Friday 31 December 2021

नववर्षी अध्यात्मिक संकल्प घेऊया - संत राजिन्दर सिंह जी महाराज

नववर्षी अध्यात्मिक संकल्प घेऊया
-  संत राजिन्दर सिंह जी महाराज


नववर्षाच्या आगमनाच्या आनंदा समयी  आपण नेहमी असा विचार करतो की,  येणारे नवीन वर्ष मागील वर्षाच्या तुलनेत कसे चांगले होईल? आपण असा विचार करतो की आपले मागील वर्ष कसे व्यथित झाले?आणि आपण येणाऱ्या वर्षाकरिता नवीन संकल्प घेतो. हे संकल्प आपल्या स्वास्थ्या मधील सुधारणा,आर्थिक स्थितीतील  वाढ,  आपांपसातील नातेसंबंधातील गोडवा किंवा इतर शारीरिक तसेच मानसिक उद्देशानं संबंधित असू शकतात. 

नवीन वर्ष आपणास ही संधी प्रदान करते कि आपण जुन्या बाबी सोडून नव्या गोष्टींचा स्वीकार करावा. बहुतेक लोक आपल्या चुकीच्या सवयी बदलू इच्छितात त्यामुळे ते नवीन वर्षी त्यांना सोडण्याचा आणि चांगल्या सवयीनां स्वीकारण्याचा संकल्प करतात. नववर्षाच्या याप्रसंगी बरेचसे लोक आपले स्वास्थ, आपली धनदौलत अथवा आपले परस्पर संबंध वृद्धिंगत होण्याचा प्रण करतात आणि नवे ध्येय ठरवितात. परंतु काही दिवसानंतर ते पुन्हा आपल्या जुन्या दिनचर्या मध्ये परत येतात. या ऐवजी आपण बरेच संकल्प घ्यावे आणि त्यांना पूर्ण करू शकलो नाही तर, त्याकरिता आपण असे करावे की एक संकल्प घ्यावा आणि त्याला चांगल्या प्रकारे जीवनात निभवावे. जर आपण एकाच संकल्पाला प्रमुखता दिली तर, आपल्याला  त्याला पूर्ण करण्याची शक्यता अधिक असू शकते.

अध्यात्मिक संकल्प सर्वात महत्त्वपूर्ण आहे कारण की, ते आपल्या आत्म्या संबंधित असतात. अध्यात्मिकता आपल्या ला स्वतःला ओळखणे आणि परमेश्वराला प्राप्त करण्याचा मार्ग दाखविते. ही महत्त्वाची बाब आहे की जेव्हा आपण अध्यात्मिक संकल्प घेतो, तेव्हा आपण आपल्या ध्येयावर ठाम रहावे.त्यावेळी आपण कोणाला शाश्वती देतो आहोत, आपण आपला आत्मा अर्थात आपण स्वतः आणि परमेश्वराला शब्द देत आहोत.  असं वचन आपण अवश्य निभावले पाहिजे.अध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करताना सर्वप्रथम सदाचारी जीवन आहे, याकरिता आपल्या अंतरी अहिंसा, सत्य,पवित्रता, नम्रता, निष्काम सेवा या सदगुणांना विकसित केले पाहिजे.

प्रभूने आपणांस जे शरीर दिले आहे त्यामध्ये आपण स्वतःला ओळखू शकतो आणि प्रभूला प्राप्त करू शकतो. याकरिता आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे की, प्रभूला आपण आपल्या अंतरी कसे शोधू शकू. या दुनियेत जेवढे पण संत- सुफी आले आहेत, ते वारंवार हेच सांगतात की, आपण अंतर्मुख होऊन प्रभूला प्राप्त करू शकतो. हे सर्व याच अभ्यासाकडे इशारा करतात की, आपण आपले लक्ष बाहेरून हटवून आपल्या अंतरी टिकवावे. ज्याद्वारे आपण आपल्या अंतरी परमपिता परमेश्वराचे स्वरुप ज्योती आणि श्रुती चा अनुभव घेऊ शकतो. या दोन्हींवर ध्यान एकाग्र करून आपण 
परमपिता परमेश्वरात लीन होऊ शकतो.

चला तर! नववर्षाचा या प्रसंगी आपण असा संकल्प घेऊया की, आपली आध्यात्मिक उन्नती होण्याकरिता यावर्षी नियमितपणे ध्यान अभ्यासाकरिता वेळ देऊ या, जेणेकरून आपण आपल्या अंतरातील विद्यमान प्रभूच्या ज्योती आणि श्रुतीचा अनुभव करूया.

सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2

अमृता : +91 84510 93275

महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे पोलीसांनी ठोकल्या बेडया !! "तरुणीला इंटरनॅशनल व्हर्चुअल मोबाईलवरुन अश्लिल मेसेज पाठवुन व्हिडीओ कॉल करुन विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक"

महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे पोलीसांनी ठोकल्या बेडया !!

"तरुणीला इंटरनॅशनल व्हर्चुअल मोबाईलवरुन अश्लिल मेसेज पाठवुन व्हिडीओ कॉल करुन विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक"


कल्याण, हेमंत रोकडे : अज्ञात तरुणाने इंटरनॅशनल व्हर्चुअल मोबाईलचा वापर करुन वेगवेगळया मोबाईल नंबर वरून कल्याण येथे राहणाऱ्या तक्रारदार २९ वर्षीय तरुणीला अश्लिल मेसेज पाठवुन तसेच कॅमेरा बंद करून व्हिडीओ कॉल करून विनयभंग केला आहे. सदर प्रकरणी तरुणीचे तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा  दाखल आहे.


आरोपीने इंटरनॅशनल व्हर्चुअल मोबाईलचा वापर केल्याने आरोपी विषयी काहीएक माहीती मिळुन येत नव्हती. पोलीसांनी आरोपीचा विविध पातळ्यांवर • तांत्रीक बाबींवर उपास केला. सदर गुन्हयाचा सायबर सेल ठाणे तसेच तांत्रीक विश्लेषक यांचे मदतीने तात्रीक तपास केला असता आरोपीने एअरटेल व डेलीक्स नेट सोल्युशन कंपनीचे आयपी अँड्रेस वापरल्याचे दिसुन आले आहे. सदर कंपनीकडून प्राप्त झालेल्या माहीतीनुसार २ संशयीत मोबाईल फोन नंबर्सचा तपास केला असता उल्हासनगर कॅम्प नं. ५ येथे राहणारा गुरदिपसिंग चतुरसिंग खालसा वय २७ वर्षे याने आयपी अ‍ॅड्रेस वापरल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुरदिपसिंग खालसा याला ताब्यात घेवून त्याचेकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्याचे मोबाईल फोनमध्ये अश्लिल मेसेज पाठविल्याचे दिसून आले आहे. म्हणुन सदर आरोपीला काल अटक केली असुन आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने त्याची दिनांक ०२/०१/२०२२ पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळाली आहे.

आरोपीकडे केलेल्या चौकशीत तो फॅशन शो साठी इव्हेंन्ट मॅनेजमेंटचे काम करून महिलांचे व्हिडीओ बनवुन युटयुब चैनलवर अपलोड करीत असतो. सुमारे ५ वर्षापुर्वी फिर्यादी तरुणीने आरोपी बरोबर जाहीरातीचा व्हिडीओ बनविण्यास नकार दिल्याचा मनात राग धरून आरोपीने इंटरनॅशनल व्हर्चुअल मोबाईलवरुन वेगवेगळया नंबरवरुन फिर्यादीस अश्लिल मेसेज पाठवुन व व्हिडीओ कॉल केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीने इंटरनॅशनल व्हर्चुअल मोबाईल नंबरचा वापर केलेला असतांना देखील गुन्हयाचा अतिशय तत्परतेने, कौशल्याने व संवेदनशिलपणे तांत्रीक तपास करून आरोपीला अटक केली आहे.

