Tuesday 28 September 2021

समांतर प्रतिष्ठान संस्थेचे शेतकरी मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर संपन्न !!

समांतर प्रतिष्ठान संस्थेचे शेतकरी मार्गदर्शन  व प्रशिक्षण शिबिर संपन्न !!


मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :
समांतर प्रतिष्ठान ही संस्था गेली विस वर्षे अनेक शैक्षणिक, सामाजिक ,सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे.कुठलेही  शासकीय अनुदान न घेता संस्था विविध उपक्रम राबवत असते.रविवार दिनांक २६|९|२०२१रोजी कुसुमाई गार्डन्स, साजई ता.मुरबाड, ठाणे येथे संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी ई-पिक पाहणीचा ॲप कसा वापरावा याचे प्रशिक्षण व कृषि विभागाच्या विविध योजना कशा राबवण्यात येतात याचे मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेमार्फत तालुक्यात अशा प्रकारचे प्रशिक्षण घेणारी ही पहिलीच संस्था आहे, तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन करुन सामाजिक भान ठेवणारी संस्था आहे असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष व पंचायत समिती मुरबाडचे सभापती *दिपक पवार*  यांनी व्यक्त केले. संस्थेच्या उपक्रमांचा महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील नागरिकांना उपयोग व्हावा यासाठी तालुका, जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. सदर कार्यक्रमात कर्जत तालुक्याचे अध्यक्ष पद सुयश क्लासेसचे संस्थापक श्री.ठाकुर सर यांना देण्यातआले व त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून पंचायत समितीचे मा. उपसभापती अनिल देसले, मुरबाड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष चेतनसिंह पवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अविनाश भोईर, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान भगत, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे मुरबाड तालुका अध्यक्ष  सोमनाथ शिरोसे, आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष कैलास कोर, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयराम देसले,देवा ग्रुप फाऊंडेशनचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष मनोज देसले, शाळा  व्यवस्थापन समिती देवगावचे अध्यक्ष राजेश पाटील, अनेक शेतकरी, महिला उपस्थित होत्या. शिबिरामध्ये संदिप चव्हाण- कृषि सहाय्यक,तालुका कृषि विभाग व ललित बडगुजर- विस्तार अधिकारी, पंचायत समिती कृषि विभाग यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ देसले यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी जाहीर केले की संस्थेमार्फत लवकरच *राज्यस्तरीय व्यक्तिमत्त्व विकास शिबीर व कलाकारांच्या मदतीसाठी तीन दिवसीय कलामहोत्सवाचे* आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संस्थेचे भिवंडी तालुकाध्यक्ष सचिन पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !! मुंबई (शांताराम गुडेकर) :       ...