Monday 31 July 2023

ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ समृध्दी महामार्गावर पुलाचे गर्डर बसवताना अपघात, १६ जणांचा मृत्यू !

ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ समृध्दी महामार्गावर पुलाचे गर्डर बसवताना अपघात, १६ जणांचा मृत्यू !

भिवंडी, दिं,१, अरुण पाटील (कोपर) :
 
नागपूर-- मुंबई समृध्दी महामार्गवर अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून असाच एक विचित्र अपघात ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळ सरलांबे  समृद्धी एक्सप्रेस हायवेवर सोमवारी रात्री उशिरा  घडला आहे.या ठीकणी पुलाचे गर्डर बसवण्याचे काम सुरू असताना गर्डर लॉन्चिंग मशिन १०० फूट उंचीवरून खाली पडले. यात १६ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तिघे जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आताही अनेक मजूर दबलेले असण्याची भीती व्यक्त होत आहे. 

सद्या  बचावकार्य सुरू असून वास्तविक, गर्डर मशीनचे वजन जास्त असल्याने ते लवकर हटवण्यात अडचणीत येत आहेत. शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे १६ मृतदेह आणण्यात आले आहेत. 

एक्स्प्रेस वेवर रात्रीच्या वेळी गर्डर बसवण्याचे काम सुरू होते. त्यानंतर एक गर्डर मशीन खाली पडले. अवजड मशिन पडल्यामुळे बचाव पथकाला ढिगारा हटवण्यात अडचण येत आहे. एनडीआरएफचे पथक अपघातस्थळी बचाव कार्य करत आहे. गर्डरचा मोठा ढिगारा हटवण्यासाठी क्रेन घटनास्थळी पोहोचली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती... 

वृत्तानुसार, शाहपूर उपजिल्हा रुग्णालयात सुमारे १६ मृतदेह आणण्यात आले आहेत. तीन ते चार जखमींवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अंधारामुळे अजून किती लोक मशीनच्या गर्डरखाली गाडले गेले हे सांगता आले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्गाचे दोन टप्पे सुरू झाले आहेत. सध्या नागपूर ते इगतपुरी असा समृद्धी महामार्ग सुरू आहे. समृद्धी महामार्गाचा शेवटचा आणि तिसरा टप्पा डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा १०० किलोमीटरचा टप्पा आहे. 

समृद्धी महामार्गाला हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे नाव देण्यात आले आहे. मुंबई आणि नागपूरला जोडणारा हा ७०१ किलोमीटर लांबीचा द्रुतगती मार्ग आहे. जो नागपूर, वाशिम, वर्धा, अहमदनगर, बुलडाणा, औरंगाबाद, अमरावती, जालना, नाशिक आणि ठाणे या १० जिल्ह्यांतून जातो. 

समृद्धी महामार्गाचे बांधकाम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. डिसेंबर २०२२  मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी आणि नागपूर दरम्यानच्या ५२० किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गाव असा एकूण ६०० किमीचा रस्ता खुला करण्यात आला आहे.

पिक विमा योजनेची ३ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ !

पिक विमा योजनेची ३ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ !

*मुदतवाढ साठी प्रदिप वाघ यांनी  केली होती तहसिलदारांकडे मागणी*

जव्हार, जितेंद्र मोरघा :

महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या एक रुपयात पिक विमा योजनेला तालुक्यात चांगला प्रतिसाद लाभलेला असतांना दोन दिवसा पासुन फाॅर्म भरण्याचे सर्व्हर डाऊच होते.त्यामुळे शेतकर्‍यासह सी.एस.सी.केंद्र चालक यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासनाने आता पिक विमा  योजनेची मुदतवाढ ३ ऑगस्ट केली असुन मोखाडा तालुक्यातील शेकडो शेतकरी हे पिक विमा योजनेचा अर्ज भरण्या पासुन वंचित राहणार होते.त्यातच लाईट ची समस्या, नेटवर्क प्रोब्लेम अशा अडचणी मुळे शेतकरी बांधवांना अडचण येत होती.

या बाबतीत पंचायत समिती चे उपसभापती प्रदीप वाघ यांनी तहसीलदार यांना मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी देखील केली होती.अता शासनाने ३ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे असे प्रतिपादन  प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.

मुंबई -- जयपूर एक्सप्रेस मध्ये आरपीएफ जवानाचा अंदाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यु, आरोपीला अटक.

मुंबई -- जयपूर एक्सप्रेस मध्ये आरपीएफ जवानाचा अंदाधुंद गोळीबार, चौघांचा मृत्यु, आरोपीला अटक.

भिवंडी, दिं,३१,अरुण पाटील (कोपर) :

आज ( दिं,३१) रोजी मुंबई -- जयपूर एक्सप्रेस मध्ये पहाटे ५ वाजून २३ मिनिटांनी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन याने अंदाधुंद गोळीबार केला. ही घटना बोगी नंबर बी- ५ मध्ये घडली. चेतन हा एस्कॉर्ट ड्युटीवर तैनात होता. गोळीबार केल्यानंतर त्याने धावत्या ट्रेनमधून उडी मारली. तो दहिसरच्या दिशेने पळून जात होता. मात्र, मीरा रोड पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

जयपूर एक्सप्रेस ट्रेन (12956)च्या बी-५ बोगीत ही घटना घडली. ही ट्रेन जयपूरहून मुंबईला येत होती. हि एक्सप्रेस पालघर स्थानकाच्या काही अंतरावर असतानाच ही घटना घढली. सकाळी ५ वाजून २३ मिनिटांनी हा गोळीबार झाला. वापी ते मीरा रोड स्टेनशच्या दरम्यान आरपीएफ जवानाने अचानक चालत्या ट्रेनमध्ये गोळीबार केला. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातात चार लोकांचा मृत्यू झाला आहे. यात आरपीएफ जवान टीका राम आणि तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. टीका राम हे एस्कॉर्टचे प्रभारी होते.                                                                   
चेतन असे गोळीबार करणाऱ्याचं नाव आहे. तो आरपीएफचा कॉन्स्टेबल होता. चेतन एस्कॉर्ट ड्यूटीवर तैनात होता. गोळीबार केल्यानंतर त्याने धावत्या ट्रेनमध्ये उडी मारली. त्याला मीरा रोड आणि बोरिवलीच्या दरम्यान अटक केली. त्याच्या जवळील शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. चेतन आणि टीका राम यांच्यात वाद झाल्याने हा गोळीबार झाल्याचं सांगितलं जातं. मात्र, नेमकं कारण समोर आलं नाही. आरपीएफ या घटनेची चौकशी करत आहे. 

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पालघर स्टेशन सोडल्यनंतर एका आरपीएफ कॉन्स्टेबलने जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार केला. त्यात दुसऱ्या आरपीएफ जवानासहीत आणखी तीन प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यानंतर तो दहिसरमध्ये धावत्या ट्रेनमधून उडी मारून पळाला. मात्र, त्याला अटक करण्यात आली असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

बदली झाली म्हणून डिप्रेशनमध्ये गेलेल्या आरपीएफ कडून गोळीबार !!

बदली झाली म्हणून डिप्रेशनमध्ये गेलेल्या आरपीएफ कडून गोळीबार !!

*वरीष्ठ अधिकां-यासह तीनजण ठार,  रेल्वे मध्ये खळबळ*

कल्याण, (संजय कांबळे) : जयपूर ते मुंबई पॅसेंजर ट्रेनमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आह पालघर रेल्वे स्थानकाजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली आहे. पॅसेंजरच्या बी-5 बोगीमध्ये हा गोळीबार झाला आहे. गोळीबारात 4 जणांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये एका पोलिसाचाही समावेश आहे. आरपीएफच्या  चेतन सिंह या कॉन्स्टेबलनेच हा गोळीबार केल्याची माहिती कळते. आपली बदली गुजरात हुन मुंबई ला झाली म्हणून डिप्रेशनमध्ये गेलेल्या कारणामुळे हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही पॅसेंजर सध्या मुंबई सेंट्रल स्थानकात पोहचली आहे. पोलीस पथक, रेल्वे पोलीस पथक मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकात ट्रेनमध्ये पाहणी करण्यात येत आहे.

एस्कॉर्ट ड्युटीवर असलेल्या आरपीएफच्या कॉन्स्टेबलने केलेल्या या गोळीबारात आरपीएफचे एएसआय टीका राम यांच्यासह तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्या डब्यात ही घटना घडली, तो डबा पोलिसांकडून सिल करण्यात आला आहे. पोलीस सर्व तपास करत आहेत. गोळीबार का केला, याबाबत तपासाअंतीच स्पष्ट होईल. मृतांची ओळख पटवण्याचेही काम सुरु आहे. मीरा रोड स्थानकात ट्रेन थांबवून मृतदेह उतरवण्यात आले आणि शताब्दी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आले आहेत.
चेतन सिंह यांची बदली झाली होती, यामुळे तो मानसिक तणावाखाली होता, अशी माहिती मिळत आहे,त्यांने एएस आय टीका राम यासह इतरही तिघावर गोळीबार करणार होता अशा पण त्यांने प्रवाशाचा जीव का घेतला ते तपासणी तून समोर येणार आहे.

