Tuesday 31 October 2023

मंत्रीमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर तीन महत्त्वाचे निर्णय!!

मंत्रीमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर तीन महत्त्वाचे निर्णय!!


मुंबई , सचिन बुटाला : राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला राज्य सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मराठवाड्यातील निझामकालीन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीचा पहिला अहवाल ३१ ऑक्टोबरला राज्य मंत्रिमंडळाने स्वीकृत केला. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या अहवालामध्ये निवृत्त न्या. संदीप शिंदे समितीने नमूद केल्याप्रमाणे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी नोंदी तपासण्यात आल्या असून १३ हजार ४९८ जुन्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत. या कुणबी नोंदी तपासण्याचे काम दररोज सुरु असून अशा नोंदी असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तातडीने सुरू करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

याशिवाय मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी तसेच उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन प्रकणात मराठा समाजाचे आरक्षण टिकून कसे राहील यासाठी शासनाला मार्गदर्शन करण्याकरिता न्या. दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली न्या. मारोती गायकवाड, न्या संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. मागासवर्ग आयोगला नव्याने इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्यासदेखील मंत्रिमंडळाने ३१ ऑक्टोबरला मान्यता दिली आहे.

देशाच्या प्रत्येक गावातून आणलेल्या मातीच्या सुगंधाने कर्तव्य पथ दरवळला !!

देशाच्या प्रत्येक गावातून आणलेल्या मातीच्या सुगंधाने कर्तव्य पथ दरवळला !!

*‘मेरी माटी मेरा देश’ अभियानाची सांगता*

मुंबई, सचिन बुटाला : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान सर्व नागरिकांना आपल्या मातीशी आणि देशाशी जोडण्यासाठी राबविण्यात आलेल्या 'मेरी माटी मेरा देश' अर्थात 'माझी माती माझा देश'  या मोहिमेत सुमारे सहा लाख गावांमधून अमृत कलशामध्ये आणलेली माती  विशाल अमृत कलशात (भारत कलश) संग्रहित करुन पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या देशी वनस्पतीं अमृत वाटिकेमध्ये समारंभपूर्वक आज स्थापित करण्यात आली. 

राजधानीतील कर्तव्य पथ येथे भव्य सांगता समारंभ सोहळा पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, सांस्कृतिक कार्यमंत्री जी.किशन रेड्डी, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल व मिनाक्षी लेखी, केंद्रीय युवा व क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर, युवा व क्रिडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक उपस्थित होते यासोबत केंद्रीय मंत्री, राज्यमंत्री, वरिष्ठ अधिकारी तसेच सर्व राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 
 
विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातून अमृत कलश घेऊन आलेल्या लोकांमध्ये मोठा उत्साह होता, तर संपूर्ण कर्तव्य पथही देशभरातून येणाऱ्या मातीच्या सुगंधाने यावेळी दरवळून गेला होता.

या समारोप सोहळ्यासाठी राजधानीत सहभागी होण्याकरिता, मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रोजी अमृत कलश यात्रा विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून, राज्यातून ४१४ कलश घेऊन  जाणा-या ८८१ स्वयंसेवकांना रवाना केले होते.  शनिवारी  दिल्लीत दाखल झालेल्या विशेष रेल्वेतून आगमन झालेल्या सर्व स्वयंसेवकांचे यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार व दिल्लीत दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने स्वागत व सत्कार केला. यावेळी मोठ्या संख्यने दिल्लीस्थित मराठी बांधव उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी आज कर्तव्य पथावर  ठेवण्यात आलेल्या भारत कलशला नमन केले.  येथे बांधण्यात आलेल्या मुख्य अमृत वाटिकेचे उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते झाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात ‘मेरी माती मेरा देश’ या अमृत महोत्सवाचा समारोप कार्यक्रमात देशभरात एकतेचा संदेशही देण्यात आला. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून अमृत कलशात माती घेऊन येणाऱ्या लोकांनी कर्तव्य पथावर देशाच्या माती आणि स्वातंत्र्यासाठी योगदान दिलेल्या वीरांना यावेळी आदरांजली वाहिली.

2.63 लाखांहून अधिक ठिकाणी अमृत वाटिका देशभरात

या मोहिमेअंतर्गत शूर शहीद आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2,33,000 शिळाफलक उभारण्यात आले आहेत. तसेच संबंधित संकेतस्थळावर पंच निर्धारांच्या प्रतिज्ञेसह सुमारे 40 दशलक्ष सेल्फी फोटो अपलोड करण्यात आले आहेत. या मोहिमेच्या अंमलबजावणीतून, देशभरातील शूरवीरांचा गौरव करण्यासाठी 200,000 हून अधिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आले होते. वसुधा वंदन संकल्पनेअंतर्गत 236 दशलक्षांहून अधिक स्वदेशी रोपट्यांची लागवड करण्यात आली असून 263,000 अमृत वाटिका उभारण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान मोदींना अमृत कलश घेऊन येणाऱ्या स्वंयसेवकांना संबोधन

पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देशाच्या विविध भागातून अमृत कलश घेऊन कर्तव्य पथावर जमलेल्या स्वंयसेवकांना संबोधित कले.  मेरी माटी  मेरा देश' अभियानाने तरुणांना विविधतेत एकतेचा संदेश दिला आणि तरुणांनी देशाच्या विकासात आपला सहभाग वाढवाण्याचे आवाहन केले. त्यांनी यावेळी 'मेरा युवा भारत प्लॅटफॉर्म' ही लॉन्च केले. या प्लॅटफॉर्मव्दारे युवक सहभागी होऊन देशाच्या विकासात हातभार लावू शकतील.

या समारंभाची उत्कृष्ट विविधरंगी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच चित्ताकर्षक प्रकाश आणि ध्वनीच्या संगीताचा कार्यक्रमाने सांगता झाली.

महापालिकेतील प्रमुख रस्ते धुळरहित न झाल्यास सेक्रेट हार्ट शाळेचे प्राचार्य अंगातील शर्ट काढून पाण्याने रस्ते धुणार !!

महापालिकेतील प्रमुख रस्ते धुळरहित न झाल्यास सेक्रेट हार्ट शाळेचे प्राचार्य अंगातील शर्ट काढून पाण्याने रस्ते धुणार !!

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण डोंबिवली महापालिकेतील प्रमुख रस्ते १२ नोव्हेंबर पर्यत धुळरहित झाले नाही तर मी स्वतः अंगातील शर्ट काढून खडकपाडा येथील रस्ता पाण्याने धुणार यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी, डाँवटर, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक आणि नागरिक हि सहभागी होणार आहेत असे सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक अलबिन अँथोनी यांनी सांगितले, त्यामुळे या हटके आंदोलनाकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्तावर धुळीचे सामाज्य पसरले आहे, तर खड्डे ही पडले आहेत, तसेच डंपिंग ग्राउंड कचरा डेपो मुळे परिसरात दुर्गधी पसरते, याबाबत उपाययोजना कराव्यात याकरिता आंदोलन केले होते, महापालिका प्रशासनाने ३१ आँवटोबर रोजी चर्चेला बोलावले होते.

