Thursday 30 September 2021

कुटुंब रंगलंय खेळात ; एकाच कुटुंबातील 5 जण विविध प्रकारच्या खेळात !!

कुटुंब रंगलंय खेळात ; एकाच कुटुंबातील 5 जण विविध प्रकारच्या खेळात !!


कल्याण :- कल्याण मधील एकाच कुटुंबामधील आई बाबा आणि मुलं असे पाच जण क्रीडा क्षेत्रांमधील विविध खेळांमध्ये आपलं नशीब आजमावत आहेत
नुकत्याच हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तनिष्क माजी याने गोळा फेक मध्ये महाराष्ट्र राज्याकडून खेळताना सुवर्णपदक मिळवत कुटुंबात अजून एका राष्ट्रीय खेळाडूंची भर पडली..


तनिष्कचे प्रशिक्षक आई आणि वडील हे दोघेही गत आठ वर्षपासून गोळाफेक ची तयारी करून घेत आहेत.
वडिल शांती दुलाल माजी हे आपली पोलीस दलातील नोकरी सांभाळत स्वतः फुटबॉल या खेळात त्यांनी सातत्यपूर्ण खेळ करत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये चमक दाखवलेली आहे तसेच ते सध्या महाराष्ट्र पोलीस दलाचे फुटबॉल प्रशिक्षक म्हणून घाटकोपर येते कार्यरत आहेत.
आई नीता शांती माजी नॅशनल ऍथलेटिक्‍स प्लेयर्स म्हणुन रेल्वे आर .पी .एफ. दलात कार्यरत असून अथलेटिक्स या खेळात त्यांनी गोल्ड मेडल मिळवले आहे..
 
तर ईशान आणि दिक्षा हे  ॲथलेटिक्स या खेळामध्ये आपलं नशीब अजमावत असून त्यांनीही जिल्हा स्पर्धेमध्ये विशेष चमक दाखवलेली आहे..

अविनाश ओंबासे
9820991450

शेई गावचे' तारमळेमामा' कल्याण पंचायत समितीच्या सेवेतून निवृत्त, सोहळा संपन्न !!

शेई गावचे' तारमळेमामा' कल्याण पंचायत समितीच्या सेवेतून निवृत्त, सोहळा संपन्न !!


कल्याण, (संजय कांबळे) : आपल्या मनमिळाऊ आणि शांत स्वभावाने प्रशासनातील तसेच इतरांना ही 'जयहरी' करायला लावणारे शहापूर तालुक्यातील शेई गावचे नारायण दतू तारमळे अर्थात सर्वांचे तारमळे मामा हे आज जिल्हा परिषदेच्या सेवेतून सेवा निवृत झाले, त्यांचा निवृती सोहळा नुकताच कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.


कल्याण पंचायत समितीचे कुंटूब प्रमुख तथा गटविकास अधिकारी अशोक भवारी हे या सोहळ्यात बोलताना म्हणाले, प्रशासनात काम करताना आपल्या अनेक गोष्टी करायच्या राहून जातात, आपली स्वप्ने, इच्छा, आकांशा ह्या दाबून ठेवाव्या लागतात. त्याप्रमाणे सेवेत पद महत्त्वाचे नसून आपण त्या पदाची सेवा कशी करतो याला महत्त्व असते. त्यामुळे आज निवृत होणारे तारमळे यांनी चांगली सेवा केली, आणि म्हणूनच प्रशासनात चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा महत्त्वाचा घटक आहे असे त्यांनी सांगितले. तर पत्रकार संजय कांबळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्याला अनेक कर्मचाऱ्यांची नावे माहिती नसतात. पण ते स्वतः ची वेगळी अशी ओळख निर्माण करतात. तशी ओळख तारमळे मामा यांनी केली आहे. ते एकमेव असे शिपाई आहेत की ज्यांनी प्रशासनासह कल्याण पंचायत समिती परिसरात येणाऱ्या प्रत्येकाला 'जयहरी, म्हणायला लावले.


तसे पाहिले तर नारायण तारमळे हे १९८६ मध्ये जिल्हा परिषदेच्या सेवत रुजू झाले होते. पहिल्यांदा शहापूर पंचायत समितीला शिपाई म्हणून सेवा केली त्यावेळी शहापूर येथे एस डी पवार हे गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत होते. यानंतर त्यांची बदली १९९१ मध्ये कल्याण येथे झाली. एकत्र कुंटूबपध्दतीमध्ये वाढलेले तारमळे मामा हे माळकरी असल्याने कल्याणला ते सर्वांना जयहरी, किंवा रामकृष्ण हरी म्हणून हात जोडायचे, त्यामुळे आपसूकच समोरचा जयहरी करायचा, सेवेत असताना त्यांनी वाशिंद परिसरातील वारकरी संप्रदायाचे दिंंड्या मध्ये भालदार व चोपदार म्हणून सहभागी झाले होते. १९८५ मध्ये सुनीता यांच्याशी विवाह झाल्यानंतर आजही हे तितकेच उत्साही व तरुण दिसतात, मनमिळाऊ, शांत, संयमी असे तारमळे मामा कल्याण पंचायत समितीच्या प्रशासनात ३०/३२ वर्षे सेवा केल्यानंतर आज सेवानिवृत्त झाले आहेत. कल्याण पंचायत समितीच्या सभापती अनिता वाकचोरे, गटविकास अधिकारी अशोक भवारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार - "जि. प.उपाध्यक्ष सुभाष दादा पवार"

ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवणार - "जि. प.उपाध्यक्ष सुभाष दादा पवार"


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :
ठाणे  जिल्ह्यातील शिक्षकांचे जिल्हास्तरावरील कोणतेही प्रश्न  प्रलंबित ठेवले जाणार नाहीत. असे आश्वासन ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष दादा पवार यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्ठमंडळास  दिले. 
     ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पाताई पाटील, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्यकार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे, शिक्षणाधिकारी शेषराव बढे व प्रशासनातील सर्व विभागप्रमुख यांच्या उपस्थितीत शिक्षक संघटनांची नुकताच एक महत्वपुर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीत प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष भगवान भगत यांनी अनेक प्रश्न मांडले. पदवीधर प्रश्न सोडवावा, विकल्प विपरीत शिक्षकांना ठाणे जिल्ह्यात परत आणावेत, वेतन  समानीकरण करावे, निवडश्रेणीच्या यादीतील  दुरुस्त्या कराव्यात, वरीष्ठ वेतनश्रेणी घेणाऱ्या शिक्षकांना एकस्तर देण्यात यावा, पगारास  दिरंगाई करु नये, शाळांची बॅंक खाती शुन्य बॅलंस असल्याने शाळा सुरु होण्यापूर्वी स्वच्छतेचे साहित्य पुरवावे, अप्रशिक्षित सेवानिवृत्त शिक्षकांचा प्रश्न सोडवावा, सेवानिवृत्त विस्तार अधिकाऱ्यांची प्रलंबित वेतने अदा करावीत, दिव्यांग शिक्षकांचे प्रश्न सोडवावेत, केंद्रप्रमुख पदोन्नती करावी. उर्दु माध्यमाची रिक्त पदे  भरावीत. अशा अनेक प्रश्नांवर या बैठकीत तोडगा काढण्यात आला. 
       नुकताच विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक पदोन्नती, निवडश्रेणी, वरीष्ठ वेतनश्रेणी, हिंदी मराठी परीक्षा सुट यांसारखे प्रश्न सोडवले असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांना खुप  मोठा दिलासा दिला आहे. हे  प्रश्नही लवकरच सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन अध्यक्षा, उपाध्यक्ष, मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यानी यावेळी बोलतांना दिले. 
    यासभेस ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने  जिल्हाध्यक्ष भगवान भगत, गणेश रिकामे, सोमनाथ सुरोशे, विलास पाटील प्रत्यक्ष उपस्थित होते तर वसंत पडवळ,प्रविण विशे, अनिल शेलार, रविंद्र  मोहपे, शैलेश ईसामे, आकांक्षा पवार, नितीन तारमळे, पंडीत  गायकवाड, गणेश गायकवाड, रविंद्र घरत, विकास भोईर, संतोष घिगे,व अनेक शिक्षक मोठ्याप्रमाणावर ऑनलाईन उपस्थित होते.

मतीमंद मुलांना शालेय साहित्य, खावु,व भेटवस्तू देऊन मुरबाड मध्ये आमदार रोहितदादा पवार यांचा वाढदिवस साजरा.!!

मतीमंद मुलांना शालेय साहित्य, खावु,व भेटवस्तू देऊन मुरबाड मध्ये आमदार रोहितदादा पवार यांचा   वाढदिवस साजरा.!! 


