Saturday 31 December 2022

भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सभेची तयारी बैठक संपन्न !

भाजपा चे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या सभेची तयारी बैठक संपन्न !

औरंगाबाद/वैजापूर, अखलाख देशमुख, दि ३१ : भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जे पी नड्डा यांच्या २ जानेवारी २०२३ रोजी सांस्कृतिक क्रीडा मंडळ औरंगाबाद येथील मैदानावर होणाऱ्या जाहीर सभेच्या नियोजनासंदर्भात पूर्वतयारीसाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांचा वैजापूर दौरा संपन्न झाला. 

या दौऱ्यात त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर साहेब, जिल्हा अध्यक्ष विजय औताडे, जिल्हा सरचिटणीस संजय खंबायते, भारतीय जनता पार्टी - तालुकाध्यक्ष कल्याण पाटील दागोंडे, जिल्हा चिटणीस मोहन आप्पा आहेर, कैलास पवार, ज्ञानेश्वर पाटील, जगताप सुनील, दादा पैठण पगारे, दशरथ अण्णा बनकर, प्रशांत नाना कंगले, नबी पटेल, मजीद शेट कुरेशी, राजू सिंग राजपूत, शहराध्यक्ष दिनेश भैय्या राजपूत, सुरेश राऊत, सतीश पाटील, शिंदे कारभारीी, पाटील कराळे,  अनिल पाटील, वाणी नाना गुंजाळ, संतोष मिसाळ, प्रताप महेर, शिवनाथ पाटील, तुपे चंद्रशेखर, साळुंखे उदय, सोनवणे सुदाम, दादा भडके, अशोक शेळके, गणेश खैरेे, प्रेम भाऊ राजपूत, शैलेश पोंदेे, गोकुळ भुजबळ, महेश भालेराव, नारायणराव कवडेे, मेजर गौतम गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, प्रदीप चव्हाण, गौरव दोडेे, सुनील गायकवाड, ज्ञानेश्वर शिरसाठ, दादाभाऊ मगर, शांताराम दुशिंग, केतन आव्हाळेे, ज्ञानेश्वर आदमाने, कल्पनाताई हंगेे, मॅडम पवार, राजू देशमुख, संतोष आवारे, अवधूत ठोंबरे, सचिन घोडके, अमोल जाधव, मनोज मुळे, ऋषिकेश सातपुतेे, संदेश जाधव, आकाश बागुल, सुरेश निकम सर सह आदी शक्ती केंद्रप्रमुख पदाधिकारी बुथ अध्यक्ष हजर होते.

चाट पुचका रेस्टोरंन्टचे 'महापौर सौ.महाजन' यांच्या हस्ते उद्घाटन !

चाट पुचका रेस्टोरंन्टचे 'महापौर सौ.महाजन' यांच्या हस्ते उद्घाटन !

जळगाव, अखलाख देशमुख,  दि ३१ :  शहरातील समर्थ कॉलनी, एम जे कॉलेज रोड येथे नव्याने स्थापित झालेल्या चाट पुचका रेस्टोरंन्ट आज शनिवार, दि.३१ डिसेंबर २०२२ रोजी जळगाव शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन झाले. 

याप्रसंगी महापौर सौ.महाजन यांनी व्यावसायिक वाटचालीसाठी संचालकांना शुभेच्छा देत या कार्यक्रमाच्या औचित्याने आयोजित स्नेहमीलन सोहळ्यातही सहभाग नोंदविला. यावेळी ‘चाट पुचका ’ या रेस्टोरंन्ट चे संचालक व परिवार यांनी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांचे यथोचित स्वागत केले. या सोहळ्याला परिसरातील नागरिक व परिवाराचे आप्तेष्ट उपस्थित होते.

बाळासाहेबाची शिवसेना आ.संजय शिरसाट यांच्या हस्ते नियुक्ति पत्र वाटप !

बाळासाहेबाची शिवसेना आ.संजय शिरसाट यांच्या हस्ते नियुक्ति पत्र वाटप ! 

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३१ : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवत व आमदार संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरप्रमुख संतोष आम्ले, उप शहरप्रमुख गणेश कांबळे यांच्या कार्यक्षेत्रात आज बाळासाहेबांची शिवसेनामध्ये पडेगाव-मिटमिटा या भागातील  फिरदोस गार्डन, सप्तशृंगीनगर, रामगोपालनगर, गुलमोहर कॉलनी शिवपुरी उपविभागप्रमुख संजय मोहनिया, अशोक सुखदेव, शाखाप्रमुख उमेश रावसाहेब आम्ले, उपशाखाप्रमुख अमोल हरिचंद्र भंडारे, चंदु बाळुभाऊ पेहरकर, वार्डप्रमुख अशोक रामचंद्र डोके, उपवार्डप्रमुख सुरेश कात्रे, ऋषिकेश वाघमोडे, शाम पेहरकर, गटप्रमुख अमन चव्हाण, उपगटप्रमुख आकाश बलवंत पाटील, धनंजय शिंदे, अमोल बोरडे, गणेश खेकडे, उपगट प्रमुख निखिल नाईक, अमोल ईंगळे, तुषार राजेश कुडेकर, सुमित कल्याणकर, स्वप्निल जोशी,शुभम भालेराव, मुक्तार शबीर सय्यद, उपग प्रमुख सचिन सोनवणे, योगेश भंडारे, नागेश मगर यांची नियुक्ती करून त्यांना नियुक्तीचे पत्र देखील देण्यात आले.
याप्रसंगी नगरसेवक सिंद्धात शिरसाट,  तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे, अशोक आम्ले, उपशहरप्रमुख राजु राजपुत, जिल्हा संघटक शिल्पाराणी वाडकर,हर्षदा शिरसाट,उपजिल्हा संघटक जयश्री घाडगे, तालुकासंघटक उषा हांडे, शहर संघटक पश्चिम सुरेखा चव्हाण, शहर संघटक पूर्व गायत्री पटेल, दीपक बनकर, नंदू आम्ले, उमेश आम्ले, भागीनाथ पेहकर, कैलास वाणी, पोपटराव हांडे, अशोक डोके, अशोक माळी, राजू लिंगे, बाळासाहेब आम्ले, गणेश बनगे, स्वप्नील जोशी, सोनू बुटे, अभिषेक बुटे, अमोल ठाकूर, माऊली आम्ले, अक्षय हांडे, अनिकेत कांबळे, अमोल भांडारे, अमोल वाघमारे, सिद्धेश्वर घोळवे आदींची उपस्थिती होती.

डॉक्टर अल्लामा इक्बाल प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेची गणित प्रकृती रिसोड तालुक्यात प्रथम !

डॉक्टर अल्लामा इक्बाल प्राथमिक सेमी इंग्लिश शाळेची गणित प्रकृती रिसोड तालुक्यात प्रथम !

वाशीम/रिसोड,: अखलाख देशमुख, दि ३१ : दिनांक 30 डिसेंबर २०२२ रोजी आयोजित तालुकास्तरीय  शासकीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये तब्बल दोनशे शाळांनी सहभाग नोंदविला होता सदरूह विज्ञान प्रदर्शनी मध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान डॉक्टर अल्लामा इकबाल सेमी इंग्रजी शाळेची गणित प्रकृतीला मिळाला शाळेतील गणित शिक्षक मोहसीन खान यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी गणित प्रकृती प्रदर्शनी मध्ये  सहभागी झाले होते.

तालुकास्तरीय विज्ञान व गणित निरीक्षक पथक यांच्याकडून  शिक्षक मोहसीन खान यांना प्रथम क्रमांकाचा सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले.‌ शाळेचे अध्यक्ष कबीर मोहसीन साहेब यांनी विज्ञान शिक्षक मोहसीन खान व सहभाग विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिली तसेच मुख्याध्यापक मोहम्मद शाहिद यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील समुद्र किनार्‍यांवर येणार्‍या जनतेच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या अतिरीक्त बसगाडया !

३१ डिसेंबरच्या रात्री नववर्ष स्वागतासाठी मुंबईतील समुद्र किनार्‍यांवर येणार्‍या जनतेच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या अतिरीक्त बसगाडया !

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शनिवार दिनांक ३१ डिसेंबर २०२२ च्या रात्री नववर्ष स्वागतासाठी गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनार्‍यांवर रात्रीच्या वेळी येणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गावर रात्री एकूण ५० जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. आवश्यकता भासल्यास अधिक प्रमाणात बसगाड्या सोडण्यात येतील.

प्रवाशांच्या मदतीसाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौक, जुहू चौपाटी, गोराई बीच तसेच चर्चगेट स्थानक (पूर्व) व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इ. ठिकाणी वाहतूक अधिकारी तसेच बसनिरीक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

जनता संपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी नववर्ष स्वागताच्या निमित्ताने बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केलेल्या अतिरीक्त बससेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली संलग्न मुंबई प्रदेश सचिवपदी भिमराव धुळप यांची नियुक्ती !

भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली संलग्न मुंबई प्रदेश सचिवपदी भिमराव धुळप यांची नियुक्ती !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )

                भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली संलग्न बृहन्मुंबई महानगर प्रदेश (शहर) च्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्य अध्यक्ष पंढरीनाथ पवार व कार्याध्यक्ष दत्ताराम घुगे यांच्या आदेशानुसार मुंबई शहर अध्यक्ष म्हणून रामदास तर सचिव म्हणून सामाजिक,शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले भिमराव हिंदुराव धुळप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर उपनगर व शहर मधील काही नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.भिमराव धुळप यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या अनुभवाचा उपयोग दलित साहित्य अकादमी ला नक्की होईल असे अध्यक्ष पंढरीनाथ पवार यांनी सांगितले. धुळप यांचे या नियुक्तीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.त्यांच्या या पुढील कार्यास खूप खूप शुभेच्छा व मनपूर्वक अभिनंदन.

Friday 30 December 2022

नववर्ष - नव्या सुरुवातीची सोनेरी संधी- संत राजिन्दर सिंह जी महाराज


नववर्ष -  नव्या सुरुवातीची सोनेरी संधी
-  संत राजिन्दर सिंह जी महाराज


आपण सर्वजण हे चांगल्या प्रकारे जाणून आहोत की, संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. ही एक अशी ही वेळ असते जेव्हा आपण आपल्या जीवनातील सामान्य कामकाजाला काही काळ थांबवून, आपले लक्ष त्या कार्यांकडे करतो, ज्यामुळे आपणांस आनंद मिळतो. ही अशी वेळ असते जेव्हा आपण गतवर्षाला मागे सोडतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने करतो.

जर आपण आपल्या मागील वर्षावर एक नजर टाकली असता, आपणांस असे दिसून येईल की, व्यतीत केलेल्या वर्षांमध्ये अशा अनेक वेळा आपल्या जीवनात ईश्वरीय कृपेचा आपण अनुभव केला असेल. ठीक याच्या विपरीत आपल्या जीवनात अनेक वेळा असे सुद्धा प्रसंग येतात की, जेव्हा आपण कठीण आणि दुःखी-कष्टी परिस्थितीतून सुद्धा जातो. अशावेळी आपल्याला या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे की, प्रत्येक गुलाबाला काटे सुद्धा असतात, त्यांची ही भूमिका आहे आणि त्यांचेही स्वतःचे असे महत्त्व आहे. ठीक अशाच प्रकारे आपल्याही जीवनात सुख आणि दुःख दोन्हीही येतात, जर आपण या बाबींवर विचार केला  तर आपणांस असे दिसून येईल की, आपण प्रत्येक परिस्थितीत शांत व सुखी राहू शकतो.

नववर्ष फक्त भौतिक आनंदच साजरा करण्याची वेळ नसून, ही आपल्या  जीवनात सुधारणा घडवून आणण्याची सोनेरी संधी सुद्धा आहे. 

आपण असे पाहतो की नवीन वर्षारंभी बरेचसे लोक चुकीच्या सवयी सोडून चांगल्या सवयी धारण करण्याचा सुद्धा संकल्प करतात. हा एक असा प्रसंग आहे जेव्हा ते स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. काही लोक धूम्रपान न करण्याचा प्रण घेतात, जेव्हा की बरेचसे लोक असेही असतात की जे मांसाहार सोडून शाकाहारी जीवन जगण्याचा संकल्प करतात, काही लोक असेही असतात जे क्रोध न करण्याचा, सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार करण्याचा आणि इतरांची मदत करण्याची प्रतिज्ञा घेतात. बरेच विद्यार्थी असे असतात की जे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपला अभ्यास अधिकाधिक करण्याचा संकल्प करतात. लक्षपूर्वक पाहिले असता, प्रत्येक जण आपापल्या स्तरावर आपल्या जीवनात काही चांगले करण्याचा प्रयत्न करतात.

नववर्षाच्या याप्रसंगी खूप कमी लोक असे असतात की जे अशी प्रार्थना करतात की, नववर्षात आपण अधिकाधिक अध्यात्मिक विकास करूया. जर आपण सुद्धा नववर्षी आध्यात्मिक रूपाने प्रगती करू इच्छित असु तर, यासाठी आपल्या दिनचर्येला लक्षपूर्वक पहावे लागेल. अशा मध्ये आपला हाच प्रयत्न असावा की आपण असे कोणतेच कार्य करू नये जे आपणांस या उद्देशापासून दूर करेल. अध्यात्मिक रूपाने प्रगती करण्याकरिता आपणांस ध्यानाभ्यासाला धारण करावे लागेल. याकरिता आपणास वर्तमान काळातील एखाद्या पूर्ण संतांकडून ध्यानाभ्यास करण्याची पद्धती शिकावी लागेल. आपण आपल्या दिनचर्येमध्ये ध्यानाभ्यास शामिल करतो, तेव्हां आपणांस आपल्या अंतरी प्रभुच्या ज्योति आणि श्रुति चा अनुभव होतो. या शिवाय आपल्याला असाही अनुभव येतो की, प्रभुची जी ज्योत मला प्राणशक्ती देत आहे, तीच इतरांमध्ये सुद्धा  आहे. त्यानंतर आपणास या बाबीवर  पक्का विश्वास होतो की, आपण सर्वजण एकाच पिता-परमेश्वराची संतान आहोत.

येणाऱ्या या नवीन वर्षी आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपण जो प्रयत्न करू तो कितीही  थोडा जरी असेल, आपण जे पाऊल उचलू ते  जरी कितीही छोटे का असेना ते आपल्याला आपल्या ध्येयाजवळ घेऊन जाईल. नववर्षी आपला असा प्रयत्न असावा की, आपला भूतकाळ जरी कसाही असेल, परंतु आपले भविष्य कलंक रहित राहील. आपण आपले विचार सदैव सकारात्मक ठेवूया याकरिता अध्यात्मिक मार्गच आपल्याला मदतगार होऊ शकतो.
चला तर!  आपण सुद्धा नववर्षी अध्यात्मिक प्रगती करण्याचा संकल्प करूया, कारण की आपल्या अंध्यात्मिक प्रकृती वरच आपली शारीरिक व मानसिक प्रकृती निर्भर आहे. जर आपण अध्यात्मिक मार्गावर चालण्याचा प्रण केला तर, आपण असे पाहू की याने केवळ आपले अंध्यात्मिकच नाही तर शारीरिक व मानसिक प्रकृती सुद्धा ठीक होईल. नववर्षाच्या प्रसंगी आपण आपल्या चुकांकडे लक्ष न देता, एका आशावादी अंतःकरणाने एका नवीन वर्षांची सुरुवात करूया. आपणा सर्वांना जीवनातील सफलते करिता खूप खूप शुभेच्छा !

सौजन्य - अमृता - +91 84510 93275


वाघांबे कुणबी संघटना तर्फे शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी मा. दिनानाथ नाट्यगृह विलेपार्ले (पूर्व) येथे नमन चे आयोजन !

वाघांबे कुणबी संघटना तर्फे शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी मा. दिनानाथ  नाट्यगृह विलेपार्ले (पूर्व) येथे नमन चे आयोजन !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर ) :

