उपस्थित होते.

डोंबिवली शहरात चोरांचा सुळसुळाट !!

डोंबिवली शहरात चोरांचा सुळसुळाट !!


डोंबिवली प्रतिनिधी :
206,साई पॅराडाईस, विष्णूनगर डोंबिवली पश्चिम येथील बांधकाम व्यावसायिक श्री.किरण केरभाऊ डोंगरे ह्यांचे ऑफिस 26जुलैच्या रात्री अज्ञात चोरटयांनी फोडून ऑफिसमधील कॉम्पुटरसह, महत्वाचे दस्तावेज तसेच 26300/-रुपये रोख रक्कम असे एकूण 65,000/-रु. किंमतीच्या ऐवज चोरटयांनी गायब केला  आहे.कोरोना महामारीच्या काळात वाढलेली बेकारी आणि बेरोजगारी ह्यामुळेचं डोंबिवली शहरात चोरीचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढत आहे, हेच सदर घटनेवरून दिसून येत आहे डोंबिवली विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये सदर प्रकरणाची तक्रार नोंदवून घेण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्री.सी डी.कोळी हे सदर घटनेचा पुढील तपास करत आहेत.

बकरी ईद ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत साजरी करण्यात येईल !!

बकरी ईद ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करीत साजरी करण्यात येईल !!


मुंबई : बकरी ईद साजरी करण्याबाबत जी नियमावली जाहीर झाली आहे त्या नियमावलीत कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही अशी माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. वाहतुकीसंदर्भात जे काही गैरसमज होते तेदेखील आता दूर झाले आहेत असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बकरी ईद साजरी करण्याबाबत जे गैरसमज होते त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली आहे. लॉकडाउनमध्ये कुर्बानीवर बंदी घालण्यात आलेली नाही असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं.

नेमकं काय म्हणाले नवाब मलिक?

“बकरी ईद संदर्भात कोणतेही गैरसमज नाहीत. जे काही गैरसमज आहेत ते गृहमंत्री संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून दूर करतील. मुंबई शहरात बकरी आणण्यासाठी कोणतीही वाहतुकीची अडचण येणार नाही. बोकडाच्या वाहतुकीवरही बंदी असणार नाही. ज्यांनी बकरी ऑनलाइन बुक केली असेल त्यांनाही बकरी मिळेल”

बाळासाहेब थोरात यांनीही या संदर्भात भाष्य केलं आहे. सरकारने बकरी ईद संदर्भात काही सूचना दिल्या आहेत त्या पद्धतीने बकरी ईद साजरी करण्यात येईल. नागरिकांनी नियमांची काळजी घेणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले.

रोटरी क्लब ऑफ चोपड़ा आणि पंचायत समिति, चोपड़ा ; यांच्या संयुक्तविद्यमाने शिक्षकांसाठी मोफत : "DIGITAL SKILL FOR SMART TEACHING".

रोटरी क्लब ऑफ चोपड़ा आणि पंचायत समिति, चोपड़ा ; यांच्या संयुक्तविद्यमाने  शिक्षकांसाठी मोफत : "DIGITAL SKILL FOR SMART TEACHING".


*सात दिवशीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन*


चोपडा प्रतिनिधी - 
नवीन शैक्षणिक वर्ष तर सुरू झाले आहे पण शाळा सुरु व्हायला अजूनही अनिश्चितता आहे . अशा परिस्थितीत विद्यार्थ्याचे शिक्षण निरंतर सुरु राहावे व ऑनलाइन शिक्षण नक्कीच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले जाऊ शकते. काही ठिकाणी शिक्षकांनी ऑनलाईन माध्यमातून शिक्षण सुरु केले आहे. बरेच शिक्षक अजूनही या माध्यमाशी जुळवून घेऊ शकत नाहीत. म्हणून रोटरी ३०३० च्या *TEACH* या प्रोग्रॅममधील पहिला स्तंभ *T - Teacher Support (शिक्षकांना सहाय्य्)* याअंतर्गत शिक्षकांसाठी मोफत डिजिटल कौशल्ये प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ५ दिवस चालणाऱ्या या उपक्रमात *१५ IT स्किल्सची Series* आपण शिक्षकांच्या *whatsapp  ग्रुपमध्ये* पाठविणार आहेत. *रोज ३ IT कौशल्ये व्हिडीओ आणि त्यावरील प्रश्न* या whatsapp ग्रुपमध्ये पाठविली जातील. पुढील दिवशी *त्या प्रश्नांची उत्तरे देणारा Video, नवीन कौशल्याचा Video आणि त्यावरील प्रश्न* ह्या स्वरुपात ही Series  पुढे नेणार आहेत. *रोटरी क्लब ऑफ चोपडा* मार्फत शिक्षकांना हे video रोजच्या रोज पाठविले जातील. सहावा दिवस सराव दिवस असणार आहे. सातव्या दिवशी एक ऑनलाईन टेस्ट घेतली जाईल. टेस्ट Submit केली की, शिक्षकांना लगेच सहभागाचे *ई-प्रमाणपत्र* ईमेलद्वारे पाठवले जाणार आहे. 

