Monday 30 October 2023

कल्याण, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यातील एकाही गावात नेत्यांना गावबंदी नाही ?

कल्याण, मुरबाड, शहापूर आदी तालुक्यातील एकाही गावात नेत्यांना गावबंदी नाही ?

कल्याण, (संजय कांबळे) : मराठा आरक्षणावरुन मराठा समाज संपूर्ण राज्यभरात आक्रमक झाला असताना, शिवाय त्यांनी राज्यात ठिकठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी केली असताना ठाणे जिल्ह्यातील कल्याण, शहापूर,आणि मुरबाड तालुक्यात मात्र एकाही गावात नेत्यांना गावबंदी झाली नसल्याचे पोलिसांन कडून समजते, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे, तर पोलिसांनी मात्र याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे म्हणून मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे, शिंदे सरकारला वेळ देऊनही मराठ्याना आरक्षण न दिल्याने जरांगे पाटील संतापले आहेत, आणि त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आजचा उपोषणाचा ६ वा दिवस आहे त्यांनी पाणी देखील सोडल्याने त्यांची प्रकृती खालावली आहे, तरी देखील सरकारने आरक्षण न दिल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. 

जरांगे च्या आवाहनानुसार राज्यभर सर्व पक्षीय नेत्यांना गावबंदी जाहीर केली आहे. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली. भाजपाचे आमदार प्रशांत बंब यांच्या कार्यालयाची तोडफोड केली, माजलगाव नगर परिषदेला आग लावली, अनेक शासकीय अधिकां-यांच्या गाड्या फोडल्या, कार्यालयात कोंडले, बँनर फाडले, काळे फासले, अशा विविध घटनांनी महाराष्ट्र अशांत झाला आहे, संपूर्ण राज्यातून जरांगे पाटील यांना पाठिंबा मिळत आहे.

असे असताना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, कल्याण, आणि शहापूर तालुक्यातील एकाही गावात नेताना गावबंदी केल्याची किंवा तसा ग्रामस्थांनी ठराव केला ची घटना घडली नाही, शहापूर तालुक्यात ६३४ गावे, २२२ महसूल गावे, ११० ग्रामपंचायती, मुरबाड मध्ये २०७ गावे, १२५ ग्रामपंचायती, तर कल्याण तालुका पोलीस ठाण्या अंतर्गत ६७ गावे, असून ४६ ग्रामपंचायती तर १२४ महसुली गावाचा समावेश आहे. असे असताना भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना भिवंडी व डोंबिवली येथे किरकोळ विरोध झाला, मात्र या तिन्ही तालुक्यात कुठेही गावबंदी झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच या तालुक्यात शांतता असल्याने सर्व सामान्य नागरिक व पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. याचे श्रेय पोलीस व मराठा समाजाला द्यायला हवे.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...