Tuesday 31 January 2023

अंतराळातील परी..!

अंतराळातील परी..!

हरियाणातील करनाल येथे जन्मलेली, लहानपणापासूनच वैमानिक होण्याची दृढ इच्छा असलेली पहिली भारतीय महिला अंतराळवीर, प्रमाणित विमान प्रशिक्षक, एक कोटी मैलाच्या अंतराळ यात्रेसह 372 तास अंतराळात राहण्याचा विक्रम केलेली, विमाने, हवाई ग्लाईड उडविण्यात प्रावीण्यप्राप्त, ‘नासा’चे विशिष्ट सेवा व अंतराळ उड्डाण पदक तसेच काँग्रेशनल अंतराळ पदक मिळविलेली अतिशय महत्त्वाकांक्षी महिला अंतराळवीर स्व. कल्पना चावला यांचा आज स्मृतिदिन. यानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन !

अखलाख देशमुख‌, औरंगाबाद 

समीर गोलांबडे यांचा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) जाहीर पक्ष प्रवेश..

समीर गोलांबडे यांचा बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटात) जाहीर पक्ष प्रवेश..

*बहुजन विकास आघाडीला धक्का...*

त्यांची बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गटाच्या) *नालासोपारा (प) शहर  प्रमुखपदी* निवड करण्यात आली..

वसई, प्रतिनिधी : वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब_ठाकरे यांचे विचार तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद_दिघे साहेब यांची प्रेरणा घेऊन बाळासाहेबांची शिवसेना पक्ष मार्गक्रमण करत आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी केलेली विविध लोकोपयोगी विकासकामे तसेच सर्व स्तरातील घटकांकरिता घेतलेले निर्णय ध्यानात घेऊन पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आ. रविंद्र फाटक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन विकास आघाडीचे समिर उर्फ बंड्या गोलांबडे यांनी आपल्या कार्यकर्त्यान समवेत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

नालासोपारात शहरात कायमच शिवसेनेचा विचार बळकट करण्याचे काम केले आहे,  बाळासाहेबांची शिवसेना पक्षावर विश्वास ठेवून सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांचा विश्वास सार्थ ठरवू, तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून वसई तालुक्यातील प्रश्न देखील लवकरात लवकर मार्गी लावू असे जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांनी आश्वासित करून या सर्वांचे पक्षात स्वागत केले तसेच त्यांच्या भावी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख दिवाकर सिंह, उपतालुकाप्रमुख अजित भाऊ खांबे, महिला आघाडी शहर संघटक रूचिता नाईक, विभाग प्रमुख गणेश मुनगेकर व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्याच्या आर्थिक नियोजनासाठी उद्योजक, शेतकरी व बँक प्रतिनिधीची बैठक संपन्न !

जिल्ह्याच्या आर्थिक नियोजनासाठी उद्योजक, शेतकरी व बँक प्रतिनिधीची बैठक संपन्न !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३१  :  उद्योगाला सुलभ परवानग्या देण्यासाठी (मैत्री) हे महाराष्ट्र उद्योग, व्यापार गुंतवणुक सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. टाटा उद्योगासमुहाच्या मदतीने कृषी, उद्योग आणि सहकार तसेच विविध व्यवसाय गटांचे योगदान व अडचणी यावर अभ्यास करुन शासनास सल्ला  दिला जाणार आहे. वित्तीय नियोजन करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. आज टाटा स्ट्रॅजिक मॅनेजमेंट ग्रुपच्या त्रिसदस्यीय सल्लागार समितीने उद्योजक, बँक प्रतिनिधी, शेतकरी यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा केली. या बैठकीत जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी या समिती विषयी माहिती सांगितली. याचा फायदा शेतकरी, लघुउद्योजक व विविध कृषी उत्पादक शेतकरी गटाचे प्रतिनिधी यांना होणार असल्याचेही जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. 

टाटा स्ट्रॅजिक मॅनेजमेंट ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश साठे, सदस्य राजमयुर शर्मा, स्नेह शहा तसेच देवगिरी नागरी सहाकारी बँकेचे अध्यक्ष किशोर ‍शितोळे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी मनिषा हराळ, दुग्ध उत्पादक संघाचे कारभारी मनगटे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रशांत सदाफुले, अजंठा अर्बन सहाकारी बँकेचे गणेश चौधरी व संदेश वाघ, यांच्यासह विविध दुध उत्पादन संघाचे प्रतिनिधी, कुक्क्टपालक उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर बाबत सुनावणी...

मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद, उस्मानाबाद नामांतर बाबत सुनावणी...

मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या याचिकेवर सुनावणी... पुढील सुनावणी 15 फेब्रुवारी रोजी...

मुंबई, अखलाख देशमुख‌, दि. ३१ : आज  31 जानेवारी 2023 रोजी मुंबई येथे, मुंबई उच्च न्यायालय येथे औरंगाबाद अणि उस्मानाबाद शहराचे नामांतर बाबत सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला औरंगाबाद अणि उस्मानाबाद शहराचे नामांतर बद्दल आपली भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे, त्यांनी सुरू केलेल्या “नाव बदलण्याच्या प्रक्रिये” बाबत सर्वसामान्यां नागरिकांच्या हरकती मागून त्याच्या विचार केला होता का ? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला विचारले. मोहम्मद हीशाम उस्मानी यांच्या तर्फे अड श्री. एस.एस. काझी यांनी दाखल केलेल्या मुख्य याचिकेवर आज सुनावणी झाली. 

