Sunday 31 January 2021

'संदीप ओंबासे' यांना क्रीडा जीवनगौरव पुरस्कार !

'संदीप ओंबासे' यांना क्रीडा जीवनगौरव पुरस्कार !


कल्याण :- ताइक्वांडो या खेळामध्ये केलेल्या भरीव कामगिरी ची दखल घेत वर्ल्ड बुद्धिस्ट व आंबेडकर राईट मिशन, भारत व कल्याण तालुका जर्नालिस्ट वेलफेअर असोसिएशन यांच्यावतीने मूकनायक शताब्दी सांगता सोहळा मुंबई पत्रकार भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता..


या पुरस्कार सोहळ्यामध्ये संदीप यशवंतराव ओंबासे, सचिव -  तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष 'मा.श्री नानाभाऊ पटोले' यांच्या शुभहस्ते *क्रीडा जीवन गौरव* हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले... प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदासजी आठवले, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ किशोरी पेडणेकर, डॉ. रामप्रसाद मोरे, दैनिक लोकधारा चे संपादक श्री प्रदीप जगताप, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी साहेबराव सुरवाडे व आदी मान्यवर उपस्थित होते.

संदिप ओंबासे..यांनी महाराष्ट्रात तायक्वांदो हा ऑलम्पिक क्रिडा प्रकार खोलवर रुजवण्यात खूप मोठे योगदान दिले आहे...

1994 ला जर्मनी (वेसेल) येते झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे तर्फे मणीपूर (इम्फाळ) येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते तसेच आतापर्यंत 22 राज्य, 8 राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा मान त्यांना मिळाला. 

सध्या ते तायक्वांदो असोसिएशनचे ऑफ महाराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हजारो खेळाडू तयार झाले आहेत. या खेळाची जागतिक संघटना वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन या संघटनेच्या जागतिक सभा  2016 ला रशिया येते संपन्न झाली होती आणि यासाठी  भारतातुन संदीप ओंबासे यांना उपस्थित राहण्याचा मान मिळाला होता....

या खेळासाठी त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  संदीप ओंबासे
त्यांच्या अनुपस्थितीत हा पुरस्कार चिरंजीव स्वप्निल संदीप ओंबासे यांनी स्वीकारला...

मुरबाड तालुक्यातील अनुसूचित जाती -जमातीतील घरकुल पाहणीसाठी **सभापती आपल्या दारी उपक्रम सुरु**

मुरबाड तालुक्यातील अनुसूचित जाती -जमातीतील घरकुल पाहणीसाठी **सभापती आपल्या दारी उपक्रम सुरु**

**देवगाव गणातुन आज पासून पाहणीदौ-याला सुरुवात **


मुरबाड (मंगल डोंगरे) : राज्य सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून आदिवासी 'मागासवर्गीय' समाजाच्या उन्नतीसाठी अनेक विकासात्मक उपाययोजना राबविल्या जातात. त्याच अनुषंगाने  मुरबाड तालुक्यातील अनुसूचित जाती-जमातीतील वंचित घटकांना प्राधान्याने घरकुल योजनेचा लाभ मिळावा. यासाठी आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आजपासून मुरबाड तालुक्यात **सभापती आपल्या दारी ** या उपक्रमा अंतर्गत मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी देवगाव पंचायत समिती गणापासुन घरकुल पाहणी दौ-याला सुरुवात केली आहे.


              गरीब; गरजु नागरिकांना त्यांचे हक्क व न्याय मिळावा. तसेच समाजात विविध विकास योजनांबाबत आणि प्राधान्याने घरकुल योजनेची प्रभावी पणे जनजागृती व्हावी. यासाठी आज देवगाव गणातील सर्व ग्रामपंचायतींचे संबधीत 'ग्रामसेवक' व त्या त्या भागातील कार्यकर्ते सोबत घेवून 'सभापती श्रीकांत धुमाळ' यांनी देवराळ वाडी 'सुकाळ वाडी 'फणसोली 'कातकरी वाडी 'देवपे 'लव्हाळी 'वाशिवली 'संतवाडी' शेळशेत 'उंबरवेढे 'फणसवाडी 'बिरवाडी 'धानिवली 'ब्राम्हणगाव 'शिर्के पाडा 'व देवगाव या गावाना प्रत्यक्षात भेटी देवुन कच्च्या घरांची पाहणी करून घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी वंचित घटकांनी तात्काळ आपले बँक खाते पुस्तक ' जातीचा दाखला 'आधार कार्ड 'अशी कागदपत्रे आपापल्या ग्रामसेवकांकडे जमा करण्याचे आवाहन केले आहे. '**सभापती आपल्या दारी**   या अभियानांतर्गत संपूर्ण मुरबाड तालुक्यातील अनुसूचित जाती -जमातीतील बांधवांना पक्की घरे देण्याचा मुरबाड पंचायत समितीचा संकल्प असल्याचे सभापती धुमाळ यांनी आमचे प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना सांगितले.

उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ संपन्न !

उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ संपन्न !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी रायगड जिल्हाच्या पालकमंत्री कुमारी आदिती ताई तटकरे यांच्या उपस्थितीत आज रायगड जिल्ह्यातील माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात पल्स पोलिओ माेहिमेचा शुभारंभ संपन्न झाला. 
      यावेळी माणगांव च्या नगराध्यक्षा योगिता चव्हाण, नगरसेवक रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, नितीन वाढवळ, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, माणगांव उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदिप इंगोले तसेच आरोग्य विभागाचे इतर अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. 
    राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीमेंतर्गतआपल्या घरातील ० ते ५ वयोगटापर्यंतच्या मुलांना ही लस द्यायला विसरू नका   
       तसेच 'करोना' विषयक सर्व नियमांचे पालन करून ही लसीकरण मोहीम आपण सर्वांनी यशस्वी करू या,असे आवाहन उपस्थितांना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी केले.

Saturday 30 January 2021

माणगांव पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव मधील सराफांची सुरक्षात्मक खबरदारी विषयक बैठक संपन्न !

माणगांव पोलीस निरीक्षक श्री प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माणगांव मधील सराफांची सुरक्षात्मक   खबरदारी विषयक बैठक संपन्न !


       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रदीप देशमुख यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शनिवार दिनांक ३०/०१/२०२१ रोजी माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील सर्व सोन्याचे व्यापारी / दुकानदार तथा सराफांची सुरक्षात्मक खबरदारी चोरी प्रतिबंधात्मक दृष्टीकोनातून मीटिंग घेण्यात आली. 
        सदर मिटिंगला माणगांव मधील सराफ बंधू उपस्थित होते. सदर मीटिंग मध्ये माणगांव पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रदीप देशमुख यांनी उपस्थित सर्व सोन्याचे व्यापारी, दुकानदार तथा सर सराफांना  त्यांच्या दुकानातील सी.सी. टी.व्ही. कॅमेरे यांची वेळोवेळी काळजी घेऊन ते कार्यरत आणि अद्ययावत आहेत का नाही या कडे लक्ष देणेबाबत तसेच काही संशयास्पद वाटल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क करणेबाबत सूचना दिल्या.
       माणगांव पोलीस ठाण्यात Dysp तथा उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून चार्ज घेतलेले कर्तव्यदक्ष, कर्तव्यतत्पर आणि कर्तव्य कठोर श्री प्रवीण पाटील साहेब आणि माणगांव पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष आणि कर्तव्यतत्पर पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रदीप देशमुख साहेब माणगांव पोलीस ठाण्यात आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्या नंतर त्यांनी माणगांव  तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच माणगांव तालुक्यातील सामाजिक सलोखा, दारुबंदी, चोरी, दरोडे, अवैध धंदे तसेच माणगांव शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अनेक कृतीशील धाडसी निर्णय घेतले. याच पार्श्वभूमीवर माणगांव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील संभाव्य भुरट्या चोर्या, दरोडे रोखण्यासाठी किंबहुना त्यांना लगाम लावण्यासाठी माणगांव पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रदीप देशमुख यांनी माणगांव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व सराफांचा माणगाव ज्वेलर्स ग्रुप बनविला आहे. आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून माणगांव मधील सर्व सराफ बंधू माणगांव पोलीस ठाण्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे माणगांव पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ५ शहरात होणार थेट प्रक्षेपण !

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ५ शहरात होणार थेट प्रक्षेपण !


नाशिक, प्रतिनिधी - गोखले शिक्षण संस्थेच्या आवारात लोकहितवादी मंडळातर्फे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ते अधिकाधिक रसिकांपर्यंत पोचविण्याचा मंडळाचा मानस आहे. त्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये केले जाईल, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक तथा मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली आहे.

दरम्यान, स्थळनिश्‍चितीनंतर सर्व्हेअर्सच्या माध्यमातून कामांनी वेग घेतला आहे. नाशिकमधील मराठी साहित्य संमेलन हा एक लोकोत्सव करण्याचा संकल्प लोकहितवादी मंडळाने सोडला असून, कोरोनानंतरच्या काळात होणारे हे संमेलन म्हणूनच महत्त्वाचे आहे. लोकांनी दिलेला प्रत्येक रूपया आमच्यासाठी महत्त्वाचा आणि अमूल्य आहे. तो सत्कारणी लावला जाईल, असे जातेगावकर यांनी सांगितले.

