Monday 28 February 2022

ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे गाळेगाव येथील पथदिवे बंद !! "१२ दिवसापासून पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त"

ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे गाळेगाव येथील पथदिवे बंद !!

"१२ दिवसापासून पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त"


मोहोने, संदीप शेंडगे : ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे वार्ड क्र.१२ येथील पंचशील नगर, लालबहादूर शास्त्री नगर, अष्टगंध कॉम्प्लेक्स, रामजी नगर, विद्या नगर सोसायटी येथील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या बारा ते पंधरा दिवसांपासून येथील नागरिक रात्रीच्या वेळी रस्त्यावर उजेड नसल्याने अंधारातून ये- जा करत आहेत.

शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या आमदार निधीतून पंचशील नगर पिठाची गिरणी रोड येथे 13.5 लक्ष निधी खर्च करून सिमेंट कॉंक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे परंतु ठेकेदाराने नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना न देता उद्घाटन झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी जेसीबीच्या साह्याने खोदकाम सुरू केले या खोदकाम मध्ये अनेकांचे पिण्याचे पाण्याचे नळ सुद्धा बाधित झाले अनेकांचा पाणीपुरवठा खंडित झाला तसेच पथदिवे यांना होणारा विद्युत पुरवठा अंडरग्राउंड असल्याने तोही बादल झाला ठेकेदाराने कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता कोणत्याही प्रकारची काळजी न घेता विद्युत पुरवठा खंडित करून नागरिकांना प्रचंड मनस्ताप दिला आहे या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. 

नुकत्याच शाळा कॉलेज महाविद्यालय सुरू झाले असून महाविद्यालयीन विद्यार्थिनी ट्युशन क्लासला जात आहेत त्यातच रात्रीच्या वेळी हे पथदिवे बंद असल्याने विद्यार्थिनींना अंधारातून जावे लागत आहे पथदिवे बंद असल्याने अनेक पालकांना आपल्या मुलांना ट्युशन, क्लासला सोडविण्यासाठी काम धंदे बंद करून जावे लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यावरील टवाळखोर पोरांकडून मुलींची छेडछाड होण्याची शक्यता असल्याने येथील पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी येथील महिलांनी केली आहे. पथदिवे बंद असल्याबाबत अ प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांना विचारले असता सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू असल्याने काही विभागातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे ठेकेदाराकडून विद्युत पुरवठा सुरळीत करून घेण्याचे काम सुरू आहे लवकरच विद्युत पुरवठा सुरळीत करून देण्यात येईल असे सुहास गुप्ते यांनी सांगितले आहे.

असे असले तरी गेल्या बारा दिवसापासून अंधारात असलेल्या विभागातील विद्युत पुरवठा कधी सुरळीत होतो ठेकेदारावर काय कारवाई होते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे

कल्याणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला !! "भाजपचे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांसह भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव"

कल्याणमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला !! "भाजपचे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांसह भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव"कल्याण, बातमीदार दि. २८ : कल्याणमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. भाजपाचे जुने कार्यकर्ते, सोशल मीडियाचे प्रभारी मनोज कटके यांच्यावर त्यांच्या दुकानात घुसून जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी ही घटना घडली. यामुळे भाजपाच्या गोटात संतापाचं वातवरण असून शहरातसुद्धा काहीसा तणाव आहे.

जखमी कटके यांच्यावर पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत असल्याची माहिती कल्याण पोलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली.

कटके यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली. त्यानंतर जमिनीवर पाडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा कैद झाली आहे. कटके यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी जमली आहे. या घटनेचा तपास आज लागला पाहिजे, नाहीतर काय करायचं ते ठरवू अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.

भाजपचे डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी कटके यांची चौकशी डॉक्टरांकडे केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी आमदारांना दिली आहे.

आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनच्या माध्यमातून हर्षल पावरा यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली !!

आरोग्यम् धनसंपदा फाऊंडेशनच्या माध्यमातून हर्षल पावरा यांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली !!

"नाव : हर्षल भगतसिंग पावरा  राहणार : राजबर्डी. ता.धडगाव जि.नंदुरबार"


कल्याण, बातमीदार : हर्सल याची अचानकपणे तब्बेत खराब झाली. त्याने जवळच्या एका प्राथमिक रुग्णालय मध्ये जाऊन तपासणी केली. त्याला स्वास घ्यायला पण त्रास होत होता. त्याने प्राथमिक उपचार घेतले पण त्याने त्याला काही फरक पडत नव्हता. कारण त्याचे नाकाचे हाड वाढलेले होते आणि आतून खराब झाले होते. डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन करायचा सल्ला दिला. आणि त्या ऑपरेशनचा खर्च एक लाखाच्या आसपास येणार होता. हर्षल पावरा हे एका आदिवासी भागामधले रहिवाशी असल्याकारणाने तेवढा पैसा नसल्याकरणाने त्याला करावे सुचत नाही होते. हर्सल पावरा याला त्याचे नातेवाईक यांनी नवापूर येथील आरोग्य दूत हेल्थ केअरचे श्री विश्वनाथ पाटील यांच्या संपर्क केला. विश्वनाथ पाटील यांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क करा असे त्यांनी सांगितले. 


श्री जितेंद्र पाटील यांनी हर्षल पावरा यांचे रिपोर्ट सर्वे व्हाट्सअप द्वारे मागून घेतले. आणि त्यांना मुंबईला येण्याचा सल्ला दिला. आणि त्यांना सांगण्यात आले की मुंबईमध्ये तुम्हाला कुठलाही खर्च लागणार नाही सर्व ऑपरेशन मोफत मध्ये होणार. हर्षल पावरा हा दुसर्‍या दिवशी मुंबई येथे आला आणि एका मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमध्ये श्री जितेंद्र पाटील यांनी त्याला ॲडमिट करून दिले. हॉस्पिटल मध्ये कुठेही खर्च न घेता त्याचे सर्वे ऑपरेशन औषधी सर्व मोफत मध्ये करण्यात आले. हर्षल पावरा याला ७ ते ८ दिवस हॉस्पिटल मध्ये ठेऊन त्याला डिस्चार्ज करण्यात आले. हर्षल पावरा यांनी आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील व विश्वनाथ पाटील यांचे खूप खूप आभार मानले..

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे ई-श्रम कार्ड शिबीर संपन्न !!

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे  ई-श्रम कार्ड शिबीर संपन्न !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

             सरकारच्या योजनांचा फायदा थेट असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून ई-श्रम कार्ड ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशात या क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे. यात स्थलांतरीत होणाऱ्या  कामगारांचा मोठा समावेश आहे. 


अशा कामगारांना केंद्र सरकारकडून काही सुविधा देण्यात येत आहे. तसेच भविष्यात देखील काही सेवा देण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी अशा कामगारांचा डेटाबेस तयार करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. याचा फायदा सर्व सामान्यांना मिळावा या हेतूने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (रजि.) शाखा विक्रोळी -घाटकोपर तर्फे दि. २७ फेब्रुवारी २०२२ रोजी संत तुकाराम बालवाडी, डगलाईन, राम नगर अ, घाटकोपर पश्चिम येथे ई-श्रम कार्ड शिबीर पार पडले. 


या शिबीरचा ८० लोकांनी लाभ घेतला. महिला अध्यक्षा सौ. अश्वीनी आत्माराम बाईत यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर संपन्न झाले. शिबीर यशस्वी करण्यासाठी सौ. शितल मांडवकर, सौ. शुभांगी  घाग, सौ. अंजली थोरे, सौ. सुप्रिया जाधव, सौ. संजना कोळंबे, श्रीमती अक्षता जागडे, कुमारी रिंकल नरेश येलमकर, कुमारी श्रद्धा अजित आंग्रे, कार्यालय प्रमुख अनंत खामकर आणि सर्व विद्यमान शाखा पदाधिकारी, सदस्य व सभासद, आजी - माजी पदाधिकारी, सदस्य, सभासद आणि महिला मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद तसेच युवक मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद, विवाह मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद तसेच हितचिंतक यांनी विशेष मोलाचे सहकार्य केले. 