सदर उपक्रम *दि. 3 ऑगस्ट 2020* पासून सुरु करण्यात येणार असून जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन रोटरी क्लब चोपडाचे अध्यक्ष नितीन अहिरराव , सचिव रुपेश पाटील, गटशिक्षणाधिकारी डॉ भावना भोसले तसेच प्रोजेक्ट चेअरमन पंकज बोरोले , विलास पी.पाटील यांनी केले आहे .त्यासाठी 9823355599 व 9975206939 या व्हाट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे......

कोळी समाजाला न्याय देणाऱ्या वंचितच्या ज्येष्ठ नेत्या, सुमनताई कोळी यांचे निधन !

कोळी समाजाला न्याय देणाऱ्या वंचितच्या ज्येष्ठ नेत्या, सुमनताई कोळी यांचे निधन  ! 


'त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली' !! 

     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश महिला सचिव तथा कोकण निरीक्षक, कोळी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सुमनताई कोळी यांचे काल दुःखद निधन झाले.
    वंचित बहुजनांचा आवाज समजल्या जाणाऱ्या तसेच सातत्याने कोळी समाजाचे प्रश्न मांडून त्यांना न्याय देणाऱ्या सुमन ताई कोळी यांचे दुःखद निधन झाले. कोकणात त्यांनी महिलांच्या माध्यमातून मोठा गट तयार केला होता. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभेची निवडणूक रायगड मधून लढवली होती. त्यांच्या जाण्याने आमच्यात एक पोकळी निर्माण झाली आहे.
ताईंच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख पेलण्याची ताकद मिळो. अशा शब्दात वंचित बहुजन आघडीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. 
     त्याच प्रमाणे वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा महासचिव सागर भालेराव आणि अध्यक्ष विश्वतेज साळवी यांनी देखील रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुमनताई कोळी यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली समर्पित केली. सुमनताई कोळी यांच्या निधनाने वंचित बहुजन आघाडी मध्ये दुःखाचे वातावरण निर्माण झाले असून वंचित बहुजन आघाडीचे कधीही भरून न येणारे असे नुकसान झाले आहे.

Monday 27 July 2020

गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी - ऍड. प्रकाश आंबेडकर

गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहायची तयारी - ऍड. प्रकाश आंबेडकर


      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) राज्यात यापुढे लॉकडाऊन मध्ये वाढ करू नका, नागरिक कोरोना ऐवजी बेरोजगारी व उपासमारीने मरतील. असे सांगत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन मुदतवाढीला जोरदार विरोध केला आहे. अकोला येथील सर्किट हाऊस मध्ये  झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
     सरकारने ३१ जुलैनंतर पुन्हा लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर येऊन विरोध करु, असा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला. यावेळी त्यांनी गुन्हे दाखल होण्याची भीती दाखवू नका, माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचेही त्यांनी सांगितले. ते अकोल्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
      आमचा पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आता आम्हाला फक्त लॉकडाऊन मोडावा लागेल. दानदात्यांची क्षमता संपलेली आहे. त्यामुळे आता तरी शासनाने लोकांना मदत करावी. ३१ जुलैनंतर राज्यात लॉकडाऊन वाढवू नये. अन्यथा रस्त्यावर उतरुन विरोध करु. सरकार गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवत आहे. मात्र ती भीती आम्हाला दाखवायची नाही. माझी जेलमध्ये जाऊन राहण्याची तयारी असल्याचेही ते म्हणाले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कुळगांव-बदलापुर शहर मंडळ च्या वतीने शरद पवारांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध !!

भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कुळगांव-बदलापुर शहर मंडळ च्या वतीने शरद पवारांच्या वक्तव्याचा जाहीर  निषेध !!


"जय श्रीराम नामाची २०००  पत्रे बदलापुरमधून शरद पवारांना पाठविली":