सध्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात केवळ पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी आहे. मात्र केंद्र सरकार फेब्रुवारीमध्ये ही सवलत वाढविण्याची शक्यता असल्याने संमेलनाला ७५ टक्के अथवा शंभर टक्के उपस्थितीला परवानगी मिळू शकते.लोकसहभागातून साजरा होणाऱ्या सोहळ्यातील प्रत्येक रूपया सत्कारणी लावत नाशिकमध्ये होणारे तिसरे साहित्य संमेलन यशस्वी करणार, असा विश्‍वासही जातेगावकर यांनी व्यक्त केला आहे.

पोलीस महासंचालकांच्या उपस्थित नियुक्तीपत्र ७४ पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात निवड !

पोलीस महासंचालकांच्या उपस्थित नियुक्तीपत्र ७४ पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात निवड !


मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

               ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ज्या पोलीस अंमलदारांचे करोना कालावधी व तत्पूर्वी पोलीस सेवेत कर्तव्यरत असताना दुर्दैवी निधन झालेले आहे, अशा पोलीस अंमलदारांच्या पाल्यांची अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलामध्ये निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.त्याप्रमाणे दिनांक २९ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे "पोलीस महासंचालक मान. श्री हेमंत नगराळे" यांच्या हस्ते आज एकूण ७४ पोलीस पाल्याना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत.सदर प्रकारे पोलीस पाल्याना अनुकंपा तत्वावर प्रत्यक्ष मा. पोलीस महासंचालक महोदयांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्याचा  ठाणे शहर पोलीस कल्याण विभागाअंतर्गत आयोजित केलेला  राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.

त्याप्रमाणे साकेत या क्रीडांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमास नवनियुक्त ७४ पोलीस अंमलदार यांचे समवेत पाल्यांचे नातेवाईक, वरिष्ठ अधिकारी अंमलदार तसेच नागरिक, पत्रकार असे ५०० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते.

        मा. पोलीस महासंचालक श्री हेमंत नगराळे यांनी  पदभार स्वीकारलेनंतर अशा प्रकारे प्रेरणादायी आणि पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या कल्याणार्थ राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमा बाबत  समाधान व्यक्त करुन पूर्ण राज्यभरात अशा प्रकारे उपक्रम राबविणेचा मनोदय  आजच्या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला आहे.

तसेच करोना कालावधीत ज्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष योगदान दिले आहे त्यांना करोना योद्धा म्हणून विशेष पोलीस पदक देवून गौरव करणे विषयी शासनास प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले आहे.या कार्यक्रम प्रसंगी नव नियुक्त पोलीस अंमलदार यांनी मनोगत व्यक्त करताना पोलीस प्रशासनाने करोना काळात अडचणीच्या वेळी केलेल्या साहाय्य बाबत आभार व्यक्त करताना पालकांच्या जागेवर पोलीस सेवेत येताना गहिवरुन आल्याचे सांगितले.आजच्या या काहीशा भारावलेल्या आणि प्रेरणादायक कार्यक्रमात मा. पोलीस आयुक्त  विवेक फणसळकर यांनी या काळात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या स्मृती जागवून अतिशय अल्प कालावधीत ही नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल संबधितांचे कौतुक केले

Friday 29 January 2021

टिटवाळा परिसरातून दुर्मिळ हिरव्या रंगाच्यागवत्या सापाची सुटका.. छायाचित्र ऋषिकेश चौधरी

टिटवाळा परिसरातून दुर्मिळ हिरव्या रंगाच्यागवत्या सापाची सुटका.. छायाचित्र ऋषिकेश चौधरी 


कल्याण, प्रतिनिधी : टिटवाळा शहरातील म्हसकल गावात काही आदिवासी पाडे आहेत तेथील नागरिक जंगलातून गवत कापायचे काम करत असतात अशाच एका आदिवासी महिलेने गवत आणले असता त्या गवताच्या गंजीतून हिरव्या रंगाचा साप आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला घरातील महिला व इतर सदस्य भयभीत झाले सुरवातीला या सापाला मारण्याचा प्रयत्न घरातल्या पुरूष मंडळींनी केला परंतू साप डूख धरेल व बदला घेईल या भितीने कोणीच मारले नाही व सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले... 


वॉर रेस्क्यू फाऊडेशन च्या टिटवाळा शाखेच्या हेल्पलाईनवर फोन आल्यावर  स्वप्निल कांबळे, सुमित भडांगे व क्षितिज जाधव या सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व गवताच्या गंजीतून सुखरूपपणे सापाची सुटका केली तसेच हा बिनविषारी असून नागरिकांना कोणताच धोका नाही तसेच कोणत्याही साप अथवा वन्यजीव मारल्यावर वनविभागाकडून कडक शिक्षा होईल असे स्वयंसेवकांकडून सांगण्यात आले. साप डूख धरतो या अंधश्रद्धा असल्यानेच आज गवत्या सारख्या निरूपद्रवी सापाचा जीव वाचला गेला आहे असे सर्पमित्र स्वप्निल कांबले यांनी सांगीतले. व ह्या सापाला कल्याण वनविभागाच्या वनपाल एम डी जाधव यांच्या सुपुत केला 

गवत्या सापाची (ग्रीन किलबॅक) पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात.  गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही. बेडूक आणि टोड हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मीलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिल्ले जन्मतात. गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात. 