आज मुंबई उच्च न्यायालय येथे झालेल्या सुनावणीत तीन याचिकांची संयुक्त सुनावणी झाली. दोन याचिकाकर्त्यांनी सांगितले की राज्य सरकारची नामांतराच्या प्रस्ताव स्वीकारून केंद्र सरकारकडे पाठविण्याची कारवाई अवैध आहे. चौकशीवर केंद्र व राज्य सरकारच्या वकिलांनी मा. न्यायालयाला सांगितले की संपूर्ण कारवाई गृह मंत्रालयाचे 1953 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केली गेली होती आणि पुढील तारखेला माननीय न्यायालयासमोर ते तथ्ये ठेवण्यासाठी वेळ मागितला. त्याच वेळी अड. जावेद शेख यांनी मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या याचिकेत नमूद मार्गदर्शक तत्त्वे काढून ते तत्त्वे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले. मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापुरवाला आणि न्यायमूर्ती मारणे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने याचिकाकर्त्याचे वकील म्हणुन जावेद शेख यांनी उपस्थित केलेल्या विशिष्ट वादाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारला आक्षेप आणि त्यावर विचार करण्याची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने सरकारला दिले. जावेद शेख यांनी सरकारने हरकती मागवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेला बायपास केला असे युक्तिवाद केले, सरकारी वकीलांनी राज्य सरकारला कोणती हरकत प्राप्त झाली किवा नाही याची याची माहिती देण्यास वेळ मागितली. कोणत्या आधारावर नामांतर करण्याचा निर्णय घेतला याबाबत न्यायालयाने विचारले. न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला 15 फेब्रुवारी 2023 रोजी आपली भूमिका मांडण्यास सांगितले. औरंगाबाद याचिकाकर्ता साठी ॲड. जावेद शेख, ॲड. मोईन शेख, ॲड. युसूफ मुचाला, ॲड. सगीर व उस्मानाबाद याचिकेसाठी कुमारी तळेकर हजर झाले. पुढची तारीख 15 फेब्रुवारी 2023 रोजी ठेवण्यात आली आहे.

शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज !

शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज !

*चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे मतमोजणी*

*अधिकारी व कर्मचारी यांना उद्या पुन्हा प्रशिक्षण*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. ३१  :-   महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे. चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे ही मतमोजणी होणार आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकारी व कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण झाले असून 1 फेब्रुवारी रोजी मतमोजणीच्या ठिकाणीच दुसरे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 

शिक्षक मतदारसंघासाठी औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यांत एकूण 53 हजार 257 मतदारांनी मतदान केले. याची मतमोजणी चिकलठाणा येथील कलाग्राम समोरील मराठवाडा रिअल्टर्स प्रा.लि. येथे होणार आहे. मतमोजणीच्या ठिकाणी 56 टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी 700 अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

मतमोजणीची सुरूवात सकाळी 8 वाजल्यापासून होणार आहे. सुरूवातीला मतपेटीतील मतांची मोजणी होईल. त्यानंतर 25 मतपत्रिकेचा एक गठ्ठा याप्रमाणे सर्व मतपत्रिकांचे सरमिसळ करण्यात येईल. यातून 25 मतपत्रिकांचा एक गठ्ठा याप्रमाणे 40 गठ्ठे अशी एक हजार मते प्रत्येक टेबलवर देण्यात येतील. या टेबलवर प्रथम क्रमांकाच्या पसंतीनुसार मतपत्रिकांचे वर्गीकरण करण्यात येईल. एकूण वैध मताप्रमाणे कोटा निश्चित करण्यात येईल. 

मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी कक्ष, निरीक्षक कक्ष, सुरक्षा कक्ष, माध्यम कक्ष,  केंद्रावरील टेबल रचना, प्रकाश व्यवस्था, विद्युत पुरवठा, आरओ, एआरओ बैठक व्यवस्था, उमेदवारांसाठी बैठक व्यवस्था तसेच आवश्यक त्या कक्षांची उभारणी करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात मोबाईल घेऊन जाता येणार नाही. मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचारी यांनी आपले ओळखपत्र सोबत ठेवत जबाबदारी देण्यात आलेल्या ठिकाणीच थांबावे तसेच उमेदवारांनी नेमलेल्या मतमोजणी प्रतिनिधी यांनीदेखील नियुक्ती दिलेल्या ठिकाणीच थाबावे असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन धोरण व कायदा करावा – मा. अजितदादा पवार

महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन धोरण व कायदा करावा – मा. अजितदादा पवार

मुंबई, अखलाख देशमुख‌, दि ३१ : महापुरुषांचा सातत्याने अपमान करण्याचे काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. महागाई, बेरोजगारी, कायदा व सुव्यवस्था, शेतकर्‍यांचे प्रश्न या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी या गोष्टी केल्या जात आहेत. महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये करून जे वाचाळवीर नवीन समस्या निर्माण करत आहेत त्यांच्यासाठी सरकारने एक नवीन धोरण किंवा नवीन कायदा करावा अशी मागणी करणार असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते मा. अजितदादा पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

बागेश्वर बाबा कोण आहे? त्याने संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करून अपमान केला आहे. हा अपमान आम्ही सहन करणार नाही. राज्यात वारकरी संप्रदाय मोठा आहे. या वक्तव्याचा निषेध करतानाच अशा बाबांवर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही अजितदादा पवार यांनी यावेळी केली.

बीबीसी डॉक्युमेंटरीबाबत बोलताना ते म्हणाले की, आपण लोकशाहीत काम करतो. आपल्या खंडप्राय देशात लोकशाहीला मोठे महत्त्व आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी फार विचारपूर्वक हे संविधान, घटना दिली आहे. ही घटना व संविधानाच्या चौकटीमध्ये बसणार्‍या ज्या बाबी असतील त्या माध्यमांनी दाखवल्या पाहिजेत, वृत्तपत्रात छापल्या पाहिजेत, लेख पण लिहिले पाहिजेत. ज्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे, ज्यातून धर्मा-धर्मात तेढ निर्माण होणार आहे, जातीयद्वेष निर्माण होणार आहे, समाजासमाजात दुही निर्माण होणार आहे, अंतर पडणार आहे अशा गोष्टी आपल्या भारताला परवडणाऱ्या नाहीत, असेही अजितदादा पवार म्हणाले. 

हिंडेनबर्गबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, यावर देशपातळीवर चर्चा करायला लागले आहेत. ज्या परदेशी कंपनीने आरोप केला त्यांचे म्हणणे वाचले. ज्यांच्या विरोधात केले त्या अदानी ग्रुपने देखील त्यांचे म्हणणे मांडले आहे. एक परदेशी कंपनी आणि आज भारतीय नागरिक म्हणून सगळ्यात श्रीमंत गणली जाणारी व्यक्ती यांच्यात हे घडत असताना केंद्र सरकारच्या वित्त विभागाने हस्तक्षेप केला पाहिजे. मोठमोठ्या बँकांच्या बातम्या आल्यानंतर वित्त विभागाने त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि लोकांनी घाबरून जाऊ नये असे पत्रक काढले व योग्य अयोग्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशी घटना घडत असताना का कुणीच बोलायला तयार नाही. केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या यंत्रणा गप्प का आहेत. याबाबतच्या वस्तुस्थितीचा परिपूर्ण अभ्यास केंद्र सरकारचा झाला असेल तर जनतेसमोर स्पष्ट करावे, अशी मागणीही अजितदादा पवार यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उद्या आमदारांची विधानभवनात बैठक लावली आहे. त्यात पोटनिवडणुकांबाबत चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले. चिंचवड व कसबा या दोन्ही जागांवर पोटनिवडणूक लढवण्यासाठी आम्ही ठाम आहोत, असे सांगतानाच कोल्हापूर, पंढरपूर, नांदेड देगलूरमध्ये निवडणुका झाल्या आहेत याची आठवण अजितदादांनी करून दिली. 