          पर्शुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भुमित अनेक कलांचा उगम होऊन बदलत्या काळानुसार त्या-त्या कला विकसीत झाल्या. त्यामध्ये कोकणचे खेळे अर्थात नमन या कलेतही अनेक बदल झाले. या कलेला शासनाकडून अनुदान मिळत नसले तरी पुर्वजानी ठेवलेली, जपलेली नमन ही कला रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यामधील गावात, वाडीत जतन केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील वाघांबे हे छोटेसे गाव. ८०% कुणबी समाज असलेल्या या छोट्याशा गावानेही पुर्वजानी ठेवलेला हा अनमोल ठेवा आजही जतन केला आहे.
           मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात कुणबी बांधव विखुरला गेला आहे.या समाजाला एकजूट करण्यासाठी कै. गंगाराम डिंगणकर व कै.धाकाजी निंबरे व सहकारीवर्ग यांनी १९९२ साली वाघांबे कुणबी संघटनेची स्थापना केली. या संघटनेने नमन हा उपक्रम हाती घेऊन मुली विविध क्षेत्रात पुढे याव्यात या उद्देशाने प्रथमच १९९३ साली नमन या कार्यक्रमात मुलींना सहभागी करून या कलेला एक नवा पायंडा पाडून दिला.आजही  संघटना वेळो वेळी आवश्यक उपक्रम राबवत असून नमन ही कला जोपासत आहे, विविधतेने नाटलेली ही एक अशी कला आहे, या कलेतून कलाकाराला आपल्यातले विविध गुण सादरीकरण करता येतात. नावीन्यपूर्ण असा हा कार्यक्रम वाघांबे कुणबी संघटना आयोजित नमन -नाट्यरूपाने शुक्रवार दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी मा. दिनानाथ  नाट्यगृह विलेपार्ले (पूर्व) येथे रात्रौ ०८:१५ वाजता आयोजित केलेला असून  गण, हास्याची कारंजे उडवणारी पण विचार करायला लावणारी हृदयस्पर्शी गौळण - गोकुळ झाले व्याकुळ आणि सम्राट रावण भाग - 2, रावणाचा घेतलेला शोध  आणि त्याला झालेला बोध असा हा लावीण्यपूर्व कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
              निर्माता वाघांबे कुणबी संघटना (मुंबई), लेखक : मोहन गोविंद निंबरे, दिग्दर्शक: शांताराम ठोंबरे, नृत्य दिग्दर्शन कु. किर्ती निंबरे, गीतरचना- प्रविण करंबेळे, अजय घाणेकर, पार्श्वगायिका - कोकणची लोककला शक्ती-तुरा मधील नामांकित तुरेवाल्या शाहिर सौ.प्रिती भोवड- विर, पार्श्वगायक- प्रविण करंबेळे, नितीन निंबरे, हारमोनियम- सुनील करंबेळे, बुलबूल - मास्टर  अविनाश बसनकर, मृदुंग/ढोलकी- रमेश डाफळे, अक्षय वणे, वाघांब्यातील २५ यशस्वी कलाकारांसह, रंगभुषा- गंगाराम गोताड,विशेष सहकार्य-मोहन करंबेळे, गंगाराम अलीम, अनंत वणे, चंद्रकांत निंबरे, अनिल ठोंबरे, ओमकार मांडवकर, सुभाष ठोंबरे, अनंत गोताड आणि सर्व संघटना सदस्य तरी या कोकणच्या लोककलेचा कोकण भूमिपुत्रानी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील कार्यक्षम व कार्यतत्पर लोकप्रिय प्रशासकीय अधिकारी राजाराम मोरे....

रायगड जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील कार्यक्षम व कार्यतत्पर लोकप्रिय प्रशासकीय अधिकारी राजाराम मोरे.... 

     बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) राजाराम अनंत मोरे हे समाज कल्याण विभाग रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे प्रशासन अधिकारी तथा प्रभारी समाज कल्याण निरीक्षक ह्या पदावर गेले दोन वर्षापासून काम करत आहेत. त्यांचे कडे काही दिवसापूर्वीच दलीत वस्ती सुधार योजना व आंतर जातीय विवाह योजना अश्या दोन योजना त्यांच्या कामाचा अनुभव व आवाका लक्षात घेता देण्यांत आलें आहे. तसेच त्यांच्याकडे तांडा वस्ती सुधार योजना ही आहे. त्यांनी सदर योजनेचे उत्तम प्रकारे कामकाज केले आहे.  
      रायगड जिल्हा परिषद कार्यालयातील एक कार्यतत्पर व कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी म्हणून राजाराम मोरे हे नाव जनमानसात प्रसिद्ध आहे. ते कर्तव्यदक्ष व शिस्तप्रिय, सौजन्यशील असे उत्तम व्यक्तीमत्व असून ते स्वतः मागासवर्गीय घटकातील असून अभ्यासू वृत्तीचे आहेत. ते आपली  शासकीय नोकरी सांभाळून संपूर्ण महाराष्ट्र भर छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले, लोकराजा राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांच्या न्याय समता, स्वातंत्र्य आणि विश्वबंधुत्ववादी लोककल्याणकारी विचारांचा प्रचार आणि प्रसार स्वतः पदर मोड करून बहुजन समाजास आणि मागास समाजाला देत आहेत.   
       त्यांच्या या महान कार्याची दखल घेत त्यांना जिल्ह्यातील व संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील अनेकविध सामाजिक संस्था आणि संघटना यांनी अनेक राज्य स्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा व त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. त्यांना कोणत्याही वेळी, कोणतीही माहिती विचारा, मग ती अगदी मोबाईल वरून जरी विचारली तरी ते सर्वसामान्य नागरिकांना तात्काळ व योग्य ती माहिती देतात. ते आपल्या कार्यालयात आलेल्या नागरिकांना  किंवा फोन वरून बोलणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना मी आता कामात कामात आहे. मला नंतर कॉल करा. नंतर या वगैरे असे त्यांनी अद्यापि म्हटलेले कोणाच्याही ऐकिवात नाही. त्यांना त्यांच्याकडे असलेल्या कामाविषयी किंवा त्यांच्याकडे असलेल्या कार्याभारा संबंधितच नाही तर एकूणच जिल्हा परिषद वा इतर कार्यालया बाहेरील माहिती विचारा ती माहिती त्यांच्याकडून तात्काळ व योग्य प्रकारे पुरवली जाते. यात शंका नाही. 
त्याच्या स्वभावानुसार ते अगदी मनमोकळे असून त्यांनी आजवर कोणतीही माहिती कोणालाही देण्यास कधीही नकार वा विरोध केलेला नाही. 
त्यांच्या कार्यालयात आलेल्या सर्वच लोकांना ते सन्मानपूर्वक देऊन त्यांची विचारपूस करून त्यांना हवी असलेली मदत व अचूक माहीती देतात. त्यामुळे त्यांना सर्वच लोक धन्यवाद दिल्या शिवाय राहत नाही. त्यांच्या कार्यतत्पर कार्यपद्धतीवर जिल्ह्यातील सर्व नागरिक संतुष्ट आहेत. शासनाच्या योजना समाजातील सर्व स्तरावर अगदी तळागाळातील जनतेपर्यंत तत्परतेने पोहचवण्यास नेहमी कटीबद्ध असलेल्या राजाराम मोरे यांनी आजवर कार्य तत्परतेने कामकाज केले आहे आणि या पुढेही ते करत राहणार.

गावातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य विभागाची जबाबदारी : "डॉ.दिपेश पष्टे"

गावातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य विभागाची जबाबदारी : "डॉ.दिपेश पष्टे"

*शिवकन्या प्रतिष्ठान व आपले मानवाधिकार फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी* 

*सर्वसामान्यांच्या आरोग्यासाठी धावून येणारे वाडा मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल : डॉ.दिपेश पष्टे*

भिवंडी/दि.30
शिवकन्या प्रतिष्ठान व आपले मानवाधिकार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व वाडा मल्टीसुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या सहकार्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नागेश जाधव व आपले मानवाधिकार फाउंडेशनचे संचालक डॉ.दिपेश पष्टे यांच्या उपस्थितीत कै.वि.अ.पाटील विद्यालय, दिघाशी, ता.भिवंडी येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. 

भारताचे भविष्य म्हणून समजल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ असणे महत्त्वाचे आहे. समाजामध्ये बहुतांश लोकांना आरोग्याविषयी जागृती नसल्यामुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने युवा समाजसेवक दिवेश पष्टे(आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यकर्ता पुरस्कृत) व संत निवृत्तीनाथ भक्त मंडळचे सचिव माही चौधरी यांच्या संकल्पनेतून व आयोजनातून आज दिघाशी येथील हायस्कूल मध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मुलींना प्रौढावस्था मधील माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांची तपासणी करत असताना विद्यार्थ्यांना त्वचारोग, डोळ्यांचे आजार, कॅल्शियमची कमतरता, हार्मोन ची कमतरता प्रामुख्याने दिसून आली. तसेच गावातील पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात यावी असे डॉ.अमित शर्मा व गणेश उमराठकर यांनी सांगितले. तर विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना भेट देऊन औषधांची व तपासणीची उपलब्धता करून देण्यासाठी आपले मानवाधिकार फाउंडेशन मागणी करेल असे आश्वासन डॉ.दिपेश पष्टे यांनी यावेळी बोलताना दिले. 

माध्यमिक शाळेमध्ये होत असलेल्या आरोग्य तपासणीची माहिती मिळताच कै.भाई पाटील समाज उन्नती मंडळ चे सदस्य सुधीर पाटील, भारतीय कामगार सेनेचे सचिव मिलिंद चौधरी, दिघाशी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सामाजिक कार्यकर्ते यांनीही आपली उपस्थिती नोंदवून आरोग्य तपासणी साठी सहकार्य व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन शिवकन्या प्रतिष्ठान च्या माध्यमातून माही चौधरी व दिवेश पष्टे याच्या सहकार्यातून करण्यात आले होते. शाळेचे मुख्याध्यापक एस के चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले तर सर्व शिक्षकांनी मुलांमध्ये असलेली शिस्त दाखवून असणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी विद्यार्थ्यांचे आजार माहिती करून घेण्यासाठी काही पालकांनीही उपस्थिती दर्शविली होती.

