Friday 30 June 2023

कल्याण तालुक्यातील कुंदे ग्रामपंचायत हद्दीतील 'आरोग्य केंद्र, उद्घाटनाविना दोन वर्षे पडून, दारे खिडक्या चोरीला जाण्याची शक्यता ?

कल्याण तालुक्यातील कुंदे ग्रामपंचायत हद्दीतील 'आरोग्य केंद्र, उद्घाटनाविना दोन वर्षे पडून, दारे खिडक्या चोरीला जाण्याची शक्यता ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या मुलभूत सोईसुविधा मिळाव्यात यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील कुंदे ग्रामपंचायत हद्दीत दानशुर शेतकरी लक्ष्मण गोविंद देवकर यांनी दान दिलेल्या १० गुंठे जागेवर प्रशस्त असे आरोग्य उपकेंद्र बांधण्यात आले. याकरिता जवळपास ९७लाख रुपये खर्च करण्यात आला. या वास्तूला आज  दोनते अडिज वर्षे होत आली असून अद्यापही त्याचे उद्घाटन न झाल्याने हे केंद्र वापराविना तसेच पडून आहे. याच्या आजूबाजुला झाडेझुडपे गवत, उगवले आहे, तसेच याचे दरवाजे खिडक्या चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर माझ्या जिवंतपणी याचे उद्घाटन व्हावे व माझ्या लोकांना आरोग्य सोईसुविधा मिळाव्यात अशी इच्छा जागा दान दिलेले वयोवृद्ध लक्ष्मण गोविंद देवकर या शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पावसाळ्यात विविध साथीचे आजार उद्भवू शकतात.या करिता हे केंद्र सुरू होणे गरजेचे आहे.

कल्याण तालुक्यात ३प्राथमिक आरोग्य केंद्र, एक ग्रामीण रुग्णालय आणि १८ उपकेंद्र आहेत. परंतु झपाट्याने वाढत असलेल्या लोकसंख्येसाठी ही खुपच अपुरी पडतात, प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी गोवेली ग्रामीण रुग्णालय अथवा मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे यावे लागते, कधीकधी वेळेवर प्राथमिक उपचार न मिळाल्याने पेंशटला जीव घमावण्याची वेळ आलेली आहे.

हे टाळण्यासाठी मुरबाड विधानसभा मतदार संघाचे आ. किसन कथोरे यांच्या पुढाकाराने व प्रयत्नांने मामणोली जवळील कुंदे ग्रामपंचायत हद्दीत प्रशस्त असे उपकेंद्र बांधण्याचे निश्चित झाले. गावातील दानशूर शेतकरी लक्ष्मण गोविंद देवकर यांनी याकरिता १० गुंटे जमीन दान दिली, गावातील अनेक अडचणी, अडथळे, राजकारण यांना तोंड देत अखेरीस २०१९ हे उपकेंद्र बांधून तयार झाले.शौचालय, बांथरुम, किचन, आदी सोईसुविधा यामध्ये करण्यात आल्या आहेत.  या करिता सुमारे ९७ लाखाच्या आसपास खर्च झाला.या उपकेंद्रांचा बांगरवाडी, खंडवीवाडी, दहिवली, आडिवली, मामणोली, कुंदे, कोलम, केळणी, म्हसरोंडी, बापसई, नवगाव आदी गावातील १०/१५ हजार नागरिकांना फायदा होणार होता. परंतु शासकीय अनास्था, टक्केवारी, राजकारण, हेवेदावे यामुळे या उपकेंद्राची वाईट अवस्था झाली आहे. अर्धवट काम, स्वच्छतेचा अभाव, झाडेझुडपे, गवत वाढलेले, यामुळे हे नवीन उपकेंद्र आहे यावर विश्वास बसत नाही. काही थोडेफार राहिलेली कामे पुर्ण केली तर ग्रामीण जणतेला आरोग्यासाठी इतरत्र धावपळ करावी लागणार नाही. हे लक्षात घेतो कोण? शासकीय अधिकारी कागदी घोडे नाचवत आहेत, तर लोकप्रतिनिधी ना याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे'गतिमान सरकार, वेगवान निर्णय, अशी जाहिरातबाजी करणाऱ्या 'मायबाप, सरकारने लाखो रुपये खर्च करून बांधून तयार असलेल्या या उपकेंद्राचे तेवढ्याच वेगवान पणे उद्घाटन केले तर गरीब 'बिचा-या जनतेला ऐन पावसाळ्यात आरोग्य सेवा मिळतील__

प्रतिक्रिया__

*किसन कथोरे (आमदार, मुरबाड विधानसभा)
कुंदे ग्रामपंचायत निवडणुकीचे राजकारण व ठेकेदाराचा हलगर्जीपणा यामुळे काही काम बाकी आहे हे पुर्ण करून लवकर उद्घाटन करण्यात येईल.