ठाणे ग्रामीण भागातील टिटवाळा च्या जंगलात या सापाचा अनेक वर्षांनी अधिवास आढळून आल्याने निर्सगप्रेमीं मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

ठाणे जिल्ह्यातील एकमेव निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड प्रतिबंधक लसीकरण सुरू !

ठाणे जिल्ह्यातील एकमेव निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड प्रतिबंधक लसीकरण सुरू!


कल्याण (संजय कांबळे) संपूर्ण जगाला हादरून सोडणा-या कोरोना विरोधातील प्रतिबंधक लसीकरणाला ठाणे जिल्ह्यातील एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी केवळ तालुक्यातील निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीकरणाची मंजुरी मिळाली असून आज वरप येथील अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य विभागाच्या आशा वरकर यांना लस टोचण्यात आली.


कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजला होता. अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने वेळीच सावध उपाययोजना केल्या मुळे कोरोना आटोक्यात आला. यामध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वरकर, ग्रामसेवक यांचा सिंहाचा वाटा आहे. आता कोरोनाला कायमचा हद्दपार करण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांना राज्यात कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहिम सुरू झाली आहे.


ठाणे जिल्हात ३३प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु यातील कल्याण तालुक्यातील केवळ निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीकरण करण्याची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार २५ जानेवारी पासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सेंटर सुरू झाले आहे. निळजे आणि दहागाव या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळणारे डॉ रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे लसीकरण सुरू असून आज म्हारळ, वरप, कांबा आणे भिसोळ, मामणोली, आदी गावातील अंगणवाडी कर्मचारी व आशा वरकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यामध्ये श्रीमती वनिता कांबळे, सुधा विशे, सरिता कुर्ले, सिंधू गोंधळे, वैजयंती मोहफे, सुजाता बनकरी, रंजना सुरोशे, आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 
तर या लसीकरण मोहिमेचे नेतृत्व डॉ रमेश राठोड यांनी केले होते तर यांना सहकार्य दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सायली जाधव, डॉ मेघा चव्हाण, डॉ नेहा मोघे, व्हक्शीनेशन आॅफिसर रुपाली शिंदे, लसटोचक मोनिका गंभीरराव, राजेश थोरात, प्रशांत गुजर, आदी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. 
गेल्या २५ जानेवारी पासून सुरू असलेले हे सेंटर २७,२८ आणि २९ जानेवारी होते. असे या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ रमेश राठोड यांनी सांगितले. 

ठाणे जिल्ह्यातील एकमेव निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड प्रतिबंधक लसीकरण सुरू !

ठाणे जिल्ह्यातील एकमेव निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड प्रतिबंधक लसीकरण सुरू !


कल्याण (संजय कांबळे) : संपूर्ण जगाला हादरून सोडणा-या कोरोना विरोधातील प्रतिबंधक लसीकरणाला ठाणे जिल्ह्यातील एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी केवळ तालुक्यातील निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीकरणाची मंजुरी मिळाली असून आज वरप येथील अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य विभागाच्या आशा वरकर यांना लस टोचण्यात आली.


कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजला होता. अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने वेळीच सावध उपाययोजना केल्या मुळे कोरोना आटोक्यात आला. यामध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वरकर, ग्रामसेवक यांचा सिंहाचा वाटा आहे. आता कोरोनाला कायमचा हद्दपार करण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांना राज्यात कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहिम सुरू झाली आहे.

ठाणे जिल्हात ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु यातील कल्याण तालुक्यातील केवळ निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीकरण करण्याची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार २५ जानेवारी पासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सेंटर सुरू झाले आहे. निळजे आणि दहागाव या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळणारे डॉ रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे लसीकरण सुरू असून आज म्हारळ, वरप, कांबा आणे भिसोळ, मामणोली, आदी गावातील अंगणवाडी कर्मचारी व आशा वरकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यामध्ये श्रीमती वनिता कांबळे, सुधा विशे, सरिता कुर्ले, सिंधू गोंधळे, वैजयंती मोहफे, सुजाता बनकरी रंजना सुरोशे , आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 
तर या लसीकरण मोहिमेचे नेतृत्व डॉ रमेश राठोड यांनी केले होते तर यांना सहकार्य दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सायली जाधव, डॉ मेघा चव्हाण, डॉ नेहा मोघे, व्हक्शीनेशन आॅफिसर रुपाली शिंदे, लसटोचक मोनिका गंभीरराव, राजेश थोरात, प्रशांत गुजर, आदी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. 
गेल्या २५ जानेवारी पासून सुरू असलेले हे सेंटर २७,२८ आणि २९ जानेवारी होते. असे या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ रमेश राठोड यांनी सांगितले.

रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या चित्ररथाद्वारे आरोग्य विषयक जनजागृती !

रायगड जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या चित्ररथाद्वारे आरोग्य विषयक जनजागृती !


       बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) :
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून पालकमंत्री कु.आदिती तटकरे, जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता पारधी , जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, भारत सरकार, तपस्वी गोंधळी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेंद्र भिसे, स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था, रोहा च्या अध्यक्षा सुचिता साळवी या मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालय पोलीस परेड ग्राऊंड येथे  जनजागृतीपर आरोग्य रथाचे उद्घाटन करण्यात आले.
       या आरोग्य रथाच्या माध्यमातून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', कोविड लस सुरक्षित आहे, बेटी बचाओ-बेटी पढाओ, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, बाळाचे लसीकरण वेळेवर करा यांसह इतरही आरोग्याशी संबंधित विषयांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. 
     या आरोग्य रथाचे नेतृत्व तपस्वी गोंधळी करीत असून या चित्ररथाची प्रतिकृती स्वयंसिद्धा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.

Thursday 28 January 2021

संत गजानन महाराज मंदिरात सत्कार सोहळा !

संत गजानन महाराज मंदिरात सत्कार सोहळा !


अमळनेर प्रतिनिधी - अमळनेर शहरातील भाविकांचे श्रध्दास्थान, मुंदडा नगर भागातील दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात श्रीमती सोनाली अविनाश भामरे ग्रामसेविका धुळे नंदुरबार ग.स.पतपेढीच्या निवडणूकीत 5146 मतांनी निवडून आल्या. व महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यकार्यकारणी सदस्य पदी दैनिक साईमतचे अमळनेर तालुका प्रतिनिधी ईश्वर रामदास महाजन यांची निवड झाली त्याबद्दल मंदिराच्या सभागृहात संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार यांनी शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.


          सत्कार प्रसंगी श्रीमती सोनाली भामरे, व पत्रकार ईश्वर महाजन यांनी संत गजानन महाराज संस्थेच्या वतीने आमचा सत्कार केल्याबद्दल संस्थेचे आम्ही सदैव ऋणी राहू असे सांगितले.यावे यावेळी धुळे नंदुरबार ग.स पतपेढीचे रोखपाल आर.एस.पाटील, रविंद्र पवार, प्राचार्य एल.जे.चौधरी, विश्वास पाटील, रघूनाथ पाटील, मोहीत पवार,महेश पाटील, संजय साळुंखे, प्रदीप शिंगाणे,कदम व गजानन परीवारातील महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लाखोंचा थाट 'दिव्यांचा असायचा झगमगाट' पण यंदा कोरोनाने लावली म्हसोबा यात्रेची वाट !! **म्हसा यात्रेत शेकडो वर्षात पहिल्यांदाच शुकशुकाट **

लाखोंचा थाट 'दिव्यांचा असायचा झगमगाट' पण यंदा कोरोनाने लावली म्हसोबा यात्रेची वाट !!                 **म्हसा यात्रेत शेकडो वर्षात पहिल्यांदाच शुकशुकाट ** 


मुरबाड-{मंंगल डोंगरे} : यंदा प्रथमतःच लाखो रुपयांच्या खर्चाच्या झगमगाटात लाखोंच्या जनसमुदायात प्रेक्षणीय ठरणारी महाराष्ट्रातील एकमेव असणारी मुरबाड तालुक्यातील खांबलिंगेश्वर म्हसोबाची यात्रा यंदा पहिल्यांदाच कोरोना संकटामुळे संपुष्टात  येवून यात्रे ठिकाणी शुकशुकाट पहावयास मिळत असुन  शेकडो वर्षांची परंपरा असलेली व संपूर्ण महाराष्ट्रात गुरांचा बाजार म्हणून सुप्रसिद्ध असलेली तालुक्यातील ' म्हसोबाची यात्रा 'यंदा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवल्याने म्हसोबा यात्रेत होणारी करोडो रूपयांची उलाढाल न झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या म्हसोबा मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिसरात शुकशुकाट पसरला आहे.


