Sunday 31 December 2023

अंगणवाडी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना न भेटता ग्रामीण विकास मंत्री यांचे पलायन - आयटकच्या आरोप

अंगणवाडी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना न भेटता ग्रामीण विकास मंत्री यांचे पलायन - आयटकच्या आरोप

जळगाव, प्रतिनिधी .. महाराष्ट्र राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस या किमान वेतन २६ हजार रुपये व १८ हजार रुपये मिळावा तसेच पेन्शन योजना लागू करावी म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅच्युइटी मिळावी. म्हणून मुलांना दर्जेदार खाऊ मिळावा. खाऊ शिजवण्याचे दर वाढून मिळावे या मागण्यांसाठी ४ डिसेंबर २४ पासून संपावर आहेत. या कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघालेला नाही. 

दुसरीकडे महाराष्ट्राचे जबाबदार मंत्री यांनी नागपूर विधानसभेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रश्नावर चर्चा करताना नकारात्मक व राजकीय भाषा वापरली तसेच महिला बालकल्याण आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दहशत दडपशाही निर्माण करण्यासाठी २२ डिसेंबर रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकाविरुद्ध देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा रोष आहे. त्या परिपत्रकात म्हटले आहे की, अंगणवाडीतील मुलांच्या खाऊ आशा बचत गट, महिला, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरसेवक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, मराठी शाळेचे शिक्षक यांना कामाला लावून वाटू  असे म्हटले आहे. दुसरीकडे बचत गटांची दहा महिन्याची बिल दिलेली नाहीत म्हणजेच परिपत्रक संपावरील कर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविका मदतनिसांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. 

अंगणवाडी कर्मचारी संपात माननीय मंत्री महोदय यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी या अपेक्षेने निवेदन सादर करण्यासाठी जळगाव जिल्हा अंगणवाडी कर्मचारी कृती समिती तर्फे अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे सचिव अमृत महाजन, अंगणवाडी कर्मचारी संघाच्या सुषमा चव्हाण, जिल्हा संघटक ,भानुदास पाटील हे चोपडा धरणगाव जामनेर जळगाव तालुक्यातील ५०/६० अंगणवाडी सेविकां सोबत गिरीश महाजन यांच्या कार्यालयात जमले होते तसेच पाचोरा, जामनेर, यावल तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे प्रतिनिधी त्यांच्या मागण्यांचे निवेदन घेऊन आले होते. माननीय ग्रामीण विकास मंत्री कर्मचाऱ्यांच्या प्रश्नात सकारात्मक भूमिका घ्यावी आणि महिला बाल विकास आयुक्त यांच्या  परिपत्रकाच्या निषेध भावना कळविण्यासाठी ग्रामीण विकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांचे कार्यालयातील जबाबदार संपर्क अधिकारी श्री तायडे यांनी दिलेल्या दुपारी बारा वाजेच्या वेळेनुसार नामदार मंत्री महोदय यांच्या घरी येणार आहोत, असे एक दिवस अगोदर ठरले होते, त्यानुसार जिल्ह्यातील दोन्ही संघटनांचे प्रतिनिधी आणि ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे सहा प्रतिनिधी नामदार गिरीश महाजन यांना जामनेर येथे भेटावयास आज सकाळी अकरा वाजेपासून जमत होते. नियोजित वेळ बारा वाजेची वेळ दिली होती. पण साडेदहा वाजताच नामदार गिरीश महाजन कार्यालयातून निघून गेले.  सेविका मदतनीस दोन वाजेपर्यंत त्याच्या घरी बसून होते. पोलिसांनी ते नेरी येथे आहेत असे सांगितले. मग काही सेविका मदतनीस नेरीला ही गेल्या. एका लग्न समारंभात त्यांची शोधाशोध केली पण तेथूनही ते एक तासापूर्वीच निघून गेले.असे कळले 

दुसरी बाब अशी की,  त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी ते दुपारी तीन वाजेपर्यंत येतील असे सांगत तर ना. गिरीश भाऊ यांना १.३० वाजेच्या सुमारास फोन केला असता ते म्हणाले की, मी सायंकाली सहा वाजेपर्यंत येईल. आता ऐनपुर ला निघालो आहे. मला ५० लग्नांचे आमंत्रणे आहेत असे त्यांनी उत्तर दिले. तरीही कार्यालयातील कोणीतरी निवेदन घ्यायला येईल या अपेक्षेने सेविका मदतनीस दोन वाजेपर्यंत त्याच्या घरी बसून होते. कार्यालयात चहापाणी सौजन्यही दाखवले गेले, शेवटी पोलिसांनी ते नेरी येथे आहेत असे पोलीस स्टेशन कडून कळाले असे सांगितले वर मग आम्ही नेरीला असता पोलिसांनी सांगितले की, जा आम्ही पी. आय. साहेबांना फोन केला आहे. असे सांगितले. प्रत्यक्षात काही सेविका मदतनीस नेरीला ही गेल्या‌, तेथे महाजन जेथे एका लग्न समारंभात उपस्थित होते तेथे त्यांची शोधाशोध केली पण तेथून ते एक तासापूर्वीच निघून गेले असे कळले. जिल्ह्याचे जबाबदार व मान्यवर मंत्री भाजप सरकारचे संकट मोचक मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे संकट मोचक भूमिका घेऊन दिलदार मनाने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले असते निवेदन घेणे व चर्चा करणे यासाठी पाच दहा मिनिटं पुरेशी होती त्यांनी भेट दिली असती तर त्यांचे विषयीचा रोष शांत झाला असता पण.. त्यांना सामान्य कर्मचाऱ्यांविषयी काही संवेदनाच नाहीत असेच दिसून आले. नामदार गिरीश महाजन यांच्या अंगणवाडी संप बाबत नकारात्मक भूमिकेचा आम्ही निषेध करतो. असे जळगाव जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटना कृती समितीचे पत्रकात म्हटलेले आहे

तसेच ग्रामीण विकास मंत्री नामदार गिरीश महाजन यांचे नावे महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे कर्मचाऱ्यांना पगारासाठी शंभर टक्के अनुदान.ध्या. पगारासाठी वसुली ची आट नको.. दहा टक्के आरक्षण नुसार भरती करा जिल्हा परिषदेमधील वर्ग ड ची पदे भरा. आधी मागण्यांचे निवेदन सुद्धा कॉम्रेड अमृत महाजन, जिल्हा सचिव राजेंद्र खरे, उपाध्यक्ष किशोर कनडारे, क्षीरसागर, निलेश पाटील. यांनी सादर केले असून त्यांच्या मंत्रालयाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्ग न काढल्यास इतिहास 16 जानेवारीपासून त्यांच्या जिल्हा परिषद समोरील भाजप संपर्क संपर्क कार्यालय समोर राज्यव्यापी जिल्हावार धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदन सादर करून देण्यात आला अशी ही माहिती काँ अमृत महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे.

महिलांनी सक्रीय राजकारणात उतरून आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे...*रूचिता अमित नाईक, शिवसेना महिला शहर प्रमुख*

महिलांनी सक्रीय राजकारणात उतरून आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे...
*रूचिता अमित नाईक, शिवसेना महिला शहर प्रमुख*

नालासोपारा, प्रतिनिधी‌ : नालासोपारा पश्चिम येथे विभाग प्रमुख गणेश मुनगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना मार्गदर्शन व सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांना शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी मार्गदर्शन केले.

महिलाविषयी दृष्टीकोन  बदलण्याची गरज  असुन केवळ महिलांना आरक्षण आहे म्हणुन संधी मिळण्यापेक्षा त्या कर्तुत्वान व सक्षम आहेत म्हणून राजकारणात त्यांना संधी मिळाली पाहिजे स्त्री  आणि पुरूष अशी तुलना  होणे देखिल चुकीचे आहे एक महिला पक्षात आली तर संपुर्ण कुटूंब पक्षाशी जोडले जाते.

यावेळी रूचिता नाईक बोलताना म्हणाल्या की महिला हि एक अशी शक्ती आहे की सर्व शक्तीचा सामना करण्याची ताकत तिच्यामध्ये असते. महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे गरजेचे आहे.
महिलांनी राजकारणात येणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात महिला संघटना मजबूत करून महापालिका निवडणुकीत सज्ज ठेवणार असल्याचे त्या बोलल्या मुख्यमंत्री यांचे काम घरा घरात पोहचवून त्यांना पक्षाशी जोडण्याचे काम करणार आहे व येणारी महापालिका निवडणुकीत हि निश्चितपणे शिवसेना  व भाजपा जिंकेल. असा विश्वास रूचिता नाईक यांनी व्यक्त केला यावेळी विभागप्रमुख गणेश मुनगेकर शाखा प्रमुख उपशाखाप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.