सरकार दरवर्षी अर्थसंकल्पात गरींबासाठी योजनांची घोषणा करत असते. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने ई-श्रम कार्डची घोषणा केली होती. हे कार्ड बनविण्याची प्रत्यक्षात सुरूवात २६ ऑगस्ट २०२१ मध्ये झाली. यासाठी सरकारकडून व्यापक मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी या योजनेची सुरूवात सरकारकडून करण्यात आली. या कार्डाच्या माध्यमातून कामगार सरकारी योजनांचा लाभ घेवू शकतात. या सध्या सुरू असणाऱ्या आणि भविष्यातील योजनांचा यात समावेश असेल. पोर्टलवर नांदेणी केल्यानंतर बारा अंकाचा एक युनिक नंबर देण्यात येतो. नोंदणी केलेल्यांना दोन लाखाच्या अपघात विम्याची सोय सरकारकडून करण्यात येते.


ज्येष्ठ छायाचित्रकार विभव बिरवटकर यांना ठाणे गौरव पुरस्कार !!

ज्येष्ठ छायाचित्रकार विभव बिरवटकर यांना ठाणे गौरव पुरस्कार !!


ठाणे, ऋषिकेश चौधरी : दैनिक वृत्तपत्राचे ज्येष्ठ छायाचित्रकार विभव एकनाथ बिरवटकर यांना सोमवारी ठाणे गौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 ठाणे महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी वर्धापनदिनानिमित्त ठाणे शहरातील नामवंत व्यक्तींचा ठाणे गौरव, ठाणे गुनिजन, ठाणे भूषण, आधी पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षीही हे पुरस्कार देऊन ठाणे शहरातील मान्यवरांच्या सन्मान करण्यात आला. या पुरस्कारांमध्ये ठाणे गौरव पुरस्काराने छायाचित्रकार विभव बिरवटकर यांना सन्मानित करण्यात आले. ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे पार पडलेल्या सोहळ्यात ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के ठाण्याचे खासदार राजन विचारे आमदार रवींद्र फाटक, ठामपा सभागृह नेते अशोक वैती आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

वाढदिवस हे केवळ निमित्त, सामाजिक कार्य करणे हा उद्देश- महेश देशमुख !!

वाढदिवस हे केवळ निमित्त, सामाजिक कार्य करणे हा उद्देश- महेश देशमुख !!


कल्याण(संजय कांबळे)मला सामाजिक कार्य, जनहितार्थ सेवा, लोककल्याणकारी योजना सर्व सामान्य लोकांसाठी राबविण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नाही, त्यामुळे आजचा माझा वाढदिवस केवळ निमित्त आहे, गोरगरीबांची कामे व्हावी हा मुळ उद्देश आहे, असे मत म्हारळ गावातील सामाजिक कार्यकर्ते महेश देशमुख यांनी नागरिकांनी आयोजित केलेल्या वाढदिवसाच्या सोहळ्यात व्यक्त केले.


अगदी लहानपणा पासूनच गरिबीची झळ पोचल्याने गरिबी काय असते हे महेश देशमुख यांनी अनुभवलं होत. आपल्या लहान भावंडांना सांभाळत असताना आजुबाजूची सर्व भावंडं हि आपलीच आहेत ह्या भावनेने ते सर्वाना देखील तितक्याच प्रेमाने सांभाळत होता.


जसा जसा मोठा होत गेला तशी तशी त्याला समज येत गेली, घरामध्ये गरिबी असल्यामुळे अतिशय कमी वयामध्ये घरातली जबादारी त्याला घ्यावी लागली, कदाचित आपलं कोण हे लहानपणीच त्याला कळालं असावं.


उच्चशिक्षण घेऊन म्हारळ मध्ये त्याने प्रथम क्लासेसची सुरवात केली. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना टाईपिंग क्लास करीता पायपीट करून कल्याण येथे जावे लागते असे निदर्शनास येताच त्याने त्या क्लास ची सोय देखील गावामध्ये करून दिली. सोबतच प्रिंटिंगचा जोड धंदा चालू केला असं एकही क्षेत्र नाही की ते याला माहीत नाही कारण परिस्थिती नुसार पडेल ते काम करणं हे त्याच्या स्वभावातच होते.


त्या मध्ये कुणाचं शाळेचं अँडमिशन असो, कुणाला नोकरी लावणे, कुणाला सर्टिफिकेट लागो नाही तर रेशनकार्ड लागो त्याच्या शिवाय कुणाचंही काम होत नव्हतं, पोलीस स्टेशन चा काही विषय असल्यास किंवा दवाखान्याचा काही काम असेल तर तो धावून येणारा तसेच सरकारी अधिकाऱ्यांना वाचा फोडणारा व ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांच्या समस्या मांडणारा, हा महेशच होता.


जिल्हा परिषद शाळा असो की गावातील  समस्या लढणारा फक्त हाच.


म्हारळ वासियांना धुळ आणि खराब रस्त्यास सामोरे जात असताना अतिशय स्वच्छ भावनेने रस्त्याचे काम त्वरित चालू व्हावे या करीता प्रशासनाच्या विरुद्ध गावात प्रथम उपोषणाला देखील हाच बसला होता आणि आपल्या ह्या गांधीगिरीने शासनाला त्याचं म्हणणं मान्य करावंच  लागलं.

महेश देशमुख हे जेव्हा प्रसिद्धीच्या झोतात आले, जेव्हा त्यांनी म्हारळ ग्रामपंचायत मधील करोंडोचा मुद्रांक घोटाळा उघडकीस आणला, यामुळे अनेकांना जेलवारी करावी लागली होती.

समाजसेवा म्हंटल तर विरोध प्रतिविरोध आलंच, काहींनी तर त्याला बदनाम करण्याचा विडाच उचलला पण त्यांना देखील तो पुरून उरला.

समाजसेवा काय हे त्याच्या कडुनच शिकावं.

समाज सेवक म्हणजे काय? तर जो जनहितासाठी आपली वेळ, संसार न बघता गरिब दिनदुबळ्यांच्या सेवेसाठी कायम हजर राहतो तो समाज सेवक ! आपल्या शिवशंभू मराठा प्रतिष्ठान म्हारळ यांना. प्रतिष्ठान मध्ये कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता अतिशय प्रामाणिक पणे काम केलं आणि प्रतिष्ठान ला उच्च शिखरावर पोचवलं ते महेश यानीच ! 

त्यामुळे त्यांचा वाढदिवस म्हणजे परिसरातील लोकासाठी एक उत्सवचं? म्हणून की काय, आजच्या दिवशी देखील  ई श्रम कार्ड, हेल्थ कार्ड, युनीव्हर्सल पास, आरोग्य शिबीर, आदी लोकोपयोगी कामे हाती घेतली, त्यांच्या या कामांचे कौतुक करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा, आशीर्वाद देण्यासाठी भाजपाचे जेष्ठ नेते व  माजी नगराध्यक्ष गुलाबराव कंरजुले, म्हारळ ग्रामपंचायतीचे माझी सरपंच प्रमोद देशमुख, सदस्य योगेश देशमुख, लक्ष्मण कोंगिरे, केतन देशमुख, विकास पवार, यांच्या सह गावातील अनेक मंडळे व पदाधिकारी, बचतगटाच्या महिला, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे वासिंद येथील कार्यालयाचे उद्घाटन संपन्न !!

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे वासिंद येथील कार्यालयाचे उद्घाटन संपन्न !!