आताचा अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून आहे. या अर्थसंकल्पात गॅस सिलेंडरचा दर वाढला आहे, प्रचंड महागाई वाढली आहे, यापासून केंद्र सरकारने देशातील जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामध्ये रेल्वेचा निधी मिळायला हवा. वेगवेगळ्या खात्यांचा निधी असतो तो महाराष्ट्राला मिळाला पाहिजे, ही महाराष्ट्राचा नागरिक म्हणून अपेक्षा आहे, असेही अजितदादा म्हणाले. 

हे सरकार गोरगरीबांचे नाही, 'सर्वसामान्यांचे... सर्वसामान्यांचे सरकार' आहे असा टोला अजितदादा पवार यांनी लगावतानाच भाजप आमदार नरेंद्र पाटील यांच्याकडून सरकारला घरचा आहेर मिळाला आहे. मी कामासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागतो त्यावेळी कॉल केल्यानंतर 'दादा देऊ काही काळजी करू नका' लवकरच देऊ..दोघेही पॉझिटिव्ह बोलतात निगेटिव्ह अजिबात बोलत नाही. कुठलं काम आहे, काय आहे विचारतात, मात्र वेळ काही मिळत नाही. आम्हाला नुसतं खेळवतायत की फक्त चालढकल करत आहेत की वेळ मारुन नेतायत हे कळायला मार्ग नाही. आमचं 'सर्वसामान्यांचे सरकार' बोलतात, मात्र कुठेही महागाई कमी करण्याचे, कारखाने बाहेर गेले ते परत येण्याकरिता प्रयत्न होत नाहीत. उलट बाहेरचे मुख्यमंत्री येतात आणि इथल्या उद्योगपतींना, बॉलिवूड आणि वेगवेगळ्या क्षेत्रांना तुम्ही आमच्याकडे चला बोलत आहेत, अशी टीका अजितदादांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत १५ दिवस अगोदर बैठक मुख्यमंत्री यांनी घ्यायची असते. कुठले प्रश्न महाराष्ट्राचे असावेत याबाबत पुस्तिका काढली जाते. परंतु ऐनवेळी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. मुद्दामहून कुणी टाळले नाही. डॉ. अमोल कोल्हे मुंबईत होते म्हणून ते बैठकीला गेले, बाकीचे खासदार दिल्लीत होते असेही अजितदादांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सांस्कृतिक सेलचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, माजी खासदार व ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्यातर्फे मालाड येथे षटकर्मचे सराव शिबीर यशस्वी संपन्न !

महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्यातर्फे मालाड येथे षटकर्मचे सराव शिबीर यशस्वी संपन्न !

*ठाणे- उदय दणदणे*

महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्हाच्या वतीने, आज रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी, मुंबईच्या मालाड येथे अमित रिद्धी योगशाला स्टुडियोमध्ये षटकर्म अभ्यासाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.

सदर आयोजनात चाळीसहुन अधिक साधक उपस्थित होते,  मुंबई जिल्ह्याचे महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ पौर्णिमा काळे आणि उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई यांनी उपस्थित साधकांना षटकर्मचे महत्व पटवून दिले, तसेच मुंबई टीम कडून नेती, धौती, नौली, कपालभाती, त्राटक, बस्ती असे षटकर्मवर प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले, त्यात दंड धौती, नौली, व्युतक्रम-शितक्रम हे मुंबई जिल्ह्याचे महासचिव प्रसाद काठे आणि उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली व त्याबद्दल माहिती दिली, तसेच यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष- शरद बजाज यांनी देखील व्युतक्रम-शितक्रम यावर सूंदर प्रात्यक्षिक करून दाखविले, जिल्ह्याचे सचिव वर्षा शर्मा व कार्यालय सचिव जयदीप कनकीया यांनी सुत्रनेती, जलनेती, वेसण याचे प्रात्यक्षिके करून दाखविली व त्याबद्दल माहिती दिली, तसेच शंखप्रक्षालन, बिंदू त्राटक, ज्योती त्राटक याच्यावर महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ पौर्णिमा काळे आणि मीडिया प्रभारी निलेश साबळे यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली व त्याबद्दल माहिती दिली आणि त्राटक व जलनेती हे उपस्थित साधकांकडून करवून घेतले.

या उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हाचे अध्यक्ष- शरद बजाज उपस्थित होते, तसेच मुंबई जिल्ह्याचे महासचिव प्रसाद काठे, उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई, श्वेता पिसाळ, कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, मीडिया प्रभारी निलेश साबळे,  सचिव वर्षा शर्मा, सुषमा माने, अमित चिबडे, महिला प्रकोष्ठ प्रभारी पौर्णिमा काळे, कार्यालय सचिव जयदीप कनकीया, संयुक्त सचिव प्रशांत मकेसर, संघटन सचिव विकास ओव्हाळ, अध्यक्ष संतोष खरटमोल आदि उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमात अमित रिद्धी योगशाळा स्टुडियोचे अमित चिबडे आणि रिद्धी देवघरकर यांचे फार मोठे योगदान लाभले, मुंबई जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी वेळात वेळ काढून हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडल्यामुळे मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल यांनी सर्वांचे अभिनंदन केले व मनापासून आभार मानले .