अशा रितीने महिलाविषयक अतिशय संवेदनशिल असलेल्या गुन्हयाचा मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण, श्री दत्तात्रय कराळे, मा. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, कल्याण श्री सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त  उमेश माने-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तसेच वपोनि अशोक होनमाने यांचे देखरेखीखाली महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (प्रशासन) लक्ष्मण कांबळे, सपोउनिरी/ यशवंत जाधव, ठिकेकर,जाधव, मधाळे व खाजगी सायबर तज्ञ यांनी तपास करुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे. अटक आरोपीने अन्य तरुणींना अशा प्रकारचे अश्लिल मेसेज, व्हिडीओ कॉल केले आहेत अगर कसे? याबाबत पोनि श्री लक्ष्मण कांबळे हे आधिक तपास करीत आहेत.

कल्याण पंचायत समितीचे दोन कर्मचारी निवृत्त, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिका-यासह अनेकांनी दिल्या शुभेच्छा !!

कल्याण पंचायत समितीचे दोन कर्मचारी निवृत्त, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिका-यासह अनेकांनी दिल्या शुभेच्छा !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीचे कुंटूब प्रमुख अर्थात गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या गाडीचे वाहनचालक गणेश महादेव कासार आणि आरोग्य विभागाचे कुष्ठ तंत्रज्ञ वासुदेव शंकर जाधव हे दोन कर्मचारी आज सेवानिवृत्त झाले, या निमित्त आयोजित कार्यक्रमात यांना गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या.


कल्याण पंचायत समितीचे वाहन चालक गणेश कासार हे १९९१ मध्ये वाहनचालक म्हणून नोकरीत रुजू झाले, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (आयसीडीएस) आदी वरीष्ठांच्या गाड्यावर वाहनचालक म्हणून काम केल्या नंतर त्यांची बदली कल्याण येथे झाली, ते गटविकास अधिकारी यांच्या गाडीचे वाहनचालक म्हणून कल्याण पंचायत समिती ला सेवा बजावल्यानंतर ते आज सेवानिवृत्त झाले, एकूण ३० वर्षे सेवा झाली असून त्यांचे शिक्षण ७ वी पर्यंत झाले आहे वडील मिलकामगार होते. 


मनमिळाऊ व सदैव हसमुख असलेल्या गणेश कासार आणि आरोग्य विभागाचे वासुदेव जाधव यांना कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ भारत मासाळ, पत्रकार संजय कांबळे, आदीनी शुभेच्छा दिल्या.


जाधव हे १९९३ मध्ये नोकरीला लागले होते. ३८ वर्षे सेवा बजावल्यानंतर ते आज सेवानिवृत्त झाले. प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवा आणि आता कल्याण पंचायत समितीच्या आरोग्य विभागात ते कुष्ठ तंत्रज्ञ म्हणून सेवा करीत होते. यावेळी जिल्हा परिषद वाहनचालक संघटना, ग्रामसेवक संघटना, आरोग्य कर्मचारी, कल्याण पंचायत समितीचे शिपाई, आदीनी या दोघांचा सत्कार केला. व शुभेच्छा दिल्या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी श्री चव्हाण यांनी केले.


यावेळी पशुसंवर्धन अधिकारी, कृषी अधिकारी, ग्रामसेवक, आणि कर्मचारी उपस्थित होते.

थर्टी फस्ट' व नवीन वर्षाच्या पाश्र्वभूमीवर कल्याण तालुका पोलिसांची चोख व्यवस्था, मार्गदर्शन, नोटिसा व कारवाई ?

'थर्टी फस्ट' व नवीन वर्षाच्या पाश्र्वभूमीवर कल्याण तालुका पोलिसांची चोख व्यवस्था, मार्गदर्शन, नोटिसा व कारवाई ?


कल्याण, (संजय कांबळे) : सध्या राज्यात कोरोना व ओमायक्राँँन च्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे कडक निर्बंध लागू केले आहेत. अशातच थर्टी फस्ट व नवीन वर्षाचे आगमन होत असताना नागरिकांनकडून कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, ड्रिंक व ड्राईव्ह वर आळा बसावा या करिता कल्याण तालुका पोलिसांनी मोक्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला असून सुरुवातीला मार्गदर्शन, नोटीसा व नाही च ऐकले तर प्रंसगी कठोर कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे तालुक्यात तसा काही अनुचित प्रकार घडला नाही.


कल्याण तालुक्यातून कल्याण नगर हा महामार्ग जातो, तसेच तालुक्यात टिटवाळा येथे महागणपती मंदिर आहे, येथे नवीन वर्षाच्या सुरुवातीला दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. अशाच परिस्थितीत थर्टी फस्ट आल्याने पोलिसांवर ताण वाढला आहे, तर दुसरीकडे राज्यात कोरोनाचे रग्ण झपाट्याने वाढत आहेत, ओमायक्राँने डोके वर काढले आहे, राज्यात पुन्हा लाँकडाऊन लागते की काय? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे या सर्व सण, उत्सव यांचा विचार करता शासनाने जमावबंदी, निर्बंध लागू केले आहे, वाहतुकीचे अनेक नियम लागू केले आहेत. अशातच थर्टी फस्ट च्या दिवशी अतिरेकी कारवाईची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


या सर्व परिस्थिती विचारात घेऊन कल्याण तालुक्यात पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रामभालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली १० अधिकारी व ५० कर्मचाऱ्यांच्या मदतीने चोख व्यवस्था लावली आहे, गोवेली, खडवली, बल्याणी, म्हारळ आदी ठिकाणी नाकाबंदी केली आहे, येथे गाड्या कसून चौकशी केली जात आहे. दारुवाल्याच्या वर धडक कारवाई सुरू केली आहे. नियम मोडून गाडी चालवणे, बेदरकार चालकावर तसेच ड्रिंक व ड्राईव्ह वर लक्ष ठेवले जात आहे.

कोरोना व ओमायक्राँनच्या धर्तीवर शासनाच्या निर्बंधाचे पालन होते की नाही, यावर नजर ठेवली आहे.

तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाँटेल, धाबे, उपहारगृह, रिसॉर्ट, फार्महाऊस, यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. टपोरी, टवाळखोर, गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्ती वर कारवाईचा धडाका चालू केला आहे. याशिवाय उद्या म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला टिटवाळा येथील महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भक्तांना मार्गदर्शन, गर्दी, टाळण्यासाठीचे आवाहन, वाहतूक व्यवस्था, मास्क, सँनिटायझर, सोशलडिंस्टिंसन आदी पाळण्याची विंनती करण्यात येत आहे. या सर्व घटनावर तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी स्वतः बारकाईने लक्ष ठेवून असल्याने अजून तरी कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, याचे सर्व श्रेय कल्याण तालुका पोलिसांना द्यायला हवे.

Thursday 30 December 2021

फ, ह आणि आय प्रभागातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई !

फ, ह आणि आय प्रभागातील अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची कारवाई ! 


कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार व विभागीय उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली 6/फ प्रभागाचे सहा. आयुक्त किशोर शेळके यांनी डोंबिवली पूर्व, गोपाळ नगर गल्ली क्र.3, येथील बांधकामधारक जयदीप भागीनाथ त्रिभुवन यांच्या नावे असलेल्या तळ +3 मजल्याचे आर.सी.सी अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. सदर निष्कासनाची कारवाई टिळक नगर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी/कर्मचारी, ग प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे व शैलेश मळेकर उप अभियंता बांधकाम, प्रभाग अधिक्षक दिनेश वाघचौरे , महापालिकेचे पोलिस कर्मचारी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने व 3 ब्रेकर, 1 गॅस कटर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


त्याचप्रमाणे विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली 7/ह प्रभागाचे सहा. आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम, गणेश नगर येथील, खाडीकिनारी विकासक सचिन भोईर यांच्या तळ+4 मजली आर.सी.सी. इमारतीच्या चालू असलेल्या बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई करण्यास आज प्रारंभ केला. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशन पोलिस कर्मचारी,महापालिकेचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व 1 पोकलन, 3 ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


9/आय प्रभागातही सहा. आयुक्त संजय साबळे यांनी विभागीय उपआयुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, आडीवली ढोकळी, येथील विकासक जयेश पटेल यांच्या तळ+4 आर.सी.सी अनधिकृत इमारत निष्कासनाची धडक कारवाई आज सुरू केली. सदर इमारतीत ऐ,बी,सी,डी असे एकूण चार विंग असून ऐ,बी व सी तळ+4 मजली आहे. डी विंग मध्ये तळ+2 मजली आहे, आज रोजी सदर इमारतीतील डी विंगचे बांधकाम पूर्णपणे जमीदोस्त करण्यात आले आहे. सदर निष्कासनाची कारवाई 4/जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर, 5/ड प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले, अधिक्षक गोवेकर, मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी, महापालिकेचे पोलिस कर्मचारी, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे कर्मचारी यांच्या मदतीने व 1 पोकलन, 1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.


मराठमोळ्या रंगभूषा काराने केली कमाल ! मेकअप मधील अडचणी सोडवण्यासाठी काढली नवीन कंपनी ?

मराठमोळ्या रंगभूषा काराने केली कमाल ! मेकअप मधील अडचणी सोडवण्यासाठी काढली नवीन कंपनी ? 


कल्याण, (संजय कांबळे) : गेली १८ वर्षे बॉलीवूड मेकअप आर्टिस्ट म्हणून मराठी हिंदी तेलगू आणि इंटरनॅशनल फॅशन क्षेत्रात प्रथम श्रेणीचे रंगभूषाकार/ मेकअप आर्टिस्ट म्हणून नाव कमावलेले मराठमोळे संजय प्रभाकर खराडे यांनी या क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, समस्या, प्रश्न सोडवण्यासाठी चक्क एक कंपनीच सुरू केली असून त्याच्या माध्यमातून अनेकांना मेकअप आर्टिस्ट होण्याचे स्वप्नपुर्तीचे व्दारे खुली केली आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


सोलापुरात जिल्ह्यात तालुका करमाळा मूळ गाव असलेल्या मुंबईत जन्मलेले संजय प्रभाकर हे उत्तम कलाकार व प्रशिक्षक आहेत. इंटरनॅशनल फॅशन मेकअप हेअर आणि बॉडी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करायच्या अफाट शैलीमुळे भारताच्या बऱ्याच सुप्रसिद्ध मासिकांच्या मुखपृष्टा द्वारे लॉस एंजलिस आणि किमान ४८ देशांमध्ये त्यांचे नाव प्रसिद्ध आहे.


मेकअपचा कोर्स करणे हे काहींसाठी तर फक्त स्वप्नच असते. अशा ३५ गरीब मुलींची स्वप्नपूर्ती करत एकही पैसा न घेता मोफत शिकवणारे संजय खराडे स्वतः मेकअप आर्टिस्ट असून मास्टर बास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या पासून ते विनोदाचा बादशहा जाँनी लिव्हर अशा शेकडो सेलिब्रिटी च्या आयुष्यात त्यांनी रंग भरले आहेत. परंतु इतकी कामे करताना एक समस्या त्यांच्या मनात सतत भेडसावत होती ती म्हणजे यातील उत्पादन?. लॉक डाऊन मध्ये मिळालेल्या वेळात त्यांनी त्या समस्येवर तोडगा काढायचे ठरवून एक नवीन उत्पादन सुरु करायचे ठरवले.


२०२१ संपता- संपता या उत्पादनास प्रत्यक्षात बाजारात उतरवण्यासाठी खूपच अडचणींचा सामना करावा लागला.

रंगभूषाकार मेकअप करत असताना वापरात आणलेले ब्रश व इतर साहित्य त्यावेळी रोजच साबणाने अथवा शाम्पू आणि ऑइल च्या मिश्रणाने क्लीन करत असत आणि ते ब्रश सुकायला किमान दोन दिवस तरी लागत असत त्यामुळे ब्रश सुकवण्यासाठी हेअर स्टायलिंग साठी वापरला जाणारा ब्लो ड्रायर वापरत असत.अथवा ब्रश चा डबल किट विकत घ्यावा लागत असे. साबण, शाम्पू ने धुतलेले ब्रश मधून ओलावा पूर्णपणे न सुकता, वास येणे ब्रश खराब होणे ब्रसेल्स सेल होणे, नवीन बॅक्टेरिया लवकरच डेव्हलप होण्याची भीती, जे स्किन साठी घातक ठरू शकते.

मार्च २०२० च्या लाँकडॉउन मध्ये एका गुगल परीक्षणात एका गुगल सर्वेनुसार झालेल्या परीक्षणात ३१% लोकांना ब्रश क्लीन करतात किंवा करायचे असतात हे माहीत नाही. ; २१% लोकांना गरजेचे वाटत नाही. ; २२% म्हणतात खूप वेळ लागतो क्लीन करायला. आणि
फक्त १९ टक्के लोक काही दिवसांनंतर नवीन ब्रश खरेदी करतात. आजही १००% लोकांपैकी ८५ % लोक घरात उपलब्ध असलेले पाणी, शाम्पू, डिश वॉश साबण आणि ऑईल यांचा वापर करून ब्रश अथवा टूल किट साफ करतात.

सर्वोत्तम मेकअप करायचा चढाओढीत ग्राहक महागडे ब्रशेस खरेदी करण्यासाठी लक्षणीय किंमत मोजत असतात. पण त्यापैकी बऱ्याच लोकांना त्यांची काळजी घेणे आणि सांभाळ करणे येतच नसते अथवा माहीत नसते.

वरील सर्वेक्षणाच्या निरीक्षणानंतर सर्व युजर्सना आपला वेळ कसा वाचवायचा ब्रश ची छान प्रकारे काळजी कशी घ्यावी याचे महत्त्व शिकवण्याची प्रथम गरज आहे असेही दिसले.

संजय खराडे स्वतः मेकअप आर्टिस्ट असल्याने या गोष्टीला आपण पुढे नॆउ असे विचार करून तयारीस लागले.

दिवस-रात्र बऱ्याच अडीअडचणींना तोंड देऊन त्यांनी लॅब टेस्टेड प्रमाणपत्र असलेले 'क्लीन-ऒ-मेकअप' नावाचे एक प्रॉडक्ट बाजारात आणले.

Instant drawing formula ; disinfectant bacteria, fungus and virus killer.

असे हे अतिशय महागडॆ सेंट वापरून बनवलेले एक उच्च प्रतीचे प्रोफेशनल ब्रश क्लिनर बनवले. जे अतिशय महागड्या मेकअपच्या ब्रशेस आणि इतर वस्तूना हायजेनिक, लॉंग लास्ट आणि सुगंधित ठेवेल.