युवकांनी मैदानी खेळ खेळावे : दिपक ( बाबा ) हांडे

युवकांनी मैदानी खेळ खेळावे : दिपक ( बाबा ) हांडे

*संघर्ष क्रीडा मंडळ भटवाडी येथील मैदानात लाल माती टाकण्याचे काम सुरू*

घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :

युवकांनी सतत मोबाईलचां वापर कमी करून मैदानी खेळ खेळावे असा सल्ला शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक दिपक ( बाबा ) हांडे यांनी युवकांना दिला. आज भटवाडी येथील संघर्ष क्रीडा मंडळ येथील मैदानात लाल माती टाकण्याचे काम सुरू करण्यात आले त्याचा शुभारंभ हांडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेविका अश्विनी दिपक हांडे, माजी शाखा प्रमुख संतोष साळुंखे, सुरेखा म्हात्रे, प्रकाश साबळे आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिपक ( बाबा ) हांडे यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात आपल्या हजारो कार्यकर्त्यासह पक्ष प्रवेश केला. दिपक ( बाबा ) हांडे हे साईभक्त असून त्यांच्या मागे मोठ्या प्रमाणात जनाधार आहे. 2014 मध्ये त्यांनी भटवाडी विभागातून अपक्ष निवडणूक लढवून ते निवडून आले होते त्यानंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सहभागी झाले होते. मात्र पक्षात आल्यापासून कोणत्याच पदाची जबाबदारी न दिल्याने तसेच विभागात विकास कामे व्हावी या उद्देशाने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यातील विविध विकासकामे पाहून हांडे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. हांडे यांच्या पक्ष प्रवेशामुळे घाटकोपर पश्चिम विभागात ताकद वाढली असल्याचे बोलले जात आहे 

*युवकांनी मैदानी खेळ खेळावे यासाठी मैदाने खेळासाठी मोकळे करणार*

युवक, युवती हे सध्याच्या युगात सारखे मोबाईल असल्याचे पाहिले जाते मुलांनी मैदानी खेळ क्रिकेट, कबड्डी, खो खो व इतर खेळ खेळल्यास त्यांचे आरोग्य देखील उत्तम राहील. आपल्या देशात खेळाला फार महत्त्व आहे. खेळ हा सुद्धा करियरचां भाग आहे. भटवाडी मध्ये लवकरच क्रीडा संकुलाचे काम होणार आहे. चांगले खेळाडू घडावे यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे माजी नगरसेवक दिपक ( बाबा ) हांडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

एम आई एम पक्षाचा मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा !!

एम आई एम पक्षाचा मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा !!

*जरांगे पाटील यांचे एम आई एम करणार मुंबईत स्वागत*

घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :

महाराष्ट्रात सुरू असलेल्या मराठा समाज बांधवांच्या आंदोलनाला आता एम आई एम ने जाहीर पाठिंबा दिला असून त्याबाबत चे एक निवेदन पत्रक पक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाला मुस्लिम बांधवांकडून पाठिंबा वाढत असताना मुंबईतून एम आई एम मुंबई प्रदेशचे जनरल सेक्रेटरी अनवर शेख यांनी मराठा बांधवांच्या आरक्षणाच्या भूमिकेला आम्ही पाठिंबा देत असल्याचे सांगितले. अनवर शेख म्हणाले इतिहास पाहता मराठा समाजाने नेहमीच मुस्लिम समाजाच्या मोठ्या भावाची भूमिका बजावली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिम बांधव देखील असत. आणि त्याच भूमिकेतून आम्ही आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा बांधव आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन त्यांच्या सोबत चालणार आहोत. 20 जानेवारी रोजी मराठा बांधवांचा मुंबईत मोठा मोर्चा धडकणार आहे आम्ही पक्षाच्या वतीने जरांगे पाटील यांचे स्वागत करणार आहोत आणि त्यांच्या सोबत मोर्चा सहभाग घेणार असल्याचे मुंबई प्रदेश जनरल सेक्रेटरी अनवर शेख यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

घाटकोपर आणि मानखुर्द मधून शिवसेनेचे दोन आमदार निवडून आणणार : इम्रान शेख

घाटकोपर आणि मानखुर्द मधून शिवसेनेचे दोन आमदार निवडून आणणार : इम्रान शेख

घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :

ज्यांना सत्ता आणि पैशाची भूक आहे ते पक्ष सोडून जात असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विचारांशी, तत्वांशी ठाम असलेले कार्यकर्ते पक्षात कट्टर आहेत. हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची शिकवण घेऊन आम्ही पुन्हा नव्या जोमाने घरोघरी जाऊन पक्ष वाढीसाठी काम करत आहोत. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबाना शब्द देतो घाटकोपर आणि मानखुर्द मधून शिवसेनेचे दोन आमदार शंभर टक्के निवडून आणणार असे आश्वासन इम्रान शेख यांनी आपले भाषण प्रसंगी मनोगत व्यक्त करताना केले. इम्रान शेख यांची पक्षाच्या घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक पदी निवड झाल्या बद्दल त्यांचा गांगावाडी येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नव्या कार्यकर्त्यांना पक्षात संधी दिली जात आहे. घाटकोपर पश्चिम मधून इम्रान शेख यांचा जनसंपर्क मोठा असून त्याचे सामाजिक कार्य देखील मोठ्या प्रमाणात होत आहे. कार्यकर्त्यांची एक मोठी फौज त्याच्या मागे असल्याने पक्षाने त्यांना एक मोठी जबाबदारी दिली असल्याचे विभाग प्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितले. सत्कार सोहळ्यात शब्द देताना आम्ही घाटकोपर आणि मानखुर्द येथून दोन आमदार नक्की निवडून आणु अशी यावेळी शपथ देखील शेख यांनी घेतली. यावेळी विभागातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला.

भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी भाग्यश्री वर्तक !!

भारतीय दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी भाग्यश्री वर्तक !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           रोचिराम टी थडानी हायस्कूल फॉर हिअरिंग हँडीकॅप या शाळेच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री वर्तक यांची नुकतीच दिव्यांग क्रिकेट बोर्ड ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी आणि प्रेसिडेंट ऑफ डीएसएब्ल्ड क्रिकेट डेव्हलेपमेंट असोसिएशनच्या जागी निवड करण्यात आली. दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडियाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड करण्यात आली. आग्रा येथे ही सभा घेण्यात आली होती. यावेळी दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्डचे अध्यक्ष मुकेश कांचन, उपाध्यक्ष डॉ भगवान तलवारे, अध्यक्ष इकरांत शर्मा , हरून रशीद, गझल खान, डॉ रामजी चंदरवाल, मनीषा प्रसाद आदी उपस्थित होते. 

         भाग्यश्री वर्तक या गेली 33 वर्ष दिव्यांगाना शिकवत आहेत. बिग सिनेमा मध्ये दाखवलेल्या राष्ट्रगीताच्या त्या सहायक होत्या. अकिरा या सिनेमात त्यांनी सोनाक्षी सिन्हा यांना खुणा शिकवल्या आहेत. दादा या शॉर्ट फिल्मच्या त्या सहनिर्मात्या आहेत. रोहिणी हट्टंगडी, पुष्कर श्रोत्री, सुनील बर्वे यासारख्या मराठीतील प्रसिद्ध कलाकारांना घेऊन त्यांनी एक व्हिडिओ केला आहे. त्याच बरोबर त्यांनी 2 वर्षापूर्वी शुभ्रा हा प्रकल्प सुरू केला होता. त्यातून त्यांनी आदिवासी आणि कर्णबधिर व्यक्तीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले आहेत. भाग्यश्री वर्तक याना सामाजिक कार्य बद्दल 30 हून अधिक पुरस्कार देखील मिळाले आहे. कर्तबगार अशा दिव्यांग मुली शोधून त्यांना क्रिकेटचे प्रशिक्षण द्यायचे हे कार्य ते करत आहेत. चांगले दिव्यांग क्रिकेटपटू घडवणे हाच माझा उद्देश असल्याचे यावेळी भाग्यश्री वर्तक म्हणाल्या.

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे मातोश्रीवर दिनदर्शिका -२०२४ चे प्रकाशन !!

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे मातोश्रीवर दिनदर्शिका -२०२४ चे प्रकाशन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर). :
    सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे मातोश्रीवर  दिनदर्शिका -२०२४ चे प्रकाशन महाराष्ट्र राज्यचे मा. मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख (उबाठा) मा.श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी दिनदर्शिका -२०२४ प्रकाशन सोहळ्याला मायेची  सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष यशवंत विठ्ठल खोपकर, सचिव  संदीप चादीवडे, संचालक दौलत बेल्हेकर, कार्यालय प्रमुख वसंत घडशी, विश्वास तेली, विजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.