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :

जनसामान्यांचे लाडके नेतृत्व महाराष्ट्राचे लोकप्रिय आमदार आदरणीय रोहितदादा पवार 


यांच्या वाढदिवसा निमित्त तारांगण मतिमंद मुलांची निवासी कार्यशाळा शिरवली, तालुका मुरबाड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुरबाड शहर यांचे माध्यमातून शैक्षणिक साहित्य, ओला व सुका कचऱ्यासाठी डजबिन भेट व खाऊ वाटप करून रोहित दादांचा वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुरबाड शहर अध्यक्ष दिपक वाघचौडे, शहर उपाध्यक्ष महेश जाधव, शहर सरचिटणीस आशिष तेलवणे, सामाजिक न्याय मुरबाड शहर अध्यक्ष विलास जाधव, अमोल भवार, शाळेचे व्यवस्थापक म्हाडसे सर व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.


स्व. विजय खांबे यांच्या कुटुंबियांना न्यू इंग्लिश स्कुल दमामे, माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात !

स्व. विजय खांबे यांच्या कुटुंबियांना न्यू इंग्लिश स्कुल दमामे, माजी विद्यार्थ्यांचा मदतीचा हात !


कोकण - ( दिपक कारकर ) :

स्वतःच जीवन जगता-जगता दुसऱ्याच्या दुःखात सामील होण्याच्या माणुसकीचे दर्शन माजी विद्यार्थ्यांच्या हातून घडले आहे.नुकतीच घडलेली दुःखद घटना म्हणजे दापोली तालुक्यातील भडवळे ( देऊळवाडी ) गावचा तरुण विजय खांबे ( वय - ३२ ) यांचं काही महिन्यांपूर्वी आकस्मिक निधन झालं. हाताला मिळेल ते काम करून आपला कौटुंबिक उदरनिर्वाह करणारा विजय आपल्या प्रेमळ, मेहनती स्वभावाने वाडीत सर्वांचा प्रिय होता. मात्र त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबियांवर मोठं दुःख कोसळले, घरचा कर्ता-कमविता फार कमी वयात कायमचाच निघून गेल्याने हे दुःख सहन न होण्यासारखेच होते. विजय यांच्या कुटुंबातील असणारी त्यांची पत्नी, १ वर्षाचा मुलगा, आई, भाऊ आणि बहिण असा त्यांचा परिवार आहे. या कुटूंबियांना कर्तव्यनिष्ठ भावनेतून मदतीचा हात देण्यासाठी न्यू इंग्लिश स्कुल, दमामे या विद्यालयाच्या सन - २००६ च्या इ.१० वी तुकडीतील माजी विद्यार्थ्यांनी ₹ १०,००० / रक्कम जमा करून कुटुंबियांना सुपूर्त केली. हा उपक्रम करताना माजी विद्यार्थी प्रशांत कदम, प्रदिप खांबे, शंकर धनावडे, सुरेश शिगवण व सर्व माजी विद्यार्थी परिवार यांनी स्व. विजयच्या कुटुंबियांना आधार देत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

Wednesday 29 September 2021

डोंबिवलीतील अत्याचार पिडीतेच्या न्याय हक्कासाठी समविचारी संस्था, पक्ष, संघटना एकवटल्या....!

डोंबिवलीतील अत्याचार पिडीतेच्या न्याय हक्कासाठी समविचारी संस्था, पक्ष, संघटना एकवटल्या....! 


डोंबिवली, (प्रतिनिधी) : कल्याण - डोंबिवली मधिल विविध पक्ष, सामाजिक संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींनी डोंबिवली येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून १४ वर्षीय बालिकेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. 


या निवेदनात १) सदर पीडित बालिकेच्या परिवारास पन्नास लाखाची मदत सरकारने तत्काळ जाहीर करावी, अन्यथा घरातील एका व्यक्तीस शासन दरबारी नोकरी द्यावी या मागणीसह  पिडीताच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत मोफत पोलीस संरक्षण देण्यात यावे, सदर गुन्ह्याचा तपास एस.आय.टी. करीत असल्याने तज्ञ व अनुभवी अधिका-यांमार्फत तपास करण्यात येवुन सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. 


या खटल्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करून दोषींना फाशीची शिक्षा करण्यात यावी. या मागण्यांसह कल्याण-डोंबिवली परीसरात चालू असलेले अनधिकृत हुक्का पार्लर, दारूचे अड्डे, उध्वस्त करून चरस-गांजा व इतर अमली पदार्थांची तस्करी व अवैध विक्री करणाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करून असे धंदे त्वरित बंद करण्यात यावेत. यांसारख्या विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सदर निवेदनावर आण्णासाहेब पंडित (प्रदेश-सरचिटणीस, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती), काळू कोमास्कर (अध्यक्ष, लाल बावटा युनियन), अमित दुखंडे (संघटक, आझाद हिंद कामगार सेना महाराष्ट्र), पँथर आनंद नवसागरे (कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष, रिपब्लिकन सेना), संजय गायकवाड (अध्यक्ष, शिक्षण स्वाभिमानी संघटना), अनामिकाताई महाले (ठाणे जिल्हाध्यक्षा, आरपीआय आंबेडकर गट), योगिनी पगारे (अध्यक्षा, भीम आर्मी) अलकाताई जगताप (महिला आघाडी ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेना), गायित्री चव्हाण (महिला अध्यक्षा अंबरनाथ तालुका, अन्याय अत्याचार निर्मूलन समिती), नितीन दोंदे (भारतीय विद्यार्थी संघटना), राजेंद्र परांजपे (R.M.P.I.) तसेच राजु दोंदे, भुजंग साळवे, राजेंद्र पराड, गणेश हरीनामे, (सर्व अन्याय अत्याचार निर्मुलन समिती) यांचे सह विविध पक्ष संघटनांचे रमेश ढगे, हर्षल कुशालकर, दिनेश पुजारी, ज्योती कुरेल, राजेंद्र शिंदे, महेंद्र आवारे, सुनील चव्हाण आदी उपस्थित होते. वरील सर्व मागण्यांची पुर्तता करणे कामी पोलीस प्रशासनाकडून प्रयत्न केला जाईल तसेच शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन सहाय्यक पोलीस आयुक्त मोरे यांनी उपस्थितांना दिले.

परम संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी आपल्या 75 व्या जन्मोत्सवा निमित्त संपूर्ण मानव जातीला, "अंतरी जागृत राहा, संपर्कात राहा, काळजी घ्या" हा संदेश दिला.परम संत राजिंदर सिंह जी महाराज यांनी आपल्या 75 व्या जन्मोत्सवा निमित्त संपूर्ण मानव जातीला, "अंतरी जागृत राहा, संपर्कात राहा, काळजी घ्या" हा संदेश दिला. !!

सावन कृपाल रुहानी मिशनचे अध्यक्ष परम संत राजिंदर सिंह जी महाराजांच्या हीरक जयंती चा समारंभ अध्यात्म, दिव्य प्रेम आणि असीम कृपेच्या वर्षावाचा उत्सव होता, जो की 20 सप्टेंबर 2021 ला साजरा केला गेला. अध्यात्मिक गुरु तसेच ध्यानाभ्यास विषयावर आधारित पुस्तकांचे सुप्रसिद्ध लेखक संत राजिदंर  सिंह जी  महाराज म्हणतात की,  आज या गोष्टीची आवश्यकता आहे की आपण आपल्या वास्तविक रूपाला म्हणजेच आत्मिक रूपास जाणावे आणि आपल्या अंतरी प्रभूशी जोडले जावे. आपले हे विचार त्यांनी तीन दिवसीय विशेष ऑनलाइन कार्यक्रमात सांगितले, ज्यास विश्वभरातील लाखो लोक पाहात होते.
या शुभ प्रसंगी समस्त मानवतेला संत राजिदंर सिंह जी महाराजांनी आपला सर्वव्यापी आणि उभार देणारा संदेश, " अंतरी जागृत रहा, संपर्कात रहा आणि काळजी घ्या" असा दिला. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की ध्यान-अभ्यासाद्वारे आपण स्वतःला आत्मिक स्वरूपात अनुभवतो, जो की चेतन आहे आणि प्रभूचा अंश आहे. जेव्हा आपण एकदा याची अनुभूती घेतो की आपण एक आत्मा आहोत, तेव्हा आपली इच्छा होते की आपण प्रभु चे प्रेम आणि प्रकाशाशी जोडले जावे. जेव्हा आपण एकदा प्रभूशी अंतरी जोडले जातो, त्यानंतर आपणास असा अनुभव होतो की प्रभु केवळ माझ्यातच नव्हे तर बाकी सर्व जीवांमध्ये सुद्धा आहे. तेव्हा, आपण प्रेमपूर्वक प्रत्येकाची काळजी घ्यावयास लागतो. चला तर! आपण सर्व प्रभूच्या मार्गाचे  अनुसरण करण्याचा  प्रयत्न करूया, जो आपणास परत प्रभूशी एकरूप करेल. संत राजिंदर सिंह जी महाराजांनी आपला हा विश्व कल्याणकारी लाईव्ह संदेश नेपरविले, अमेरिकेहून युट्युब वर दिला.
संत राजिंदर  सिंह जी महाराज आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त अध्यात्मिक गुरु आहेत. ते संपूर्ण विश्वभरात ध्यानाभ्यासाद्वारे आंतरिक आणि बाह्य शांती आणण्याकरिता  प्रयत्नशील असतात. आजच्या आधुनिक युगामध्ये संत राजिंदर सिंह जी  महाराजांना 30 पेक्षा अधिक वर्षांपासून संपूर्ण विश्वात शांती, प्रेम आणि मानव एकतेचे संदेश प्रसारक म्हणून ओळखले जाते.  
एक वैज्ञानिक असल्याने संत राजिंदर सिंह जी महाराजांनी विज्ञान आणि त्याच्या निष्कर्षांच्या उदाहरणातून अध्यात्मिक शिकवणूक समजावितात. म्हणून संपूर्ण विश्व आज याचा स्वीकार करत आहे की कशाप्रकारे विज्ञान आणि अध्यात्म एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