तीन वर्षीय अल्पवयीन मुलाच्या खूनातील मुख्य सुत्रधार अंजनेरी येथील आधारतिर्थ आश्रमातील संचालक मंडळ यांचेवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी - *रविंद्रदादा जाधव अ.आ.नि.स."*

तीन वर्षीय अल्पवयीन मुलाच्या खूनातील मुख्य सुत्रधार अंजनेरी येथील आधारतिर्थ आश्रमातील संचालक मंडळ यांचेवर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी - *रविंद्रदादा जाधव अ.आ.नि.स."*

नाशिक (प्रतिनिधी) : आधारतिर्थ आश्रम अंजनेरी ता.त्रबंकेश्वर जि.नाशिक या ठीकाणी २२/११/२०२२ रोजी ३ वर्षाच्या अनुसूचित जातीच्या बालकाचा गळा आवळून फाशी देवुन खुन करण्यात आला. त्याचे शव आश्रमशाळेच्या मागे टाकुन देण्यात आले होते. 

हत्या करणाऱ्या व हत्येस जबाबदार असणा-या आश्रम शाळेच्या संचालक मंडळ व मुख्य आरोपीस तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी  मयत बालकाची आई सुजाता विशाल शिंगारे यांचेसह अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्रदादा जाधव, यांचे नेतृत्वाखाली प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत, समितीचे उल्हासनगर तालुकाध्यक्ष श्री.दिपक मागाडे , प्रदेश काँग्रेस  सेवादल सरचिटणीस सौ. उज्वलाताई पंडीत, पत्रकार संदीप (भैयासाहेब) कटारे  इत्यादींसह नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक  शहाजी उमाप यांची भेट घेऊन या बालकाच्या खुनास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदार असलेल्या मुख्य आरोपीस अटक करण्यात यावी या संदर्भात सविस्तर चर्चा करुन संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.. 

निपक्षःपाती पणे चौकशी करून मयत बाळाच्या आईस पीडीत
महिलेस न्याय दिला जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक शहाजी उमाप साहेब यांनी शिष्टमंडळास दिले. न्याय न मिळाल्यास त्रबंकेश्वर तालुका पोलीस ठाण्यासमोर अ.आ.नि.स. तर्फे निदर्शने आंदोलन करण्याचा ईशारा रविंद्रदादा जाधव, अण्णासाहेब पंडीत यांनी निवेदनाव्दारे दिला आहे..

Monday 30 January 2023

कांग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन !

कांग्रेस कमिटी तर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमीत्त्त अभिवादन करुन भारत जोडो यात्रेचा श्रीनगर येथे समारोप निमीत्त्त पक्ष कार्यालय गांधी भवन येथे ध्वजारोहन संपन्न झाले.

दि.७ सप्टेंबर २०२२ रोजी कन्याकुमारी येथुन सुरु झालेली मा.खा.राहुलजी गांधी याच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेचा दि.३० जानेवारी २०२३ रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनी श्रीनगर येथे समारोप होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉगे्रस कमिटीचे अध्यक्ष मा.आ. नानाभाऊ पटोले यांच्या सुचनेनुसार शहर जिल्हा मुख्यालयात महात्मा गांधी यांना अभिवादन करुन ध्वजारोहणाचा कार्यकम आयोजीत करावयाचा होता. यानुसार औरंगाबाद शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दि.३० जानेवारी २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळा येथे अभिवादन करुन पक्ष कार्यालय गांधी भवन शहागंज येथे ध्वजारोहणाचा कार्यकम जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.कल्याण काळे व औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रोफेशनल कॉंग्रेस कमिटीच्या वतीने क्रांतीचौक ते गांधी पुतळा पर्यत पायी यात्रा काढण्यात आली होती.तसेच पक्ष कार्यालय गांधी भवन येथील ध्वजारोहन झाल्यानंतर कार्यकम घेण्यात आला. यामध्ये तीन जणाचें प्रामुख्याने मार्गदर्शन झाले. संदिप पाटील यांचे मार्गदर्शन झाले यामध्ये यांनी प्रोफेशनल कॉंग्रेस बददल पुर्ण माहिती दिली. भारत जोडो यात्रा कशासाठी निघाली याचा हेतु काय होतो याची सविस्तर माहिती दिली. भारतीय जनता पार्टी समाजामध्ये कुठल्या पध्दतीने तेढ निर्माण करत आहे.त्याला तोड देण्यासाठी भारत जोडो यात्रा निर्माण करण्यात आली. शहर अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी आपल्या भाषणामध्ये पक्षाची पुर्ण धोरणे ठेवली. हाथ से हाथ जोडो जे अभियान चालु झाल त्या संदर्भामध्ये त्यांनी प्रकाश टाकला. त्याच प्रमाणे त्यांनी हे ही सांगीतले भारत जोडो यात्रा आज आपल्या लक्ष वरती पोहचली असेल.तर संपुर्ण भारतामध्ये नविन चेतना निर्माण करण्याचे काम या यात्रेव्दारे परत निर्माण करण्यात आले. शेवटी जिल्हाध्यक्ष कल्याण काळे यांनी आपली सुचना मांडली व आपले मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आज भारत जोडो यात्रा याचा समारोप नसुन पुर्ण भारतामध्ये नविन उर्जा पसरविण्याचे काम झालेले आहे. ठराव मांडण्यात आला की, राहुलजी गांधी यांनी भारतामध्ये यात्रा काढुन नविन संदेश दिला त्याबददल  त्यांचे आभार अभिनंदनाचा ठराव मांडला. त्या ठरावाला अनुमोदन माजी मंत्री अनिल पटेल व शहर अध्यक्ष शेख युसूफ लिडर यांनी दिला व कार्यकमाचा समारोप करण्यात आला.    
   
यावेळी औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, औरंगाबाद शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी चे अध्यक्ष शेख युसूफ लिडर, किरण पाटील, भाऊसाहेब जगताप, डॉ.पवन डोंगरे, रविंद्र काळे, अनिस पटेल,अतिश पितळे, कैसर बाबा, प्रा.प्रकाश वाघमारे, शेख रईस, शेख अथर, सय्यद फयाजोददीन, आसमत खान, अनिल माळोदे,  उमाकांत खोतकर, मुददसिर अन्सारी, विजया भोसले, अनिता भंडारी, दिपाली मिसाळ, रेखा राऊत, अरुणा लांडगे, राजशेखर साळवे, साहेबराव बनकर, मनोज शेजुळ, जमील पटेल, योगेश बहादुरे, सिंधुताई पवार, संदिप जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सहायक आयुक्त दिनेश वाघचौरे यांच्या आदेशाने गतिरोधक बनविण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात !

सहायक आयुक्त दिनेश वाघचौरे यांच्या आदेशाने गतिरोधक बनविण्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात !

*पालक विद्यार्थी संघटनेच्या प्रयत्नांना यश*

मोहने, संदिप शेंडगे : शिवसृष्टी मोहने येथे वारंवार अपघात होत असल्याने गतिरोधक बसविण्याची मागणी पालक विद्यार्थी संघटनेने केली होती. 

या मागणीला यश आले असून प्रत्यक्ष गतिरोधक बसवण्याचे काम सुरू झाल्याने येथील रहिवाशांनी आनंद व्यक्त केला आहे. 

शिवसृष्टी कॉम्प्लेक्स नवीन उड्डाणपूला जवळ सातत्याने अपघात होत होते येथील वाहन चालक वाहने अतिशय वेगाने चालवत असल्याने शिवसृष्टी कॉम्प्लेक्स रहिवाशांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत असे, लहान मुले वयोवृत्त व गरोदर स्त्रियांना येथून ये जा करणे कठीण झाले होते. 

नितीन राजगुरू यांनी ही बाब पालक विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सचिन बोराडे, सेक्रेटरी आनंद सोनवणे, सदस्य राजू गायकवाड, पत्रकार संदीप शेंडगे यांच्या निदर्शनास आणून दिली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांच्याकडे पालक विद्यार्थी संघटनेने तात्काळ पत्र व्यवहार करून गतिरोधक बसविण्याची मागणी केली. 

सहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे यांनी मागणीची तात्काळ दखल घेतली तसेच सहाय्यक यांना गतिरोधक बसविण्यास सांगितले. सहाय्यक अभियंता बोरसे यांनी तात्काळ गतिरोधक बसविण्याची प्रक्रिया सुरू केली आणि आज प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन गतिरोधक बसविण्यात आले तात्काळ गतीरोधक बसविल्याने रामचंद्र आढाव, प्रकाश जोशी, एम डी मडीवाला, महादेव मोकाशी यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दिनेश वाघचौरे, साहाय्यक अभियंता नितीन बोरसे तसेच पालक विद्यार्थी संघटनेचे आभार व्यक्त केले.
समाज एकत्र होण्यासाठी पष्टे परिवार कुलदैवतांचा देवभेट, जागर व गोंधळ !

समाज एकत्र होण्यासाठी पष्टे परिवार कुलदैवतांचा देवभेट, जागर व गोंधळ !

*वृत्त संकलन: डॉ.दिपेश पष्टे (ध्यानतज्ञ व समुपदेशक)*

‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून ‘कुलदेवता’ हा शब्द बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनीशक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता असं पुराणात म्हंटलय. कुलदेवता ज्या वेळी पुरुषदेवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते. कुलदैवत हे आपल्या कुळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात. बहुतेक करून, कुळाचे पूर्वज ज्या ठिकाणी पूर्वी वास्तव्यास होते, त्या प्रदेशानजीकच्या परिसरातील प्रसिद्ध दैवत हे प्रामुख्याने, त्यांचे ‘कुलदैवत’ असते. त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी/कुलदैवत यांचे स्थानी जाउन दर्शन घ्यावं असं म्हटल जात.
              प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तु, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो. कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व पुराणात सांगितल आहे की, ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आल्यावर साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, श्रीशिव आणि श्रीगणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा असं म्हणतात.
          कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवलं जात. पूर्ण कुळाचे एकच दैवत असण्याची शक्यता असते. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधले गेलेले असू शकते. कुटुंबकबिला वाढला की त्याला कुळ म्हणत असावेत. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी. कुळदैवत हे येणाऱ्या अरिष्टांपासून कुळाचे रक्षण करते, अशी समजूत आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यातील विजयगड, ता. वाडा येथील पष्टे परिवारातील कुळदैवतचा देवदर्शन, जागरण व गोंधळ कार्यक्रम हा २ फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारी पर्यंत आहे. यामध्ये परिवारातील तसेच कुळातील बाहेर राज्य मध्ये वास्तव्यास असलेले सर्वजण दर्शनासाठी येत असून एकत्रित राहून समाजामध्ये आपली एकजूट तसेच एकत्र कुटुंब पद्धतीचे दर्शन या कार्यक्रमातून दाखवून देत असतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात कोणाकडेही वेळ नसताना संपूर्ण कुळाची एकजूट दाखवून समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी एकीचे बळ तयार करून आनंदी जीवन जगण्यासाठी तयार होणाऱ्या वातावरणाचे पष्टे परिवार एक उत्तम उदाहरण निर्माण करत आहे.

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे ज्योती वृद्धाश्रम सेवा संस्था (रजि.) भाईंदर या वृद्धाश्रमास मदतीचा हात !

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे ज्योती वृद्धाश्रम सेवा संस्था (रजि.) भाईंदर या वृद्धाश्रमास मदतीचा हात !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर) :
              शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेद्वारे हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री सन्मा. श्री.अनंत गीते यांच्या सूचनेनुसार दिनांक २९.०१.२०२३ रोजी ज्योती वृद्धाश्रम सेवा संस्था (रजि.) भाईंदर या वृद्धाश्रमास भेट देऊन त्यांना जीवनाश्यक वस्तू तसेच दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या साधनांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम मुंबई महानगर पालिकेचे मा. उपमहापौर श्री.सुहास वाडकर, शिवसेना महाड तालुका संपर्क प्रमुख श्री.नागेंद्र राठोड  यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी सदर वृद्धाश्रमाच्या सेक्रेटरी सौ.मालती कानोजिया (ताम्हणकर) तसेच मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक यशवंत खोपकर, सचिव प्रमोद चौंडकर, सल्लागार भरत पंडीत, कार्यकारिणी सदस्य संदीप चांदिवडे व  बंडू चौधरी, सदस्य वसंत घडशी, दौलत बेल्हेकर, प्रदीप गुप्ता, राजु पेडणेकर, श्रीकांत चिंचपुरे उपस्थित होते. तसेच वृध्दाश्रमाच्या सेक्रेटरी यांनी सौ. मालती कानोजिया यांनी मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष श्री. यशवंत खोपकर व संपुर्ण टिमला आभार पत्र देऊन त्यांचे आभार व्यक्त केले.