             तालुक्यातील म्हसा येथे पौष पौर्णिमेपासून भरणाऱ्या म्हसोबाच्या यात्रेत महाराष्ट्रासह गुजरात व कर्नाटक येथून लाखोंच्या संख्येने भावीक येत असतात. या यात्रेत शेतकऱ्यांना उपयोगी शेती अवजारे, बैल, गाई, म्हैशी, घोंगड्या, ब्लॅंंकेट, टोपल्या इ. सह मुलांसाठी खेळणी कपडे इ.ची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व असते. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी यांनी म्हसा परिसरात कलम १४४ लागू केल्याने व यात्रा रद्द केल्याने लाखों भाविकांना यात्रेपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे दहा ते बारा दिवस चालणाऱ्या या यात्रेतील खरेदी विक्री व्यवहार होणार नाहीत. पर्यायाने स्थानिक ग्रामस्थांसह व्यापारी व शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होणार आहे.                    
** शेकडो  वर्षाची परंपरा असलेली म्हसा याञा कोरोना संकटामुळे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु दुकानदार, व्यापारी, तसेच जागा मालक आपली जागा भाड्याने देऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षभर आपले कुटूंब चालवत असतात. अशा सर्वांचे खूप मोठे नुकसान होणार असल्याची खंत म्हसा गावचे रहिवासी तथा शिवसेना उपतालुका प्रमुख कचरु म्हारसे, यांनी व्यक्त केली आहे.

*आम आदमी पार्टी* कल्याण डोंबिवली महानगरपालिका 'अ' प्रभाग यांच्या मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन *प्रजासत्ताक दिन* केला साजरा...

*आम आदमी पार्टी* कल्याण डोंबिवली महानगरपालिका 'अ' प्रभाग यांच्या मार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन *प्रजासत्ताक दिन* केला साजरा...


टिटवाळा, (अण्णा पंडित) : आम आदमी पार्टी, अ प्रभागक्षेत्र कार्यकारिणीच्या वतीने प्रजासत्ताक दिनी सकाळी ठीक ७ वाजता  गणपती मंदिर ते टिटवाळा पोलीस स्टेशन पर्यंत शालेय विद्यार्थी व नागरीकांची *प्रभा फेरी काढण्यात आली होती. 


सायंकाळी ४ ते ७ या कालावधीमध्ये आम आदमी पार्टी महिला बचत गटांतर्फे *महिलांसाठी हळदी कुंकू* समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात करोना योद्धे 'सुशीला मयूर म्हाके स्टाफ नर्स' यांच्या शुभहस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत *छत्रपती शिवाजी महाराज* यांना मानवंदना देवुन करण्यात आली. सदर कार्यक्रमास "धनंजय जोगदंड कल्याण जिल्हा अध्यक्ष आम आदमी पार्टी" "महेंद्र तथा अण्णा पंडित. प्रदेश-सरचिटणीस, अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य", "संतोष (अप्पा) तरे नगरसेवक वॉर्ड क्रमांक १०", 'रोहित खिस्ममतराव समाजसेवक तसेच विकासक', "यशवंत परब अध्यक्ष, कोकण रहिवाशी मंडळ", 'मोहन कानेरे उपाध्यक्ष, कोकण रहिवाशी मंडळ',
'सायली कदम शिवसेना शाखाप्रमुख', 'मनोज पवार उद्योजक टिटवाळा'. 'धीरज ऐगडे मोरया ग्रुप टिटवाळा'. राजेश शेलार, रवी  जाधव, कल्पेश आहेर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
कार्यक्रमांतर्गत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पुढील *कोरोना योद्ध्यांचा* मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. भूषण नलावडे, सुनंदा नलावडे, सुनील नारायण शेलार, सचिन नारायण शेलार, मधुकर भालचंद्र जोशी, भाऊराव (अण्णा) कोंडाजी पंडित, (कडोंमपा), सुशीला मयूर म्हाके वरील पैकी सर्वानी आरोग्य सेवा देवुन लॉकडाउन मध्ये आपले कर्तव्य बजावले आहे. तसेच *अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य* या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जागतिक महामारी संकटात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल "महेंद्र तथा अण्णा पंडित.(प्रदेश-सरचिटणीस)", 'दिपक मागाडे (अंबरनाथ /उल्हासनगर तालुकाध्यक्ष)', यांना *नगरसेवक संतोष तरे* यांचे हस्ते *कोरोना योद्धा* प्रमाणपत्र देवुन सन्माननीत करण्यात आले. *पत्रकार* उमेश जाधव, अजय शेलार, राजु टपाल, संभाजी तांबे, जैनेन्द्र सैतवाल.. इत्यादींसह छाया पगारे, प्रमोद नांदगावकर, सुरेंद्र साळवी, मनोज पवार, सचिन चंद्रकांत मोरे, प्रकाश खाडे, नमिता" मयुर पाटील (नगरसेविका)", 'प्रभाकर भोईर (अध्यक्ष संभाजी ब्रिगेड)', *उपेक्षा शक्तिवान भोईर (नगरसेविका)* मुन्ना राईस यांनाही मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. 
"आम आदमी पार्टी सह सचिव कल्याण डोंबिवली महानगरपालिका संदीप नाईक", 'वार्ड क्रमांक ९ चे अध्यक्ष उमेश परब', 'वार्ड क्रमांक १० चे महिला अध्यक्ष ॲड. संगीताताई जैस्वार', 'वार्ड क्रमांक १०चे महिला उपाध्यक्ष वैष्णवीताई शिर्के' तसेच संदीप वाघ, नितीन जाधव, 'भाऊराव (अण्णा) कोंडाजी पंडित', विजय शिर्के, सुनंदाताई नलावडे, नंदाताई खाडे, योगिताताई धावडे, संगीता शेलार, अमृता मळेकर, संजना गडेकर, संगीता नलावडे, राणी ताई काकवीपुरे, लताताई शेलार, आरती काकवीपुरे ,गायत्री देशमाने, अर्चना नाईक या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.