जयपूरहून मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजरमध्ये अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई सेंट्रल स्थानकात प्रवाशांना उतरवत तपास सुरु करण्यात आला आहे. या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेतर्फे अंधेरी येथील अंध महिलांच्या वसतिगृहास मदतीचा हात !!

मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेतर्फे अंधेरी येथील अंध महिलांच्या वसतिगृहास मदतीचा हात !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे कैवारी, हिंदू धर्मरक्षक,संयमी व प्रभावशाली नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्मा.पक्षप्रमुख लोकनेते श्री.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एकहात कर्तव्याचा या संस्थेतर्फे अंधेरी येथील नॅशनल अससोसिएशन फॉर द ब्लाइंड इंडिया काका पाटील सेन्टर या अंध महिलांच्या वसतिगृहास दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माजी केंद्रीय कॅबिनेट अवजड उद्योग मंत्री श्री.अनंत गिते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी दक्षिण रायगड जिल्हा संपर्कप्रमुख व विधानसभा संघटक श्री.संजय कदम,महाड तालुका संपर्क प्रमुख श्री.नागेंद्र राठोड, चंद्रकांत धोंडगे महाड पोलादपूर सहसंपर्कप्रमुख, ज्ञानोबा बादल पोलादपूर सहसंपर्कप्रमुख, प्रसाद आहीरे उपविभागप्रमुख, उदय महाले शाखा प्रमुख, दयानंद कडडी शाखाप्रमुख,संजय साखले शाखा प्रमुख,विश्वास तेली उपशाखा प्रमुख, प्रशांत घोलप सहचिटणीस रिक्षाचालक, सुनंदा नादभोवकर, प्रज्ञा सावंत महिला शाखासघटिका, संजीवनी घोसाळकर युवा विभाग अधिकारी, रमेश वागळे युवा विभाग अधिकारी, मीनाली पाटील उपमहीला सघटिका व मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. यशवंत खोपकर, संचालक श्री.सदाशिव लाड, सचिव श्री.प्रमोद चौंडकर, खजिनदार श्री.संदीप चांदिवडे, श्री विश्वनाथ जाधव, श्री.दौलत बेल्हेकर, श्री.वसंत घडशी, श्री.श्रीकांत चिंचपुरे, श्री राजेद्र पेडणेकर, सुभाष खोडदे, सौ. समीता बागकर व आदी पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sunday 30 July 2023

वयोवृद्धांच्या आधारकाठीसह मोफत आरोग्य शिबिर संपन्न !!

वयोवृद्धांच्या आधारकाठीसह मोफत आरोग्य शिबिर संपन्न !!

*भैरवनाथ जनसेवा संस्थेचा स्तुत्य उपक्रम*

                            (संस्थापक/ अध्यक्ष श्री राजुदादा सुर्यवंशी)

मुंबई, (शांताराम गुडेकर /संतोष गावडे) -

          अंधेरी पुर्व अंधेरीतील मरोळ विभागातील शिवसेना शाखा ८६ (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अंतर्गत भैरवनाथ जनसेवा संस्थेच्या माध्यमातून रविवार दिनांक ३० जुलै रोजी संपूर्ण मरोळ विभागासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. 

           सदर शिबिरात तज्ञ डॉक्टरांकरवी नागरिकांच्या आरोग्याची योग्य तपासणी पूर्णतः मोफत करून आवश्यक औषधेही मोफत देण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, डोळ्यांचे आजार, आदी विविध आजारांच्या आणि साथीच्या विविध आजारांच्या अनुषंगाने तपासणी करून नागरिकांना त्याबाबतीत मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी ईसिजीची तपासणीही मोफत करण्यात आली. गंभीर आजारांचे निदान झालेल्या नागरिकांना पुढील उपचारांसाठी योग्य मार्गदर्शनही करण्यात आले.

          शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत गेल्या अनेक वर्षांपासून वर्षाकाठी किमान दोन वेळा सदर शिबिराचे नियमित आयोजन केले जाते. सतत बदलत राहणारे हवामान, दिवसागणिक तापमानात होणारी वाढ, वाढते प्रदुषण, आदींमुळे आज संपूर्ण जगभर नागरिकांना आरोग्यासंबंधी विविध समस्या भेडसावत आहेत, नागरिक विविध आजारांना बळी पडत आहेत. आपल्या देशात याचे प्रमाण त्यामानाने किंचित वरचे आहे. 

          आजवर ह्या शिबिरामुळे विभागातील हजारो नागरिकांना आपल्या आरोग्याच्या संबंधित उपचार करता आलेले आहेत. अनेकजण त्यांच्या लहानमोठ्या आजारातून कायमचे रोगमुक्त झालेले आहेत, तर अनेकांनी आजारांची तिव्रता कमी करण्यात यश मिळवलेले आहे.

          'जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा' हे ब्रिद लक्षात घेऊन आपण ह्या शिबिराचे आयोजन करीत आहोत आणि पुढेही ते करतच राहू, असे ह्या शिबिराचे प्रमुख आयोजक आणि भैरवनाथ जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजुदादा सुर्यवंशी यांनी सांगितले. ह्या एक दिवसीय  शिबिरासाठी किमान दोन महिने आधीपासूनच मेहनत घेऊन तयारी करावी लागते. ह्यकामी आपले चिरंजीव शुभम सुर्यवंशी यांचे मोलाचे योगदान लाभत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांचेही तेवढेच सहकार्य लाभत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले 

          उद्घाटनप्रसंगी व संपूर्ण शिबिरादरम्यान शिवसेना युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, स्थानिक आमदार ऋतुजा लटके, अंधेरी विधानसभा संघटक प्रमोद सावंत, महिला विधानसभा संघटीका मंदाकिनी कदम, शाखाप्रमुख बिपिन शिंदे, महिला शाखा संघटिका सरिता रेवाळे, युवासेनेचे फ्लॉइड मिरांडा, विशाल चव्हाण, किरण पुजारी, निरपा तिरुवा, आलम सलमानी, उल्ल्हास चवाथे, आदी मान्यवर, इतर सर्व पदाधिकारी आणि शिवासानिक उपस्थित होते.

'प्रदीप केशव गावंड' समाजहितासाठी झटणारा कार्यकर्ता ....

'प्रदीप केशव गावंड' समाजहितासाठी झटणारा कार्यकर्ता .... 
      
        वाशी गाव येथील सुपूत्र चेंबूर वाशी गाव - मुंबई येथे वास्तव्यास असणारे आर.सी.एफ कर्मचारी, समाजसेवक प्रदीप केशव गावंड अतिशय दिलदार, निस्वार्थी,कष्टाळू, भितभाषी, मनमिळावू आहेत.समाजामध्ये ते लोकप्रिय आहेत. अशा सर्वगुणसंपन्न, प्रतिभाशाली तसेच गरजवंतांच्या हाकेला घरच्या माणसासारखा धावून जाणारा जनसेवक प्रदीप केशव गावंड म्हणजे एक आदर्शवत जीवन मानावे लागेल.अशा या प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रमाणित प्रयत्न ....

        प्रदीप केशव गावंड यांची ओळख खरं तर पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) चेंबूर यांच्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमुळे अशोक भोईर यांच्या माध्यमातून झाली. प्रदीप गावंड यांच्या सहवासाने आम्हाला खूप चांगल्या  माणसांचा सहवास लाभला हे विसरुन  चालणार नाही. गावंड यांचे कार्य सर्वसामान्यनांना न्याय/हक्क मिळाला म्हणून असुन हजारो नागरिक त्यांच्या सेवेचा लाभ घेत आहेत.

         प्रदीप  केशव गावंड  यांचा जन्म  येथे ३१/७/१९६३ रोजी झाला. ते लहान पणापासूनच शिक्षण, सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा या क्षेत्रात हुशार होते. खेळातून, अभ्यासातून तर शाळेत शिक्षक, विद्यार्थीवर्गाचे ते आवडते होते. आपण ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचे आपण काही तरी देणं लागतो याचे भान प्रदीप गावंड यांना आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.समाजाची सेवा करणे हे जणू काही आपले आद्य कर्तव्य ठरावे, समाजाची सेवा करण्याचे भाग्य प्रत्येकाच्या नशिबी असते असे नाही. पण प्रदीप केशव गावंड यांना आर. सी. एफ / पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) च्या माध्यमातून  लाभले. गेली ३९ वर्षे ते शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहेत. उपरोक्त संघटनांमध्ये त्यांनी कार्याध्यक्ष, सचिव अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. कार्यक्रमाचे सु नियोजन करणे गावंड यांना खूप चांगले जमते. गावंड यांनी पंचरत्न मित्र मंडळ (रजि.) स्थापन झाल्यावर मुंबईसह कोकणात समाजसेवेला सुरुवात केली. ते वाशी गाव चेंबूर येथे वास्तव्यास असून विभागातील गरजूंच्या हाकेला घरच्यांसारखे धावत जाऊन होईल तितकी मदत करतात.

          समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून गावंड जमेल तशी जनसेवा करत आहेत. गावांमध्ये विकासात्मक गोष्टींना चालना देणे, आजारी व्यक्तीला उपचारासाठी योग्य मार्ग दाखवणे, क्रिडा स्पर्धाचे आयोजन करुन स्वतः सहभागी  होणे, आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन इ. मध्ये प्रदीप गावंड  कायम सहभाग घेऊन तो कार्यक्रम यशस्वी करतात. समाजकार्यात सहभागी होताना कुटुंबाकडे थोडे दुर्लक्ष होत असले तरी पत्नी, मुले व मित्रपरिवार त्यांना समजून घेत त्यांच्या या जनसेवेला हातभार लावतात. प्रदीप केशव गावंड पंचरत्न मित्र मंडळ (रजि.)चे सेक्रेटरी असून वाशी ग्रामसेवा मंडळ चे सह सचिव आहेत. मुंबई आगरी सहकारी पतपेढी चे ते संचालक म्हणून काम पाहतात. याशिवाय इंटक चे युनियन प्रतिनिधी (वर्कर्स कमिटी) म्हणून दोन टर्म काम पाहत आहेत. आदर्श मुंबई चे सदस्य पत्रकार असून मुंबई आद्य स्थानिक आगरी समाज संचालक आहेत. त्याचप्रमाणे आर.सी.एफ कर्मचारी सेना, युथ कौन्सिल चे ते सदस्य आहेत. आर.सी.एफ मध्ये ३९ वर्ष ६ महिने अविरत सेवा करून प्रदीप गावंड ३१ जुलै २०२३ रोजी आपला वाढदिवस साजरा करत त्याच दिवशी सेवानिवृत्त होत आहेत. 

            समाजात भेडसावत असल्या अनेक समस्या सोडवणे, आपली युवा पिढी चांगले उच्चशिक्षण घेऊन मोठं मोठे हुद्यावर असणे. मोठया कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत राहून स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, दरवर्षी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणे, दरवर्षी गावी वृक्षारोपण करणे, स्वच्छता अभियान राबविणे असे अनेक उपक्रम राबवत समाजाला नवप्रेरणा देण्याचे काम मा.अशोक दामू भोईर साहेब सातत्याने करत आहेत.

          कमी शिक्षण असल्याने किंवा शिक्षण न घेतल्याने नोकरी मिळणासाठी होणारा त्रास तसेच अशिक्षित असल्यामुळे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी स्वःताच्या पगारातून काही पैसे बाजूला करुन हे प्रदीप गावंड आणि त्यांचे पंचरत्न मित्र मंडळ शिकवण्यासाठी गरिब, होतकरु युवकांच्या मदतीला धावत आहे. मंडळाचे कार्य होतकरु व गरजू विद्यार्थीवर्ग व त्यांच्या पालकवर्गासाठी असून आदिवासी भागातील रहिवाशांसाठी, अपंग, अंधांसाठी आहे. श्री प्रदीप गावंड, श्री.अशोक भोईर आणि मंडळतर्फे दरवर्षी होत असलेल्या मदतीमुळे आदिवासी भागातील युवक-युवती शिक्षणासाठी बाहेर पडत आहेत. महिला-पुरुष वर्गाला रोजगार उपलब्ध होत आहे. पदरमोड करुन दुसऱ्याला आनंदीत बघण्यासाठी मंडळतर्फे प्रदीप गावंड कायम झटत असतात.

           कधीही न थकता हसत मुखाने काम करणे हे प्रदीप गावंड यांचे वैशिष्ट्य आहे.हसरा व प्रसन्न चेहरा, निःस्वार्थी, निगर्वी आणि सदैव मदतीला तयारअसणारे गावंड सर्वांनाच आवडतात. कारण नागरी समस्या सोडवणे व लोकोपयोगी उपक्रम राबविणे यासाठी ते विभागात जास्त परिचित आहेत. प्रसंगी सनदशीर/संसदीय मार्गाने लढे देऊन कारवायांना यशस्वीरित्या तोंड देत लोकांच्या अडीअडचणींवर उपाय शोधत ती समस्या मार्गी लावतात. आजच्या वेळेला एक व्यक्ती आपल्या बरोबरच्या व्यक्तीचे गुण गाताना फारसे दिसत नाहीत. पण प्रदीप केशव गावंड याला अपवाद आहेत. ते सहकारीवर्गाला नेहमी सांगतात की ध्येय, तत्त्व, नियोजन, चिकाटी, सहनशीलता, स्वाभिमान याच्याबरोबर कोणतेही काम करण्याची तयारी ठेवल्यास आत्मविश्वास आपोआप येतो. जे-जे लोक निःस्वार्थी भावनेने काम करतात तसेच काम मलाही करायचे असल्याचे गावंड कायम सांगतात. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार /सन्मानचिन्ह/सन्मानपत्र देऊन गौरव केलेला आहे. गुणवंत कामगार पुरस्कार -२००८ तसेच महाराष्ट्र शासन कडून गावंड यांना विशेष कार्यकारी अधिकारी पद देऊन सन्मान केलेला आहे.

           प्रत्येक क्षेत्र असे असते तेथे निःस्वार्थी सेवा करणारी माणसे लागतात.जी आजच्याघडीला दुर्मिळ झालेली आहेत. आणि मग प्रदीप केशव गावंड यांच्यासारखी माणसे लाभली की त्यांच्या वेळेचा उपयोग सामाजिक संघटनेसाठी करुन घ्यावा व आपली संघटना सर्वांच्या सहकार्याने मजबूत उभी रहावी असे वाटते. अनेक मार्गदर्शन करणारी माणसं, माझे नातेवाईकांकडून मिळालेल्या भरभरुन प्रेम व मार्गदर्शन यामुळेच ही जनसेवा करण्याचा मार्ग सापडला असे गावंड  आपल्या मित्रपरिवार यांना सांगतात.आम्ही सामाजिक भान असलेल्या या प्रदीप केशव  गावंड  यांचे कार्य पाहून इतकेच म्हणू इच्छितो की___

सूर्याचे तेज येऊ द्या, तुमच्या कर्तृत्वात
चंद्राची शितलता, बहरावी स्वभावात 
कस्तुरीचा सुगंध, दरवळावा सहवासात 
मकरंदाचे माधुर्य, असावे मुखात.

प्रदीप केशव गावंड या समाजकार्यकर्त्यास वाढदिवसाच्या आणि सेवानिवृतीसह पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा...!

शांताराम गुडेकर, 
पार्क साईट, विक्रोळी (प.)
भ्रमणध्वनी-९८२०७९३७५९

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने *आमचा महासागर, आमची जबाबदारी* हा किनारपट्टी स्वच्छता उपक्रम !

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने *आमचा महासागर, आमची जबाबदारी* हा किनारपट्टी स्वच्छता उपक्रम !

वसई , प्रतिनिधी : रविवार दि.३० जुलै रोजी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने वसई तालुक्यातील भुईगाव समुद्रकिनारी स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली. 
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक मा. श्री.निलेश भगवान सांबरे हे गेली १४ वर्षे आपल्या स्वकमाईतून समाजसेवा या तत्वाच्या आधारे संपूर्ण कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात कार्यरत आहेत. आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि क्रिडा अशा अनेक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांच्या माध्यमातून त्यांनी लाखो गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. इतकेच नाही तर समाजाच्या दृष्टीने ते संपूर्ण कोकणात अनेक समाजपयोगी उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवत असतात. 

गेल्या काही दिवसांपासुन वसई समूद्र किनारी मोठ्या प्रमाणावर साठलेल्या कचऱ्यामुळे या किनारपट्टीची अवस्था दयनीय झाल्याचे पाहायला मिळत आहे.प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास,थरामोकोल हे समुद्रात, नाल्यात फेकले जातात आणि हाच कचरा समुद्र भरतीच्या वेळी बाहेर फेकला जातो. इतकेच नाही तर मागील ४,५ दिवसांपासून उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. यामुळे शहरातील सर्व कचरा बीचजवळ येऊन साचला होता. या कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरून तेथील नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता होती. तसेच भुईगाव समुद्रकिनारी फिरण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. दरम्यान या बिचवर कचऱ्याचे साम्राज्य असल्याने बीचवर भेट देणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधी व अस्वच्छतेला सामोरे जावे लागत़े. यामुळे पर्यटक देखील बीचवर येण्यास टाळाटाळ करतात. ज्यामुळे इतर स्थानिक व्यवसायिकांचे देखील नुकसान होते. सदर बाब जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ भुईगाव बीचवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. या स्वच्छता मोहीम अंतर्गत त्यांनी बीचवर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, खाऊचे कागद आदींची साफसफाई करण्यात आली.

यावेळी स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी तरुण तसेच महानगरपालिका प्रभाग समिती ई चे कर्मचारी जिजाऊ संस्था वसई तालुका अध्यक्ष हर्षाली चंद्रकांत खानविलकर,अमित नाईक, अभिषेक गोरुले, अभिजित गायकवाड, शिवसेना महिला शहर संघटक रुचिता नाईक, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मस्के देखील उपस्थित होते.याप्रसंगी जिजाऊ संस्थेचा प्रयत्नातून समुद्रकिनारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले गेले व स्थानिक नागरिकांना देखील स्वछतेची खबरदारी घेण्यास सांगितले.