मुलुंडमधील हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मुलुंडमधील हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मुंबई उपनगर, (शांताराम गुडेकर) :

          कोकणवृत्तसेवा आणि ओजस्वी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, डेव्हलपमेंट अँड ट्रेनिंग तर्फे २९ जानेवारी २०२३ रोजी हौसिंग सोसायटी मार्गदर्शन शिबीर मुलुंडमधील सार्वजनिक शिक्षण संस्थेचे पुरंदरे हायस्कूल येथे उत्स्फूर्तपणे पार पडले. या क्षेत्रातील तज्ञ संतोष (भाई) पालव यांनी यावेळी मार्गदर्शन केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून शिबीरास सुरुवात झाली. उद्घाटनावेळी राजकीय पत्रकार ईटीव्ही भारत काशिनाथ म्हादे वेळात वेळ काढून याठिकाणी आले आणि त्यांच्या हस्ते भाई पालव यांचा सत्कार करण्यात आला.

           हौसिंगसंबंधी अभ्यासक्रम लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली. ऍड. प्रशांत गायकवाड यांच्या पुढाकाराने शिबीर पार पडले. हौसिंग सोसायटी म्हणजे काय? त्याची नोंदणी झाल्यावर असणारी व्याख्या पालव यांनी नेमकेपणाने सांगितली. घर खरेदी विक्री करार, सदस्य अर्ज, उपविधीनुसार कामकाज, सोसायटी व्यवस्थापन आदी अनेक बाबी सखोलपणे सांगण्यात आल्या. सार्वजनिक शिक्षण संस्था अध्यक्ष विवेक देशपांडे यांनी शिबिरासाठी वर्ग उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. भूषण भिसे आणि संदीप घोलप यांनी सहकार्य केले.

Sunday 29 January 2023

गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम संपन्न !

गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम संपन्न !

मुंबई, (शांताराम गुडेकर/मोहन कदम) :
           गिरनार नागरी निवारा सहकारी गृहनिर्माण संस्था या संस्थेच्या माध्यमातून प्रतीवर्षा प्रमाणे सत्यनारायण पूजा महोत्सव साजरा करण्यात आला. पूजा महोत्सवचे हे २३ वे वर्ष होते. 

यावेळी भव्य महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते.प्रतिवर्षी मोठ्या उत्साहात  साजरा करत असताना विविध स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, विद्यार्थी गुणगौरव -सत्कार सोहळा, त्याचबरोबर विविध डान्स व बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. या सर्व कार्यक्रमाला रहिवाशी यांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

सोसायटीचे पदाधिकारी इमारत कार्यकारणी - लक्ष्मण जाधव(अध्यक्ष ), सुशीलकुमार शिंदे (सचिव ), कैलास गावडे (खजिनदार ), उत्सव समितीचे अध्यक्ष कैलास गावडे, सचिव सुजाता कांबरे, वैभव दा. कदम (खजिनदार) आणि कार्यकर्ते ,महिला मंडळ व मुला-मुलीने यामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी, सदस्य व सभासद आणि रहिवाशी आणि हितचिंतक यांनी महत्वाचे सहकार्य केले याबद्दल सर्वाचे आभार मानले.या कार्यक्रमला अनेक मान्यवर यांनी भेट दिली. शेवटी आभार प्रदर्शनाने पूजा महोत्सवची सांगता करण्यात आली.

नाशिक येथे सावकारी जाचाने एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या !

नाशिक येथे सावकारी जाचाने एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या !

'बाप-लेकांनी संपवले जिवन'  


नाशिक, प्रतिनिधी : नाशिकमधील सातपूर परिसरातील राधाकृष्ण नगरमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांनी आत्महत्या केली. वडील आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीत फॅनला गळफास घेऊन जीवन संपवलं. वडील दीपक शिरोडे यांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी आणि दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीमध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं. आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत. पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. आत्महत्या करणाऱ्या कुटुंबाच्या शेजाऱ्यांकडे पोलीस चौकशी करत आहेत. 

आत्महत्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. ,पण सावकारी जाचाने आत्महत्या केल्याची शक्यता‌, पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून सर्व शक्यता विचारात घेऊन तपास करत आहेत. पण या धक्कादायक प्रकरामुळे नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

सावकाराच्या जाचाला कंटाळून रेल्वेखाली आत्म हत्त्या, आत्महत्ये पूर्वी केला व्हिडिओ व्हायरल !

सावकाराच्या जाचाला कंटाळून रेल्वेखाली आत्म हत्त्या, आत्महत्ये पूर्वी केला व्हिडिओ व्हायरल !

भिवंडी, दि२९, अरुण पाटील (कोपर) :
         सावकारांच्या जाचाला कंटाळून उल्हासनगर मधिल एका व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृताने आत्महत्या करण्यापूर्वी त्याचे कारण स्वतःच्याच मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रित केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे.
            गिरीश नंदलाल चूबे (वय ३५;रा.उल्हासनगर) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो उल्हास नगरमधील कॅम्प नंबर पाच परिसरात पत्नी आणि दोन मुलासह राहत होता. लॉकडाऊन पासून त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची झाल्याने त्याने काही सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले होते. 
          मृतक गिरीश हा उल्हासनगर मधील एका खासगी कंपनीत कामाला होता. मात्र दोन महिन्यापूर्वी या कंपनीत काम करणाऱ्या जय आणि विनोद या दोघांनी त्या कंपनी मालकाला गिरीश बद्दल उलटसुलट सांगितल्याने मालकाने गिरीशला नोकरीवरून काढून टाकले होते. नोकरी गेल्याने आपल्यावर एक लाखापर्यंत कर्ज झाले असल्याचे मृत गिरीशने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले. बेरोजगारी आणि कर्जाच्या नैराश्यातून आपण आत्महत्या करत असल्याचे व्हिडीओत नमूद केले.
         गिरीशने आत्महत्या करण्यापूर्वी त्याने रेल्वे रुळावर लोकल येण्याआधीच स्वतःच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ तयार करून ते नातेवाईक आणि मित्राला पाठवले होते. त्या घटनेमुळे सावकारी जाच एखाद्याच्या जीवावर कसा बेतू शकते याचा प्रत्यय या व्हायरल व्हिडीओ मधून समोर आला आहे.
          गिरीशने सुसाईड नोट देखील लिहिली आहे. त्यामध्ये ४० टक्के व्याजाने पैसे देणाऱ्या सावकरांसह चार ते पाच सावकरांना कंटाळून आणि बेरोजगारीमुळे नैराश्यातून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार त्याने आत्महत्या करण्यापूर्वी तयार केलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून समोर आला आहे.
            तत्त्कालीन दिवंगत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राज्यात सावकार विरोधी कायदा अंमलात आणला होता. त्यामुळे त्यावेळी व्याजाने पैसे देणारे राज्यभरातील अनेक सावकारांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली होती. मात्र, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे लाखो कामगारांवर बेरोजगार होण्याची वेळ आली होती. 
            हीच संधी साधून पुन्हा राज्यभरात बेकायदा व्याजाचा गोरखधंदा करणाऱ्या सावकरांचे पेव फुटल्याचे गेल्या दोन वर्षांत सावकारी जाचाला कंटाळून झालेल्या आत्महत्यांच्या घटनेवरून दिसून येते. दुसरीकडे घराचा एकमेव कमावता व्यक्ती गेल्याने चुबे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

जीवनदीप महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न !