शिक्षकांनी शालेय वेळेचे बंधन पाळावे- प्रदिप वाघ

शिक्षकांनी शालेय वेळेचे बंधन पाळावे- प्रदिप वाघ

जव्हार-जितेंद्र मोरघा
 
विविध केंद्रांवर शिक्षण परिषदे चे आयोजन तालुक्यात करण्यात आले होते यावेळी संबोधन करताना प्रदीप वाघ यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे, यासाठी शालेय वेळेचे नियोजन केले पाहिजे व पुर्ण वेळ शाळेत आपण उपस्थित रहावे.

कुणीही कर्तव्यात कसूर केला तर योग्य ती कारवाई केली जाईल अशी सुचना प्रदीप वाघ यांनी शिक्षकांना दिली आहे.
तसेच गुणंवत व उपक्रमशील शिक्षक यांचे कौतुक देखील केले व अशा शिक्षकांचा आदर्श देखील इतरांनी घ्यावा असे हि ते यावेळी म्हणाले. 

आज दुधगाव, जोगलवाडी ,कारेगाव येथील शिक्षण परिषदे मध्ये शिक्षकांनी विविध उपक्रमांची माहिती दिली,

यावेळी प्रदीप वाघ उपसभापती, नंदकुमार वाघ विस्तार अधिकारी, सरपंच सुलोचना गारे, उपसरपंच हनुमंत फसाळे, भरत गारे गुरुजी, केंद्र प्रमुख, सखाराम रेरे, कांबळे, विरकर सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते

काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकी रस्त्याच्या डांबरीकरणाची महापौर सौ. जयश्री महाजन यांच्याकडून पाहणी !

काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकी रस्त्याच्या डांबरीकरणाची महापौर सौ. जयश्री महाजन यांच्याकडून पाहणी !

जळगाव दि ३०  :  गेल्या अनेक दिवसांपासून जळगावकर नागरिकांसह वाहनचालकांची रस्त्यांसंदर्भात होणारी गैरसोय आता टप्प्या-टप्प्याने दूर करणे सुरू झालेले आहे. 

त्याचाच भाग म्हणून शुक्रवार, दि.30 डिसेंबर 2022 रोजी  शहरातील मुख्य रस्त्यांतर्गत येत असलेल्या काव्यरत्नावली चौक ते गिरणा टाकी दरम्यानचा रस्ता डांबरमध्ये बीबीएम करुन डांबरीकरणाला सुरुवात झाली असता शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेची पाहणी करण्याच्या उद्देशातून तात्काळ दुपारी महापौरांनी सदर कामाच्या ठिकाणी भेट देऊन संपूर्ण रस्त्याच्या डांबरीकरणाचा आढावा घेतला. त्यात रस्ता डांबरीकरणाचे काम चांगल्याप्रकारे होत असल्याने समाधान व्यक्त केले. 

दरम्यान, यापुढेही आपण अशाच प्रकारे रस्त्यांच्या विविध कामांच्या ठिकाणी केव्हाही भेट देऊन गुणवत्तेसंदर्भात पाहणी करू. यावेळी कामात कोणताही हलगर्जीपणा केला जात असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर महापालिकेच्या माध्यमातून निश्चितपणे कारवाई होईल, असेही महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी त्यांच्यासमवेत महापालिकेचे शहर अभियंता संजय नेमाडे, साईट इंजिनिअर मनोज वानखेडे व ठेकेदाराचे सुपरवायझर व कामगार उपस्थित होते.

शालेय शिक्षण पोषण आहारातील प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे - *विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली मागणी*

शालेय शिक्षण पोषण आहारातील प्रलंबित अनुदान त्वरित द्यावे - *विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली मागणी*

नागपूर, अखलाख देशमुख, दि ३० : -  शालेय शिक्षण पोषण आहारातील ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान सरकारने त्वरित द्यावे, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. त्यावर अधिक माहिती देताना दानवे म्हणाले की, शालेय शिक्षण पोषण आहारासंदर्भात यापूर्वी शालेय शिक्षण मंत्री यांची भेट देखील घेतलेली आहे. शालेय पोषण आहाराचे एप्रिल ते सप्टेंबर  २०२२ पर्यंतचे ७० टक्के अनुदान वितरित करण्यात आलेले आहेत. मात्र आता डिसेंबर महिना संपत आला असून ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंतचे प्रलंबित अनुदान कधीपर्यंत देण्यात येईल असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला. 

तसेच नागपूर शहरात तांदूळासंदर्भातील गैरव्यवहार झाला आहे त्यावर फौजदारी कारवाई कधी होणार असा सवाल देखील त्यांनी सभागृहात उपस्थित केला त्यावर शालेय शिक्षण मंत्री यांनी उत्तर देताना म्हटले की, शालेय पोषण आहार संदर्भात प्रलंबित अनुदान हे इंधन व भाजीपाल्याबाबत आहे.  संबंधितांना कंत्राटदार यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यास अडचणी येत असल्याने त्यांना बिल पास करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने भरण्याची  सवलत दिली आहे. शालेय पोषण आहाराचे अनुदान देण्यात येईल. तसेच यापुढेही या वर्गाला प्राथमिकता देण्यात येईल.

नागपूरमधील तांदूळ गैरव्यवहारप्रकरणी संबंधित बचतगटाला काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे. तसेच त्यावर पोलीस आवश्यकतेनुसार कारवाई करत असल्याची माहिती दिली.

ऑलिम्पिक क्रीडाज्योतला जळगाव येथून सुरुवातमान्यवरांसह महापौर सौ.महाजन यांनी दाखविली हिरवी झेंडी !

ऑलिम्पिक क्रीडाज्योतला जळगाव येथून सुरुवात
मान्यवरांसह महापौर सौ.महाजन यांनी दाखविली हिरवी झेंडी !

जळगाव, अखलाख देशमुख, दि ३० : महाराष्ट्र शासन आयोजित जळगाव येथे मिनी राज्य ऑलिम्पिक सॉफ्टबॉल, मल्लखांब, खोखो, शूटिंगबॉल या खेळाच्या स्पर्धा होत आहे. त्यानिमित्त गुरुवार, दि. 29 डिसेंबर 2022 रोजी क्रीडाज्योत जळगाव येथून नाशिककडे रवाना झाली. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन व जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी क्रीडाज्योतला हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी पोलीस बॅण्ड पथकाने देशभक्तीपर गीते वाजवून ज्योतचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, क्रीडा शिक्षक डॉ.प्रदिप तळवलकर, सौ.अंजली पाटील, जिल्हा शूटिंगबॉल असोसिएशनचे अशोक चौधरी, जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव जयांशु पोळ, जिल्हा एथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.ईकबाल मिर्झा, क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, क्रीडा अधिकारी मार्क धर्माई, जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे सहसचिव अनिल माकडे, जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सहसचिव नरेंद्र भोई यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने यांनी तर प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित यांनी केले. जळगाव शहरातून निघालेल्या ‘क्रीडाज्योत’चे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करीत प्रत्येक चौकात बँडपथक व ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. शहरापासून विद्यापीठ पर्यत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून विद्यार्थी व नागरिक यांनी ज्योतचे स्वागत केले. क्रीडाज्योत रॅलीत सॉफ्टबॉल, मल्लखांब, खोखो, शुटिंगबॉल या खेळांच्या खेळाडूंसह अनेक जिल्हा क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू, पोलीस विभागाचे कमांडो खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

मांजर्ली गावातील शेतकऱ्यांची पांरपारीक पध्दतीने भाताची साठवणूक, नामशेष होत असलेला "कनगा" पुन्हा उजेडात !

मांजर्ली गावातील शेतकऱ्यांची पांरपारीक पध्दतीने भाताची साठवणूक, नामशेष होत असलेला "कनगा" पुन्हा उजेडात !

कल्याण, (संजय कांबळे) : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व्यवसाय सुरू झाल्याने बळीराजा ची अनेक अवजारे, साहित्य जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावर असताना कल्याण तालुक्यातील मांजर्ली गावातील शेतकरी नकलू बारकू घारे यांनी मात्र बांबूच्या काड्यापासून 'कनगा' बनवून त्यामध्ये भाताची साठवून केली आहे. यामुळे नैसर्गिक पध्दतीने भात दिर्घकाळ टिकतात असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला हा कनगा पुन्हा उजेडात आला आहे.