कल्याण, बातमीदार : मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया वासिंद शहराच्या वतीने नवनिर्वाचित वासिंद शहर अध्यक्ष राहूल दोंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, कार्याध्यक्ष अनिलजी धनगर, संघटक शाम शेवाळे, तालुकाध्यक्ष जयवंत थोरात, प्रा.दिपक वाघ सर, जोसेफ डीसुझा, उद्योजक तथा सह सचिव नितिन गीरी, पंस सदस्या संजिवनी कोचूरे ,तालुका सचिव बबन गायकवाड यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.


त्याच बरोबर स्थानिक कोळी, आगरी, मुस्लिम बहूजन समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पक्ष प्रवेश देण्यात आला तसेच काहींना तालूक्याच्या वतीने पदनियुक्त करण्यात आले कार्यक्रमाचे उत्तम आयोजन वासिंद विभागीय अध्यक्ष नरेंद्र कोचूरे, तालुका उपाध्यक्ष सचिन जाधव, सचिन घेगडे, सचिन रोकडे, राहूल दिवेकर, मोहम्मद वसईकर यांनी केले होते कार्यक्रमास आसनगाव विभाग अध्यक्ष मंगेश भडांगे, योगेश संगारे, सयाजी गायकवाड उपस्थित होते यावेळी सुत्रसंचालन अभिनेते सुनिल जगताप यांनी केले..

महाशिवरात्री उद्या 6 राजयोगात शिवरात्री साजरी होणार, 24 तासात पूजेचे 7 मुहूर्त; शिवपूजेच्या 5 सोप्या स्टेप्स, मंत्र आणि आरती एका तासापूर्वी !!

महाशिवरात्री उद्या 6 राजयोगात शिवरात्री साजरी होणार, 24 तासात पूजेचे 7 मुहूर्त; शिवपूजेच्या 5 सोप्या स्टेप्स, मंत्र आणि आरती एका तासापूर्वी !!


भिवंडी, दिं,28, अरुण पाटील (कोपर) :
              उद्या शिव पूजेचा महापर्व म्हणजे शिवरात्री आहे. पंचांगानुसार हा दिवस माघ मासातील कृष्णपक्षातील चतुर्दशीचा असतो. जो यावेळी 1 मार्चला आहे. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीला शिंवलिंगापासुन सृष्टी सुरु झाली. या दिवशी सर्वात पहिले ब्रह्मदेव आणि श्रीविष्णुंनी शिवलिंगाची पूजा केली होती. तेव्हापासून प्रत्येक युगात या तिथीला महादेवाची पूजा आणि व्रत-उपवास करण्याची प्रथा चालत आलेली आहे. या दिवशी दिवसभर तर शिव पूजा होतेच परंतु ग्रंथांमध्ये रात्री पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. मान्यतेनुसार या दिवशीच शिव-पार्वतीचे लग्न झाले होते.
              स्कंद आणि शिवपुराणानुसार, शिवरात्रीच्या चार प्रहरांमध्ये महादेवाची पूजा करावी. कारण या तिथीला भगवान शिव लिंगाच्या रूपात रात्रीच प्रकट झाले होते, म्हणून शिवरात्रीच्या चारही प्रहारांमध्ये पूजा केल्याने कळत-नकळत झालेले पाप आणि दोष नाहीसे होतात. अकाली मृत्यू होत नाही आणि वयही वाढते.

पहिला प्रहर - संध्याकाळी 6:25 पासून रात्री 9:31 पर्यंत.
 ----------------------
दुसरा प्रहर - रात्री 9:31 पासून 12:37 पर्यंत
तिसरा प्रहर - 12:37 पासून 3:43 पर्यंत
चौथा प्रहर - 3:43 पासून सकाळी 6:49 पर्यंत
            ----------------------
दुर्लभ ग्रहस्थिती आणि पाच राजयोग :-

पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, महाशिवरात्रीला शिवयोग तयार होत आहे. त्याचबरोबर शंख, पर्वत, आनंद, दीर्घायुष्य आणि भाग्य नावाचे राजयोग तयार होत आहेत. या दिवशी चंद्र, मंगळ, बुध, शुक्र आणि शनि मकर राशीत राहतील. जेव्हा हे ग्रह एका राशीत असतात तेव्हा पंचग्रही योग तयार होतो.त्याच वेळी, या महापर्वात कुंभ राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग असणे देखील शुभ असेल. गुरु हा धर्मकर्माचा ग्रह आहे आणि सूर्य हा आत्मा कारक आहे. या दोन ग्रहांच्या संयोगाने शिव उपासनेचे शुभफळ आणखी वाढतील. शिवरात्रीला ग्रह-ताऱ्यांची अशी स्थिती गेल्या अनेक वर्षांत निर्माण झालेली नाही.

पूजन सामग्री.
-----------------
गंगाजल, शुद्ध पाणी, दूध (अभिषेकासाठी), चंदन, पंचामृत (दूध, दही, मध, साखर, तूप) बेलाची पाने, फुले, रुद्राक्ष, दिवा, उदबत्ती

पूजेचे मंत्र.
-------------
1. ॐ नम: शिवाय
2. ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्द्धनम्।
ऊर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षिय मामृतात्।। ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ
----------------------------+
पाच सोप्या स्टेप्समध्ये शिवरात्री पूजन विधी.
------------------------------
(१) दिवा आणि उदबत्ती लावून श्री गणेश पूजन केल्यानंतर शिव पूजा सुरु करावी.
(२) शिवलिंगाला अभिषेक करत गंगाजल, दूध, पंचामृत आणि शुद्ध पाणी अर्पण करावे.
(३) महादेवाला चंदन, भस्म, अत्तर लावावे.
(४) बेलाची पाने, धोतऱ्याचे फुल अर्पण करावे.
(५) धूप-दीप लावून नैवेद्य दाखवून आरती करावी.

व्रत कसे करावे.
-------------------
शिवरात्रीला सूर्योदयापूर्वी उठून पाण्यात गंगाजल आणि काळे तीळ मिसळून स्नान करावे. यानंतर दिवसभर उपवास करून महादेवाची पूजा करावी. व्रत उपवास दरम्यान अन्न खाऊ नये. दिवसभर पाणी देखील पिऊ नये असाही पुराणात उल्लेख आहे. तज्ज्ञांनुसार जर तुम्ही एवढा कठीण उपवास करू शकत नसाल तर फळे, दूध आणि पाणी पिऊ शकता. या व्रतामध्ये सकाळी-संध्याकाळी स्नान करून शिव मंदिरात दर्शनासाठी जावे.

महादेवाची आरती.
-----------------------
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

मौजे तिवरे गंगेचीवाडी विकास मंडळ पुणे, मौजे तिवरे गंगेचीवाडी भगिनी महिला मंडळ पुणेतर्फे सन -२०२२ कौटुंबिक मेळावा, हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ संपन्न !!

मौजे तिवरे गंगेचीवाडी विकास मंडळ पुणे, मौजे तिवरे गंगेचीवाडी भगिनी महिला मंडळ पुणेतर्फे सन -२०२२ कौटुंबिक मेळावा, हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ संपन्न !!