जीवनदीप महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न !

कल्याण, नारायण सुरोशी : जीवनदीप महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील शैक्षणिक, वयक्तिक व सांघिक गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी ठाण्याचे आयकर आयुक्त अखिलेंद्र यादव उपस्थित होते. त्यांनी सध्याच्या घडीला यश मिळविण्यासाठी प्रयत्नही वेगवान असायला हवेत याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्रगतीवर प्राचार्य डॉ. के.बी. कोरे यांनी सादरीकरण केले. यानंतर विविध सांस्कृतिक व संगीतमय कार्यक्रम संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. के.बी. कोरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रिया जाधव व प्रा.पौर्णिमा एगडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.दौलतराव कांबळे यांनी केले. यावेळी अभिनेते समीर पाटील, सागर पगार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, अध्यक्ष रवींद्र घोडविंदे, संचालिका स्मिता घोडविंदे, संचालक प्रशांत घोडविंदे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे,  प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*श्री आदि जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतिने* व *जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था* यांच्या सहकार्याने नालासोपारातील दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअर व मोफत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न...

*श्री आदि जीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतिने* व
 *जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था* यांच्या सहकार्याने नालासोपारातील दिव्यांग बांधवांना मोफत व्हिल चेअर व मोफत सायकल वाटप कार्यक्रम संपन्न...

दिव्यांग व्यक्तींना दररोज विविध समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्याकडे योग्य साधने उपलब्ध नसल्याने त्यांना अनेकदा दुखापती होत असतात.

दिव्यांग नागरिकांना सर्वसामान्य नागरिकांच्या तुलनेत मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे दुर्लक्ष केले जातं. असं असताना नालासोपारा शहरात भव्य असा ऐतिहासिक कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी दिव्यांग बांधवांना आवश्यक त्या साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दिव्यांग बांधवांनाही सक्षम करून त्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिजाऊ संस्था मदत करत असते.

यावेळी श्री आदि जीन युवक  चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतिने व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक अर्चना पाटील व अमित नाईक यांच्या सहकार्याने दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला....

औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी विदेशी पर्यटकाचे पासपोर्ट, व्हिसा भारतीय तसेच परकीय चलन असलेले पॉकेट केले परत !

औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल यांनी विदेशी पर्यटकाचे पासपोर्ट, व्हिसा भारतीय तसेच परकीय चलन असलेले पॉकेट केले परत !

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि  २९ : दिनांक २८/०१/२०२३ रोजी औरंगाबाद ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गुलाब राठोड हे  जगप्रसिद्ध वेरूळ लेणी येथे कर्तव्य बजावत असताना त्यांची नजर रोडवर पडलेल्या पॉकेट वर गेली त्यांनी ते पॉकेट तपासले असता  त्यात Kamil नावाच्या  परदेशी व्यक्तीचा पासपोर्ट व व्हिसा सापडला तसेच त्यात परकीय चलनाच्या नोटा व भारतीय 26500 रुपये तसेच 7 एटीएम कार्ड असे वस्तू मिळून आले परंतु त्यात त्यांना संपर्क करण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर न मिळाल्याने त्यांनी पूर्ण लेणी परिसर शोधून काढले परंतु गर्दी खूप असल्याने त्यांना kamil नावाचा परकीय व्यक्ती भेटला नाही. 

त्यानंतर त्यांनी औरंगाबाद येथील पर्यटक कार्यालयास संपर्क करून सदर घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली त्यांनी सदर परकीय व्यक्तीस माहिती दिल्याने ते वेरूळ येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गुलाब राठोड संपर्क करून भेटून आपली ओळख दाखऊन सदरचे पॉकेट व साहित्य घेतले त्या वेळी त्यांची तोंडून एक शब्द निघाला जो नमस्ते इंडिया व वाकून हात जोडून नमस्कार केला व पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन गुलाब राठोड यांचे नाव घेत तसेच वेल औरंगाबाद पोलीस इंडियन पोलीस असे उच्चरले तसेच संपूर्ण पोलिस यंत्रणेबाबत माहिती घेऊन धन्यवाद मानले.

भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस अपिलीय सुनावणी जनतेची फसवणूक !

भिवंडी सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस अपिलीय सुनावणी जनतेची फसवणूक !

भिवंडी, मनोहर शिंदे : भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभागात माहिती अधिकार अधिनियम कायद्याचे उल्लंघन करून, आर्थिक घोटाळे उघडकीस येऊ नये यासाठी उपविभागीय अभियंता श्री.एस.डी.चौधरी यांना अधिकार नसतानाही अपिलीय सुनावणी घेऊन, माहिती अधिकार कार्यकर्ते पांडुरंग कुंभार यांना अपमानास्पद वागणूक देऊन हाकलून देण्यात आले व त्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे.

दिनांक २६ मे २०२२ च्या शासन निर्णया नुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागात उपविभागीय अभियंता हे जनमाहिती अधिकारी असून विभाग कार्यालयातील कार्यकारी अभियंता हे नियमाप्रमाणे प्रथम अपिलीय अधिकारी आहेत. असे असतानाही आर्थिक घोटाळ्यांची माहिती द्यावी लागू नये व थातूरमातूर उत्तरे देऊन अपिल व माहिती अधिकार अर्ज निकाली काढता यावा यासाठी बोगस अपिलीय सुनावण्या घेऊन शासन निर्णयाला व आदेशाला केराची टोपली दाखवली गेली आहे.