संत राजिंदर सिंह जी महाराजांचे संपूर्ण जीवन आणि कार्य प्रेम आणि निष्काम सेवेची निरंतर चालणारी एक यात्रा आहे. आणि जगभरातील लाखो लोकांच्या मानवी जीवनातील खऱ्या उद्देशाला प्राप्त करण्यास मदत करते. ते सर्व समाज आणि धर्मातील लोकांना ध्याना -भ्यासाची विधी शिकवून पिता परमेश्वराची अनुभूती करवितात. याचं करिता त्यांचा पावन संदेश विश्वभरातील लोकांमध्ये आशा, प्रेम, मानव एकता आणि निष्काम सेवे च्या प्रति जागृती निर्माण करतो. ते ध्यानअभ्यास विषयावरील लिहिल्या गेलेल्या पुस्तकांचे विश्व प्रसिद्ध लेखक सुद्धा आहेत. याकरिता त्यांना विविध देशांद्वारे अनेक शांती पुरस्कारांबरोबरच 5 डॉक्टरेट च्या मानत पदव्या देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.

सावन कृपाल रूहानी मिशनची आज संपूर्ण विश्वभरात 3,200 पेक्षा अधिक केंद्र स्थापित आहेत. तसेच मिशनचे साहित्य विश्वभरातील 55 पेक्षा अधिक भाषांमध्ये प्रकाशित झालेले आहे. याचे मुख्यालय विजय नगर, दिल्लीमध्ये आहे तसेच आंतरराष्ट्रीय मुख्यालय नेपरविले, अमेरिकेत स्थित आहे.

सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2

अमृता : +91 84510 93275

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे महाडमधील मु. मौजे तांबडभुवन व मु. मौजे किंजलघर येथे गृहपयोगी साहित्याचे मोफत वाटप !!

पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबुरतर्फे महाडमधील मु. मौजे तांबडभुवन व मु. मौजे किंजलघर येथे गृहपयोगी साहित्याचे मोफत वाटप !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

         सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय, बौद्धिक इ. क्षेत्रांत लोककल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था. 


या संस्थांची संघटना एका विशिष्ट हेतूने व उद्दिष्टासाठी केलेली असते आणि त्यांत काम करणारे स्वयंसेवक स्वेच्छेने व निःस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात. या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींत सापडलेल्यांना साहाय्य करतात; प्रसंगी आर्थिक मदतही देतात. 


यांशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे, नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे, बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास साहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचे काम पंचरत्न मित्र मंडळतर्फे गेली अनेक वर्षे केले जात आहे. 


सामाजिक बांधिलकीचा वारसा अखंडपणे जपत आलेल्या पंचरत्न मित्र मंडळातर्फे मु.मौजे तांबडभुवन व मु.मौजे किंजलघर ता.महाड, जि.रायगड येथे मोफत ब्लँकेट, चादर, बेडशिट, चटईसह अन्य गृहपयोगी साहित्य वाटप कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे  म्हणून कार्यकारी संचालक आर.सी.एफ मा. सुहास शेलारसाहेब, श्री.अश्विन कांबळे साहेब (वरिष्ठ प्रबंधक मा.स. -आरसीएफ), तसेच तसेच पंचरत्न मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री.अशोक भोईर, सचिव श्री प्रदीप गावंड तसेच मंडळाचे पदाधिकारी उपसचिव वैभव घरत, सल्लागार हनुमंता चव्हाण, उपाध्यक्ष रमेश पाटील, एम डिसोझा, डी. एम. मिश्रा, रहीम शेख, संतोष नाईक, जालिंदर इंगोले, प्रकाश मांडवकर, सुशील मिस्त्री, संजय वडाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील मिस्त्री यांनी तर आभार प्रदर्शन अशोक भोईर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाला मदत करणारे देणगीदार, शुभचिंतक, तसेच सर्व कार्यकर्ते यांचे मंडळाच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले.

Tuesday 28 September 2021

नालासोपारा येथे हेल्थ केअर पॅथॉलॉजी आणि निर्भय जन संस्थेने राबवले रक्त तपासणी शिबीर !!

नालासोपारा येथे हेल्थ केअर पॅथॉलॉजी आणि निर्भय जन संस्थेने राबवले रक्त तपासणी शिबीर !!


नालासोपारा- (दिपक मांडवकर/शांत्ताराम गुडेकर) :

      नालासोपारा पश्चिम नाळा गाव येथे वसई तालुक्यात परिचित असलेली निर्भय जन संस्था विविध वैद्यकीय व अन्य उपक्रम राबवत असताना नालासोपारा येथे हेल्थ केअर पॅथॉलॉजी आणि निर्भय जन संस्थेच्या वतीने अल्पदरात रक्त तपासणी शिबीराचे आयोजन केले. यात प्रामुख्याने नाळा गावातील नागरिकांनी भरगोष प्रतिसाद देऊन तब्बल १४६ नागरिकांनी तपासणी करून घेतली. तर हेल्थ केअर पॅथॉलॉजी ल्याबचे प्रमुख श्री. ओमकार राणे यांनी तपासणीसाठी आलेल्या प्रत्येक नागरिकांची कोरोना नियमांचे पालन करून अत्यावश्यक सहकार्य केले. सकाळी सात वाजल्या पासून दुपारी दोन वाजे पर्यंत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.निर्भय जन संस्थेचे अध्यक्ष श्री. कॅलिस ब्रास, सरचिटणीस श्री नितिन दोनतलावकर, माजी कार्यध्यक्ष श्री. जॉन परेरा, विशेष कार्यकारी सदस्य श्री. रुकसान तुस्कनो आणि हेल्थ केअर पॅथॉलॉजी ल्याबचे श्री. ओमकार राणे यांनी नागरिकांचे आभार मानले.

अखेर सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांच्या लढ्याला यश !! ***उपोषणाचे हत्यार उपसताच सां.बा.राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हादरले **

अखेर सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांच्या लढ्याला यश !!

***उपोषणाचे हत्यार उपसताच सां.बा.राष्ट्रीय महामार्ग प्रशासन हादरले **


मुरबाड ,(मंगल डोंगरे) :
कल्याण मुरबाड राष्ट्रीय महामार्ग या रस्त्याची झालेली चाळण व पडलेले हजारो खड्डे, त्यात दैनदिन प्रवास करणा-या प्रवाशांना करावा लागणारा धोकादायक प्रवास आणि होणारे अपघात पाहता 


सदर रस्त्याचे म्हारळ ते पाचवा मैल पर्यंत तात्काळ डांबरीकरण करण्यात यावे. म्हारळ ते माळशेज घाट रस्त्याच्या दोन्ही कडेचे गवत तात्काळ काढण्यात यावे. शहाड पुलावरील खड्डे तात्काळ भरण्यात यावेत. म्हारळ, कांबा, वरप गावातील पाण्याच्या विसर्गाची व्यवस्था करणे, माळशेज-मुरबाड मार्गे, मुंबई-भिंवडी कडे जाणा-या अवजड वाहणांसाठी रायते पुलापासुन -कल्याण फाट्यापर्यंत नवीन रस्त्याची निर्मिती करणे, अशा मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते, रमेश हिंदूराव यांनी संबंधित खात्यांकडे अनेकदा पत्रव्यवहार करून धोकादायक बाबी प्रशासना समोर मांडण्याचा प्रयत्न केला. 