मुंबई, (शांताराम गुडेकर/दिपक फणसळकर) :

          मौजे तिवरे गंगेचीवाडी विकास मंडळ पुणे,मौजे तिवरे गंगेचीवाडी भगिनी महिला मंडळ पुणेतर्फे सन -२०२२ कौटुंबिक मेळावा, हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ ५० व्या सुवर्ण महोत्सव वर्षाचे औवचित्त साधुन कार्यक्रमाचे नियोजन वाडीचे अध्यक्ष रविंद्र कदम पदाधिकारी व सभासद वाडीचे सदस्य भगिनी महिला मंडळ, पदाधिकारी आणि सदस्य सर्व मिळून करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मंडळाचे सल्लागार लक्ष्मण पवार यांनी भूषवले. आमदार शेखरजी निकम, शिवसेना शहरप्रमुख गजानन थरकुडे, नगरसेवक आनंद रिठे, नगरसेविका रुपाली धाडवे तिवरे ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र पाचांगणे सामाजिक कार्यकर्ते सुरज लोखंडे, राजु कदम, दिपक कदम, मुकेश पोटे, दै. झुंजार केसरीचे पुणे शहर विशेष प्रतिनिधी दिपक फणसळकर, रामचंद्र घडशी आणि कुणबी समाजातील इतर मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनंत रांगणे यांनी केले. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Sunday 27 February 2022

"आगरी युथ फोरम" संचलीत "श्रीसंत सावळाराम महाराज" म्हात्रे स्मारक समिती ; "श्रीसंत सावळाराम महाराजां"चे स्मारक होणार ——खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे

"आगरी युथ फोरम" संचलीत "श्रीसंत सावळाराम महाराज" म्हात्रे स्मारक समिती ; "श्रीसंत सावळाराम महाराजां"चे स्मारक होणार   ——खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे


कल्याण, ऋषिकेश चौधरी : "संत सावळाराम महाराज" एक थोर विभूती होते त्यांचे नावाचे स्मारक आणि अध्यात्मपिठ कल्याण डोंबिवलीमधे उभारण्याची संधी मला माझ्या कारकिर्दित मिळत आहे हे मी माझे भाग्य समजतो. किर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ज्यांनी समाजामधे वैचारीक क्रांती घडवून आणली त्या आदरणीय संत सावळाराम महाराजांचे स्मारक आणि अध्यात्मपिठ उभारण्याचे आश्वासन नाही तर अभिवचन देतो तसेच हे स्मारक तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षा अधिक भव्य दिव्य व्हावे यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करीन असे वचन 'खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे' यांनी वारकरी शिष्टमंडळाला दिले. 


संत सावळाराम महाराज यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये महाराजांचे यथोचित स्मारक उभारण्याची मागणी ठाणे— रायगड जिल्ह्यावासीयांमध्ये जोर धरु लागली आहे. यासाठी ठाणे जिल्ह्यातील किर्तनकार, प्रवचनकार, निष्ठावंत वारकरी त्याचप्रमाणे अनेक सामाजिक कार्यर्त्यांच्या आगरी युथ फोरमच्यावतीने बैठका घेण्यात आल्या. त्या बैठकांमधे श्रीसंत सावळाराम महाराजांचे स्मारक उभारण्याचे कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी आगरी युथ फोरम संचलीत "श्रीसंत सावळाराम महाराज" स्मारक समिती स्थापन करण्यांत आली आहे. 

वारकरी संप्रदयाचे माध्यमातून ज्यांनी समाजामध्ये वैचारीक क्रांती घडवून आणली. तोच विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचावा महाराजांचे कार्य त्यांच्या पर्यंत पोहोचावे यासाठी महाराजांचे यथोचित स्मारक तथा अध्यात्मपिठाची उभारणी करण्यांत येणार आहे. महाराजांच्या स्मारक तथा अध्यात्मपिठ उभारणीसाठी मोठा भूखंड आणि मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. यास्तव ही स्मारक उभारणी स्मारक समिती आणि कल्याण— डोंबिवली महापालीकेच्या संयुक्त विद्यमाने व्हावी त्यासाठी मा. खासदार यांनी पुढाकार घ्यावा यासाठी आगरी युथ फोरम संचलीत संत सावळाराम महाराज स्मारक समितीचे पदाधिकारी आणि निष्ठावंत वारकरी किर्तनकार यांनी समितीचे 'अध्यक्ष श्री. गुलाबराव वझे' यांचे नेत्तृत्वाखाली 'मा. खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे' साहेबांची त्यांच्या डोंबिवली येथील कार्यालयात भेट घेतली. 

हे स्मारक म्हणजे फक्त महाराजांचा पुतळा उभारणे अपेक्षित नसून सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक कार्याचे केंद्र ठरावे. या अध्यात्मपिठामध्ये वारकरी संप्रदायिक अध्यात्मिक शिक्षण,संस्कृत पाठशाळा, संगीत शिक्षण, किर्तनकुल,योगविद्या प्रशिक्षण आणि विद्यार्थ्याच्या उपजत कलागुणांचा विकास घडवून आणण्याचा उदात्त हेतु असल्याचे आणि हे सर्व शिक्षण गुरुकुल पद्धतीने करण्याची योजना असल्याचे 'श्री.गुलाबराव वझे' यांनी सांगीतले. महाराजांच्या या स्मारकाची मांडणी एवढी आकर्षक आणि विलोभनिय असावी तसेच अध्यात्मपिठाचे कार्य एवढे शिस्तबद्ध असावे कि बाहेरच्या प्रांतांतील लोक कल्याण डोंबिवली मध्ये फक्त महाराजांचे स्मारक बघण्यासाठी यावेत असे आमचे प्रयत्न राहतील असेही 'गुलाबराव वझे' यांनी सांगीतले. 

तसेच स्मारक तथा अध्यात्मपिठ उभारणीसाठी "मा. पालक मंत्री श्री.एकनाथ शिंदे" साहेब यांचे सोबत कल्याण— डोंबिवली मधील आजीमाजी लोकप्रतिनिधी, वारकरी, किर्तनकार, प्रवचनकार, समाजसेवक, कल्याण—डोंबिवली महापालीकेचे अधिकारी आणि समिती सदस्यांची लवकरच एक संयुक्त  बैठक आयोजित करावी अशी विनंती करण्यांत आल्याचेही 'गुलाबराव वझे' यांनी सांगीतले. 

वारकरी शिष्टमंडळाचे मागणीला 'मा. खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे' यांचेकडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने शिष्टमंडळ सदस्यांच्या,पदाधिका—यांच्या  चेह—यावर समाधान दिसून येत होते. याप्रसंगी आर्किटेक श्री.राजीव तायशेटे, समितीचे कार्याध्यक्ष ह.भ.प. चेतन महाराज, सरचिटणीस ह.भ.प. शरद पाटील, खजिनदार ह.भ.प. गणेश महाराज, श्री.पांडुरंग म्हात्रे, वारकरी संप्रदयातील ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. बाळकृष्ण महाराज, श्री. विजय पाटील, ह.भ.प. जनार्दन महाराज भिवंडी, ह.भ.प. प्रकाश महाराज, ह.भ.प.अनंता महाराज, युवा किर्तनकार ह.भ.प.विनित महाराज, ह.भ.प. विश्वनाथ कालण, ह.भ.प. संतोष काळण, ह.भ.प. गुणाजी मढवी, ह.भ.प. जे.डी. म्हात्रे, श्री. सुखदेव पाटील इत्यादी वारकरी मंडळी आणि मा. स्थायी समिती सभापती श्री. रमेश म्हात्रे, मा. नगरसेवक श्री. रवि पाटील, श्री. नितीन पाटील, डोंबिवली शहर प्रमुख श्री. राजेश मोरे, श्री. राजेश कदम,श्री. प्रकाश म्हात्रे, श्री. एकनाथ पाटील, श्री. सदाशिव गायकर, श्री. सदानंद थरवल आणि अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

कल्याण बसस्थानकात "मराठी भाषा गौरवदिन" उत्साहात साजरा !! *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय गायकवाड*

कल्याण बसस्थानकात "मराठी भाषा गौरवदिन" उत्साहात साजरा !! *कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय गायकवाड*


कल्याण, बातमीदार : आज दिनांक २७ फेब्रुवारी, २०२२ रोजी कल्याण बसस्थानकावर "मराठी भाषा गौरवदिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 


बसस्थानकावरील शिवस्मारकाजवळ जेष्ठ कविवर्य कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर (तात्या) यांच्या प्रतिमेचे पूजन कल्याण आगाराच्या पालक अधिकारी तथा यंत्र अभियंता (चा) सौ. स्मिता कुलकर्णी यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विजय गायकवाड होते. बसस्थानकावर सौ. टापरे मॅडम यांनी सुंदर रांगोळी रेखाटली होती. याप्रसंगी बोलताना आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी मराठी भाषा विविध साहित्यिकांनी व संतांनी समृध्द केली असून संत ज्ञानेश्वरांनी लिहीलेल्या पसायदानाला जगात तोड नाही , तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी राजकोष करवून घेतला व मराठीला राजाश्रय दिला होता. 