बदलापुर / प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑगस्ट  रोजी होणाऱ्या अयोध्येतील संपूर्ण देशाची अस्मिता असणाऱ्या श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर "मंदिर बांधून कोरोना आटोक्यात येणार नाही"  या रामनामावर केलेल्या वक्तव्याचा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या आदेशाने भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल  पाटील व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगांव-बदलापुर शहर भाजपा युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्येमाने गांधी चौक, कुळगांव कार्यालयाजवळ जाहीर निषेध  व्यक्त करण्यात आला. 
०५ ऑगस्टला संपूर्ण दिवसभर शरद पवारांनी श्रीराम नामाचे महत्व जाणावे, तमाम रामभक्तांच्या अपार भक्तीला पोहचलेली ठेच त्यांच्या लक्षात यावी व त्यांनी त्या दिवशी संपूर्ण दिवसभर रामनामाचा जप करावा यासाठी भाजपा युवा मोर्चा कुळगांव-बदलापुर यांच्या वतीने यावेळी २००० श्रीराम नामाची पत्रे पाठविण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व  कार्यकर्त्यानी जय श्रीराम,जय श्रीराम असा जयघोष करून  संपूर्ण बदलापुर शहरात  श्रीराममय वातावरण निर्माण केले होते. सदर निषेध आंदोलनात भाजपा युवा मोर्चा चे शहर अध्यक्ष नयन जयवंत मुठे, सरचिटणीस,तुषार प्रभुदेसाई, युवती सचिव ज्योती (राणी) जवळेकर, उपाध्यक्ष,प्रफुल मोरे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद भोपी, वार्ड अध्यक्ष दिपक घोरपडे, महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया सदस्या प्रिया झोरे इत्यादींनी सहभाग नोंदविला होता.

संतोष चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने मास्कवाटप...

संतोष चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या वतीने मास्कवाटप...


पनवेल (प्रतिनीधी) : अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य या अराजकीय सामाजिक संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके यांचा वाढदिवस मास्कचे वाटप करुन साजरा करण्यात आला. 
जागतिक समस्या बनलेल्या कोरोना महामारी या जागतिक संकटाची पाश्र्वभूमी लक्षात घेता  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने येणा-या संकटावर मात करण्यासाठी शासकीय पातळीवर अनेक उपाययोजना व वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. आणि आपले सामाजिक दायित्व राखत अनेक सामाजिक संस्था संघटना देखील शासनाच्या नियमांचे पालन करून त्यांना व समाजाला मदत करीत आहेत. 
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य ही देखील सामाजिक दायित्व जपणारी व कर्तव्य पार पाडणारी एक संघटना. या संघटनेचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके या आपल्या युवा नेत्याचा वाढदिवस स्थानिक कार्यकर्त्यांनी कापडी मास्कचे वाटप करुन साजरा केला. 
या वेळी उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील सर्व वैद्यकीय स्टाफ व गरजु रुग्णांसाठी कापडी मास्क रुग्णालयाचे डॉ. एमपल्ले यांच्या कडे सुपुर्द करण्यात आले. सदर प्रसंगी रुग्णालयातील नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांशह प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा नेते सुनील शिरिषकर व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. 
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित यांच्या उपस्थितीत टेंभोडे गाव, नवीन पनवेल, सुकापुर ते वाजेरोड या परीसरातील नागरिकांना जवळपास पाचहजार कापडी मास्कचे वाटप कार्यकर्त्यांनी अत्यंत शिस्त बद्ध पध्दतीने व शासकीय नियमांचे पालन करून केले. 
संतोष चाळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्तुत्य कार्यक्रमास पनवेल प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा कोकण डायरी वृत्तपत्राचे संपादक व भाजपा अल्पसंख्यांक सेल प्रदेश प्रवक्ते अकबर सय्यद, संपादक व पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश सोनावणे या मान्यवरांनी भेट देऊन संतोष चाळके यांस सुभेच्छा दिल्या. तसेच सागर शिंदे (कल्याण) राज भोईर,राकेश हरकुळकर, परेश लोंढे, राहुल गायकवाड, सुयोग गडगे, परेश भोईर, कुणाल भोईर, अजय पाटील, ऋषी म्हात्रे निलेश शिरसाठ इत्यादी कार्यकर्त्यासह चिंतामणी गृप यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

रायगड हॉस्पिटल मधील कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करणार !! "पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे"‌.

रायगड हॉस्पिटल मधील कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करणार !! "पालकमंत्री कु.आदितीताई तटकरे"‌.