*एका कार्यकर्त्यांची संघर्षमय गाथा* 'नाथा' या पुस्तकाचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याहस्ते ३१ जानेवारीला दिल्लीत प्रकाशन !!

*एका कार्यकर्त्यांची संघर्षमय गाथा*

'नाथा' या पुस्तकाचे माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याहस्ते ३१ जानेवारीला दिल्लीत प्रकाशन !!


मुंबई (शांत्ताराम गुडेकर) :

       महाराष्ट्राच्या राजकारणात तळागळापासून कार्यकर्ता घडत आला आहे. यांची अनेक उदाहरणे देता येतील असेच एक उदाहरण जनता दलाच्या एका कार्यकर्त्यांची संघर्षमय गाथा 'नाथा' या पुस्तकाची प्रस्तावना प्रसिद्ध व्यक्ती डॉ रामचंद्र देखणे यांनी लिहिली आहे. एका कार्यकर्त्याला कसा संघर्ष करावा लागतो, किती अडचणी निर्माण होत असतात व त्यामधून तो हिऱ्या सारखा घडत गेला आहे हे या पुस्तकातून वाचायला मिळणार आहे. म्हणूनच या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दि.३१ जानेवारी २०२१ रोजी येथे भारताचे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या शुभहस्ते दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती भारताचे माजी पंतप्रधान व्ही.पी.सिंग यांच्या पत्नी श्रीमती राणी सितादेवी सिंग, बसपाचे खा.कुंवर दानिश अली, डॉ अमोल कोल्हे, माजी आम. शरद पाटील, लोकतंत्रिक जनता दलाच्या सुशिलाताई मोराळे, ललीतदादा रूनवाल, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

  या कार्यक्रमाचे निमंत्रण जनता दलाचे (से) युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी केले आहे.

निवडून आलेल्या सदस्यांची "जावया" प्रमाणे सेवा, हट्ट पुरवण्यासाठी लाखोंचा खर्च, नेतागिरी करणा-याचे दिवाळे ?

निवडून आलेल्या सदस्यांची "जावया" प्रमाणे सेवा, हट्ट पुरवण्यासाठी लाखोंचा खर्च, नेतागिरी करणा-याचे दिवाळे ?