मात्र ढिम्म प्रशासनाने याकडे जाणीव पुर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आज अखेर म्हारळ, कांबा, वरप, ग्रामस्थांसह पदाधिकारी यांचे सोबत बेमुद्दत धरणे आंदोलन आणि उपोषण सुरू करताच, सां.बा.व राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली आणि डांबरी रोडवरील हेलकावे खात करावा लागणारा होडीचा प्रवास आता लवकरच संपणार असल्याचे अधिकारी वर्गानी प्रत्यक्षात उपोषण कर्त्यांची भेट घेऊन लेखी पत्र देवुन यातील, 


मागणी क्रमांक -1)-20 आँक्टोबर पर्यंत कांक्रीटीकरण सोडून  रस्त्याच्या दोन्ही बाजुचे डांबरी करण केले जाईल. 2) धोक्याच्या वळणावरील गवत सरकारी मजुरांकडुन काढण्याचे काम सुरु आहे. ते शेवट पर्यंत पुर्ण केले जाईल. 3) 7 आँक्टोबर पासून काँंक्रीटी करणाचे काम सुरू करण्यात येईल. 4 ) वाहतूक विभागाची परवानगी मिळताच शहाड पुलावरील खड्डे तात्काळ भरण्यात येतील. 5 ) म्हारळ, वरप, कांबा गावातील पाण्याचा विसर्ग करण्यासाठी या परीसरातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेऊन उंच आणि मोठ्या मो-या बांधल्या जातील. तसेच 6) कल्याण शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपण सुचविलेल्या रायता पुलापासुन मुंबई, भिंवडी, कल्याण फाट्यापर्यंतच्या नविन रस्त्याबाबतचे मागणी पत्र वरीष्ठांकडे तात्काळ पोहचविले जाईल. असे लेखी आश्वासन दिल्याने अखेर उपोषण कर्ते रमेश हिंदूराव  महेश देशमुख , विवेक गंभीरराव, अश्विन भोईर, लक्ष्मण सुरोशी, योगेश देशमुख, अश्फाक शेख यांनी अधिका-यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले. 

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे प्रेरणादाई कार्य !! "२५ रुग्ण मोफत शस्त्रक्रियेसाठी रवाना"

आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशनचे प्रेरणादाई कार्य !!
"२५ रुग्ण मोफत शस्त्रक्रियेसाठी रवाना"


कल्याण : आज 28/9/2021 रोजी *आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत शस्त्रक्रिया साठी तेरणा हॉस्पिटल याठिकाणी २५ रुग्णांना पाठवण्यात आले.*

खालील दिलेले रुग्णाचे आजार सर्वे रिपोर्ट. शस्त्रक्रिया सर्व मोफत मध्ये करण्यात येणार आहे.
1) हृदयाची शस्त्रक्रिया. 2) अन्ननलिका शस्त्रक्रिया 3) हाडांचे फॅक्चर शस्त्रक्रिया 4) कॅन्सर शस्त्रक्रिया  5) कान.नाक व घसा शस्त्रक्रिया  6) हर्निया 7) स्वशननलिकेच्या संबंधित शस्त्रक्रिया  8) पुरुष ग्रंथी  वाढणे मूत्राशयाच्या मार्ग संकुचित होणे 9) मणक्याची शस्त्रक्रिया  10) यकृत्याचे आजार / शस्त्रक्रिया 11) सांध्याच्या शस्त्रक्रिया  12) अपेन्डिस  13) डोळ्यातील सफेद पडद्याची शस्त्रक्रिया  14) मुतखडा शस्त्रक्रिया  15) जीभेच्या शस्त्रक्रिया  16) किडनीचे आजार  17) गर्भपिशवी दुरुस्ती  18) पित्ताशय किंवा पित्ताशयातील खडे शस्त्रक्रिया

सर्व रुग्णांना घेऊन जाण्यासाठी गाडीची व्यवस्था आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी केली होती.

स्थळ : आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन.अनंता सुधा भवन. शॉप नंबर 3. न्यू स्टार सिटी हॉस्पिटल खाली. चक्की नाका. कल्याण ( पूर्व )
 
*: श्री जितेंद्र पाटील (आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन. अध्यक्ष )* 9970219877 / 8169741997

**मुरबाड मध्ये समाजसेवक राकेश डोंगरे यांच्या घरी साकारला "साखरचौथीचा" गणपती** "मुरबाड-कल्याण महामार्गावरील साईसंसार शेल्टर देवगाव येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही थाटामाटात झाले गणपतीचे आगमन"

**मुरबाड मध्ये समाजसेवक राकेश डोंगरे यांच्या घरी साकारला "साखरचौथीचा" गणपती**

"मुरबाड-कल्याण महामार्गावरील साईसंसार शेल्टर देवगाव येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही थाटामाटात झाले गणपतीचे आगमन"


**मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांसह टी.डी.सी संचालक राजेश पाटील यांसारख्या दिग्गजांनी घेतले बाप्पाचे दर्शन **

**भाद्रपद शुक्ल पक्ष गणेश चतुर्थीला येणाऱ्या गणपती, आणि गौराई ला अंनत चतुर्थ दशिला भक्ती भावाने  निरोप दिल्यानंतर "" क्रुष्णपक्षातीला येणाऱ्या गणपतीला ,,साखरचौथीच्या गणपतीचे मोठ्या थाटामाटाने आगमन होते.**

**समाज सेवक राकेश डोंगरे यांच्याकडे हि या गणपतीची दरवर्षी स्थापना केली जाते.**

**यावेळी नेहमीचे गौरी/गणपतींचे विसर्जन होउन लोकांमध्ये शांतता पसरते न पसरते तोच पुन्हा एकदा ,तोच उत्साह आणि जोश घेवून साखरचौथीच्या बाप्पाचे आगमन होते.अडीच दिवस विसावणा-या  या बाप्पाला भक्ती भावाने, पुजाअर्चा, भजन,प्रवचनानी मानवंदना दिली जाते.तर दुर्वा, फुले,उकडीचे लाडू, मोदकांचा, नैवद्य, तिनप्रहरी,आरती आरास करून आराधना केली जाते.**

**याबाबत राकेश यांना या गणपतीचे वैशिष्ट्य काय म्हणून विचारले असता,नवसाला पावणारा हा गणपती असून, मि माझ्या मुलाच्या नवसाच्या निमित्ताने स्थापना करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तर यावेळी गणपतीला मनोभावे आरती करताना राकेश डोंगरे सोबत, पत्नी, आई-वडील भाऊ दिसत आहेत. तर दुसरीकडे गणपती बाप्पाची संगीत भजनातुन आराधना करणारे सुमधुर ,सुश्राव्य भजन सुरु असल्याचे दिसून येत आहे.**

समांतर प्रतिष्ठान संस्थेचे शेतकरी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर संपन्न !!

समांतर प्रतिष्ठान संस्थेचे शेतकरी मार्गदर्शन  व प्रशिक्षण शिबिर संपन्न !!


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :
समांतर प्रतिष्ठान ही संस्था गेली विस वर्षे अनेक शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे.कुठलेही  शासकीय अनुदान न घेता संस्था विविध उपक्रम राबवत असते.रविवार दिनांक २६|९|२०२१रोजी कुसुमाई गार्डन्स, साजई ता.मुरबाड, ठाणे येथे संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी ई-पिक पाहणीचा ॲप कसा वापरावा याचे प्रशिक्षण व कृषि विभागाच्या विविध योजना कशा राबवण्यात येतात याचे मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेमार्फत तालुक्यात अशा प्रकारचे प्रशिक्षण घेणारी ही पहिलीच संस्था आहे, तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन सामाजिक भान ठेवणारी संस्था आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष व पंचायत समिती मुरबाडचे सभापती *दिपक पवार*  यांनी व्यक्त केले. संस्थेच्या उपक्रमांचा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील नागरिकांना उपयोग व्हावा यासाठी तालुका, जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. सदर कार्यक्रमात कर्जत तालुक्याचे अध्यक्ष पद सुयश क्लासेसचे संस्थापक श्री.ठाकुर सर यांना देण्यातआले व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पंचायत समितीचे मा. उपसभापती अनिल देसले, मुरबाड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष चेतनसिंह पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अविनाश भोईर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान भगत, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे मुरबाड तालुका अध्यक्ष  सोमनाथ शिरोसे, आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष कैलास कोर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयराम देसले,देवा ग्रुप फाऊंडेशनचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष मनोज देसले, शाळा  व्यवस्थापन समिती देवगावचे अध्यक्ष राजेश पाटील, अनेक शेतकरी, महिला उपस्थित होत्या. शिबिरामध्ये संदिप चव्हाण- कृषि सहाय्यक,तालुका कृषि विभाग व ललित बडगुजर- विस्तार अधिकारी, पंचायत समिती कृषि विभाग यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ देसले यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी जाहीर केले की संस्थेमार्फत लवकरच *राज्यस्तरीय व्यक्तिमत्त्व विकास शिबीर व कलाकारांच्या मदतीसाठी तीन दिवसीय कलामहोत्सवाचे* आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे भिवंडी तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले.

