Wednesday 28 June 2023

डिजिटल रंगमंच आणि कृष्णाई सेवा संस्था तर्फे मालाड कांदिवली विभागातील विद्यार्थ्यांसाठी "लहानपण देगा देवा" कार्यक्रम संपन्न !

डिजिटल रंगमंच आणि कृष्णाई सेवा संस्था  तर्फे मालाड कांदिवली विभागातील विद्यार्थ्यांसाठी "लहानपण देगा देवा" कार्यक्रम संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर /निलेश कोकमकर) :
             देवयानी आषाढी एकादशी निम्मित अनुदत्त  विद्यालय कांदिवली पूर्व येथे शिवसेना (उद्धव  बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख प्रतोद , विभागप्रमुख- आमदार माजी महापौर श्री. सुनिलजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली व कृष्णाई सेवा संस्था आणि डिजिटल रंगमंच ह्या यु ट्यूब चॅनल मार्फत कांदिवली आणि मालाड पूर्व विभागातील मुंबई महानगर पालिका शाळेतील विद्यार्थ्यंसाठी  "लहानपण देगा देवा" सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

या सोहळ्यामध्ये कृष्णलीला, अंभग, ओव्या, भारुड, दोहे, गवळण, गाणी, नृत्य आणि कोरोना आपत्तीवर अभिनय  अशा अनेक माध्यमातून शालेय मुलांना दाखवण्यत आले.  तसेच ह्या सोहळ्यासाठी कांदिवली मालाड क्षेत्रातील १५ पेक्षा अधिक शाळांमधून १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रेक्षकांनी आनंद घेतला. साक्षी घाडी, प्रथमी मोहिते, हर्षदा डांगे, सागर घाडी, प्रथमेश मोडक, आणि पूर्णेन्दू दास इत्यार्दी  गायकांनी आपल्या गायनाने उपस्थितांची मने जिंकली.त्याच सोबत श्री.अविनाश भिवाजी वाघमारे यांच्या  संकल्पनेतुन प्रथमेश मोदक यांच्या लेखणीतून आणि प्रथमेश कदम यांच्या अभिनयातून साकारलेले नवीन वारकरी गीत   "मी त्याचा वारकरी"  ह्या गीताचे प्रक्षेपण करण्यात आले. आणि हे गाणं आता डिजिटल रंगमंच ह्या यु ट्यूब  चॅनेलवर सर्वांना ऐकायला मिळणार आहे त्याच बरोबर वारीचा देखाली आनंद घेता येणार आहे . तसेच ह्या सोहळ्यात  ह.भ.प. श्री. देवराम महाराज जाधव यांच्या वाणीतून आणि हरिपाठाच्या माध्यमातून माऊलीच्या गजरात अनुदत्त विद्यालयाच्या  पटांगणात जणू प्रति दिंडी साकारण्यात आली. त्या दिंडीत सर्व भाविकांनी  सहभाग घेऊन दिंडीचा आनंद घेतला. 
              या आनंदी सोहळ्यामध्ये  दिंडोशी विधानसभा संघटक विष्णू सावंत, युवासेना कार्यकारणी सदस्य अंकित प्रभू, शिवसेना प्रभारी संघटक कांतिमोहन मिश्रा, उपविभागप्रमुख प्रदीप निकम, वृंदा पालेकर, वेदमूर्ती - ज्योतिष्याचार्य पैठणकर गुरुजी, अनुदत्त विद्यालयाचे  प्राचार्य -संस्थापक रामचंद्र आदवले, युवासेना दिंडोशी विभाग अधिकारी प्रशांत मानकर यांच्यासह शिवसेना - युवासेना पदाधिकारी सह शाळेतील मुलं व त्यांचे पालक वर्ग  उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृष्णाई सेवा संस्थाचे संस्थापक शाखा प्रमुख रमेश कळंबे, अध्यक्ष विष्णू कळंबे, सेक्रेटरी शिवाजी गोळे, खजिनदार ह.भ.प. मारुती  कळंबे, उपाध्यक्ष नारायण जाधव, उपखजिनदार ह.भ.प. राजेंद्र  कळंबे, महेंद्र जाधव, राजेंद्र गायकवाड आणि संस्थेचे सर्व सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...