भारत हा शेतीप्रधान देश आहे. परंतु आजही या देशातील शेतकरी पांरपारीक पध्दतीने शेती करतात अशी नेहमी ओरड होते,  यातून कर्ज बाजारी होऊन ते आत्महत्या करता मागील जानेवारी पासून ते आतापर्यंत जवळपास २ हजाराच्या आसपास शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.

अलिकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात आधुनिक शेतीच्या मागे लागले आहेत. त्यामुळे बैलजोडी च्या जागी ट्रक्टर, तसेच इतर यंत्राचा वापर वाढला आहे, तिफन, नांगर, कुदळ, विळे, खुरपे, या शेतकऱ्यांच्या पांरपारीक अवजारांची जागा आता आधुनिक यंत्रानी घेतली आहे. बेसुमार रासायनिक खतांचा वापर वाढल्याने जमीनीचा पोत खालावत चालला आहे, सेंद्रिय खतांचा वापर, सेंद्रिय शेती अत्यल्प दिसून येत आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येत आहे.

राज्यातील काही भागात आजही बहुजन, आदिवासी शेतकरी पांरपारीक पध्दतीने शेती करत आहेत. नगर मधील, अकोले तालुका, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, येथे अशी शेती पाह्याला मिळते. मुंबई शहराच्या उपनगरातील शेती जवळपास संपुष्टात आली आहे. कल्याण, भिवंडी, शहापूर, अंबरनाथ ,मुरबाड आदी तालुक्यातील काही मोजक्याच भागात शेती केली जात आहे. या परिसरात देखील भातशेती च्या जागी फार्म हाऊस, इमारती, रेस्टॉरंट, हाँटेल, अशी सिंमेट ची जंगले पसरत आहेत. यावर अजूनही कडी म्हणजे या परिसरातून अनेक एक्स्प्रेस, महामार्ग, जात आहेत, यामुळे तर शिल्लक राहिलेली शेती ही असून नसल्यासारखी झाली आहे.

अशाही परिस्थितीत कल्याण तालुक्यातील मांजर्ली गावातील शेतकरी नकलू बारकू घारे यांनी पांरपारीक पध्दतीची कास सोडलेली नाही. अगदी नांगरणी, कुळवनी, चिखलनी, पासून ते कापणी, झोडणी, हरपनी, अशी सर्व शेतीची कामे ते बैलजोडी व घरातील माणसाच्या मदतीने करतात.अगदी कापणीच्या वेळी भारे बांधण्यासाठी व प्लास्टिकच्या बंदाऐवजी चिबां-याचे बंद वापरतात, तसेच इतर शेतकरी झोडलेला भात गोण्या किंवा लोंखडी हौद याचा सर्रास वापर करतात. परंतु यांनी बांबूच्या काड्या चिरून त्यांच्या पासून कनगा बनवून त्यामध्ये भात साठवणूक केली आहे.

भात कापणी नंतर त्याची झोडणी केली जाते, यानंतर हरपनी केल्यावर ते भात गोण्या किंवा पत्र्याच्या हौदात (पेटी) ठेवले जाते, हा भात पुर्णपणे सुकलेला नसतो, अलीकडे तर वर्षभर पाऊस पडतो. यामुळे भात साठवणूक करणे अवघड असते. गोणीत किंवा पत्र्याच्या हौदात तो खराब होतो, याउलट या बांबूच्या कनग्यात त्याला नैसर्गिकरित्या वातावरण मिळते,या कनग्यामध्ये सुमारे १०/१५ क्विंटल भाताची साठवणूक करता येते. तसेच  यामुळे तो दिर्घकाळ टिकतो असे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. याशिवाय आपण आपल्या ग्रामीण संस्कृती ची जोपासना करतो याचे समाधान मिळते असेही घारे यांचा विश्वास आहे.

खरेच आजच्या आधुनिकतेच्या नावाखाली चंगळवादी दुनियेत आपण आपल्या चालीरीती, पंरपरा, संस्कृती याची जोपासना करतो का?याचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या सोईनुसार देईल. परंतु कल्याण सारख्या झपाट्याने शहरीकरण होत असलेल्या या तालुक्यातील मांजर्ली गावातील शेतकऱ्यांचे हे काम नक्कीच 'खेड्याकडे चला, म्हणायला लावणारे आहे.

राष्‍ट्रीय ग्राहक दिनानिमित्त तृतीयपंथीयांना शिधापत्रिकेचे वाटप‌ !

राष्‍ट्रीय ग्राहक  दिनानिमित्त तृतीयपंथीयांना शिधापत्रिकेचे वाटप‌ !

*_•चित्ररथाद्वारे जनजागृती_*

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ३० :  राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने आणि  सामाजिक विकास संस्थेच्या सहकार्याने 40 तृतीयपंथी कुटुंबांना केशरी शिधापत्रिकेचे वितरण जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण आयोगच्या अध्यक्षा स्मिता कुलकर्णी आणि  जिल्‍हापुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा मार्फत  राबविण्‍यात येणा-या धान्‍य वितरण योजना बाबत जनजागृती करण्यासाठी बनविण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि जिल्हा पोलिस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते  करण्यात आले.
या चित्ररथाव्दारे ग्राहक  संरक्षण कायदयातील तरतुदी,तक्रार निवारण प्रणाली तसेच पुरवठा विभागाशी सबंधीत योजना बाबत जनजागृती करण्‍यात येणार आहे. हा चित्ररथ औरंगाबाद शहर  तसेच सर्व तालुका मुख्‍यालयाचे ठिकाणी जनजागृती करणार आहे.

राष्‍ट्रीय ग्राहक दिनानिमीत्‍त अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा मार्फत या वर्षीची “Effective disposal of cases in Consumer Commissions ”  हि संकल्‍पना आहे.  

याप्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमती स्मिता कुलकर्णी यांनी  राष्‍ट्रीय ग्राहक दिनानिमीत्‍त अन्‍न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागा मार्फत या वर्षीची “Effective disposal of cases in Consumer Commissions ”   या संकल्‍पनेची माहिती दिली. तसेच ग्राहकांना तक्रार असल्‍यास त्‍या करीता दाद मागण्‍यासाठी उपलब्‍ध यंत्रणे बद्दल माहिती दिली तसेच ग्राहक आयोगाने या वर्षी ऑनलाईन पोर्टल सुरू केले असून ज्‍याव्दारे 18 भाषेत ग्राहक तक्रार नोंदवू शकतील यामुळे ग्राहकांचा तक्रार दाखल करण्‍याकरिताचा वेळ व परिश्रम वाचतील असेही त्यांनी सांगितले.

सहाय्यक जिल्‍हापुरवठा अधिकारी सोनाली जोंधळे  यांनी आभार  मानले.

Thursday 29 December 2022

औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण करण्याचे निर्देश !

औरंगाबाद ते अजिंठा रस्त्याचे काम जानेवारी अखेर पूर्ण करण्याचे निर्देश !

*_• G-20 च्याअनुषंगाने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची संयुक्त पाहणी_*

  औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि  २९ : जळगाव टी पॉइंट ते अजिंठा लेणी पर्यंतच्या रस्त्याची कामे जानेवारी अखेरपर्यंत  पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी राष्ट्रीय रस्ते विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी हर्सूल ते अजिंठा रस्त्याची संयुक्त पाहणी केली.

तहसीलदार आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांत समन्वय ठेवून रस्त्याचे काम पुर्ण करावे. या कामात कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही  श्री  पाण्डेय यांनी सांगितले.

यावेळी पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया, उपविभागीय  अधिकारी रामेश्वर राडगे, तहसीलदार ज्योती पवार, फुलंब्री तहसीलदार शीतल राजपूत, सिल्लोड तहसीलदार विक्रम राजपूत, सोयगांव तहसीलदार श्री जसवंत, पल्लवी सोनवणे, कार्यकारी अभियंता, राष्टीय महामार्ग औरंगाबाद, विकास महाले, कार्यकारी अभियंता राष्टीय महामार्ग धुळे, शाखा अभियंता सागर कळंब, गजानन कामेकर तसेच  संबंधित अधिकारी  व कर्मचारी रस्ते पाहणी दरम्यान उपस्थित होते.

पर्यटकांची संख्या पाहता अजिंठा लेणी परिसरात रुग्णवाहिका आणि डॉक्टराची नेमणूक करावी. एक खिडकी तिकीटाची निर्मिती तसेच वीजपुरवठा खंडित होवू नये म्हणून महावितरण आणि वन विभागाने याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. लेणी परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पुरातत्व विभाग यांनी पर्यटकांसाठी आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध करुन  देण्याचे निर्देश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले .

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या ; "मुख्य क्रीडा ज्योत" रॅलीचे किल्ले रायगडवरून आयोजन !

महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या ; "मुख्य क्रीडा ज्योत" रॅलीचे किल्ले रायगडवरून आयोजन !
 
