Thursday 30 April 2020

देवगड येथील पत्रकार विष्णु घावडे यांची गरजूंना मदत

देवगड येथील पत्रकार विष्णु घावडे यांची गरजूंना मदत
देवगड, प्रतिनिधी
कोरोना या विषाणूने जगभरात थैमान घातले असल्याने भारत सरकारने देशात २४ मार्च पासून संचारबंदी लागू केली, त्यामुळे देशात रोजगार नसल्याने शहर तसेच ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली अशा वेळी अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांनी या कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न केला.
देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील पत्रकार विष्णु घावडे हे स्वत: पत्रकार असल्याने त्यांना समाजातील परिस्थितीचे भान आहे म्हणून पत्रकार विष्णु घावडे यांनी स्वखर्चाने देवगड तालुक्यातील तांबळडेग निराधार, गरजवंत, कुटुंबीयांना त्यांच्या हस्ते धान्य वाटप केले. गावातील अपंग, निराधार महिलांना घरी जाऊन धान्य दिले.
पत्रकार नेहमीच आपल्या लेखनातून सामाजिक कार्य करत न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर असतात मात्र कोरोनाच्या संकटात पत्रकार विष्णु घावडे यांनी गरजूंना केलेल्या ‌मदती बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

कल्याण ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव, कोलम येथे सापडला पाॅझिटिव रुण्ग, परिसरात भिंतीचे वातावरण!

कल्याण ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव, कोलम येथे सापडला पाॅझिटिव रुण्ग, परिसरात भिंतीचे वातावरण! 

कल्याण (संजय कांबळे) ऐवढे दिवस कोरोनोच्या प्रादुर्भावापासून दुर राहिलेल्या कल्याण ग्रामीण भागात आता कोरोनाचा शिरकाव झाला असून तालुक्यातील कोलम येथील बीएमसी कर्मचाऱ्यांला कोरोनाची लागण झाली असून त्याचा रिपोर्ट पाॅझिटिव आला असल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या भागात पाहणी केली असून या रुग्णाच्या संपर्कात अजून किती लोक आले आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान यांच्या समोर आहे
सध्याच्या परिस्थितीत कल्याण डोंबिवली, शहरी भागासह २७ गावे आणि कसारा, शहापूर, आणि वांशिद आदी ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. सुदैवाने कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा, रायते आणे भिसोळ जाभूळ, गोवेली, मामणोली, कोलम केळणी दहागाव, बापसई, आदी ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. पण आज धक्कादायक बाब समोर आली. तालुक्यातील कोलम येथै राहणारा आणि मुंबई बीएम सी मध्ये नोकरी करणारा पुरुष कोरोनाचा शिकार ठरला. हा मुंबई येथून ये जा करित होता. याला लक्षणे आढळून आल्याने तो प्रथम कल्याण च्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल झाला. तेथून त्याचे रिपोर्ट के ई एम ला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामध्ये तो पाॅझिटिव आला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी त्याच्या मोठ्या भावाचे अपघातात निधन झाले होते. या अंत्य यात्रेत तो सहभागी झाला होता. शिवाय किराणा दुकानात, भाजीपाला, आणि मामणोली येथील एका खासगी दवाखान्यात दोन दिवसापूर्वी उपचार घेण्यासाठी गेला होता अशी माहिती गावातील काही नांगरिकानी दिली. त्यामुळे याच्या संपर्कात कोण कोण आलेत हे शोधणे हे आव्हान डॉक्टरांनसमोर असणार आहे.
या भागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड व कर्मचारी वर्ग टिम सह घटनास्थळी पोहोचले असून गावचे सरपंच ग्रामसेवक, पोलीस पाटील, आशा, अंगणवाडी सेविका, आदी या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोंरोटांईग करण्यासाठी प्रयत्न करित आहेत. याविषयी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव साहेब आणि कल्याण चे तहसीलदार दीपक आकडे यांना विचारले असता ते म्हणाले ग्रामीण भागातील नागरिकांना एकाच ठिकाणी कोंरोटांईग करण्यासाठी काही इमारती ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर कोलम सह परिसरातील मामणोली, केळणी कुंदा, चौरे बापसई, म्हसरोडी, बांगरवाडी, आदी गावातील नांगरिकानी काही लक्षणे आढळून आली तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधावा व घरीच रहावे असे आवाहन केले आहे. तसेच हा परिसर पुर्ण पणे शील करण्याचे काम सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

१ में २०२० पासून फळे, भाजीपाला विक्रीसाठी दोन(२) वाजेपर्यंत अनुमती शहरातील करोनाग्रस्त‌ रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही - पालिका आयुक्त सुधाकर देशमुख.

1 मे 2020 पासून फळे व भाजीपाला विक्रीसाठी पालिकेतर्फे दुपारी 2.00 वाजेपर्यंत अनुमती
शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही पालिका आयुक्त सुधाकर देशमुख
सिद्धांत गाडे उल्हासनगर -
उल्हासनगर शहरातील फॉलॉवर लाईन येथील दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी 87 वर्षीय मयत महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे चिंतेचे वातावरण होते. तसेच त्या भागातील रहिवाशांना मध्ये सुद्धा भीतीचे वातावरण होते. याशिवाय एका पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे सुद्धा चिंता वाढली होती. त्यामुळे या दोन्ही कुटुंबाच्या नजीकचे संपर्क यांना तात्काळ quarantine करण्यात आलेले आहे. सर्वसाधारणपणे सात दिवसानंतर कोरोना रोगाची लक्षणे दिसत असल्याने quarantine करण्यात आलेल्या जवळच्या संपर्काचे नमुने चार ते पाच दिवसानंतर घेऊन पाठविले जाणार आहेत. अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील यापूर्वी चाचणीसाठी पाठवलेल्या आणखी आठ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून सर्व अहवालांचे कोरोना निगेटिव अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एक पोलिस कर्मचारी यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. या अहवालांचा विचार करतात आज शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. असे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
उल्हासनगर शहरातील डेडिकेटेड कोव्हिड हॉस्पिटलमध्ये एकूण 12 रूग्ण असून यापैकी 11 कोरोनाग्रस्त तर 1 SAR Beco रूग्ण आहे. 11 रुग्णांपैकी 5 रुग्ण उल्हासनगर शहरातील एकाच कुटुंबातील असून 5 रुग्ण बदलापूरचे आहेत व 1 रुग्ण कल्याण येथील आहे. रुग्णालयात सर्व प्रकारे खबरदारी घेतली जात असल्यामुळे कोणत्याही रुग्णाची प्रकृती चिंताजनक नाही. सर्वांच्या प्रकृती उत्तम असून ठरवून दिलेल्या प्रक्रियेनुसार किमान दोन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर टप्प्याटप्प्याने या रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल. अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
वेळेत उपाययोजना केल्यास कोरोना पूर्णपणे बरा होतो. मात्र भीतीपोटी आजार दडविल्यास त्याचे न्युमोनियामध्ये रूपांतर होऊन या रुग्णाच्या जीवितास धोका पोहोचतो. तसेच हा रुग्ण उपचाराविना बाहेर राहिल्यामुळे त्याचा त्याच्या कुटुंबातील सदस्यांना व त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना प्रादुर्भाव होऊन साथ रोगाच्या प्रसारास मदत होते. त्यामुळे कोरोना रोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी ताबडतोब महानगरपालिकेच्या स्थापन केलेल्या फिवर क्लिनिकमध्ये तपासणी करणे आवश्यक आहे. असे आवाहन पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले आहे.
शहरात कोरोना रोगाचा प्रसार रोखण्यासाठी अशा प्रकारची लक्षणे असलेल्या व्यक्तींनी पुढे येऊन स्वतः तपासणी करून घेतल्यास भविष्यात या रोगाचा प्रसार थांबविण्यास व पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यास प्रशासनास यश येईल. असे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.
उद्या दिनांक 1 मे 2020 पासून फळे व भाजीपाला विक्रीसाठी दुपारी 2.00 वाजेपर्यंत अनुमती देण्यात येणार आहे. तथापि ही फळे व भाजीपाल्याची विक्री केवळ ज्या विक्रेत्यांना महानगरपालिकेच्या प्रभाग अधिकारी यांनी परवानगी दिली आहे त्यांनाच केवळ प्रभाग अधिकारी यांनी ठरवून दिलेल्या जागेवर करता येईल. परवानगी नसलेले किंवा ठरवून दिलेल्या जागेच्या व्यतिरिक्त विक्री व्यवसाय करणारे फळे व भाजीपाला विक्रेते यांचे संपूर्ण साहित्य व दुकान किंवा हातगाडी तात्काळ जप्त करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. असे निर्देश पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रभाग अधिकारी यांना दिलेले आहेत.
उल्हासनगर-5 येथील एक, जिजामाता कॉलनी संभाजी चौक येथील एक व फॉलॉवर लाईन येथील एक अशा तीन कंटेनमेंट झोनचे नियमांचे सर्व नागरिकांनी कटाक्षाने पालन करावे. ही सक्ती कुणाला त्रास देण्यासाठी नसून सर्वांच्या भल्यासाठी व रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनास व महानगरपालिकेस सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. असेही पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेकडून गोरगरिबांना मदतीचा ओघ सुरूच

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेकडून गोरगरिबांना मदतीचा ओघ सुरूच 
कल्याण, सचिन भोईर
कोरोना या विषाणूने थैमान घातल्याने सरकारने २४ मार्च पासून संचारबंदी लागू केली आहे त्याला आज गुरुवार ३०/०४/२०२० एक महिन्याच्या वर कालावधी झाला आहे, त्यामुळे बेरोजगार झालेले तसेच हातावर पोट असलेल्या गोरगरीब जनतेवर, नागरिकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे अशी परिस्थिती संपूर्ण देशात निर्माण झाली असून अशा वेळी मुंबई जवळील एक औद्योगिक शहर कल्याण येथील मिलिंद नगर, प्रभाग क्रमांक १६ या परिसरातील दानशूर व्यक्तिमत्व  कामगार नेते, नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, व सामाजिक उपक्रमातील सहकारी  सामाजिक कार्यकर्ते सुनील उतेकर, सुरेंद्र आढाव, आर्किटेक्ट गणेश नाईक, सचिन भोईर, प्रकाश सोनावले, संजय भोईर, संदिप पाटील, दुर्योधन पाटील, गणेश पाटील, रवी भोईर, संदिप मोरे, उन्मय पाटील, ललिता पाटील, स्वाती पाटील यांनी परिसरातील, प्रभागातील (मिलिंद नगर, भवानी नगर, त्रिमूर्ती कॉलनी, इ.) नागरिकांना दानशूर व्यक्तिमत्व ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितलेल्या प्रमाणे या अडचणीच्या दिवसात कोणीही उपाशी राहू नये यासाठी स्वतः ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण प्रभागात जातीने लक्ष घालून अन्नदान केले.
विशेष म्हणजे आज कोळी समाजाचे अध्यक्ष देवानंद भोईर यांनी स्वतः उपस्थित राहून ज्ञानेश्वर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले व सांगितले आमच्या समाजातील एक बांधव गोरगरीब व गरजवंत नागरिकांसाठी जे काही करतोय त्याचा मला व आमच्या समाजाला अभिमान आहे.

Wednesday 29 April 2020

खासदार सुनिल तटकरे संचालित युवा प्रातिष्ठानच्या वतीने साई येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

खासदार सुनिल तटकरे संचालित युवा प्रातिष्ठानच्या वतीने साई येथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
 बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) 
 माणगाव तालुक्यातील साई ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या गावांना खा. सुनिल तटकरे संचालित युवा प्रतिष्ठानच्या वतीने गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. राज्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असल्यामूळे सर्वच ठिकाणी संचारबंदी व लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. या लॉक डाऊनमूळे अनेक व्यवसाय, उद्योग, नोकऱ्या, रोजंदारी कामे बंद झाली आहेत. त्यामूळे सतत मोलमजूरी करणाऱ्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता शासनाकडून, तसेच सामाजिक संस्था, समाजातील दानशूर व्यक्ती समाजातील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचा वाटप करीत आहेत.
   या पार्श्वभूमीवर खा. सुनिल तटकरे यांच्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने साई परिसरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप २७ व २८ एप्रिल रोजी शासनाने दिलेल्या अटींचे पालन करुन साई ग्रामपंचायतीचे सरपंच हुसेनभाई रहाटविलकर, ग्रा.पं. सदस्य खेरटकर, जावेद अंबेरकर, हारुन सोलकर, काशिराम मोरे, प्रविण अधिकारी यांच्या हस्ते गरजू कुटुंबांना धान्याचे वाटप करण्यात आले.

उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी यांची मोफत कोरोना टेस्ट करा

उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची मोफत कोरोना टेस्ट करा
सिद्धांत गाडे उल्हासनगर  -  
उल्हासनगर महापालिकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांची मोफत कोरोना टेस्ट करा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक सचिव प्रविण खरात यांनी पालिका आयुक्त यांना पत्राद्वारे केली आहे. 
सध्या संपूर्ण देशात कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे, या महामारी संकटाविरुद्ध उल्हासनगर महापालिका परिक्षेत्रात अधिकारी कर्मचारी लढा देत आहेत. परंतू हा लढा देत असताना सहजिकच त्यांच्यामध्येही भितीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढावे याकरिता सर्वांची मोफत कोविड तपासणी करण्यात यावी, अशी मागणी प्रविण खरात यांनी उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
त्याचप्रमाणे अंबरनाथ नगरपरिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची यांचीसुद्धा मोफत कोरोना टेस्ट करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटक सचिव प्रविण खरात यांनी अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पवार यांना पत्राद्वारे केली आहे.
अंबरनाथ येथील कोरोना महामारी संकटाविरुद्ध अंबरनाथ नगरपरिषद क्षेत्रात अधिकारी कर्मचारी लढा देत आहेत. परंतू हा लढा देत असताना साहजिकच त्यांच्यामध्येही भितीचे वातावरण आहे. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढावे याकरिता सर्वांची मोफत कोविड तपासणी करण्यात यावी, अशी मागणी प्रविण खरात यांनी अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी पवार साहेब यांच्याकडे केली आहे.
तसेच प्रविण खरात यांनी यासंदर्भात राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही ईमेल द्वारे मागणी केली आहे.