*डॉ, भारत मासाळ (तालुका वैद्यकीय अधिकारी,)
लाईट व पाणीपुरवठा ही सोय झाल्यानंतर ते ताब्यात घेऊन तेथे उपकेंद्र सुरू करता येईल.

*लक्ष्मण देवकर (जागा दान देणारे शेतकरी, कुंदे)
माझ्या परिसरातील लोकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून मी १० गुंठे जागा दिली, बांधकाम ही पुर्ण झाले मात्र, उद्घाटन न झाल्याने ते पडून आहे. याचे वाईट वाटते.

खोडाळा हायस्कूल च्या विद्यार्थिनींचे यश हे कौतुकास्पद - प्रल्हाद कदम

खोडाळा हायस्कूल च्या विद्यार्थिनींचे यश हे कौतुकास्पद - प्रल्हाद कदम

जव्हार, जितेंद्र मोरघा :

आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती व पत्रकार संघ मोखाडा तालुका च्या वतिने आयोजित करण्यात आलेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याला संबोधित करताना जेष्ठ नेते व शाळेचे चेअरमन प्रल्हाद कदम यांनी सांगितले की खोडाळा हायस्कूल मधील मुलींनी तालुक्यात बाजी मारली असुन सानीया अन्वर अन्सारी हि विद्यार्थ्यांनी ने 92% टक्के गुण मिळविले आहेत हि बाब अभिमानास्पद आहे. तसेच आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चा हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

या कार्यक्रमाला प्रल्हाद कदम जेष्ठ नेते, समितीचे अध्यक्ष  प्रदीप वाघ, सरपंच कविता पाटील, माजी सरपंच प्रभाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत हमरे, नंदकुमार वाघ, विठ्ठल गोडे, संजय वाघ, पत्रकार रघुनाथ गांगुर्डे मुख्याध्यापक भोई सर, पालक वर्ग, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्था वर केली टिका !!

मा. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्था वर केली टिका !!पुणे, प्रतिनिधी : राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. केली. राज्यातील महिला आणि मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुलींवर हल्ले करुन त्यांच्या हत्या केला जात आहेत. जातीय, धार्मिक सांप्रदायिकतेचे वातावरण निर्माण करुन दंगली घडू लागल्या आहेत. 

राज्यात जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत महिला व मुलींच्या बेपत्ता होण्याच्या 6 हजार 889 घटना घडल्या आहेत. तसेच पुण्यात मागील दोन आठवड्यांपासून दोन थरारक घटना घडल्या. एमपीएससी परीक्षेत राज्यातून तिसऱ्या आलेल्या दर्शना पवार या मुलीची राजगडावर हत्या करण्यात आली. सदाशिव पेठेत भररस्त्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला झाला. यांसारख्या प्रकरणांवरुन राज्यातील महिला असुरक्षित असल्याची बाब पुढे आली आहे.

राज्याचे उमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाकीची वक्तव्य करण्याऐवजी मुली आणि महिलांच्या संरक्षणासाठी उपाय केले पाहिजेत, असा टोलाही पवार यांनी लगावला आहे.

ज्युनिअर तायक्वादो स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई !!

ज्युनिअर तायक्वादो स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई !!

*मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्टार वन तायक्वांदो अकादमीचे खेळाडू कु.वेदांत मंजिरी, महेश सावंत यांना क्युरेगी मध्ये सुवर्ण पदक*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             रत्नागिरी येथे दिनांक २४ ते २६ जून २०२३ या कालावधीत ३३ व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये २८ जिल्ह्यातील ५०० हुन अधिक खेळाडू यात सहभागी झाले होते. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, तायक्वाडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्टार वन तायक्वांदो अकादमीचे खेळाडू कु.वेदांत मंजिरी, महेश सावंत यानी क्युरेगी मध्ये सुवर्ण पदक पटकावले असून ६ ते ८ जूलै २०२३ रोजी शिमोगा ,कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेकरिता त्याची निवड झाली आहे .स्टार वन तायक्वाडो अकादमी मुख्य प्रशिक्षक कल्पेश गोलंबडे व सायुरी गोलंबडे यांचे वेदांतला तायक्वाडो खेळाचे मार्गदर्शन मिळत आहे.