Saturday 30 December 2023

नववर्ष - नव्या सुरुवातीची सोनेरी संधी- संत राजिन्दर सिंह जी महाराज

नववर्ष -  नव्या सुरुवातीची सोनेरी संधी
-  संत राजिन्दर सिंह जी महाराज

आपण सर्वजण हे चांगल्या प्रकारे जाणून आहोत की, संपूर्ण जगभरात नवीन वर्षाचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. ही एक अशी ही वेळ असते जेव्हा आपण आपल्या जीवनातील सामान्य कामकाजाला काही काळ थांबवून, आपले लक्ष त्या कार्यांकडे करतो, ज्यामुळे आपणांस आनंद मिळतो. ही अशी वेळ असते जेव्हा आपण गतवर्षाला मागे सोडतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या आनंदाने करतो.

जर आपण आपल्या मागील वर्षावर एक नजर टाकली असता, आपणांस असे दिसून येईल की, व्यतीत केलेल्या वर्षांमध्ये अशा अनेक वेळा आपल्या जीवनात ईश्वरीय कृपेचा आपण अनुभव केला असेल. ठीक याच्या विपरीत आपल्या जीवनात अनेक वेळा असे सुद्धा प्रसंग येतात की, जेव्हा आपण कठीण आणि दुःखी-कष्टी परिस्थितीतून सुद्धा जातो. अशावेळी आपल्याला या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे की, प्रत्येक गुलाबाला काटे सुद्धा असतात, त्यांची ही भूमिका आहे आणि त्यांचेही स्वतःचे असे महत्त्व आहे. ठीक अशाच प्रकारे आपल्याही जीवनात सुख आणि दुःख दोन्हीही येतात, जर आपण या बाबींवर विचार केला  तर आपणांस असे दिसून येईल की, आपण प्रत्येक परिस्थितीत शांत व सुखी राहू शकतो.

नववर्ष फक्त भौतिक आनंदच साजरा करण्याची वेळ नसून, ही आपल्या  जीवनात सुधारणा घडवून आणण्याची सोनेरी संधी सुद्धा आहे. आपण असे पाहतो की नवीन वर्षारंभी बरेचसे लोक चुकीच्या सवयी सोडून चांगल्या सवयी धारण करण्याचा सुद्धा संकल्प करतात. हा एक असा प्रसंग आहे जेव्हा ते स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. काही लोक धूम्रपान न करण्याचा प्रण घेतात, जेव्हा की बरेचसे लोक असेही असतात की जे मांसाहार सोडून शाकाहारी जीवन जगण्याचा संकल्प करतात, काही लोक असेही असतात जे क्रोध न करण्याचा, सर्वांशी प्रेमपूर्वक व्यवहार करण्याचा आणि इतरांची मदत करण्याची प्रतिज्ञा घेतात. बरेच विद्यार्थी असे असतात की जे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत आपला अभ्यास अधिकाधिक करण्याचा संकल्प करतात. लक्षपूर्वक पाहिले असता, प्रत्येक जण आपापल्या स्तरावर आपल्या जीवनात काही चांगले करण्याचा प्रयत्न करतात.

नववर्षाच्या याप्रसंगी खूप कमी लोक असे असतात की जे अशी प्रार्थना करतात की, नववर्षात आपण अधिकाधिक अध्यात्मिक विकास करूया. जर आपण सुद्धा नववर्षी आध्यात्मिक रूपाने प्रगती करू इच्छित असु तर, यासाठी आपल्या दिनचर्येला लक्षपूर्वक पहावे लागेल. अशा मध्ये आपला हाच प्रयत्न असावा की आपण असे कोणतेच कार्य करू नये जे आपणांस या उद्देशापासून दूर करेल. अध्यात्मिक रूपाने प्रगती करण्याकरिता आपणांस ध्यानाभ्यासाला धारण करावे लागेल. याकरिता आपणास वर्तमान काळातील एखाद्या पूर्ण संतांकडून ध्यानाभ्यास करण्याची पद्धती शिकावी लागेल. आपण आपल्या दिनचर्येमध्ये ध्यानाभ्यास शामिल करतो, तेव्हां आपणांस आपल्या अंतरी प्रभुच्या ज्योति आणि श्रुति चा अनुभव होतो. या शिवाय आपल्याला असाही अनुभव येतो की, प्रभुची जी ज्योत मला प्राणशक्ती देत आहे, तीच इतरांमध्ये सुद्धा  आहे. त्यानंतर आपणास या बाबीवर  पक्का विश्वास होतो की, आपण सर्वजण एकाच पिता-परमेश्वराची संतान आहोत.

येणाऱ्या या नवीन वर्षी आपण हे समजून घेतले पाहिजे की, आपण जो प्रयत्न करू तो कितीही  थोडा जरी असेल, आपण जे पाऊल उचलू ते  जरी कितीही छोटे का असेना ते आपल्याला आपल्या ध्येयाजवळ घेऊन जाईल. नववर्षी आपला असा प्रयत्न असावा की, आपला भूतकाळ जरी कसाही असेल, परंतु आपले भविष्य कलंक रहित राहील. आपण आपले विचार सदैव सकारात्मक ठेवूया याकरिता अध्यात्मिक मार्गच आपल्याला मदतगार होऊ शकतो.

चला तर !  आपण सुद्धा नववर्षी अध्यात्मिक प्रगती करण्याचा संकल्प करूया, कारण की आपल्या अंध्यात्मिक प्रकृती वरच आपली शारीरिक व मानसिक प्रकृती निर्भर आहे. जर आपण अध्यात्मिक मार्गावर चालण्याचा प्रण केला तर, आपण असे पाहू की याने केवळ आपले अंध्यात्मिकच नाही तर शारीरिक व मानसिक प्रकृती सुद्धा ठीक होईल. नववर्षाच्या प्रसंगी आपण आपल्या चुकांकडे लक्ष न देता, एका आशावादी अंतःकरणाने एका नवीन वर्षांची सुरुवात करूया. आपणा सर्वांना जीवनातील सफलते करिता खूप खूप शुभेच्छा !

सौजन्य - सावन कृपा रुहानी मिशन

प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंमलबजावणीसाठी भोर तालुक्यात सर्वेक्षणाला सुरूवात !!

प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंमलबजावणीसाठी भोर तालुक्यात सर्वेक्षणाला सुरूवात !!

पुणे, प्रतिनिधी, दि. ३० : केंद्र शासनाने आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी 'प्रधानमंत्री जनमन योजना' सुरू केली असून भोर तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ नागरिकांना देता यावा यासाठी त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्यादृष्टीने सर्वेक्षणात माहिती घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आदिवासी प्रवर्गातील कातकरी वस्तीला भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी भेट देवून योजनेच्या अंमलबजावणीसाठी कातकरी कुटुंबाच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली. 

या योजनेअंतर्गत आदिवासी प्रवर्गातील सर्व लाभार्थ्यांना आधार कार्ड, जातीचे दाखले,  रेशन कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड आधी योजनेचा लाभ देण्यात येत असून १ जानेवारी २०२४ रोजी  वस्तीवर सर्वांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या वस्तीवरील जागाधारकांना शासकीय योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्याबाबतदेखील प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. आदिवासी बांधवांनी प्रधानमंत्री जनमन योजनेचा लाभ घ्यावा व सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन श्री.कचरे यांनी केले आहे.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज !!

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज !!

*जिल्हाधिकाऱ्यांकडून परिसरातील सुविधांचा आढावा*

पुणे, प्रतिनिधी, दि ३० - पेरणे फाटा येथे १ जानेवारी रोजी आयोजित विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने आवश्यक सर्व तयारी पूर्ण केली असून येणाऱ्या अनुयायांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचा जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी परिसराला भेट देऊन आढावा घेतला. 

यावेळी बार्टीचे महासंचालक सुनील वारे, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, बार्टीचे विभागप्रमुख डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण,निबंधक इंदिरा अस्वार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी शिक्रापूर येथील  वाहनतळ आणि विजयस्तंभ परिसराची पाहणी केली. स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची पुरेशा सुविधा राहील याची दक्षता घ्यावी. नागरिकांना माहिती देण्यासाठी सूचना फलक ठिकठिकाणी लावावेत. गर्दीचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी पीएमपीएमल बसेसच्या फेऱ्या सुरू राहतील याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी दिल्या.

सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज __

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून यावर्षी अधिक अनुयायी येण्याची शक्यता लक्षात घेवून अधिक प्रमाणात सुविधा करण्यात आल्या आहेत. २९ ठिकाणी आरोग्य कक्ष उभारण्यात आले आहे. २० फिरते दूचाकी आरोग्य पथक,  ५० रुग्णवाहिका ९० तज्ज्ञ डॉक्टर आणि २०० आरोग्य कर्मचारी नियुक्त केलेले आहे. खाजगी रुग्णालयात १०० खाटा आरक्षित करण्यात आल्या आहेत. पुरेशा प्रमाणात औषधसाठादेखील ठेवण्यात आला आहे.