त्या प्रमाणे सेक्रेड हार्ट शाळेचे संचालक अलबिन अँथोनी व त्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त डॉ भाऊसाहेब दांडगे याची भेट घेतली व चर्चा केली, संचालक अलबिन अँथोनी यांनी सांगितले की महापालिका प्रशासनाने १२ नोव्हेंबर पर्यत प्रमुख रस्ते, खडकपाडा, प्रेम आँटो, वायले नगर तसेच कल्याण मुरबाड रोड हे महत्त्वाचे रस्ते धुळीत न्हाऊन गेले आहेत. यामुळे शालेय विद्यार्थी, लहान बालके, स्त्रिया, वयोवृद्ध यांना ब्लड कँन्सर झाले आहेत, यामध्ये अनेकाचा जीव गेला आहे. याबाबत वेळोवेळी महापालिकेकडे पत्रव्यवहार केला मात्र या भ्रष्ट अधिका-यांनी दखल घेतली नाही. देशाचे पंतप्रधान स्वच्छतेचे धडे देतात, स्वतः झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबवितात. मात्र या कल्याण डोंबिवली पालिकेने त्यांच्या स्वप्नांना कच-यात टाकले आहे, असा आरोप करुन आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, मी व माझ्या सोबत विधाथी, पालक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक,, नागरिक असे पाचशे जण मिळुन पाण्याच्या बादल्या आणून अंगातील शर्ट काढून खडकपाडा येथील रस्ता संपूर्ण पाण्याने धुणार, असे सांगितले तसेच स्वच्छ भारत अभियनावर लाखो रुपये खर्च केला जातो त्याचा काय उपयोग, जिकडे तिकडे घाण दिसत आहे असे आरोप केले आहेत.

आजच्या या शिष्टमंडळात सेक्रेट हार्ट शाळेचे प्राचार्य अलबीन अँथोनी, कल्याण चे सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर, सेवानिवृत्त डेप्युटी सीईओ श्री नाईक, शाळेच्या श्रीमती अश्विनी मँडम, सना मँडम, संजिता मँडम, यासिम सर, भामरे सर आणि शाळेचे विद्यार्थी याचा समावेश होता.

दरम्यान सेक्रेट हार्ट शाळेचे प्राचार्य अलबीन सर यांनी आतापर्यंत जनहितार्थ जी जी आंदोलन केलेत, प्रश्न मांडले आहेत, ती यशस्वी केले आहेत, त्यामुळे हाही धुळरहित रस्त्याचा प्रश्न ते निकाली काढतील आणि लोकांना न्याय मिळवून देतील असे वाटते.

एकात्मिक बालविकास विभागाच्या खडवली बीटाचा मानिवली येथे महिलांचा मेळावा संपन्न, मान्यवरांची उपस्थिती !!

एकात्मिक बालविकास विभागाच्या खडवली बीटाचा मानिवली येथे महिलांचा मेळावा संपन्न, मान्यवरांची उपस्थिती !!

कल्याण (संजय कांबळे) : कल्याण पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाच्या खडवली बीटाच्या वतीने महिला मेळावा नुकताच मानिवली ग्रामपंचायत कार्यालया शेजारी मोठ्या उत्साहात साजरा झाला, यावेळी अनेक मान्यवरांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली व मार्गदर्शन केले.

याप्रंसगी व्यासपिठावर मानिवली च्या सरपंच सुकन्या गायकर, सदस्यां चंदाबाई गायकर, माया गायकर, माझी सरपंच चंद्रकांत गायकर, सामाजिक कार्यकर्ते संजय शेलार तर प्रमुख पाहुणे म्हणून हभप दिनेश तारमळे, अँड नंदिनी वडनेर, गुरवली ग्रामपंचायतीच्या सरपंच आशा दळवी, उपसरपंच, प्रशांत दळवी, सदस्य वैशाली मेहेर, स्वप्नील देशमुख, डॉ संदिप पाटील, मोस चे श्री मांजरे,आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रथम उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, तर खडवली बीटातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी स्वागत गीत गाऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. मुख्य सेविका रेखा भगत यांनी अंगणवाडीच्या साह्याने चालणारे विविध उपक्रमाची माहिती दिली. तर डॉ संदिप पाटील यांनी महिलांच्या आहार व आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. महिलांना सकस आहार घेणे किती महत्त्वाचे आहे याचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच शरीरासाठी पाणी किती महत्त्वाचे आहे हेही सांगितले. अँड नदिंनी वडनेर यांनी महिलांच्या कायदेशीर कारवाई व हक्क, याबद्दल माहिती दिली .तर हभप दिनेश तारमळे यांनी आध्यात्मिक विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत गायकर यांनी ही मार्गदर्शन केले.

प्रशासनाच्या वतीने मुख्य सेविका उषा लांडगे, प्रज्ञा निपुर्ते, घरत मँडम उपस्थित होत्या, यावेळी मांडलेले खाद्यसंस्कृती व आकर्षक रांगोळीचे उपस्थितीतांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खडवली च्या सेविका श्रीमती जाधव यांनी केले. या मेळाव्याला परिसरातील महिलांनी व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती.

कार्यकर्ता मेळावा आणि नवीन बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती मराठा आंदोलकांच्या सावटाखाली !!

कार्यकर्ता मेळावा आणि नवीन बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती मराठा आंदोलकांच्या सावटाखाली !!

*आरपीआयचे कार्यकर्ते नाराज असल्याची कुण कुण* 

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण अत्रे रंगमंदिर येथील कार्यकर्ता मेळावा आणि मोहने येथील विश्वशांती सोसायटी मधील नवीन बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते या नवीन वास्तूचे लोकार्पण होणार आहे. मात्र जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यात मराठा समाज सर्वत्र आंदोलन करीत आहे.

जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणादरम्यान जरांगेनी पाणी सुद्धा पिण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील मंत्र्यांना घेराव घालणे मंत्र्यांच्या गाड्या अडवणे, मंत्र्यांच्या गाड्या समोर काळे झेंडे दाखविणे आदी प्रकार मराठा समाज आक्रमकपणे करत आहे.
कल्याणमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दौऱ्यात काही मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली
याच पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे कल्याण दौऱ्यावर येतील की नाही यावर मराठा आंदोलनाचे सावट पसरले आहे.
 
नवीन बुद्ध विहाराला पहिलाच पावसात गळती___

या नवीन बुद्ध विहाराच्या कामाकरिता माजी आमदार नरेंद्र पवार यांनी 50 लाख रुपये निधी मंजूर केला होता आमदार नरेंद्र पवार हे गुजरात दौऱ्यावर असल्याने या बुद्ध विहाराच्या भूमिपूजनाच्या कामाचे उद्घाटन आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते झाले होते. मात्र या बुद्ध विहाराच्या कामात ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरून बुद्ध विहाराचे काम घाई घाईने केल्याने बुद्धविहारास पहिल्याच पावसात गळती सुरू झाली होती याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सुशील आरके यांनी पालिकेच्या बांधकाम विभागाकडे केली होती.
या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याशिवाय याचे उद्घाटन करू नये अशी आरके यांची मागणी होती परंतु भाजप पदाधिकाऱ्यांनी घाईघाईने याचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे

*आरपीआयचे कार्यकर्ते नाराज*

विश्वशांती सोसायटी गाळेगाव येथील बुद्ध विहाराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त भाजपने मोठमोठे होर्डिंग बॅनर लावले आहेत परंतु या होर्डिंग मध्ये स्थानिक आरपीआयच्या कार्यकर्त्यांचे फोटो नसल्याने आरपीआयचे कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची युती असताना भाजपने केवळ त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचे बॅनरवर फोटो लावल्याने आरपीआयचे कार्यकर्ते नाराज असल्याने आरपीआय समर्थकांची या कार्यक्रमाला उपस्थिती राहीलच असे सांगता येत नाही.
या उद्घाटन सोहळ्याच्या माध्यमातून आरपीआयचे कार्यकर्ते नाराज झाल्यास आगामी लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसू शकतो. तसेच आरपीआयच्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपातील वरिष्ठ नेते काय प्रयत्न करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

देशाचा आत्मा म्हणजे कष्टकरी शेतकरी- कोकणात भात कापणीला वेग !!

देशाचा आत्मा म्हणजे कष्टकरी शेतकरी- कोकणात भात कापणीला वेग !!