एका रिक्षाचालकाच्या सामाजिक जाणीव आणि जिजाऊ संस्थेच्या मदतीने रस्त्यावरील बेवारस रुग्णाचे वाचले प्राण !!

एका रिक्षाचालकाच्या सामाजिक जाणीव आणि जिजाऊ संस्थेच्या मदतीने रस्त्यावरील बेवारस रुग्णाचे वाचले प्राण !!

*रस्त्यावरील बेवारस रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी धावली जिजाऊ संस्था आणि एक रिक्षाचालक* 

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण परिसरात रिक्षाचालक म्हणून व्यवसाय करणाऱ्या मनोज वाघमारे यांनी पुन्हा एकदा आपल्या समाजिक जाणिवेचे दर्शन घडवले आहे. रिक्षाचालक वाघमारे हे व्यवसायाने जरी रीक्षाचालक असले तरी ते एक समाजसेवक म्हणुं कल्याण परिसरात प्रचलित आहेत. नागरी समस्यांवरती ते अनेकवेळा भाष्य आणि आंदोलन करत असतात आपल्या हटके स्टाईलने ते प्रशासनाला दखल घ्यायला भाग देखील पाडतात .  

दिनांक २७ जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या  दरम्यान फेसबुकला एक पोस्ट रिक्षाचालक वाघमारे यांनी पहिली  त्या पोस्टमध्ये एक अनोळखी महिला दोन दिवसापासून भर पावसात कल्याण येथील शितलादेवी मंदिराजवळ असलेल्या शेलार हॉस्पिटलच्या परिसरात भिजत असल्याचे सांगण्यात आले होते. तिचे काही विडीओ देखील पोस्ट करण्यात आले होते. ही पोस्ट बघितल्यावर रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी जिजाऊ संस्थेच्या परिवारातील सदस्य असलेल्या  रुपेश पाटील यांना याबाबत कळवले व स्वतः देखील तेथे जाऊन भर पावसात भिजत उपचारासाठी तळमळणाऱ्या त्या महिलेला जिजाऊ संस्थेचे सदस्य रुपेश यांसह स्वत:च्या रिक्षात बसवून  कल्याणचे रुक्मिणीबाई हॉस्पिटल पश्चिम येथे उपचारासाठी दाखल केले. 

मात्र यावेळी महात्मा फुले पोलीस स्टेशनला सदर महिलेची माहिती दिली व खबर घेण्यासाठी रुक्मिणीबाई हॉस्पिटल बोलावले असता त्या पोलीस स्थानकातून बराच कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर वाघमारे यांनी 112 या  मदत क्रमांकावर या नंबरास संपर्क  करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळेतच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले व खबर घेण्यात आली. 
चांगले काम करणाऱ्या नागरिकांना जर पोलिसांकडून मानसिक त्रास होणार असेल तर नागरिकांनी पोलिसांना किंवा चांगल्या कामांना प्रतिसाद कसा द्यायचा ही खंत देखील यावेळी वाघमारे यांनी बोलून दाखवली. जिजाऊ संस्थेने तत्परतेने दखल घेतल्याने ही महिला वाचली आहे. जिजाऊ संस्थेसारख्या चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या सोबत  प्रशासनाने आणि प्रत्येक नागरिकाने सहकार्याच्या भावनेने उभे राहिले पाहिजे असे देखील वाघमारे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मुंबई -- नाशिक महामार्गाचा पाहणी दौरा, खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकचा वापरार करण्याच्या दिल्या सुचना !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मुंबई -- नाशिक महामार्गाचा पाहणी दौरा, खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकचा वापरार करण्याच्या दिल्या सुचना !

*समृध्दी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरु -- एकनाथ शिंदे*
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दिं,३०) मुंबई-नाशिक महामार्गावर पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे आज रविवार (दिं,३०) रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः फिल्डवर उतरुन मुंबई-नाशिक महामार्गा वरील खड्ड्यांची पाहणी करून पाहणी करून खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई - नागपूर समृध्दी महा मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा सांगितले आहे.

        भिवंडी बायपास नाशिक  कडून मुंबईला येणाऱ्या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ठाण्यावरुन शहापूरपर्यंत सगळ्या रस्त्यांची पाहणी केली असून कोणत्या मार्गावर कशाची आवश्यकता आहे, अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी खडवलीला (भिवंडी बायपास ) येथे एका काळी-पिवळी जीपचा अपघात झाला होता, त्यावेळी सहा लोकांचा मृत्यू झाला. अपघाताची कारणे, होणारी वाहतूक कोंडी यावर मार्ग काढण्यासाठी एक बैठक मंत्रालयात झाली होती. त्यात काही उपाययोजना सुचवल्या आहेत. 

          त्याचप्रमाणे जे आवश्यक क्रॉसिंग आहेत, त्यावर देखील नॅशनल हायवेच्या नॉर्म्सप्रमाणे त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर काही मार्गांवरील क्रॉसिंग काढले तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. आज कलेक्टर ठाणे पोलीस आयुक्त ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एमएमआरटीसीचे अध्यक्ष व इतर अधिकारी मंत्री कपिल पाटील, इतर आमदार सूचना देण्यासाठी उपस्थित होते. 

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “रस्त्यावरील खड्डे आता पावसात न बुजवता मासस्टिकच्या माध्यमातून बुजवावे. एकंदरीत हा रस्ता खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून पाऊस असल्यामुळे मासस्टिकचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अवजड वाहने डाव्या बाजूने गेली तर ॲम्बुलन्स, नागरिकांना त्यांना एक लेन मोकळी मिळेल, यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी शंभर ते दीडशे पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन घेण्याचा विचार असल्याचे सांगितले आहे.

         अवजड वाहने डाव्या बाजूने गेली पाहिजे, याची अंमलबजावणी काटेकोरपणाने केली तर वाहतूक सुरळीत होईल, असेही ते म्हणाले. अवजड वाहने रस्त्यावर आले तर आम्ही काही स्पॉट तयार केले त्या ठिकाणी त्यांच्यासाठी पार्किंगसह सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिक, वाहनचालक व स्थानिक लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना सुचवलेल्या आहेत. त

     तर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यासंदर्भात व होणाऱ्या वाहतूक कोंडी साठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करुन हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महामार्गाच्या बाजूला सर्विस रोड सुरु करायला सांगितले असून त्याचबरोबर फ्लायओव्हरचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खडवली येथे झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे. तसेच नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आठ लेनच्या सर्विस रोडचे कामे तातडीने करा, महामार्ग खड्डे मुक्त करा, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  

              दरम्यान दोन्हीकडे काँक्रिटचे रस्ते झाले असून त्याचा वापरही सुरु करा. त्यामुळे वाहतूक कोंडीला मिळणार आहे. अवजड वाहनासाठी डाव्या बाजूने वाहतूक असल्याच्या सूचना अनाउन्समेंट आणि बाईकवर पोलीस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लेंथ कटिंग करून ट्राफिकमध्ये अडकू नये, यासाठी हा प्रयत्न केला आहे. अनेक कट बंद केलेले असून काही गाव आहेत, त्यांना ये जा करण्यासाठी हाईट बॅरियर टाकण्याचा सूचना केल्या आहेत. तसेच रस्त्यावर आरोग्य केंद्राची मागणी होती, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून आरोग्य रुग्णालय उभारण्याच्या आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर तरतूद केली जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

युथ असोसिएशन तर्फे कांदिवली (मुंबई) येथे मौज ऐ गरब्याचे आयोजन !

युथ असोसिएशन तर्फे कांदिवली (मुंबई) येथे मौज ऐ गरब्याचे आयोजन !

मौज ऐ गरबा- २०२३ उत्तर मुंबई, कांदिवली पश्चिम येथे मुंबई यूथ एसोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी गरबाप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली तसेच या कार्यक्रमात सर्वांनी उत्साहाने सहभाग घेतला.

या मौज ऐ गरबा - २०२३ मधील सहभागी गरबा प्रेमीना सन्मानचिन्ह देऊन गौरव करताना शिवसेना उत्तर मुंबई  पदाधिकारी श्री.सचिन म्हात्रे, समीर खाडिलकर,कौस्तुभ भोसले आणि अध्यक्ष -वैभव म्हात्रे (एस.ई.ओ) आदी मान्यवर 

(छाया -शांताराम ल. गुडेकर )

जिजाऊ संस्थेच्या वतीने आमचा महासागर, आमची जबाबदारी हा किनारपट्टी स्वच्छता अभियान उपक्रम !!

जिजाऊ संस्थेच्या वतीने आमचा महासागर, आमची जबाबदारी हा किनारपट्टी स्वच्छता अभियान उपक्रम !!

जव्हार, जितेंद्र मोरझा :

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने वसई तालुक्यातील भुईगाव समुद्रकिनारी स्वच्छता अभियान मोहीम राबवण्यात आली. 