नियमांचे काटेकोर पालन केले तरच कोरोनाच्या प्रसारापासून बचाव होऊ शकेल उल्हासनगर - पालिका आयुक्त सुधाकर देशमुख

नियमांचे काटेकोर पालन केले तरच कोरोनाच्या प्रसारापासून बचाव होऊ शकेल उल्हासनगर - पालिका आयुक्त सुधाकर देशमुख
सिद्धांत गाडे उल्हासनगर - 
दिनांक 27 एप्रिल 2020 पर्यंत उल्हासनगर शहरांमध्ये एकूण दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. यापैकी एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन मार्च महिन्यामध्ये घरी आलेला आहे. दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी आढळलेला दुसरा रुग्ण उल्हासनगर 4 येथील कोव्हिड रुग्णालयात दाखल आहे. दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी यापूर्वी आढळलेल्या रुग्णाचे जवळच्या संपर्कातील कुटुंबातील चार सदस्यांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनाही लगेचच कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय कल्याण येथील 1 व बदलापूर येथील 3 कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्यावर उपचार सुरू असून सर्व 9 रुग्णांची तब्येत स्थिर आहे. अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.
आज पुन्हा बदलापूर येथील 3 कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आलेले असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांची संख्या 12 झालेली आहे. याशिवाय उल्हासनगर शहरातील कोरोनासाठी निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या मात्र SAR Beco चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या महिलेवरही उपचार सुरू असून तिचीही तब्येत सुधारत आहे. कोरोनासाठी तिची पुन्हा चाचणी घेण्यात येत असून रिझल्ट निगेटिव्ह आल्यास त्या महिलेस घरी सोडण्यात येईल. असे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.
दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी निधन झालेल्या 87 वर्षीय महिलेची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे एका खाजगी प्रयोगशाळेकडून आज दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी कळविण्यात आले आहे. ही महिला कॅम्प नंबर तीनमध्ये फॉलवर लाईन या भागात राहत असल्यामुळे शहरातील चिंता वाढलेली आहे. शहरातील नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात सतर्क राहणे आवश्यक झाले असून नियमांचे काटेकोर पालन केले तरच कोरोनाच्या प्रसारापासून बचाव होऊ शकेल. असेही पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे

थैलेसिमिया ग्रस्त रुग्णांसाठी आज 43 रक्तदात्यांनी केले

थैलेसिमिया ग्रस्त रुग्णांसाठी आज 43 रक्तदात्यांनी केले
सिद्धांत गाडे उल्हासनगर  -  
उल्हासनगर मधील मध्यवर्ती रुग्णालयात 55 थैलेसिमिया ग्रस्त मुलांना दर 15  दिवसांनी रक्त चढ़वावे लागते. अम्बरनाथ, बदलापुर, कल्याण या ठिकाणाहून सुमारे 130 मुलांना प्रत्येक 15 दिवसांनी रक्त चढवावे लागते.
28 एप्रिल रोजी थैलेसिमिया ग्रस्त  मुलांसाठी 50 रक्तदात्यांनी रक्तदान केले होते. 29 एप्रिल रोजी संपूर्ण दिवसभरात 43 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
28 एप्रिल रोजी मंगलवारी आणि 29 रोजी बुधवारी थैलेसीमिया यूनिट मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर कैम्प नम्बर 3 येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर संपन्न झाले.
यावेळी उल्हासनगर मधील निरंकारी आश्रमचे सेवाधारी, समाजसेवक सत्येन पुरी आणि भीषम असुदानी मित्र परिवार तसेच इतर 43 रक्तदात्यांनी ने रक्तदान केले.

जेष्ठ पत्रकार यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य म्हणून नियुक्ती, एनजेयुजे महाराष्ट्राच्या वतीने करण्यात आले अभिनंदन

ज्येष्ठ पत्रकार आनंद राणा यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया चे सदस्य म्हणून नियुक्ती
एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले अभिनंदन
       सिद्धांत गाडे
नवी दिल्ली - ज्येष्ठ पत्रकार श्री. आनंद राणा यांची प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) चे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री राणा यांच्या नियुक्तीसंदर्भातील प्रक्रिया गेल्या २ February फेब्रुवारी रोजी पीसीआय अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री. चंद्रमौली कुमार प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील माहिती इमारतीत पूर्ण झाली. श्री. राणा यांच्या नियुक्तीची अधिसूचना केंद्र शासनाने राजपत्रात केली आहे.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स इंडिया (एनयूजीआय) चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि दोन दशकांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले आनंद राणा हे गेल्या अनेक वर्षांपासून हरिभूमीच्या दिल्ली आवृत्तीची जबाबदारी सांभाळली होते. दिल्ली जर्नालिस्ट असोसिएशनचे (डीजेए) माजी सरचिटणीस आनंद राणा पत्रकारांशी संबंधित मुद्द्यांवरून संघर्ष करीत आहेत.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया, प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही एक घटनात्मक स्वायत्त संस्था आहे जी प्रामुख्याने प्रेस स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी आणि त्याच्या जबाबदा-या सुनिश्चित करण्याचे कर्तव्य बजावते. स्पीकर हे पीसीआयचे प्रमुख असतात, जे राज्यसभेचे अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष आणि सदस्यांमधून निवडलेले सभासद नियुक्त करतात. पीसीआयच्या सदस्यांमध्ये लोकसभेचे तीन सदस्य, राज्यसभेचे दोन सदस्य आणि भारतीय परिषदेचे प्रत्येकी एक सदस्य, विद्यापीठ अनुदान आयोग आणि साहित्य अकादमी तसेच पत्रकार बंधू प्रतिनिधींचा समावेश आहे.
राणा यांच्या नियुक्तीबद्दल नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट (एनयूजे) आणि संबंधित राज्य संघटनांनी आनंद व्यक्त केला आहे. 
एनयुजे महाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर यांनी राणा यांचे अभिनंदन करुन, आणखी प्रखरपणे पत्रकार हितासाठी काम करणारे प्रतिनिधित्व राणाजींच्या रुपाने लाभले असल्याचे सांगितले .  इंडियन जर्नालिस्ट्स युनियन, प्रेस असोसिएशन, वर्किंग न्यूज कॅमेरामॅनस असोसिएशनने श्री राणा यांचे पीसीआय सदस्य झाल्याबद्दल अभिनंदन केले. एनयूजेचे अध्यक्ष श्री रास बिहारी, सरचिटणीस श्री प्रसन्ना मोहंती, भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. के. श्रीनिवास रेड्डी, सरचिटणीस श्री बलविंदरसिंग जम्मू, पी.आय.बी. मान्यताप्राप्त पत्रकार संघटनेचे अध्यक्ष - जयशंकर गुप्ता, प्रेस असोसिएशनचे सरचिटणीस श्री. के. नायक आणि वर्किंग न्यूज कॅमेरामेन्स असोसिएशनचे अध्यक्ष. एन. सिन्हा, सरचिटणीस श्री संदीप शंकर यांनी श्री. आनंद राणा यांच्या नियुक्तीनंतर सांगितले की यामुळे पत्रकारांच्या हिताचा आवाज आणखी वाढू शकेल. दिल्ली पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री राकेश थापलियाल आणि सरचिटणीस श्री केपी मलिक यांनी एनयूजे, आयजेयू, प्रेस प्रेस असोसिएशन आणि वर्किंग न्यूजकॅममेन असोसिएशनच्या सर्व पदाधिका-यांचे आभार मानले आहेत, जेव्हा श्री आनंद राणा यांना पीसीआय सदस्य म्हणून नियुक्त केले गेले होते.
एनयूजे आयचे मावळते अध्यक्ष, श्री. प्रज्ञानंद चौधरी (आनंद बाजार पत्रिका), माजी उपाध्यक्ष श्री. शिवकुमार, माजी कोषाध्यक्ष सीमा किरण, डीजेएचे माजी उपाध्यक्ष अशोक किंकर, उत्तर प्रदेश पत्रकार संघाचे अध्यक्ष रतन दीक्षित आणि सरचिटणीस अशोक अग्निहोत्री (ताऊ) ), जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ राजस्थान (जार) चे अध्यक्ष राकेश शर्मा आणि सरचिटणीस राकेश सैनी, ओडिशा युनियन ऑफ जर्नलिज टीयूएसचे सरचिटणीस अक्षय साहू, जर्नलिस्ट असोसिएशन ऑफ आंध्र प्रदेशचे अध्यक्ष पुन्नम राजू, सरचिटणीस युगंधर रेड्डी, झारखंड युनियन ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष रजत गुप्ता आणि सरचिटणीस शिव अग्रवाल, उत्तराखंड एनयूजेचे अध्यक्ष ब्रह्मदत्त शर्मा आणि सरचिटणीस आरसी कन्नौजिया,  पश्चिम बंगाल जर्नलिस्ट्स युनियनच्या अध्यक्ष, प्रोबीर चँटर्जी आणि सरचिटणीस कल्याण पंडित, आसाम जर्नालिस्ट असोसिएशनचे सरचिटणीस डलीम फुकण, कर्नाटक एनयूजेचे अध्यक्ष प्रकाश सत्तार महाजन, जम्मू-काश्मीर जर्नलिस्ट ऑफ जर्नालिस्टचे अध्यक्ष सय्यद जुनैद, छत्तीसगड एनयूजेचे अध्यक्ष मनोज व्यास, सरचिटणीस प्रभुल ठाकुर, मध्य प्रदेशचे पत्रकार संघ खिलवान चंद्रकर, त्रिपुरा युनियन आँफ वर्किंग  जर्नालिस्ट्सचे सरचिटणीस प्रसन्ना चक्रवर्ती, हिमाचल प्रदेश राज्य अध्यक्ष रणेश  राणा  ,महासचिव किशोर ठाकूर, तामिळनाडू एनयुजे अध्यक्ष एस मुरुनंदम,महासचिव एम कृष्णावेनी आणि केरळ एनयुजे अध्यक्ष टि एस शालिनी , 
 आणि एनयुजे आय केंद्रीय कार्यालय सचिव मनमोहन लोहानीननी  श्री राणा नियुक्ती यांचे नियुक्तीचे स्वागत केले आहे.

नियमांचे काटेकोर पालन केले तरच कोरोनाच्या प्रसारापासून बचाव होऊ शकेल उल्हासनगर - पालिका आयुक्त सुधाकर देशमुख

नियमांचे काटेकोर पालन केले तरच कोरोनाच्या प्रसारापासून बचाव होऊ शकेल उल्हासनगर - पालिका आयुक्त सुधाकर देशमुख
 सिद्धांत गाडेउल्हासनगर - 
 दिनांक 27 एप्रिल 2020 पर्यंत उल्हासनगर शहरांमध्ये एकूण दोन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. यापैकी एक रुग्ण पूर्णपणे बरा होऊन मार्च महिन्यामध्ये घरी आलेला आहे. दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी आढळलेला दुसरा रुग्ण उल्हासनगर 4 येथील कोव्हिड रुग्णालयात दाखल आहे. दिनांक 28 एप्रिल 2020 रोजी यापूर्वी आढळलेल्या रुग्णाचे जवळच्या संपर्कातील कुटुंबातील चार सदस्यांचे नमुने कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांनाही लगेचच कोव्हिड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय कल्याण येथील 1 व बदलापूर येथील 3 कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्यावर उपचार सुरू असून सर्व 9 रुग्णांची तब्येत स्थिर आहे. अशी माहिती पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी दिली आहे.
आज पुन्हा बदलापूर येथील 3 कोरोनाग्रस्त रुग्ण दाखल करण्यात आलेले असल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांची संख्या 12 झालेली आहे. याशिवाय उल्हासनगर शहरातील कोरोनासाठी निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या मात्र SAR Beco चाचणी पॉझिटिव्ह आलेल्या महिलेवरही उपचार सुरू असून तिचीही तब्येत सुधारत आहे. कोरोनासाठी तिची पुन्हा चाचणी घेण्यात येत असून रिझल्ट निगेटिव्ह आल्यास त्या महिलेस घरी सोडण्यात येईल. असे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सांगितले.
दिनांक 27 एप्रिल 2020 रोजी निधन झालेल्या 87 वर्षीय महिलेची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे एका खाजगी प्रयोगशाळेकडून आज दिनांक 29 एप्रिल 2020 रोजी कळविण्यात आले आहे. ही महिला कॅम्प नंबर तीनमध्ये फॉलवर लाईन या भागात राहत असल्यामुळे शहरातील चिंता वाढलेली आहे. शहरातील नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात सतर्क राहणे आवश्यक झाले असून नियमांचे काटेकोर पालन केले तरच कोरोनाच्या प्रसारापासून बचाव होऊ शकेल. असेही पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वदेश फाऊंडेशनने दिली रायगड जिल्हा रुग्णालयास वैद्यकीय सुरक्षा साधने

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वदेश फाऊंडेशनने दिली रायगड जिल्हा रुग्णालयास वैद्यकीय सुरक्षा साधने
        बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात निरंतर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्वदेश फाऊंडेशनच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा रुग्णालयास
 Covid_१९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करण्यात आला. 
       सदर वैद्यकीय सुविधा साधनांमध्ये प्रामुख्याने पुढील प्रमाणे वैद्यकीय सुरक्षा साधने  उदाहरणार्थ ट्रिपल लेयर मास्क ५००००,
एन-९५ मास्क १०००,
थर्मल स्कॅनर -५०, 
पी पी ई किट-७५०, 
पल्स ऑक्सी मिटर २० इत्यादी साहित्य देण्यात आले. 
       सदर वैद्यकीय सुरक्षा साधने   स्वदेस फाऊंडेनचे महाव्यवस्थापक यांच्या समवेत  समन्वयक नयन पोटले यांचे हस्ते अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अनिल फुटाणे, प्रशासकीय अधिकारी श्री.धामोडा पी. डी ,औषध निर्माता कदम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम समन्वयक सुनिल चव्हाण यांचेकडे जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद गवई यांच्या मार्गदर्शनाखाली
सुपूर्द करण्यात आली
       स्वदेश फाऊंडेशनने कोरोना च्या पार्श्वभूमीवर आता पर्यंत 
ट्रिपल लेयर मास्क १,५००००,
एन-९५ मास्क  ६०००,
पी पी ई किट-३२००, 
ट्रिपल लेयर मास्क - १५०००० तर
५२ थर्मल स्कॅनर आणि २०पल्स ऑक्सी मिटर देण्यात आले आहेत.