"शेतकरी जगला, तर देश जगेल; शेतकरी संपला तर हा देशही संपेल."

               शेतकरी ही शेती धारण करणारी व्यक्ती असते. शेेती कसणारा तो शेतकरी. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. 'गावगाडा'कार त्रि.ना.आत्रे 'गाव वसविण्याचे आणि जमीन वहीतीला आणण्याचे' श्रेय शेतकऱ्यांना देतात. त्यांच्या मते खेडणे म्हणजे जमिनीची मशागत करणे आणि खेडुत म्हणजे जमीन कसणारा. असा प्रत्यक्ष जमीन कसणारा मालक असो वा कुळ, मिरासदार असो वा बटाईदार. प्रत्यक्ष जमीन कसणारा म्हणजे शेतकरी होय. शेतात येणाऱ्या पिकाच्या उत्पन्नावरून शेतकऱ्याची उपजीविका चालते.

              रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील आंगवली हे माझं गाव. गावात सर्व जाती-धर्माचे लोक रहातात. येथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. गावात जि. प. शाळा आंगवली, जनता विद्यालय आंगवली, सोमेश्वर मंदिर. मार्लेश्वर देवालय (मठ) याशिवाय अनेक आवश्यक सोयी -सुविधा उपलब्ध आहेत.माझा जन्म याच गावात झाला. शिक्षण पण येथेच झाले. शालेय जीवनात खूप सारी मस्ती.. धमाल केली. वडील शेतकरी असल्यामुळे सुट्टी दिवशी मी पण गंम्मत म्हणून शेतात जात असे. यातील खास मज्जा यायची ती पावसाळी शेती कामात. आई -बाबा, दोन भाऊ, दोन बहिणी, दोन वहिनी सतत शेती कामात मग्न असायचे. मी गंम्मत म्हणून शेतावर जात असे. ते दिवस आज (५२व्या वर्षी) जरी आठवले तरी सर्व वाडी, गाव आणि सर्व माणसं डोळ्यासमोर येतात.भारतीय संस्कृती ही विविधतेने नटलेली आहे. अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात.पण शेती हा भारतातील प्रमुख व्यवसाय आहे. म्हणूनच भारताला 'कृषी प्रधान देश' म्हणून सुद्धा ओळखले जाते. शेतकरी भारताचा कणा आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेत त्याचे १७% योगदान आहे.  शेतकऱ्यांमुळेच भारत आज अन्नाच्या बाबतीत आत्मनिर्भर आहे. या शिवाय दर वर्षी खूप सारे खाद्यान्न भारतातून इतर देशांना निर्यात केले जाते.शेतकरी सकाळी लवकर उठतो आपले बैल आणि इतर सर्व सामान घेऊन शेताकडे निघतो. तासनतास तो शेतात काम करतो. शेतकऱ्यांच्या घराचे इतर लोक सुद्धा शेतात त्याची मदत करतात. शेतकऱ्याचे जेवण अतिशय साधे असते. बरेच शेतकरी चटणी भाकर खाऊन दिवस काढत असतात. दुपारी शेतकऱ्यांच्या घरून त्याची पत्नी किंवा दुसरे कोणीतरी जेवण घेऊन येते.शेतकरी जेवण करून काही मिनिटांच्या विश्रांती नंतर पुन्हा आपल्या कामाला लागतो. तो कठीण परिश्रम करतो.पण एवढ्या परिश्रमानंतर देखील त्याला जास्त लाभ होत नाही अशी खंत आंगवली रेवाळे वाडी येथील शेतकरी श्री. शशिकांत शां. आग्रे यांनी व्यक्त केली.

              नोकरीनिमित्त शहरात गेलेले तरुण सुट्टी काढून खासकरून शेतीच्या कामाला गावी आली आहेत. सुशिक्षित तरुणांना शेतीत रस निर्माण झाला असून शेतकामात आता शिकला सवरलेला वर्ग दिसून येत असल्याने कृषी क्षेत्रात हा सकारात्मक बदल म्हणावा लागेल. अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचा फटका भातशेतीला बसू नये म्हणून शेतकरी मिळेल ते मनुष्यबळ वापरून कापणीचे काम आटपून घेत आहेत. अनेक ठिकाणी कापणी, काढणीच्या कामाला वेळेत मजूर मिळत नसल्याने सधन शेतकरी यंत्राच्या वापराने कामे जलदगतीने आटपून घेत आहेत.काही शेतकरी पारंपरिक पद्धतीला बाजूला सारत यंत्रसामुग्री चा वापर करीत आहेत. यामध्ये श्रम वेळ व पैसा बचत होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी भात झोडणीच्या कामात व्यस्त झाला असून मळणी काढण्यासाठी सकाळी लवकरच शेतात दाखल होत आहेत. भात कापणी, भात वाळवणे, पेंढ्याची उडवी रचणे या कामाला आता चांगलाच वेग आला आहे. ग्रामीण भागात आजही खळ्यांवर मोकळ्या आकाशात झोडणीची कामे होत आहेत. खळ्यांमध्ये पडलेला भात पोत्यात भरून घरात आणून टाकण्याचे काम सुरू आहे.

                 या देशाची माती सर्जक आहे. ती पोसणारी, भाईचारा जपणारी आहे. आपल्या व्रात्य, भ्रमिष्ट लेकरांनी (धरतीपुत्रांनी) केलेले अत्याचार सहन करूनही ती त्यांना ममत्वाने पुन्हा अन्नाचे चार घास भरवून जगण्याचा अवसर देते. तिच्यात ममत्व आहे, तसं दातृत्वही. ती विषमता नव्हे, तर समता उगवते. द्वेष नव्हे, बंधुभाव जगवते. ती खिळे उगवत नाही, तर अन्न पिकवून देते. ती विषपेरणी नव्हे, तर माणुसकीची पेरणी करते. हिसकावून घेणं नव्हे, तर देणं शिकवते. ती हात उगारायला नव्हे, तर कष्टानं हाताला घट्टे पाडायला शिकवते. ती उलटायला नव्हे, तर जागायला शिकवते. ती परजीवी नव्हे, श्रमजीवी आहे. ती बांडगूळ नव्हे, तर करोडो पोटांना जगवणारी आहे. ती विद्वेषी नव्हे, तर सहिष्णू आहे. ती एकचालकानुवर्ती नव्हे, तर लोकचालकानुवर्ती आहे. ती एकवचनी नव्हे, बहुवचनी आहे. माती म्हणजे जीवन. शेती म्हणजे जीवनपद्धती, जगण्याची संस्कृती. या देशाची नस. मृत्यूनंतर उदरात सामावून एकजीव करणारी. तिच जन्म देते, तिच जगवते, तिच पदरी घेते. हाच शेतकरी धर्म, हीच भूमाता. भारतमाता. कृषिसंस्कृती! या शेतकरी धर्माचा आम्ही पूर्ण आदरसन्मान करतो. तिचे शेतकरीपुत्र अन्यायाला, दडपशाहीला डरत नाहीत. सहिष्णुता, अहिंसा आणि लोकशाही मार्गाने आपला लढा व्यापक करण्याची ताकद शेतकऱ्यांमध्येच आहे. जी गांधीजींना आकळली होती. म्हणूनच कृषिसंस्कृतीशी नाळ असलेला एक तरुण या नात्याने या शेतकरी लढ्याला, आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांना कृतज्ञतापूर्वक सलाम करणं, त्यांच्या अतूट धैर्याला मानवंदना देणं, त्यांच्याविषयी सद्भावना व्यक्त करणं, त्यांच्या सोबत राहणं, हे एक भारतीय म्हणून माझं कर्तव्य आणि जबाबदारी समजतो...खंत इतकीच की, अन्नदात्यालाच टाच रगडून, अत्याचार सहन करून न्यायासाठी झगडावं लागणं, यासारखं शिवछत्रपती-जोतीराव फुले-भगतसिंह-महात्मा गांधी, साने गुरुजी, आंबेडकर आणि लोहिया आदींच्या योगदानातून स्वातंत्र्य-समता-धर्मनिरपेक्षता या लोकशाही मूल्यांवर उभ्या राहिलेल्या देशात यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणते?

