Wednesday, 28 June 2023

ब्युटीशन आणि स्पा महिला कामगारांना मनसे कामगार सेनेचा मदतीचा हात !

ब्युटीशन आणि स्पा महिला कामगारांना मनसे कामगार सेनेचा मदतीचा हात !

मुंबई ,(शांताराम गुडेकर) :

           'अर्बन क्लॅप' या ई-कॉमर्स सेवा पुरवठादार कंपनीच्या ब्युटीशन आणि स्पाचे काम करणाऱ्या शेकडो महिला पार्टनर्सनी त्यांच्या रोजगाराची असुरक्षितता आणि व्यावसायिक पिळवणूक या विरोधात आता दंड थोपटले आहेत. आज या शेकडो महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून चुनाभट्टी येथील मुख्य कार्यालया समोर धडक मोर्चा काढून आपला हक्क मागितला. यावेळी कंपनीने त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

           या शेकडो महिलांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी  मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस कामगार नेते गजानन राणे आणि उपाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वाखाली आज अर्बन क्लॅपच्या मुंबईतील मुख्यालयावर धडक दिली. यावेळी शेकडो महिलांनी अर्बन क्लॅप कार्यालय, हुँडाई शोरूम. प्रियदर्शनी बिल्डींगच्या समोर आपला सहभाग नोंदवला. मुंबई उपनगरातील अर्बन क्लॅप या कंपनीत काम करणाऱ्या हजारो महिला कामगार या ब्युटीशन आणि स्पाचे काम करतात. 

          सुरुवातीला कंपनी यांच्याकडून 50 हजार रुपये घेऊन त्यांची आयडी बनवली जात होती. मात्र काही महिन्या नंतर त्यांचे आयडी क्लोज करून नवीन भरती केली जात आहे. त्यामुळे पूर्वी काम करणाऱ्या या महिला कामगारांची आय डी बंद केल्याने आणि त्यांना नोकरी नसल्याने हजारो महिला कामगार घरी होत्या. दरम्यान, आपल्यावरील या अन्यायामुळे या महिला कामगारांनी मनसे कामगार संघटनेकडे कडे न्याय मागितला. त्यानुसार मनसेचे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे आणी त्यांचे सहकारी ह्यानी अर्बन क्लॅप कंपनीवर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यामुळे मनसेचा हा धाक बघत अखेर कंपनीच्या दिल्ली येथील अधिकाऱ्यांनी मनसेच्या नेत्यांची भेट घेत आम्ही येत्या 24 तासात सर्व महिलांचा आयडी सुरू करू असे आश्वासन दिले. त्यामुळे या महिलांनी त्यांचे काम सुरू होणार असल्याने मनसेचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...