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभाग क्रमांक १६ मधे गोरगरिबांना अन्नदान वाटप

नंदिकेश्वर सामाजिक संस्थेच्या वतीने प्रभाग क्रमांक १६ मधे गोरगरिबांना अन्नदान वाटप
कल्याण, सचिन भोईर
कोरोना या विषाणूने थैमान घातल्याने  सध्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून सामाजिक वारसा असलेले, कामगार नेते, नंदिकेश्वर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, यांनी आपल्या प्रभागातील अनेक नागरिकांची लॉक डाऊन मुळे ज्यांचे हातावर पोट असलेल्या असे, व गरिब, गरजवंत नागरिक‌ यांची उपासमार  होत आहे असे दिसल्यावर संकटकाळी नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे ज्ञानेश्वर पाटील यांनी व त्यांचे सहकारी जसे भाजीपाला वाटप ( जवळपास ४०० कुटुंबीयांना लाभ), किराणा सामान वाटप,  असे सामाजिक कार्य केले व कोणीही उपाशी राहू नये व त्यांना सकस आहार मिळावा म्हणून आजपासून अन्नदान वाटपाला सुरुवात केली, आज पहिल्याच दिवशी तीनशेहून अधिक गरजवंतानी लाभ घेतला, यावेळी ज्ञानेश्वर पाटील व यांचे सहकारी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र आढाव, सचिन भोईर, प्रकाश सोनावले, संजय भोईर, संदिप पाटील, दुर्योधन पाटील, गणेश पाटील, रवी भोईर, संदिप मोरे, उन्मय पाटील, ललिता पाटील, स्वाती पाटील व इतर उपस्थित होते, यावेळी अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की आम्ही (मी व माझे सहकारी) आमच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य नेहमीच करत असतो, पण आता आणीबाणीच्या काळात गोरगरीब जनतेला मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे जो पर्यंत गरज आहे तो पर्यंत आम्ही अन्नदान  करत रहाणार मी व माझे सहकारी आम्ही आमच्या प्रभागात तरी कुणी शक्यतो उपाशी राहू नये असे पहाणार.

गरिबनगरात शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर मरसाळे यांनी केली बिर्याणी वाटप

गरिबनगरात शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर मरसाळे यांनी केली बिर्याणी वाटप 

 सिद्धांत गाडे, उल्हासनगर -  
कोरोना या विषाणूने थैमान घातल्याने  सध्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून सामाजिक वारसा  असलेले , युवासेना उल्हासनगर उपशहर अधिकारी आणि माथाडी कामगार सेना शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर  सुभाष मरसाळे, यांनी नागरिकांची भुख भागवतांना दिसून येत आहे सध्या राज्यात हातावर पोट भरणाऱ्या नागरिकांची उपासमार होत आहे. पण संकटकाळी नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे मरसाळे यांनी व त्यांचे पदाधिकारी सोबत उल्हासनगर  मध्ये गरिबनगरात  मात्र  ४०० ते ५०० नागरिकांना चिकन बिर्याणी वाटप करण्यात आली असून  आणी बाणीच्या काळात सुध्दा एक हात मदतीची पुढे जनतेला मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे असे ज्ञानेश्वर मरसाळे यांनी सांगितले असून बिर्याणी वाटपाप्रसंगी नामदेव  मरसाळे,  दिलीप अवसारे, रमेश ससाणे, सुभाष मरसाळे, रविद्र सौदागर,  ज्ञानेश्वर पाटोळे, गणेश कांबळे, शंकर मरसाळे, रवि कांबळे, रवि शिरसाठ, बनसी कांबळे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Tuesday 28 April 2020

कल्याण पंचायत समितीच्या सभापतीच्या सास-यांचे हद् य विकारांच्या झटक्याने निधन तर उपसभापतीना मातृशोक!

कल्याण पंचायत समितीच्या सभापतीच्या सास-यांचे हद् य विकारांच्या झटक्याने निधन तर उपसभापतीना मातृशोक!

कल्याण (संजय कांबळे) 
कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती रंजना केतन देशमुख यांचे सास-याचे हृदय विकारांच्या तीव्र झटक्याने निधन झाले तर उपसभापती पांडुरंग हरिभाऊ म्हात्रे यांच्या आईचे अल्पशा आजाराने निधन झालं
कल्याण पंचायत समितीच्या सभापती श्रीमती रंजना देशमुख या म्हारळ गावच्या आहेत तर याच गावचे सुपूत्र पांडुरंग हरिभाऊ म्हात्रे हे देखील म्हारळ चे रहिवाशी आहे. एक सभापती तर दुसरे उपसभापती अशी दोन्ही पदे एकाच गावाला मिळण्याचा योग आला होता. माझी उपसभापती पांडुरंग म्हात्रे यांच्या मातोश्री श्रीमती अनुसया हरिभाऊ म्हात्रे यांचे निधन २२/४/२० २० रोजी म्हारळ येथे राहत्या घरी झाले. तर सभापती रंजना केतन देशमुख यांचे सासरे आणि म्हारळ गावचे जेष्ठ नागरिक केशवराव गणपतराव देशमुख यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतू वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली या दोन्ही दु:खद घटना मुळे म्हारळ गावावर शोककळा पसरली आहे .

कल्याण-डोंबिवली मधील पत्रकार व पोलिसांची कोरोना चाचणी.

कल्याण-डोंबिवली मधील पत्रकार व पोलिसांची कोरोना चाचणी..
कल्याण, प्रतिनिधी,
खा.डॉ.श्रीकांत शिंदे आणि शिवसेना वैद्यकीय मदत यांच्या वतीने पत्रकार व पोलीस यांची कोरोनाचाचणी करण्यात आली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत क्षेत्रात सद्या कोरोनाबाधितांची संख्या १४३ वर पोहचली आहे. 
यात ३ मयत तर ४५ जण डिस्चार्ज आहेत.
९५ जण हे उपचार घेत आहेत.
टाळेबंदी असून देखील पत्रकार आपली जबाबदारी ओळखून बातम्या लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम करतात.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या मार्फत आज कल्याण डोंबिवलीत पत्रकार आणि पोलीस यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली 
यामध्ये कल्याण डोंबिवलीतील ६० पत्रकार आणि पोलीस अधिकारी ,पोलीस बांधवांचा यांचा समावेश होता 
या पूर्वी देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन मार्फत नाशिक, ठाणे,मुंबई येथे पत्रकार बांधवांच्या कोरोनाचाचण्या करण्यात आल्या होत्या.

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुनिलजी तटकरे युवा प्रतिष्ठान च्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुनिलजी तटकरे युवा प्रतिष्ठान च्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश ठप्प झाला आहे. कोरोना विषाणूची संक्रमण साखळी तोडून कोरोना विषाणूचे देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी देशात सर्वप्रथम लाॅकडाऊन संचारबंदी लावण्यात आली आहे. या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे नागरिकांच्या संचार स्वातंत्र्यावर आणि नोकरी धंदा व मोलमजुरीवर कायद्याने निर्बंध आले आहेत. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होऊन त्यांच्यावर आर्थिक उपासमारीची वेळ आली आहे. 
      लाॅकडाऊन संचारबंदी च्या कालावधीत गोरगरीब, गरजू, आर्थिक दृष्ट्या दुर्बल समाज घटकातील नागरिकांचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नये व कोणीही उपाशी पोटी राहू नये म्हणून केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहयोगाने नागरिकांना रेशनिंग कार्डच्या माध्यमातून मोफत व अल्प दरात तांदूळ, गहू, डाळी साखर इत्यादींचा त्या त्या ठिकाणी  पुरवठा सर्वत्र करण्यात येत आहे. 
      याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे अनेक संस्था, सामाजिक संघटना, समाजातील दानशूर व्यक्ती आणि लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून गोरगरीब सर्व सामान्य जनतेला आपापल्या परीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. 
    कोरोना मुक्तीच्या या राष्ट्रीय लढ्यासाठी लोकप्रिय खासदार माननीय सुनिलजी तटकरे साहेब, आमदार अनिकेत तटकरे आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय अदितीताई तटकरे यांच्या प्रत्येकी खासदार, आमदार आणि पालकमंत्री सरकारी निधीतून कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात भरीव निधी देण्यात आला. तसेच सध्याच्या लाॅकडाऊन संचारबंदी कालावधीत संपूर्ण रायगड जिल्ह्यातील विविध प्रभागातील  नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खासदार सुनिलजी तटकरे संचालित युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या पार्श्वभूमीवर खासदार सुनिलजी तटकरे साहेब युवा प्रतिष्ठानच्या वतीने पेण तर्फे तळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच श्री. नितीन चांदोरकर, माजी सरपंच श्री. मनोहर वाघरे आणि माजी तंटामुक्त अध्यक्ष श्री. नामदेव कासारे यांच्या हस्ते    सोमवार दिनांक २७ एप्रिल आणि मंगळावर दिनांक २८ एप्रिल २०२० रोजी माणगांव तालुक्यातील पेण तर्फे तळे, बोरघर आणि आमडोशी या गावातील सर्व सामान्य कुटुंबातील गोरगरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक किराणा वस्तू व अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

अखेर मधुबनी अभिनेता चंद्रमणी मिश्रा घरी पोहोचले

अखेर मधुबनी अभिनेता चंद्रमणी मिश्रा घरी पोहोचले 
मुंबई, प्रतिनिधी
मधुबनी प्रख्यात अभिनेता चंद्रमणी मिश्रा, कुलूपबंदी दरम्यान एक महिन्यापेक्षा जास्त काळ बिलासपुरला अडकल्यानंतर मधुबनी जिल्ह्यातील खजुली ब्लॉकमधील त्याच्या मूळ गावी सुक्कीला पोहोचले. मीडिया, एनयुजेएम, जलसंपदा मंत्री बिहार सरकारचे त्यांनी आभार मानले.
बारा वर्षांपासून मुंबईत राहून अभिनयात करिअर करणारे मिश्रा म्हणाले की, लॉकडाऊनमुळे ते २४ मार्चपासून छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये अडकले होते. चंद्रमणी मिश्रा मधुबनी येथील आपल्या घरी जाण्यासाठी नागपूर सोडले होते पण २४ मार्चला कुलूपबंदीमुळे ते बिलासपुरात अडकले. त्याची आई गावात आजारी होती. तिची काळजी घेण्यास कोणीही नाही कारण ती स्वतःच म्हातारी झालेल्या आजी आजोबांसोबत राहते. अशा परिस्थितीत, त्याने घरी पोहोचण्यासाठी प्रत्येक पद्धतीचा वापर केला, परंतु सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले.
एका चित्रपट अभिनेत्याच्या सल्ल्यानुसार त्याने सोशल मीडियावर हेल्पलाइन नंबरसाठी मदत मागितली. दैनिक भास्कर चे पत्रकार धर्मेद्र प्रतापसिंह यांनी हा संदेश एनयुजेएम अध्यक्ष शीतल करदेकरजीना दिला. त्यांनी तो एनयुजेएम चे मार्गदर्शक शिवेंद्रकुमार यांना दिला आणि मदत सुरु झाली. 
शिवेंद्रकुमारजींच्या एका फोनवर छत्तीसगड जर्नालिस्टस् असोसिएशन चे २५/३०पत्रकार मला भेटायला आले. रमन दुबे, शशि कोन्हैर,अशाद जुंजाणी, सूर्यकांत,सत्य प्रकाश, आणि इतर पत्रकारांनी आपलेपणाने चौकशी केली व माझ्याबद्दल लिहिले.
एनयुजेएमचे मार्गदर्शक शिवेंद्रकुमार मधुबनीमध्ये राहणारे देशाचे सुप्रसिद्ध राजकीय रणनीतिकार डॉ. कृष्णा कुमार झा यांना या समस्येची माहिती दिली. डॉ झा यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशात कार्यरत असलेली अँटी कोरोना टास्क फोर्स, ज्यामध्ये 20 हजाराहून अधिक स्वयंसेवक कार्यरत आहेत.त्यांनी सर्वबाबींची तपासणी केल्यावर माझं गावाला पोहोचणे खरोखर आवश्यक आहे  म्हणून मदतकार्याला गती दिली. 
एसीटीएफचे संयोजक डॉ. झा, मधुबनी जिल्हा प्रशासन, बिहारचे जलसंपदा मंत्री, माननीय संजय झा, बिहारचे मुख्यमंत्री सी. नितीशजी, झारखंडचे मुख्यमंत्री माननीय हेमंत सोरेन आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री माननीय बघेल जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 
माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याशी बोलले, सरकारी समन्वय स्थापन केला, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि शेवटी मी गावात पोहोचू शकलो.
अभिनेता चंद्रमणी मिश्रा नी ,कोणाकडूनही कोणतीही आर्थिक मदत न घेता स्वत: च्या संसाधनांसह निःस्वार्थ सेवा करणारे संस्थेचे संयोजक डॉ झा यांच्यासह छत्तीसगड, बिहार, झारखंड, महाराष्ट्र आणि सर्व मीडिया जगताने सहकार्य करून , प्रोटोकॉलचे अनुसरण करून घरी पोचण्यास मदत केली .
विशेषत:मा शिवेंद्रकुमार जी, एनयुआय च्या महाराष्ट्र युनिटच्या शीतलजी करदेकर,बिलासपूर यांचे सर्व सामाजिक प्रयत्न तसेच मधुबनीचे डीएम, केंद्रीय मंत्री, खजौली चे विडियो, गावाचे सरपंच या सर्वाचे मनापासून कृतज्ञता व्यक्त केली.
उल्लेखनीय बाब अशी की, चंद्रमणी मिश्रा यांनी क्राइम पेट्रोल, सावधान इंडिया, निमकी मुखिया, जोधा अकबर, सीआयडी, अफसर बिटिया, परिचयन, तुम देना साथ मेरा, ये है मोहब्बतें, आहत, शपथ टीव्ही शोमध्ये काम केले आहे. याशिवाय २०१७ मध्ये आलेल्या 'मोदी काका का व्हिलेज' चित्रपटात मुख्य भूमिका निभावली होती.