आपण जन्मल्या बरोबर पहीला शब्द उच्चारला तो मराठी होता. भाषा हे फक्त विचार व्यक्त करण्याचे संवादाचे साधन नाही तर तो आपला गर्व आणि अभिमान आहे. मराठी भाषेला थोर साहित्यिकांनी व मराठी मातीत जन्मलेल्या अनेक संत, थोर समाजसुधारक व महात्म्यांनी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. 


असे सांगून ज्ञानपीठ विजेते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या विपुल साहित्यातून याची प्रचिती येते. कितीही मोठे संकट आले तरी, त्यातून "मोडून पडला संसार तरी मोडला नाही 'कणा' " अशा शब्दांत मराठी माणसाचे लढण्याचे नैतिक बळ वाढवणारे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज हे एकमेव श्रेष्ठ साहित्यिक होते.  मराठी साहित्य विपुल व समृद्ध आहे, पण "वाटस अप युनिव्हर्सिटी मुळे" वाचनाची आवड कमी होत असल्याची खंत व्यक्त केली. या प्रसंगी बसस्थानकावरील प्रवासी बांधवांना साखरपेढे व गुलाब पुष्प देवून "मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा" देण्यात आल्या. सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक श्री महेश भोये यांनी उपस्थितांचे स्वागत व आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्थानक प्रमुख श्री आपोतीकर, वरिष्ठ लिपिक सौ. देवयानी पाटील, मालती मॅडम, वाहतूक नियंत्रक मणिष म्हात्रे, भोये, सिनकर इत्यादी परिश्रम घेतले. कार्यक्रमास राप कर्मचारी अधिकारी व प्रवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लांजेकर बंधू आंबेवालेतर्फे रत्नागिरी हापूसची पहिली पेटी पुणे मार्केटमध्ये दाखल !!

लांजेकर बंधू आंबेवालेतर्फे रत्नागिरी हापूसची पहिली पेटी पुणे मार्केटमध्ये दाखल !!


कोकण, (शांताराम गुडेकर) :
    दर्जेदार रत्नागिरी हापूस उत्पादक आणि विक्रेते लांजेकर बंधू आंबेवाले फुणगूस ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी यांच्या तर्फे गेली दोन वर्ष त्यांच्या आंबा बागेतून थेट आपल्या दारापर्यंत, मधुर, दर्जेदार जीआय मानांकित रत्नागिरी हापूस आंबा पोहोचवला जात आहे. आणि तो आंबा आपल्यासारख्या रसिक ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरत आहे. गेली वर्षेभर ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत आहात त्यांची सुरुवात शनिवार दि. २६/२/२०२२ यादिवशी पुणे मार्केट येथे आंबा पेटी पाठवून करण्यात आली आहे. तरी दरवर्षी प्रमाणे आपण याही वर्षी देखील या आपल्या आंबा शेतकऱ्यांला भरभरून प्रेम द्याल यामध्ये  तीळमात्र शंका नाही. चला तर मग.... वाट कसली बघताय आजच भ्रमणध्वनी- 9209908945/ 9767649066/ 7030278104/ 9769926614
9112162134 या नंबर वर संपर्क करून आपली ऑर्डर बुक करा.

Saturday 26 February 2022

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) आयोजित ५ दिवशीय शिवजयंती उत्सव, विविध स्पर्धा थाटामाटात संपन्न !!

महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.) आयोजित ५ दिवशीय शिवजयंती उत्सव, विविध स्पर्धा थाटामाटात संपन्न !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :
         महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्था ( रजि.) आयोजित ५ दिवशीय शिवजयंती उत्सव, विविध स्पर्धा थाटामाटात संपन्न झाल्या. संस्था मागील ३ वर्षा पासून मुंबई आणि पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी विभागात ५ दिवशीय शिवजयंती उत्सव साजरा करते. 


याही वर्षी हा उत्सव आनंदात साजरा केला. १९ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झालेल्या शिवजयंती उत्सवात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. घरोघरी शिवजयंती साजरी करणे स्पर्धा, गडकिल्ले बांधणी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, विविध क्रीडा स्पर्धा, रक्तदान शिबिर, कोव्हिड १९ च्या काळात आणि आपात्कालीन परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. 


यामध्ये जनता जागृती मंच, निड विकास संस्था, D Y F I, आकार मुंबई, विकास सहयोग प्रतिष्ठाण, झेड फाउंडेशन, पाणी हक्क समिती, Awantika school of home science kamptee, रहेमान शिक्षण सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, saithak  charitable trust,  क्रांतिसूर्य बहुउद्देशीय शिक्षण संस्था, अभिनव कला मंच गडचिरोली, चंद्र राज रुग्ण सेवा समिती, वाचल्या सोशल ऑर्गनायझेशन, Dr. J.J. kagwade charitable trust, आदर्श बहुउद्देशीय प्रसारक महिला मंडळ, विवेकानंद युवा मंडळ, छत्रपती राजश्री शाहू महाराज ट्रस्ट,  OAISIS THE ISLAND of Hope multi- purpose trust , ग्राम विकास संस्था, आदर्श युथ फाउंडेशन, सक्षम कन्या विकास संस्था, शिव प्रतिष्ठान, अग्रणी सोशल फाउंडेशन, आदर्श मानव विकास संस्था, संजीवन बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, अश्वमेध मागासवर्गीय शिक्षण संस्था, समृद्ध फौंडेशन, विश्वात्मा प्रतिष्ठान, मुस्लिम उन्नती सेवा फाउंडेशन, सहवास बहुउद्देशीय संस्था, कामलेश्वरी शैक्षणिक व सामाजिक व सांस्कृतिक संस्था, समिज्ञा बहुउद्देशीय संस्था, ज्ञानदायिनी शैक्षणिक व सामाजिक संस्था, अवनी महिला संचलीत.. अवनी मतिमंद निवासी विद्यालय, सेव द शिवाजी नगर फाउंडेशन, पवन चॅरिटेबल ट्रस्ट, अंतरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था, अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय संस्था, अहिल्यादेवी ग्राम विकास प्रतिष्ठान, जय महेश्वर शिक्षण, कृषी व जल विकास संस्था, अनंत एज्युकेशनल सोशल आणि कल्चरल सोसायटी, हरिकमल सामाजिक व शैक्षणिक संस्था तर उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती/संघटनामध्ये शांत्ताराम लक्ष्मण गुडेकर (पत्रकार/वृत्तपत्रलेखक), समीर वि.खाडिलकर  (पत्रकार/सामाजिक कार्यकर्ते), सौ.मणस्वी महेंद्र मणवे (पत्रकार/वृत्तपत्रलेखिका), केतन द. भोज (पत्रकार / आरटिआय कार्यकर्ते), सुभाष ल. कोकणे (पत्रकार/आरटिआय कार्यकर्ते), दिलीप तावडे (पत्रकार /आरटिआय कार्यकर्ते), मोहन ज. कदम (पत्रकार/ सामाजिक कार्यकर्ते), राजेंद्र भुवड (पत्रकार/सामाजिक कार्यकर्ते), दिपक धों. कारकर (युवा पत्रकार/सामाजिक कार्यकर्ते), दादासाहेब येंधे(पत्रकार/ वृत्तपत्रलेखक), संतोष गावडे (पत्रकार/ वृत्तपत्रलेखक), प्रसाद महाडिक (पत्रकार /कवी ), मुनीर खान -पत्रकार, समाजसेविका श्रीमती मंजू सराठे, पंकजकुमार पाटील - पत्रकार, शरद भावे - सामाजिक कार्यकर्ता, दीपक मांडवकर- पत्रकार, सौ. शिल्पा निमकर - शिक्षिका, श्रीराम वैद्य - सामाजिक कार्यकर्ते, सचिन ठिक- संपादक - कोकण समाचार, आकाश पोकळे- संपादक- कोकण साम्राज्य, किरण पडवळ संपादक - दै. पुण्य विचार, उमेश भेरे संपादक - दै. अग्रलेख, प्रमोद दळवी संपादक - जिल्हा टाइम्स, महेंद्र मनवे- सामाजिक कार्यकर्ते /पत्रकार, कोकण कट्टा - विलेपार्ले, पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)- चेंबूर, जीवन (लाईफ) सेवा संस्था, मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट, सफल विकास वेल्फेअर सोसायटी, दिपक फणसळकर, प्रदीप खांबे आदी सर्वाना ऑनलाईन सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सेवा भावी संस्थेचे कार्यकर्ते, पदाधिकारी प्रसाद शितल सिताराम मांडवकर, अनंत जोशी, निलेश कुडतरकर, स्वाती गावडे, गौतम बनसोडे, रंजिता सावंत, विष्णू रामबाडे, दीपक माचीवलेकर, गजानन नार्वेकर, विशाल शेट्ये, दिपक चंदूरकर, गंगाराम पेडणेकर, अनिल खिल्लारी, मारुती नेमन, साईनाथ खामकर, प्रशांत परब, सचिन खेतले त्याच बरोबर ज्यानी महत्वाचे सहकार्य केले ते दत्त मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, महात्मा गांधी ब्लड बँक आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व संस्था, संघटना, विद्यार्थी आणि युवक वर्ग या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. ज्यानी या ५ दिवशीय शिवजयंती उत्सवास सहकार्य केले त्या सर्व दात्यांचे मनःपूर्वक आभार असेच प्रेम संस्थेवर या पुढे ही दाखवाल अशी मी आशा व्यक्त केली. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमची सांगता करण्यात आली.


दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केलेल्या वक्ताव्याविरोधात मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दखल !!

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केलेल्या वक्ताव्याविरोधात मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दखल !!


भिवंडी, दिं,27, अरुण पाटील (कोपर) : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत काही विधाने केली होती. दिशा सालियनची बदनामी केल्याचं सांगत तिच्या आई-वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर महिला आयोगाकडून नारायण राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दिशा सालियन मृत्यू प्रकरणात काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांनी एक खळबळजनक आरोप केला. या प्रकरणी शिवसेनेच्या नेत्या आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणें विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली होती. महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहिले होते. या पत्रात दिशा सॅलियन प्रकरणावरून नारायण राणे यांनी भाष्य केल्यामुळे कारवाई करण्याची मागणी केली होती. 

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने पूर्ण केला आहे. सीबीआयने दिशा सॅलियन प्रकरणाचाही तपास पूर्ण केला असून तिच्यावर बलात्कार झाला नाही, ती गरोदर सुद्धा नव्हती, असं तिच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. तिच्या आई- वडिलांनी सुद्धा या अहवालाला दुजोरा दिला आहे. एवढंच नाहीतर तिच्या आई-वडिलांनी मुलीच्या मृत्यूनंतरही बदनामी होत असल्याची तक्रार दिली आहे. तरीही नारायण राणे यांनी वारंवार पत्रकार परिषद घेऊन बलात्कार आणि हत्या झाल्याचे आरोप करत आहे, हे थांबवले पाहिजे, दिशाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी पेडणेकर यांनी पत्रातून केली आहे. 

१९ फेब्रुवारी रोजी नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी नारायण राणे म्हणाले, ८ जून रोजी दिशा सालियनची हत्या झाली. सांगितलं आत्महत्या केली. का करेल ती आत्महत्या? एकतर ती पार्टीला जात नव्हती. जबरदस्ती बोलवलं. त्यानंतर ती थांबत नव्हती, घरी जायला निघाली होती. त्यानंतर कोण-कोण होते? पोलीस संरक्षण कोणाला होतं? तिच्यावर वाईट कृत्य होत असताना बाहेर संरक्षण कोणाचं होतं. सालियनचा पोस्टमार्टम रिपोर्ट अजून आला नाही, का नाही आला? सात महिन्यात यायला हवा होता. दिशा सालियन ज्या इमारतीत राहत होती त्या इमारतीच्या रजिस्टरमधील ८ जूनची पाने कोणी फाडली? कोणाला इन्ट्रेस्ट होता. 

२२ फेब्रुवारी २०२२ रोजी नितेश राणे यांनी ट्विट करत दिशा सालियन मृत्यू प्रकरणात पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले होते. नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं, दिशाला आठ तारखेच्या रात्री (८ जून २०२० – दिशा सालियानच्या मृत्यूचा दिवस) काळ्या रंगाच्या मर्सिडीजने पार्टीतून तिच्या मालाडमधील घरी नेण्यात आले होते. सचिन वाझेच्या मालकीचीही काळ्या रंगाचीच मर्सिडीज कार आहे, जी सध्या तपास यंत्रणांच्या ताब्यात आहे. ही तीच कार आहे का? वाझेला पोलीस दलात ९ जून रोजी पुन्हा रुजू करण्यात आलं होतं. कनेक्शन? 

मालवणी पोलीस स्टेशनची भूमिकाही पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद आहे. आता त्यांना दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. दिशा सालियनसोबत राहणारा आणि ८ तारखेला उपस्थित असलेला रोहित राय पुढे येऊन का बोलत नाहीये? असा प्रश्नही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

उद्योगधंदे, बाजारपेठ वाढीसाठी नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव सुपरफास्ट सुरू करण्याची केंद्रीय रेल्वेमंत्री मा रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे केली मागणी !!

उद्योगधंदे, बाजारपेठ वाढीसाठी नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव सुपरफास्ट सुरू करण्याची केंद्रीय रेल्वेमंत्री मा रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे केली  मागणी !!


रत्नागिरी, बातमीदार : रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, गोरेगाव, माणगाव, श्रीवर्धन, रोहा, इंदापूर, कोलाड, नागोठणे, पेण रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, लांजा, चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोली  सिंधुदुर्ग जिल्हातील कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण, देवगड हे महत्वाचे ठिकाण असुन ही वेगाने विकसित होणारी शहरे आहेत दापोली येथे डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरात अनेक शाखा आहेत कोकण कृषी विद्यापीठामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर या परिसरात येणारी लोकांची प्रवाशांची संख्या भरपूर आहे.