सगळीच मित्रमंडळी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित मेकअप आर्टिस्ट असल्याने प्रथमदर्शनी सॅम्पल चा प्रतिसाद लगेचच आणि चांगलाच मिळाला.

ब्रँडेड आणि हाय क्वालिटी मेंटेन,  लक्झरी फ्राग्रन्स असले तरीही किंमत ही मध्य मच शिवाय मेड इन इंडिया असल्याने ही बातमी बॉलीवूड मध्ये वार्‍यासारखी पसरली.

वर्षे २०२१ चा शेवटपर्यंत बॉलीवूड ते हैदराबाद सिनेसृष्टी पर्यंत सर्वांच्या पसंतीस पडलेले हे उत्पादन जवळपास प्रत्येकाकडे दिसू लागले आहे.

सिनेसृष्टीसह ब्रायडल मेकअप आर्टिस्ट यांनी पण इन्स्टंट ब्रश क्लिनर चा वापर करण्यास सुरुवात केली तर ग्राहक वाढतील व कमाई पण दुप्पट होईल.

मेकअपचा व मेकअप आर्टिस्ट चा दर्जा वाढवण्यास आपण सर्वांनीच सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे असे संजय खराडे यांचे म्हणणे आहे.शिवाय यातून नवनवीन साधनांचा वापर केला तर मराठी, हिंदी, तेलगू, बाँलीवुड क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल असे ही त्यांनी सांगितले.

विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल म्हणजे, शिक्षण क्षेत्रात वाझे तयार करण्याचा महाविकास आघाडीचा डाव..

विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल म्हणजे, शिक्षण क्षेत्रात वाझे तयार करण्याचा महाविकास आघाडीचा डाव..


डोंबिवली, (ऋषिकेश चौधरी) :
महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या मनमर्जीने ने अधिवेशनात चर्चा न करताच विद्यापीठ विधेयक पारीत करुन घेतल्या च्या विरोधात, डोंबिवली येथे भाजयुमो कल्याण जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.


2017 मध्ये, विधानसभा आणि विधानपरिषद ह्या दोन्ही सभागृहात बहुमताने पारित झालेल्या विद्यापीठ सुधारणा कायद्या मध्ये महाविकास आघाडी सरकारने दडपशाहीने दुरुस्ती आणली, आणि शिक्षण मंत्र्यांना उप कुलगुरू म्हणून मान्यता देऊन, शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करण्याचे अधिकार दिले. विद्यापीठ नियुक्ती, विद्यापीठाच्या खरेदी, परीक्षा विभाग, अभ्यासक्रम ह्या सर्वात आता राजकीय हस्तक्षेप होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी ह्याला विरोध करून नाराजी प्रकट केली आहे, असे मिहिर देसाई जिल्हाध्यक्ष, भाजयुमो, कल्याण जिल्हा यांनी सांगितले.


भाजप ह्या अरेरावी आणि दडपशाही विरुद्ध हायकोर्ट मध्ये देखील दाद मागणार आहे. प्रत्येक विद्यापीठ, जिल्हा स्तरावर रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल असे शशिकांत कांबळे यांनी सांगितले. या वेळी आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आघाडी सरकारच्या मनमानी कारभार विरोधात फलक धरून, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला.


भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम अध्यक्ष प्रदीप चौधरी, युवमोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सकपाळ, सौरभ सिंह, सचिव स्वानंद भणगे, चिंतन देढिया, अमोल साळुंके आणि युवा मोर्चा जिल्हा आणि मंडल पदाधिकारी उपस्थित होते.


वाहतुक नियमांच्या जनजागृतीसाठी ‘नो चलान डे’ उपक्रम कल्याण ट्रॅफिक पोलिसांचा !!

वाहतुक नियमांच्या जनजागृतीसाठी ‘नो चलान डे’  उपक्रम कल्याण ट्रॅफिक पोलिसांचा !!


कल्याण, हेमंत रोकडे : मोटार वाहन रेग्युलेशन २०१९ अन्वये मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या तरतुदीमध्ये बदल होऊन मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध मोठ्या प्रमाणात दंडाची तरतूद करण्यात आली सदर कायद्यातील अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य सरकारने १ डिसेंबर २०२१ पासून राज्यभर सुरु केली आहे. महाराष्ट्रामध्ये “१ स्टेट १ चलान” या योजनेअंतर्गत फेब्रुवारी २०१९ पासून लेखी चलान बंद होऊन ई-चलान सुरु करण्यात आले आहे. 


वाहतुकीच्या नविन कायद्यांबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासह ते पाळण्याचे आवाहन करण्यासाठी कल्याण ट्रॅफिक पोलिसांतर्फे ‘नो चलान डे’ उपक्रम राबविण्यात आला. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना यावेळी गुलाब पुष्प आणि नव्या वाहतूक नियमांचे पत्रक वाहतूक पोलिसांकडून देण्यात आले.


केंद्र सरकारने काही आठवड्यांपूर्वी वाहतुकीच्या नियम मोडणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे पूर्वी काही शेमध्ये असणारा दंड आता हजारांच्या घरात पोहचला आहे. त्याजोडीला न्यायालयीन शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. त्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आजचा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती कल्याण ट्रॅफिक एसीपी मंदार धर्माधिकारी यांनी दिली. तसेच आज कल्याण स्टेशन परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना थांबवून वाहतुक पोलिसांनी त्यांचे न केले. एसटी स्टँड, शिवाजी चौक शहजानंद ,सुभाष चौक,दुर्गाडी अशा विविध ठिकाणी तसेच ‘नो चलान डे’ हा केवळ आजच्या दिवसापूरता मर्यादित असून वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर उद्यापासून पुन्हा एकदा कडक कारवाई सुरू केली जाणार असल्याचा इशाराही वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी यावेळी दिला.

Wednesday 29 December 2021

रविवारी ठाणे -दिवा मार्गावर मेगा ब्लॉक, या मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द.!!

रविवारी ठाणे -दिवा मार्गावर मेगा ब्लॉक, या मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम, अनेक लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द.!!


भिवंडी, दिं,30, अरुण पाटील (कोपर) :  मध्य रेल्वेकडून ठाणे-दिवा मार्गावर पुन्हा एकदा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम सुरू आहे. यासाठी रविवारी तब्बल 24 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी मध्यरात्री दोन ते सोमवारी मध्यरात्री दोनपर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे वाहतुकीवर परिणाम होऊन, प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मेगा ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे. ब्लॉकमुळे अनेक गाड्यांच्या वेळेमध्ये देखील बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मध्य रेल्वेने घेतलेल्या या ब्लॉकचा लोकल सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. एक जानेवारीला रात्री 11 : 43 पासून ते दोन जानेवारीला रात्री 11 : 43 पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या कल्याणहून सुटणाऱ्या अप आणि जलद गाड्या कल्याण आणि मुलुंड दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या गाड्या ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थाबंबणार नाहीत. पुढे मुलंड स्थानकावर अप धीम्याा मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. त्यामुळे या सर्व लोकल नियोजित वेळेपेक्षा दहा मिनिटे उशीराने पोहोचतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून निघणाऱ्या डाऊन धीम्या, अर्ध जलद सेवा मुलुंडहून 2 जानेवारी रोजी 5.05 पासून ते 3 जानेवारी मध्यरात्री 1.15 पर्यंत मुलुंड व कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या लोकल कळवा, मुंब्रा, कोपर व ठाकुर्ली स्थानकावर थांबणार नाहीत. 