स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता दीडशे पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे.  मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या माता-भगिनींची काळजी घेण्यात आली असून एकूण पाच हिरकणी कक्ष उभारण्यात येत आहेत.  हिरकणी कक्षामध्ये स्तनदा माता व ज्येष्ठ महिला यांना तसेच त्यांच्या समवेत असलेले लहान बालकांसाठी विश्रांती तसेच बालकांच्या मनोरंजनाकरीता खेळणी साहित्य व खाऊ ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी स्वतंत्र महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

परिसरातील विविध ठिकाणी एकूण २ हजार २०० तात्पुरत्या शौचालयांची उभारणी करण्यात आलेली आहे. वापराच्या पाण्यासाठी ४० टँकर आणि स्वच्छतेसाठी ४० सक्शनमशीन व  १५ जेटींग मशीन ठेवण्यात आले आहेत. रस्त्यावर कचरा साचू नये याकरीता ५०० कचराकुंड्या ठेवण्यात आल्या आहेत.  स्वच्छतेसाठी  २०० सफाई कामागार नियुक्त करण्यात आले आहेत. कचरा उचलण्याकरिता  ८० घंटागाड्या  उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून नागरिकांना सुचना देण्यासाठी ठिकठिकाणी ध्वनीक्षेपकांची व्यवस्था ( पब्लीक ॲड्रेस सिस्टिीम) करण्यात आली आहे. सीसीटीव्हीद्वारे परिसरावर नजर राहणार असून त्यासाठी सुसज्ज नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.

*पोलीस आयुक्तांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा*

पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी विजयस्तंभ परिसराची पाहणी करुन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी प्र. सह पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अरविंद चावरिया आदी उपस्थित होते.

ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित 'द प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथाच्या शताब्दी वर्षानिमित्त बार्टी संस्थेचे महासंचालक  सुनिल वारे यांच्या संकल्पनेतून विजयस्तंभ परिसरात बार्टी संस्थेच्यावतीने  पुस्तकांचे ३०० स्टॉल उभारले आहेत. बार्टी संस्थेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके ८५ टक्के सवलतीच्या दरात अनुयायांना वितरण करण्यात येणार आहेत.

'द प्रॉब्लेम ऑफ रुपी, भारताचे संविधान, संविधान उद्देशिका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खंड, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,  बुद्ध आणि त्याचा धम्म आदी पुस्तके उपलब्ध असून अनुयायांनी बार्टीच्या दालनाला भेट देऊन या पुस्तकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग प्रमुख डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी केले आहे.

*सोहळ्याचे थेट प्रक्षेपण*

सोहळ्यास उपस्थित राहू न शकणाऱ्या नागरिकांना घरबसल्या सोहळा पाहता यावा यासाठी सह्याद्री वाहिनीवरून १ जानेवारी रोजी सकाळी ६ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सकाळी ६.३० वाजता मान्यवर पाहुणे विजयस्तंभास अभिवादन करतील. ७.३० वाजता समता सैनिक दल, महार रेजिमेंट सेवानिवृत्त सैनिक आणि सैनिक दलातर्फे मानवंदना दिली जाईल. सकाळी ९.३० वाजता ‘डॉ.बी.आर. आंबेडकर विज्डम बुकफेअर’चे उद्घाटन होईल, अशी माहिती बार्टीच्यावतीने देण्यात आली आहे.

गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

-धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा* 

गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने कटिबद्ध - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  

ठाणे, प्रतिनिधी :- धोकादायक इमारतींमधील लोकांना त्यांच्या हक्काच्या चांगल्या घरात नेईन तो दिवस माझ्यासाठी महत्त्वाचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

      22 नंबर सर्कल, किसननगर या भागातील यु.आर.सी. क्र.1 व 2 येथे आशिया खंडातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी नागरी पुनरुत्थान (क्लस्टर) पुनर्विकास योजनेतील नवीन प्रकल्पाचे भूमीपूजन त्याचबरोबर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर येथील नेचरपार्क व इतर विविध विकास कामांचा ई-शुभारंभ मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते. 

       यावेळी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, मुख्य वनसंरक्षक के. प्रदीपा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे  संचालक श्री. मल्लिकार्जुन, ठाणे महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डीग्गीकर, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व प्रशांत रोडे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे आणि माजी नगरसेवक, नगरसेविका, आदी मान्यवर उपस्थित होते.

       मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कस्टरसाठी अनेक संघर्ष करावे लागले. साईराज बिल्डिंगची दुर्घटना अजूनही लक्षात आहे. त्यातील 18 जण मृत्युमुखी पडले, ही घटना माझ्या मनाला चटका लावून गेली. धोकादायक इमारती सर्वांनाच काळजी टाकणाऱ्या असतात. या पार्श्वभूमीवर ही योजना राबविण्याचा संकल्प केला. काही इमारती अनधिकृत जरी असल्या तरी त्यातील जिवंत माणसे, त्यांचा जीव महत्त्वाचा, ही माणुसकीची भावना महत्त्वाची, या भावनेतूनच क्लस्टर योजनेचा जन्म झाला. क्लस्टर योजनेत काही त्रुटी होत्या मात्र देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या त्रुटी दूर करण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले. महापालिका आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे ही योजना यशस्वीपणे पूर्णत्वास आणावी. 

      ते म्हणाले, या योजनेतील पुढील टप्प्यातील कामांकरिता आपल्याला वेगवेगळे भूखंड मिळत आहेत. क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात साडेदहा हजार घरांचे काम पूर्णत्वास जाणार आहे, पुढील काम हे दोन टप्प्यातच पूर्ण करण्याचे मी निर्देश दिले आहेत. क्लस्टर योजनेसाठी पूर्वी काम केलेल्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पंधराशे हेक्टर भूखंडावर होणारा हा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला इतका मोठा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण समाजासाठी जगणे, ही होती. हीच शिकवण घेवून मी आता जगतोय. मुख्यमंत्रीपदाचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवन बदलण्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय. 
      डीप क्लीन ड्राईव्ह विषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, हे अभियान यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात हे अभियान राबविले जाणार आहे आणि हे केवळ एक-दोन दिवसासाठी नव्हे तर नियमितपणे राबविले जाणार आहे. सर्वांनाच नियमित स्वच्छतेची सवय व्हायला हवी. 
       केंद्र सरकारच्या मदतीमुळे राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत, याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आनंदवन” ही संकल्पना मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त अशी संकल्पना आहे. या योजनेंतर्गत ठाण्यातील पहिल्या टप्प्यात 27 किलोमीटर आणि 500 मीटर रुंदीचा श्रीनगर ते गायमुख या भागात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्षारोपण, ग्रीन पॅच, ऑक्सिजन पार्क, अर्बन फॉरेस्ट हे उपक्रम राबविले जाणार आहेत. शासनाकडून राज्यात बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. 
      या प्रकल्पात बांधकाम करणाऱ्या शिर्के कन्ट्रक्शन कंपनीचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितले की, लोकांना कमीत कमी वेळेत उत्तम दर्जाची घरे बांधून द्यावीत. नुसत्या इमारती उभ्या न करता नियोजित शहर निर्माण करायचे आहे. येथील लोकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा मिळायला हव्यात. क्लस्टर हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध असून आनंदवन, क्लस्टर आणि डीप क्लीन ड्राईव्ह या अभियानाचा परिणाम निश्चितच येत्या काळात सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने दिसून येईल. भविष्यात ठाण्यातील व राज्यातील इतर शहरांचाही क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून विकास केला जाईल. सर्वांच्या सहकार्याने ठाणे शहर, ठाणे जिल्हा अन् राज्याचाही सर्वांगीण विकास करावयाचा आहे.
      कार्यक्रमाच्या सुरुवातीस मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.      
       यावेळी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविक करताना क्लस्टर पुनर्विकास योजनेबद्दलची माहिती सांगितली. तसेच "आनंदवन" Forest in the City  आणि क्लस्टर समूह विकास योजना” याबाबतची चित्रफीत दाखविण्यात आली. शेवटी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

"डीप क्लिन ड्राईव्ह" मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

"डीप क्लिन ड्राईव्ह" मोहीम  यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  

ठाणे, प्रतिनिधी :- मीरा-भाईंदर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या “डीप क्लीन ड्राईव्ह” या मोहिमेचा शुभारंभ आज मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. "डीप क्लिन ड्राईव्ह" मोहीम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. 

    हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील सर्वच शहरांना आवाहन केले होते. मुंबई, ठाणे महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेप्रमाणे मीरा-भाईंदर येथील स्वच्छता मोहिमेमध्ये मुख्यमंत्री स्वतः सहभागी झाले,त्यावेळी ते बोलत होते.

     यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर, पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी देखील या मोहिमेत सहभाग नोंदविला.