     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील  कर्जत तालुक्यात असलेल्या रायगड कोविड हॉस्पिटलची क्षमता वाढविण्यासाठी शासन संपूर्ण सहकार्य करणार, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आज येथे केले. डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल मधील कोविड रुग्णालयाची पाहणी दौरा कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या.
     यावेळी आमदार महेंद्र थोरवे, माजी आमदार सुरेश लाड, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे, माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे, नगराध्यक्षा सुवर्णा जोशी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती उत्तम कोळंबे, अशोक भोपतराव, पंचायत समितीचे माजी सभापती तानाजी चव्हाण, प्रदीप ठाकरे, नगरपालिका विरोधी पक्ष नेते शरद लाड, प्रांताधिकारी वैशाली ठाकूर-परदेशी, तहसिलदार विक्रम देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सी.के.मोरे, पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर, रायगड हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. नंदकुमार तासगावकर आदि उपस्थित होते.
    यावेळी पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, रायगड हॉस्पिटलमधील कोविड उपचार केंद्र सुरू आहे, परंतु अधिक क्षमतेने जिल्ह्यातील कोविड रुग्णांसाठी प्रमुख कोविड हॉस्पिटल बनविण्याचा शासनाचा प्रयत्न असून येथे ४०० बेडची व्यवस्था देखील आहे. त्यामुळे त्यातील २०० बेड हे ऑक्सिजन सुविधेसह तयार केले जात आहेत.    शासनाकडून तेथे एकावेळी २०० बेड हे कोविड रुग्णांसाठी उपलब्ध असतील. त्यासाठी आता रायगड हॉस्पिटल मध्ये पाच व्हेंटिलेटर उपलब्ध असून शासनाकडून आणखी पाच व्हेंटिलेटर पुरविले जातील.
      या रुग्णालयातील ४०० पैकी उर्वरित २०० बेड हे कोणत्याही प्रकारची लक्षणे नसलेल्या करोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी आहेत, जिल्ह्यात यापूर्वी पनवेल उप जिल्हा रुग्णालय, पनवेल आणि एमजीएम तसेच जिल्हा रुग्णालय,अलिबाग अशा तीन ठिकाणी कोविडच्या रुग्णांवर उपचार सुविधा सुरु करण्यात आल्या  आहेत.   मात्र रायगड हॉस्पिटलची क्षमता लक्षात घेता हे रुग्णालय केवळ कर्जत नाहीतर खालापूर,उरण या तालुक्यातील रुग्णांसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगून पालकमंत्री कु.आदिती तटकरे पुढे म्हणाल्या की, रायगड जिल्ह्यात सध्या करोनाचा प्रादूर्भाव वाढत आहे.  जिल्ह्यासाठी टेस्टिंग लॅब मंजूर करण्यात आली आहे. जेणेकरून जिल्ह्यातील कोविड रुग्णांचे अहवाल लवकर मिळतील. भविष्यात लागणारी गरज लक्षात घेऊन शासनाने रायगड जिल्ह्यातील कोविड रुग्णालयाची क्षमता वाढविण्यावर भर दिला आहे . त्यामुळेच आपण कर्जत येथे सुविधा उपलब्ध असल्याने रायगड हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी आलो आहोत. येथे पाहणी केल्यानंतर ऑक्स‍िजन सुविधेसह आवश्यक असलेले बेड वाढविण्याचे काम शासन नक्कीच करू शकते, हे दिसून आले आहे. त्यामुळे शासन या ठिकाणी ४०० बेडचे कोविड हॉस्पिटल सुरू करण्यासाठी लक्ष केंद्रित करीत आहे. त्यासाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा आणि मनुष्यबळ यासाठी रायगड हॉस्पिटलकडून प्रस्ताव आल्यावर शासन उचित कारवाई करेल.
      सुरुवातीला पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी रायगड हॉस्पिटल मधील शासनाच्या आणि खासगी तत्वावर चालविण्यात येणाऱ्या करोना रुग्ण कक्षाची पाहणी केली. यावेळी रायगड हॉस्पिटल मधील सर्व सोयी-सुविधांची सविस्तर माहिती डॉ. तासगावकर यांनी त्यांना दिली.

ऑनलाईन शिक्षणाविषयी शिक्षण विभागा कडून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी !!

ऑनलाईन शिक्षणाविषयी शिक्षण विभागा कडून सुधारित मार्गदर्शक सूचना जारी !!

      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड )  राज्यात कोविड- १९ च्या प्रादूर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने दि. १५ जून २०२० पासून शैक्षणिक वर्ष सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त व संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५ जून रोजी च्या जारी केलेल्या शासन निर्णयानुसार प्रदान केले होते. 
       या शासन निर्णयात इयत्ता पहिली ते बारावी चे वर्ग सुरू करण्याबाबतच्या अंदाजे तारखा देण्यात आल्या होत्या तसेच त्यामध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याचेही निर्देश देण्यात आले होते. आता दिनांक २२ जुलै च्या या शासन निर्णयानुसार पूर्व प्राथमिक ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याविषयीचे निर्देश शासनाने दिले आहेत. ते निर्देश पुढीलप्रमाणे:- 
इयत्ता- पूर्व प्राथमिक, सोमवार ते शुक्रवार, ऑनलाइन शिक्षणाचा कालावधी- प्रत्येक दिवशी ३० मिनिटांपर्यंत, शिक्षणाचे स्वरूप- पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन. इयत्ता पहिली ते दुसरी, सोमवार ते शुक्रवार, ऑनलाईन शिक्षणाचा कालावधी- प्रत्येक दिवशी ३० मिनिटांची दोन सत्रे, शिक्षणाचे स्वरूप- त्यापैकी १५ मिनिटे पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन आणि १५ मिनिटे विद्यार्थ्यांना उपक्रम आधारित शिक्षण, इयत्ता तिसरी ते आठवी,  प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची दोन सत्रे, शिक्षणाचे स्वरुप-विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण, इयत्ता नववी ते बारावी, प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांची चार सत्रे, शिक्षणाचे स्वरुप-विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण असे आहे.