Monday 27 September 2021

आंबिवली बल्याणी मार्गावर रिक्षाचा अपघात ; 'ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रिक्षा चालकासह एक प्रवासी जखमी' !! *दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी*

आंबिवली बल्याणी मार्गावर रिक्षाचा अपघात ; 'ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रिक्षा चालकासह एक प्रवासी जखमी' !!

*दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी*


मोहोने : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आंबिवली बल्याणी मार्गावर रिक्षाचा अपघात झाला असून यात रिक्षा चालकासह एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

रिक्षाचालक कपिल गायकर है प्रवासी घेऊन आंबिवलीच्या दिशेने जात होते रस्त्याला प्रचंड मोठमोठी खड्डे पडल्याने अंधारातून वाट काढत रस्त्याने जात होते. नायलॉन प्लांट जवळ एन आर सी कंपनीचे भिंत बांधण्याचे अदानी समूहाच्या ठेकेदारांकडून काम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रीट पावडर टाकण्यात आली होती. रस्त्यावर पथदिवे नसल्याने खड्डा वाचविण्याच्या प्रयत्नात रस्त्यावर टाकलेल्या ग्रिट वरून गाडी घसरून अपघात झाला. या अपघातात रिक्षाचालक कपिल गायकर यांच्या हाताला फ्रॅक्चर झाले असून सहप्रवासी सद्दाम शेख त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

या अपघातास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार असून वेळीच रस्त्यांची डागडुजी केली असती तर असा अपघात झालाच नसता मी अनेकदा पत्रव्यवहार करून रस्त्याची डागडुजी करण्याकरिता प्रशासनाला कळविले आहे परंतु प्रशासन दखल घेत नसल्याने हा अपघात झाला असल्याचे "नगरसेविका नमिता मयुर पाटील" यांनी सांगितले आहे. 

असे असले तरी रस्त्यावर पडलेल्या खड्डे वाचवावे की ठेकेदाराने रस्त्यावर कामासाठी टाकलेली ग्रिट वाचवावी या गोंधळात हा अपघात झाला असून या अपघातात भिंत बांधणारा ठेकेदार जबाबदार आहे असे रिक्षाचालकांचे म्हणणे आहे.

या अपघाताबाबत 'अ' प्रभाग क्षेत्रातील 'सहाय्यक उपायुक्त राजेश सावंत' यांना विचारले असता भिंत बांधण्याच्या कामात सुरक्षा उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी न केल्यामुळे संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सावंत यांनी सांगितले आहे.

रात्रीच्या वेळेस येथील रस्त्यावर पथदिवे बंद असल्याने रिक्षा चालकासह गोरगरीब पायी चालत जाणाऱ्या नागरिकांचे अतिशय हाल होत असून पथदिवे सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

येत्या पंधरा दिवसात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने आंबिवली बल्याणी टिटवाळा रस्त्याची डागडुजी न केल्यास तसेच शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वार्ड क्रमांक ११ च्या "नगरसेविका नमिता मयुर पाटील" यांनी प्रशासनाला दिला आहे.

रिक्षाचालकांनी टिटवाळा पोलिसांना घटनास्थळी बोलावून पंचनामा करण्यास सांगितले असून संबंधित भिंत बांधणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी रिक्षाचालकांनी केली आहे.

गेंड्याची कातडी ओढून झोपलेले प्रशासन येत्या पंधरा दिवसात रस्त्यांवरील खड्डे बुजवितात की नाही याकडे 'अ' प्रभाग क्षेत्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

एच. जे. दोशी घाटकोपर हिंदूसभा हॉस्पिटल व सिद्धी महिला कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व हिंदूसभा रुग्णालयाचे ट्रस्टी प्रमुख, *श्रद्धेय श्री. मगनभाई दोशी* यांच्या मार्गदर्शनानुसार बौद्ध धम्मगुरुंकरिता *“मोफत विशेष आरोग्य शिबीर, औषध वाटप व संघदानाचा”* कार्यक्रम संपन्न. !!

एच. जे. दोशी घाटकोपर हिंदूसभा हॉस्पिटल व सिद्धी महिला कल्याणकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व हिंदूसभा रुग्णालयाचे ट्रस्टी प्रमुख, *श्रद्धेय श्री. मगनभाई दोशी* यांच्या मार्गदर्शनानुसार बौद्ध धम्मगुरुंकरिता *“मोफत विशेष आरोग्य शिबीर, औषध वाटप व संघदानाचा”* कार्यक्रम  संपन्न. !!


मुंबई, प्रतिनिधि : विश्व भूषण बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय शहिद स्मारक सभागृह, रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व), मुंबई येथे अत्यंत थाटामाटात, उत्साहात पार पडला. 


कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांनी *भगवान गौतम बुद्ध  व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून पुष्प अर्पण केले.  *मा. डॉ. वैभव देवगिरकर ( वैद्यकीय संचालक )* यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या कार्यक्रमास  *“विपश्यनाचार्य पूज्य भदन्त संघकिर्तिजी महाथेरो”* ( प्रमुख, भारतीय भिक्खू संघ ) प्रमुख उपस्थिती लाभली.  


त्यांनी सर्वाना मार्गदर्शन करत असताना एच. जे. दोशी हिंदूसभा रुग्णालय कोरोना काळात व आता हि कशाप्रकारे अत्यंत चांगली सेवा देत आहे याचा स्वतःचा अनुभव सांगत माझी या सर्वानी खूप सेवा करून मला नवीन आयुष्य दिल्याचे सांगितले. आज हि त्यांनी आपल्या सर्व बौद्ध भिक्खू साठी आरोग्य शिबीराचे आयोजन केले असून हिंदूसभा रुग्णालय करत असलेल्या सेवेचे व्रत असेच अखंड चालत राहू दे या साठी सर्व बौद्ध भिक्खू संघाच्या वतीने शुभाशीर्वाद दिले. आज बौद्ध धम्मगुरू यांच्या साठी रक्ततपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, ई. सी. जी., तज्ञ डॉक्टरांकडून त्यांच्या इतर प्रकारच्या आजारांचे निदान करून मोफत औषधे हि देण्यात आली. तसेच सर्व बौद्ध धम्मगुरू यांना भोजनदान व संघदान हि करण्यात आले. 


आजच्या या उपक्रमात ७० पेक्षा अधिक बौद्ध धम्मगुरू मुंबई सहित यवतमाळ, नांदेड, आसाम, कानपुर, त्रिपुरा येथून आले होते. त्या सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली व पुढील उपचारांसाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णालयातील सर्व डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी यांनी बौद्ध धम्मगुरूंना संघदान करून त्यांचे आशीर्वाद घेतले. सदरच्या कार्यक्रमास *“भिक्खू विरत्न थेरो”* ( कार्याध्यक्ष, भारतीय भिक्खू संघ ) विशेष सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन व आयोजन डॉ. रवींद्र कांबळे व श्री. आनंद सावते यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रवींद्र कांबळे यांनी केले.  


तसेच कार्यक्रमास *सिद्धी कल्याणकारी महिला संस्था* व त्याच्या प्रमुख श्रीमती *सौ. स्मिता कवाडे,* श्री सूर्यकांत गायकवाड, श्री विष्णू कांबळे, तसेच श्री. विजय गोरे, ऍड. विनोद जाधव जी ,  श्री. नामदेव उबाळे ( माजी नगरसेवक ), श्री बापू धुमाळे, डॉ. रजनीकांत मिश्र.  डॉ. ओमप्रकाश गजरे, डॉ. राहुल कोल्हे, डॉ. शबनम कराणी, डॉ. स्नेहा भट्टे, डॉ. निलक्षी धुरी, डॉ. संजय पाल, डॉ. विनायक अवकीरकर, डॉ. अक्षया वाघ, सौ. सुचिता मांजरेकर, सौ. राजश्री डुंबरे, श्री. चंद्रकांत गावडे, श्री. संजीवजी भावसार व रुग्णालयातील इतर कर्मचारी यांनी हि उपस्थित राहून सदरच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

टिळक नगर पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी फरार भाजप कार्यकर्त्याला एका तासात अटक !!

टिळक नगर पोलिसाची कौतुकास्पद कामगिरी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी फरार भाजप कार्यकर्त्याला एका तासात अटक !!