              शेतकऱ्याचे जीवन खूपच साधे असते. त्याचा पेहराव ग्रामीण असतो. बरेच शेतकरी कच्या घरात राहतात. शेतकऱ्याची संपत्ती बैल आणि काही एकर जमीन असते. शेतकरी हा देशाचा  आत्मा असतो. लाल बहादूर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' चा नारा दिला होता. त्यांनी म्हटले होते की शेतकरी हा भारताचा आत्मा आहे. म्हणून आज शेतकऱ्याला सरकार द्वारे अधिकाधिक मदत मिळायला हवी.त्यांना शेताचे सर्व आधुनिक यंत्र व कीटनाशके उपलब्ध करून द्यायला हवेत. शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे राहणीमान, जेवण साधे जरी असले तरी शेतातील बांदावर बसून केलेल्या जेवणाची चव खूप भारी असते. एखाद्या हॉटेल मधील टेबलावर बसून केलेल्या  जेवणापेक्षा उत्तम असते. हातावर भाकरी.. चटणी.. भाजी..झुणका भाकर... पावसापासून सुरक्षित म्हणून डोक्यावर  प्लास्टिक कागद किंवा घोंगडी.. अशा परिस्थितीत जेवण करताना एक वेगळाच आनंद मिळतो.काय ती  माती..... काय ती शेती...काय तो  सुगंध... काय ते कष्ट....काय मग येताय का बांदावरील जेवणाची मज्जा घ्यायला आमच्या कोकणात ...! कारण "शेतकरी जगला, तर देश जगेल; शेतकरी संपला तर हा देशही संपेल." हे कटू सत्य नकरण्यासारखे नाही.

शांताराम ल. गुडेकर, 
दै. अग्रलेख
मुंबई /कोकण विभागीय संपादक 
पार्क साईट विक्रोळी (प.)
मुंबई -७९, (मो. +91 98207 93759)

Monday 30 October 2023

मानपाडा पोलिसांची कारवाई सराईत साखळी चोरांना अटक !

मानपाडा पोलिसांची कारवाई सराईत साखळी चोरांना अटक !

डोंबिवली , मिनल पवार : डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सराईत साखळी चोरांना अटक केलीय. वारिस मिराज खान (२४) आणि मोहम्मद जाफर कुरेशी ( ३०) अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी या चोरट्यांकडून ८ लाख ६८ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज हस्तगत केला.

याबाबत मानपाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या परिसरात साखळी चोरांचा उपद्रव वाढला होता. मानपाडा पोलीसांनी निसर्ग हॉटेल समोरील रोडवर साध्या वेशात तीन ठिकाणी सापळा लावला. तळोजा रोडकडुन आरोपीची मोटार सायकल निसर्ग हॉटेल जवळ येताच पोलीसानी त्यांना जाळ्यात अटकवण्यासाठी रस्त्याने येणारी जाणारी वाहने रोडवर थांबवली. या प्रकारचा आरोपींना संशय आला आणि आरोपींनी आपली मोटार सायकल रोडवर टाकून पळण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले. वारिस मिराज खान आणि मोहम्मद जाफर कुरेशी अशी या चोरट्यांची नावे आहेत. आरोपींनी चेन स्नॅचिंगचे ८ आणि मोटार सायकल चोरीचा १ गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. या दोन्ही चोरट्यांकडून सर्व गुन्हयामध्ये ८,१८,५००/- रूपये किंमतीचे १५१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५० हजार रूपये किंमतीची चोरीची बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण ८,६८,५००/- रूपये किंमतीचा मुददेमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.

सदरची कामगिरी मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग कल्याण मा. श्री. सचिन गुंजाळ, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, कल्याण आणि मा. श्री. सुनिल कुराडे सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे श्री. अशोक होनमाने, वपोनि मानपाडा पोलीस ठाणे, यांच्या देखरेखीखाली श्री. सुरेश मदने, पोनि (प्रशा) श्री राम चोपडे पोनि (गुन्हे) श्री. दत्तात्रय गुंड पोनि (कावसु) सपोनि / अविनाश वनवे, सपोनि / सुनिल तारमळे, सपोउपनिरी/ भानुदास काटकर, पोहेकॉ / संजु मासाळ, पोहेकॉ / शिरीष पाटील, पोहेकॉ / सुनिल पवार, पोहेकॉ / विकास माळी, पोहेकॉ / राजेंद्र खिलारे, पोहेकॉ / दिपक गडगे, पोना / शांताराम कसबे, पोना / यल्लप्पा पाटील, पोना/ महादेव पवार, पोकॉ/ विजय आव्हाड, पोकों/महेंद्र मंझा, पोकॉ/ विनोद ढाकणे, पोकॉ/ अशोक अहेर, पोना / महाजन, पोकों/ चंद्रकांत खरात, पोना/पाटील, पोकों / संदीप खरात यांचे पथकाने केली आहे.

आमदार राजू पाटील यांच्या मागणीला यश ! पलावा वासियांना मालमत्ता करात ६६ टक्के सूट !!

आमदार राजू पाटील यांच्या मागणीला यश ! पलावा वासियांना मालमत्ता करात ६६ टक्के सूट !!

डोंबिवली , सचिन बुटाला‌‌ : डोंबिवली पूर्वेकडील पलावा हा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा कोणताही भार महापालिका प्रशासनावर येत नसतानाही येथील रहिवाशांकडून संपूर्ण कराची आकारणी केली जात होती. पलावामध्ये सुमारे २६ हजार फ्लॅट आहेत. हा आयटीपी प्रकल्प असून या प्रकल्पधारकांना नियमानुसार मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी आमदार राजू पाटील यांच्या कडून केली जात होती.  

महाविकास आघाडी सरकारच्या कालखंडात २० नोव्हेम्बर २०१८ रोजी आयटीपी प्रकल्पामधील नागरिकांना मालमत्ता करात ६६ % सवलत देण्याचे परिपत्रक सरकारने काढले होते. मात्र या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नव्हती. कारण तत्कालीन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे हे कार्यरत असताना त्यांनी खोणी पलावा येथील नागरिकांना मालमत्ता करात सवलत दिली होती. 

दरम्यान, या संदर्भात महापालिकेचे या आधीचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मात्र त्यांची निर्णय घेण्याआधीच बदली झाली. या संदर्भात आमदार राजू पाटील यांनी २० जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. 

आयुक्तांनी या संदर्भात अहवाल सादर करण्यास दिरंगाई केली, तरी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी जनहित मागणीचा आदर करीत नागरिकांना ६६ % मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. यानिर्णयासाठी आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं. तसेच नागरिकांनी जो अधिकचा कर भरला आहे, तो आगामी मालमत्ता करात समायोजित करण्यात यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‌ यांनी केली पलावा (डोंबिवली) वासियांची दिवाळी गोड !!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‌ यांनी केली पलावा (डोंबिवली) वासियांची दिवाळी गोड !!