      डीप क्लीन ड्राईव्ह या मोहिमेचा उद्देश  रस्ते आणि पदपथावरील धूळ कमी करणे, हा आहे. या मोहिमेदरम्यान अनेक नागरिक, राजकीय प्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थांनी या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. महापालिका सफाई  कामगारासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष संवाद साधला. झाडू चांगल्या प्रतीचे वापरावे, अशीही सूचना त्यांनी पालिका प्रशासनास केली. त्याचबरोबर कामगारांचे त्यांनी कौतुकही केले.

      मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेमध्ये शनिवारी प्रभाग क्रमांक 11 आणि 12 मध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 च्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 22 पथके अथकपणे काम करताना दिसली. यानंतर दर शुक्रवारी 8 मार्च 2024 पर्यंत संपूर्ण शहरात ही मोहीम राबविली जाणार आहे. या विशेष मोहिमेमध्ये वॉर्डांमध्ये रस्ते, दुभाजक, फूटपाथ आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या ठिकाणी संपूर्ण स्वच्छता केली जाईल. बस स्टॉप वरील, भिंतींवरील पत्रिका आणि स्टिकर्स काढून टाकणे, तसेच शहरातील थुंकलेले रेड स्पॉट्स स्वच्छ करणे, ही कामे केली जातील. मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या उपक्रमाचे कौतुक करीत मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी हनुमान मंदिर आणि गोल्डन नेस्ट रोड सारख्या ठिकाणी स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला. नागरिकांचा सहभाग आणि क्यूआर कोड मॉनिटरिंगद्वारे कचरा वर्गीकरणावर भर दिल्याबद्दल मुख्यमंत्री यांनी आयुक्तांचे कौतुक केले.

    मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त संजय काटकर यांनी मोहिमेदरम्यान मेरी गोल्ड सोसायटी येथे अभिनव कचरा वर्गीकरण प्रणालीचे सादरीकरण केले. यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी नागरिकांशीही संवाद साधला, उपक्रमातील त्यांची भूमिका समजून घेऊन स्वच्छतेच्या सामूहिक जबाबदारीचे महत्त्व त्यांनी सांगितले. 
   मीरा-भाईंदर महानगरपालिका पुढील काळात हा स्वच्छतेचा जागर कायम चालू ठेवणार असून शहरातील रहिवाशांसाठी स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने ही महानगरपालिका नेहमीच कार्यरत राहील, यासाठी नागरिकांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त श्री. काटकर यांनी यावेळी केले.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी दि.15 जानेवारी पर्यत मुदतवाढ !!

किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीसाठी दि.15 जानेवारी पर्यत मुदतवाढ !!

मुंबई, प्रतिनिधी :- पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदी करीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता दि.31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापी. ऑनलाईन पोर्टलवरील माहितीनुसार, मागील हंगामाचा विचार करता शेतकरी नोदणी पुरेशी झाल्याचे न दिसल्याने शासनाने या बाबीचा विचार करुन या चालू हंगामामध्ये पुरेशा प्रमाणात शेतकरी नोंदणी व्हावी, म्हणून पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान व भरडधान्य खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणीकरीता, दि. 15 जानेवारी 2024 अखेरपर्यत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती पुरवठा विभागाने दिली आहे.

किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून आधारभूत किंमतीचा शेतकऱ्यांना लाभ होण्याच्या दृष्टीने  व त्यांना हमी भावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी राज्य शासनाने राज्यात खरेदी केंद्र सुरु केली आहेत.  हंगाम 2016-2017 पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. 

आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनीअर्ज सादर करावेत - जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे

आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी
अर्ज सादर करावेत - जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे

रायगड, प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in,  या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी https://raigad.gov.in, या संकेत स्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून सदरचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.30 जानेवारी 2024 रोजी सायं. 06.00 वा. पर्यंत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्रे, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना "आपले सरकार सेवा केंद्र" हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे बँडींग करण्यात आले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (2011 च्या जनगणनेनुसार) किमान 2 केंद्रे स्थापन करण्यात येईल. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद 10 हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र स्थापन करण्यात येईल.

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागणी, कालावधी 30 दिवस, दि.01 ते 30 जानेवारी 2024, प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जाची छानणी, कालावधी 15 दिवस, दि.31 जानेवारी  ते दि.14 फेब्रुवारी 2024, प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जावर जिल्हास्तरीय कार्यवाही करिता, कालावधी 15 दिवस, दि.15 फेब्रुवारी ते दि.29 फेब्रुवारी 2024.

रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण केंद्रांची माहिती :-  एकूण ग्रामीण केंद्र 884, एकूण शहरी केंद्र 105,एकूण-989. ग्रामीण कार्यरत केंद्र- 751,  शहरी कार्यरत केंद्र- 123, एकूण- 874.  ग्रामीण रिक्त केंद्र- 306, शहरी रिक्त केंद्र- 12, एकूण- 318.

रिक्त केंद्रांची संख्या- 318, रिक्त केंद्राची तालुकानिहाय संख्या :-अलिबाग 4, कर्जत 9, खालापूर 10, महाड 75, माणगाव 18, म्हसळा 17, मुरुड 5, पनवेल 39, पेण 20, पोलादपूर 24, रोहा 34, श्रीवर्धन 21, सुधागड 12, तळा 18, उरण 12.

आपले सरकार सेवा केंद्राबाबत माहितीसाठी माहिती व तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा.

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पोहचले जटायू पक्षाचे वंशज !!

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी पोहचले जटायू पक्षाचे वंशज !!

भिवंडी, दिं,३०, अरुण पाटील, (कोपर)‌ :
       अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची जय्यत तयारी युद्ध पातळीवर सुरू असून राम मंदिराच्या उद्घाटना बाबत जगभरातील राम भक्तांमध्ये  उत्साह व आनंदाचे वातावरण पसरले आहे.या रामलला शहरातून एक अनोखी घटना पाहायला मिळाली आहे.
        या राम मदिराच्या उद्घाटनापूर्वीच मिल्कीपुरच्या जंगलात व ग्रामीण भागात रामायणातील जाटायु पक्षाच्या वंशातील गिधाडांच्या कळपाचे दर्शन  ग्रामस्थांना  झाले आहे .हा जटायू पक्षी गिधाडांच्या प्रजातीचा होता. ज्या जटायूने ​​रावणाला पंखांनी खूप दुखवले होते. जटायूने ​​रावणाच्या शरीरावर रक्तस्त्राव केला होता. 
        रामकथेत एक घटना आहे जेव्हा जटायूचा भाऊ संपाती म्हणाला की माझे पंख कमकुवत आहेत पण माझ्या डोळ्यांना दूरच्या गोष्टी दिसत आहेत, म्हणूनच मला अशोक वाटिकेत बसलेल्या सीताजी दिसत आहे. आता अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी गिधाडांचे दर्शन घडल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोक त्याला जटायूचे वंशज मानून त्याची पूजा करत आहे.
       खांदासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारौली गावातील नागरिकांनी सांगितले की, गावाच्या आजूबाजूच्या बागांमध्ये डझनभर गिधाड पक्षी दिसत आहेत, ही निसर्गासाठी चांगली बातमी आहे. अयोध्येचे उपविभागीय वन अधिकारी एन सुधीर म्हणाले की, जर तसे असेल तर ही खूप चांगली बातमी आहे, आता आम्ही तात्काळ घटनास्थळी टीम पाठवू आणि ते पूर्ण करू. वास्तविक, देशात गिधाडे नामशेष झाली आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी शासनही अनेक योजना राबवत आहे. 
       गेल्या वर्षीच्या एका अहवालानुसार, भारतात गिधाडांची संख्या ३० वर्षांत लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. हे ४ कोटींवरून ४ लाखांहून कमी झाले आहेत. तर पृथ्वीवर त्यांची नितांत गरज आहे. ते नामशेष होण्याच्या मार्गावर पोहोचले आहेत. आता अशा परिस्थितीत राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येत गिधाडांचे दर्शन घडल्याने लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

नव्या वर्षाच्या पुर्वसंधेला कांबा-पावशेपाडा येथील सिंमेट गोडाऊनवर पोलिसांची धाड, दोन इसमासह दोन ट्रक ताब्यात !

नव्या वर्षाच्या पुर्वसंधेला कांबा-पावशेपाडा येथील सिंमेट गोडाऊनवर पोलिसांची धाड, दोन इसमासह दोन ट्रक ताब्यात !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पावशेपाडा येथील सिंमेट गोडाऊन वर ठाणे ग्रामीण च्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ दिपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून नामांकित कंपनीच्या सिंमेट गोणी, दोन ट्रक व सचिन नांगरे आणि राजेश भाटिया या दोघांना ताब्यात घेतले आहे एकूण १२ लाख ६० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नव्या वर्षाच्या पुर्व संध्येला ही कारवाई झाल्यानें पोलिसांचे कौतुक होत आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा येथे झपाट्याने नागरिकरण झाले आहे. शेजारी उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण अशी मोठी शहरे असल्याने या परिसरात अनेक अनाधिकृत, गैर धंदे फोफावले आहेत, अर्थात हे स्थानिक पोलिसांना माहिती नाही असे मुळीच नाही, म्हारळ, कांबा येथे तर अश्या ठिकाणी चाळी व गोडाऊन झाले आहेत की ते सहजासहजी कोणाच्या नजरेस पडणार नाही, कांबा ग्रामपंचायत हद्दीत टाटा पावर हाऊस मागे शेकडो गोडाऊन झाले आहेत, तसेच पाचवामैल पावशेपाडा रस्त्याच्या बाजूला अशीच गोडाऊन झाली आहेत, येथे नक्की काय उद्योग चालतात हे त्यांनाच माहिती ?