वरिष्ठ पत्रकार आनंद राणा प्रेस कांउसिल ऑफ इंडिया के सदस्य नियुक्त

*वरिष्ठ पत्रकार आनंद राणा प्रेस कांउसिल ऑफ इंडिया के सदस्य नियुक्त*

नई दिल्ली, 28 अप्रैल 2020
वरिष्ठ पत्रकार श्री  आनंद राणा को प्रेस कांउसिल ऑफ इंडिया (पीसीआई) का सदस्य नियुक्त किया गया है। नई दिल्ली स्थित सूचना भवन में पीसीआई के चैयरमेन एवं सुप्रीम कोर्ट के पूर्व न्यायाद्यीश श्री चंद्रमौली कुमार प्रसाद की अध्यक्षता में गत 24 फरवरी को श्री राणा की नियुक्ति संबंधी प्रक्रिया को पूर्ण किया गया था। केंद्र सरकार ने श्री राणा की नियुक्ति को गजट ऑफ़ इंडिया में अधिसूचित कर दिया है। 

नेशनल यूनियन ऑफ जर्नलिस्ट्स इंडिया (एनयूजेआई) की राष्ट्रीय कार्यकारिणी के सदस्य और पत्रकारिता के क्षेत्र में दो दशक से भी ज्यादा समय से कार्यरत आनंद राणा पिछले कई सालों से हरिभूमि के दिल्ली संस्करण की बागडोर संभाल रहे हैं। दिल्ली जर्नलिस्टस एसोसिएशन  (डीजेए) के पूर्व महासचिव आनंद राणा पत्रकारों से जुड़े मुद्दों पर संघर्षरत  रहे हैं।

गौरतलब है कि प्रेस कांउसिल ऑफ इंडिया यानी भारतीय प्रेस परिषद एक संविधानिक स्वायत्तशासी संगठन है जो प्रमुखरूप से प्रेस की आजादी की रक्षा करने एवं उसकी जिम्मेदारियों को सुनिश्चित करने के दायित्व का निर्वहन करता है। अध्यक्ष पीसीआई के प्रमुख होते हैं, जिसे राज्यसभा के सभापति, लोकसभा के अध्यक्ष एवं सदस्यों में चुना गया एक सदस्य मिलकर नामित करते हैं। पीसीआई के सदस्यों में पत्रकार बिरादरी के नुमाइंदों के अलावा तीन लोकसभा सदस्य, दो राज्यसभा सदस्य तथा एक-एक सदस्य बॉर कांउसिल ऑफ इंडिया, विश्वविद्यालय अनुदान आयोग तथा साहित्य अकादमी से होते हैं।

श्री राणा की नियुक्ति पर नेशनल यूनियन ऑफ जर्नलिस्टस (एनयूजे) और संबंद्ध राज्य ईकाईयों ने खुशी का इजहार किया है। इंडियन जर्नलिस्टस यूनियन, प्रेस एसोसियसन, वर्किंग न्यूज कैमरामेनस एसोसियसन ने श्री राणा के पीसीआई का सदस्य बनने पर बधाई दी है। एनयूजे के अध्यक्ष श्री रास विहारी, महासचिव श्री प्रसन्ना मोहंती, इंडियन जर्नलिस्टस यूनियन के अध्यक्ष श्री  के. श्रीनिवास रेड्डी, महासचिव श्री बलविंदर सिंह जम्मू, पीआईबी मान्यता प्राप्त पत्रकारों के संगठन-प्रेस एसोसियसन के अध्यक्ष श्री जयशंकर गुप्त, महासचिव श्री सी.के.नायक और वर्किंग न्यूज कैमरामेनस एसोसियसन के अध्यक्ष श्री एस. एन. सिन्हा,महासचिव श्री सन्दीप शंकर ने श्री आनंद राणा की नियुक्ति के बाद कहा कि इससे पत्रकार हितों की आवाज और बुलंद होगी। दिल्ली जर्नलिस्ट्स एसोसिएशन के अध्यक्ष श्री  राकेश थपलियाल और महासचिव श्री  के पी मलिक ने श्री आनंद राणा के पीसीआई सदस्य नियुक्त होने पर एनयूजे, आईजेयू, प्रेस प्रेस एसोसिएशन और वर्किंग न्यूजकैमरामैन एसोसिएशन के सभी पदाधिकारियों का धन्यवाद किया है।
एनयूजे-आई के निवर्तमान अध्यक्ष श्री प्रज्ञानंद चौधरी (आनंद बाजार पत्रिका ),पूर्व उपाध्यक्ष श्री शिवा कुमार,  पूर्व कोषाध्यक्ष सीमा किरण, डीजेए के पूर्व उपाध्यक्ष अशोक किंकर, उत्तर प्रदेश जर्नलिस्टस एसोसियसन (उपजा) के अध्यक्ष रतन दीक्षित तथा महासचिव अशोक अग्निहोत्री (ताउ),जर्नलिस्टस एसोसियसन ऑफ राजस्थान (जार) के अध्यक्ष राकेश शर्मा तथा महासचिव राकेश सैनी, ओडिसा यूनियन ऑफ जर्नलिस्टस के  महासचिव अक्षय साहू, जर्नलिस्टस एसोसियसन ऑफ आंध्रप्रदेश के अध्यक्ष पुन्नम राजू, महासचिव युगांधर रेड्डी, झारखंड यूनियन ऑफ जर्नलिस्टस के अध्यक्ष रजत गुप्ता तथा महासचिव शिव अग्रवाल, उत्तराखंड एनयूजे के अध्यक्ष ब्रह्मदत्त शर्मा तथा महासचिव आर.सी.कन्नौजिया, महाराष्ट्र एनयूजे की अध्यक्ष शीतल ताई तथा महासचिव सीमा बोइर, पश्चिम बंगाल यूनियन ऑफ जर्नलिस्टस के अध्यक्ष प्रोबीर चटर्जी तथा महासचिव कल्याण पंडित, असम जर्नलिस्टस एसोसियसन के महासचिव दालिम फुकन, कर्नाटक एनयूजे के अध्यक्ष प्रकाश सत्तार महाजन, जम्मू-कश्मीर यूनियन ऑफ जर्नलिस्टस के अध्यक्ष सयैद जुनैद, छत्तीसगढ़ एनयूजे के अध्यक्ष मनोज व्यास, महासचिव प्रभुल्ल ठाकुर, जर्नलिस्टस यूनियन ऑफ मध्यप्रदेश के अध्यक्ष खिलावन चंद्राकर, त्रिपुरा यूनियन ऑफ वर्किंग जर्नलिस्टस के महासचिव प्रसन्था चक्रवर्ती, हिमाचल प्रदेश एनयूजे के अध्यक्ष राणेश राणा तथा महासचिव किशोर ठाकुर, तमिलनाडु एनयूजे के अध्यक्ष एस मुरूनंदम व  महासचिव एम कृष्णावेनी,, केरल एनयूजे के अध्यक्ष टी एस शालिनी और एनयूजे -आई केन्द्रीय कार्यालय सचिव मनमोहन लोहानी ने श्री राणा की नियुक्ति पर बधाई दी है.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालया चा अनागोंदी कारभार लोकांच्या जीवावर उठलाय.

उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालया चा अनागोंदी कारभार लोकांच्या जीवावर उठलाय... 
         
सिध्दांत गाडे, उल्हासनगर  -  युथ ऑफ टुडे वेलफेअर फाऊंडेशन मार्फत कवट्याची वाडी बदलापूर येथील डोंगरात आदिवासी पाडय़ातील नागरिकांना जेवन वाटप करण्यासाठी संस्थेचे स्वयंसेवक गेले असताना त्यांना समजले की वाडीतील एका आदिवासी मुलाच्या हाताला झाडावरून पडून मार बसल्याने हाताला फॅक्चर झाला आहे. बदलापूर येथील शिवाजी महाराज चौकामधील महाडिक डॉक्टर यांच्याकडे त्याच्यावर उपचार करण्यासाठी होऊन गेले होते. तेथील डॉक्टरांनी उपचाराचा खर्च वीस हजार रुपये एवढा सांगितला. अश्या परिस्थितीमध्ये आदिवासी मुलांच्या आईने आम्हाला संस्थेकडे मदतीचा हात मागितला. मुलाला वडील नसल्याने आई त्याचे संगोपन करीत होती. मग संस्थेमार्फत मुलाच्या उपचारासाठी संस्थेचे अध्यक्ष मार्शल नाडर यांनी त्या मुलाला सेंट्रल हॉस्पिटल उल्हासनगर नंबर तीन येथे नेहुन दोन दिवस त्याच्यावर उल्हासनगर येथील सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आला. हाताला दोन्ही 2 ठिकाणी फॅक्चर असल्यामुळे त्याचे ऑपरेशन करण्याचा तेथील डॉक्टरांनी सल्ला दिला व लवकरच ठाणे येथील कळवा हॉस्पिटलला घेऊन जा असे सांगण्यात आले. आज संध्याकाळी संस्थेमार्फत त्याला कळवा हॉस्पिटल ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी घेऊन गेले पण ते पुढे मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवत आहे. कोरोनाच्या वाढत्या  परिस्थिती मुंबईच्या हॉस्पिटलला जाणं तेवढेच धोकादायक आहे.
आपल्याकडे खासगी दवाखान्या शिवाय दुसरा पर्याय नाही. फॅक्चर होऊन चार दिवस झाल्यास लवकरात लवकर आताचे ऑपरेशन नाही केले तर त्याला आयुष्यभरासाठी हाताला मोठी इजा होण्याची शक्यता आहे. 
काल रात्री सामाजिक संघटना द्वारे सोशल मीडिया वरील केलेल्या तीव्र आंदोलन पाहता सेंट्रल हॉस्पिटल प्रशासनाद्वारे मुलाला एडमिट केले गेले आहे. आज ऑपरेशन करण्यात येणार असतानाच प्रशासना बाहेरुन काही आरोग्य सामग्री आणण्यास सांगितली, त्याची तैयारी करत असतानाच डॉक्टर म्हणाले कि आमच्याकड़े एनेस्थेसिया डॉक्टरची व्यवस्था नाही आहे, देउ नाही शकत. 
आधीच सेंट्रल हॉस्पिटल प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे उल्हासनगर येथील वरिष्ठ पत्रकार रामेश्वर गवई यांची मुलगी आमच्यातुन निघुन गेली, तर दुसऱ्या घटनेत गरोदरबाईला सेंट्रल हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी 2 वेळा घरी पाठवले गेले, आणि आता हे प्रकरण यामुळे सेंट्रल हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.
उल्हासनगर येथील सामाजिक संघटना द्वारे मुख्यमंत्री, आरोग्यमन्त्री, ठाणे जिल्हाधिकारी, आयुक्त यांना ट्विट करुन व विभिन्न सामाजिक कार्यकर्तेद्वारे प्रशासनावर कार्रवाई करणेसाठी सांगण्यात आले आहे.

भुसावळ रेल्‍वे यांत्रिक विभागातर्फे मास्कचे उत्पादन

भुसावळ रेल्‍वे यांत्रिक विभागातर्फे मास्कचे उत्पादन
भुसावळ प्रतिनिधी :- कोविड-१९ कोरोना या साथी आजाराच्या पार्श्वभूमीवर मास्क अत्यावश्यक वस्तूंची भुसावळ रेल्‍वे विभागातील यांत्रिक विभागातर्फे मास्कची इन-हाऊस निर्मिती करण्‍यात येत आहे.       
या इन-हाऊस तयार होणा-या मास्‍कचा उपयोग रेल्‍वे आरोग्य सेवा कर्मचारी आणि आवश्यक कर्तव्यावर तैनात असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांना करता येईल.सदरचे मास्क बनवण्याचे कार्य रेल्‍वेयांत्रिक विभागातील कर्मचारी लघुलेखक (स्‍टेनो)श्रीमती ज्योती शितोळे ह्‍या आपल्‍या निवासस्‍थानी स्व:खर्चाने करीत आहे. त्यांनी आतापर्यंत दीडहजार मास्क बनवून तयार केले असून अजून बनवण्याचे कार्य सुरु ठेवले आहे.यातील १ हजार २०० मास्क रेल्वे कर्मचारी आणि उर्वरित मास्क गरजू लोकांना देण्यात आले आहे.

Monday 27 April 2020

एरंडोल येथे नगरसेवकाने दिले ४५०० लोकांना जेवण.

एरंडोल येथे नगरसेवकाने दिले ४५०० लोकांना जेवण.
कुंदन ठाकुर, एरंडोल
सध्या सगळीकडे लॉक डाऊन असल्याने गरीब व मजुर लोकांचे जेवणा वाचुन हाल होत असुन त्यांना मदतीचा हात म्हणुन एरंडोलच्या वार्ड क्र.७ चे नगरसेवक व माजी उपनगराध्यक्ष अब्दुल शकुर मोमीन यांनी दि.२ एप्रिल पासुन ते आजपर्यंत ४५०० गरजु लोकांना घरपोच अन्नदान केले असुन अजुनही ते अन्नदान करीत असुन जो पर्यंत लॉक डाऊन आहे तो पर्यंत मी गरजुंना अन्नदान करणार असल्याचे सांगितले.यात त्यांना त्यांचे सहकार्यांची देखील मोलाची साथ मिळत आहे.
सदर नगरसेवक अब्दुल शकुर मोमीन हे बांधकाम व्यवसायिक असल्याने त्यांच्याकडे अनेक मजुर काम करतात त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालेल या हेतुने प्रेरित होऊन त्यांनी सदर अन्नदान करण्याचा विचार केला परंतु कालांतराने त्यांना परिसरात अनेक गरजु व गरीब आढळुन आल्याने त्यांनी सदर उपक्रमात सर्व गरजुंना अन्नदान करण्यचा विचार केला व आज तागायत त्यांनी ४५०० गरजुंना अन्नदान केले असुन भविष्यात जो पर्यंत लॉक डाऊन सुरु आहे तो पर्यंत अन्नदान करण्याचे त्यांनी सांगितले.