महाराष्ट्राचे आराध्य दैवत व विदर्भातील प्रसिद्ध संत  गजानन महाराज मंदिर, अमरावती शहरातील वालगाव येथील संत गाडगेबाबा महाराज स्मारक ,नागपूर येथे महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची दिक्षाभुमी,वर्धा येथील महात्मा गांधी यांचे सेवाग्राम,बुलढाणा येथील नांदुरा येथील १०५ फुटी हनुमानाची मूर्ती, मुर्तीजापुर येथील कार्तीकस्वामी मंदिर,कारंजा येथील दत्त गुरूचे  स्थान,रेणुकामाता मंदिर, नाशिक येथील शुर्पणखा स्मृतीस्थान, धुळे येथील देवापुर येथील स्वामीनारायण मंदिर, जळगाव येथील मुक्ताबाई, चांगदेव मंदिर, दर्शनाकरीता व पाहण्याकरिता अनेक भाविक शेगाव व बुलढाणा परिसरात येत असतात. नाशिक येथे द्राक्षांची, धुळे व नंदुरबार येथे लाल मिरचीची मोठी बाजारपेठ, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ, जळगाव केळीची मोठी बाजारपेठ व केळीची मोठी उत्पादन केंद्र कोकणामध्ये येणाऱ्या केळी, द्राक्षे, संत्री, लाल मिरची रत्नागिरी हापुस आंबा व सिंधुदुर्ग प्रसिध्द देवगड हापुस आंबा, मालवणी खाजा, कडक बुंदीचे लाडू, चुरमुऱ्याचे लाडू, सावंतवाडी प्रसिद्ध लाकडी खेळणी, पेणचे पापड, कुरडई, लोणचे, पांढरा कांदा, पश्चिम बंगाल मधिल हल्दीराम रसगुल्ला, रसमलाई, गुलाबजाम, पेठे, मिठाई, संत्रा वडी, नारळवडी, आंबा व फणसवडी या मार्केटमुळे आयात निर्यात होण्यास मदत होणार आहे, तसेच धार्मिक क्षेत्र, उदयोग क्षेत्र, पर्यटन क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र यांची नाळ जोडल्यामुळे प्रचंड प्रमाणात प्रवाशांची या गाडीसाठी मागणी आहे. तसेच कोकण ते खान्देश, विदर्भ असे महाराष्ट्र दर्शन म्हणून या गाडीला थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, राजापुर रोड, रत्नागिरी, चिपळूण, खेड, माणगाव, पेण या थांब्यावरून नागपूर करिता जाणारे असंख्य प्रवासी आहेत या भाविकांना दर्शनासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग परिसरातून रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.तरी या रेल्वेच्या प्रवाशांची मागणी आहे की हि *मडगाव ते नागपूर किंवा अमरावती मडगाव  रेल्वेसेवेला पेण, चाळीसगाव, पाचोरा, जळगांव, मुक्ताईनगर, नांदुरा, शेगांव, मुर्तीजापुर अधिकृत थांबे मिळावे होळी उत्सवनिमित्त नागपूर मडगाव किंवा अमरावती मडगाव  सुपरफास्ट स्पेशल  सुरू करण्याची कल्याण सावंतवाडी रेल्वे समन्वय समिती मुंबई अध्यक्ष सुनिल सिताराम उत्तेकर, रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष राजकुमार व्यास, प्रवासी संघटना अध्यक्ष शेखर नागपाल, जनसंपर्क प्रमुख तथा तालुकाध्यक्ष व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष श्री वैभव बहुतूले, पेण संपर्कप्रमुख हर्षद भगत, कुडाळ तालुकाध्यक्ष चैतन्य धुरी, अकोला प्रवासी सुधीर राठोड, जळगाव येथील दिपक सोनवणे, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ओमकार उमाजी माळगांवकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री मा.रावसाहेब पाटील दानवे यांच्याकडे सुरू करण्याची मागणी केली आहे.

हवालदारांचे फौजदार होण्याचे स्वप्न होणार पूर्ण ; शासनादेश झाला जारी, सतरा हजार पदे वाढणार--गृहमंत्र्याची माहिती !!

हवालदारांचे फौजदार होण्याचे स्वप्न होणार पूर्ण ; शासनादेश झाला जारी, सतरा हजार पदे वाढणार--गृहमंत्र्याची माहिती !!


भिवंडी, दिं,26, अरुण पाटील (कोपर) : राज्यातील हजारो पोलिस शिपाई, हवालदारांचे पोलिस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण करणारा शासन निर्णय शुक्रवारी (ता. २५) जारी झाला आहे. या निर्णयामुळे पोलिस दलाच्या बळकटीकरणास चालना मिळेल तसेच गुन्ह्यांची उकल होण्यास व गुन्हे रोखण्यास मदत होईल असा विश्वास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यातील अंमलदारांना वर्षानुवर्षे सेवेनंतरही पोलिस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहोचता येत नसल्याने त्यांना पदोन्नतीचा लाभ देऊन अधिकारी होता यावे या दृष्टिकोनातून हा प्रस्ताव गृह विभागाने तयार केला होता. या निर्णयाला आज मंजुरी दिल्याबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. 

पोलिस शिपाई ते सहायक पोलिस निरीक्षक या पदोन्नती साखळीमधील पोलिस नाईक या संवर्गातील ३८ हजार १६९ पदे व्यपगत करण्यात आली असून ती पोलिस शिपाई, पोलिस हवालदार व सहायक पोलिस उपनिरीक्षक या संवर्गात वर्ग करण्यात येत आहेत. या निर्णयामुळे पोलिस दलाची पुनर्रचना होणार असून पोलिस शिपायांची पदे १ लाख ८ हजार ५८, पोलिस हवालदारांची पदे ५१ हजार २१०, सहायक पोलिस उपनिरीक्षकांची पदे १७ हजार ७१ वाढणार आहेत. 

पदोन्नतीच्या तीन संधी मिळून अधिकारी : गृहमंत्री या निर्णयामुळे पोलिस शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यास त्याच्या सेवा कालावधीत पदोन्नतीच्या ३ संधी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस महासंचालक स्तरावर सुकाणू समिती गठित करण्यात येईल, अशी माहितीही गृहमंत्र्यांनी दिली

कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी बाल साहित्य संमेलन संपन्न !!

कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात शालेय विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे महत्त्व जाणून घेण्यासाठी बाल साहित्य संमेलन संपन्न !!
 

कल्याण, ऋषिकेश चौधरी : कवी कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्ताने मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा होत आहे कोरोना मुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद होत्या त्यात कुठलेच कार्यक्रम साजरे झाले नव्हते मराठी भाषा दिनाचे निमित्त साधून कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयाच्या प्रांगणात मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला. 


यावेळी बाल साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते  अभ्यासक्रमातिल कुसुमाग्रजांच साहित्य विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या  साहित्यिकांच्या भूमिकेत येवून आणि कवी कुसुमग्रज, बहिणाबाई चौधरी, संत ज्ञानेश्वर, गाडगे बाबा आदी अनेक प्रकारच्या वेशभुषा परिधान करून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व शाळेच्या आवारात ग्रंथ दिंडी काढून मराठी भाषेचा जागर केला रविवारी सुटी असल्याने एक दिवस अगोदच आम्हीं हा मराठी भाषा दिवस साजरा केल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली.


फळेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक पदी सुरेश गायकवाड बिनविरोध !!

फळेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक पदी सुरेश गायकवाड बिनविरोध !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील एकूण १९ विविध कार्यकारी सेवा सोसायटीतील फळेगाव सोसायटीच्या संचालक पदी उशीद गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश शंकर गायकवाड यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.

कल्याण तालुक्यात फळेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी सह नडगाव, पळसोली, उतणे, गुरवली, मानिवली, रायते, वाडेघर, वरप, कांबा, कुंदे, चवरे, दावडी, गोळवली, घोटसई, जांभूळ, कोल्हा, शिरढोण, वडवली, काटई, आदी १९ सोसायट्या आहेत, यातील बहुतांश सोसायटीच्या निवडणुका लागल्या आहेत. तर काही नंतर होणार आहेत. चौविसशेच्या आसपास मतदार आहेत तर थकबाकीदार असल्याने मतदान करु न शकणारेची संख्या ३ हजारांच्या आसपास आहे. यातील महत्त्वाची असलेल्या फळेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या संचालक पदी उशीद गावचे सामाजिक कार्यकर्ते सुरेश शंकर गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली आहे.

गायकवाड हे दुसऱ्यांदा संचालक म्हणून बिनविरोध निवडणूक आले असून त्यांनी मागील कार्यकाळात परिसरातील अनेक शेतकऱ्यांना विविध प्रकारची मदत, सहकार्य केले आहे, त्यांचे प्रश्न, अडचणी समस्या सोडवल्या आहेत, त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. त्यांच्या बिनविरोध निवडीमुळे वासुद्री, सांगोडे, कोंढेरी, उशीद, फळेगाव, पळसोली, मांडा टिटवाळा, आरेळे, दहिवली, आडीवली, रुंदा, आदी गावातील शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते किशोर पंडित, विनोद जाधव, जयप्रकाश फुलपगार,म्हारळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अश्विनी निलेश देशमुख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष निलेश देशमुख, जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे, आदींनी गायकवाड यांचे अभिनंदन केले आहे.

