Thursday 30 December 2021

विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल म्हणजे, शिक्षण क्षेत्रात वाझे तयार करण्याचा महाविकास आघाडीचा डाव..

विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल म्हणजे, शिक्षण क्षेत्रात वाझे तयार करण्याचा महाविकास आघाडीचा डाव..


डोंबिवली, (ऋषिकेश चौधरी) :
महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या मनमर्जीने ने अधिवेशनात चर्चा न करताच विद्यापीठ विधेयक पारीत करुन घेतल्या च्या विरोधात, डोंबिवली येथे भाजयुमो कल्याण जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.


2017 मध्ये, विधानसभा आणि विधानपरिषद ह्या दोन्ही सभागृहात बहुमताने पारित झालेल्या विद्यापीठ सुधारणा कायद्या मध्ये महाविकास आघाडी सरकारने दडपशाहीने दुरुस्ती आणली, आणि शिक्षण मंत्र्यांना उप कुलगुरू म्हणून मान्यता देऊन, शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करण्याचे अधिकार दिले. विद्यापीठ नियुक्ती, विद्यापीठाच्या खरेदी, परीक्षा विभाग, अभ्यासक्रम ह्या सर्वात आता राजकीय हस्तक्षेप होणार आहे. शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज लोकांनी ह्याला विरोध करून नाराजी प्रकट केली आहे, असे मिहिर देसाई जिल्हाध्यक्ष, भाजयुमो, कल्याण जिल्हा यांनी सांगितले.


भाजप ह्या अरेरावी आणि दडपशाही विरुद्ध हायकोर्ट मध्ये देखील दाद मागणार आहे. प्रत्येक विद्यापीठ, जिल्हा स्तरावर रस्त्यावर उतरून तीव्र विरोध करेल असे शशिकांत कांबळे यांनी सांगितले. या वेळी आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आघाडी सरकारच्या मनमानी कारभार विरोधात फलक धरून, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांनी निषेध नोंदवला.


भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, भाजयुमो कल्याण जिल्हाध्यक्ष मिहिर देसाई, डोंबिवली ग्रामीण अध्यक्ष नंदू परब, डोंबिवली पश्चिम अध्यक्ष प्रदीप चौधरी, युवमोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राहुल सकपाळ, सौरभ सिंह, सचिव स्वानंद भणगे, चिंतन देढिया, अमोल साळुंके आणि युवा मोर्चा जिल्हा आणि मंडल पदाधिकारी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !!

रितिका भोसलेने दुबई इंटरनेशनल कराटे चैंपियन शिपमध्ये जिंकली दोन सुवर्ण पदक !! मुंबई,  (शांताराम गुडेकर ) :         बूड़ोकन कराटे ...