डोंबिवली, नईम खान : डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ३३ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजलेली असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिकवणी घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजपच्या कार्यकर्त्याला अटक केली आहे.
मानवी अन्याय निर्मूलन संघटनेच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष सौ सुवर्णा ताई कानवडे  याच्या दखल मुळे आरोपी वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवलीच्या टिळकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून पप्पू सहानी असं या आरोपीचं नाव आहे. पप्पू सहानी हा कल्याण पूर्व भागातील कचोरे येथील  भागात राहतो. तो मुलुंड येथे भाजप कार्यालयात गटप्रमुख म्हणून कार्यरत आहे  माझ्या पाठीमागे मोठ्या मोठ्या नेत्यांचा हात आहे. मला पोलिसांची काही भीती नाही असा पिडीत मुलीच्या आजीला आरोपीने दम दिल्याचे फिर्यादी यांनी तक्रार केली आहे. आरोपीच्या बोलण्यावरून अशी माहिती मिळत आहे की सदर आरोपी हा भाजपा चा कार्यकर्ता आहे पप्पू सहानीने आपण मुलुंडमध्ये भाजपसाठी काम करत असल्याचं म्हटलं आहे.. अशी माहिती समोर आली आहे. हा गुन्हा रविवारी रात्री १० वाजल्याच्या दरम्यान घडल्याचं कळतंय.

पीडित मुलगी या भागात लहान मुलांच्या शिकवण्या घेते. आरोपीची मुलगीही याच पीडित मुलीकडे शिकवणीसाठी यायची. रविवारी संध्याकाळी पीडित मुलगी आरोपीच्या मुलीला तिच्या घरी सोडण्यासाठी गेली. यावेळी घरी परतत असताना आरोपी पप्पू सहानीने तिला रस्त्यात बोलवून तिला अंधारात घेवून जावून  अंधाराचा फायदा घेत तिचा विनंयभंग केला.  व मुलीने आरडा ओरडा केल्याने आरोपीने मुलीला शिवीगाळ करत असल्याने पीडित मुलीच्या आजीला ला घडताना माहित झाल्यास विचारणा करण्यास गेलेल्या महिला हिला आरोपी कडून अश्लील शिव्या देत असल्याने स्थानिक नागरिक गोळा झाल्याने आरोपीने पळ काढला सदर झालेल्या घटनेची  दखल मानवी अन्याय निर्मूलन संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सौ सुवर्णा ताई कानवडे यांनी टिळक नगर पोलीस स्टेशन कळवताच  डोंबिवली टिळक नगर पोलीस स्टेशन   सहाय्यक पोलीस निरीक्षक  बाकळे,  यांनी सदर घटनेची दखल घेत गुन्हा दाखल केला सदर फरार आरोपी याच्या शोध घेण्यासाठी पथक तयार केले  पोना ६९३० घुगे, पोना ६९१६ जाधव, पोशि ७१७८ राठोड, पो महाले यांनी  या प्रकरणी तात्काळ कारवाई करत  फरार झालेल्या आरोपीला एका तासात अटक केली आहे. त्यामुळे मानवी अन्याय निर्मूलन संघटना ठाणे जिल्हा अध्यक्षा सौ सुवर्णा ताई कानवडे व वाल्मिकी आबेडकर आवास योजना कचोरे परिसरातील नागरिकांनी टिळकनगर पोलिसांच्या कामगिरी चा कौतुक करत आभार मानले.अवघ्या १ तासांत फरार आरोपीचा शोध करून बेड्या ठोकल्या आहेत . पोलिसांनी केलेल्या उत्तम कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

सदर आरोपी वर भारतीय दंड संहिता कलम ३५४ , प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्सस्युअल ऑफेन्सस ऍक्ट, २०१२’ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पपू सहानी  असे आरोपी चे नाव आहे. त्याला टिळकनगर पोलिसांनी रविवारी  साफला रचून अटक करून कल्याण न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. सदर पपू उर्फ छोटू सहानी हा मुलुंड मध्ये भाजपा साठी काम करतो असे कबूल केले आहे. सदर त्याच्या वर दाखल झालेल्या गून्ह्या बाबत राजकीय नेत्यांकडून हलचाली केले जातील  अशी माहिती आरोपीने दिले आहे. आरोपीच्या दिलेल्या माहिती वरून सदर झालेल्या घटने विरुद्ध कोण कोणत्या राजकीय नेत्याचा दबाव तपास अधिकारी याच्यावर आणला जाणार आहेत. व सदर दाखल झालेल्या गुन्ह्याची बातमी प्रकाशित होऊ नये यासाठी पत्रकार ह्याच्या वर हस्तक्षेप घेतला जाईल अशी माहिती फिर्यादी दिली आहे. सदर आरोपीच्या संपर्कात कोणता  राजकीय नेता आहे  . आरोपीच्या  बचावा साठी राजकीय नेत्या चा चहेरा समोर येणार आहे. यावर लक्ष लागून आहे . सदर आरोपीच्या बचावसाठी राजकीय हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे विनयभंगाच्या गुन्ह्यात हस्तक्षेप करणाऱ्या राजकीय नेत्याचा सीडीआर रिपोर्ट सह योग्य तपास ही करावा सदर आरोपी ह्याचा ही सखोल तपास करण्यात यावा अशी मागणी फिर्यादी कडून करण्यात आली आहे.
सदर पुढील तपास सपोनी बाकळे हे करत आहेत.

कोव्हीड सेंटरमध्ये डॉक्टर आणि स्टाफने मिळून केला एक वर्षाच्या बाळाचा वाढदिवस साजरा !!

कोव्हीड सेंटरमध्ये डॉक्टर आणि स्टाफने मिळून केला एक वर्षाच्या बाळाचा वाढदिवस साजरा !!


कल्याण, दि. २७ : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लाल चौकी येथील आर्ट गॅलरी कोव्हीड केयर सेंटरमध्ये डॉक्टर आणि स्टाफने  मिळून एक वर्षाच्या बाळाचा वाढदिवस साजरा केला.
योगेश कुंदे आणि कुसुम कुंदे यांना कोव्हिडची सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांना सोमवारी कोव्हिड सेंटर मध्ये भरती व्हावे लागले. 


सोमवारीच त्यांच्या जय नावाच्या बाळाचा वाढदिवस असल्याने त्यांना बाळाचा वाढदिवस साजरा करता आला नाही. जय बाळाचा पहिला वाढदिवस साजरा होत नसल्याने पालक चिंतेत होते. ही बाब डॉक्टर आणि स्टाफचा निदर्शनास आल्यानंतर डॉक्टरांनी आणि स्टाफने मिळून बाळाचा पहिला वाढदिवस मिस होऊ नये म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला लागलीच स्टाफने एक सुंदर केक आणला आणि सर्व स्टाफला बोलावून घेतले व जया बाळाचा केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी त्याच्या पालकांना आनंदाश्रू अनावर झाले होते. कोव्हीड सारख्या गंभीर आजारातही डॉक्टरांनी कुंदे  दांपत्याच्या चेहऱ्यावरती हसू फुलविल्याने डॉक्टर आणि स्टाफ त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी हॉस्पिटल मॅनेजर दिपाली मोरे सिस्टर इन्चार्ज संगिता पोटे डॉ. अमोल कांबळे डॉ. अक्षता तरे वार्ड बॉय प्रमुख राजू कदम सिस्टर मयुरी कांबळे ब्रदर ऋषिकेश बोरुडे प्रथमेश लगड मंदार शिंदे अक्षय भालेराव कैलास आव्हाड यांसह डॉक्टर आणि स्टाफ यांनी मिळून मोठ्या उत्साहात जयचा वाढदिवस साजरा केला.

दापोली नाशिक दापोली वेळ बदलणे संदर्भात 'आगार व्यवस्थापक' यांचा "मनमानी" कारभारासंदर्भात मा. परिवहन मंत्री (महाराष्ट्र राज्य) महाव्यवस्थापक वाहतुक, पणन नियोजन, विभाग नियंत्रक रत्नागिरी विभाग, विभागीय वाहतूक अधिकारी रत्नागिरी वरिष्ठांकडे पत्र पाठवून केली तक्रार !!

दापोली नाशिक दापोली वेळ बदलणे संदर्भात 'आगार व्यवस्थापक' यांचा "मनमानी" कारभारासंदर्भात मा. परिवहन मंत्री  (महाराष्ट्र राज्य) महाव्यवस्थापक वाहतुक, पणन नियोजन, विभाग नियंत्रक रत्नागिरी विभाग, विभागीय वाहतूक अधिकारी रत्नागिरी वरिष्ठांकडे पत्र पाठवून केली तक्रार !!