*मालमत्ता करात ६६ टक्के सूट*


डोंबिवली, सचिन बुटाला‌‌ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे‌ यांनी डोंबिवलीच्या पलावातील रहिवाशांना दिवाळी भेट दिली आहे. डोंबिवली पूर्वेकडील पलावा येथील २६ हजार फ्लॅटधारकांना आयटीपी प्रकल्पात समाविष्ट करत मालमत्ता करात सूट देण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेकडील पलावा हा एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचा कोणताही भार महापालिका प्रशासनावर येत नसतानाही येथील रहिवाशांकडून संपूर्ण कराची आकारणी केली जात होती. पलावामध्ये सुमारे २६ हजार फ्लॅट आहेत. हा आयटीपी प्रकल्प असून या प्रकल्पधारकांना नियमानुसार मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्यात यावी, अशी मागणी केली जात होती.

आज मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण , खासदार श्रीकांत शिंदे, पालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत या प्लॅटधारकांच्या मालमत्ता करात ६६ टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे २६ हजार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी या निर्णयानंतर मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं आहे. 

'द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन'च्या उपाध्यक्षपदी खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड !!

'द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन'च्या उपाध्यक्षपदी खासदार श्रीकांत शिंदे यांची निवड !!


मुंबई , सचिन बुटाला‌ ::भारतातील फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकीत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनशी संलग्न असलेल्या आणि महाराष्ट्रात फुटबॉलचे नियमन करणाऱ्या ''द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन'' (WIFA) या संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारी समितीच्या उपस्थिती शनिवारी मुंबईत झालेल्या बैठकीत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

''द वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन ही संस्था भारतात फुटबॉल खेळाचे नियमन करणाऱ्या नामांकीत ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनशी संलग्न आहे. तर, महाराष्ट्रात फुटबॉलचे नियमन देखील या संस्थेमार्फत करण्यात आले आहे. महाराष्ट्रात आणि देशात फुटबॉल खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळासाठी आवश्यक गोष्टींची उभारणी करण्यासाठी काम करणारी ही सर्वात जुनी संस्था असून १९११ पासून कार्यरत आहे. देशातील सर्वात जुनी दुसरी स्पर्धा असलेल्या रोव्हर्स कपची सुरुवात संस्थेच्या स्थापनेपूर्वीच झाली होती. राज्यातील फुटबॉल खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेमार्फत विविध ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.


यावेळी राज्यात आणि देशात फुटबॉलसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा आणि पोषक वातावरण निर्माण करण्यात नक्कीच योगदान देण्याचा प्रयत्न राहणार असून ग्रामीण भागातील खेळाडूंना फुटबॉलच्या मुख्य प्रवाहात आणण्याला प्राधान्य असल्याच्या भावना खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.

या बैठकीला संघटनेचे उपाध्यक्ष छत्रपती मालोजीराजे, सुनील धांडे, विश्वजीत कदम, हरेश वोरा, किरण चौगुले, ए. सलीम परकोटे, सहसचिव आणि कार्यकारी समितीस सदस्य उपस्थित होते.




कल्याण-डोंबिवलीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक !!

कल्याण-डोंबिवलीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक !!

*शहरातील इतर महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा*

मुंबई,, सचिन बुटाला‌‌ : कल्याण-डोंबिवलीतील २७ गावांमधील पाणी पुरवठा प्रश्न तसेच डोंबिवलीमधील विविध नागरी समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी २७ गावांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न तातडीने व कायमस्वरुपी सोडविण्याच्या दृष्टीने उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. तसेच या परिसरात सध्या अस्तित्वात असलेल्या नळजोडण्यांचा व्यास दुप्पट करणे, बुस्टर पंप बसविणे यांसह दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या संदर्भातही सविस्तर चर्चा झाली. 

पाण्याचा प्रश्न नेहमीच उपस्थित होत असल्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्रांचे व या परिसरातील रहिवाश्यांचे खूप हाल होत आहेत, त्यामुळे या विषयावर ठोस उपाययोजना करण्यासासाठी महापालिका व एमआयडीसी स्तरावर तातडीने पावले उचलावीत अशी सूचना केली.  

त्याचबरोबर बैठकीत हभप सावळाराम महाराज क्रिडा संकुल, पिंपळेश्वर महादेव मंदिर आणि डोंबिवली जिमखाना, पलावा सिटी कर आकारणी इत्यादी विषयांसंदर्भात सविस्तर चर्चा करून हे विषय सकारात्मकरित्या सोडविण्याच्या दृष्टीने निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

या बैठकीला कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा यांच्यासह कल्याण-डोंबिवली महागनरपालिकेचे व एमआयडीसीचे अधिकारी तसेच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी आणि २७ गाव संघर्ष समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

कल्याण, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यातील एकाही गावात नेत्यांना गावबंदी नाही ?

कल्याण, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यातील एकाही गावात नेत्यांना गावबंदी नाही ?

कल्याण, (संजय कांबळे) : मराठा आरक्षणावरुन मराठा समाज संपूर्ण राज्यभरात आक्रमक झाला असताना, शिवाय त्यांनी राज्यात ठिकठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केली असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर,आणि मुरबाड तालुक्यात मात्र एकाही गावात नेत्यांना गावबंदी झाली नसल्याचे पोलिसांन कडून समजते, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर पोलिसांनी मात्र याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे, शिंदे सरकारला वेळ देऊनही मराठ्याना आरक्षण न दिल्याने जरांगे पाटील संतापले आहेत, आणि त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आजचा उपोषणाचा ६ वा दिवस आहे त्यांनी पाणी देखील सोडल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे, तरी देखील सरकारने आरक्षण न दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. 

जरांगे च्या आवाहनानुसार राज्यभर सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी जाहीर केली आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली. भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड केली, माजलगाव नगर परिषदेला आग लावली, अनेक शासकीय अधिकां-यांच्या गाड्या फोडल्या, कार्यालयात कोंडले, बँनर फाडले, काळे फासले, अशा विविध घटनांनी महाराष्ट्र अशांत झाला आहे, संपूर्ण राज्यातून जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळत आहे.

असे असताना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, कल्याण, आणि शहापूर तालुक्यातील एकाही गावात नेताना गावबंदी केल्याची किंवा तसा ग्रामस्थांनी ठराव केला ची घटना घडली नाही, शहापूर तालुक्यात ६३४ गावे, २२२ महसूल गावे, ११० ग्रामपंचायती, मुरबाड मध्ये २०७ गावे, १२५ ग्रामपंचायती, तर कल्याण तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत ६७ गावे, असून ४६ ग्रामपंचायती तर १२४ महसुली गावाचा समावेश आहे. असे असताना भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भिवंडी व डोंबिवली येथे किरकोळ विरोध झाला, मात्र या तिन्ही तालुक्यात कुठेही गावबंदी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या तालुक्यात शांतता असल्याने सर्व सामान्य नागरिक व पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. याचे श्रेय पोलीस व मराठा समाजाला द्यायला हवे.

Sunday 29 October 2023

महाविजय-२०२४ संकल्प दौऱ्यानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन !!

महाविजय-२०२४ संकल्प दौऱ्यानिमित्त भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन !!

उल्हासनगर , सचिन बुटाला : महाविजय-२०२४ संकल्प दौऱ्यानिमित्त उल्हासनगर येथे भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली. उल्हासनगर टाऊन हॉलमध्ये कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ या तिन्ही विधानसभा क्षेत्रातील पक्ष बुथ वारियर्स थेट संवाद साधून मार्गदर्शन केले.  

यावेळी सेवाकार्याच्या पायावर उभा असलेला भारतीय जनता पक्ष भारतीयांच्या मनामनात वसतो आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात आपला देश नवनवीन शिखरे गाठत आहे. भारताची ही दैदीप्यमान वाटचाल निरंतर सुरू रहावी, ही आपल्या सर्वांची इच्छा आहे. आपल्या भारताला विश्वगुरुपदी विराजमान झाल्याचे बघायचे असेल, तर आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हाच एकमेव पर्याय आहे. आगामी निवडणुकांमध्ये मोदीजींना विजयी झालेले बघायचे असेल. यासाठीच भाजपाचे संघटन आणखी मजबूत कसे करता येईल, कार्यकर्ता म्हणून जास्तीत जास्त योगदान कसे देता येईल हे आपण सर्वांनी बघितले पाहिजे.

यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीत मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा कल्याण पूर्व, अंबरनाथ आणि उल्हासनगरवासियांनी संकल्प केला. यावेळी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपतशेठ गायकवाड, आमदार कुमार आयलानी, माजी आमदार जगन्नाथ पाटील यांच्यासोबत भाजपाचे अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. 



मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी आयुक्तांनी केली मान्य !!

मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी आयुक्तांनी केली मान्य !!

डोंबिवली , सचिन बुटाला‌‌ : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांनी आपले बस्तान मांडले आहेत. यासंदर्भात नागरिकांकडून ठाणे महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनदेखील योग्य प्रतिसाद मिळत नाही. तसेच महानगरपालिकेचे कर्मचारी फेरीवाल्यांकडून हप्तेवसुली करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. मात्र त्यानंतरदेखील दिवा रेल्वे स्थानकाच्या परिसरात फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. तसेच अनधिकृत वाहनांचे पार्किंग रिक्षांची गर्दी यामुळे वाट शोधण्यात दिवेकरांना दमछाक करावी लागत आहे.

त्यामुळे स्थानिक आमदार राजू पाटील यांनी परिसरात सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली आहे. या मागणीला आयुक्तांनीदेखील हिरवा कंदील दिला आहे. स्मार्ट योजनेअंतर्गत सीसीटीव्ही बसवून परिसरावर नजर ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट !!

डोंबिवली शिवसेना मध्यवर्ती शाखेला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट !!


डोंबिवली, सचिन बुटाला : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना डोंबिवली शहर शाखेला सदिच्छा भेट दिली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी त्यांचे स्वागत केले. प्रदेशाध्यक्षांसोबत कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, आमदार गणपतशेठ गायकवाड, संजय केळकर, जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी, कल्याण लोकसभा संयोजक शशिकांत कांबळे, मा. नगरसेवक राहुल दामले, मंदार हळबे, संदीप पुराणिक, इतर मान्यवर मा. नगरसेवक, पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व मान्यवरांचे स्वागत शिवसेना शहर शाखेकडून करण्यात आले. 

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी २०२४ सालात कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे होणार आणि शिंदे लक्षावधी मतांनी पुन्हा निवडून येणार असे सांगून भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २०२४ सालात होणारी कल्याण लोकसभा मतदारसंघात युतीच्या वतीने डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे निवडणूक लढविणार असे आश्वासन उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले यामुळे संपूर्ण शहर शाखेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

बावनकुळे यांच्या हस्ते शहर शाखेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय ! या घोषणांनी शिवसैनिकांनी शहर शाखा दुमदुमवून सोडली. या प्रसंगी शिवसेनेचे उप-जिल्हाप्रमुख राजेश कदम, उपशहर प्रमुख राजेश मुणगेकर, कार्यालय प्रमुख प्रकाश शांताराम माने, शाखाप्रमुख वैभव राणे, ज्येष्ठ शिवसैनिक सुनिल मालणकर, झोपडपट्टी महासंघ प्रमुख हरिश्चंद्र कांबळे, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटनेचे नामदेव भानुसे, पिराजी काकडे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील - प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध, मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील - प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 

डोंबिवली, सचिन बुटाला‌ : आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे सरकार केंद्रात आणण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहे. याअंतर्गत प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघात 2024 संकल्प दौरा आयोजित करण्यात आला होता. याच्या अंतर्गत आज रविवारी चंद्रशेखर बावनकुळे डोंबिवली येथे होते. यावेळी अप्पा दातार चौक येथे आयोजित संवाद कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधताना 527 वर्षे वाट पहात आहोत. किती पिढ्या यात गेल्या. विरोधकांनी आपल्याला सुनावले पण आता तारीख त्यांना पण समजली असेल असे बावनकुळे म्हणाले. यानंतर त्यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांना जवळ बोलवत लोकनेते असा त्यांचा उल्लेख केला तसेच प्रदेशाध्यक्ष यांनी कल्याण डोंबिवली मध्ये भाजप पदाधिकारी यांच्यासोबत शहरातील व्यापारी, व्यावसायिक यांची भेट घेतली. भाजपच्या वतीने यावेळी शक्तिप्रदर्शन देखील करण्यात आले.

यावेळी मराठा समाजातील एका व्यक्तीने एक मराठा लाख मराठा अशी घोषणा दिली असताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच यावर योग्य तो निर्णय देतील. सर्व पक्ष हे मराठा समाजाच्या बाजूने असून शिंदे यांच्या भूमिकेशी आम्ही सर्व सहमत असू असे सांगितले.

यावेळी कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण पूर्वचे आमदार गणपतशेठ गायकवाड, आमदार संजय केळकर, कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी, महिला जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अभिनेत्री कोकण कन्या दिपा परब - चौधरी " कोकण रत्न" या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !!

अभिनेत्री कोकण कन्या  दिपा परब - चौधरी " कोकण रत्न" या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित !!

कोकण रत्न अवॉर्ड प्रदान करताना सामाजिक कार्यकर्त्या गिताली पवार आणि दयानंद कुबल

मुंबई, (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) :

             ज्यांनी इयत्ता ८वी मध्ये असतानाच अभिनयाला सुरुवात केली, २००१ पासून हिंदी व मराठी  सिनेमा आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण केली.अलीकडेच प्रदर्शित झालेला सुपरहिट सिनेमा  'बाईपण भारी देवा' या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारून मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री कोकणची कोकणकन्या सौ.दीपा परब - चौधरी यांना या वर्षीच्या कोकण संस्थेच्या १२ व्या वर्धापन दिनानीमित्त मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय" कोकण रत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ.अमेय देसाई यांनाही राज्यस्तरीय कोकण रत्न या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.दादर, मुंबई येथे आज पार पडलेल्या कार्यक्रमात डिजिटल सोशल चेंज मेकर म्हणजेच टॉप १२ रीलस्टारना रील टू रिअल या पुरस्काराने सौ. दीपा परब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यामध्ये  सई उतेकर, तन्मय पाटेकर, बिनधास्त गर्ल गौरी पवार, रोशन पुजारी, किरण पास्ते, सायली इंदुलकर, साहिल दळवी, प्रथमेश  कदम, अमित  कुबडे, निखिल  सकपाळ, अनमोल  यादव, अंकिता प्रभू वालावलकर यांचा सत्कार करण्यात आला.डॉ अमेय देसाई यांच्या हस्ते शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कार्यरत असणाऱ्या महिलांचा झिरो टू हिरो या पुरस्काराने सन्मान करण्यात आला यामध्ये पुणे मावळ विभागातील ग्रामसेविका सौ. प्रतिभा विठ्ठल कुंभार,तर ठाणे ग्रामीण आणि आदिवासी विभाग शहापूरच्या सौ.तारा सांगळे आणि श्रीमती पूजा कंठे, तर पालघर वाडाच्या सौ. रोशना निलेश पाटील आणि मानसी मनोज पानवे भिवंडी यांचा समावेश होता.
              कोकण संस्था गेली १२ वर्षे शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास, अनाथ मुलांसाठी वसतिगृह आणि महिला सक्षमीकरण यासारख्या विविध क्षेत्रांच्या विकासासाठी काम करत आहे. या कार्यक्रमात संस्थेच्या ग्रामीण भागातील भागधारकांनी मंगळागौर या सांस्कृतिक नृत्य सादर करून लोकांकडून वाहवा मिळवली आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
         अभिनेत्री दीपा परब यांनी सन्मान स्वीकारल्यावर मालवणीतून आपल्या संबोधनाला सुरुवात केली व म्हणाल्या कि माझे वडील असते तर त्यांना आज खूप आनंद झाला असता कारण एका सामाजिक संस्थेने माझा आज गौरव केला आहे. आम्ही कलाकार आहोत आम्हाला कामाचे मानधन मिळते पण गरजूंसाठी अविरत मोफत काम करणाऱ्या कोकण संस्थेचे मला खूप कौतुक वाटते, हे काम कठीण तर आहेच पण   कोकण संस्था समाजासाठी करत असलेले काम खरोखर खूप प्रशंसनीय असून आणि प्रेरणादायी आहे. काशिनाथ धुरू हॉल मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात प्रमुख अतिथी सौ.गीताली पवार, श्रीमती अमृता माने, संदीप सिंग, विशाल महांगरे, संस्था व्यवस्थापक साक्षी पोटे, प्रीती पांगे, सुरज कदम सह शेकडो सांस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन अभिनेते अक्षय ओवळे तर आभार संस्थाध्यक्ष दयानंद कुबल यांनी मांडले.