Thursday 29 June 2023

सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) या संघटनेच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्ताने १००१ तुळशी रोपांचे विठ्ठलवाडी प्रति पंढरपूर या ठिकाणी वाटप !

सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर (महाराष्ट्र) या संघटनेच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्ताने १००१ तुळशी रोपांचे विठ्ठलवाडी प्रति पंढरपूर या ठिकाणी वाटप !

मुंबई, (शांताराम गुडेकर /दिपक फणसळकर) :

              सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर ही संघटना नेहमी प्रत्येक कार्यात अग्रेसर असते,नेहमीप्रमाणे या वर्षी देखील आषाढी एकादशीला प्रति पंढरपूर म्हणून मानल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी या ठिकाणी संघटनेच्या वतीने १००१ तुळशी रोप आणि त्यासोबत कुंडी मोफत वाटप करण्यात आले.यावेळी पोलीस कर्मचारी सनसिटी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक महाजन,पी.एस्.आय लोहार, पी.एस् आय साबळे मॅडम, सह्याद्री कुणबी संघांचे दोन माजी अध्यक्ष सहयाद्री कुणबी संघ पुणे शहर, महाराष्ट्र प्रांत, महिला आघाडी, सर्व सहयाद्रीचे विभाग पदाधिकारी महिला वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.सकाळी ७ ते ९ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.

वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीतर्फे आषाढी एकादशी निमित्त वडाळा येथील विठ्ठल मंदिर जवळ तुळशीची रोपे व लाडू वाटप !!

वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीतर्फे आषाढी एकादशी निमित्त वडाळा येथील विठ्ठल मंदिर जवळ तुळशीची रोपे व लाडू वाटप !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
         वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे संस्थापक/अध्यक्ष मा.डॉ. अविनाशजी संकुडे व महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष व WHRAF चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जितेंद्र दगडु (दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळा येथील विठ्ठल मंदिर जवळ तुळशीची रोपे व लाडू वाटप केले.या कार्यक्रमासाठी संघटनेचे AIACPC चे महा.उपाध्यक्ष अमोल वंजारे, मुंबई सचिव सौ.ज्योती ताई भोसले, WHRAF चे मुंबई उपाध्यक्ष महेश सरफरे, AIACPC चेमुंबई सचिव ऋतिका पंदुगडे, मुंबई सह सचिव लीतेश केरकर, शिवडी विधा.सचिव नंदकुमार बागवे तसेच डॉ.शशिकांत मोरे, सौ.वसुधा वाळुंज, सौ.सुप्रिया ठोंबरे, राजाराम झगडे, संतोष सावर्डेकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवसेनेच्या वतिने आषाढी एकादशीनिमित्त नालासोपारा शहरात तुळस व खिचडी प्रसाद वाटप....

शिवसेनेच्या वतिने आषाढी एकादशीनिमित्त नालासोपारा शहरात तुळस व खिचडी प्रसाद वाटप....

वसई, प्रतिनिधी : दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त सर्व विठ्ठल भक्तांना  शिवसेनेच्या वतिने तुळस व खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले.

तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने…
संपूर्ण महाराष्ट्राची श्रद्धा व अभिमान असलेला सण म्हणजे आषाढी एकादशी. 

या सणाचे महत्व व आपल्या प्रथा परंपरा जपण्याचा व  विठ्ठल भक्तांचा आनंद द्विगुणीत करण्याच्या उद्देशाने नालासोपारातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे तुळस व खिचडी प्रसाद वाटप करण्यात आले.

यावेळी शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, शहर प्रमुख समीर गोलांबडे, उपशहरप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख गणेश मुनगेकर, विभागप्रमुख दानिश करारी, महिला उपशहर संघटक आशा सातपुते, महिला विभागप्रमुख सुजाता जाधव उपस्थित होते.

कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान, नदी नाले तुंडूब, नालेसफाईची पोलखोल, अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर !

कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान, नदी नाले तुंडूब, नालेसफाईची पोलखोल, अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर !

कल्याण, (संजय कांबळे) : गेल्या दोन तीन दिवसापासून कल्याण तालुक्यात पावसाचे धुमशान सुरू असून यामुळे कोरड्या पडलेल्या नद्या, नाले तुंडूब भरून वाहू लागले आहेत. या पावसामुळे कल्याण डोंबिवली शहरासह ग्रामीण भागातील नालेसफाईची पोलखोल केली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावरुन वाहत होते. तर सिमेंटच्या रस्त्यावर चिखल झाल्याने बहुतांश मोटारसायकल स्वार घसरुन पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

कित्येक दिवस सर्वजण उकाड्याने हैराण झाले होते. प्रत्येक प्राणी पावसाची अतूरतेने वाट पाहत होता. अखेरीस गेल्या दोन तीन दिवसापासून पावसाने चांगली सुरुवात केली आहे. आतापर्यंत १५७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कोरड्या पडलेल्या तसेच तळ गाठलेल्या काळू, उल्हास, बारवी, भातसा नद्या तसेच अनेक नाले, ओहळ, तुंडूब भरून वाहत आहेत. मुंबई वडोदरा एक्स्प्रेस च्या बाजूला असलेले शेताना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनखरपाडा, रुदा, आपटी फाटा, गोवेली, कांबा, वाघेरापाडा, येथील नाले दुथडी भरून गेले आहेत, अनेक ठिकाणी बिल्डर ने भरणी केल्याने ते पाणी रस्त्यावर आले आहे.

वरप येथे बिल्डर ने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात १५/२० फुटापर्यंत पाणी भरल्याने ते धोकादायक ठरू शकतात. कल्याण डोंबिवली  टिटवाळा,शहरासह ग्रामीण भागात नालेसफाईची कामे झाल्याचा दावा करणाऱ्या प्रशासनाची या पावसाने पोलखोल केली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर गटारगंगा अवतरल्याचे चित्र दिसत होते. कल्याण मुरबाड रस्त्यावर म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान सिमेंट काँक्रीटीकरण चिखल झाल्याने,पावशेपाडा येथे डोंगरातून येणारे पाणी सरळ या रस्त्यावर येत असल्याने तसेच अनेक ठिकाणी रस्त्याचे अर्धवट काम झाल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

उल्हास नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाहून येत असल्याने गडूळ पाण्याच्या जागी ही वनस्पती च सर्वत्र दिसत आहे. असे असलेतरी वळगणीचे मासे पकडण्यासाठी तरुणांनी वलावर मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दुपार पासून पावसाने उघडिप दिल्याने लोक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे भविष्यात मुसळधार पाऊस पडला तर काय होईल याचा अंदाज येवू शकतो.

बकरी ईद निमित्त कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे घंटानाद आंदोलन !!

बकरी ईद निमित्त कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचे घंटानाद आंदोलन !!

कल्याण, प्रतिनिधी : गुरुवारी आषाढी एकादशी व बकरी ईद च्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी किल्ल्याजवळ शिवसैनिकांनी घंटानाद आंदोलनाचा इशारा दिला होता. गुरुवारी सकाळीच शिंदे गट व ठाकरे गटाचे कार्यकर्ते दुर्गाडी किल्ल्याच्या बाहेर जमून आंदोलन करू लागले. किल्ल्याच्या पायथ्याशी घंटानाद करत देवीची आरती कार्यकर्त्यांनी केली. तसेच जोरदार घोषणाबाजी करत किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी आधीच सतर्कतेचा उपाय म्हणून दुर्गाडी किल्ला परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. बॅरिकेट्स लावून किल्ल्यात जाण्याचा मार्ग बंद करण्यात आला होता. त्यामुळे शिवसैनिकांनी किल्ल्याच्या बाहेरच घंटानाद आंदोलन केले.

दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही धर्मीयांची प्रार्थनास्थळे आहेत. तेथे बकरी ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना दुर्गादेवीच्या दर्शनास प्रतिबंध केला जातो. त्याच्या निषेधार्थ तसेच हिंदूंनाही देवीच्या दर्शनास प्रवेश दिला जावा, या मागणीसाठी बकरी ईदच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने १९८६ सालापासून दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले होते.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही शिवसेनेकडून दुर्गाडी किल्ल्यासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करतानाच पोलिसांचे बॅरिकेट्स तोडून किल्ल्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. 

यासंदर्भात बोलताना शिवसेनेचे नेते गोपाळ लांडगे म्हणाले, "हिंदूंवर हा जो अन्याय होतोय, तो अन्याय दूर करण्यासाठी आनंदी दिघे यांनी १९८६ साली सुरू केलेले आंदोलन आम्ही सातत्याने सुरू ठेवले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यात सहभाग आहे. त्यांना हा विषय माहीत आहे. ते हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. न्यायालयीन लढाई सुरू असल्यामुळे याला वेळ लागत आहे, मात्र आम्ही हिंदू हे सहन करणार नाही. आंदोलनाच्या माध्यमातून आमचा लढा सुरूच राहील."