पाचवामैल येथील एका गोडाऊन मध्ये अल्ट्राटेक, ऐसीसी, आणि अंबुजा आदी नामांकित सिंमेट कंपनीच्या नावाने मिलावट सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ दिपाली घाटे यांनी स्वतः या मोहिमेवर जाण्याचा निश्चय केला, त्यानुसार कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, म्हारळ पोलीस चौकीचे पीएसआय सुपेकर, देशमुख, मोरे पोका, प्रशांत बडगे आदी सहकारी यांनी या गोडाऊन वर धाड टाकली, यावेळी घटनास्थळी ऐसीसी, अल्ट्राटेक, अंबुजा आदी सिमेंट कंपनीच्या २००,६०० बँगा मिळून आल्या, तसेच दोन ट्रक ज्यामध्ये ऐसीसी, अल्ट्राटेक कंपनीच्या सिंमेट गोणी सापडल्या, एकूण १२ लक्ष, ६० हजार २५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याच्या सह सचिन नांगरे व राजेश भाटिया या दोन इसमानाही ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्या कडे आवश्यक कागदपत्रे न मिळाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास पीएसआय हेंमत सुपेकर हे करित आहेत.

अशीच कारवाई टाटा पावर हाऊस मागील गोडाऊन वर एक वर्षांपूर्वी करण्यात आली होती, त्याचे काय झाले हे अद्यापही कळाले नाही. त्यामुळे यावेळी तरी लोकांच्या जीवनाशी, त्यांच्या निवा-याशी मिलावट करून जीवघेणा खेळ करणाऱ्या आरोपीना कडक शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करुया, नव्या वर्षाच्या पुर्वसंधेला पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Thursday 28 December 2023

भारत निवडणूक आयोगाकडून पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ !!

भारत निवडणूक आयोगाकडून पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ !!
मुंबई, प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.29 मे व दि.25 सप्टेंबर 2023 च्या पत्राने जाहीर केला आहे. त्यानुसार दावे व हरकती निकाली काढण्याचा अंतिम दि.26 डिसेंबर 2023 हा होता. भारत निवडणूक आयोगाकडून पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आलेली असून, सुधारित पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

सुधारित कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :- शुक्रवार दि.12 जानेवारी 2024 दावे व हरकती निकाली काढणे, बुधवार, दि.17 जानेवारी 2024 मतदार यादीचे Health Parameter तपासणे आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे, डेटा बेस अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करणे, सोमवार दि.22 जानेवारी 2024  अंतिम प्रसिध्दी असा आहे.

   प्रारुप मतदार यादी दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिध्द झाली आहे. नागरिकांनी प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. बऱ्याचवेळा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असतात. तरी आपले नाव, पत्ता, जन्म दिनांक, वय, मतदार संघ इत्यादी तपशिल सुध्दा अचूक आहे याची खात्री करावी. हा तपशिल https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच Voter Helpline App वर पाहता येईल.

    सर्व नागरिक दि.05 जानेवारी 2024 पर्यंत नाव नोंदणी, वगळणी व दुरुस्ती इत्यादी साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा Voter Service Portal Beta (https://voters.eci.gov.in/)., Voter Portal https://voterportal.eci.gov.in/ , Voters Helpline App (VHA) मोबाइल अॅप  उपलब्ध आहे. तसेच ऑफलाईन अर्ज  संबंधित मतदार नोंदणी कार्यालय (तहसीलदार कार्यालय), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे करता येणार आहेत.

   तरी सन 2024 मध्ये येवू घातलेल्या निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्वाची संधी असल्याने पात्र नव मतदारांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभागातर्फे करण्यात आले.

मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी दि.5 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत. !!

मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत राज्याबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी दि.5 जानेवारी पर्यंत अर्ज करावेत. !!
मुंबई, प्रतिनिधी :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन 2023-24 मध्ये मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांसाठी राज्याबाहेर प्रक्षेत्र भेट हा कार्यक्रम राबविण्यात आला आहे. त्यानुषंगाने शेतकऱ्यांना इतर राज्यातील शेती उद्योगांची माहिती व्हावी, यासाठी राज्याबाहेरील अभ्यास दौरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले.

राज्याबाहेर अभ्यास दौरा राबविताना शेतकऱ्यांमध्ये फलोत्पादन विषयक जिज्ञासा व आवड निर्माण करण्याच्या हेतूने तसेच फलोत्पादनाची प्रतवारी, हाताळणी, शेत स्तरावर करावयाची प्रक्रिया, उद्योग स्थापन करणे, आधुनिक लागवड तंत्रज्ञानाबाबत व काढणी पश्चात तंत्रज्ञानाबाबत सखोल शास्त्रोक्त ज्ञान उपलब्ध करुन देणे व या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतः ची व त्याचबरोबर समूहाची फलोत्पादन विषयक शेती उन्नत करणे या बाबीसाठी शेतकऱ्यांचा राज्याबाहेर अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे.

हा अभ्यास दौरा कर्नाटक राज्यातील तीन ठिकाणी मैसूर-कर्नाटका, सी.एस.आय.आर.सेन्ट्रल फुड तंत्रज्ञान आणि संशोधन, I.C.A. आर.एस. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च, हेसरगट्टा, बंगलोर वाई आय.सी.ए.आर डायरेक्टरेट ऑफ कॅशू रिसर्च, मोत्तेबडका, पुडुर येथे भेट देण्यासाठी आयोजित केला जाईल.

अभ्यास दौऱ्याचा कार्यक्रम हा जास्तीत जास्त सात दिवसांचा राहील. या अभ्यास दौऱ्याकरीता 25 शेतकऱ्यांचा एक गट याकरिता 7 दिवसांसाठी रक्कम रु. 2 लाख याप्रमाणे खर्च अनुज्ञेय आहे. यामध्ये प्रवास खर्च (बस किंवा द्वितीय श्रेणी स्लीपर रेल्वे), निवास व भोजन व्यवस्था, प्रशिक्षण साहित्य इ.बाबींचा समावेश राहील. प्रति लाभार्थी ठरवून दिलेल्या मापदंडापेक्षा जादा लागणारा खर्च लाभार्थी शेतकऱ्याने स्वतः करावा लागेल.

या प्रशिक्षणार्थीची निवड अर्ज प्राप्त झाल्यास विहित पध्दतीने अर्जाची सोडत काढून, ज्येष्ठता सुचीनुसार अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात येईल. ई-केवायसी, आधार लिंक बँक खाते, मँगोनेट व जी.आय.मानांकन अधिकृत बापरकर्ते, इ-पीक पाहणी करणारे शेतकरी व महिला/अनु.जाती/अनु.जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना तसेच शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी गटातील सदस्यांना प्राधान्य देण्यात येईल.

तरी इच्छुक शेतकऱ्यांनी  दि.5 जानेवारी 2024 पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे मार्गदर्शक सुचनेनुसार विहीत अर्ज, सात बारा, 8 अ, आधार कार्ड व छायाचित्रासह सादर करावा.

*"लोकं काय म्हणतील ?"* नाट्यकृती देईल हास्याची मेजवानी व प्रेरणादायी सामाजिक संदेश...

*साहित्य संघात "नमन" प्रयोग ; २५ वर्षे लोककलेचा वारसा जपते "नव जवान बाळ कला मित्र मंडळ" ( रजि.)*

*"लोकं काय म्हणतील ?"* नाट्यकृती देईल हास्याची मेजवानी व प्रेरणादायी सामाजिक संदेश...
 