भुसावळात जिल्ह्यधिकाऱ्यांचा दैरा : शासकीय विश्राम गृहात बैठक संपन्न ; शहराची केली पाहणी

भुसावळात जिल्ह्यधिकाऱ्यांचा दैरा : शासकीय विश्राम गृहात बैठक संपन्न ; शहराची केली पाहणी
निलेश फिरके, भुसावळ
भुसावळात कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आल्याचा पार्श्वभूमीवर जळगाव येथील मा.जिल्ह्याधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांचा भुसावळात दैरा झाला.त्यानंतर शासकीय विश्राम गृहामध्ये त्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली.
शहरात दोन रुग्ण आढळले त्या पार्श्वभूमीवर त्यांची व्यवस्था कशी करता येणार आहे तसेच बाकी रुग्ण वाढल्यास त्यासाठी काय उपाय योजना करता येणार आहे.यासाठी लोकांना वेळेवर माहिती देणे गरजेचे आहे.बैठकीत शहराची पाहणी करणे.भुसावळ शहरात कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी काय उपाय योजना करता येईल यावर चर्चा करण्यात आली.समता नगर व सिंधी कॉलनी भागात दोन झोन तयार करण्यात आले आहे. यामुळे लोकांना येणाऱ्या अडचणी भाजीपाला,किराणा सोडविण्यात प्रयत्न करणार आहे.बैठक झाल्यानंतर सर्व अधिकारी शहराची पाहणी करण्यासाठी गेले.यावेळी बैठकीला पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दिपक धिवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ गजानन राठोड, मुख्याधिकारी कल्पना डहाळे, बा.पो.स्टे. नि.दिलीप भागवत,ता.पो.स्टे.नि. रामकृष्ण कुंभार, श.पो.स्टे.नि. बाबासाहेब ठोंबे,मंडळ अधिकारी योगिता पाटील,तलाठी रतनाणी उपस्थित होते.

डांबरात अडकलेल्या श्वानाला 'शिवदुर्ग'कडून जीवनदान

🔴न्यूज फ्लॅश;

डांबरात अडकलेल्या श्वानाला 'शिवदुर्ग'कडून जीवनदान
लोनावळा – डांबर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. ट्रकमधून डांबर रस्त्याच्या बाजूला सांडले. त्या डांबरातून जात असताना एक मादी श्वान (यापुढे ‘ती’ असे वाचावे) त्यात अडकली. श्वास घेण्यापुरतं नाक वगळता सगळं अंग डांबराने भरलं. त्याला दगड, माती, कचरा लागू लागला. वेदनांचा कल्लोळ उडाला. पण त्या मुक्या प्राण्याला साधं ओरडणं सुद्धा शक्य नव्हतं. ही बाब शिवदुर्ग टीमच्या एका सदस्याच्या निदर्शनास आली. अन त्यानंतर सगळी टीम तीच्या मदतीसाठी धावली. तब्बल चार दिवस शिवदुर्गच्या प्राणी प्रेमींनी अथक परिश्रम घेऊन तीचे सर्व डांबर काढून मोकळे केले. त्यानंतर ती आनंदाने उड्या मारत निघून गेली.

मुंबई-पुणे या लेनवर द्रुतगती मार्गावरून एक डांबराचा ट्रक जात होता. तुंगार्ली येथी त्या ट्रकला अपघात झाला आणि डांबराने भरलेला ट्रक पलटी झाला. ट्रक मधील सर्व डांबर रस्त्याच्या कडेला सांडले. सर्व खड्डे डांबराने भरून गेले. हे डांबर ओलांडताना एक श्वान त्यात अडकली आणि चिकटून बसली.नाक आणि एक बाजूचा पाठीचा थोडा भाग वगळता सर्व अंग डांबराने माखून गेले.

शिवदुर्ग रेस्क्यु टीमचे राहुल देशमुख यांना ही माहिती मिळाली. लगेचच त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. टीमची आवश्यकता भासल्याने त्यांनी तात्काळ टीमला बोलवले. शिवदुर्ग अॅनिमल रेस्क्यु अॅम्बुलन्स सुद्धा घटनास्थळी पोहोचली. तीच्या अंगावर खूप मोठा डांबराचा थर होता. त्याला दगड, गोटे, माती, कचरा लागलेले होते. ती एक प्राणी आहे, याची कल्पनाही करता येत नव्हती, एवढी विदारक अवस्था तीची झाली होती.

शिवदुर्गच्या सदस्यांनी तीला पोत्यावर घेऊन अॅम्बुलन्सने औंढे, लोणावळा येथील शिवदुर्ग अॅनिमल रेस्क्यु सेंटर मध्ये आणले. तात्काळ डांबर काढण्याचे काम सुरू झाले. शिवदुर्ग मित्र लोणावळा आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सयुक्त विद्यमाने अॅनिमल रेस्क्यू सेंटर चालवले जात आहे.मोठमोठे चिकटलेले दगड व माती हाताने काढून घेतली. नंतर डिझेल व खोबरे तेल याचे सम प्रमाणात मिश्रण करून घेतले. हे मिश्रण लावल्यावर डांबर निघून जाते व साईड इफेक्ट काहीही होत नाही. नाकाचा भाग सर्वप्रथम मोकळा करण्याचे ठरले. त्यामुळे तीचा श्वास सुरू झाला. त्यानंतर तोंड मोकळे केले. ज्यामुळे तीला खाता येऊ लागले. तोंड उघडायला लागल्यावर पाणी पाजले, खायला दिले.

त्यानंतर मलमूत्र विसर्जनाची जागा स्वच्छ केली. शरीरावर लागलेले डांबर काढणे अत्यंत जिकरीचे काम होते. शिवदुर्गचे स्वयंसेवक दररोज तासंतास तीची सेवा करीत होते. घाई, ओढाताण केल्यास अंतर्गत जखमा होण्याची दाट शक्यता असल्याने हलक्या हाताने सर्व काम केले. प्रथम तेल लावून चोळायचे आणि नंतर पाण्याने अंघोळ घालायची. ही प्रक्रिया तब्बल चार दिवस सुरू होती. टेबल, ट्रे, काम करणारे स्वयंसेवक डांबरमय झाले होते.
सुरवातीला गुरगुरणारी ती नंतर शांत राहून स्वयंसेवकांना सहकार्य करू लागली. दुसऱ्या दिवशी चार पाय मोकळे झाले व ती उभी राहायला लागली. मग तीने पळायचा प्रयत्न केला. पण डांबरामुळे पाय चिकटत असल्याने ती पळू शकत नव्हती. हा सर्व प्रकार लॉकडाऊन सुरु होण्यापूर्वी झाला. डांबर काही प्रमाणात निघाले असताना संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर झाले अन सगळं काही ठप्प झालं. या डांबर कन्येचे काय करायचे हा विचार सुरू झाला. त्यानंतर स्वयंसेवक वैष्णवी भांगरे हिने तीला स्वतःच्या घरी नेले. उरलेले सर्व डांबर काढून फायनल टच दिला. घरी नेल्यावर तीने एकदा रात्री हातातून सटकून धूम ठोकली. पण काही वेळाने ती परत आली. चार दिवसानंतर तीला पुन्हा तुंगार्ली येथे सोडण्यात आले. तिथे सोडल्यानंतर तीआनंदाने उड्या मारत निघून गेली.

राहुल देशमुख, प्रणय अंबूरे, विकास मावकर, अबोली वाकडकर, सुमित पिंगळे, संकेत मानकर, मंगेश केदारी, महिपती मानकर, सुनिल गायकवाड, वैष्णवी भांगरे या सदस्यांनी तीचे डांबर काढण्यास मदत केली. कोणताही प्राणी अडचणीत असेल, जखमी असेल तर शिवदुर्ग अँनिमल हेल्पलाईनवर (7522946946) यावर संपर्क करण्याचे आवाहन शिवदुर्गकडून करण्यात आले आहे.

उल्हासनगर शहरवासीयांसाठी पालिका आयुक्तसुधाकर देशमुख यांची धोक्याची सूचना

उल्हासनगर शहरवासीयांसाठी पालिका आयुक्त
सुधाकर देशमुख यांची धोक्याची सूचना
            
उल्हासनगर  - सिध्दांत गाडे
उल्हासनगर-५ येथे यापूर्वी अत्यंत गर्दीच्या भागात एक कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे. आज उल्हासनगर शहरात मिळालेला जिजामाता कॉलनी, संभाजी चौकातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ही शहराची चिंता वाढवणारी बाब आहे. असे उल्हासनगर महानगर पालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

पुढे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे की अत्यंत गर्दीच्या शहरात गर्दी करण्याचे प्रमाण वाढले असून पोलिसांनी शिक्षा करूनही शिस्त मोडणार यांचे प्रमाणही वाढले आहे.  जिजामाता कॉलनी जवळचा मोठ्या प्रमाणात भाग हा झोपडपट्टी किंवा गर्दीच्या चाळींचा आहे. त्यामुळे याठिकाणी कोरोना रोगाचा फैलाव झाल्यास कुणीही नियंत्रणात आणू शकणार नाही. असे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

मुंबई शहरात या रोगाने फैलावत गती पकडली असून दर ६.६ दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. ठाणे व मीरा-भाईंदर येथील प्रसार सुद्धा अत्यंत चिंताजनक आहे. थोडक्यात या आजाराने अक्राळ विक्राळ रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरास साथ रोगमुक्त ठेवणे हे प्रशासनाच्या हातात राहिले नसून शिस्त पाळणाऱ्या नागरिकांच्या हातात आहे. मुंबई व उपनगर क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रभाव यामुळे त्या क्षेत्रात राहणारे उल्हासनगर शहरातील रहिवासी किंवा उल्हासनगर येथील रहिवाशांचे नातेवाईक छुप्या पद्धतीने शहरात प्रवेश करून राहण्याचा प्रयत्न करत आहेत. असेही पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

अनेक वेळा आवाहन करूनही नागरिकांना नातेवाईकाकडे जाऊ नये व नातेवाईकाला बोलावू नये असे सांगूनही त्याचे पालन केले जात नाही. या बाबी पोलिसांच्या नियंत्रणाच्या पलीकडे आहेत.

खेड्यापाड्यांमध्ये नागरिकांनी पूर्ण शिस्त पाळली असून राज्यात खेड्यांमध्ये हा आजार पोहोचला नाही. मात्र नोकर-चाकर, मालक व चालक वर्ग असलेल्या सुशिक्षित लोकांच्या शहरांमध्ये दुर्दैवाने शिस्त पाळण्यामध्ये शहरे कमी पडत आहेत.

शहरातील अत्यावश्यक सेवांचे दुकानदार, भाजीपाला विक्रेते यांना अनेक नियम घालून दिलेले आहेत. प्रशासन नियम पाळण्यासाठी दबाव आणत आहे. मात्र दुकानदार किंवा ग्राहक या दोघांनाही शिस्तीबद्दल गांभीर्य नाही. सर्वच बाबी केवळ प्रशासनाने थांबविणे कधीही शक्य नसते. लोक शिस्त पाळत नाहीत म्हणून तक्रारी केल्या जातात मात्र शिस्त पाळत नाही हे पाहणाऱ्यांचे व तक्रारी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त वाढत असून शिष्ट स्वतःहून पाळणार यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मुळातच मर्यादित असलेले पोलीस व प्रशासकीय कर्मचारी यांचा ताण वाढत असून रोग नियंत्रणावर काम करण्यापेक्षा तक्रारी निवारण करण्यातच वेळ जास्त जातो. असे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

शहरवासीयांच्या हातून अद्याप वेळ गेलेली नाही. मनाला आवर घालणं व आपल्या भागातील लोकांना शिस्तीत ठेवणे हे अजून आपण करू शकतो. आपण किमान २० मे पर्यंत रोग नियंत्रणात ठेवला तरच हे शहर वाचू शकते. अन्यथा या शहराला कोण वाचवेल हे सांगणे कठीण आहे. राज्यातील एका महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना कोरोनाची लागण झाली असल्याने तेथील आयुक्तांसह इतर कर्मचाऱ्यांना quarantine करण्यात आलेले आहे. अनेक शहरांमध्ये डॉक्टर व नर्सेस कोरोना रोगाची रुग्ण बनत आहे. त्यामुळे ही यंत्रणा किती दिवस कार्यरत राहू शकते याची शाश्वती देणे अत्यंत कठीण आहे.

यासंदर्भात पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे की मी खूप चिंतीत आहे. प्रशासन आता सर्व उपाययोजना करून जनतेच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे. मात्र जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे विनाश अटळ आहे. आताच मनाला आवर घाला अन्यथा जे वाचतील ते केवळ कुणाच्यातरी डोक्यावर दोषाचे खापर फोडण्याचे काम करतील. असे उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी म्हटले आहे.