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक मा. श्री.निलेश भगवान सांबरे हे गेली १४ वर्षे आपल्या स्वकमाईतून समाजसेवा या तत्वाच्या आधारे संपूर्ण कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यात कार्यरत आहेत. आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण, रोजगार आणि क्रिडा अशा अनेक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रांच्या माध्यमातून त्यांनी लाखो गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे. इतकेच नाही तर समाजाच्या दृष्टीने ते संपूर्ण कोकणात अनेक समाजपयोगी उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवत असतात. 

गेल्या काही दिवसांपासुन वसई समूद्र किनारी मोठ्या प्रमाणावर साठलेल्या कचऱ्यामुळे या किनारपट्टीची अवस्था दयनीय झाल्याचे पाहायला मिळत आहे.प्लास्टिकच्या पिशव्या, ग्लास, थर्माकोल हे समुद्रात, नाल्यात फेकले जातात आणि हाच कचरा समुद्र भरतीच्या वेळी बाहेर फेकला जातो. इतकेच नाही तर मागील ४,५ दिवसांपासून उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं होतं. यामुळे शहरातील सर्व कचरा बीचजवळ येऊन साचला होता. या कचऱ्यामुळे साथीचे रोग पसरून तेथील नागरिकांना आरोग्याची समस्या उद्भवण्याची शक्यता होती. तसेच भुईगाव समुद्रकिनारी फिरण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात. दरम्यान या बिचवर कचऱ्याचे साम्राज्य असल्याने बीचवर भेट देणाऱ्या पर्यटकांना दुर्गंधी व अस्वच्छतेला सामोरे जावे लागत़े. यामुळे पर्यटक देखील बीचवर येण्यास टाळाटाळ करतात. ज्यामुळे इतर स्थानिक व्यवसायिकांचे देखील नुकसान होते. सदर बाब जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ भुईगाव बीचवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. या स्वच्छता मोहीम अंतर्गत त्यांनी बीचवर पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, खाऊचे कागद आदींची साफसफाई करण्यात आली.

यावेळी स्थानिक नागरिक, निसर्गप्रेमी तरुण तसेच महानगरपालिका प्रभाग समिती ई चे कर्मचारी जिजाऊ संस्था वसई तालुका अध्यक्ष हर्षाली चंद्रकांत खानविलकर,अमित नाईक, अभिषेक गोरुले, अभिजित गायकवाड, शिवसेना महिला शहर संघटक रुचिता नाईक, सामाजिक कार्यकर्ते मंगेश मस्के देखील उपस्थित होते.याप्रसंगी जिजाऊ संस्थेचा प्रयत्नातून समुद्रकिनारे स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले गेले व स्थानिक नागरिकांना देखील स्वछतेची खबरदारी घेण्यास सांगितले.

नदीकाठी संरक्षण भिंत तात्काळ उभारा - रमेश कानावले

मौजे बामणोली गावातील वाढत्या नदी पात्राचा गावातील घरांना धोका !!

नदीकाठी संरक्षण भिंत तात्काळ उभारा - रमेश कानावले

संगमेश्वर, (शांताराम गुडेकर) :
           रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर पासून जवळलच असलेल्या संगमेश्वर तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या सह्याद्री पर्वत रांगाच्या कुशीत वसलेल्या मौजे बामणोली (ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) येथील नदीपात्र दि.२१/०७/२०२१ ते २३/०७/२०२१ या कालावधीत झालेल्या जोरदार पावसामुळे नदीपात्रात दगडाचा भराव झाल्यामुळे नदीपात्र बदलले आहे. 

          त्यामुळे तेव्हा पासून पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह नदी शेजारील रत्नागिरी -कोल्हापूर मार्गांला जोडणाऱ्या देवरुख -कळकदारा रस्त्यावरून दरवर्षी वाहत असल्यामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहमुळे ढासळत आहे. तसेच आजू -बाजूच्या भात पीक शेतात पाणी घुसून शेत जमिनी पाण्याच्या प्रवाहात वाहून जात आहेत. शिवाय नदी शेजारी असलेल्या काही घरात पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण २०२१ मध्ये झालेल्या तीन -चार दिवस सततच्या पावसामुळे घरात पाणी शिरले होते. त्याची भीती आजही आहे असे बळीराज सेना उपनेते आणि मुंबई  उपाध्यक्ष कोकण भूमिपुत्र श्री.रमेश कानावले यांनी बोलताना सांगितले. आताच चार दिवसापूर्वी (२४/७/२०२३ ते २७/७/२०२३) झालेल्या मुसळधार पावसामुळेही धोका निर्माण झाला होता. त्यामुळे येथील रहिवाशी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन दिवस -रात्र काढत आहेत. गावातील बौद्धवाडी ग्रामस्थ यांची पाण्याची विहीर नदीपात्रपासून काही फूट अंतरावर असल्यामुळे भविष्यात ती विहीर जमीनदोस्त होऊ शकते. तसे झाले तर या वाडीची पाण्याची मोठी गैरसोय होणार आहे. शिवाय घरे, रस्ता, शेत जमीन, लागवड केलेली भात शेती वाहून गेली तर करोडो रुपयेचे नुकसान होणार आहे. आपत्ती झाल्यावर नुकसान भरपाई देत बसण्यापेक्षा त्याअगोदर उपाय योजना करून होणारा संभाव्य धोका दूर करण्यासाठी आवश्यकता असलेल्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारून स्थानिक रहिवाशी यांना भयमुक्त करावे अशी मागणी बळीराज सेना उपनेते आणि  मुंबई उपाध्यक्ष कोकण भूमिपुत्र श्री.रमेश कानावले यांनी केली आहे.

Saturday 29 July 2023

पोलादपूर- महाबळेश्वर (आंबेनळी घाट) पुढील पंधरा दिवसांकरिता रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद !

पोलादपूर- महाबळेश्वर (आंबेनळी घाट) पुढील पंधरा दिवसांकरिता रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद !

अलिबाग, दि.29 :- जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पोलादपूर-महाबळेश्वर आंबेनळी घाट रस्त्यावरील दुर्घटना टाळण्यासाठी  जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी आजपासून पुढील पंधरा (15) दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंद करण्याची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

अपर पोलीस अधीक्षक रायगड-अलिबाग यांच्या पत्रानुसार आंबेनळी घाट रस्ता हा अरूंद व घाट वळणाचा असल्याने रस्त्याचे बाजूला असणारा डोंगरकडा हा या भागात पडणाऱ्या पावसामुळे भूस्खलन होवून डोंगरावरील माती व मोठमोठे दगड रस्त्यावर आल्याने तसेच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला खोल दरी असल्याने हा घाट रस्ता वाहतुकीस धोकादायक असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

 या रस्त्यावरून वाहतुक सुरू ठेवल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उद्भवून मोठया प्रमाणांत जिवित व वित्तीय हानी होण्याची दाट शक्यता आहे. त्या कारणास्तव हा रस्ता  बंद करण्यात येऊन, पर्यायी रस्ता पोलादपूर खेड-चिपळूण-पाटण- कराड-कोल्हापूर तसेच पाटणकडून सातारामार्गे पुण्याकडे असा पर्यायी मार्ग आहेत, असे अभिप्राय सादर केले आहेत.

या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी, महाड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीच्या अनुषंगाने पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावरील कोणतीही दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी या अधिसूचनेच्या दिनांकापासून ते पुढील पंधरा (15) दिवसांकरिता पोलादपूर-महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्ता सर्व प्रकारच्या वाहतूकीकरिता बंदी आदेश जारी केला आहे‌

माजिवाडा, ते वडपे दरम्यानच्या महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवावेत - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

माजिवाडा, ते वडपे दरम्यानच्या महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवावेत - केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील

ठाणे, दि. २९ - मुंबई -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवून प्रवाशांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. यासाठी माजिवाडा, खारेगाव नाका ते वडपे या मार्गावरील खड्डे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने बुजवावेत. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते तेथील कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करावीत. यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय अधिकारी नेमून लक्ष ठेवावे, असे निर्देश केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज येथे दिले. 

भिवंडी तालुक्यातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीसंदर्भात आज श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा पोलीस प्रमुख विक्रम देशमुख, ठाणे शहर वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त डॉ. विनय राठोड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) गोपीनाथ ठोंबरे, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजित भांडे पाटील, भिवंडीचे उपविभागीय अधिकारी अमित सानप, महामार्ग पोलीसांचे अधिक्षक मनोज दहिकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता विलास कांबळे, यांच्यासह महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वाहतूक पोलीस आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 

पावसाळ्याच्या कालावधीत खारेगाव नाका ते मानकोली, मानकोली ते राजनोली व राजनोली ते वडपे आणि या मार्गातील खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. हा त्रास कमी करून सुरळीत वाहतूक होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत. एमएसआरडीएने या मार्गावरील खड्डे मास्टिक पद्धतीने बुजविण्याचे काम तातडीने पूर्ण करावे. आवश्यक तेथे जास्तीचे मनुष्यबळ कामास लावावे. दिवे, ओवळी, पिंपळास आदी ठिकाणी मोठी वाहने रस्ता ओलांडताना कोंडी होती. ती दूर करण्यासाठी या ठिकाणी हाईट बॅरिअर लावण्यात यावे. पाईपलाईनच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी. या कामांवर संनियंत्रण ठेवण्यात यावे. वाहतूक कोंडी दूर होऊन नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही केंद्रीय राज्यमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिले. 

सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जड-अवजड वाहनांना बंदी घालावी, ही अवजड वाहने रात्रीच्या वेळेस पाठविण्यात यावी. दरम्यानच्या काळात दिवसा ही अवजड वाहने शहापूरमधील खर्डी येथे थांबविण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी. तसेच नाशिकवरून येणारी अवजड वाहनांची वाहतूक मुरबाडमार्गे वळविण्यासंदर्भात संबंधित विभागांनी कार्यवाही करावी. माणकोली व रांजणोली उड्डाणपुलाखाली वळण मार्ग तयार करावेत, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी दिल्या.

जिल्हाधिकारी श्री. शिनगारे यांनीही मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी एमएसआरडीसी व इतर यंत्रणांनी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच या मार्गावरील कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी मार्गावरील दुरुस्तीची कामेही पूर्ण करावीत. आवश्यक तेथील अंडरपासच्या ठिकाणी दुरुस्ती करताना नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात यावे. गर्दीच्या वेळेस अवजड वाहने शहापूरजवळ थांबविण्यात यावेत. तसेच कमी गर्दीच्या वेळेस ही वाहने टप्प्या टप्प्याने सोडण्यात यावीत. शहापूर ते सापगाव रस्ता दर्जोन्नत करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 

पुल वाहुन गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला !!

पुल वाहुन गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला !!

जव्हार, जितेंद्र मोरघा :

शेवटचे टोक असणाऱ्या जव्हार तालुक्यातील पिंपळशेत, तीलोंडा, चांभारशेत, आकरे या चार ग्रामपंचायत मधील गावांना अती मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे सर्व नदी नाल्यांना पूर आला होता त्यामूळे गावांना जोडणारे रस्ते व त्यावरील अरुंद पुल असल्यामुळे सर्व पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

जव्हार पिंपळशेत रस्तावरील कोतीमाळ, पागीपाडा, शींगारपाडा, माडविहिरा या गावांना जोडणाऱ्या पुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, जव्हार खरोंडा रस्त्यावरील मोठा पुल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेला आहे. त्यामुळे तेथील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून सर्व भागाची पाहणी करण्यात आली व लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी व पुलांचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे म्हणून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. यावेळी गुलाब विनायक राऊत (माजी महिला व बालकल्याण समिती सभापती), विनायक राऊत (शिवसेना तालुकाप्रमुख जव्हार), PWD उपअभियंता विजय भदाने, विजय संखपाळे, राजू भोये (युवासेना तालुका प्रमुख), सरपंच कासटवाडी कल्पेश राऊत, सरपंच पिंपळशेत दिनेश जाधव, राहुल शेंडे, धर्मेंद्र होळकर, रमेश हांडवा व ग्रामस्थ उपस्थित होते.

नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा !

नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

लोकनेते रामशेठ ठाकूर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोखाडा उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग आयोजित, इयत्ता अकरावी नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रथमतः रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत म्हणून मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंभार सर यांनी केले. इयत्ता ११ वी विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख पाहुणे मा. डॉ. एस. एच. जाधव  आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. एल. डी. भोर यांच्या हस्ते झाले. तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी लाभलेले  प्रमुख पाहुणे महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख डॉ. एस. एच. जाधव हे विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, की जसा शेतकरी शेतीमध्ये बियाणे टाकतो आणि जेव्हा रोपे तयार होतात. ती रोपे बघताना जसा आनंद होतो ना ! त्याचप्रमाणे तुमचे निर्मळ आणि प्रेमळ चेहरे बघून मला आनंद झाला आहे. अभ्यास करण्याचे हेच वय आहे. या वयात तुम्ही अभ्यास केला तर  नक्कीच तुम्ही ठरवलेले ध्येय साध्य करू शकता. जसे म्हणतात ना 'लाथ मारीन तिथे पाणी काढीन' या उक्तीप्रमाणे तुम्ही ठरवलेले ध्येय साकार करून तुम्ही चांगल्या पदावर  रुजू व्हाल ! असे आव्हान विद्यार्थ्यांना  यावेळी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. डी. भोर यांनी देखील विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात असलेले 'डिजिटल साक्षरता केंद्र' या केंद्रामार्फत अनेक कोर्स चालवले जातात .ते  तुम्ही दोन वर्षात पूर्ण करावेत. असे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात प्रवेश केल्याबद्दल 'हार्दिक अभिनंदन' केले. यावेळी महाविद्यालयातील उपप्राचार्य प्रा. एस. जी. मेंगाळ, खोसे सर, महाले सर, इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. पराडके सर, मराठी विभाग प्रमुख प्रा.घाटाळ सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावीच्या विद्यार्थिनी कु. सोनिया आरडे, गायत्री शेंडे व विमल भांगरे यांनी केले.  आभारप्रदर्शन चोथे सर यांनी केले.

आरोग्य समस्यां बाबत प्रदिप वाघ यांनी दिलं डाॅ. दिपक सावंत यांना पत्र !

आरोग्य समस्यां बाबत प्रदिप वाघ यांनी दिलं डाॅ. दिपक सावंत यांना पत्र !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यातील आरोग्य समस्या सोडविण्यासाठी मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ यांनी माजी आरोग्य मंत्री दिपक सावंत यांना मोखाडा तालुक्यातील समस्या बाबत पत्र दिले. यात मोखाडा ग्रामिण रुग्णालयास उपजिल्हा रुग्णालयचा दर्जा देणे. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामिण रुग्णालय मंजूर करणे, कुर्लोद येथील उपकेंद्र ईमारतीस २०१४-१५ साली प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे. त्या ईमारतीचे बांधकाम तातडीने सुरु करणे,आरोग्य विभागाची रिक्त पदे तातडीने भरावी या समस्या विषयी डाॅ दिपक सावंत यांना पत्र दिले. तसेच डॉ दिपक सांवत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र खोडाळा व कुर्लोद येथे भेट दिली.

यावेळी प्रकाश निकम पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष,  प्रदीप मोखाडा पंचायत समिती उपसभापती. सिव्हिल सर्जन, जिल्हा आरोग्य अधिकारी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

पुढील महिन्यातील पावसासाठी भारतीय हवामान अंदाज !!

पुढील महिन्यातील पावसासाठी भारतीय हवामान अंदाज !!


मुंबई, प्रतिनिधी : जुलैमध्ये महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं. यामुळे अनेकांना दिलासा मिळाला तर अनेकांचे मोठे नुकसान देखील झाले. काहींना यामध्ये आपला जीव देखील गमवावा लागला. यामुळे मोठ्या अडचणी निर्माण झाल्या.

असे असले तरी ऑगस्ट महिन्यात मात्र पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन आठवड्यांत महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण कमी असण्याची शक्यता आहे.

आजपासूनच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर ओसरेल, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे.

१ जून ते २७ जुलै या कालावधीत सरासरीपेक्षा १३ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे.

सत्कर्म फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने घाटकोपर मध्ये फ्री लर्निग क्लासेस !

सत्कर्म फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने घाटकोपर मध्ये फ्री लर्निग क्लासेस !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            सत्कर्म फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने घाटकोपर मध्ये एकल पालक मुलांसाठी इंग्रजी फ्री लर्निग क्लासेस दर रविवारी घेण्यात येते. मात्र संस्थेला मुलांसाठी वर्ग उपलब्ध होत नसल्याने त्यांनी आपली माती आपली माणस या संघटनेकडे वर्ग उपलब्ध व्हावा यासाठी विनंती केली लागलीच त्यांना आपली माती आपली माणस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राज पार्टे, कायदेशीर सल्लागार राम रिंगे आणि पत्रकार निलेश मोरे यांनी सहकार्य केले. यावेळी शिवप्रतीमा भेट देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.. यावेळी सत्कर्म फाऊंडेशन चे संचालक, शिक्षक दत्तात्रय सावंत यांच्या तर्फे आपली माती आपली माणस संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख निलेश मोरे यांचा सत्कारही  करण्यात आला.

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रक संस्था आणि बी. एम.सी तर्फे शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान सोहळा संपन्न !

मुंबई जिल्हा एड्स नियंत्रक संस्था आणि बी. एम.सी तर्फे शतकवीर रक्तदात्यांचा सन्मान सोहळा संपन्न !

