Monday 28 February 2022

महाशिवरात्री उद्या 6 राजयोगात शिवरात्री साजरी होणार, 24 तासात पूजेचे 7 मुहूर्त; शिवपूजेच्या 5 सोप्या स्टेप्स, मंत्र आणि आरती एका तासापूर्वी !!

महाशिवरात्री उद्या 6 राजयोगात शिवरात्री साजरी होणार, 24 तासात पूजेचे 7 मुहूर्त; शिवपूजेच्या 5 सोप्या स्टेप्स, मंत्र आणि आरती एका तासापूर्वी !!


भिवंडी, दिं,28, अरुण पाटील (कोपर) :
              उद्या शिव पूजेचा महापर्व म्हणजे शिवरात्री आहे. पंचांगानुसार हा दिवस माघ मासातील कृष्णपक्षातील चतुर्दशीचा असतो. जो यावेळी 1 मार्चला आहे. शिवपुराणानुसार महाशिवरात्रीला शिंवलिंगापासुन सृष्टी सुरु झाली. या दिवशी सर्वात पहिले ब्रह्मदेव आणि श्रीविष्णुंनी शिवलिंगाची पूजा केली होती. तेव्हापासून प्रत्येक युगात या तिथीला महादेवाची पूजा आणि व्रत-उपवास करण्याची प्रथा चालत आलेली आहे. या दिवशी दिवसभर तर शिव पूजा होतेच परंतु ग्रंथांमध्ये रात्री पूजा करण्याचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. मान्यतेनुसार या दिवशीच शिव-पार्वतीचे लग्न झाले होते.
              स्कंद आणि शिवपुराणानुसार, शिवरात्रीच्या चार प्रहरांमध्ये महादेवाची पूजा करावी. कारण या तिथीला भगवान शिव लिंगाच्या रूपात रात्रीच प्रकट झाले होते, म्हणून शिवरात्रीच्या चारही प्रहारांमध्ये पूजा केल्याने कळत-नकळत झालेले पाप आणि दोष नाहीसे होतात. अकाली मृत्यू होत नाही आणि वयही वाढते.

पहिला प्रहर - संध्याकाळी 6:25 पासून रात्री 9:31 पर्यंत.
 ----------------------
दुसरा प्रहर - रात्री 9:31 पासून 12:37 पर्यंत
तिसरा प्रहर - 12:37 पासून 3:43 पर्यंत
चौथा प्रहर - 3:43 पासून सकाळी 6:49 पर्यंत
            ----------------------
दुर्लभ ग्रहस्थिती आणि पाच राजयोग :-

पुरीचे ज्योतिषाचार्य डॉ. गणेश मिश्र सांगतात की, महाशिवरात्रीला शिवयोग तयार होत आहे. त्याचबरोबर शंख, पर्वत, आनंद, दीर्घायुष्य आणि भाग्य नावाचे राजयोग तयार होत आहेत. या दिवशी चंद्र, मंगळ, बुध, शुक्र आणि शनि मकर राशीत राहतील. जेव्हा हे ग्रह एका राशीत असतात तेव्हा पंचग्रही योग तयार होतो.त्याच वेळी, या महापर्वात कुंभ राशीमध्ये सूर्य आणि गुरूचा संयोग असणे देखील शुभ असेल. गुरु हा धर्मकर्माचा ग्रह आहे आणि सूर्य हा आत्मा कारक आहे. या दोन ग्रहांच्या संयोगाने शिव उपासनेचे शुभफळ आणखी वाढतील. शिवरात्रीला ग्रह-ताऱ्यांची अशी स्थिती गेल्या अनेक वर्षांत निर्माण झालेली नाही.

पूजन सामग्री.
-----------------
गंगाजल, शुद्ध पाणी, दूध (अभिषेकासाठी), चंदन, पंचामृत (दूध, दही, मध, साखर, तूप) बेलाची पाने, फुले, रुद्राक्ष, दिवा, उदबत्ती

पूजेचे मंत्र.
-------------
1. ॐ नम: शिवाय
2. ॐ हौं जूं स: ॐ भूर्भुवः स्वः ॐ त्र्यंबकम् यजामहे सुगंधिम् पुष्टिवर्द्धनम्।
ऊर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मुक्षिय मामृतात्।। ॐ स्वः भुवः भूः ॐ सः जूं हौं ॐ
----------------------------+
पाच सोप्या स्टेप्समध्ये शिवरात्री पूजन विधी.
------------------------------
(१) दिवा आणि उदबत्ती लावून श्री गणेश पूजन केल्यानंतर शिव पूजा सुरु करावी.
(२) शिवलिंगाला अभिषेक करत गंगाजल, दूध, पंचामृत आणि शुद्ध पाणी अर्पण करावे.
(३) महादेवाला चंदन, भस्म, अत्तर लावावे.
(४) बेलाची पाने, धोतऱ्याचे फुल अर्पण करावे.
(५) धूप-दीप लावून नैवेद्य दाखवून आरती करावी.

व्रत कसे करावे.
-------------------
शिवरात्रीला सूर्योदयापूर्वी उठून पाण्यात गंगाजल आणि काळे तीळ मिसळून स्नान करावे. यानंतर दिवसभर उपवास करून महादेवाची पूजा करावी. व्रत उपवास दरम्यान अन्न खाऊ नये. दिवसभर पाणी देखील पिऊ नये असाही पुराणात उल्लेख आहे. तज्ज्ञांनुसार जर तुम्ही एवढा कठीण उपवास करू शकत नसाल तर फळे, दूध आणि पाणी पिऊ शकता. या व्रतामध्ये सकाळी-संध्याकाळी स्नान करून शिव मंदिरात दर्शनासाठी जावे.

महादेवाची आरती.
-----------------------
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
वीषें कंठ काळा त्रिनेत्रीं ज्वाळा ॥
लावण्यसुंदर मस्तकीं बाळा ।
तेथुनियां जल निर्मळ वाहे झुळझूळां ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्रीशंकरा ।
आरती ओवाळूं तुज कर्पूरगौरा ॥ ध्रु० ॥
कर्पूरगौरा भोळा नयनीं विशाळा ।
अर्धांगीं पार्वती सुमनांच्या माळा ॥
विभुतीचें उधळण शितिकंठ नीळा ।
ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ॥ जय देव० ॥ २ ॥
देवीं दैत्य सागरमंथन पै केलें ।
त्यामाजीं जें अवचित हळाहळ उठिलें ॥
तें त्वां असुरपणें प्राशन केलें ।
नीळकंठ नाम प्रसिद्ध झालें ॥ जय देव० ॥ ३ ॥
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।
पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ॥
शतकोटीचें बीज वाचे उच्चारी ।
रघुकुळटिळक रामदासा अंतरीं ॥ जय देव जय देव० ॥ ४ ॥

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...