दरम्यान या मेगा ब्लॉकदरम्यान काही लांब पल्ल्याच्या गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये अमरावती -मुंबई एक्सप्रेस, डेक्कन एक्सप्रेस, मुंबई-जालना- मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेस, मुंबई- आदिलाबाद नंदीग्राम एक्सप्रेस, डेक्कन क्विन, मुंबई-अमरावती एक्सप्रेस, सेवाग्राम एक्सप्रेस, मुंबई -नांदेड राजधानी एक्सप्रेस या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुले लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे चांगलेच हाल होणार आहेत.

ठाणे जिल्ह्यातील गरजू कष्टकरी महिलांना केंद्र - राज्य शासनाच्या योजनेच्या मार्फत बनविणार उद्योजक - 'डॉ. आदर्श भालेराव'

ठाणे जिल्ह्यातील गरजू कष्टकरी महिलांना केंद्र - राज्य शासनाच्या योजनेच्या मार्फत बनविणार उद्योजक - 'डॉ. आदर्श भालेराव'


कल्याण, बातमीदार : दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत.जीवनात प्रगती करण्याचे शिक्षण हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. महिलांची प्रगती आणि सक्षमीकरणासाठी (Mahila Sashaktikaran) शिक्षणापेक्षा जास्त परिणामकारक काय असू शकते? आर्ट ऑफ लिविंगने शिक्षणाद्वारे देशातील काना कोपऱ्यातील ग्रामीण मुली आणि महिलांना समान दर्जाने सक्षम बनवले आहे. 

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमामुळे देश विदेशातील महिलांना आर्थिक स्वतंत्र बनवले आहे, ज्यामुळे त्या सामाजिक अन्यायाविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. या महिला सकारात्मक परिवर्तनाचे प्रतिनिधी बनून इतर महिलांना शिक्षित आणि सक्षम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःची ओळख प्राप्त करून देण्यासाठी परिश्रम घेत आहेत. 

पण तरी जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी समाजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तसेच महिला मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परावलंबित्व आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडतात. अनादी काळापासून महिलांवरील ही बंधने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहेत. 

सामाजिक असमानता, कौटुंबिक हिंसा, अत्याचार आणि आर्थिक परावलंबित्व यातून स्त्रियांची सुटका व्हायची असेल तर गरज आहे महिला सक्षमीकरणाची (सबलीकरण / सशक्तीकरण). प्रथम ‘आपण सक्षम आहोत’ याची खात्री स्त्रियांनी बाळगणे गरजेचे आहे. आपण स्त्री आहोत या आत्मग्लानीमध्ये कधीही राहू नका. जेंव्हा तुम्ही आत्मग्लानीमध्ये येता तेंव्हा ऊर्जा, उत्साह आणि सामर्थ्य गमावता. अध्यात्मिक मार्ग एकमेव मार्ग आहे जेथे तुम्ही आत्मग्लानी आणि अपराधीपणावर मात करू शकता. आत्मग्लानी आणि अपराधी भावना, दोन्ही मध्ये तुम्ही आपल्या मनाचा छोटेपणा अनुभवता - ज्यामुळे तुम्ही आपल्या आत्म्यापासून दूर जाता. स्वतःला दोष देणे बंद करून आपली स्तुती - कौतुक करणे सुरू करा. ‘स्तुती करणे दैवी गुण आहे, होय नां? मी स्त्री आहे, अबला आहे, असा विचार सुद्धा करू नका. या आंतरिक असमानातेमुळे काहीही घडणार नाही. उभे रहा, तुमचे अधिकार प्राप्त करण्यासाठी गरजेचे सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. नक्कीच समाजामध्ये बदल घडायलाच हवा. परंतु आत्मग्लानीमध्ये राहून तुम्ही हा बदल करू शकत नाही.” 

जर  समाज्यात बदल घडवायचं असेल तर महिला सबलीकरण / सशक्तीकरण | Women Empowerment  होण अत्यन्त गरजेचं आहे. 

महिलांना औद्योगिक क्षेत्रातील मशनरीचे ट्रेनिंग आणि रोजगार निर्माण करण्यासाठी प्रहार  Social Problems Anti-Injustice Legal Guidance Center कल्याण च्या माध्यमाने  महिला रोजगार मार्गदर्शन अभियान 2022 आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती  संचालक 'डॉ. आदर्श भालेराव' यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

ज्या तरुण तरुणी व गरजू कष्टकरी महिला बचत गट महिला यांना  उद्योग क्षेत्रात आपल पाऊल टाकून उद्योगाची शुरुवात करण्याची इच्छा आहे अश्या इच्छुकानी प्रहार Social Problems Anti-Injustice Legal Guidance Center च्या माध्यमाने  महिला रोजगार मार्गदर्शन अभियान 2022  सहभागी होण्यासाठी खालील नंबर वर संपर्क करावे अशी माहिती देण्यात आली.

प्रत्येक महिलेत सुप्तगुण असतात. त्या सुप्तगुणांना व्यवसायात रूपांतरित करण्याची गरज असते. स्वयंपूर्णा संस्थेच्या वतीने अशा महिलांना विचारपीठ उपलब्ध करून देण्यात येते. त्यामुळे महिलांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन विचाराने आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे,

महिलांनी उद्योजिका होताना शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. त्यासाठी महिलांनी ऑनलाइन उद्योग आधार काढण्याची गरज आहे. उद्योग सुरू केल्यानंतर उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवणे महत्त्वाचे आहे 

कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार आहे. परंतु कर्ज घेताना उद्योजिकांनी आत्मविश्वासाने स्व:तचे विश्लेषण करीत तुम्ही काय करू शकता, हे पटवून देण्याची गरज आहे. 

गरीब गरजू महिलांना मानसिक आधार देऊन स्वयंपूर्ण होण्यासाठी बचत गटांच्या विविध उपक्रम राबविले जाणार आहेत त्याना आवडीचा व्यवसाय निवडता येईल व्यवसाय साठी भांडवल उभे करण्यासाठी  केंद्र - राज्य शासनाच्या अनेक योजनेचा योग्य लाभ कोणत्या प्रकारे घेता येईल  योग्य मार्गदर्शन  करण्यात येणार अशी माहिती 'डॉ. आदर्श भालेराव' यांनी दिली. 

ठाणे, कल्याण भिवंडी डोंबिवली टिटवाळा बदलापूर शहापूर मुंब्रा, मुरबाड, अंबरनाथ शहरात महिलांची बेरोजगारी संख्या वाढती आहे. शहरातील कंपन्यांमध्ये विविध प्रकारचे जॉब महिलांना देण्यासाठी तसेच महिलांना उद्योग क्षेत्रातील मशनरी बाबत तंत्रज्ञान देऊन कामाच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी रोजगार मार्गदर्शन अभियान 2022 आयोजित करण्यात येणार  आहे. त्याच्या माध्यमातून शहरातील महिला, तरुण-तरुणींना रोजगाराची संधी देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व्हाट्सएप नंबर कल्याण "9892715554" या मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरोनाने वाढवली महाराष्ट्राची चिंता, तर मुंबईत उद्रेक !!

कोरोनाने वाढवली महाराष्ट्राची चिंता, तर मुंबईत उद्रेक !!