दापोली :  ग्रुप ग्रामपंचायत तिडे तळेघर यांच्या वतीने मंडणगड तिडे तळेघर नालासोपारा ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे त्यानुसार ही बस सेवा मंडणगड येथून सकाळी ०७.४५ वाजता सुटते व दापोली आगारा कडून दापोली नाशिक ही बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे सदर गाडीची वेळ सकाळी दापोली येथून 6.30 वाजता असल्याने ही गाडी मंडणगड येथे सकाळी सुटणारी मंडणगड नालासोपारा बसला दापोली नाशिक ही बस समांतर होत आहे तेव्हा दोन्ही गाडी बरोबर सुटल्याने मंडणगड नालासोपारा बस  भारमान कमी मिळत आहे तरी दापोली आगाराची दापोली कल्याण मार्गे नाशिक बस चा वेळ सकाळी ५.३० किंवा  ६.०० वाजता  करण्यात यावा या विषयाबद्दलची बोलणी केली असता आगार व्यवस्थापक दापोली आगार मान्य करण्यास तयार नाहीत तुमची  गाडीची वेळ बदली करा असे सांगण्यात आले आहे मंडणगड तिडे तळेघर नालासोपारा ही बस कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ही बस रेग्युलर सुरू असल्याने प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दापोली आगाराची दापोली नाशिक सदर बसची वेळ बदलण्यात यावी अशी तक्रार पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती,कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई गृपचे  संपर्कप्रमुख तथा तालुकाध्यक्ष श्री. वैभव बहुतूले यांनी वरिष्ठांकडे पत्र पाठवले आहे.

मुरबाड मध्ये भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद !! मात्र ** शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती संघटना, प्रहार संघटना सह सर्व सहभागी पक्षानी केला भांडवल वादी सरकारचा निषेध ***

मुरबाड मध्ये भारत बंदला अत्यल्प प्रतिसाद !!

मात्र **
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती संघटना, प्रहार संघटना सह सर्व सहभागी पक्षानी केला भांडवल वादी सरकारचा निषेध ***


मुरबाड, { मंगल डोंगरे } : आज भारतभर शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या बंदला मुरबाड तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला असुन, या बंद मध्ये काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, श्रमिक मुक्ती संघटना, प्रहार संघटनासह सहकारी पक्ष सहभागी झाले होते.


           केंद्र सरकारने आणलेले शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत. या मागणीसाठी गेले आठ महिन्यापासून दिल्लीत अंदोलन सुरू असून, या आंदोलनाला आज दिनांक 27 रोजी देशभरातील भाजपा  विरोधातील  सर्व पक्षा सोबतच      
शेतकरी, कामगार, श्रमिक, दुकानदार यांनी पाठींबा. दिला असून, मुरबाड मध्ये सर्व कामधंदे ,दुकाने, औद्योगिक क्षेत्रातील कारखाने सुरु ठेवून मुरबाड कर बंदमध्ये सहभागी झाले असुन, येथे अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी मुरबाड तहसीलदार कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात येऊन केंद्रातील भाजपा सरकारने केलेले शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावेत, अशी मागणी केली. याप्रसंगी केंद्र शासनाचा समाचार घेताना काँग्रेसचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी मोदी सरकारने सत्तेवर येण्यासाठी तरुणांना कबूल केलेल्या वर्षाला दोन कोटी नोक-या, प्रत्येकाच्या खात्यात पडणारे 15 लाख रुपये गेले कुठे, मोदींनी दिलेली आश्वासने आणि घोषणा ह्या पोकळ वादे ठरले असून, त्यात 14 कोटी लोकांचे रोजगार गेले आहेत. 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी वाढली असून याला केंद्र सरकारचे धोरण जबाबदार आहे.हे सरकार भांडवल दारांच्या दावणीला बांधण्याचा आरोप श्रमिक मुक्तीच्या इंदूमती तुळपुळे यांनी केला. लोकांना गरीबीचे चटके बसु लागले आहेत. मात्र बहुमतातील सरकारच्या पुढे सर्वच पक्ष हतबल झाले आहेत. त्यांच्या पुढे मोर्चे, आंदोलने आणि निषेध याशिवाय दुसरे हत्यार आता बोथट ठरत असुन, गोरगरिबांसाठी हे सर्व पक्ष ,संघटना आजही तितक्याच ताकदीने रस्त्यावर उतरून आपला विरोध दर्शवून निषेध व्यक्त करताना दिसतात. हाच विरोध आणि मागण्या. लावून धरण्यासाठी आज मुरबाड तहसिलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले.. यावेळी काँग्रेसचे मुरबाड तालुका अध्यक्ष चेतनसिंह पवार, शिवसेना मुरबाड शहर प्रमुख रामभाऊ  दुधाळे, काॅम्रेड विलास शेलार , दिलीप धनगर, संध्या कदम, दिपक वाकचौडे, अविनाश भोईर ,काँ.नारायण दादा पाटोळे, काँ. शारदा शेलार, काँ. अंजली जामघरे, यांचेसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेतकरी कामगार पक्ष तालुका तळा यांच्या माध्यमातून तळा पोलीस ठाण्यास एचपी प्रिंटर प्रदान ! शेकापच्या दातृत्व गुणांचे सर्वत्र कौतुक !!

शेतकरी कामगार पक्ष तालुका तळा यांच्या माध्यमातून तळा पोलीस ठाण्यास एचपी प्रिंटर प्रदान ! शेकापच्या दातृत्व गुणांचे सर्वत्र कौतुक !! 


     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : तळा तालुका आरडीसी बैंक संचालक ज्ञानेश्वर भोईर शेठ, शेतकरी कामगार पक्षाचे विद्यमान चिटणीस तथा महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती अध्यक्ष धनराज गायकवाड शेकाप यांच्या प्रयत्नाने लहुशेठ चव्हाण यांच्या माध्यमातून तळा पोलीस ठाण्यास एचपी प्रिंटर प्रदान करण्यात आला. 
      रायगड जिल्ह्यातील तळा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या दुर्गम तालुका आहे. एकेकाळी माणगांव तालुक्याचा अविभाज्य भाग असलेला तळा तालुका प्रशासकीय दृष्ट्या कामकाजाच्या सुनियोजनासाठी विभक्त करण्यात आला. डोंगराळ भागात वसलेल्या या तळा तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या पोलीस ठाण्याच्या दैनंदिन कामकाजात अत्यंत उपयुक्त ठरेल असा प्रिंटर उपरोक्त शेतकरी कामगार पक्ष टीम च्या माध्यमातून तळा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे आणि पोलीस हवालदार पवार व पोलीस हवालदार पाटील यांच्या कडे शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस धनराज गायकवाड, तळा आरडीसी बैंक संचालक ज्ञानेश्वर भोईर, लहुशेठ चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळा पोलीस ठाण्यास प्रदान केलेला हा इलेक्ट्रॉनिक प्रिंटर मुळे पोलीस ठाण्याच्या दैनंदिन  कामकाजास उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे तळा तालुका सामाजिक स्तरातून तळा शेतकरी कामगार पक्षाच्या सेवाभावी सहकारी भूमिकेचे आणि दातृत्व गुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कम्युनिस्ट पार्टी तर्फे शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून रस्ता रोको आंदोलन !!

कम्युनिस्ट पार्टी तर्फे शेतकरी आंदोलनास पाठिंबा म्हणून रस्ता रोको आंदोलन !!


चोपडा.. येथे भारतीय कम्युनिस्ट पार्टी तर्फे मोदी सरकारने गेल्यावर्षी केलेल्या तीन कृषी कायद्याविरुद्ध व चार कामगार श्रम संहिताविरुद्ध तसेच जनविरोधी कार्पोरेट धार्जिण्या देश विकाऊ धोरणांविरुदध देशातील डावे पक्ष व काँग्रेस आदी विरोधी पक्षांतर्फे आयोजित भारत बंद आंदोलनात सहभाग म्हणून चोपडा येथे धरणगाव चौफुलीवर काल ११.३० वा रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. 


त्यावेळी ३ कृषी कायदे रद्द करा ४ श्रम संहिता रद्द करा.कॉर्पोरेट धार्जिणे मोदी सरकार चा निषेध असो "अशा जोरदार घोषणा आंदोलकांनी दिल्या व पाटा नजीक रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अमृत महाजन, गोरख वानखेडे ,शांताराम पाटील, वासुदेव कोळी, आरमान तडवी, हाजी साहब, जियाउद्दीन काझी, फिरोज शेख, आत्माराम पाटील, राधेश्याम माळी, आदी पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी होते पोलिसांचा बंदोबस्त कडक होता.