औरंगाबादच्या वैभवात नवीन बुद्ध लेण्यांची भर !! जटवाडा रोडवरील हर्सूल तलावालगत, भीमटेकडीच्या शेजारील डोंगरामध्ये आढळल्या ४ ते ५ नवीन बुद्धलेण्या.

औरंगाबादच्या वैभवात नवीन बुद्ध लेण्यांची भर !!
जटवाडा रोडवरील हर्सूल तलावालगत, भीमटेकडीच्या शेजारील डोंगरामध्ये आढळल्या ४ ते ५ नवीन बुद्धलेण्या.


भीमसैनिकांच्या श्रमदानातून लेण्यांचे पुनरुज्जीवन

औरंगाबाद : औरंगाबाद बुद्धलेणीच्या मागील बाजूस भीमटेकडीच्या शेजारील दुर्लक्षित आणि झाडी-मातीमध्ये कुणालाही माहीत नसलेल्या बुद्धलेण्यांचा शोध घेतला आहे.
भन्ते करुणानंद थेरो यांनी. भन्तेजींच्या आवाहनानुसार आज रविवार दिनांक २६ जुलै सकाळी ९ वाजेपासून शेकडो भीमसैनिकांनी एकत्र येत येथे श्रमदान केले.
या बुद्धलेणीत काही ठीकाणी शून्यागार (ध्यान कुटी) असून, सुमारे ३००-४०० चौरस फूट आकाराचे भिक्खु निवास, विहार, ध्यानगृह, तर दुसर्‍या ठिकाणी दोन मजली लेणी आहे. तिथे काही अर्धवट भिक्खूनिवास आहेत जेथे शेकडो वर्षांपासून मोठ्या प्रमाणात चिखल व गाळ साचला होता. आजू बाजूला मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे होते, भीमसैनिकांनी परिश्रम घेऊन कुऱ्हाड, फावडे, कुदळ, टोपले, सब्बल आदींच्या साह्याने मोठ्या प्रमाणात गाळ व आत साचलेले पाणी काढून एक किमी अंतरावरून लेणी दिसू शकेल असे मोठे श्रमदान आज केले,  आजूबाजूला असलेले झाड-झुडपे स्वच्छ केले.
मागील एक महिन्यापासून भन्ते करुणानंद थेरो व सचिन खरात व अनेक उपासक ह्या लेण्याच्या पुनरुज्जीवन करण्यासाठी आवाहन करत होते त्यातूनच आज भीमसैनिकांनी श्रमदान करत हा परिसर स्वच्छ केला आहे.
आज प्राथमिक स्वरूपाचे काम करण्यात आले असून ह्यासाठी अजून मोठे मनुष्यबळ लागणार असून मोठ्या संख्येने भीमसैनिकांनी ह्या ठिकाणी येऊन श्रमदान करणे आवश्यक आहे.
आज अपुऱ्या साधनांमुळे अनेक भीमसैनिक फारसे काम करू शकले नाहीत. ह्या कामासाठी मनुष्यबळा सोबतच स्वछता करण्यासाठी फावडे, कुदळ, टोपले, कुऱ्हाडी, दोरी, सब्बल अश्या साधनांची आवश्यकता आहे.
भन्ते करुणानंद थेरो ह्यांच्या आवाहना प्रमाणे भीमसैनिकांनी श्रमदानासाठी येतांना हे साहित्य सोबत घेऊन येणे अपेक्षित आहे.
काही भीमसैनिकांनी आज ह्या ठिकाणी काम करणाऱ्या भीमसैनिकांसाठी पाणी, केळी, खिचडी असा अल्पोपहार सुध्दा घेऊन आले व ह्या श्रमदानात सहभाग नोंदवला.
राज्यात आज अनेक ठिकाणी बुद्धलेण्यांवर अतिक्रमण व विद्रुपीकरण होत आहे. अनेक ठिकाणी अपूर्ण अवस्थेत कोरलेल्या लेण्यांवर गैरकृत्य करणे, लेण्यांची तोडफोड करणे असे प्रकार घडत आहे.
भारत हा तथागत बुद्धांचा समृद्ध वारसा असलेला देश आहे, कोरलेल्या लेण्या ह्या आपल्या अस्तित्वाच्या संस्कृतीच्या प्रतीक आहेत. यांचे संवर्धन, देखभाल करणे यासाठी धम्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली संघटितपणे सर्वांनी पुढे येऊन ह्या साठी काम करण्याची गरज आहे.
आज औरंगाबादमधल्या विविध पक्ष, संघटनांमध्ये सक्रिय असणाऱ्या भीमसैनिकांनी भन्ते करूणानंद थेरो यांच्या आवाहनानुसार पुढे येत ह्या कामाची सुरुवात केली आहे.
इथून पुढे दर रविवारी भीमसैनिक या ठिकाणी श्रमदान करण्यासाठी एकत्र येणार असून ज्या ज्या भीमसैनिकांना, उपासकांना शक्य होईल त्यांनी याठिकाणी भेट द्यावी, श्रमदान करावे असे आवाहन भन्तेजींच्या वतीने करण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी-

भन्ते करुणानंद थेरो मो.9890437445

कोव्हिड रुग्णांच्या भेटीसाठी शिवसेनेची मांदियाळी !!

