Sunday 30 July 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मुंबई -- नाशिक महामार्गाचा पाहणी दौरा, खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकचा वापरार करण्याच्या दिल्या सुचना !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मुंबई -- नाशिक महामार्गाचा पाहणी दौरा, खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकचा वापरार करण्याच्या दिल्या सुचना !

*समृध्दी महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरु -- एकनाथ शिंदे*
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दिं,३०) मुंबई-नाशिक महामार्गावर पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ठाणे ते खारेगाव तसेच ठाणे- नाशिक महामार्गाची पाहणी केली. या रस्त्यावर खड्डे पडल्याने तासनतास वाहतूक कोंडी होत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. त्यामुळे आज रविवार (दिं,३०) रोजी मुख्यमंत्र्यांनी स्वतः फिल्डवर उतरुन मुंबई-नाशिक महामार्गा वरील खड्ड्यांची पाहणी करून पाहणी करून खड्डे बुजवण्यासाठी मास्टिकचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच मुंबई - नागपूर समृध्दी महा मार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याचा सांगितले आहे.

        भिवंडी बायपास नाशिक  कडून मुंबईला येणाऱ्या रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहनधारकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. ठाण्यावरुन शहापूरपर्यंत सगळ्या रस्त्यांची पाहणी केली असून कोणत्या मार्गावर कशाची आवश्यकता आहे, अधिकाऱ्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी खडवलीला (भिवंडी बायपास ) येथे एका काळी-पिवळी जीपचा अपघात झाला होता, त्यावेळी सहा लोकांचा मृत्यू झाला. अपघाताची कारणे, होणारी वाहतूक कोंडी यावर मार्ग काढण्यासाठी एक बैठक मंत्रालयात झाली होती. त्यात काही उपाययोजना सुचवल्या आहेत. 

          त्याचप्रमाणे जे आवश्यक क्रॉसिंग आहेत, त्यावर देखील नॅशनल हायवेच्या नॉर्म्सप्रमाणे त्यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर काही मार्गांवरील क्रॉसिंग काढले तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. आज कलेक्टर ठाणे पोलीस आयुक्त ग्रामीणचे पोलीस अधीक्षक एमएमआरटीसीचे अध्यक्ष व इतर अधिकारी मंत्री कपिल पाटील, इतर आमदार सूचना देण्यासाठी उपस्थित होते. 

          मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, “रस्त्यावरील खड्डे आता पावसात न बुजवता मासस्टिकच्या माध्यमातून बुजवावे. एकंदरीत हा रस्ता खड्डे मुक्त करण्याचा निर्णय आम्ही घेतला असून पाऊस असल्यामुळे मासस्टिकचा वापर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. अवजड वाहने डाव्या बाजूने गेली तर ॲम्बुलन्स, नागरिकांना त्यांना एक लेन मोकळी मिळेल, यासाठी सूचना दिलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी शंभर ते दीडशे पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन घेण्याचा विचार असल्याचे सांगितले आहे.

         अवजड वाहने डाव्या बाजूने गेली पाहिजे, याची अंमलबजावणी काटेकोरपणाने केली तर वाहतूक सुरळीत होईल, असेही ते म्हणाले. अवजड वाहने रस्त्यावर आले तर आम्ही काही स्पॉट तयार केले त्या ठिकाणी त्यांच्यासाठी पार्किंगसह सोयी सुविधांची व्यवस्था करण्यात येणार आहे. नागरिक, वाहनचालक व स्थानिक लोकांची गैरसोय होऊ नये, यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना सुचवलेल्या आहेत. त

     तर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यासंदर्भात व होणाऱ्या वाहतूक कोंडी साठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडले आहेत किंवा वाहतूक कोंडी होत आहे, अशा सगळ्या ठिकाणी त्यांनी पाहणी करुन हे खड्डे तत्काळ बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच महामार्गाच्या बाजूला सर्विस रोड सुरु करायला सांगितले असून त्याचबरोबर फ्लायओव्हरचे काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. खडवली येथे झालेल्या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे. तसेच नॅशनल हायवे अधिकाऱ्यांना प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आठ लेनच्या सर्विस रोडचे कामे तातडीने करा, महामार्ग खड्डे मुक्त करा, अशा सूचना संबंधित विभागाला दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.  

              दरम्यान दोन्हीकडे काँक्रिटचे रस्ते झाले असून त्याचा वापरही सुरु करा. त्यामुळे वाहतूक कोंडीला मिळणार आहे. अवजड वाहनासाठी डाव्या बाजूने वाहतूक असल्याच्या सूचना अनाउन्समेंट आणि बाईकवर पोलीस ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लेंथ कटिंग करून ट्राफिकमध्ये अडकू नये, यासाठी हा प्रयत्न केला आहे. अनेक कट बंद केलेले असून काही गाव आहेत, त्यांना ये जा करण्यासाठी हाईट बॅरियर टाकण्याचा सूचना केल्या आहेत. तसेच रस्त्यावर आरोग्य केंद्राची मागणी होती, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या असून आरोग्य रुग्णालय उभारण्याच्या आरोग्य विभागाकडून युद्ध पातळीवर तरतूद केली जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...