अलिबाग, झी. 29 : महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि.02 ते दि.12 जानेवारी 2023 या कालावधीत शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे तसेच इतर जिल्ह्यांमध्ये “महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धां”चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत एकूण 39 क्रीडा प्रकारांचा समावेश असून एकूण 10 हजार 546 खेळाडू, मार्गदर्शक, पंच सहभागी होणार आहेत. एकूण 39 क्रीडा प्रकारांपैकी 19 क्रीडा प्रकारांचे आयोजन हे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणार आहे. 

तर मुख्य क्रीडा ज्योत रॅली दि.04 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 9.00 वा. किल्ले रायगड येथून सुरु होऊन पुणे येथे सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल महाळूंगे येथे पोहोचणार आहे.

या मुख्य क्रीडाज्योतीच्या आयोजनाकरिता जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे जी.टी.सी.सी.सदस्य आणि क्रीडा ज्योत समन्वयक श्री.अमित गायकवाड पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड श्री.रविंद्र नाईक  हे उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाकडून या मुख्य क्रीडा ज्योत रॅलीकरिता सर्वतोपरी सहकार्य केले जाईल,असे जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी यावेळी सांगितले.  तसेच महाड उपविभागीय अधिकारी श्रीमती प्रतिमा पुदलवाड आणि महाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.महादेव रोडगे यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आवश्यक सर्व परवानग्या तसेच इतर आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.

या मुख्य क्रीडा ज्योत रॅलीची सुरुवात किल्ले रायगड येथून दि. 4 जानेवारी 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता होणार असून प्रसंगी पुणे येथून 20 धावक येणार आहेत. तसेच रायगड जिल्ह्यातून देखील क्रीडापटू धावक सहभागी होतील तसेच इतर शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी या क्रीडा ज्योत मध्ये सहभागी होतील.

आयोजन समिती मार्फत किल्ले रायगड येथे फुलांची सजावट करण्यात येणार आहे. मुख्य क्रीडा ज्योत रॅली रायगड येथून निघून ताम्हिणी घाटातून पुणे येथील शिव छत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे पोहोचेल..,

‘साहिबजादे’ यांना महाराष्ट्राचा मानाचा सलाम

‘साहिबजादे’ यांना महाराष्ट्राचा मानाचा सलाम

महाराष्ट्र आणि पंजाब यांचे शतकांचे नातं आहे. हे नातं आत्मतीयेचे आहे. आंतरीक असे हे नातं आहे. संत नामदेव भारत भ्रमण करीत असताना पंजाबच्या घुमानमध्ये पोहोचले आणि तिथलेच झालेत. त्यांच्या वाणीत, कर्तृत्वात ऐवढे बळ होते. त्यांच्या अभंगांचा अंर्तभाव ‘गुरू ग्रंथ साहेब’ मध्ये आहे. दशमेश (दहावे)गुरू गुरू गोविंदसिंग यांना ही महाराष्ट्रात यावेसे वाटले. नांदेडमध्ये त्यांच्या नावे ‘सचखंड श्री हजूर साहेब’ असे शीख अनुयायांचे महत्वाचे तीर्थस्थळ आहे. हा काही योगायोग नसावा. अस व्हायचं असेल. म्हणूनच ते झालं. 

महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये असणारे साधर्म्य हे अनेक विषयात दिसून येते. स्वातंत्र्य पूर्व काळात महाराष्ट्र आणि पंजाब यांनी कित्येक क्रांत‍िकारांना जन्म दिला. देशाचे नेतृत्व केले. भगतसिंगासोबत हसत हसत फाशीवर चढणारे राजगुरू हे ही महाराष्ट्राचे.  महाराष्ट्र आणि पंजाब चे ऋणानुबंध  किती विशेष आहे. दोन्ही राज्यातील बहुसंख्य जनता ही कृषीनिगडीत व्यवस्थेवर आधार‍ित आहे. पंजाब रेंजीमेंट आणि मराठा रेजीमेंटच्या शौर्य गाथा आपण ऐकतच मोठे झालेलो आहोत. देशाच्या मातीसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे महाराष्ट्र आणि पंजाब हे शौर्य आणि धाडस, आणि अध्यात्माची पंरपरा जोपसाणारे राज्य आहेत.

महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये  साहसाचे बाळकडू त्यांना घरूनच पाजले जाते.  माता गुजरी आणि गुरू तेगबहादूर यांच्याकडून अदम्य साहसाचे संस्कार गुरू गोविंदसिंग यांना मिळाले आणि पूढे हाच वारसा त्यांच्या ‘साहिबजादे’बाबा अजीत सिंग, बाबा जुझार सिंग तसेच ‘छोटया साहिबजादे’ साहिबजादे बाबा जोरावरnसिंग आणि बाबा फतेहसिंग यांना मिळाला. अन्यायाविरूद्ध लढण्याची ताकद त्यासाठी शेवटपर्यंत निसंकोचपणे शौर्याने उभे राहणे या साहिबजादयांचे आचरण ‘मूर्ती लहान आणि किर्ती महान’ अशीच आहे. त्यांना 26 डिसेंबर ला हौतात्म आले. 

त्यांच्या या दिवसाला ‘वीर बाल दिवस’ म्हणून पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला. पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांचा गुरू गोविंदसिंगशी असलेले नातं बघता या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना नवी दिल्ली येथे आयोजित उपक्रमास मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये येथे आंमत्रित करण्यात आले. 

या ऐतिहास‍िक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले संबोधन उपस्थितांच्या  ह्दयात भ‍िडले असल्याच्या भावना उपस्थितांच्या चेह-यावर दिसत होत्या. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या समागमनातील उपस्थिती आणि संबोधनामुळे पंजाब आणि महाराष्ट्राच्या नात्यात नव्याने दृढता निर्माण होईल.

अवघ्या 9 वर्ष आणि 6 वर्षांचे वय असणारे छोटे साहिबजादे बाबा जोरावरतसिंग आणि बाबा फतेहसिंग यांनी अदम्य शौर्याचे परिचय देऊन आपले प्राण अर्पण करून स्वाभ‍िमानीपणाने शहादत दिली. त्यांच्यामध्ये गुरू गोविंदसिंग यांचे रक्त असल्यामुळे या साहबजादे यांनी अदम्य धाडस दाखविले. त्यांच्या या धाडसाला महाराष्ट्राच्या जनतेचा सलाम.

अंजु निमसरकर
माहिती अधिकारी
 ्

दासगावची जञा ____

दासगावची जञा ____

जेमतेम मी दहा बारा वर्षांचा असेन महाड, दासगांव मधील भैरीभवानीची जत्रा ही एप्रिलमध्ये असते.

तस पहाता 'मामाच गाव कोणाला नाआवडीच नसतं' मला मामाचं गाव दासगाव, बामणेकोंड प्रचंड आवडायचं. अस वाटायचं कधी शाळेला सुट्टी पडते आणि कधी मी आजोळ्यास जाईन याची वाट पहावी लागायची. अशीच एका रविवारी सुट्टी आणि दासगावची जत्रा एकाच ताळमेळमध्ये आल्याने मी आजोबा म्हणजे माझ्या आईचे बाबा, आई माझा छोटा भाऊ सुनिल आम्ही पालवणीतुन दासगावला जत्रेसाठी गेलो. तर तेथील ग्रामस्थ एकत्र जमुन जंगलातुन मोठा जाडसर लाकुड आणुन त्याची आपापल्या पधतीने पुजा करताना पहायला मिळालं. आजोबांच्याही घरासमोर पुजा करण सुरू होतं माझ्या आईने व आजीने आम्हा दोघा भावडांना पुजा करुन नमस्कार करावयास सांगितले. मग मी आजीला विचारलं याला काय म्हणतात पुजा का करतात? यावर आजी आम्हादोघा भावंडाना म्हणाली या लाकडाला "भैरीभवानीची लाट असे म्हणतात" व ती खालुबाजा वाजवत तसेच लेझिमचे विवीध खेळ नाचवत भैरीभवानी मंदिरापर्यंत घेऊन जातात. मी ही छोटाभाऊ सुनिलचा हात पकडुन मामाच्या मागुन गावकर्यांच्यात सामिल होऊन गेलो. नतंर ती लाट सहा खाबांच्या सहाय्याने ऊंच चढवली गेली. नतंर दोन्ही बाजुला पिळदार दोरी बांधुन काही ग्रामस्थ एका बाजुला तर काही दुसर्या बाजुच्या दोरखंडाला लटकुन धाऊन फेऱ्या मारत होते. अशाच मी सात फेऱ्या पाहील्या. मला हे एक वेगळ चित्र पाहुन आनंद गगणात मावेनासा झाला. संध्याकाळी जत्रेतून खेळणी व काहीतरी खाण्याचा आईबरोबरचा तो बालहट्ट करायच. त्यावेळी मामाच्या शेतात पावटा, मुग, हरभरे, तुरची लागवड बर्यापैकी आली होती. गरमपाण्यात शिजवलेले पावटे, तुरीचे दाणे खाण्याची मजाच वेगळी होती. एकदातर मामांनी कमालच केली, पोपटी लावली शेतात खायला घेऊन गेले. मामांना मी विचारलं पोपटी म्हणजे काय? मामा म्हणाले एक मडंक त्यात भांबुरड्याचा पाला पावटे तुरी अंडी मटन मसाले मीठलाऊन अस  एकत्र करुन शेतात चुलीवर तयार करतात.