कोव्हिड रुग्णांच्या भेटीसाठी शिवसेनेची मांदियाळी !!   


मुरबाड (मंगल डोंगरे )
मुरबाड तालुक्यात सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढत असुन,मागील काही दिवसां पासुन रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. याची दखल घेवुन राज्य हात माग महामंडळाचे अध्यक्ष व शिवसेना ठाणे जिल्हा(ग्रा) प्रमुख प्रकाश पाटील व जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्षा सुषमा लोने ,उपाध्यक्ष सुभाषदादा पवार यांसह जि.प.सदस्या रेखाताई कंटे यांनी  नुकताच मुरबाड मधील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेवुन पिपीई किट घालुन थेट कोवीड सेंटर मध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेवुन संवाद साधत विचारपुस केली व रुग्णांच्या समस्या जाणुन घेतल्या.
       आता पर्यंत मुरबाड तालुक्यात 256 रुग्ण कोरोनाने बाधीत झाले असुन 65 रुग्ण उपचार घेत आहेत आहेत. या भेटीत त्यांनी येथील कोव्हिड सेंटरच्या  सोयीसुविधांची पाहणी करुन तेथील रुग्णांशी, डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मनोबल वाढविले. तसेच रुग्णांचे म्हणणे ऐकून त्यांच्या सुचनांप्रमाणे डॉक्टरांशी समन्वय करुन त्याच ठिकाणी त्यांच्या सुचनांचे निरसन केले. तसेच तिथे देण्यात येत असलेल्या सोयी सुविधांबाबत आणि अधिकारी, कर्मचारी करत असलेल्या कार्याबद्दल त्यांचे कौतुकही केले.या वेळी रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणुन च्यवनप्राश चे वाटप करण्यात आले. या भेटी दरम्यान जिल्हा परीषदेचे उपाध्यक्ष सुभाषदादा पवार, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंठे, किसन गिरा, तालुका प्रमुख कांतीलाल कंठे,आप्पा घुडे,रामभाऊ दळवी महिला तालुका प्रमुख योगीता शिर्के, महिला संघटक उर्मिला लाटे इत्यादी मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी शहर मनसेचा पुढाकार !!

१०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान टाळण्यासाठी शहर मनसेचा पुढाकार !!


मुरबाड {  मंगल डोंगरे  } कोरोना लॉकडाऊन काळात शाळा-कॉलेजेस पूर्णपणे बंद आहेत. मुरबाड तालुक्यातील इयत्ता १० वी व १२वीच्या बोर्डाच्या महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टीकोणातुन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून खासगी कोचिंग क्लासेसला मर्यादीत विद्यार्थ्यांना घेऊन सशर्त परवानगी दयावी या मागणी साठी मुरबाड शहर मनसेचे अध्यक्ष नरेश देसले व शहर सचिव तुषार म्हसे  यांनी पुढाकार घेतला असून नगर पंचायतीकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

अन्यायग्रस्त नागरिक, शेतकऱ्यांचे प्रश्न , कामगारवर्गाची पिळवणूक,शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  अडीअडचणी सोडवण्याच्या संदर्भात  मुरबाड शहर मनसेने सदैव पुढाकार घेऊन त्या प्रामाणिक पणे सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शाळा बंद असल्याने मुरबाड मधील १०वी,१२वीच्या विद्यार्थ्यांचे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.या बाबत मनसे कडे अनेकांनी गाऱ्हानीं मांडल्या मुळे किमान काही खासगी कोचिंग कलासेस कोरोनाच्या महत्वाच्या नियमावली निर्देेशित  करून सशर्त  सुरू करावेत.या आशयाचे लेखी पत्र  मुरबाड नगर पंचायतीचे मुख्यधिकारी परितोष कंकाळ यांना मुरबाड शहर मनसेचे अध्यक्ष नरेश देसले व सचिव तुषार म्हसे यांनी सादर केले आहे.

सध्या मुरबाड मध्ये सम-विषम फॉर्म्युला वापरून अत्यावश्यक गरजांची दुकाने सुरू असून मनसेच्या मागणीला नगर पंचायतीने हिरवा कंदील दाखविल्यास दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे काही प्रमाणात शैक्षणिक नुकसान टळणार आहे.

