Wednesday, 27 December 2023

टुरिस्ट हॉस्पिटलच्या मागणीसाठी वैद्यकीय मदत कक्ष घेणार आरोग्यमंत्र्यांची भेट !!

टुरिस्ट हॉस्पिटलच्या मागणीसाठी वैद्यकीय मदत कक्ष घेणार आरोग्यमंत्र्यांची भेट !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
                 ऐतिहासिक वारसा असलेल्या पोलादपूर तालुक्यात पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांची रेलचेल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक तसेच अनेक विजय पाहिलेला रायगड किल्ला, सुभेदार तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे यांच्या समाधी तसेच तालुक्याच्या वाटेवरून प्रतापगड, महाबळेश्वर अशा स्थळांना दररोज हजारोहून अधिक पर्यटक भेटी देत आहेत मात्र पोलादपूर तालुक्याच्या भूमीत ग्रामीण तसेच पर्यटकांना तातडीने उपचार मिळू शकेल असे रुग्णालय नसल्याने रुग्णाचे मोठे हाल होत आहेत. याच महत्त्वाच्या विषयावर गेली दोन वर्ष ग्रामीण भागातील रुग्णांसाठी काम करणाऱ्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख पदाधिकारी राज्याचे आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन टुरिस्ट हॉस्पिटल ची मागणी करणार असल्याचे कक्षाचे प्रमुख कृष्णा कदम ( के के ) यांनी सांगितले.
              कोरोना महामारी नंतर सामाजिक कार्यकर्ते कृष्णा कदम यांनी ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने उपचार मिळवण्यासाठी शहरात मदत व्हावी या उद्देशाने विविध रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर, वार्ड बॉय, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करत वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली. या मदत कक्षा तर्फे रुग्णांसाठी विविध कार्य केले जात आहेत. अपघातात पाय किंवा हात गमवणाऱ्या नागरिकांना कृत्रिम हात व पाय, स्ट्रेचर देण्याचे कार्य सुरू असून आता पर्यंत ५४ हून अधिक नागरिकांनी कक्षाच्या मदतीचा लाभ घेतला आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना उपचारसाठी तालुक्यातच चांगले हॉस्पिटल उभे राहिल्यास रुग्णांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही असे कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. रुग्णालय उभारण्यासाठी कदम हे विविध पर्यटकांना आवाहन करत तसेच कक्षाच्या पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच वैद्यकीय मदत कक्षा तर्फे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेऊन तालुक्यात चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल बांधण्याची मागणी करणार असल्याचे कक्षाचे प्रमुख कृष्णा कदम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न !!

बांद्रा शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांतर्फे सरकारचे आभार मानण्यासाठी सभा संपन्न !! ** मा.आ.श्री.किरण पावसकर (शिवसेना सचिव/प्रवक्ते) यांनी उपस्...