श्री.गणेश अं.नवगरे.                              छायांकन - सुरेंद्र राणे
अंधेरी (पश्चिम)
मोब.नं.९८६९७१५४१३


भिवंडी कोपर येथे सरपंचपदी श्री .हेमंत घरत व उप सरपंचपदी सौ. अस्मिता घरत विराजमान !

भिवंडी कोपर येथे सरपंचपदी श्री .हेमंत घरत व उप सरपंचपदी सौ. अस्मिता घरत विराजमान !
भिवंडी, दि,२९, अरूण पाटील (कोपर) :
        भिवंडी तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या पंच वार्षिक सरपंच निवडणुकीत कोपर गावातून जनतेतून थेट बहुमताने निवडून आलेले  सरपंच श्री. हेमंत घरत हे  सरपंच पदी विराजमान झाले आहेत, तर उप सरपंच पदी सौ.अस्मिता घरत या विराजमान झाल्या आहेत.
         कोपर गावात पार पडलेल्या या  पंच वार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व महाराष्ट्र नव निर्माण सेनेची युती होऊन श्री. कोपरेश्वर महा विकास आघाडी पॅनलची स्थापन होऊन या आघाडी व्दारे  निवडणूक लढविण्यात आली होती.
      या निवडणुकीत बिजीपीच्या सौ.अरुणा दत्तात्रे पाटील, सौ. विमल कबीर पाटील, व यतेश महेश म्हात्रे हे तीन उमेदवार निवडून आले.तर मनसेचे श्री संजय पांडुरंग पाटील,प्रभाकर लक्ष्मण पाटील व सौ,अस्मिता रुपेश घरत हे तीन उमेदवार असे मिळून सहा उमेदवार व जनतेतून थेट सरपंच म्हणून श्री हेमंत सूर्यकांत घरत निवडून आले.
         आज, ( दि.२९/१२/२०२२) रोजी भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तथा निवडणुक निरीक्षक श्री.सोनवणे यांनी सरपंच श्री.हेमंत घरत यांना सरपंच पदाचा कार्यभार सोपवला.तर उपसरपंच पदासाठी सौ अस्मिता घरत यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणुक निरीक्षक श्री.सोनवणे यांनी सौ.अस्मिता घरत यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
        या सरपंच,उपसरपंच सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. डी.के. म्हात्रे, ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे आर.पी.आय.चे इंदिसे,वळ गावचे उद्योगपती वसंतसेठ भोईर, अनंत लक्ष्मण पाटील (मास्तर) ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष राजू पाटील, काल्हेर गावचे.श्रीधर पाटील.,पुंडलिक भोकरे, सुजित (तात्या) पाटील, उपस्थीत होते.
           तसेच गावातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या वेळी गावातील पत्रकार श्री.अरुण पाटील, माजी.सरपंच श्री बुधाजी का. पाटील, गोरखनाथ पाटील, सूर्यकांत घरत, देवराम पाटील, कबीर पाटील, डी.के.पाटील ,दत्तात्रेय पाटील, केशव पाटील, ज्ञानेश्र्वर भंडारी, भगवान भंडारी, सुरेश म्हात्रे, संतोष म्हात्रे, भारत पो. पाटील, सोपं पाटील, परूनाथ पाटील, रुपेश घरत, संतोष पाटील, संदीप सू.पाटील सह ईतर ग्रामस्थ  व माजी उपसरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंकशास्त्रावरील ‘सक्सेस इन लाईफ : न्युमरो मॅजिक' पुस्तक प्रकाशित !

अंकशास्त्रावरील ‘सक्सेस इन लाईफ : न्युमरो मॅजिक' पुस्तक प्रकाशित !

 मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर )
         नवी मुंबई निवासी गणितज्ञ व अंकशास्त्री मनोहर आर पुथ्रान यांनी लिहिलेल्या ‘सक्सेस इन लाईफ : न्युमरो मॅजिक' या प्रियांका चोप्रा, ईशा अंबानी व दिपिका पदुकोण यांना समर्पित केलेल्या पुस्तकाची पहिली प्रत 'नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्‌स'चे उपाध्यक्ष व वरिष्ठ पत्रकार विश्वरथ आर. नायर यांच्या हस्ते 'न्युजबॅण्ड' दैनिकाच्या उपसंपादिका मीना प्रशांत यांना प्रदान करण्यात आली.

        पुस्तकाचे लेखक मनोहर आर. पुथ्रान तसेच दैनिक आपलं नवे शहर चे उपसंपादक राजेंद्र घरत, नंदकुमार ठाकूर यांच्या उपस्थितीत दै.न्युजबॅण्डच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

Wednesday 28 December 2022

अभ्युदय नगरमध्ये पोहचली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते "किशोरदादा गणाई" यांची "शिक्षणवारी" ,!

अभ्युदय नगरमध्ये पोहचली ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते "किशोरदादा गणाई" यांची "शिक्षणवारी" ,!

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते "किशोरदादा गणाई" यांच्या कल्याण ते कुलाबा संकल्प व्हीलचेअर शिक्षणवारीने  भारतीय कम्युनिष्ट पक्ष अभ्युदय नगर शाखेला भेट दिली. 

जेष्ठ कार्यकर्ते किशोरदा गणाई (जगताप) गेली चाळीस वर्षे शिक्षणापासून वंचित व शिक्षणबाह्य मुलीमुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी बागशाळा, फुटपाथ शाळा, वस्तीशाळा व महत्वाचे म्हणजे मैत्रकुल चालवतात, जे एकार्थाने आधुनिक गुरुकुल आहे, जे गेली ५ वर्षे कल्याण-भिवंडी रोडवर बापगाव येथे भाड्याच्या जागेत आहे, अशी माहीती मैत्रकुलच्या संचालक पुजा गाई यांनी दिली.

मैत्रकुल स्वतःच्या हक्काच्या जागेत सुरु करून बांधण्याकरता एक कोटीची गरज आहे त्या करता किशोरदा संकल्प व्हिलचेअर यात्रा शिक्षणवारी ६ ऑगस्ट २०२२ अर्थात 'हिरोशिमा दिवस" पासून सुरूवात करण्यात आली आहे. 

गेली ५ वर्षे मैत्रकुल हे भाडेतत्त्वावर चालत आहे पण अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून मैत्रकुल आता स्वतःची जागा घेण्यासाठी तसेच याच जागेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे वाचनालय, तंत्रज्ञान खोली, लहान मुलांसाठी खेळणीघर, कलाकारांसाठी वेगळी जागा अशा विविध सुविधा करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे. या संपूर्ण उपक्रमासाठी लागणारा निधी हा संकल्प व्हीलचेअर यात्रेच्या माध्यमातून आपल्या दारोदारी येऊन ५ हजार लोकांकडून प्रत्येकी २००० रुपयांच्या मदतीने उभा करण्याचा संकल्प किशोरदादा यांनी केला आहे.  

हीच "शिक्षणवारी" 'भारतीय कम्युनिष्ट पक्ष अभ्युदय नगर कार्यालयाजवळ पोहचल्यानंतर त्यांचे जोषात स्वागत करण्यात आले. त्या प्रसंगी कॉ. विजय राणे यांच्या हस्ते वही पेन व शिक्षणवारीला खारीचा वाटा म्हणून आर्थिक मदत भारतीय कमुनिस्ट पक्ष अभुदय नगर शाखा सचिव कॉ. संजय खळे यांच्या हस्ते देण्यात आली. त्याप्रसंगी मुंबई सचिव मंडळ सदस्य कॉ. प्रसाद नारायण घागरे आणि पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर सदर वारी अभ्युदय नगर ज्येष्ठ नागरिक संघ आणि अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ येथे निधी संकलनासाठी गेली. 

स्वाभिमानी, स्वावलंबी, उच्चशिक्षीत, सामाजिक भान असलेले कृतीवंत विद्यार्थी घडवणाऱ्या मैत्रकुलला ५०० विद्यार्थ्यांच्या निवासाकरता, कल्याण ग्रामीण मध्ये स्वतःची २ एकर जागा घेण्याकरता १ कोटी हवेत म्हणून शिक्षणवारी गेली ४ महिने झाले तरी पावसात, उन्हात, थंडीवार्‍यात चालूच आहे.