मुंबई - ( दिपक कारकर  )
 
चिपळूण तालुक्यातील अंतीम टोकाच्या कातळसर ग्रामीण भागात वसलेल्या मौजे मुर्तवडे ( कातळवाडी - ता. चिपळूण, जि.रत्नागिरी ) गावातील "नव जवान बाळ कला मित्र मंडळ ( रजि. ) मंडळ गेली अनेक वर्षे नमन कलेचं जतन - संवर्धन करत आहे. उपरोक्त मंडळातर्फे खास रसिक प्रेक्षकांच्या आग्रहास्तव शनिवार दि.१३ जानेवारी २०२४ रोजी रात्रौ ठीक ०८.३० वा. साहित्य संघ मंदिर,गिरगाव ( मुंबई ) येथे ग्रामदैवत आई श्री वाघजाई देवीच्या कृपेने "नव जवान बाळ कला मित्र मंडळ ( रजि.) प्रस्तुत/आयोजित, सखाराम लक्ष्मण नेवरेकर निर्मित व अक्षय य.नेवरेकर संकल्पित कोकणची लोककला जपणारे "ग्रामीण - मुंबई रंगभूमीवरील सुप्रसिद्ध नमन'' हया वर्षातील शुभारंभ प्रयोग सादर करते आहे. दरम्यान दमदार खेळे, श्री गणेश आराधना गण, राधा - कृष्णाची प्रेमलीला - गवळण, सहित नावीन्यपूर्ण नाट्य कलाकृती करण्यासाठी मंडळाचे यशस्वी कलाकार पुन्हा एकदा सज्ज झाले असून "मराठीची अस्मिता जपणारा आणि कोकणची लोककला जोपासणारा एक मराठमोळा कार्यक्रम मृदुंगमणी/ढोलकीपट्टू अक्षय नेवरेकर, संगीतकार मास्टर सुधाकर धा.नेवरेकर, पॅड मास्टर सतीश रा.नेवरेकर, गीतकार मास्टर सुरेंद्र दे.नेवरेकर, दिग्दर्शक महेश नेवरेकर सह अजय कारकर यांच्या साथीने लोकप्रिय गायक/शाहीर रविंद्र भेरे, गायिका/शाहीर संगीता पांचाळ/बलेकर व नवोदित गायिका प्रथमी मोहिते यांची प्रत्येक रसिक प्रेक्षकांच्या तोंडावर रूळतील अशी सुमधुर गाणी व हास्य मैफिलीत रुतलेली समजातील क्लिष्ट प्रवृत्तीवर भाष्य करणारी प्रबोधनात्मक नाट्यकृती- "लोकं काय म्हणतील....?" रसिक प्रेक्षकांसाठी पाहणे पर्वणीच आहे.

"नमन"या लोककलेवर प्रेम करणाऱ्या तमाम कोकणवाशीय, मुंबईकर, नाट्यरसिक प्रेक्षकांनी सहकुटुंब, सहपरिवार समवेत उपस्थित राहून हा कार्यक्रम पहावा असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी दिपक कारकर / पांडुरंग आलीम - ९९३०५८५१५३,     ७९७७६१२६९५, ९६५३३२३७३३, ८८७९४७४५९० यांच्याशी संपर्क साधावा.

रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरातील रहिवाशांसाठी घरांची योजना !!

रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरातील रहिवाशांसाठी घरांची योजना !!

घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :

               घाटकोपर पूर्वेकडील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरातील नालंदा नगर येथील रहिवाशांना एमएमआरडी आणि एस आर ए योजनेच्या माध्यमातून स्थानिक ठिकाणीच घरे बांधून देण्यात येणार आहेत अशी माहिती स्थानिक माजी नगरसेवक परमेश्वर कदम यांनी दिली आहे. ते कामराज नगरातील रहिवाशांच्या एका जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी रहिवाशांना योग्य कागदपत्रे जमा करण्याचे आवाहनही केले.
               या विभागात एकीकडे रहिवाशांसाठी घरे बांधण्यात येणार असून, दुसरीकडे कामराज नगर येथून रस्ताही जाणार आहे. कामराज नगर तसेच रमाबाई आंबेडकर नगर मध्ये राहणाऱ्यांना तिथेच घरे दिली जाणार आहेत. पात्र असणाऱ्यांना ही घरे मिळणार आहेत. तीन ते चार वर्षात हे काम पूर्ण होणार असल्याचे शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक 10 चे विभाग प्रमुख परमेश्वर कदम यांनी या जाहीर सभेत सांगितले. 

प्रतिक्रिया 

परमेश्वर कदम ( विभाग प्रमुख , माजी नगरसेवक ) : रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर मधील सर्व झोपडीधारकांचा (एस.आर.ए.) झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्प एमएमआरडीए ने मंजूर केला आहे. सर्व झोपडीधारकांना कामराज नगर व रमाबाई आंबेडकर नगरमध्येच इमारती मध्ये 300 चौ. फुटाचे घर 3 वर्षाच्या आत बांधून देणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या ठिकाणी येवून याबाबत आश्वासन देऊन गेले आहेत.

Wednesday 27 December 2023

घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक पदी इम्रान शेख यांची नियुक्ती !!

घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक पदी इम्रान शेख  यांची नियुक्ती !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागात कार्यकर्त्यांना पदांची जबाबदारी दिली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईत कार्यकर्त्यांच्या पदनियुक्त्या जाहीर केल्या जात असून घाटकोपर पश्चिम मध्ये देखील युवा कार्यकर्त्यांना पक्षात विशेष संधी दिली जात आहे. युवा कार्यकर्ते इम्रान शेख यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे विभाग प्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितले. इम्रान शेख हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचे विभागात विविध कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. विविध आंदोलनात देखील ते मोठ्या संख्येने पक्षात सक्रिय सहभाग घेत आहेत. इम्रान शेख मित्र मंडळात त्यांचे 20 हजार हून अधिक युवक जोडले गेले आहेत. आदिवासी पाडे, गरजू नागरिक, दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी इम्रान शेख विशेष कार्य पाहत आहे. त्यांच्या याच कार्याचा अहवाल पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांना पक्षात जबाबदारी दिल्याचे सांगण्यात आले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप 24 वा दिवस... महिला बाल विकास आयुक्त यांच्या पत्रकाची होळी.!!

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप 24 वा दिवस... महिला बाल विकास आयुक्त यांच्या पत्रकाची होळी.!! 

*ग्रामीण विकास मंत्र्यांचा निषेध !!*

चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रातील दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस गेल्या चार डिसेंबर पासून संपावर आहेत. या संपकरी कर्मचाऱ्यांचा प्रश्नांवर तोडगा काढणे तर दूरच; पण नागपूर विधानसभेत माजी महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या विचारलेल्या प्रश्नाला सकारात्मक उत्तर देण्याऐवजी नकारात्मक राजकीय भाषेत उत्तर दिले त्याबद्दल ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या  कर्मचारी विरोधी भूमिकेबद्दल  काल रोजी चोपड्यात संतप्त निषेध करण्यात आला व आणि त्यांचे भाषण  कमी की काय? गेल्या 22 डिसेंबर 23 रोजी महिला बालकल्याण आयुक्त श्रीमती रुबल अग्रवाल यांनी सुद्धा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपाचे आगीत सतरा मुद्द्यांचे तेल ओतणारे पत्रक काढून कर्मचाऱ्यांचया मागण्यांबाबत जी असंवेदनशीलता दाखवली आहे त्यात अंगणवाडीचा खाऊ आशा, बचत गट ,पंचायत राज चालक मंडळ, प्राथमिक शाळा शिक्षक यांनी हस्तांतरित करून घ्यावा जणू काही हे विभाग यांच्याच अखत्यारीत येतात.  अशा अविर्भावात पत्र काढलेले आहे. आणि त्यावर कडी म्हणजे मुख्य सेविका यांनीच खाऊ वाटप करावा असेही म्हटले आहे आधीच बचत गटांना खाऊ शिजवणे चे काम एप्रिल २३ पासून बंद केले आहे, त्यांची गेल्या तीन महिन्यांची थकीत बिल दिलेले नाहीत. दुसरीकडे हल्लीं जे खाऊ शिजतात त्यांचेही सात महिन्यांची बिल देखील दिलेली नाहीत आणि आशा वर्कर व प्रा शिक्षक त्यांची काम करतील की अंगणवाडीची काम करतील? असे महिला बाल विकास आयुक्त श्रीमती रुबल यांनी काढलेल्या अशा विसंगती पूर्ण परिपत्रकाचा  चोपडा तालुका अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन  पत्रकाची जाहीर होळी करण्यात आली. व अशा आयुक्तांची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली त्यावेळी झालेल्या सभेत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनचे जिल्हा सचिव काँ अमृत महाजन तसेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनलच्या निर्मात्या दिग्दर्शक  पुष्पावती मोरे. युनियनच्या तालुका अध्यक्ष वत्सला पाटील यांनी मार्गदर्शन केले व त्यांनी आपल्या संपाबाबत वस्तूस्थिती मांडली.