गरीब मजुर भाडेकरू व गरजु कुटुंबीयांना "भोजनदान" करुन साजरा केला वाढदिवस

गरीब मजुर भाडेकरू व गरजु कुटुंबीयांना "भोजनदान" करुन साजरा केला वाढदिवस
पनवेल -अण्णा पंडित
अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष विनोद चाळके यांनी अविरत समाजसेवेचा वसा घेतलेला असुन अन्याय अत्याचार निर्मुलन समिती चे संस्थापक अध्यक्ष रवींद्र (दादा) जाधव यांच्या प्रेरणेने व राज्य सचिव महेंद्र तथा अण्णा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चाळके हे समाजातील दलित पिडीत वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत असतात.
अनेक राष्ट्र आज कोरोना विषाणूं या महामारीचा मुकाबला करीत आहे. संपुर्ण देशात या आपात्कालीन परीस्थितीत दि. ०३ मे पर्यंत लॉक-डाऊन अर्थात संचारबंदी असुन त्याचा हातावर पोट असणाऱ्या जनतेच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होत आहे. याचे भान ठेवून व समाजसेवेचे बाळकडू घरातुनच मिळालेले असल्याने संतोष चाळके यांची अर्धांगिनी आयुष्यमती अविता संतोष चाळके यांचा वाढदिवस त्यांनी पनवेलमधील टेंभोडे गावातील गरीब मजुर भाडेकरू व गरजू कुटुंबाला भोजनदान देवुन अनोख्या पद्धतीने साजरा केला. अर्थात या सर्व धामधुमीत कार्यकर्त्यांकडून फिजीकल डिस्टन्सिंग चे योग्य रीतीने पालन  केले गेले. गावातील शेकडो कुटुंबीयांनी भोजनदानाचा लाभ घेतला. अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष रविंद्रदादा जाधव, राज्य सचिव महेंद्र तथा अण्णा पंडित. ठाणे जिल्हाध्यक्ष अमीत साळवे यांच्या सह संघटनेचे इतर पदाधिकारी प्रेमलता जाधव(राज्य उपाध्यक्षा) राधाताई क्षीरसागर (नासिक जिल्हाध्यक्षा) रफिक सय्यद, ममता पुणेकर,रेखा मंजुळकर,सुनीता सोनार, सुनील ऊकीर्डे(नासिक) वसंतराव वाघ. (ओझर)संदिप भालेराव (सिन्नर) विनोद भोसले, संजय गायकवाड (निफाड) परविन बागवान,मीना शिरसाठ (चांदवड) इत्यादींनी श्रीमती अविता संतोष चाळके यांना विविध माध्यमांतून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असुन भोजनदान करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.

Sunday 26 April 2020

कल्याण स्टेशन परिसरातील निर्वासित, बेघर, अपंग, दिव्यांग, वयोवृद्ध, गरजु, यांना जेवण सुविधा

कल्याण स्टेशन परिसरातील निर्वासित, बेघर, अपंग, दिव्यांग, वयोवृद्ध, गरजु, यांना जेवण सुविधा
कल्याण :- प्रतिनिधी 
कल्याण रेल्वे स्टेशन हा अत्यंत ‌गजबजलेले व वर्दळीचे ठिकाण, पण आलेल्या कोरोना सारख्या महामारी मुळे केंद्र, राज्य सरकारने लॉक डाऊन चा निर्णय घेतला, सर्व प्रकारच्या रेल्वे बंद केल्या अशा परिस्थितीत तेथील मजुर, गरजु, अपंग, दिव्यांग, वयोवृद्ध यांची उपासमार व्हायला लागली अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी सेलचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रसाद सुरेश महाजन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व पार्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून‌ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रसाद सुरेश महाजन स्वतः दररोज ५०० गरजु अपंग दिव्यांग वयोवृद्ध गरजवंत यांना ५ एप्रिल पासून दुपारी व रात्री जेवण पुरवितात तसेच जो पर्यंत लॉक डाऊन असेल तोपर्यंत या परिसरात कोणालाही उपाशी रहावे लागणार नाही व मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली मोफत जेवण सुविधा चालू ठेवणार. प्रसाद सुरेश महाजन यांचे या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कल्याण स्टेशन परिसरातील निर्वासित, बेघर, अपंग, दिव्यांग, वयोवृद्ध, गरजु, यांना जेवण सुविधा

कल्याण स्टेशन परिसरातील निर्वासित, बेघर, अपंग, दिव्यांग, वयोवृद्ध, गरजु, यांना जेवण सुविधा

कल्याण:- प्रतिनिधी 
कल्याण रेल्वे स्टेशन हा अत्यंत ‌गजबजलेले व वर्दळीचे ठिकाण, पण आलेल्या कोरोना सारख्या महामारी मुळे केंद्र, राज्य सरकारने लॉक डाऊन चा निर्णय घेतला, सर्व प्रकारच्या रेल्वे बंद केल्या अशा परिस्थितीत तेथील मजुर, गरजु, अपंग, दिव्यांग, वयोवृद्ध यांची उपासमार व्हायला लागली अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी सेलचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रसाद सुरेश महाजन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व पार्थ फाऊंडेशनच्या माध्यमातून‌ राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष प्रसाद सुरेश महाजन स्वतः दररोज ५०० गरजु अपंग दिव्यांग वयोवृद्ध गरजवंत यांना ५ एप्रिल पासून दुपारी व रात्री जेवण पुरवितात तसेच जो पर्यंत लॉक डाऊन असेल तोपर्यंत या परिसरात कोणालाही उपाशी रहावे लागणार नाही व मी माझ्या पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली मोफत जेवण सुविधा चालू ठेवणार. प्रसाद सुरेश महाजन यांचे या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

निंभोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न,५०जणांनी केले रक्तदान.युवा रसिक मंडळातर्फे राबविला उपक्रम.

निंभोरा येथे रक्तदान शिबिर संपन्न,५०जणांनी केले रक्तदान.
युवा रसिक मंडळातर्फे राबविला उपक्रम
दस्तगीर खाटीक, निंभोरा (रावेर)
येथील युवा रसिक मंडळातर्फे दि.२६ रोजी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून ५० जणांनी रक्तदान केले.यावेळी  सरपंच डिगंबर चौधरी,डॉ एस डी चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती दुर्गादास पाटील,सोपान पाटील,नंदपाल दूध संस्थेचे चेअरमन सुधीर मोरे आदी उपस्थित होते.यावेळी सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करीत रक्तदान शिबिर संपन्न झाले.याववेळी ४९ पुरुष व ०१ महिलेने रक्तदान केले.विशेष म्हणजे १८ वर्षाच्या खालील मुलांनीही यात सहभागी नोंदविण्याची आग्रह केला मात्र 18वर्षावरील व्यक्तीलाच रक्तदान करता येत असल्याने त्यांचा हिरमोड झाला.मात्र बाकी तरुणांनी उत्साहात रक्तदान केले.यावेळी इंडियन रेडक्रॉस सोसायटीतर्फे डॉ ए एम चौधरी,वीरेंद्र बिऱ्हाड़े,उमाकांत शिंपी,योगेश पाटील,अन्वर शेख यांसह निंभोरा येथील डॉ जयेश वाणी, डॉ डीएस झोपे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी धीरज भंगाळे,दुर्गादास पाटील,सुनील कोंडे,रवींद्र भोगे,गुणवंत भंगाळे,नंदपालचे चेअरमन सुधीर  मोरे,सोपान पाटील,परमानंद शेलोडे,हर्षल ठाकरे,युगल राणे,राजीव भोगे आदींनी परिश्रम घेतले.

ठाणे जिल्हा परिषद कल्याण तालुका मांजर्ली गटातील आदिवासी, विधवा महिला,गरजू लोकांना विनाप्रसिध्दी जीवनाश्यक वस्तूचे वाटप

*ठाणे जिल्हा परिषद कल्याण तालुका मांजर्ली गटातील आदिवासी, विधवा महिला,गरजू लोकांना  विनाप्रसिध्दी जीवनाश्यक वस्तूचे वाटप*
कल्याण :- प्रतिनिधी 
कोरोना लॉकडाऊनमध्ये अनेकजण आपल्यापरीने गावागावात जाऊन गोरगरीब व गरजू लोकांना मदत करत आहेत. अनेकांनी आपले फ़ोटो व बातम्या प्रसिद्धी माध्यमातून लोकांपुढे मांडले. पण एक महिना होऊनही कोणत्याही प्रसिद्धीचा मोह न धरता 80% समाजकारण,20%राजकारण हे बाळासाहेबांनी दिलेले शब्द समोर ठेवून सदाशिव बुधाजी सासे शिवसेना उपजिल्हा प्रमुख ठाणे ग्रामिण आणि शिवसेना ठाणे जिल्हा परिषद सदस्या साै.जयश्री ताई अच्युत सासे यांनी स्थानिक शिवसैनिकाना सोबत घेऊन  ठाणे  जिल्हा परिषद मांजर्ली गटातील पोई गाव, दहागाव, बांधने, भिसोल, नालिम्बि, रायते, गोवेली, कोलम, म्हसरोडी(चवरे),पोई,, मांजर्ली, आपटी गाव, आपटी चोण गाव व या गावांतील आदिवासी वाड्यां मध्ये जाऊन गरीब व गरजु लोकांना अन्नधान्यांचे वाटप केले. त्यांचे हे कार्य अखंड सूरू असून जनहित समोर ठेवून कोणताही गाजावाजा न करता करताना प्रतिनिधीना दिसल्याने या कामाची दखल घेवून बातमी देत आहोत .

Saturday 25 April 2020

वाल्मीक देसले व नीता देसले पती-पत्नी यांना त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त भाजपा चित्रपट कामगार आघाडी ठाणे तर्फे शुभेच्छा

वाल्मीक देसले व नीता देसले पती-पत्नी यांना त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त भाजपा चित्रपट कामगार आघाडी ठाणे तर्फे शुभेच्छा
भारती बुटाला, कल्याण
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्यामुळे तो रोखण्यासाठी २४ मार्च पासून संपूर्ण देशात जाहीर केल्यामुळे विस्थापित कामगार व गोरगरीब मजुरांचे आतोनात हाल होत आहेत. अशा सर्वसामान्य कुटुंबाचे हाल होऊ नये याकरिता काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती गोरगरिब कुटुंबांना सढळ हस्ते मदत करीत आहेत. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची व गरजवंत नागरिकांची उपासमार होऊ नये  याकरिता वाल्मीक देसले व नीता देसले या पती-पत्नी यांनी यांनी अगदी पहिल्यापासून या कुटुंबांना व व्यक्तींना जेवण पुरविलेे, राशन सामुग्री पुरवली, त्यांच्या मधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी च्यवनप्राश वाटप केले. विभागातील रहिवाशांकरीता स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करून दिला, सर्व नियोजन करताना त्यांनी शासकीय नियमांचे पालन केले.
अशा समाजासाठी झटणाऱ्या वाल्मीक देसले व नीता देसले या पती-पत्नी यांचा आज २६ एप्रिल २०२० रोजी २६ वा लग्न वाढदिवस या निमित्ताने त्यांना  भाजपा चित्रपट कामगार आघाडी, ठाणे तर्फे त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा.

वाल्मीक देसले व नीता देसले पती-पत्नी यांना त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त भाजपा चित्रपट आघाडी ठाणे तर्फे शुभेच्छा

वाल्मीक देसले व नीता देसले पती-पत्नी यांना त्यांच्या लग्न वाढदिवसानिमित्त भाजपा चित्रपट आघाडी ठाणे तर्फे शुभेच्छा
भारती बुटाला, कल्याण
देशात व राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत चालल्यामुळे तो रोखण्यासाठी २४ मार्च पासून संपूर्ण देशात जाहीर केल्यामुळे विस्थापित कामगार व गोरगरीब मजुरांचे आतोनात हाल होत आहेत. अशा सर्वसामान्य कुटुंबाचे हात होऊ नये याकरिता काही सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती गोरगरिब कुटुंबांना सढळ हस्ते मदत करीत आहेत. मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची व गरजवंत नागरिकांची उपासमार होऊ नये  याकरिता वाल्मीक देसले व नीता देसले या पती-पत्नी यांनी यांनी अगदी पहिल्यापासून या कुटुंबांना व व्यक्तींना जेवण पुरविलेे, राशन सामुग्री पुरवली, त्यांच्या मधील रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी च्यवनप्राश वाटप केले. विभागातील रहिवाशांकरीता स्वस्त दरात भाजीपाला उपलब्ध करून दिला, सर्व नियोजन करताना त्यांनी शासकीय नियमांचे पालन केले.
अशा समाजाच्या साठी झटणाऱ्या वाल्मीक देसले व नीता देसले या पती-पत्नी यांचा आज २८ एप्रिल २०२० रोजी २६ वा लग्न वाढदिवस या निमित्ताने त्यांना  भाजपा चित्रपट आघाडी, ठाणे तर्फे त्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा.

जगाचा बिझनेस कोमात, डिमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची यशस्वी जीवन गाथा

जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची यशस्वी जीवन गाथा
कोरोनाच्या संकटानं साऱ्या जगाचा धंदा मंदावलाय. अशा संकटातही एका माणसाची घसघशीत कमाई सुरू आहे. डी-मार्टच्या राधाकिशन दमानींच्या कमाईचे आकडे अंबानी, अदानींनाही तोंडात बोट घालायला लावणारे आहेत. दमानींच्या कमाईत पाच टक्क्यांनी वाढ झालीय. ग्राहकांनी घसघशीत डिस्काऊंट देऊन दमानींनी हे यश कसं मिळवलं?

कोरोनाने सगळ्यांना हादरवलं. पण कोरोनाला हादरवलं ते राधाकिशन दमानी यांनी. लॉकडाऊनमधे फायद्यात असणारं राधाकिशन दमानींच्या डी-मार्टचं बिझनेस मॉडेल भारी आहे. अंबानी, अदानी, बिर्ला, कोटक यांच्यासारख्या देशातील अनेक बड्या उद्योगतींना मोठं नुकसान सहन करावं लागतंय. कारण अर्थातच कोरोना. भविष्यात हे नुकसान भरुन काढण्याचं मोठं आव्हान या सगळ्यांसमोर आहे.

पण या सगळ्यात एका अवलियाचा मात्र फायदा झालाय. या अवलियाचं नाव आहे राधाकिशन दमानी. डी-मार्टचे मालक असलेल्या दमानी यांच्या कमाईचे जे आकडे समोर आलेत, ते अंबानी, अदानींना धक्का लावणारे आहेत. दमानी यांच्या संपत्तीत नुसती घसघशीत वाढ झाली नाहीय, तर त्यांचा धंदा लॉकडाऊनमधेही तेजीत आहे.

