Wednesday, 29 July 2020

*पनवेल मनपाने ५०० बेडचे सुसज्य कोरोना रुग्णालय उभारावे, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*...

*पनवेल मनपाने ५०० बेडचे सुसज्य कोरोना रुग्णालय उभारावे, प्रहार जनशक्ती पक्षाची मागणी*...


पनवेल (अण्णा पंडित) : कोरोना महामारीच्या काळात पनवेल महानगर पालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या लोकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. पनवेलमध्ये उपजिल्हा रुग्णालय वगळता शासकीय रुग्णालय नसल्याने नागरिकांची उपचारासंदर्भात तारांबळ उडत आहे. देशात कोरोना संकटाने थैमान घातले असतानाच नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांसाठी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाहीत. 


ज्या खाजगी रुग्णालयांशी मनपाने करार केले आहे, तेथे किती बेड शिल्लक आहेत याची लोकांना माहिती मिळत नाही. ती माहिती रुग्णालयांत दर्शनी भागात प्रसिद्ध करण्याची मागणीही केली आहे. त्याचबरोबर कोरोना आजाराच्या उपचारासाठी शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार खाजगी रुग्णालयांना शुल्क आकारण्यास सांगावे, तसेच अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. पनवेल मनपाचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष संतोष गवस, कामगार संघटनेचे चंद्रकांत उत्तेकर, नवी मुंबई अध्यक्ष प्रवीण खेडकर, सुनील शिरिषकर, रोहित देखणे, राहुल तेलंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ !

सिद्धार्थ महाविद्यालयात व्यवसाय संशोधन व आधुनिक तंत्रज्ञान विषयावर राष्ट्रीय परिषद संपन्न‌ ! मुंबई, (पंकजकुमार पाटील) : पिपल्स ए...