या आंदोलनात शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, मा. आमदार विश्वनाथ भोईर, शहरप्रमुख रवी पाटील, महिला संघटिका छायाताई वाघमारे तसेच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तर शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाप्रमुख विजय साळवी, धनंजय बोडारे, शहरप्रमुख सचिन बासरे, संघटिका विजयाताई पोटे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Wednesday 28 June 2023

जिजाऊ संस्थेच्या ब्युटी पार्लर स्पर्धेला नालासोपारात महिलांचा प्रतिसाद....

जिजाऊ  संस्थेच्या  ब्युटी पार्लर स्पर्धेला नालासोपारात  महिलांचा प्रतिसाद....

वसई, प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारा शहरात प्रथमच ब्युटी पार्लर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मीनाक्षी कोंडकर, व्दितीय क्रमांक तन्वी हडशी, तृतीय क्रमांक अनिता वर्मा यांनी क्रमांक पटकविले.

सौदर्य स्पर्धा या महिलांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे या स्पर्धा म्हणजे केवळ सौदर्यावर आधारीत नसतात तर इथे बुध्दिमत्तेचाही कस लागतो. स्पर्धांमध्ये भाग घेतल्यावर महिलांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना स्वतःला सिध्द करण्याची प्रेरणा मिळते. महिलांनी स्वावलंबी होऊन व्यवसायकपुरक दृष्टीकोन ठेवावा आणि सक्षमपणे काम करून आपल्या पायावर उभे रहावे या उद्देशाने अधिकाधिक महिलांना सर्व प्रकारचे मोफत प्रशिक्षण जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेकडून देण्यात येते.

अनेक महिला घरकामात गुंतलेल्या असतात त्यांना आर्थिकदृष्टया पतीवर अवलंबुन रहावे लागते या महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावेत यासाठी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे साहेब यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरण च्या माध्यमातुन महिलांसाठी  हक्काचे व्यसपीठ उपलब्ध करून दिले. यामध्ये मेहंदी प्रशिक्षण, ब्युटी पार्लर प्रशिक्षण, शिवणकला प्रशिक्षण, अगरबत्ती निरमा पावडर प्रशिक्षण, मोफत देण्यात येते.

ब्युटी पार्लर स्पर्धेतील विजेत्यांना जिजाऊ संस्थेचा तालुकाप्रमुख हर्षालीताई खानविलकर, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, ब्युटी पार्लर प्रशिक्षक संगिता पासी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड व मा. सचिन गुंजाळ डीसीपी झोन - ३ यांच्याकडून जल शुध्दीकरण संयंत्र भेट !!

रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड व मा. सचिन गुंजाळ डीसीपी झोन - ३ यांच्याकडून जल शुध्दीकरण संयंत्र भेट !!

कल्याण, नारायण सुरोशी : 

रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड व मा. सचिन गुंजाळ डीसीपी झोन -३ यांचे वतीने आज दिनांक २७.०६.२०२३ रोजी ठाणे डीसीपी झोन -३ अंतर्गत बाजारपेठ पोलिस स्टेशन व वायरलेस विभाग यांना संयंत्र भेट देण्यात आले.

सध्या सुरू असलेल्या पावसामुळे बऱ्याच प्रमाणात गढूळ व दूषित पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे पाणीजन्य आजार उद्भवतात. आपले पोलिस बांधव २४ तास कर्तव्यावर कार्यरत असतात. त्यादरम्यान त्यांना आजार उद्भवू नये म्हणून मा. सचिन गुंजाळ डीसीपी झोन ३ व अग्रगणी सामाजिक संस्था रोटरी क्लब ऑफ कल्याण रिव्हर साईड तथा कल्याण रिव्हर साईड चॅरिटेबल फाऊंडेशन यांचे वतीने बाजारपेठ पोलिस स्टेशन व वायरलेस विभाग यांना, जलशुध्दीकरण संयंत्र भेट देण्यात आले. सदर संयंत्राची क्षमता १०० व्यक्तींना पुरेल इतके पाणी शुद्ध करण्याची आहे. याप्रसंगी मा.सचिन गुंजाळ, डीसीपी झोन - ३, पो. नि.श्री. सुनील पवार बाजार पेठ पोलिस स्टेशन, क्लब अध्यक्ष रो. डॉ. अनंत इटकर, फाऊंडेशन अध्यक्ष रो. डॉ. अवधूत शेट्ये, क्लब सचिव रो. सागर महाजन, रो. संजय माचवे इतर क्लब सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्युटीशन आणि स्पा महिला कामगारांना मनसे कामगार सेनेचा मदतीचा हात !