मुंबईच्या आमदारांच्या क्षेत्रात वणवण फिरत पायलट टिम रोज मार्ग ठरवत आहे. अजून चार हजार साथींनी स्वतः वा मित्रपरीवार / संस्था मिळून किमान २००० रूपये दिल्यास १ कोटींचा संकल्प पुरा होईल. 

बँकेचा तपशील:-
Chhatrashakti sanstha Bank of Baroda (For building fund only)
छात्रशक्ती संस्था बँक ऑफ बरोडा
Acount no. (खाते क्रमांक) 34910100008577  
Ifsc code (आयएफएससी कोड) BARBOKHADAK (fifth character is zero)
जीपे ९०२९८९५१२० ॲड. पुजा बडेकर

कृपया चेक “छात्रशक्ती संस्था" या नावाने काढावा असे छात्रशक्ती संस्थेच्या मानद अध्यक्षा अॅड. पुजा बडेकर यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील तीन साहित्यिकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान !

महाराष्ट्रातील तीन साहित्यिकांना साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान !

मराठी, संस्कृत, ऊर्दु भाषेसाठी पुरस्कार

नवी दिल्ली,  28 : महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना क्रमश: मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठित ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

येथील कमानी सभागृहात मंगळवारी युवा साहित्यिक पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध साहित्यिक ममता कालिया उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण 24 भाषेसाठी ‘युवा साहित्यिकांना वर्ष 2022 चे साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांचा समावेश आहे.
 
मराठी भाषेसाठी युवा साहित्यिक पवन नालट यांना ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्य संग्रहासाठी  ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या साहित्यकृतीत 'मी संदर्भ पोखरतोय' या शिर्षकातूनच बऱ्याच गोष्टी व्यक्त होत असल्याचे श्री नालट म्हणाले.  मी म्हणजे सामान्य माणूस, मी चा संदर्भ समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,आर्थिक या सर्व घटकांमध्ये जे अनिष्ट आहे त्याला पोखरण्याचे काम हा सामान्य माणुस करू शकतो. अशा आशयाच्या कविता या काव्य संग्रहात असल्याचे श्री नालट म्हणाले.
    
श्री नालट हे मुळचे अमरावतीचे असून ते  शिक्षक आहेत. त्यांच्या याच कविता संग्रहाला के.बी. निकुंब काव्यसंग्रह पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा नवोदित साहित्य लेखनाचा पुरस्कार तसेच डॉ. किसनराव पाटील वाड:मय  पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
 
‘श्रीमतीचरित्रम्’ या संस्कृत काव्य संग्रहासाठी श्रुती कानिटकर यांना पुरस्कार
        
मुंबईच्या श्रुती कानिटकर यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील ‘श्रीमतीचरित्रम्’ या काव्यसंग्रहासाठी ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राधा-कृष्ण प्रेम हे सर्व परिचित आहे. कृष्णाबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्र, राधाबद्दल कमी लोकांना माहिती असल्याचे श्रुती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, राधा या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या काव्यसंग्रहात करण्यात आलेला आहे. हे काव्य सात विभागात आहे.  प्रत्येक भागाला लीला असे नाव देण्यात आलेले आहे. यात प्रेम भक्ती व्यक्त करण्यात आलेली आहे. 
 
श्रुती कानिटकर या आयआयटी मुंबईत  सहायक प्राध्यापक आहेत. त्या वेदांतमध्ये पी.एच.डी करीत आहेत.  श्रुती यांनी वयाच्या 11 वर्षापासून लेखनाला सुरूवात केली. त्यांच्या श्रीमतीचरित्रम् (कविता संग्रह), सुभाषित – रत्नभांडागारम् (मराठीतील अनुवादाला)  श्रीपाद सेवा मंडळ काव्य लेखन स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे. 
 
‘गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना युवा साहित्यचा पुरस्कार
 

‘गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना वर्ष 2022 चा ‘युवा साहित्य’ साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा ग़ज़ल संग्रह  सामाजिक संबंध, मानवीय मूल्य,  श्रम आणि आधुनिक दुनियेतील भ्रम यावर आधारित आहे. हा संग्रह पारंपरिक आणि आधुनिक ग़ज़लांचे संयोजन आहे. जीवनातील चढ उतार ग़ज़लांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेले आहेत. 
        
मुंबईचे मकसूद आफ़क़ हे शिक्षक आहेत. त्यांचे ऐतबार आणि गिरयाह हे दोन ग़ज़ल संग्रह आहेत. त्यांनी वेब सीरीज साठीही गीत लिहीले आहेत.  त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलेले आहे.

एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप...

एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप...

माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई व नारायण राणे यांच्यावर केले गंभीर आरोप... उच्चस्तरीय चौकशी करण्याची केली मागणी

औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि. २८ : 
शहरात नवीन उद्योग तर आणले नाही उलट चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत उद्योगासाठी दिलेल्या भुखंडाची खाजगी व रेसीडेन्स भुखंड करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई व नारायण राणे यांनी केला असल्याचा गंभीर आरोप पत्रकार परिषदेत केले आहे.
आज सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत ५१ भुखंडाचे आरक्षण बदलण्यासाठी प्रत्येकी दिड ते दोन कोटी रुपये घेण्यात आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा भुखंडाची चौकशी करण्यासाठी बक्षी समीती सन २०१८ मध्ये नियुक्त करण्यात आली होती. अगोदरच्या उद्योग मंत्र्यांनी सुध्दा अशा प्रकारे भुखंडाचे आरक्षण बदलण्यासाठी निर्णय घेतले असल्याने नारायण राणे यांच्यावर सुध्दा त्यांनी पत्रकार परिषदेत आरोप केले आहेत. राज्य सरकारने उच्चस्तरीय चौकशी नियुक्ती केल्यास अंदाजे एक हजार कोटींचा जमीन घोटाळा उघड होईल. दोषी असलेले तुरुंगात जातील. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये घोटाळ्यांची जणू मालिका सुरू असल्याचे दिसत आहे. सरकारने काही प्रकरणात एसआयटी चौकशीचे आदेश दिले. अशाच प्रकारे या प्रकरणात तपास करावा अशी मागणी त्यांनी राज्य सरकारला केली आहे.
यावेळी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष समीर साजिद बिल्डर, शहराध्यक्ष शारेक नक्शबंदी उपस्थित होते.

कु.अर्चिता परब कराटे स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदकाची मानकरी !

कु.अर्चिता परब कराटे स्पर्धेत सुवर्ण व कांस्य पदकाची मानकरी !

मुंबई उपनगर (शांताराम गुडेकर) :

              ९ वी इंटरनॅशनल स्टेट कराटे अँड वेपोन टुरनामेंट २०२२, छावा शिवकालीन बहुउद्देशीय कलामंच (छाया प्रतिष्ठान ) व शोटोकन कराटे -दो,ऑर्गनायझेशन घणसोली, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद स्कूल, सेक्टर २६, नवी मुंबई येथे संपन्न झाली.
             या स्पर्धेत, गोरेगाव पूर्व येथे स्थायिक असलेली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, बागतळवडे गावची सुकन्या, अर्चिता परब हिला कुमीटे स्पर्धेत- सुवर्ण पदक व काटा स्पर्धेत कांस्य पदक मिळाले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुवर्ण व कांस्य पदक देऊन सन्मानीत करण्यात आले .कु अर्चिता ही यशोधाम हायस्कूल ची विद्यार्थीनी असून इ. ६ वी मध्ये शिकत आहे. पंचजन्य मार्शल आर्ट या कराटे संस्थेत  गोपाळ शेट्टीगार यांच्या मार्गदर्शनाखाली ती प्रशिक्षण घेत आहे. या पूर्वीही कु अर्चिताने काराटेत अनेक पारितोषिके जिंकली आहेत.
           विवेक संकल्प गृह निर्माण संस्थेचे अध्यक्ष-धनंजय पाणबुडे, सचिव-छाया राणे, कोषाध्यक्ष-मनोज खंबाळ व पदाधिकारी यांनी घरी जाऊन कु अर्चिता हिचे पुष्पगुच्छ देऊन कौतुक केले.

जातीय सलोख्यासाठी भाकप ला मतदान करा.. काम्रेड देसले

जातीय सलोख्यासाठी भाकप ला मतदान करा.. काम्रेड देसले   परभणी, प्रतिनिधी.. भारतीय कम्युनिस्ट पक्ष देशात ज्या ज्या वेळी कष्टकरी अल्...