कोरोनामुळे सगळ्याच क्षेत्रांचं नुकसान झालंय. एकही क्षेत्र यातून सुटलेलं नाही. पण रिटेल स्टोअर म्हणून प्रसिद्ध असणारं डी-मार्ट फायद्यात आहे. ते का, हे वेगळं सांगायला नको. लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तू मिळणार नाहीत, या भीतीने अनेकांनी डी-मार्टच्या बाहेर रांगा लावल्या. ही गर्दी काही फक्त लॉकडाऊनपुरती मर्यादित नाही, हे लक्षात घ्या. कधीही जा, डी-मार्टमधे गर्दी दिसतेच. कोणत्या वेळेला गेलं की डी-मार्टमधे गर्दी नसते, याचं गॉसिपींग होतं, हेच डी-मार्टचं मोठं यश आहे.

स्वस्त मिळतो म्हणून बायका किराणा घेतात, तर थम्पअप, स्प्राईटवर भरघोस डिस्काऊंट मिळतं म्हणून बिलाच्या लाईनमधे बराचवेळ उभे राहणारेही तुम्ही पाहिले असतीलच. स्वस्त ते मस्त हे काही कुठं शिकवायला लागत नाही. तो मानवी स्वभावच आहे. पण डी-मार्ट स्वस्तात का विकतं? त्याचा डी-मार्टला काय फायदा होतो? कुठून आलीय ही कॉन्सेप्ट? बिग बाजार, रिलायन्स फ्रेश, फ्युचर बाजार सारख्या तगड्या स्पर्धकांवर डी-मार्टने कशी मात केली? ही स्टोरी तर इंटरेस्टिंग आहेच. पण त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग आहे, डी-मार्टला जन्म देणाऱ्या राधाकिशन दमानी यांची गोष्ट.

*शेअर बाजारातला कसलेला खेळाडू*
राधाकिशन दमानी हा अतिशय सर्वसामान्य मुलगा. अभ्यासात काही हुश्शार वगैरे तर अजिबात नाही. अगदी सामान्य आणि अगदी किरकोळ. मुंबईत वन रुम किचनमधे राधाकिशन लहानाचा मोठा झाला. कशी बशी एच.एस.सी. पास केली आणि बी.कॉम.ला  एडमिशन घेतलं. पण बी.कॉम.च्या पहिल्या वर्षातच ड्रॉपआऊट. शिक्षण अर्धवट सोडून वडलांसोबत राधाकिशन काम करु लागले. वडील बॉल बेअरिंगचा धंदा करायचे. वयाची तिशी ओलांडल्यानंतर राधाकिशन यांना शेअर मार्केट खुणावू लागलं. मुंबई शेअर बाजारात त्यांनी पैसे गुंतवण्यास सुरवात केली. यावेळी त्यांचं वय होतं ३२ वर्ष.

शेअर बाजाराचं गणित आजही अनेकांना कळत नाही. मात्र अल्पावधीतच बी.कॉम.च्या पहिल्या वर्षात नापास झालेल्या राधाकिशन यांनी शेअर बाजाराचा असा काही अभ्यास केला की कुठं गुंतवणूक करायची, कधी गुंतवणूक करायची आणि कधी शेअर विकायचा, यात ते एकदम माहीर झाले. कमी वेळात त्यांनी शेअर बाजारातून चांगली कमाई केली. पण अचानक काय झालं कुणास ठाऊक. शेअर बाजारातला एकदम अस्सल खेळाडू म्हणून ओळख मिळवलेला हा गडी अचानक गायब झाला. 

*वयाच्या ४२व्या वर्षी राधाकिशन यांनी आंत्रप्रिनर व्हायचं ठरवून टाकलं.*
 एका यशस्वी स्टॉक ब्रोकरने आपल्या करीअरच्या एकदम फॉर्मात असताना शेअर बाजाराचा नाद सोडला. या निर्णयामुळे अनेकांनी त्यांना तेव्हा मूर्खातही काढलं असावं. कारण, १९९५ मधे राधाकिशन दमानी यांच्याकडे एच.डी.एफ.सी. बँकेचे सगळ्यात जास्त शेअर्स होते, अशी माहिती ब्लूमबर्गवरच्या एका लेखात सापडते. पुढच्या ५ वर्षातच मात्र या माणसाचा शेअर बाजारातून रस का निघून जातो, हे कुणालाच कळत नाही. २००० मधे शेअर मार्केट सोडून राधाकिशन यांनी लॉन्ग टर्म इनवेस्टमेन्ट करण्याचं मनाशी पक्क केलं. एक अशी गुंतवणूक दमानी यांना करायची होती, जी कधीच तोट्यात जाणार नाही. नेहमी फायद्यातच राहील. यातूनच जन्माला आली डी-मार्टची संकल्पना.

*डी-मार्टच्या जन्माची गोष्ट*
ते वर्ष होतं २००२. मुंबईच्या पवई भागात राधाकृष्ण यांनी एक जागा विकत घेतली. या जागेत पहिलं डी-मार्ट उभं राहिलं. किराणा, ग्रोसरी, कपडे, जगण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टी असं सगळं इथं विकायला ठेवलं. हे तर अगदी सामान्य होतं. यात वेगळेपण ते काय, बिझनेस असा कसा चालेल? असा प्रश्न राधाकिशन यांना विचारला जायचा. हा धंदा काही चालत नाही, असं हिणवलं जायचं.

डीमार्टच्या तुलनेत तेव्हा आलेले सुपरमार्केट जास्त आकर्षक होते. तिथे असणारी मांडणी, विकायला असणारे सेल्स एक्झिकेटिव हे सगळं डी-मार्टच्या तुलनेत अधिक उजवं होतं. सामान्य वाटणारं डी-मार्ट स्पर्धेत टिकणारच नाही, असं तेव्हा कुणीही सांगितलं असतं. मग तरीही डी-मार्ट का चाललं? कसं काय फायद्यात आलं? डी-मार्टचं बिझनेस मॉडेल आहे तरी काय?

थेट लाभाचं बिझनेस मॉडेल
डी-मार्टचं बिझनेस मॉडेल इतर सुपर मार्केटच्या तुलनेत एकदम खास आहे. इतर सुपरमार्केटच्या शाखा पटापट उघडत गेल्या. पण डी-मार्ट मात्र कासवाच्या गतीनं आपल्या शाखा सुरु करतंय. असं का, हे समजून घेण्यासाठी डी-मार्टचं बिझनेस मॉडेल अगदी बारीकपणे पाहायला हवं. डी-मार्ट हे वेंडरला म्हणजेच उत्पादकाला आणि बायरला म्हणजेच ग्राहकाला दोघांनाही फायदा करुन देतं.

जवळपास ९९.९९ टक्के गोष्टीत डिस्काऊंट मिळतो. म्हणून ग्राहक पुन्हा पुन्हा डी-मार्टकडे वळतो. म्हणजेच काय तर लॉयल ग्राहक तयार करण्यात डी-मार्टला यश मिळतं. ग्राहक पुढच्यावेळीही नक्की येणार आहे, ही खात्री डी-मार्टमधून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक ग्राहकाबद्दल देता येऊ शकते. ग्राहकांचा फायदा तर होतो, पण उत्पादकाचाही कसा काय फायदा?

वेंडर म्हणजेच उत्पादकाला आपला माल जास्तीत जास्त प्रमाणात विकायचा असतो. जितका जास्त माल विकणार, तितका जास्त पैसा. माल विकण्यासाठी लागतात ग्राहक. डी-मार्टकडे होते लॉयल ग्राहक. लॉयल ग्राहकांची संख्या जास्त असल्यानं माल विकला जाणार, याची खात्री वेंडरला असतेच. त्यामुळे जितके जास्त ग्राहक, तितका जास्त माल विकला जाण्याची शक्यताही बळावते.

दुसरी गोष्ट म्हणजे उप्तादकाचं पेमेंट ही डी-मार्टमधे दोन आठवड्यांच्या आत केलं जातं. इतर अनेक सुपर मार्केटमधे वेंडर पेमेंट व्हायला महिना किंवा त्यापेक्षा जास्त वेळ वाट पाहावी लागते. या दोन महत्त्वाच्या गोष्टी उत्तमपणे हाताळल्यानं डी-मार्टला मोठं यश मिळालं.

*विस्तार कासव गतीनं का होतोय?*
राधाकिशन दमानी हा दूरदृष्टी असणारा उद्योजक आहे. तात्काळ मिळणारा नफा तात्पुरत्या काळासाठी टिकतो, हे या माणसाला ठाऊक झालं होतं. त्यात शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचाही दांडगा अनुभव पाठीशी होता. त्यात एका मध्यमवर्गीय कष्टकरी घरातून आल्यामुळे त्यांना रिस्क न घेता लाँगटर्म रिटन्स देईल, असाच व्यवसाय करायचा होता. त्यामुळे त्यांनी २००२ मधे भाड्याच्या जागेत डी-मार्ट उभं न करता आधी स्वतःची जागा घेण्याला प्राधान्य दिलं. याचाच त्यांना मोठा फायदा झाला. 

पण तुम्ही इतर सुपर मार्केटच्या बिझनेस मॉडेलचा अभ्यास कराल, तर असं लक्षात येतं, की डी-मार्टच्या तुलनेत इतरांच्या शाखा पटापट उभ्या राहिल्या. डी-मार्ट मात्र अतिशय संथपणे सुरु होतं. शांतपणे सुरु होतं. राधाकिशन पटापट शाखा उभ्या करु शकले नाहीत, त्यालाही एक कारण आहे.

अति घाई, संकटात नेई, हे राधाकिशन जाणून होते. गुंतवणूकदार असल्यानं त्यांनी कुठे गुंतवणूक करायची नाही, हे आधी हेरलं. डी-मार्टमधे कधी गेला असाल, तर एकदा डी-मार्ट आतून कसं दिसतं, हे एकदा डोळ्यासमोर आणा. ते एखाद्या शो-रुम सारखं तर अजिबात दिसत नाही. वाण्याच्या दुकानात आल्यानंतर जो फिल येतो तोच डी-मार्टच्या आतमधे गेल्यावर येतो. वाण्याचं एसी दुकान डी-मार्टला म्हणता येऊ शकेल. तिथे काही आकर्षकपणा नाही. दिखाऊपणा तर अजिबात नाही. सामान्य ते अतिसामान्य गोष्टी इथे विकायला असतात. इथली ट्रॉली आणि बास्केटचा दर्जादेखील नावापुरता ठीकठाक आहे.

*स्वतःच्या जागेचा आग्रह*
अवास्तव पैसे खर्च करायचे नाहीत, हे दमानी यांचं धोरण आहे. बेसिक गोष्टींवर काम चालवायचं. किमान कर्मचारी वर्गात कमाल काम करुन घ्यायचं. तिथे नोकरीवर ठेवण्यात आलेल्या माणसांचा युनिफॉर्म पाहा, तो देखील किरकोळ आहे. किंमतींचे प्रिन्ट, स्टिकर्स, यात कुठेही ग्रेट डिझाईन आहे, असा साधा आर्विभावही नाही. कॉमन मिनिमम प्रोग्रॅम डी-मार्टचा जग कोणता असेल, तर तो हाच आहे. खर्च कमी ठेवायचा. याशिवाय राधाकिशन यांचा आणखी एक आग्रह होता. डी-मार्ट जिथे उभं करणार ती जागा स्वतःच्या मालकीची असली पाहिजे. म्हणजे दर महिन्याला भाडं किंवा लीजवर जागा घेऊन पैसे देण्याची भानगडच उरत नाही. त्यामुळे थेट नफा होणारच आहे, हे निश्चित. 

२००२ मधे पहिलं डी-मार्ट पवईत सुरु झालं. त्यातून जो नफा आला, त्यातून डीमार्टने दुसरी जागा घेतली आणि तिथे नवं डीमार्ट उभं केलं. स्वाभाविक आहे, एकाचे दोन व्हायला जर का तीन वर्ष लागत असतील, तर दोनाचे तीन व्हायला दीड वर्ष लागेल. अशा प्रकारे तीन, चार करता करता डी-मार्टने शाखा वाढवण्यासाठी जेव्हा गिअर टाकला, तेव्हा २००७ साल उजाडलं होतं.

मधल्या काळात बिग बाजार, फ्युचर रिटेल, आदित्य बिर्ला फॅशन असे सगळे सुपरमार्केट तुलनेने वेगात आपल्या शाखा उघडत होते. पण त्यातील किती शाखा टिकल्या, हा चिंतनाचा विषय आहे. मात्र डी-मार्टची पवईची पहिली शाखा ते काल परवा उघडलेलं बेलापूरचं नवीन डी-मार्ट या सगळ्याच ठिकाणी दमानी यांचा धंदा तेजीत सुरु आहे. आतापर्यंत देशातल्या फक्त १२ राज्यांमधेच डी-मार्ट आहे. या १२ राज्यांतल्या वेगवेगळ्या शहरांत डी मार्टच्या फक्त १८१ इतक्याच शाखा सुरु आहेत. महत्त्वाचं म्हणजे ८० टक्के शाखा या डी-मार्टच्या स्वतःच्या जागेवरच उभ्या आहेत.

*ग्राहक, वेंडर दोघांनाही खूश ठेवण्याचं डोकं*
राधाकृष्ण दमानी यांनी आणखी एक गोष्ट केली. सर्वसामान्य लोकांना जास्तीत जास्त डिस्काऊंट मिळत राहिलं पाहिजे, हा डी-मार्टचा अजेंडा त्यांनी यशस्वीपणे राबवत नेला. डिस्काऊंट किती मिळतंय, यावरुनच लोक डी-मार्टमधे पुन्हा पुन्हा येतील, हे राधाकिशन यांनी हेरलं होतं. पण फक्त ग्राहकाला खूश ठेवून चालणार नव्हतं. डी-मार्ट संकल्पना यशस्वी करायची असेल, तर वेंडरलाही खूश ठेवावं लागणार होतं. त्यासाठी राधाकिशन यांनी जे डोकं लावलं, ते कमाल आहे.