 *आगामी काळात जामनेर येथे महिला बालकल्याण मंत्री ग्रामीण विकास मंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालय कम निवासस्थान जामनेर येथे   मोर्चा नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे*. महाराष्ट्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मागण्या मान्य करून त्यांचा व अंगणवाडीतील लाभार्थी यांचे प्रश्न सोडवावेत अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी सर्व श्रीमती ठगूबाई पाटील, शारदा पाटील, लताबाई पाटील, शीतल पाटील, यशोदा धनगर, पूनम धनगर, संध्या पाटील, रेखा पाटील, अनिता सावळे, पारवता साळुंखे, उज्वला बोरसे, उषा करंदीकर ,रंजना पाटील ,ज्योती चौधरी, शैलाबाई पाटील, जिजाबाई सोनवणे, शोभा नेवे, पद्मजा नेवे, दीपिका पाटील, आदी ६०/७० सेविका, मदतनीस हजार होत्या उपस्थित होत्या

कल्याण मध्ये आम्ही नगरकर संघ वतीने मेळाव्याचे आयोजन !!

कल्याण मध्ये आम्ही नगरकर संघ वतीने मेळाव्याचे आयोजन !!

कल्याण, प्रतिनिधी -
आम्ही नगरकर मु़ंबई संघ वतीने शनिवार दि.६ जानेवारी २०२४ संध्या ४ ते ९ वेळात साई हाॅल ,वायले नगर, खडकपाडा, कल्याण प. येथे नवीन वर्षात कल्याण येथे  मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नोकरी, व्यवसाय शिक्षण निमित्ताने अहमदनगर जिल्ह्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर येथे स्थायिक झाले आहेत.

या बांधवांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे नोकरी, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण, वधू -वर शोध यामध्ये एकाच मंचा खाली सहकार्य  मिळावे या उद्देशाने स्थापन झालेल्या आम्ही नगरकर मु़ंबई संघ नोंदणीकृत संस्थेचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. 

या स्नेहसंमेलनात नोकरी, व्यवसाय, वधू वर सूचक माहिती संकलन, सांस्कृतिक कार्यक्रम, महिलांसाठी खेळ पैठणीचा, लकी ड्राॅ कूपन, विविध क्षेत्रातील सामाजिक, उद्योजक, व्यवसायिक, शैक्षणिक, आरोग्य, कला, क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान आम्ही नगरकर भूषण स्मृती चिन्ह व शाल, श्रीफळ देऊन  त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात येणार आहे तसेच स्नेह भोजनाचे आयोजन केले आहे.

या कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्यातील विविध शहरात स्थायिक झालेल्या बांधवांना कार्यक्रम सहभाग, योगदान व सहकार्यसाठी तसेच सदस्य नोंदणी साठी संस्थेचे प्रसार व प्रचार प्रमुख प्रशांत आहेर यांना संपर्क करावा.
संपर्क क्रमांक - 72084 46993

या स्नेहसंमेलनात सर्व‌ मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर शहरातील सर्व बांधवांनी सह परिवार उपस्थित रहावे असे आव्हान आम्ही नगरकर मुंबई संघ आयोजक समिती, पदाधिकारी यांनी केले आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात *"विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम संपन्न !!

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात *"विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम संपन्न !!

कल्याण , नारायण सुरोशी : केंद्र शासनाच्या पीएम विश्वकर्मा योजना, पीएम उज्वला योजना, पीएम मुद्रा लोन्स, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, पीएम आवास योजना, अटल मिशन फॉर रिज्युवनेशन अमृत-पीएम भारतीय जन औषधी योजना, उजाला योजना, सौभाग्य योजना, आधारकार्ड अपग्रेडेशन तसेच *महापालिकेशी निगडीत आयुष्यमान भारत, पीएम स्वनिधी, स्वच्छ भारत मिशन, पीएम ई-बस सेवा, डिजीटल पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर,खेलो इंडिया इ.* विविध उपक्रम करण्यात आले. यासाठी शासनाकडील डिजीटल स्क्रिन असलेली सुसज्य व्हॅन आणण्यात आली होती. भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी हे अभियान राबविले असून लक्ष्यित लाभार्थ्यांना  विविध योजनांची प्रत्यक्ष माहिती दिली. 

*"विकसित भारत संकल्प यात्रा"* 

या उपक्रमाच्या उदघाटन प्रसंगी उपस्तित अतिरिक्त आयुक्त के.डी.एम.सी श्री. चितळे साहेब, उपयुक्त श्री. धैर्यशील जाधव साहेब, उपयुक्त श्री. बोरकर साहेब, सहायक आयुक्त श्री. संजय जाधव साहेब,कार्यकारी अभियंता श्री. भागवत साहेब, महिला बालकल्याण समितीच्या माजी सभापती सौं. वीणा गणेश जाधव, तसेच प्रभाग क्षेत्र अधिकारी श्री. राजेश सावंत साहेब व सर्व कर्मचारी उपस्तित होते.

पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची नवीन खेळी पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता !!

पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची नवीन खेळी पोलिसांच्या अंगलट येण्याची शक्यता !!

*गडब/सुरेश म्हात्रे* 

रायपूर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पोलीस प्रशासन आणि प्रशासकीय अधिका-यांवर जोरदार निशाणा साधला. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूर्ण यांच्या खंडपीठाने सांगितले की, घटनेच्या कलम १९ आणि २२ नुसार पोलीस कोणत्याही पत्रकाराची सूत्रे विचारू शकत नाहीत आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांच्या विरोधात न्यायालयही विचारू शक्त नाही. जोपर्यंत तपास आणि ठोस पुराव्याशिवाय पत्रकारांवर दाखल झालेले गुन्हे आणि साक्ष तपासली जात नाहीत. आजकाल पोलीस पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याचे दिसून येत आहे कारण बहतांश घटनांमध्ये पोलीस स्वतःला चांगले बनवण्यासाठी असे करतात, या संदर्भात उच्च न्यायालयाने आता पोलीस असे करताना आपली कोर भूमिका दाखवण्यास सांगितले आहे. तसे असेल तर न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो. कोणतीही बातमी छापण्यासाठी पत्रकार त्यांच्या स्रोतांचा वापर करतात हे लक्षात घेण्याजोगे आहे, परंतु अनेक वेळा भ्रष्ट राजकीय माफिया आणि पोलीस संघटित गुन्हेगारीच्या धर्तीवर पत्रकारांना त्रास देत असल्याचे दिसून येते. छत्तीसगड मधील महादेव  ॲप घोटाळा उघडकीस आल्याने छत्तीसगड पोलिसांनी भोपाळमधील महिला पत्रकाराला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र महिला पत्रकाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्त्वाचा आधार घेतला होता. फॉर्म्युल्यामुळे तुम्ही कोणत्याही पत्रकाराला अटक करू शकत नाही, असे न्यायालयाने सांगितले, पत्रकारांनी ही बातमी जास्तीत जास्त व्हायरल करण्याची गरज आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या हक्कांची जाणीव होईल.

टुरिस्ट हॉस्पिटलच्या मागणीसाठी वैद्यकीय मदत कक्ष घेणार आरोग्यमंत्र्यांची भेट !!

टुरिस्ट हॉस्पिटलच्या मागणीसाठी वैद्यकीय मदत कक्ष घेणार आरोग्यमंत्र्यांची भेट !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                 ऐतिहासिक वारसा असलेल्या पोलादपूर तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची रेलचेल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तसेच अनेक विजय पाहिलेला रायगड किल्ला, सुभेदार तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे यांच्या समाधी तसेच तालुक्याच्या वाटेवरून प्रतापगड, महाबळेश्वर अशा स्थळांना दररोज हजारोहून अधिक पर्यटक भेटी देत आहेत मात्र पोलादपूर तालुक्याच्या भूमीत ग्रामीण तसेच पर्यटकांना तातडीने उपचार मिळू शकेल असे रुग्णालय नसल्याने रुग्णाचे मोठे हाल होत आहेत. याच महत्त्वाच्या विषयावर गेली दोन वर्ष ग्रामीण भागातील रुग्णांसाठी काम करणाऱ्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख पदाधिकारी राज्याचे आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन टुरिस्ट हॉस्पिटल ची मागणी करणार असल्याचे कक्षाचे प्रमुख कृष्णा कदम ( के के ) यांनी सांगितले.
              कोरोना महामारी नंतर सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कदम यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळवण्यासाठी शहरात मदत व्हावी या उद्देशाने विविध रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर, वार्ड बॉय, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करत वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली. या मदत कक्षा तर्फे रुग्णांसाठी विविध कार्य केले जात आहेत. अपघातात पाय किंवा हात गमवणाऱ्या नागरिकांना कृत्रिम हात व पाय, स्ट्रेचर देण्याचे कार्य सुरू असून आता पर्यंत ५४ हून अधिक नागरिकांनी कक्षाच्या मदतीचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारसाठी तालुक्यातच चांगले हॉस्पिटल उभे राहिल्यास रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही असे कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. रुग्णालय उभारण्यासाठी कदम हे विविध पर्यटकांना आवाहन करत तसेच कक्षाच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच वैद्यकीय मदत कक्षा तर्फे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन तालुक्यात चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल बांधण्याची मागणी करणार असल्याचे कक्षाचे प्रमुख कृष्णा कदम यांनी सांगितले.

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...