ब्युटीशन आणि स्पा महिला कामगारांना मनसे कामगार सेनेचा मदतीचा हात !

मुंबई ,(शांताराम गुडेकर) :

           'अर्बन क्लॅप' या ई-कॉमर्स सेवा पुरवठादार कंपनीच्या ब्युटीशन आणि स्पाचे काम करणाऱ्या शेकडो महिला पार्टनर्सनी त्यांच्या रोजगाराची असुरक्षितता आणि व्यावसायिक पिळवणूक या विरोधात आता दंड थोपटले आहेत. आज या शेकडो महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून चुनाभट्टी येथील मुख्य कार्यालया समोर धडक मोर्चा काढून आपला हक्क मागितला. यावेळी कंपनीने त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

           या शेकडो महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी  मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस कामगार नेते गजानन राणे आणि उपाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली आज अर्बन क्लॅपच्या मुंबईतील मुख्यालयावर धडक दिली. यावेळी शेकडो महिलांनी अर्बन क्लॅप कार्यालय, हुँडाई शोरूम. प्रियदर्शनी बिल्डींगच्या समोर आपला सहभाग नोंदवला. मुंबई उपनगरातील अर्बन क्लॅप या कंपनीत काम करणाऱ्या हजारो महिला कामगार या ब्युटीशन आणि स्पाचे काम करतात. 

          सुरुवातीला कंपनी यांच्याकडून 50 हजार रुपये घेऊन त्यांची आयडी बनवली जात होती. मात्र काही महिन्या नंतर त्यांचे आयडी क्लोज करून नवीन भरती केली जात आहे. त्यामुळे पूर्वी काम करणाऱ्या या महिला कामगारांची आय डी बंद केल्याने आणि त्यांना नोकरी नसल्याने हजारो महिला कामगार घरी होत्या. दरम्यान, आपल्यावरील या अन्यायामुळे या महिला कामगारांनी मनसे कामगार संघटनेकडे कडे न्याय मागितला. त्यानुसार मनसेचे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे आणी त्यांचे सहकारी ह्यानी अर्बन क्लॅप कंपनीवर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे मनसेचा हा धाक बघत अखेर कंपनीच्या दिल्ली येथील अधिकाऱ्यांनी मनसेच्या नेत्यांची भेट घेत आम्ही येत्या 24 तासात सर्व महिलांचा आयडी सुरू करू असे आश्वासन दिले. त्यामुळे या महिलांनी त्यांचे काम सुरू होणार असल्याने मनसेचे आभार मानले आहेत.

डिजिटल रंगमंच आणि कृष्णाई सेवा संस्था तर्फे मालाड कांदिवली विभागातील विद्यार्थ्यांसाठी "लहानपण देगा देवा" कार्यक्रम संपन्न !