*कळंबोलीतील स्टील मार्केट बनले नियमबाह्य कामाचे आणि भ्रष्टचाराचे आगर....!*

*कळंबोलीतील स्टील मार्केट बनले नियमबाह्य कामाचे आणि भ्रष्टचाराचे आगर....!*


पनवेल (अण्णा पंडित) कळंबोली येथील मुंबई महानगर प्रदेश लोखंड व पोलाद बाजार (स्टील मार्केट) हे नियमबाह्य कामाचे आणि भ्रष्टचाराचे आगर बनले असल्याचे दिसून येत आहे. बाजार समितीने घेतलेल्या अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये अनियमिता आणि भ्रष्टचार झाल्याचे माहिती अधिकारात दिसून आले आहे. मु.म.प्र.लो.व पोलाद व बाजार समितीच्या आवारात सद्य स्थितीत भूखंडाबाबत सर्वेक्षण अहवालानुसार १९४७ भूखंड धारकांपैकी ६११ भूखंड धारक लोखंड व पोलाद व्यक्तिरिक्त अनधिकृत व बेकायदेशीर वापर व व्यवसाय करत आहेत, तसेच मु.म.प्र.लो.व पोलाद व बाजार समितीने कळंबोली अंतर्गत येथील आवारातील वेगवेगळ्या प्लॉटवरील सर्व एकाच प्रकारची कामे करण्यासाठी ई-निविदाचा वापर न करता तुकडे पाडून ठेकदारला फायदा होईल अशा प्रकारे कामे देण्यात आल्याने बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाने निदर्शनास आणून दिले आहे.


सन २०१७ -२०१८ मध्ये १७ लाख ५१ हजार ९६३ रुपये किमतीचे मु.म.प्र.लो.व पोलाद व बाजार समितीने सी.सी.टी.व्ही, फोन टॅब आणि सी.सी.टी.व्ही. सोफ्टवेअर हे साहित्य नव्याने घेतले होते, परंतु याबाबत कोणताही लेखा जडसंग्रह नोंदवहीत घेण्यात आलेला नाही. म्हणून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे लेखा परीक्षण अहवालानुसार मु.म.प्र.लो.व पोलाद व बाजार समिती अधिनियम ४२ प्रमाणे संस्थेचे लेखा परीक्षण मुख्य लेखापरीक्षक, महाराष्ट्र स्थानिक निधि लेखापरीक्षा यांच्याकडून करण्यात यावे असे नमूद असताना देखील, मे.अग्निहोत्री अँड असोसीएट यांची नेमणूक करून बाजार समितीच्या खर्चात वाढ केल्याने बाजार समितीचे आर्थिक नुकसान झाले आहे. 
मु.म.प्र.लो.व पोलाद व बाजार समितीच्या अनेक निर्णयात ठेकेदाराच्या लाभात ठेकेदारा सोबत संगनमत करून घेतल्याचे दिसत आहे, ज्यामुळे महाराष्ट्र स्थानिक निधि लेखापरीक्षा विभागाने ताशेरे ओढले असून त्यावर अद्याप कारवाई न केल्याने या संदर्भात एमएमआरडीए आयुक्त आणि नगर विकास सचिव यांच्याकडे लेखी तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे. ज्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने सदर नियमबाह्य काम करून भ्रष्टाचार  करण्यात आला आहे त्या अधिकार्‍यांचे निलंबन करण्याची मागणी निवेदना द्वारे करण्यात आली असुन सदर निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष संतोष गवस यांची स्वाक्षरी असल्याची माहिती सुनील शिरिषकर यांनी दिली आहे.

कल्याण पंचायत की दुरुस्तीची पंचायत, नवीन इमारत नाहीच, केवळ दुरुस्ती पे दुरुस्ती ?

कल्याण पंचायत की दुरुस्तीची पंचायत, नवीन इमारत नाहीच, केवळ दुरुस्ती पे दुरुस्ती ?


कल्याण (संजय कांबळे) : तालुक्याचे विकास केंद्र म्हणून ओळखले जाणा-या कल्याण पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्न काय कोणत्याही सभापतीच्या कार्यकाळात सुटेल असे वाटत नाही. कारण केवळ दुरुस्ती च्या नावाखाली सडलेल्या लोंखडाला मुलामा देण्याचे काम सध्या सुरू असून आतापर्यंत कित्येक दुरुस्त्या झाल्या पण प्लास्टर पडायचे काय थांबले नाही त्यामुळे ही लोकांची पंचायत आहे की ठेकेदारासाठी "पंचायत" हेच कळेनासे झाले आहे.