तहसीलदारांना सादर निवेदनात नमूद  *.. शेतकऱ्यांचा विरोधातील 3 काळे कायदे रद्द करा कामगारांना बरबाद करणाऱ्या चार श्रम सहिता रद्द करा *नवीन विज कायदा रद्द करा* *बेरोजगारी हटाव* *ीवनावश्‍यक वस्तूंची प्रचंड भाव वाढ रोखा* *पेट्रोल डिझेल गॅस औषधी यांची महागाई रोखा* *शेतीमाल सोयाबीन कापूस धान्य भाजीपाला भावाची परवड रोखा* *सरसकट चाललेले बँक विमा रेल्वे आदी जनतेच्या घामाच्या पैशातून निर्माण झालेल्या मालमत्ता व संस्थांची चाललेली लय लूट व विक्री बंद करा शेतीमालाला हमीभाव मिळावे म्हणून नवीन एम एस पी  कायदा तयार करा. केरळच्या धर्तीवर भाजीपाल्याचे  हमीभाव बांधून द्या * * ग्रामपंचायत कर्मचारी यांचे थकीत पगार ध्या* *शेतकरी कामगार व्यापारी जनतेला गुलामगिरीपासून वाचवा..* .या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पत्रकात माहिती दिली आहे.भिवंडी तालुक्यातील महिला पोलीस कर्मचारी ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासात सुरक्षा अधिकारी पदावर !

भिवंडी तालुक्यातील महिला पोलीस कर्मचारी ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावासात सुरक्षा अधिकारी पदावर !


भिवंडी, दिं,27, अरुण पाटील, (कोपर) :
        जिल्ह्यातील एका पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेची विदेश मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सहायक सुरक्षा अधिकारी या पदावर निवड करण्यात आली. विशेष म्हणजे त्यांच्यावर पहिलीच जबाबदारी ऑस्ट्रेलिया येथे भारत सरकारच्या दूतावास (इंडियन एम्बेसी) आस्थापनेवरील सुरक्षा मिशनवर सोपविण्यात आली आहे. माया पाटील उर्फ आरती आनंद बेळगली, असे पोलीस नाईक असलेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्या भिवंडी तालुक्यातील अलिमघर गावातील रहिवाशी आहेत.
       आरती आनंद बेळगली या ठाणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत असलेल्या विशेष शाखा आस्थापनेत महिला पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. त्यांची नुकतीच विदेश मंत्रालय भारत सरकारमार्फत निवड केल्या जाणाऱ्या सहायक सुरक्षा अधिकारी पदावर निवड झाली आहे.आरती यांच्या एकूणच गुणवत्तेवर ऑस्ट्रेलिया येथील भारत सरकारच्या दूतावास (इंडियन एम्बेसी) कार्यालयाच्या आस्थापनेवरील मिशनवर नियुक्ती झाली आहे. त्या सध्या ठाण्यातील बाळकुम परिसरात कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत.
            अनेक गुणवत्ता व निष्कर्षावर निवडविदेश मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सहायक सुरक्षा अधिकारी म्हणून होणारी निवड अनेक गुणवत्ता व निष्कर्षावर केली जाते. त्यात इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे, वक्तृत्त्व, धाडसीपणा मेहनत घेण्याची तयारी सचोटी प्रामाणिकपणा व निष्ठा इत्यादी गुणांसह खेळ, वाहन चालविणे इत्यादी कला गुणांचाही विचार केला जातो. या साऱ्या निष्कर्षांवर पोलीस नाईक आरती बेळगली यांनी स्वतःला सिद्ध करून दाखविल्याने त्यांची निवड झाली असल्याचे केंद्रीय "पंचायत राज " राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सांगितले. ठाणे पोलीस दल व भिवंडी तालुक्यातुन आरती  यांचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Sunday 26 September 2021

कोरोनाच्या संकटकाळात जीवावर उदार होऊन पोलिसांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता म्हणून 'कोरोना समुपदेशन समिती'च्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलिसांच्या हस्ते करण्यात आले.!

कोरोनाच्या संकटकाळात जीवावर उदार होऊन पोलिसांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता म्हणून 'कोरोना समुपदेशन समिती'च्या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पोलिसांच्या हस्ते करण्यात आले.!


कल्याण ; दि. २६ :
      कोरोना समुपदेशन समितीच्या विदयमाने कल्याण येथील स्वामी नारायण हाॅल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे हे सातवे यशस्वी रक्तदान शिबिर होते. नागरिकांनी शिबिराला चांगला प्रतिसाद दिला. अनिल सांगळे आणि गणेश जाधव हया दोन पोलिसांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. शिबिरात  सर्वाधिक रक्तदाते आणल्याबद्दल उमेश परब यांचा समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. स्वामी नारायण हाॅलचे संचालक दिनेश ठक्कर यांनी रक्तदान करणे काळाची गरज असून  समिती असे उपक्रम राबवून अनेकांना जीवनदान देण्याचे कौतुकास्पद काम करत असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या. यावेळी विलास जोशी यांनी आपले 98 तर विनोद पाटील यांनी आपले 60 वे रक्तदान हया शिबिरात केले. योगेश धमेले व शितल धमेले हया पती पत्नीने जोडीने रक्तदान केल्याबद्दल त्यांचा अनिल काकडे यांच्या हस्ते  विशेष सन्मान करण्यात आला. 


              रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री अनिल काकडे, विनायक शेणवी, एकनाथ जाधव, सचिन ताम्हणकर, दत्ता गोरे, स्वप्निल कांबळी, प्रथमेश पुण्यार्थी, राजेंद्र पाटणकर, विनय ताटके, प्रमोद जोशी, पलाश लिखार, महेश भोईर, संजय अडसूळ, सुषमा सहस्त्रबुद्धे, पूजा गांगण, तृप्ती दोडवाल, प्रज्ञा मेहता, जयश्री सातपुते, भारती वाढे, सुलेखा गटकल, मनिषा सुर्वे, अल्पा राजगोर, वंदना तुपे इत्यादींनी परिश्रम घेतले.

शहरातील कचऱ्याच्या साम्राज्याबद्दल केडीएमसीचे आभार व्यक्त करत व्यक्त केला निषेध... "कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर पालिका प्रशासनासाठी लावले आभार प्रदर्शनाचे फलक"...

शहरातील कचऱ्याच्या साम्राज्याबद्दल केडीएमसीचे आभार व्यक्त करत व्यक्त केला निषेध...

"कचऱ्याच्या ढिगाऱ्यांवर पालिका प्रशासनासाठी लावले आभार प्रदर्शनाचे फलक"...


उमेश जाधव, टिटवाळा -: क.डों.पा. प्रशासन मांडा टिटवाळा परीसरातील कचऱ्याच्या व आरोग्याच्या समस्येवर लक्ष देत नसल्याने टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशन आणि नागरिकांच्या वतीने आभार प्रदर्शनाचे फलक लावत प्रशासनाचा प्रतीकात्मक निषेध केला आहे.


"अ" प्रभाग क्षेत्रातील टिटवाळा परिसरात केडीएमसीच्या कामचुकारपणामुळे ठिकठीकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून शून्य कचारा मोहीमचा फज्जा उडाला असून ती शून्यात जमा झाली आहे. शहरात पसरलेल्या या घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रशन निर्माण झाला आहे. 


याबाबत नागरिकांतून वारंवार टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनच्याकडे तक्रारी येत होत्या. त्यानुसार फाऊंडेशनच्यावतीने प्रशासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला.  करदात्या नागरीकांना फाऊंडेशन कडून आवाहन आले होते.  आपण राहत असलेल्या अथवा आपल्या शहरात नजरेस पडलेल्या परिसरात कुठेही कचरा दिसला तर त्वरीत आम्हाला त्याची माहिती व फोटो तसेच व्हिडीओ पाठवावीत. त्यानुसार आम्ही करदात्या नागरीकांसोबत त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर महापालिकाचे आभार व्यक्त करणाचे फलक त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर ठेवणार आहोत. हे आवाहन केल्यानंतर नागरीकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रविवार दिनांक २६ रोजी टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनकडे  करदात्या नागरीकांना नियमित कर भरुन हि कचऱ्यासंदर्भात असुविधा निर्माण होत असल्याची माहिती जागरूक नागरीकांनी दिली.  त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली व तेथे निर्माण झालेल्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर टिटवाळा फाऊंडेशनच्यावतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचे आभार व्यक्त करणारे फलक लावुन प्रतिकात्मक निषेध व्यक्त केला. तसेच महापालिका प्रशासनाला विनंती करण्यात आली की आधीच कचऱ्याच्या बाबतीत भरमसाठ कर वाढविले असुन आता तरी करदात्या नागरीकांना सुविधा द्यावी. या प्रसंगी टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय(भाऊ) देशेकर तसेच कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.


सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...