Friday, 30 December 2022

ऑलिम्पिक क्रीडाज्योतला जळगाव येथून सुरुवातमान्यवरांसह महापौर सौ.महाजन यांनी दाखविली हिरवी झेंडी !

ऑलिम्पिक क्रीडाज्योतला जळगाव येथून सुरुवात
मान्यवरांसह महापौर सौ.महाजन यांनी दाखविली हिरवी झेंडी !

जळगाव, अखलाख देशमुख, दि ३० : महाराष्ट्र शासन आयोजित जळगाव येथे मिनी राज्य ऑलिम्पिक सॉफ्टबॉल, मल्लखांब, खोखो, शूटिंगबॉल या खेळाच्या स्पर्धा होत आहे. त्यानिमित्त गुरुवार, दि. 29 डिसेंबर 2022 रोजी क्रीडाज्योत जळगाव येथून नाशिककडे रवाना झाली. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून सकाळी शहराच्या प्रथम नागरिक अर्थात महापौर व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका तसेच जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ज्ञ संचालिका सौ.जयश्री सुनिल महाजन व जिल्हा पोलीस उपअधीक्षक संदीप गावित यांनी क्रीडाज्योतला हिरवी झेंडी दाखविली.

यावेळी पोलीस बॅण्ड पथकाने देशभक्तीपर गीते वाजवून ज्योतचे स्वागत केले. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित, क्रीडा शिक्षक डॉ.प्रदिप तळवलकर, सौ.अंजली पाटील, जिल्हा शूटिंगबॉल असोसिएशनचे अशोक चौधरी, जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव जयांशु पोळ, जिल्हा एथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रा.ईकबाल मिर्झा, क्रीडा मार्गदर्शक मिनल थोरात, क्रीडा अधिकारी मार्क धर्माई, जिल्हा आट्यापाट्या असोसिएशनचे सहसचिव अनिल माकडे, जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सहसचिव नरेंद्र भोई यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा अधिकारी श्रीमती सुजाता गुल्हाने यांनी तर प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दीक्षित यांनी केले. जळगाव शहरातून निघालेल्या ‘क्रीडाज्योत’चे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करीत प्रत्येक चौकात बँडपथक व ढोलताशांच्या गजरात स्वागत केले. शहरापासून विद्यापीठ पर्यत रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून विद्यार्थी व नागरिक यांनी ज्योतचे स्वागत केले. क्रीडाज्योत रॅलीत सॉफ्टबॉल, मल्लखांब, खोखो, शुटिंगबॉल या खेळांच्या खेळाडूंसह अनेक जिल्हा क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू, पोलीस विभागाचे कमांडो खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक व नागरिक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

रिपोर्ट: सपोनि विनोद पाटील नेम. म.फुले चौक पोलीस स्टेशन कल्याण प. यांच्याकडुन विषय म.फुले चौक पो.स्टे. कल्याण येचील बेवारस वाहनांची माहीती व...