महाराष्ट्र योगशिक्षक संघ मुंबई जिल्ह्यातर्फे मालाड येथे षटकर्मचे सराव शिबीर यशस्वी संपन्न !
*ठाणे- उदय दणदणे*
महाराष्ट्र योगशिक्षक संघ, मुंबई जिल्हाच्या वतीने, आज रविवार दिनांक २९ जानेवारी २०२३ रोजी, मुंबईच्या मालाड येथे अमित रिद्धी योगशाला स्टुडियोमध्ये षटकर्म अभ्यासाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
सदर आयोजनात चाळीसहुन अधिक साधक उपस्थित होते, मुंबई जिल्ह्याचे महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ पौर्णिमा काळे आणि उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई यांनी उपस्थित साधकांना षटकर्मचे महत्व पटवून दिले, तसेच मुंबई टीम कडून नेती, धौती, नौली, कपालभाती, त्राटक, बस्ती असे षटकर्मवर प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आले, त्यात दंड धौती, नौली, व्युतक्रम-शितक्रम हे मुंबई जिल्ह्याचे महासचिव प्रसाद काठे आणि उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली व त्याबद्दल माहिती दिली, तसेच यवतमाळ जिल्ह्याचे अध्यक्ष- शरद बजाज यांनी देखील व्युतक्रम-शितक्रम यावर सूंदर प्रात्यक्षिक करून दाखविले, जिल्ह्याचे सचिव वर्षा शर्मा व कार्यालय सचिव जयदीप कनकीया यांनी सुत्रनेती, जलनेती, वेसण याचे प्रात्यक्षिके करून दाखविली व त्याबद्दल माहिती दिली, तसेच शंखप्रक्षालन, बिंदू त्राटक, ज्योती त्राटक याच्यावर महिला प्रकोष्ठ प्रभारी डॉ पौर्णिमा काळे आणि मीडिया प्रभारी निलेश साबळे यांनी प्रात्यक्षिके करून दाखवली व त्याबद्दल माहिती दिली आणि त्राटक व जलनेती हे उपस्थित साधकांकडून करवून घेतले.
या उपक्रमात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हाचे अध्यक्ष- शरद बजाज उपस्थित होते, तसेच मुंबई जिल्ह्याचे महासचिव प्रसाद काठे, उपाध्यक्षा हेमवंता जिजाबाई, श्वेता पिसाळ, कोषाध्यक्षा रिद्धी देवघरकर, मीडिया प्रभारी निलेश साबळे, सचिव वर्षा शर्मा, सुषमा माने, अमित चिबडे, महिला प्रकोष्ठ प्रभारी पौर्णिमा काळे, कार्यालय सचिव जयदीप कनकीया, संयुक्त सचिव प्रशांत मकेसर, संघटन सचिव विकास ओव्हाळ, अध्यक्ष संतोष खरटमोल आदि उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमात अमित रिद्धी योगशाळा स्टुडियोचे अमित चिबडे आणि रिद्धी देवघरकर यांचे फार मोठे योगदान लाभले, मुंबई जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी वेळात वेळ काढून हा उपक्रम यशस्वी रित्या पार पाडल्यामुळे मुंबई जिल्हा अध्यक्ष संतोष खरटमोल यांनी सर्वांचे अभिनंदन केले व मनापासून आभार मानले .
No comments:
Post a Comment