तालुका पंचायत समिती ही जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यातील दुवा मानली जाते. कल्याण पंचायत समितीच्या जुन्या इमारतीची मुदत केव्हाच संपलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केलेली आहे. त्यामुळे चार पाच वर्षांपूर्वी ती रिकामी करण्यात आली आहे. परंतू तिला लागून असलेली इमारत देखील धोकादायक आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण या इमारतीच्या प्लेअरला तडे गेले आहेत.. याला लोखंडी खांबाचे "टेकू" लावले आहेत. सभागृहात, व्हरांड्यात, जिना, कृषी विभागात अनेक वेळा प्लास्टर पडल्याच्या घटना घडल्या आहेत.
दहा ते पंधरा विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी तसेच लोक कल्याण पंचायत समितीच्या कार्यालयात ये जा करित असतात. कर्मचारी तर जीव मुठीत धरून काम करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकजण घरी बसून काम करतात. त्यामुळे पंचायत समितीत ज्यादा गर्दी होत नाही. म्हणून अद्यापही कोणी जखमी झाले नाही. दुरुस्ती केली की पुन्हा पडते. 
आतापर्यंत यावर लाखोंचा खर्च दुरुस्ती पोटी केला आहे. परंतु काही दिवसांत पुन्हा तेच, त्यामुळे या दुरुस्ती नक्की कोणासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मागील काही वर्षांपासून कल्याण पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा, वाढीव चटईक्षेत्राचा प्रश्न कधी केडीएमसी तर कधी मंत्रालय असा प्रवास करतो आहे. पण तो नक्की कोठे "लाॅकडाऊण" झाला आहे हे सांगणे कठीण आहे.
सध्या कल्याण पंचायत समितीच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या इमारतीसाठी सुमारे ६७ लाख रुपये कामाची वर्क आॅर्डर निघाल्याचे कल्याण पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता एस आर चव्हाण यांनी सांगितले. तसेच ही  स्टक्चर दुरुस्ती (संरचनात्मक) दुरुस्ती असून पावसाळ्यानंतर या कामाला वेग येईल असे ही ते म्हणाले. 
कल्याण पंचायत समितीवर सर्वाधिक काळ शिवसेनेची सत्ता राहिलेली आहे आतापर्यंत २५ते३० सभापती उपसभापती यांनी सत्ता उपभोगलेली आहे. सुदैवाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद देखील कल्याण तालुक्याला मिळाले आहे. त्यामुळे आतातरी कल्याण पंचायत समितीच्या नवीन इमारतीचा कायमस्वरूपी तोडगा निघावा ऐवढीच माफक अपेक्षा नागरिकांची आहे. तर आतापर्यंत कल्याण पंचायत समितीच्या इमारतीची किती वेळा दुरुस्ती झाली यावर किती खर्च केला याचा हिशोब विचारला पाहिजे असे मत डॉ सोमनाथ पाटील यांनी व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया : 
किरण चंदू ठोंबरे (पंचायत समिती सदस्य, खोणी गट) "कल्याण पंचायत समितीच्या इमारतीची दुरुस्ती ही केवळ ठेकेदारासाठी व काही लोकांच्या टक्केवारी साठी केली, जातेय, वर्षानुवर्षे हेच सुरू आहे. जीव मुठीत धरून आम्हाला बसावे लागते आहे",

लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कार्यान्वित तर मुगवली येथील प्रस्तावित कोविड केअर सेंटर ! "पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली भेट"

लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातील कार्यान्वित तर मुगवली येथील प्रस्तावित कोविड केअर सेंटर ! "पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी दिली भेट"


      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी माणगाव तालुक्यातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील १०२ बेडच्या कार्यान्वित असलेल्या तर मुगवली येथील ४४ बेडच्या प्रस्तावित कोविड केअर सेंटरला ( रविवार,दिनांक २६ जुलै रोजी ) भेट दिली. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष करोना बाधित रूग्णांशी संवाद साधत त्यांची विचारपूस करुन प्रशासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवासुविधांबद्दल माहिती जाणून घेतली.
       पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्याशी संवाद साधताना येथील रुग्णांनी या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा, जेवण, स्वच्छता तसेच वैद्यकीय सेवा उत्तम असल्याचे सांगितले. याप्रसंगी पालकमंत्री कु.तटकरे यांनी येथील दाखल रुग्ण व निरीक्षणाखालील रुग्ण यांची माहितीही जाणून घेतली. या कोविड केअर सेंटरमध्ये दिल्या जात असलेल्या सेवांबद्दल तेथील रुग्णांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया ऐकून पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
      यानंतर मुगवली येथील ४४ बेडच्या प्रस्तावित कोविड केअर सेंटरलाही त्यांनी भेट दिली. तसेच त्या ठिकाणीही रुग्णांना सर्व प्रकारच्या उत्तम वैद्यकीय सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात याव्यात, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
       यावेळी प्रातांधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर, गटविकास अधिकारी श्री.गाढवे, तालुका आरोग्य अधिकारी श्री.परदेशी, निवासी नायब तहसिलदार श्री.भाबड हे उपस्थित होते.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...