३ दिवसाच्या धरणे आंदोलनाचा समारोप ! आता ३० ऑक्टोबर चलो मुंबई !!

आयटकतर्फे कंत्राटी नर्सेस यांचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा ! 

*३ दिवसाच्या धरणे आंदोलनाचा समारोप ! आता ३० ऑक्टोबर चलो मुंबई*

जळगाव, प्रतिनिधी.. महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कर्मचारी संघटना कृती समितीतर्फे २५ तारखेपासून महाराष्ट्र राज्यातील कंत्राटी नर्सेस यांचा बेमुदत संप सुरू आहे. या संपात कंत्राटी नर्सेस बरोबर ए एन एम, जी एन एम, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कर्मचारीही सहभागी आहेत या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना सरकारी सेवेमध्ये समायोजन करावे या महत्त्वाच्या मागणीसह इतर मागण्या समान कामाला समान वेतन, नवीन ए एन एम यांना लागू करा, मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना रिक्त पदावर सामावून घ्यावे. एकदाच बदली चे धोरण तयार करावे  मागण्यासाठी महाराष्ट्रभर संप सुरू आहे. म्हणून म्हणून जळगाव येथेही जिल्हा परिषदेसमोर २५ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर काळात आरोग्य खात्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे  तीन दिवस झाले. त्यात प्रामुख्याने कंत्राटी नर्सेस यांचा समावेश होता धरणाच्या शेवटच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे उप आरोग्य अधिकारी डॉ बिराजदार व डॉ मोरे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले व जळगाव महानगरपालिकेवर जिल्हा परिषदेपासून नाहीतर मार्फत धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अमृत महाजन कंत्राटी नर्सेस युनियनच्या अध्यक्ष कॉ‌ पूनम चौधरी उपाध्यक्ष कॉ. मंगला दायमा, मोहिनी वायकोले, भारती पाटील आदींनी केले त्यावेळी जिल्हा परिषदेत तसेच मनपा समोर जोरदार निदर्शने करण्यात आली मनपाचे आयुक्त निर्मला गायकवाड यांना निवेदन सादर केले.
त्यावेळी मोर्चामध्ये सर्व श्रीमती प्रतिभा सरोदे, कविता नवघरे, महेंद्र पाटील, सुशील सरोदे, अलका बेंदे, शारदा चौधरी, ज्योती धनगर, सविता पेंभरे ,पांडे इत्यादी शंभर कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.

ठळक बाबी__

१)त्यावेळी मार्गदर्शन करताना महाजन म्हणाले की, १७ मजली इमारतीवर आयटक तर्फे २५ वर्षात पहिल्यांदाच मोर्चा आणला अशी माहिती दिली.

२) ३० /३१ ऑक्टोबर रोजी मुंबईला मंत्रालयावर महाराष्ट्र व्यापी आंदोलन आयोजित करण्यात येणार आहे, त्यासाठी जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एकूण २९ तारखेला रात्री रेल्वेने शालिमार एक्सप्रेस जायचे आहे, त्यासाठी जळगाव रेल्वे स्टेशनवर जमावे असे आवाहन कॉ. महाजन, पूनम चौधरी यांनी केले आहे

३) कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी युनियन वैद्यकीय अधिकारी युनियन यांनी देखील पाठिंबा जाहीर केला असून ते या प्रति मार्गाने आल्यास सोमवारपासून जाणार आहेत अशी माहिती कंत्राटी नरसी युनियन चे प्रसिद्ध केलेल्या पत्रकार श्रीमती पुनम चौधरी व आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड अमृत महाजन यांनी दिली आहे.

आंगवलीचा युवक अमृत कलश घेऊन नवी दिल्लीला रवाना !!

आंगवलीचा युवक अमृत कलश घेऊन नवी दिल्लीला रवाना !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                  मेरी माती मेरा देश अभियाना अंतर्गत अमृत कलश संकलन समारोप कार्यक्रम आणि अमृत वाटिका उपक्रम नवी दिल्ली येथे दि.३१ ऑक्टोबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.या ऐतहासिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातून अनेक युवक,स्वयंसेवक, पदाधिकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत.मेरी माटी मेरा देश अंतर्गत जमविलेल्या मातीचा कलश घेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुकाध्यक्ष श्री. रुपेशजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आंगवली गावचे सुपूत्र, युवा मोर्चा दक्षिण तालुका सरचिटणीस किशोर दत्ताराम करंबळे व त्यांचे सहकारी संगमेश्वर तालुका मधील युवा मोर्चाची टीम दिल्लीकडे कार्यक्रमासाठी रवाना झाली.ते "अमृत कलश" नवी दिल्ली येथे संकलित करणार आहेत.तसेच या संपूर्ण सोहळ्याची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्ड मध्ये नोंद केली जाणार आहे. आंगवली गावचे सुपुत्र या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत.

              देशाच्या सेवेस हातभार लावणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील युवा मोर्चा अध्यक्ष प्रथमेश धामनस्कर आणि त्यांची टीमचे आंगवली भाजपा नेतृत्व,भाजपा उपाध्यक्ष संगमेश्वरचे श्री.विजय गुरव व ओबीसी मोर्चा चे तालुकाध्यक्ष अमित रेवाळे यांनी अभिनंदन केले.

43 खोल्यांचे असेसमेंट अजून बाकी. 14 खोल्या अनाधिकृत, न्यायदेवता स्टे कशी देणार?

43 खोल्यांचे असेसमेंट अजून बाकी. 14 खोल्या अनाधिकृत,  न्यायदेवता स्टे कशी देणार? 

(पॅन्थर डॉ. राजन माकणीकर यांचा सवाल)

मुंबई दि (प्रतिनिधी) : आधीच्या 43 खोल्यांचे असेसमेंट अद्यापही भरणे शिल्लकच असून आताच्या 14 खोल्यांच्या अनधिकृत बांधकामाला न्यायदेवता स्टे देईल कशी? असा प्रश्न विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी उपस्थित केला आहे.

पवई टुरिस्ट हॉटेल अनधिकृत बांधकाम प्रकरणी बृहन्मुंबई च्या एस विभागाकडून हॉटेल मालक के. अशोक राय यांना नोटीस काढल्यानंतर मालक राय याने न्यायलाया कडे स्टे मिळवण्यासाठी करिता धाव घेतली आहे.