डिजिटल रंगमंच आणि कृष्णाई सेवा संस्था  तर्फे मालाड कांदिवली विभागातील विद्यार्थ्यांसाठी "लहानपण देगा देवा" कार्यक्रम संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर /निलेश कोकमकर) :
             देवयानी आषाढी एकादशी निम्मित अनुदत्त  विद्यालय कांदिवली पूर्व येथे शिवसेना (उद्धव  बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख प्रतोद , विभागप्रमुख- आमदार माजी महापौर श्री. सुनिलजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली व कृष्णाई सेवा संस्था आणि डिजिटल रंगमंच ह्या यु ट्यूब चॅनल मार्फत कांदिवली आणि मालाड पूर्व विभागातील मुंबई महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यंसाठी  "लहानपण देगा देवा" सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या सोहळ्यामध्ये कृष्णलीला, अंभग, ओव्या, भारुड, दोहे, गवळण, गाणी, नृत्य आणि कोरोना आपत्तीवर अभिनय  अशा अनेक माध्यमातून शालेय मुलांना दाखवण्यत आले.  तसेच ह्या सोहळ्यासाठी कांदिवली मालाड क्षेत्रातील १५ पेक्षा अधिक शाळांमधून १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रेक्षकांनी आनंद घेतला. साक्षी घाडी, प्रथमी मोहिते, हर्षदा डांगे, सागर घाडी, प्रथमेश मोडक, आणि पूर्णेन्दू दास इत्यार्दी  गायकांनी आपल्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली.त्याच सोबत श्री.अविनाश भिवाजी वाघमारे यांच्या  संकल्पनेतुन प्रथमेश मोदक यांच्या लेखणीतून आणि प्रथमेश कदम यांच्या अभिनयातून साकारलेले नवीन वारकरी गीत   "मी त्याचा वारकरी"  ह्या गीताचे प्रक्षेपण करण्यात आले. आणि हे गाणं आता डिजिटल रंगमंच ह्या यु ट्यूब  चॅनेलवर सर्वांना ऐकायला मिळणार आहे त्याच बरोबर वारीचा देखाली आनंद घेता येणार आहे . तसेच ह्या सोहळ्यात  ह.भ.प. श्री. देवराम महाराज जाधव यांच्या वाणीतून आणि हरिपाठाच्या माध्यमातून माऊलीच्या गजरात अनुदत्त विद्यालयाच्या  पटांगणात जणू प्रति दिंडी साकारण्यात आली. त्या दिंडीत सर्व भाविकांनी  सहभाग घेऊन दिंडीचा आनंद घेतला. 
              या आनंदी सोहळ्यामध्ये  दिंडोशी विधानसभा संघटक विष्णू सावंत, युवासेना कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू, शिवसेना प्रभारी संघटक कांतिमोहन मिश्रा, उपविभागप्रमुख प्रदीप निकम, वृंदा पालेकर, वेदमूर्ती - ज्योतिष्याचार्य पैठणकर गुरुजी, अनुदत्त विद्यालयाचे  प्राचार्य -संस्थापक रामचंद्र आदवले, युवासेना दिंडोशी विभाग अधिकारी प्रशांत मानकर यांच्यासह शिवसेना - युवासेना पदाधिकारी सह शाळेतील मुलं व त्यांचे पालक वर्ग  उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णाई सेवा संस्थाचे संस्थापक शाखा प्रमुख रमेश कळंबे, अध्यक्ष विष्णू कळंबे, सेक्रेटरी शिवाजी गोळे, खजिनदार ह.भ.प. मारुती  कळंबे, उपाध्यक्ष नारायण जाधव, उपखजिनदार ह.भ.प. राजेंद्र  कळंबे, महेंद्र जाधव, राजेंद्र गायकवाड आणि संस्थेचे सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

पूर्व उपनगर रस्ते विभागाच्या उप प्रमुख अभियंता पदी संजय सोनवणे !!

पूर्व उपनगर रस्ते विभागाच्या उप प्रमुख अभियंता पदी संजय सोनवणे !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            मुंबई पूर्व उपनगर रस्ते विभागाच्या उप प्रमुख अभियंता पदी संजय तात्याबा सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संजय सोनवणे यांनी दोन वर्षे यापूर्वी एन वार्डच्या सहायक आयुक्त पदाची समर्थपने जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर आता कुर्ला ते मुलुंड रस्ते विभागाच्या उप प्रमुख अभियंता म्हणून ते आज पासून रुजू झाले. ते एन वॉर्डात सहायक आयुक्त म्हणून आल्यानंतर त्यानी एन विभागात आमूलाग्र बदल करुन व त्यांच्या कामाच्या पध्दतीने पालिका एन विभागाच नाव लौकीक केले त्याच प्रमाणे रस्ते विभागात ही मी माझ्या काम करण्याच्या पद्धतीने रस्ते विभागाचे ही नावलौकिक करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यानिमित्ताने त्यांचे अभिनंदन पत्रकार निलेश मोरे यांनी पुष्पकरंडक देऊन केले.

Tuesday 27 June 2023

चोपड्यामध्ये डायलिसिस सुविधा; चोपडा रोटरी व हरताळकर हॉस्पिटल चा पुढाकार !!

चोपड्यामध्ये डायलिसिस सुविधा; चोपडा रोटरी व हरताळकर हॉस्पिटल चा पुढाकार !!

चोपडा, प्रतिनिधी : रोटरी क्लब ऑफ चोपडा व हरताळकर हॉस्पिटल यांच्या संयुक्तविद्यमाने चोपडा रोटरी डायलिसिस सेंटर हरताळकर हॉस्पिटल येथे हे केंद्र सुरू केले जाणार असून गुरुवार, 29 जून संध्या 5 वाजेला आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर याचे लोकार्पण होईल.

चोपडा तालुक्यात व परिसरातील रूग्णांसाठी शहरामध्ये डायलेसिस यंत्रणा उपलब्ध नाही. त्यामुळे येथील रूग्णांना उपचारासाठी इतर शहरांमध्ये जावे लागते. यात रूग्णाला अधिकचा आर्थिक भुर्दंड बसतो. त्यासाठी चोपडामध्ये ही सुविधा असावी अशी मागणी होती.