मुंबई, बातमीदार : कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल ३ हजार ९०० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज तब्बल ३ हजार ९०० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे

तर १३०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. मागील दोन- तीन दिवसांपासून कोरोनाची संख्या ही हजाराच्या पुढेच येत आहे. आज रुगणसंख्येने तीन हजाराचा आकडा देखील ओलंडला आहे. त्यातच नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.

आज मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा उद्रेक झालेला पाहिला मिळाला तर आज मुंबई महानगपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी मुंबईमध्ये २५१० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याच कालावधीत २५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आज एका रुग्णाचा कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय. 

म्हारळ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिका-याच्या बदलीसाठी सरपंच आणि सदस्यांनी एकमेकांच्या विरोधात थोपटले दंड !!

म्हारळ ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिका-याच्या बदलीसाठी सरपंच आणि सदस्यांनी एकमेकांच्या विरोधात थोपटले दंड !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील सर्वात मोठ्या बहुचर्चित म्हारळ ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बी आर वाघचौडे हे मनमानी कारभार करतात म्हणून यांची बदली करण्यात यांवी अशी मागणी सरपंच, उपसरपंच व काही सदस्यांनी केली होती, परंतु ग्रामविकास अधिकारी हे ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थित व चांगल्या प्रकारे करतात त्यामुळे त्यांची बदली करण्यात येवू नये अशी मागणी एकूण १७ सदस्यांपैकी १२ सदस्यांनी स्वाक्षरी करून कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली असून सरपंच, उपसरपंच विरुद्ध काही सदस्य असा "सामना" म्हारळ गावात रंगणार आहे, यामुळे ऐन थंडीत या परिसरात वातावरण भलतेच तापले आहे.


कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत ही सर्वाधिक महसूल देणारी, १७ सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे. प्रगती प्रकाश कोंगिरे (सरपंच), अश्विनी निलेश देशमुख (उपसरपंच), वेदिका गंभिरराव, किशोर वाडेकर,
अँड दिपक अहिरे, बेबी सांगळे, अनिता देशमुख, अमृता  महेश देशमुख, प्रकाश चौधरी, लक्ष्मण कोंगिरे, योगेश देशमुख, निलिमा म्हात्रे, प्रमोद देशमुख, मंगला इंगळे, नंदा म्हात्रे, विकास पवार आणि मोनिका गायकवाड असे १७ सदस्य सुमारे एक ते दिड लाख लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. लोकांची कामे करण्यासाठी यांना नागरिकांनी निवडून दिले आहे. परंतु सध्या म्हारळ ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी कसे वाईट व कसे चांगले याचा सामना सरपंच, उपसरपंच व सदस्यांमध्ये सुरू झाला आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायत ही वादग्रस्त व कटकटीची म्हणून ओळखली जाते. यामुळे येथे कोणी ग्रामविकास अधिकारी यायला तयार नसतात आँगस्ट २०२१ मध्ये बी आर वाघचौडे हे येथे हजर झाले, म्हारळ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. शिवसेनेच्या सरपंच तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपसरपंच तर भाजपा विरोधक असे सत्ता विभाजन झाले आहे. परंतु सरपंच प्रगती कोंगिरे या सरपंच पदी विराजमान झाल्यापासून ग्रामविकास अधिकारी वाघचौडे हे मनमानी कारभार करतात, लोकप्रतिनिधींचा अपमान करतात, सरपंच, उपसरपंच, सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, सदस्यांनी मंजूर केलेली कामे करीत नाहीत, फोन उचलत नाही, सरपंचाना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, इतिवृतात परस्पर बदल करतात, असे अनेक आरोप करत. त्यामुळे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी व पत्र सरपंच प्रगती कोंगिरे व इतर ४ सदस्यांनी  सीईओ यांना दिले आहे.

तर ग्रामविकास अधिकारी वाघचौडे हे हजर झाल्यापासून ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थित व चांगल्या प्रकारे सुरळीतपणे सुरू आहे, सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामकाज करीत आहे, उलटपक्षी सरपंच प्रगती प्रकाश कोंगिरे या चुकीची कामे करण्यासाठी दबाव आणत आहेत पण ते दबावाला बळी पडत नाही, म्हणून त्यांची बदली करण्याचा खटाटोप सुरू आहे, एकाच वार्डात जास्तीत जास्त कामे निवडणे, वार्डात मतभेद, एका व्यक्तीच्या फायद्यासाठी ४० लाखाचा निधी खर्च करणे, मासिक सभेची मान्यता न घेता परस्पर निविदा आदेश काढण्यासाठी सूचना देणे, ग्रामविकास अधिकारी यांच्या कामात अडथळा निर्माण करणे, संवेदनशील ग्रामपंचायत असून १० वर्षात मोठे घोटाळे, अंदाजपत्रकाशिवाय खर्च करणे, ग्रामविकास अधिकारी यांची स्वाक्षरी होऊनही सरपंच प्रगती कोंगिरे यांनी आँगस्ट २०२१ पासून इतिवृत्त दिले नाही, अशा प्रकाराच्या दबावांंचा समावेश असून यामुळेच त्यांची बदली करण्यात येवू नये अशी मागणी १२ सदस्यांनी लेखी पत्राद्वारे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या कडे केली आहे. या पत्रावर अँड दिपक अहिरे, बेबी सांगळे, अनिता देशमुख, अमृता देशमुख, लक्ष्मण कोंगिरे, योगेश देशमुख, निलिमा म्हात्रे, प्रमोद देशमुख, मंगला इंगळे, नंदा म्हात्रे, विकास पवार, आणि मोनिका गायकवाड आदी सदस्यांचा समावेश आहे, सध्या म्हारळ परिसरात सरपंच, उपसरपंच व काही सदस्य यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. त्यामुळे ग्रामविकास अधिकारी वाघचौडे यांच्या "बदली" वरुन सुरू झालेला हा "सामना" निर्णायक होतो की काही "तडजोड" होते हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे. तसेच येत्या ३१ डिसेंबर म्हणजेच "थर्टी फस्ट" दिवशी होणाऱ्या मासिक सभेत याचा 'धुरळा' उडणार का? हे लवकरच स्पष्ट होईल या बाबतीत ग्रामविकास अधिकारी वाघचौडे यांना संपर्क साधला असता आपण कार्यशाळेत आहोत, असे त्यांनी सांगितले..

*प्रतिक्रिया

ग्रामविकास अधिकारी वाघचौडे हे हजर झाले पासून काय कामे केली, उलट सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा अपमान करतात, मनमानी कारभार करतात, त्यांची तक्रार केली आहे -श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे,(सरपंच, म्हारळ ग्रामपंचायत)

'आमच्याकडे तक्रार आली आहे, त्याची आम्ही चौकशी सुरू केली आहे -डॉ भाऊसाहेब दांंगडे* मुख्य कार्यकारी अधिकारी, जिप, ठाणे)

'ग्रामविकास अधिकारी वाघचौडे हे कायदा जाणणारे, कायदेशीर काम करणारे, हुशार आहेत, गेल्या ६ वर्षात दलितवस्ती मध्ये ७३ लक्ष रुपये खर्च केले नाहीत, हे त्यांच्या मुळे समोर आले, ते बेकायदेशीर कामे करत नाहीत म्हणून त्यांच्या बदलीची मागणी सरपंचाकडून होत आहे -अँड दिपक अहिरे, सदस्य, ग्रामपंचायत, म्हारळ.

साईभक्त नवजागृत ग्रुप, कासार कोळवणचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !! "युयुत्सु आर्ते आणि मराठी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत काब्दुले यांची प्रमुख उपस्थिती"

साईभक्त नवजागृत ग्रुप, कासार कोळवणचा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा !!

