Sunday, 30 July 2023

एका रिक्षाचालकाच्या सामाजिक जाणीव आणि जिजाऊ संस्थेच्या मदतीने रस्त्यावरील बेवारस रुग्णाचे वाचले प्राण !!

एका रिक्षाचालकाच्या सामाजिक जाणीव आणि जिजाऊ संस्थेच्या मदतीने रस्त्यावरील बेवारस रुग्णाचे वाचले प्राण !!

*रस्त्यावरील बेवारस रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी धावली जिजाऊ संस्था आणि एक रिक्षाचालक* 

कल्याण, प्रतिनिधी : कल्याण परिसरात रिक्षाचालक म्हणून व्यवसाय करणाऱ्या मनोज वाघमारे यांनी पुन्हा एकदा आपल्या समाजिक जाणिवेचे दर्शन घडवले आहे. रिक्षाचालक वाघमारे हे व्यवसायाने जरी रीक्षाचालक असले तरी ते एक समाजसेवक म्हणुं कल्याण परिसरात प्रचलित आहेत. नागरी समस्यांवरती ते अनेकवेळा भाष्य आणि आंदोलन करत असतात आपल्या हटके स्टाईलने ते प्रशासनाला दखल घ्यायला भाग देखील पाडतात .  

दिनांक २७ जुलै रोजी दुपारी दोन वाजताच्या  दरम्यान फेसबुकला एक पोस्ट रिक्षाचालक वाघमारे यांनी पहिली  त्या पोस्टमध्ये एक अनोळखी महिला दोन दिवसापासून भर पावसात कल्याण येथील शितलादेवी मंदिराजवळ असलेल्या शेलार हॉस्पिटलच्या परिसरात भिजत असल्याचे सांगण्यात आले होते. तिचे काही विडीओ देखील पोस्ट करण्यात आले होते. ही पोस्ट बघितल्यावर रिक्षाचालक मनोज वाघमारे यांनी जिजाऊ संस्थेच्या परिवारातील सदस्य असलेल्या  रुपेश पाटील यांना याबाबत कळवले व स्वतः देखील तेथे जाऊन भर पावसात भिजत उपचारासाठी तळमळणाऱ्या त्या महिलेला जिजाऊ संस्थेचे सदस्य रुपेश यांसह स्वत:च्या रिक्षात बसवून  कल्याणचे रुक्मिणीबाई हॉस्पिटल पश्चिम येथे उपचारासाठी दाखल केले. 

मात्र यावेळी महात्मा फुले पोलीस स्टेशनला सदर महिलेची माहिती दिली व खबर घेण्यासाठी रुक्मिणीबाई हॉस्पिटल बोलावले असता त्या पोलीस स्थानकातून बराच कालावधी उलटूनही कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही, त्यानंतर वाघमारे यांनी 112 या  मदत क्रमांकावर या नंबरास संपर्क  करून सदर घटनेची माहिती दिली असता काही वेळेतच त्या ठिकाणी पोलीस दाखल झाले व खबर घेण्यात आली. 
चांगले काम करणाऱ्या नागरिकांना जर पोलिसांकडून मानसिक त्रास होणार असेल तर नागरिकांनी पोलिसांना किंवा चांगल्या कामांना प्रतिसाद कसा द्यायचा ही खंत देखील यावेळी वाघमारे यांनी बोलून दाखवली. जिजाऊ संस्थेने तत्परतेने दखल घेतल्याने ही महिला वाचली आहे. जिजाऊ संस्थेसारख्या चांगले काम करणाऱ्या संस्थांच्या सोबत  प्रशासनाने आणि प्रत्येक नागरिकाने सहकार्याच्या भावनेने उभे राहिले पाहिजे असे देखील वाघमारे यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...