त्यामुळे आता चोपडा शहरात रूग्णांसाठी डायलिसिस सेंटर सुरू होणार असल्याने रूग्णांना दिलासा मिळणार आहे. डायलिसिस सेंटर सुरु करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या कळून विशेष सहकार्य मिळालेले असून रोटरी डायलिसिस सेंटर च्या माध्यमातून अल्प दरात हि सुविधा रुग्णांना दिली जाणार आहे.

जिजाऊ संस्थेच्या वतिने नालासोपारातील मेहंदी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप...

जिजाऊ संस्थेच्या वतिने नालासोपारातील मेहंदी प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप...

वसई, प्रतिनिधी : महिला फक्त चुल, मुल,घर या चौकटीत न राहता तीच्या  कलागुणांना वाव मिळावा या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने नालासोपारातील महिलांसाठी मोफत मेहंदी प्रशिक्षण वर्ग समेळपाडा येथे सुरू करण्यात आला होता.

महिनाभर महिलांना मोफत  मेहंदी प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण पुर्ण केलेल्या महिलांना राष्ट्रपती च्या हस्ते पुरस्कार प्राप्त परिचारिका सुजाता तुस्कानो यांच्या हस्ते  प्रमाणपत्र वाटप करण्यात आले होते.

महिलांच्या कौटुंबिक आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या विविध संधी यातुन शाश्वत उपजीविका निर्माण व्हावी यासाठी जिजाऊ संस्था नेहमी मदत करत असते.

आजकालच्या धावत्या युगामध्ये स्रिया प्रशिक्षणाच्या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांच्या मध्ये एकोपा वाढण्यात मदत होते.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त सुजाता तुस्कानो यांनी सर्व महिलांना मार्गदर्शन केले. मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. महिलांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहुन मला हि मनस्वी आनंद झाला असे त्यांनी सांगितले.

यावेळी जिजाऊ तालुकाध्यक्ष हर्षालीताई खानविलकर शिवसेना महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक शहर प्रमुख समीर गोलांबडे उपशहरप्रमुख महेश निकम, विभागप्रमुख दानिश करारी, महिला उपशहर प्रमुख आशा सातपुते उपस्थित होते.

दापोलीतील आर.जी.पवार हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे शाळेसाठी योगदान..

दापोलीतील आर.जी.पवार हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचे शाळेसाठी योगदान..

मुंबई, (प्रसाद महाडीक /शांताराम गुडेकर) :

              दापोलीतील आर. जी. पवार हायस्कूल माटवण शाळेच्या इयत्ता दहावीच्या १९९२ बॅचने नुकतीच शाळेला सदिच्छा भेट दिली. २०१८साली शाळा सोडल्याला पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल १९९२ बॅचचे सर्व विद्यार्थी पुन्हा एकदा एकत्र आले आणि तेव्हापासून दरवर्षी ते शाळेला भेट देत आहेत. या बॅचने आतापर्यंत शाळेला अनेक प्रकारे मदत केलेली आहे. मग शिक्षण क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा सन्मान असेल, तालुकास्तरीय मॅटवरील कबड्डी स्पर्धा असेल, विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांचा वर्षभराचा शैक्षणिक खर्च करणे असेल आणि शाळेसाठी लागणारे फर्निचर असेल, विविध प्रकारे त्यांनी शाळेला हातभार लावलेला आहे. यावर्षी देखील प्रत्येक वर्गातील अँड्रॉइड टेलिव्हिजनला डिजिटल अभ्यासक्रमाचे अंदाजे २५ ते ३० हजार रुपये किमतीचे पेन ड्राईव्ह त्यांनी शाळेला भेट स्वरूपात दिले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव श्रीराम महाडिक, शालेय समिती अध्यक्ष महेश पवार, संचालक उदय महाडिक, रवींद्र सुतार, शाळेचे माजी मुख्याध्यापक तसेच १९९२ चे तत्कालीन वर्गशिक्षक गिरीश पाटील, शाळेचे मुख्याध्यापक कोंडीकिरे सर व सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.
                ग्रामीण भागातील या शाळेला अशा प्रकारच्या मदतीमुळे शिक्षण क्षेत्रात एक वेगळीच चालना मिळेल याबाबत शंका नाही. गेले सहा वर्षे या बॅचने दरवर्षी सदिच्छा भेट देऊन आतापर्यंत लाखो रुपयांचे सहाय्य शाळेला व संस्थेला केले आहे. शाळेच्या आजी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी या बॅचने एक आदर्श निर्माण केला आहे. शाळा तसेच संस्थेने १९९२ बॅचच्या या स्तुत्य उपक्रमाचे भरभरून कौतुक केले आहे.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...