"युयुत्सु आर्ते आणि मराठी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेते प्रशांत काब्दुले यांची प्रमुख उपस्थिती" 


कोकण, (शांताराम गुडेकर/मोहन कदम) :

          रत्नागिरी जिल्हामधील संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण गावच्या श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ पुरस्कृत साईभक्त नवजागृत ग्रुप, कासार कोळवण या तरुण मुलांच्या सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटनेच्या दिनदर्शिका २०२२ चा प्रकाशन सोहळा साई मंदिर, कासार कोळवण येथे सामाजिक कार्यकर्ते श्री. युयुत्सु आर्ते आणि मराठी टेलिव्हिजन वरील प्रसिद्ध अभिनेते श्री. प्रशांत काब्दुले यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. 


यावेळी कासार कोळवण गावच्या सरपंच सौ. मानसी करंबेळे, कुणबी युवा संगमेश्वरचे सेक्रेटरी कु. वैभव तोरस्कर , ग्रा.पं. सदस्या सौ. वनिता करंबेळे, सौ. श्रद्धा करंबेळे, सौ. दीक्षिती करंबेळे, पोलीस पाटील श्री. महेंद्र करंबेळे, जेष्ठ नागरिक श्री. शंकर तोरस्कर, श्री राजाराम करंबेळे, श्री.तुकाराम करंबेळे, श्री. रोशन कदम आणि गावातील प्रतिष्ठित मान्यवर तसेच कासार कोळवण ग्रामस्थ उपस्थित होते. 


कार्यक्रमाची सुरुवात कुळवाडी भूषण रयत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी नवजागृत ग्रुपच्या सर्व युवा कार्यकर्त्याना मोलाचं असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शैलेश दळवी यांनी केले. 


कार्यक्रमाला साईभक्त नवजागृत ग्रुपचे सर्व कार्यकर्ते खूप तळमळीने मेहनत घेतली. त्या सर्वांचे आभार मानण्यात आले तसेच ज्यांनी या दिनदर्शिकेस जाहिराती दिल्या अशा जाहिरातदारांची नावे वाचून त्यांचे देखील आभार मानण्यात आले व सर्व उपस्थित मान्यवरांचे कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि साईभक्त नवजागृत ग्रुपचा उत्साह द्विगुणित केला त्या बद्दल आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

प्रभागात अनधिकृत चाळीचे व आर.सी.सी फुटिंगचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई - कडोमपा !!

प्रभागात अनधिकृत चाळीचे व आर.सी.सी फुटिंगचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई - कडोमपा !!


कल्याण, हेमंत रोकडे : महापालिका आयुक्त "डॉ. विजय सूर्यवंशी" यांचे निर्देशानुसार विभागीय उपायुक्त अनंत कदम यांचे मार्गदर्शनाखाली 1/अ प्रभागातील सहा. आयुक्त सुहास गुप्ते यांनी मोहना येथील रहिवास नसलेल्या दहा चाळींच्या खोल्यांचे बांधकाम व चार जोते निष्कासित करण्याची धडक कारवाई नुकतीच केली. सदर कारवाई अधिक्षक स्वाती गरुड, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी व 1 जेसीबी यांच्या सहाय्याने करण्यात आली.


त्याचप्रमाणे विभागीय उपायुक्त सुधाकर जगताप यांचे मार्गदर्शनाखाली 7/ह प्रभागाचे सहा.आयुक्त अक्षय गुडधे यांनी डोंबिवली पश्चिम, जूनी डोंबिवली येथील सुरेश भुवन इमारतीच्या बाजूला, भारत माता शाळेच्या मागे बांधकाम धारक सुरेश गायकवाड यांचे राज्य शासनाच्या भूखंडावरील आर.सी.सी फुटिंग आणि कॉलमचे बांधकाम निष्कासित करण्याची धडक कारवाई आज केली. 


सदर कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी, विष्णुनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी व 1 जेसीबी, 1 ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात आली.


शिशु विकास मंदिरात चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत !!

शिशु विकास मंदिरात चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत !!


जळगाव, बातमीदार : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिशु विकास मंदिरात कोरोना नियमांचे पालन करीत सिनीयर गटाची प्रत्यक्ष शाळा सुरु करण्यात आली. विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले !

बालकांचा किलबिलाट दिसून आला. फुलांच्या पायघड्यांवरुन विद्यार्थ्यांनी वर्गात प्रवेश केला. फुलांच्या पायघड्यांच्या दोन्ही बाजूला दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात येऊन सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. ज्येष्ठ शिक्षिका सौ. सुषमा साळुंखे आणि सहाय्यक शिक्षक श्री. सागर पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अनुक्रमे झांज आणि ढोलकच्या तालावर स्वागत केले. उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला शाळेच्या समन्वयिका सौ.लताताई छापेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. साधना महाजन, शिशु विकास मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. वृषाली दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत करण्यात आले. पालकांनी मनोगत व्यक्त करुन शाळेला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे नियोजन सौ. मिनाक्षी पाठक व सौ. वृषाली दलाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. भाग्यश्री राव तर आभार सौ. दिपाली शिंपी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले !

Tuesday 28 December 2021

अनेक वर्षे रखडलेला पाण्याचा प्रश्न मिटला - 'प्रभागातील नागरिकांकडून' माजी नगरसेवकांचा सन्मान

अनेक वर्षे रखडलेला पाण्याचा प्रश्न मिटला
- 'प्रभागातील नागरिकांकडून' माजी नगरसेवकांचा सन्मान


कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण पूर्व प्र.क्र. ९६ मधील साई टॉवर्स नामक सोसायटीच्या एका इमारतीच्या रहिवाश्यांना गेली सहा वर्षांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र हा प्रश्न स्थानिक माजी नगरसेवक रमेश सुदाम जाधव यांना कळविल्यानंतर रहिवाशांचा प्रश्न मार्गी लागला. या मुळे आनंदित झालल्या रहिवाश्यांनी माजी नगरसेवक रमेश सुदाम जाधव आणि त्यांच्या पत्नी रेखा जाधव यांचा जाहीर सत्कार केला.


 प्रभागातील प्रश्न सोडवण्यासाठी नगरसेवक हा कटिबद्ध असतो. क.डों.म.पा. क्षेत्रातील प्र.क्र. ९६ जाईबाई साईनगर प्रभागातील साई टॉवरच्या दुसऱ्या इमारतीत बिल्डरकडून पाण्याची पूर्तता करण्यात आलेली नव्हती. मागील सहा वर्षे येथील रहिवासी पाण्यासाठी वणवण करीत होते. घरी एखादा पाहूणा जरी आला तरी मोठा प्रश्न रहिवाशांना पडत होता. त्यामुळे पालिकेचा कर भरूनही पाण्याचा रोजचा प्रश्न बाहेरून सोडवावा लागत होता. बिल्डर कडून सहकार्य मिळने जवळपास धूसर वाटू लागले होते. 


यामुळे इमारतीतील रहिवाशी माजी महापौर असलेले प्रभागाचे स्थानिक माजी नगरसेवक रमेश सुदाम जाधव यांच्या भेटीस आले. त्यांनी संबंधित समस्या रमेश जाधव आणि रेखा जाधव यांना कळवली. यावर तोडगा काढू असा शब्द रमेश जाधव यांनी रहिवाशांना दिला होता. त्यामुळे पुढील काही काळातच दिलेल्या शब्दा नुसार जाधव यांनी पाठपुरावा करून तात्काळ नवी पाईपलाईन इमारतीला पोहोचवली आणि सहा वर्षांनी घरोघरी नळाला पाणी आले.