याच हॉटेल मध्ये आधीच्या 43 खोल्या आहेत त्याचे असेसमेंट अजूनही पूर्ण भरले नाही. पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून अपूर्ण असेसमेंट भरले असून कामात कुचराई करून शासनाच्या असेसमेंट मध्ये चोरी करणाऱ्या तत्कालीन अधिकारी व राय यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी डॉ. राजन माकणीकर यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या मुंबई महानगरात अशोक राय याचे अनधिकृत बांधकामाचे जमिनी बल्कवण्याचे, सरकारचा असेसमेंट चोरी करण्याचे, चुकीचा धंदा लपवण्याचे व चादर पलटी हॉटेल उभारून त्यात नाबालिक मुलामुलींना शारीरिक संबंध जोडण्यासाठी हॉटेलची खोली देण्याचे काम बहुतांश प्रमाणात आहेत.

लवकरच पूर्ण कागदपत्र व इव्हिडन्स सह पत्रकार परिषद घेत आहे, के अशोक राय याला नागड करून जेलमध्ये पाठवणार आहे. असंख्य मानहानीचे दावे माझ्यावर असून एकही दावा अजून सिद्ध झाला नाही शिवाय ज्याला मानच त्यांची हानी कसली? असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधान पक्षाचे राष्ट्रीय मुख्य सचिव डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

Saturday 28 October 2023

श्रीमती मनिषा रासम "नवरत्न सन्मान पुरस्कार"-२०२३ ने सन्मानित !!

श्रीमती मनिषा रासम "नवरत्न सन्मान पुरस्कार"-२०२३ ने सन्मानित !!

मुंबई, (शांताराम गुडेकर/मोहन कदम) :

        नवरात्रीचे औचित्य साधून व्हिजन फाऊंडेशन द्वारा स्त्री कर्तुत्वाला मानाचा मुजरा करून विविध क्षेत्रातील नऊ मान्यवर स्त्री व्यक्तिमत्त्वांचा नवरत्न सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रातील मान्यवर स्त्रियांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन जर्मनी, सिंगापूर, सौदी, बहरीन एवं भारत देशातील संस्था सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली अफगाणिस्थान देशाच्या महामहीम श्रीमती झकिया वर्डक, श्रीमती कल्पना देसाई, दादासाहेब फाळके वंशज श्रीमती मृदुला पुसाळकर, गृह मंत्रालय सेनी श्रीमती सुधा शेट्टी, श्रीमती कविता कुमार, आदिवासी सेविका श्रीमती ललिता मूंनुस्वामी यांसमवेत कोविड काळात अखंड आहारदान करणाऱ्या श्रीमती मनिषा रासम (साई परिवार सेवाभावी ट्रस्ट कांदिवली) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सदर सन्मान हा कोणतेही आवाहन निवेदन पश्चात न देता, प्रसिध्दी पासून दूर राहत समाजात आपले भरीव योगदान देणाऱ्या स्त्रियांना निवडून देण्यातआला. या नवरत्न समाजास दिशादर्शक आहेत असे प्रतिपादन फाऊंडेशन अध्यक्ष स्वप्नील राणी नंदकुमार यांनी याप्रसंगी केले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी घेतला आढावा‌ !!

भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा भाजपा प्रदेशाध्यक्ष यांनी घेतला आढावा‌ !!


कल्याण, प्रतिनिधी : महायुतीत कोणाकडे किती जागा असतील, कोण किती जागा लढवतील, याबाबतचा निर्णय राज्यातील नेते आणि केंद्रीय पार्लमेंट बोर्ड ठरवेल. राज्यातील ४५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा मानस आहे, त्यामुळे लोकसभेत महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी भाजपची असेल, असे सांगून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी कल्याण पश्चिम येथे महायुतीच्या निवडणूक स्ट्रॅटेजीबद्दल भाष्य केले.

चंद्रशेखर बावनकुळे भिवंडी लोकसभा दौऱ्यावर आहेत. त्यांनी कल्याण, शहापूर आणि मुरबाड विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. कल्याण पश्चिमेला पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.कल्याण पश्चिम येथे घर चलो अभियान, पदाधिकारी-सुपर वॉरिअर्सशी संवाद साधला. राज्यातील प्रत्येक खासदाराने ५१ टक्के मतं घेऊन निवडून यावे, यासाठी जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे. पत्रकारांशी बोलताना बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

यावेळी केंद्रीय पंचायती राज मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, मा. आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हाध्यक्ष नरेंद्र (नाना) सुर्यवंशी, कल्याण पश्चिम शहर प्रमुख वरुण पाटील, महिला शहर प्रमुख वैशाली ताई पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते, उपस्थित होते.



महाविजय - २०२४ अभियानासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २८/२९ ऑक्टोबर रोजी कल्याण दौऱ्यावर !!

महाविजय - २०२४ अभियानासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २८/२९ ऑक्टोबर रोजी कल्याण दौऱ्यावर !!

*कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांची माहिती*

कल्याण , सचिन बुटाला : महाविजय २०२४ अभियान साठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे २८/२९ ऑक्टोबर या दोन दिवसीय कल्याण जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचे स्वागत केले जाणार आहे.

त्याचप्रमाणे त्यांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात विविध बैठका, सभा, भेटीगाठी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात सविस्तर ___

दिनांक २८ ऑक्टोबर रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघात कल्याण पश्चिम, मुरबाड, शहापूर विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची संघटनात्मक बैठक तसेच त्या नंतर अहिल्याबाई चौक ते टिळक चौक या दरम्यान नागरिकांसोबत घर चलो अभियान असा कार्यक्रम आयोजित केला आहे.

प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दुसऱ्या दिवशी दिनांक २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९.०० वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत कल्याण लोकसभा मतदारसंघातील डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा, कल्याण पूर्व, उल्हासनगर, अंबरनाथ या सहाही विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून डोंबिवली मध्ये फडके रोड परिसरात नागरिकांसोबत घर चलो अभियान तर उल्हासनगर येथे देखील नागरिकांसोबत घर चलो अभियान असा कार्यक्रम आयोजित केला आहे, रात्री ९.०० वाजता कोअर कमिटीची बैठक होणार यानंतर या दोऱ्याची सांगता होईल.

यावेळी मा. कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, शशिकांत कांबळे, व पदाधिकारी उपस्थित होते.



कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघ आयोजित कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा-२०२३ !!

कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघ आयोजित कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा-२०२३ !!

 *कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांच्या उपस्थितीत झाली सुरुवात* 
 

कल्याण , प्रतिनिधी : पुण्यातील महाराष्ट्र कुस्तीगीर संघातर्फे कल्याणात आयोजित महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचणी स्पर्धेचे शुक्रवार दि.२७ ऑक्टोबर २०२३ रोजी *आमदार श्री.विश्वनाथ भोईर साहेब* यांच्या प्रमुख उपस्थितीत *उद्घाटन* करण्यात आले. 

कल्याण पश्चिमेतील वायले नगर परिसरातील रिटा मेमोरियल शाळेत या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कुस्तीगीर क्षेत्रात महाराष्ट्र केसरी किताब स्पर्धा अतिशय मानाची समजली जाते. या स्पर्धेमध्ये कल्याण डोंबिवली जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी या चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याला आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरुवात झाली. 

यावेळी कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघाचे आयोजन मोरेश्वर भोईर यांच्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील अनेक कुस्ती मार्गदर्शक आणि वस्ताद मंडळी उपस्थित होती. विशेष म्हणजे आमदार विश्वनाथ भोईर साहेब हे स्वतः एक कुस्तीप्रेमी असून आपल्या उमेदीच्या काळात त्यांनीही कुस्तीच्या अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. याप्रसंगी आयोजक मोरेश्वर भोईर, मा.सरपंच नवनाथ चौधरी, राजेश भगत, श्याम कारभारी, श्रीपत भोईर व इतर कुस्तीगीर प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने  रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत !! मुंबई, (शांताराम गुडेकर) :  ...