पांडुरंग कुंभार हे अपिलीय सुनावणी साठी भिवंडी उपविभागात गेले असता त्यांना उपविभागीय अभियंता  एस.डी. चौधरी यांनी अरेरावीची भाषा वापरून अपमानित करून हाकलून देण्यात आले.

एवढेच नाहीतर असंवैधानिक भाषा वापरली असा ठपका ठेऊन खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. संबंधित घटणे विरूद्ध कुंभार यांनी वरिष्ठ कार्यालयास ठाणे विभाग क्रमांक १ कार्यकारी अभियंता पाटील यांना वारंवार रितसर तक्रार देऊनही जाणिवपूर्वक चौधरी यांना पाठीशी घालत गैरप्रकार दाबण्याचा आटोकाट प्रयत्न केला. व उलटपक्षी कुंभार यांचेवरच खोटे व बिनबुडाचे आरोप केले.

या संदर्भात पांडुरंग कुंभार यांनी दिनांक १५ डिसेंबर २०२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग विश्रामगृह ठाणे समोर एकदिवसीय उपोषण देखील केले.

या नंतर कुंभार यांनी उपविभागीय अभियंता एस.डी.चौधरी यांना लिगल नोटीस देखील पाठवली पण यावर देखील एक महिना उलटून कोणतेही उत्तर संबंधित कार्यालयाकडून व चौधरी यांचे कडून देण्यात आले नाही.

भिवंडी सार्वजनिक बांधकाम उपविभाग व ठाणे विभाग क्रमांक १ हे आपले आर्थिक घोटाळे उघड होऊ नयेत यासाठी वरील गैरप्रकार करत आहेत व संबंधित फसवणूक करणाऱ्या अधिकार्याची चौकशी लागून त्यांच्यावर फसवणूकीचे गुन्हे दाखल व्हावेत व त्वरीत निलंबनाची कारवाई केली जावी अशी मागणी पांडुरंग कुंभार व प्रकाश संकपाळ हे करत आहेत.

Saturday 28 January 2023

मौजे गोद्री (जामनेर) येथे आयोजित “अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा समाज कुंभ मेळावा” खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट...

मौजे गोद्री (जामनेर) येथे आयोजित “अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा समाज कुंभ मेळावा” खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांची भेट...

जळगांव, अखलाख देशमुख, दि २९ :  जिल्ह्यातील *मौजे गोद्री (जामनेर)* येथे *“अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लाबना - नायकडा समाज कुंभ २०२३”* मेळाव्याचे दि.२५ जानेवारी ते ३० जानेवारी या कालावधीत आयोजन करण्यात आलेले असून, आज सदर कुंभ मेळाव्यास *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांची भेट यांनी भेट देऊन आयोजनाबाबत माहिती जाणून घेतली. तसेच उपस्थित संत मंडळी यांचे दर्शन घेऊन, सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला.

यावेळी *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह अखिल भारतीय धर्म जागरण समन्वय प्रमुख श्री.शरदराव ढोले, श्री.बाळासाहेब चौधरी, पश्चिम क्षेत्र कार्यवाह, परम श्रधेय श्री.गोपाल चैतन्य बाबाजी वृदवन धाम पाल, महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, रामेश्वर नाईक,नंदकिशोर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, माजी जि.प.सदस्य अमित देशमुख, राहुल महाजन, चंद्रकांत बोलणे, बबलू भंसाली, राजू मानकर, विठ्ठल खवळे, राजू तायडे, शुभम पाटील ई. उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनी उत्साहात राष्ट्रध्वज वंदन !

प्रजासत्ताक दिनी उत्साहात राष्ट्रध्वज वंदन !

* खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम सादर

बुलडाणा, प्रतिनिधी : दि. 26 : प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापनदिनी आज दि. 26 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.15 वाजता जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदान येथे राष्ट्रध्वज वंदन करण्यात आले.

यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरवी सावंत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक शामला खोत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी, पोलिस उपअधीक्षक गिरीश ताथोड यांच्यासह विरमाता, विरपिता, विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.

राष्ट्रध्वज वंदनानंतर डॉ. तुम्मोड यांनी परेड निरीक्षण केले. पोलिस दल, होमगार्ड, राष्ट्रीय छात्र सेना, राजीव गांधी सैनिकी शाळा, मुलींची सैनिकी शाळा, सेंट जोसेफ शाळा, पोलिस बँड पथक, श्वान पथक, मोटार परिवहन विभाग यांच्या परेड संचलनानंतर त्यानंतर कृषि विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग, नगर विकास शाखा, सामाजिक वनीकरण विभाग, निवडणूक विभाग यांच्या चित्ररथाने मार्गक्रमण केले.

यावेळी सॅन्डो बटालियनमध्ये कार्यरत असताना शहिद झालेले कैलास पवार यांच्या विरमाता उज्ज्वला भारत पवार यांना ताम्रपट देऊन गौरव करण्यात आले. तसेच प्रशंसनीय सेवेबद्दल पोलिस दलातील पंकज सपकाळे, मोहम्मद शफीक अब्दुल रहिम, केशव नागरे, गजानन नाटेकर, शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त श्रीनिल बेलोकार, अदिती राणे, हर्ष कुंभारे, आदिनाथ इंगळे, वृंदा राठी, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रवी शिंदे, डॉ. यास्मिन चौधरी, एस. जी. सोळंकी, कैलास बेंडवाल, आयुष्मान भारतच्या डॉ. रिया चोपडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे अविनाश महाले, फुल सिंह, धीर वाकोडे, पराग गवई, जिल्हाधिकारी कार्यालयाचे श्रीकांत हाके यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी बाल शिवाजी कॉन्व्हेंट, कराटे प्रशिक्षण केंद्र, महिला स्वसंरक्षण स्वयंसिद्धा, मर्दाणी खेळ, शिवाजी विद्यालय, शारदा कॉन्व्हेंट, एडेड हायस्कूल, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल, उर्दू हायस्कूल,भारत विद्यालय, प्रबोधन विद्यालय, श्री. शिंदे गुरूजी कन्या विद्यालय, जिल्हा परिषद हायस्कूल, रूखाबाई कन्या विद्यालय, सेंट जोसेफ हायस्कूल, सहकार विद्या मंदिर यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे आहारतज्ज्ञ साहेबराव सोळंकी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शहरातील गणमान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...