पाण्याने सुखवलेल्या रहिवाशांची वणवण मिटल्याने त्यांनी रमेश जाधव आणि त्यांच्या पत्नी रेखा जाधव यांचा सत्कार केला. त्याचबरोबर शिवसेना शाखाप्रमुख प्रमोद परब, उप शाखा प्रमुख राम पावशे, महिला शाखा संघटक कांचन हुमने, चंद्रकांत पालव, दत्ता पाखरे, मनोहर राणे, सखाराम भोसले व इतर सहकाऱ्यांचा देखील सन्मान केला. या प्रसंगी अजय गमरे, प्रमोद गुड्डू परब, अशोक पाखरे, प्रमोद ओव्हाळ, सचिन आळंगे, विजय आळंगे, नंदकुमार भोसले व सोसायटीतील इतर रहिवासी देखील उपस्थित होते.


प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी मी नेहमी पुढे असतो असे रमेश जाधव यांनी सांगितले तर भविष्यात आम्ही देखील रमेश जाधव यांच्या पाठीशी उभे राहू असे इमारतीतील रहिवाशांनी सांगितले.

कोरोनाचे संकट गडद ; दिल्लीत लॉकडाऊन !!

कोरोनाचे संकट गडद ; दिल्लीत लॉकडाऊन !! 


मुंबई, बातमीदार : देशातील कोरोनाचं संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत चाललं आहे. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराबरोबरच इतर व्हेरिंएंटची लागण झालेले रुग्णही वाढू लागले आहेत.
दिल्लीमध्ये हा वेग अधिक असल्याचे स्पष्ट झाले असून दिल्ली सरकारने कठोर नियम करण्यास सुरूवात केली आहे. सरकारकडून मंगळवारी 'यलो अलर्ट' जारी करत अनेक निर्बंध लावण्यात आले. त्यामुळे दिल्लीत आता अंशत: लॉकडाऊन असणार आहे.

दिल्लीमध्ये सोमवारी ३३१ रुग्ण आढळून आले आहेत. नऊ जूननंतर पहिल्यांदाच एवढे रुग्ण आढळून आले आहेत. यादिवशी पॉझिटिव्हिटी रेट ०.६८ टक्के होता, तर आदल्यादिवशी हा दर ०.५५ टक्के एवढा होता. दरम्यान, यलो अलर्ट अंतर्गत दिल्लीमध्ये अनेक निर्बंध तातडीने लागू करण्यात आले 

असे असतील निर्बंध :- 

रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी

सम-विषम नियमानुसार दुकाने, मॉल (अत्यावश्यक सेवा वगळून) सकाळी 10 ते रात्री 8 यावेळेत खुली राहतील.

उद्योगधंदे सुरू राहणार 

बांधकाम क्षेत्राला दिलासा, कामे सुरू ठेवण्यास परवानगी

उपाहरगृहे सकाळी 8 ते रात्री 10 यावेळेत तर बार हे दुपारी 12 ते रात्री 10 यावेळेत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

चित्रपटगृहे, मल्टीप्लेक्स, सभागृह अनिश्चित काळासाठी बंद राहणार

हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी, पण कार्यक्रमाचे हॉल बंद राहणार

स्पा, जिम, सलून, ब्युटी पार्लर, योगा इन्स्टिट्यूट, मनोरंजन पार्क बंद राहणार

दिल्ली मेर्टो, आंतरराज्य बस 50 टक्के क्षमतेने धावणार

रिक्षा, ई-रिक्षा, टॅक्सी, सायकल रिक्षामध्ये केवळ दोन प्रवाशांना परवानगी

स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियम, जलतरण तलाव बंद राहणार

सार्वजनिक उद्याने सुरू राहणार

विवाह समारंभांना केवळ 20 लोकांना उपस्थितीची परवानगी

सामाजिक, राजकीय, धार्मिक, उत्सव आणि इतर मनोरंजनात्मक उपक्रमांवर बंदी

धार्मिक ठिकाणे खुली राहणार पण भक्तांना प्रवेशासाठी बंधने

शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लास बंद राहणार

खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी

हरीयाणा राज्य येथुन अपहरण झालेल्या २ अल्पवयीन मुलींना घेतले शिताफीने ताब्यात.!! "कल्याण महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनची कामगिरी"

हरीयाणा राज्य येथुन अपहरण झालेल्या २ अल्पवयीन मुलींना घेतले शिताफीने ताब्यात.!!  "कल्याण महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनची कामगिरी"


कल्याण, हेमंत रोकडे : हरीयाणा राज्य, जिल्हा नुह येथील सिटी तावडु पोलीस स्टेशनचे ASI जसविर सिंग यांनी वपोनि. अशोक होनमाने यांना फोनद्वारे कळविले की, हरीयाणा राज्य येथुन २ अल्पवयीन मुली वय १५ वर्षे व १८ वर्षे यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असुन त्याबाबत सीटी तावडु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन मुली कल्याण येथे आल्याची माहीती मिळुन आली असुन तपास पथकाला कल्याण येथे पोहचण्यास वेळ लागणार आहे. तरी अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घ्यावे, अशी विनंती केली होती.


अपहरण झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखुन वपोनि अशोक होनमाने यांनी सदरची माहीती मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ - ३, सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांना कळवुन अपहरण झालेल्या मुलींचा कल्याण परीसरात शोध घेणे कामी तात्काळ महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे दिपक सरोदे, भालेराव, तिडके यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करून पाठविले होते. त्या प्रमाणे सदर पथकाने आपले सर्व कसब पणाला लावुन अतिशय दक्ष व चाणाक्षपणे कल्याण रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड परीसर, मार्केट परीसरात अपहरण झालेल्या मुलींचा मिळालेल्या वर्णनांचे आधारे कसोशीने शोध घेतला असता अपहरण झालेल्या मुलींच्या वर्णनाप्रमाणे २ अल्पवयीन मुली लक्ष्मी भाजीमार्केट गेटसमोर भांबावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे चौकशी केली असता त्या हरीयाणा राज्य येथुन अपहरण झालेल्या मुली असल्याचे निष्पन्न झाले आहे. हरीयाणा राज्य, सिटी तावडु पोलीस स्टेशनचे ASI जसविर सिंग हे महिला पोलीस अंमलदार व पोलीस पथकासह पोलीस ठाण्यात आले. ASI जसविर सिंग यांचेकडील कागदपत्रांप्रमाणे पडताळणी केली असता ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही अल्पवयीन मुली अपहरण झालेल्या मुलीच असल्याची खात्री झाली आहे. कायदेशिर कारवाईने दोन्ही अल्पवयीन • मुलींना सिटी तावडु पोलीस स्टेशनचे ASI जसविर सिंग यांचे ताब्यात देण्यात आले आहे.


अशा रितीने हरीयाणा राज्य येथुन अपहरण झालेल्या २ अल्पवयीन मुली कल्याण परीसरात असल्याची माहीती मिळाल्यावरुन मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण श्री दत्तात्रय कराळे, मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण श्री. सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, उमेश माने-पाटील यांचे मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांचे देखरेखीखाली महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे डिटेक्शन पथकाचे दिपक सरोदे, पोहवा  भालेराव, तिडके यांनी सदर मुलींचा कसोशिने शोध घेवुन अपहरण झालेल्या मुलींबाबत माहीती मिळाल्यापासुन २ तासांचे आत अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींना ताब्यात घेवुन उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...