मुंबई, (निलेश कोकमकर/शांताराम गुडेकर) :

       रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान म्हणून प्रचार आणि प्रसार जरी होत असला तरी मुळात रक्तदात्याची संख्या ही खूप कमी आहे. आणि त्यातच रक्तदानाबद्दल समाजात अजून ही अनेक गैरसमज आहेत. देशाची लोसंख्या जवळजवळ १४० कोटी असली तरी केवळ ०.८ टक्केच रक्तदान केले जाते. अशातच स्वतःच्या रक्ताने आणि SDP (प्लेटलेट्स) ने अनेकांचे प्राण वाचणारे खरे जीवनदाते ठरणारे विशेषतः शतकवीर रक्तदाते म्हणून मुंबई जिल्हा एड्स नियंत्रक संस्था आणि मुंबई महानगर पालिकेच्या वतीने 14 जून 2023 'जागतिक रक्तदाता दिवस' च्या निमित्ताने "शतकवीर रक्तदात्यांचा विशेष सत्कार सोहळा" दिनांक 28 जुलै 2023 रोजी दुपारी दोन ते चार या वेळेत मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था, हॉल क्रमांक दोन, वडाळा पश्चिम, मुंबई येथे संपन्न झाला.

         यामध्ये शतकवीर रक्तदाता म्हणून श्री.गणेश आमडोसकर, श्री.प्रशांत म्हात्रे, डॉ. प्रागजी वाजा, श्री.गजानन नार्वेकर, श्री.मनीष सावंत यांच्या अन्य १४ शतकी रक्तदान करणाऱ्या शतकवीरांचा विशेष सन्मान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री विजयकुमार करंजकर (अति प्रकल्प संचालक)  श्री. रमाकांत बिराजदार (प्रकल्प डॉ.संचालक) आणीन मुंबई जिल्हा एड्स नियंत्रक संस्था यांच्या शुभहस्ते रक्तदात्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
        यावेळी शतकवीर रक्तदाता म्हणून संबोधित करताना जीवनदाता  संस्थेचे श्री. गणेश आमडोसकर यांनी रक्तदान क्षेत्रासोबतच संस्था करीत असलेल्या इतर उपक्रमाची माहिती दिली. त्यांच्या संस्थेच्या येणाऱ्या नवीन सामाजिक उपक्रम 'संकल्प मरणोत्तर देहदानाचा' नोंदणी अभियान याबद्दल माहिती दिली. अवयव दान व देहदान यातील फरक थोडक्यात सर्वांना समजावून सांगितला. जीवनदाता संस्था रक्तदान क्षेत्रासोबतच आता देहदान तसेच अवयव दान क्षेत्रात सुद्धा कार्यरत होत आहे. श्री गणेश आमडोसकर यांनी जीवनदाता सामाजिक संस्था आयोजित करत असलेल्या फक्त महिलांसाठीच विशेष रक्तदान शिबीरा बद्दल माहिती दिली. महिला रक्तदानात मागे नाहीत. हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी डॉक्टर प्रागजी वाजा यांनी सुद्धा रक्तदात्यांना संबोधित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्रीमती अपर्णा पवार, सहाय्यक संचालक मुंबई जिल्हा एड्स नियंत्रक संस्था यांनी केले. यावेळी  सह सूत्रसंचालक म्हणून श्रीमती अश्विनी लोहार, श्रीमती सुनीता घमेंडी तसेच श्रीमती कविता ससाणे मॅडम यांनी  सूत्रसंचालन जबाबदारी पार पाडली आणि  हा कार्यक्रम मोठया उत्साहात पार पडला.

Friday 28 July 2023

संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक, विधीमंडळात पृथ्वीराज चव्हाण यांनी केली अटकेची मागणी !!

संभाजी भिडेंच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक, विधीमंडळात पृथ्वीराज चव्हाण यांनी केली अटकेची मागणी !!
 
*योग्य ती कारवाई करू -- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

भिवंडी, दिं,२९, अरुण पाटील (कोपर) :
          करमचंद गांधी नव्हे तर एक मुस्लिम जमीनदार राष्ट्रपिता महात्मा गांधींचा खरा बाप आहे, असे धक्कादायक विधान शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे संपादक संभाजी भिडे यांनी  गुरुवारी आयोजित केलेल्या सभेत केले होते. या विरोधात आता कॉंग्रेस आक्रमक झाली आहे. भिडे हे नेहमी वादग्रस्त विधान करत असतात, हा बाहेर कसा फिरू शकतो त्या मुळे संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करा अशी मागणी काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात केली, त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत भिडे यांच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले आहे.
          शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांची गुरूवारी सायंकाळी शहरातील बडनेरा मार्गा वरील जय भारत मंगलम् येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत त्यांनी महात्मा गांधी यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत टीका केली आणि त्यांचे वडील करमचंद गांधी यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविले.     
           त्या वेळी भिडे म्हणाले की, मोहनदास हे चारित्र्य संपन्न व शिलवान करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नी सारखा व्यवहार केला, असा दावा संभाजी भिडे यांनी केला होता.
           वादग्रस्त वक्तव्यामुळे कायम चर्चेत असलेले संभाजी भिडे यांची सभा उधळण्याचा प्रयत्न अमरावती येथील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी काल केला होता. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हजारो महापुरुष शहीद झाले; मात्र हे भिडे स्वातंत्र्य दिनाला काळा दिवस म्हणून दुखवटा पाळण्याचे सांगतात. राष्ट्रीय ध्वज, संविधान, राष्ट्रगीत, महामानवांचा, महिलांचा वारंवार अपमान करून संपूर्ण भारतीयांच्या भावना दुखवतात. त्यामुळे समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करत आंबेडकरी संघटनांनी संभाजी भिडेंची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता.
          संभाजी भिडेंच्या अमरावतीच्या सभेतील खळबळजनक व्यक्तव्याचे अमरावतीत संतप्त पडसाद उमटले आहेत. संभाजी भिडे यांना अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा काँग्रेसने इशारा दिला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची पोलिसांकडे व्हिडिओ व ऑडिओ क्लिप उपलब्ध नाही. अमरावती पोलीस व गुप्तचर यंत्रणा का गप्प आहे, असा आरोप काँग्रेस कडून होत आहे.

नाशिक अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई !!

नाशिक अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई !!

*तब्बल दीड कोटीचा प्रतिबंधित गुटखा व तीस लाखाचे वाहन जप्त*

मात्र भिवंडी व परीसरात खुलेआम होते विक्री, कारवाई कधी नागरिकांचा सवाल ?

भिवंडी, दिं,२८, अरुण पाटील (कोपर) :
           नाशिक शहरातील पंचवटीतील एका दुकानावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने छापा टाकून तब्बल दीड कोटींचा गुटखा जप्त  केला आहे. नाशिक  अन्न आणि औषध प्रशासनाने दुकानात, चारचाकी वाहनात आणि घरात साठविलेला सुमारे दीड कोटी रुपयांचा गुटखा आणि  तीस लाख रु. किंमती वाहनं जप्त करून दुकान सील केले आहे. याप्रकरणी दुकान मालकाच्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
           मात्र भिवंडीत गुजरात मार्गे येणाऱ्या व  भिवंडी शहरात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खुले आम विक्री होणाऱ्या प्रतीबंधित गुटख्यावर कारवाई कधी होणार या बाबत नागरिकांना मधून सवाल उपस्थित होत आहे. भिवंडी शहर व परिसरातील ग्रामीण भागातील पान टपऱ्या, दुकाने, जनरल स्टोर्स या ठिकाणी खुलेआम गुटखा विकला जात आहे.
            भिवंडीतील नारपोलि पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोडाऊन पट्ट्यात गुजरात मार्गे येणारा गुटखा उतरवला जात आहे.त्या ठिकाणावरून विविध ठिकाणी वितरित केला जातो.अश्याच प्रकारे narpoli पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पूर्णा गाव गेट नं -२, जेके पेट्रोल पंपा जवळील श्री.गणेश जनरल स्टाअर्स आणि याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काल्हेर गाव बस स्टॉप जवळ अंबिका जनरल स्टोअर्स या ठिकाणा वरून सर्वत्र खुलेआम मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा विकलाजात आहे. मात्र  ठोस कारवाई होत नसल्याने संशय व्यक्त होत आहे.
           तसेच भिवंडी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ मोठया कंटेनर मधून आलेला माल रोज वेग वेगळ्या ठिकाणी उतरवला जात असून या सर्व प्रकरणाची माहिती संबधित पोलीस स्टेशनला व संबधित खात्याला असून सुद्धा ठोस कारवाई होताना दिसत नाही.
           अश्याच प्रकारे प्रतिबंधित केलेला गुटखा आणि तत्सम अन्न पदार्थाची छुप्या मार्गाने विक्री होत असल्याने नाशिक अन्न आणि औषध प्रशासनाने छापासत्र सुरू केले आहे. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहआयुक्त संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त उदय लोहकरे यांच्यासह पथकाने आडगाव परिसरातील खंडेराव मंदिरासमोरील मे. महालक्ष्मी ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला.
           यावेळी मालक प्रशांत कचरू सावळकर हा उपस्थित होता. अधिकाऱ्यांनी पेढीची झडती घेतली असता 3 हजार 675 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा साठा विक्रीसाठी आढळला. पेढीच्या समोर उभी असलेल्या गाडीची तपासणी केली असता त्यात 45 हजार 789 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.
          दरम्यान, अधिकाऱ्यांचा संशय बळावला असता पथकाने सावळकर यांच्या राहत्या घराची झडती घेतली. त्यात एक कोटी 4 लाख 280 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा विक्रीसाठी आढळून आला. या साठ्यात हिरा पान मसाला, विमल पानमसाला, राजनिवास पानमसाला, रॉयल ११७ सुगंधित सुपारी, व्ही वन सुगंधित सुपारी, नखरेली स्वीट सुपारी असा एक कोटी ५२ लाख ७४४ रुपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. त्याचबरोबर ३० लाख रुपये किमतीचे वाहनदेखील जप्त करण्यात आले आहे. 
           नाशिकसह इतर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून सातत्याने धडक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत लाखो कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना प्रतिबंधित अन्न पदार्थ साठा, वाहतुक आणि विक्री केल्याचे आढळून आल्यास 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रदीप वाघ यांनी केली पुरग्रस्त भागाची पाहणी !