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या पुण्यतिथी दिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली !

स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर व डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या पुण्यतिथी दिनी महानगरपालिकेतर्फे भावपूर्ण आदरांजली !


कल्याण, हेमंत रोकडे : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर व डॉ. आनंदीबाई जोशी  यांचे पुण्यतिथी दिनी आज महापालिकेतर्फे,  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.  महापालिका मुख्यालयात महापालिका अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी  स्वातंत्र्यवीर सावरकर व डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थित कर विभागाचे उप आयुक्त विनय कुलकर्णी, महापालिका सचिव तथा विभागप्रमुख माहिती व जनसंपर्क विभाग, संजय जाधव तसेच माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकर व डॉ. आनंदीबाई जोशी यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून आदरांजली वाहिली.

Friday 25 February 2022

जे प्रभागातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास – रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणा-या बेवारस, भंगार वाहनांवर जप्तीची धडक कारवाई !

जे प्रभागातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास – रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा ठरणा-या बेवारस, भंगार वाहनांवर जप्तीची धडक कारवाई !


कल्याण, हेमंत रोकडे : महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवरील वाहतुकीची कोंडी कमी व्हावी आणि नागरिकांना रस्त्यावरून प्रवास करणे सहज सुलभ व्हावे या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी कल्याण पूर्व परिसरातील पत्रीपूल, पूनालींक रोड, क्रिस्टल प्लाझा येथील बगीचा आरक्षण लोकग्राम, तिसगाव या ठिकाणी रस्त्यावर पडून असलेली व दैनंदिन साफसफाईस तसेच रस्त्यांवरुन मार्गक्रमण करणा-या पादचा-यांना बाधा ठरणारी  बेवारस व मोडकळीस आलेली एकुण 16 बेवारस वाहने जप्त करुन खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली. सदर कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी, आर.टी.ओ. चे अधिकारी यांच्या मदतीने व टोइंग मशीन, 4 डंम्‍पर व 1 जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.
माणगाव उपजिल्हा रुग्णालय दिव्यांगत्व शिबीरात दिव्यांगांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्रांचे वितरण !!

माणगाव उपजिल्हा रुग्णालय दिव्यांगत्व शिबीरात दिव्यांगांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्रांचे वितरण !!


        बोरघर / माणगाव, ( विश्वास गायकवाड ) : माणगाव उपजिल्हा रुग्णालय आयोजित माणगाव व ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्रांचे वितरण पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते आज दिनांक 25 फेब्रुवारी रोजी माणगाव येथे करण्यात आले. 

दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या प्रत्येक घटकाप्रमाणेच व्यक्तिगत विकास साधता यावा, यासाठी शासनाच्या समाज कल्याण व विशेष सहाय्य विभागाच्या या योजनेचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी यावेळी केले. 

या दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष आनंद यादव, श्रीमती संगिता बक्कम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, माणगाव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ प्रदिप इंगोले, प्रांताधिकारी प्रशाली जाधव- दिघावकर, तहसिलदार प्रियंका कांबळे तसेच स्थानिक नगरसेवक, नर्स, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते.

पोलीस उपनिरीक्षक सुनिता भोसले यांचे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे !

पोलीस उपनिरीक्षक सुनिता भोसले यांचे विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे !


मुंबई, संदीप शेंडगे : साकीनाका पोलीस ठाणे हद्दीतील महेश्वरी इंग्लिश मिडीयम स्कूल चांदिवली साकीनाका मुंबई या ठिकाणी निर्भया पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनिता भोसले व म पो ना बोऱ्हाडे यांनी  विद्यार्थ्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले. शाळेमध्ये इयत्ता ४ थी ते ९ वी च्या एकूण ७९ विद्यार्थिनी व ८ शिक्षक उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थिनी व शिक्षक यांना निर्भया पथका विषयी त्याचे उद्देश समजावून सांगून त्यांना सविस्तर माहिती दिली. तसेच त्यांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श कसा ओळखायचा तसेच आपली सुरक्षा कशी करायची या बाबत सविस्तर प्रात्यक्षिक करून माहिती दिली.        


सायबर क्राईमसंदर्भात इंटरनेट चे फायदे व दुरुपयोग याची माहिती दिली. लहान मुलांसाठी असलेल्या पोक्सो कायदा यांची माहिती करून दिली. तसेच निर्भया पथकाची ओळख करून त्यांना निर्भया पथकाचा मोबाईल नंबर व  निर्भया पथकाचे अधिकारी व अंमलदार यांचे फोन नंबर देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना बोलते करून त्यांच्या मनातील पोलीसांबददल असणारी भीती कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत जवळीक साधली त्यांना येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या त्याच्यावर त्यांना उपाय सांगण्यात आले. आत्मसुरक्षा प्रात्यक्षिक देण्यात आले व विद्यार्थ्यांकडून करवून घेतले. 


तसेच शिक्षक यांच्या समस्यावर चर्चा करून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्यात आले. साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

निघुण हत्या करणाऱ्या आरोपीस पाच तासात जेरबंद ; "खडकपाडा पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी"

निघुण हत्या करणाऱ्या आरोपीस पाच तासात जेरबंद ; "खडकपाडा पोलीस स्टेशनची उत्कृष्ट कामगिरी"


कल्याण, हेमंत रोकडे : शहाड येतील शेतात एका इसमावर कोणीतरी वार केले असुन सदर इसम मृत अवस्थेत पडला आहे. अशी प्राथमिक माहीती मिळताच पोलिस अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ घटनास्थळी पोहचले असता एका १६ ते १७ वर्षे वयाचे इसमास कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून जिवे ठार मारल्याचे दिसून येत होते. सदर घटनास्थळ व आजुबाजुचा परिसर हा शेत तसेच झाडीझुडपे असणारा होते.


सदर ठिकाणी पोलिसांनी बारकाईने निरीक्षण करून प्राप्त झालेल्या मोबाईल फोन वरून मयत इसमाचे नाव निष्पन्न केले. त्यानंतर गोपनीय माहिती व तांत्रीक कौशल्याच्या आधारे आरोपी नामे शाहरूख यासीन शेख उर्फ इमरान वय २० वर्षे रा. आंबेडकर चौक, उंबर्णी रोड, बनेली, टिटवाळा जिल्हा ठाणे यास बनेली, टिटवाला परिसरातुन शिताफीने ताब्यात घेवून अटक केली. त्यावेळी मयत इसम व त्याचे मित्र यांचे त्याच परिसरात राहणारा आरोपी नामे शाहरूख शेख उर्फ इमरान यांचे सोबत आठ ते दहा दिवसापूर्वी भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपीताने त्या भांडणाचा राग धरून धारदार कोयत्याने फिर्यादी यांचा मुलगा याचे डोक्यावर व मानेवर वार करुन जिवे ठार मारले असल्याची माहिती समोर आली. सद रबाबत खडकपाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ७२ / २०२२ भा.दं.वि.स. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हयाचे तपासाचे अनुषंगाने अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्तात्रय कराळे, पोलीस उप आयुक्त सो परिमंडळ- ३, कल्याण सचिन गुंजाळ, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण विभाग उमेश माने पाटील, खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक पवार, पोलीस निरीक्षक (प्रशासन) सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने, पोलीस निरीक्षक नंदकुमार केंचे, अनिल गायकवाड व तपास पथकाचे अमलदार पोहवा एस एच. पवार, ठोके, डोमाडे, पोहवा देवरे, एस. पाटील, लोखंडे, श्रीरामे, बूधकर, कामडी, पोना खांबेकर, थोरात, बोडके, तागड, देसले, वारघडे यांनी आपले बातमीदारा मार्फत बातमी काढून व तांत्रीक तपास करून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...