डी-मार्ट सुरु करण्याआधी राधाकृष्ण दमानी यांनी नवी मुंबईच्या नेरुळमधे अपना बाजारचं दुकान चालवलं होतं. यातून त्यांना अनेक खाचखळगे कळत गेले. विकता तर येईल. पण विकण्यासाठी माल लागतो. साठा लागतो. तो नियमितपणे येत राहिल, याची सोय करणंही तितकंच गरजेचंय, हे अपना बाजार चालवताना त्यांच्या लक्षात आलं. या अनुभवातून त्यांनी डी-मार्ट सुरू करताना स्लॉटिंग फी नावाची एक कल्पना राबवली.

स्लॉटींग फी म्हणजे वेंडरने त्याचा माल विकण्यासाठी एक विशिष्ट फी भरायची. याला एन्ट्री फी देखील म्हणता येऊ शकेल. या स्लॉटिंग फीच्या माध्यमातूनच डी-मार्ट भरघोस डिस्काऊंट देते, ज्याचा फायदा ग्राहकांना तर होतोच, शिवाय वेंडरलाही होतो. हे आपण आता एका उदाहरणासह समजून घेऊ.

उदाहरणार्थ, 
एका पेन बॉक्सचा एमआरपी आहे १०० रुपये. असे दहा पेन बॉक्स डी मार्टजवळ वेंडरने विकण्यासाठी दिले.

१० पेन बॉक्स X १०० = १ हजार रुपये एमआरपी

आता १० पेनबॉक्स विकायला देण्यासाठी पेन बॉक्सच्या वेंडरला स्लॉटिंग फी भरावी लागेल. असं समजा की स्लॉटिंग फी आहे १०० रुपये. आता वेंडर रिटेलरला म्हणजेच डीमार्टला १० पेन बॉक्स एकत्र विकण्यास देणार, तेव्हा त्यात आधीच डिस्काऊंट असणार. असं समजा १ हजारचे पेन बॉक्स डीमार्टला ८०० रुपयाला पडले. त्यात स्लॉटिंग फी आली १०० रुपये. म्हणजे ८०० - १०० = ७०० रुपये झाली पेन बॉक्सची डी मार्टला पडलेली किंमत.

याचाच अर्थ डी मार्टला एक पेन बॉक्स पडला ७० रुपयांना. तर अशा प्रकारे आता डीमार्ट पेन बॉक्सवर तुम्हाला २० टक्के डिस्काऊंट देतं. आणि १०० रुपयांचा पेन बॉक्स ८० रुपयांना विकतं.  ज्यातून डी-मार्टला फक्त १० रुपयांचा नफा होत असला तरी ग्राहक आणि विक्रेता दोघांनाही होणाऱ्या नफ्यामुळे डी-मार्ट १० रुपयांच्या पैशांसोबत ज्याची किंमत करता येणार नाही असा विश्वास वेंडर आणि ग्राहक दोघांमधे तयार करण्यात यशस्वी झाले.

*छोट्या गोष्टीतला मोठा बदल*
भारतातील मध्यमवर्ग सुपरमार्केटमधे एसीमधे खरेदीला जातो, तेव्हा त्याला थोडसं प्रतिष्ठीतही वाटतं. वाण्याकडे जाण्यापेक्षा एकाच ठिकाणी सगळं मिळत असेल, तर कुणाला नकोय. खाण्यापासून पिण्यापर्यंतच्या गोष्टी तर डी-मार्टमधे मिळतातच, पण केसांपासून कंडोमपर्यंतही जे जे माणसाला लागतं, ते ते सगळं एका छताखाली घ्यायला मिळणं, हे मध्यमवर्गीय सर्वसामान्य माणासासाठी नवीनच होतं. यात राधाकिशन यांनी केलेली एक गोष्ट दुर्लक्षित करुन चालणारच नाही. छोट्या छोट्या गोष्टीत मोठा बदल घडवतात, तशातलीच ही गोष्ट आहे रिजनल टूलची.

प्रत्येक ठिकाणच्या सणाप्रमाणे डी-मार्टमधे तुम्हाला रिजनल टूल दिसतील. दिवाळीत दिवे, फराळासाठी विशेष डिस्काऊंट, रक्षाबंधनच्या वेळी राखी, होळीला पिचकाऱ्या, गणपतीला मोदक, असं प्रत्येकवेळी काहीना काही दिसतंच. इतकंच काय तर लोकल गोष्टी विकण्यावरही त्यांचा भर असतो. तुम्ही डी-मार्टमधे गुलाबजाम आणि लोणच्याचे जर का प्रकार पाहिलेत,  तर ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल.

कमी किंमतीत घ्यायचं आणि स्वस्तात विकायचं, हे धोरण डी-मार्टमधे राबवल्याचा परिणाम आज सगळीकडे दिसतोय. डी-मार्टची चेन आता हळूहळू वेग पकडतेय. आता ती वेगानं गुणाकार करायला लागेल. कासवाच्या गतीनं चालायचं, पण कोणतीही शाखा बंद पडता कामा नये, याची काळजी घेतच पुढे जायचं, हे दमानी यांनी केलं.

शेअर मार्केटमधे सगळे धक्के खातात आणि दमानी, वादळ येतं तेव्हा ते मोठमोठ्या झाडांनाही आपल्या कवेत घेतलं. अशावेळी वटवृक्षासारखं डी-मार्ट दिमाखात उभं राहिलेलं दिसतं. कोरोनाच्या महामारीत अंबानी, अदानी, बिर्ला, फ्युचर रिटेल यांना नुकसान झालंय. पण राधाकिशन दमानी यांची एव्हेन्यू रिटेल ही कंपनी डी-मार्टच्या जोरावर दिमाखात उभी आहे. नुसती उभी नाहीये, तर वादळाचा जोरकसपणे सामना करते आहे. नफा कमावते आहे. 

जिथे मुकेश अंबनींच्या संपत्तीत तब्बल २८ टक्के घट नोंदवण्यात येते, तिथे राधाकिशन दमानी यांच्या वाढ झालेल्या कमाईने जगाला संदेश दिलाय. जेव्हा कोरोनाने सगळ्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडलाय, तेव्हा राधाकिशन दमानी यांच्या संपत्तीत तब्बल ५ टक्के इतकी वाढ झालीय, असं इकॉनॉमिकल टाईम्सच्या बातमीत म्हटलंय. तर सध्या राधाकिशन दमानी १०.२ अरब डॉलर इतक्या संपत्तीचे मालक आहेत.

शेअर मार्केटची उलथापालथ कोरोनाच्या प्रकोपात सगळ्यांनाच धक्के देतेय. अशाही परिस्थितीत दमानी यांच्या कंपनीच्या शेअर्स तब्बल १८ टक्क्यांनी वधारल्याची बातमी बिझनेस स्टँडर्डनं दिलीय. याचा अर्थ स्पष्ट, २१ दिवसांच्या या लॉकडाऊनचाही डी-मार्ट स्टोअर्सला मोठा फायदाच झालाय.

*कुणी साधं कॉपीही करू शकत नाही*
१ जानेवारी, १९५६ला राधाकृष्ण दमानी यांचा जन्म झाला. मुंबईतील वन रुम किचनमधे लहानाचा मोठा झालेला हा मुलगा डिग्री कॉलेजच्या पहिल्याच वर्षात ड्रॉप आऊट होतो. मधेच हा मुलगा शेअर बाजारात नाव कमवायला जातो. तेही अर्थवट सोडून दुसरंच काहीतरी खूळ डोक्यात घालून घेतो. पण हाच मुलगा आज देशातल्या दुसऱ्या क्रमाकांचा सगळ्यात श्रीमंत माणूस बनतो, तेव्हा लोकांना त्याने कमावलेले कित्येक अब्ज डॉलर दिसतात. फोर्ब्ज सारख्या संस्थेलाही वन रुम किचनमधे राहिलेला मुलगा आपली दखल घ्यायला दमानी भाग पाडतो, हे प्रचंड मोठं यश आहे.

*ट्विटर आणि फेसबूकवर दमानी नाहीत.*
 माध्यमांसमोरही ते कधी आल्याचं दिसत नाही. जिंकायच्या गोळ्या विकणारा त्यांचा साधा एक विडीओही आपल्याला यूट्यूबवर सापडणार नाही. आहेत तर फक्त काही फोटो. श्रीमंती आली की ग्लॅमर आपोआप येतं. पण या माणसाने पहिल्यापासूनच मीडिया आणि ग्लॅमर या दोघांनाही चार हात लांबच ठेवलं.

प्रचार कमी आणि प्रसार जास्त, या धोरणावर राधाकिशन दमानी यांनी काम केलं. वयाच्या ४२व्या वर्षी एक माणूस धंदा सुरु करतो. तो यशस्वी करुन दाखवतो. यात सगळ्यांचा फायदाच झाला पाहिजे, हा मुख्य संदेश असतो. पैसे कमवायचे, पण कुणाचं नुकसान करुन कमवायचे नाहीत, हे दमानी यांनी केलं. त्यामुळेच ते एक असा धंदा उभा करु शकले, ज्याच्याशी स्पर्धा करणं तर सोडाच, त्याची कॉपी करणंही कुणाला जमत नाही आहे.

Friday 24 April 2020

लॉकडाऊनमधे अडकलेल्या बदलीग्रस्त शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्याची परवानगी द्यावी

लॉकडाऊनमधे अडकलेल्या बदलीग्रस्त शिक्षकांना स्वजिल्ह्यात जाण्याची परवानगी द्यावी... 
          राज्याच्या विविध जिल्हा परिषदांमध्ये स्वजिल्ह्यापासून शेकडो किलोमीटर दूर हजारो शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. या शिक्षकांनी आंतरजिल्हा बदल्यांसाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा केलेली आहे. अशा शिक्षकांना लॉकडाऊन काळात स्वजिल्ह्यात परतण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी खूला प्रवर्ग कर्मचारी महासंघाने मुख्यमंत्र्याकडे केली आहे.
              राज्यातील विविध जिल्हा परिषदांतील प्राथमिक शाळांमध्ये  शिक्षक आपल्या कुटुंबापासून शेकडो किलोमीटर अंतरावर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. स्वजिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीने जाण्यासाठी त्यांनी अनेक वर्षापासून प्रस्ताव सादर केलेले आहेत. परंतु त्यांना आंतरजिल्हा बदली मिळालेले नाही. अशा शिक्षकांची संख्या दहा ते पंधरा हजार च्या घरात आहेत. राज्यातील एकूण कार्यरत शिक्षकांमधे या शिक्षकांची संख्या केव १० टक्क्यांच्या आसपास आहे. हे शिक्षक दरवर्षी आंतरजिल्हा बदलीचा प्रस्ताव दाखल करतात. मात्र त्यांच्या वाट्याला आंतरजिल्हा बदली अद्यापही आलेली नाही. हे शिक्षक दिवाळी व उन्हाळी सुट्ट्यातच आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या आपत्तीमुळे कार्यरत जिल्ह्यामध्ये अडकून पडले आहेत. दरवर्षी दुसरे शैक्षणिक सत्र १ मे रोजी संपत असते. त्यानंतर जूनमधे शाळा सुरू होईपर्यंत दीड महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्या शिक्षकांना असतात. इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे प्रत्येक आठवड्यातील शनिवारची सुट्टी शिक्षकांना नसते. त्यामुळे त्यांना केवळ दिवाळी आणि उन्हाळी या दिर्घ सुट्टी असतात. शासनाने यावर्षी शाळांमध्ये साजरा होणारा महाराष्ट्र दिन कोरोना आपत्तीमुळे रद्द केलेला आहे. दूसरा लॉकडाऊन संपेपर्यंत जिल्हा परिषदेचे शिक्षक आपत्ती व्यवस्थापनाने दिलेल्या सर्व जबाबदारी पार पाडत आहेत. याना स्वजिल्ह्यात जाण्याची परवानगी दिल्यास आपत्ती व्यवस्थापनावर फारसा फरक पडणार नाही. 
               वेगवेगळ्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या पती-पत्नींचा संसार केवळ या दीर्घ सुट्ट्याच्या काळातच होत असतो. उन्हाळी सुट्ट्यांची ते चातकाप्रमाणे वाट पाहात असतात. वर्षभराची धावपळ संपून या दोन सुट्ट्या तच निवांत पणे भेटीगाठी होत असतात. अपंग, विधवा, परितक्त्या, कुमारिका, गरोदर शिक्षिकांच्या आरोग्य व सूरक्षेचाही महत्वाचा प्रश्न उद्भवत आहे. 
                शासनाने शिक्षकांच्या बदल्यांच्या धोरणात आवश्यक बदल सुचविण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली  पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची एक अभ्यास गट समिती तयार केली होती. या अभ्यास गटाने मार्च महिन्यातच आपला अहवाल शासनाकडे सादर केलेला आहे. मात्र अद्याप पर्यंत शिक्षकांच्या बदल्यांचे धोरण अंतिम झालेले नाही. या महिन्यात आंतरजिल्हा बदल्यांचे व जिल्हांतर्गत बदल्यांचे धोरण घोषित होऊन बदल्यांचे बिगुल वाजेल अशी अपेक्षा आहे. दरम्यानच्या काळात आंतरजिल्हा बदली समस्यांमुळे अनेक समस्यांना तोंड देणाऱ्या शिक्षकांना जिल्ह्यात परतण्याची परवानगी व तशी वाहतूक व्यवस्था मिळाल्यास थोडासा दिलासा मिळेल अशी अपेक्षा शिक्षकांनी निवेदनात व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर सनिदेवल जाधव, गोविंद सोळंके पाटील, साहेबराव कल्याण, संतोष जगताप व राजेंद्र गोडसे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

भिवंडी मतदारसंघात बदलाचे वारे !!

भिवंडी मतदारसंघात बदलाचे वारे !! ** सर्व सामान्यांचे नेतृत्व सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांना वाढता पाठिंबा भिवंडी, प्रतिनिधी ...