प्रदीप वाघ यांनी केली पुरग्रस्त भागाची पाहणी !

जव्हार, जितेंद्र मोरघा :

मोखाडा तालुक्यातील शिरसगाव येथील थाळेकर वाडीतील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन शाळकरी मुलांना नदीच्या पात्रातून सुखरूप बाहेर काढणार्‍या थाळेकर बंधुची मोखाडा पंचायत समिती उपसभापती प्रदीप वाघ यांनी त्यांची भेट घेतली.

तसेच देवबांध नदीवर पूल होणे गरजेचे आहे. या बाबतीत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे असे प्रदीप वाघ यांनी सांगितले
तसचे करोळ पाचघर गावाल जोडणारा पुल पाण्याखाली गेल्याने दोन गांवांचा संपर्क तुटला होता सुमारे अडीच हजार लोक वस्ती असलेल्या या गावाला पुराचा फटका बसला आहे. या ठिकाणी देखील उपसभापती प्रदीप वाघ यांनी भेट दिली व पुलाची उंची वाढविण्याची मागणी शासनाकडे केली आहे.

मुलुंडच्या कामगार रुग्णालयात अस्वच्छता, इमारत मोडकळीस !!

मुलुंडच्या कामगार रुग्णालयात अस्वच्छता, इमारत मोडकळीस !!

*व्यवस्थापनाला मनसेचा अल्टिमेटम* 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

               मुलुंड येथील राज्य कामगार विमा रुग्णालयात सध्या ऐन पावसाळ्यात घाणीचे साम्राज्य वाढून रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे रुग्णालय इमारत मोडकळीस आली असून, ती धोकादायक अवस्थेत असल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमधून भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान याबाबत आज मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धडक देऊन प्रशासनाला १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. यावर वैद्यकीय अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी उद्यापासून कार्यवाहीस सुरुवात करू असे आश्वासन या पदाधिकाऱ्यांना दिले आहे. मुलुंडच्या या (ई एस आय सी) राज्य कामगार विमा योजना रुग्णालयात कामगारांनाही सध्या अनेक असुविधा भेडसावत आहेत. तर रुग्णालयातील अस्वच्छता दिवसेंदिवस ऐन पावसाळ्यात वाढत आहे. याबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाची पाहणी करत येथील परिस्थिती अधिकाऱ्यांच्या निदर्शनात आणून दिली. यावेळी रुग्णालयात रोज साफसफाई आणि स्वच्छता ठेवत कामगारांच्या उपचारासाठी निर्माण होणाऱ्या समस्या येत्या १५ दिवसात सोडवाव्यात अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. त्यावर डॉ विलास डोंगरे यांनी उद्यापासून याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती मनसेचे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी दिली आहे.
                मुलुंड येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयातील भिंती, जीने तसेच दरवाजे तुटलेल्या अवस्थेत असून पडणारे सिमेंटचे प्लास्टर रुग्णालयातच पडून आहे. औषधांचे स्टोअर्स अस्वच्छ असून, कामगारांना औषध नीटपणे मिळत नसल्याची तक्रार मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांच्याकडे कामगारांनी केली. त्यामुळे आज मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन पाहणी केली. त्यावेळी रुग्णालयात सगळीकडे अस्वच्छता असल्याचे निदर्शनास आले अशी माहिती राज पार्टे यांनी दिली. तर यावेळी  रुग्णालयाच्या परिसरात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या असेही त्यांनी दिली.  यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस विजय निकम, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष अनुप गुप्ता, शाखाध्यक्ष सर्वेश अंबोलकर, उपचिटणीस सुयोग शिवगण, महाराष्ट्र सैनिक रुपेश कांबळे आदी सह, सर्व कामगार उपस्थितीत होते.

बारवी डँम अद्यापही भरलेला नाही, विविध अफवांचे पिक, अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचे अवाहन !

बारवी डँम अद्यापही भरलेला नाही, विविध अफवांचे पिक, अफवांवर विश्वास ठेवू नये, प्रशासनाचे अवाहन !

कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीचा असलेला बारवी डँम अद्याप भरलेला नाही, या धरणाला स्वयंचलित वक्रव्दारे असल्याने धरणाची पाणी पातळी ७२:६० मीटर पर्यंत गेल्यानंतरच धरणातून पाण्याचा विसर्ग होतो आणि पाणी पातळी कमी झाल्यावर हे वक्रव्दारे आपोआप बंद होतात व पाणी विसर्ग थांबतो, ही सत्यता असताना एमआयडीसी ने एक पत्र काढून उल्हास नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा दिला आणि सोशलमिडियावर धरण भरल्याच्या अपवांचे पिक आले. परंतु अद्यापही धरण भरलेले नाही, पाण्याची पातळी वाढत असली तरी धरण भरण्यासाठी एक आठवडा किंवा पाऊस जास्त झाला तर २/३ दिवसात ही भरेल असे बारवी धरणाचे उप अभियंता श्री मेश्राम यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे अवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

२६ जुलै २००५ मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात ढगफुटी पावसामुळे हाहाःकार उडाला होता. याचा फटका कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा, मानिवली, रायते, मोहीली आदी गावाना बसला होता, तीन दिवस या परिसरात पाणी होते, डोळ्यासमोर या परिसरातील लोकांचे जीव व संसार उध्वस्त झाले होते. उल्हास नदीने आक्राळविक्राळ रुप धारण केले होते. तीन दिवसानंतर डोंगरावर आसरा घेतलेले नागरिक उरल्या सुरल्या घराकडे येवून गाळ काढण्याचे काम करत असतानाच कोणीतरी बारवी धरण फुटले अशी अफवा आणली आणि पुन्हा सगळे लोक जीव वाचवण्यासाठी डोंगराकडे धाऊ लागले. तेव्हा पासून ते आजपर्यंत या गावातील लोक २६ जुलै हा दिवस उगवला की घाबरगुंडी उडते.

सध्या कल्याण तालुक्यात ४ नद्या भरून वाहत आहेत, उल्हास नदीवरील रायते पुलावर पाणी आल्याने मागील आठवड्यात कल्याण नगर हा मार्ग बंद झाला होता. अजूनही पाऊस पडत आहे. अशातच एमआयडीसी ने उल्हास नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देणारे पत्र प्रसिद्ध केले. यामध्ये त्यांनी म्हटलं की, २६ जुलै सांयकाळी ४ वा धरणाची पातळी ७०:५० मी ऐवढी वाढली आहे, संभाव्य येव्यामुळे पाणी पातळीत सतत वाढ होत आहे, धरणास ११ स्वयंचलित वक्रव्दारे बसविण्यात आले आहेत. त्याची उच्चतम विसर्ग पातळी ७०:६० मी आहे, धरणाची पाणी पातळी ७०:६० मी तलांकावर गेल्यानंतर स्वयंचलित वक्रव्दारे आपोआपच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होईल व पाणी पातळी ७०:६० मी खाली गेल्यावर आपोआप बंद होऊन विसर्ग थांबेल. सद्यस्थितीत  चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे उल्हास नदीस पुर परिस्थिती उदभवलेली आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करणे शक्य नाही त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे धरणाची पाणी पातळी कधीही ७०:६० मी जावू शकते व स्वयंचलित वक्राव्दारे उल्हास नदीत पाण्याचा विसर्ग होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या. आणि याचा प्रत्येकाने आपापल्या सोईप्रमाने अर्थ काढून सोशलमिडियावर मागील, जुने पुराणे विडियो टाकून अफवांचा बाजार मांडला. यामुळे नदीच्या काठावर वसलेल्या म्हारळ, वरप, कांबा, रायते, आपटी, चांदप, पिंपळोली, रहाटोली, पाद-याचा पाडा, आदी शेकडो गावातील नागरिकांची काळजी वाढली,

याबाबत बारवी डँमचे उप अभियंता श्री मेश्राम यांना विचारले असता ते म्हणाले, अद्याप डँम भरलेला नाही, तो भरण्यासाठी एक आठवडा किंवा पाऊस धरणक्षैत्रात चांगला झाला तर २/३ दिवसाही भरेल, या धरणास स्वयंचलित वक्रव्दारे असल्याने ते आपोआप उघडतील, व पाणी पातळी खाली गेल्यावर आपोआप बंद होतील, त्यामुळे या पाण्याने उल्हास नदीस फारसा फरक पडत नाही, या नदीवर पुढे व आंध्र धरण असल्याने त्याचे ते पाणी आहे. म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...