कल्याण, (संजय कांबळे) : आपल्या लाडक्या मुलीला सासरी काही त्रास होऊ नये, ती सुखात नांदावी या करीता मुलीचे आई वडील प्रसंगी कर्ज काढून जावईबापूचे लाड पुरवतात. अगदी असेच निवडून आलेल्या सदस्यांच्या बाबतीत सध्या सुरू असून ते म्हणतील तसे त्यांच्या वर लाखोंची उधळपट्टी केली जात आहे. यामध्ये नेतागिरी करणा-याचे मात्र दिवाळे निघत आहे.
तालुक्यातील वरप ग्रामपंचायत अगोदरच बिनविरोध निवड झाली आणि उर्वरित २० ग्रामपंचायतीसाठी नुकतेच मतदान झाले व मतमोजणी देखील झाली. कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या, आमच्या ताब्यात किती ग्रामपंचायती आल्या हे सर्वच पक्ष नेते बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत सुटले. त्यातच सरपंच आरक्षणानंतर हे स्पष्ट होणार असल्याने व त्याची तारीख निश्चित नसल्याने प्रत्येकाने आपआपले सदस्य सुरक्षित अशा फार्म हाऊस, हाॅटेल, अशा ठिकाणी ठेवले. ४/५ दिवसानंतर डायरेक्ट सरपंच निवडणूकीलाच सदस्य हजर करायचे असे नियोजन टिम प्रमुखांचे होते. पण झाले उलटेच, सरपंच पदाचे आरक्षण निवडणूकीनंतर लगेच न पडता ते चक्क १६ दिवसानंतर जाहीर केले. आणि यानंतर देखील प्रत्यक्ष सरपंच निवड होण्याकरिता काही दिवस लागू शकते आणि तोपर्यंत पळवलेल्या सदस्याला सांभाळावे लागत आहे.
कल्याण तालुक्यातील २० ग्रामपंचायतीपैकी म्हारळ, कांबा, गोवेली, म्हसकळ, खोणी, बेहरे, घोटसई, आदी ग्रामपंचायती आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे या ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता असावी असे प्रत्येकाला वाटत असते. त्यामुळे काही झाले तरी सदस्य आपल्या बाजूने रहावेत म्हणून त्याचेवर लाखांचा खर्च केला जात आहे. गोवा, अलिबाग, माळशेज, अशी ठिकाणे निवडली जातात. तसेच काही फाऊ स्टार, थ्री स्टार हॉटेलमध्ये देखील यांची सोय केलेली असते. एका दिवसाला ३लाख रुपये खर्च येतो असे एका सदस्याने सांगितले. त्यामुळे सध्या पैशाचाच बाजार मांडला जात आहे. म्हणून तर भास्करराव पेरे पाटील यांच्या मुलीचा पराभव होतो. असे एका पराभव झालेल्या उमेदवारांचे म्हणने आहे. तर ऐवढा खर्च गाव विकासासाठी केला तर गावाचा चेहरा मोहरा बदलून जाईल असे सामाजिक कार्यकर्त्यांने सांगितले. दरम्यान ३फेब्रुवारीला काय आरक्षण पडते यावर पुढील गणीतं अवलंबून आहेत.

आर.आर.पाटील फाऊंडेशन आयोजक केतन भोज यांच्यावतीने ज्ञानाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या वत्कृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न !

आर.आर.पाटील फाऊंडेशन आयोजक केतन भोज यांच्यावतीने ज्ञानाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या  वत्कृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न !


मुंबई, (प्रतिनिधी) : सावित्रीबाईंनी स्त्री शिक्षणाचा पाया रोवून समाजाच्या आर्थिक,सामाजिक आणि शैक्षणिक विकासाची गुरुकिल्लीच आपल्याला दिली आहे आणि त्यामुळे समाजाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळाली आहे. हा त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत आर. आर. पाटील फाऊंडेशन संलग्न पँथर राजाभाऊ गांधळे सामाजिक संस्था, मायक्रोलिंक फाऊंडेशन या तिन्ही संस्थांनी ज्ञानाई क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन वत्कृत्व स्पर्धेसाठी आवाहन केलेल्या नंतर तसेच ही स्पर्धा सर्वच वयोगटासाठी खुली असल्यामुळे या स्पर्धेसाठी प्रचंड प्रमाणात विविध स्तरातून चांगला प्रतिसाद मिळाला. 


या स्पर्धेत पहिले उत्कृष्ट तीन स्पर्धक तसेच दहा उत्तेजनार्थ वक्तृत्व करणारे स्पर्धक निवडण्यात आले होते. दि.२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन या दिवशी या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी वरिष्ठ शिक्षका जयश्री काशिद, समाजसेवक निलेश फलके, पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक हनुमंत सा.टाव्हरे, योगेश सर्स कॉमर्स अकॅडमीचे संचालक योगेश बुध्दगे सर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार ननावरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आर. आर. पाटील फाऊंडेशनचे केतन भोज, पँथर राजाभाऊ गांधळे सामजिक संस्थेचे शरद गांधळे, मायक्रोलिंक फाऊंडेशनचे सचिन मनवळ यांनी कठोर परिश्रम घेतले.

Wednesday 27 January 2021

वंचित बहुजन आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांना मुंबईत अटक, वंचित बहुजन आघाडी कडून आघाडी सरकारचा निषेध....

वंचित बहुजन आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांना मुंबईत अटक, वंचित बहुजन आघाडी कडून आघाडी सरकारचा निषेध.... 


          बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : दिल्लीत शाईन बागच्या धर्तीवर राज्यात किसान बाग आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत  आहे. आज दिवसभर आंदोलन राज्यात चालू झालेले आहे. मात्र मुंबई वंचित बहुजन आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने या आंदोलनाला आता हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी रात्रीपासूनच वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली तर आज सकाळी चांदिवली येथे हे अब्दुल हसन खान यांना ताब्यात घेण्यात आले. त्याचबरोबर अनेक कार्यकर्त्यांच्या गाड्या तसेच पाच बसेस पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्याच बरोबर त्यांच्या चालकांनाही पोलिसांनी अटक केली. तर शिवाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते अब्दुल बारी यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. देवनार येथे समीर लालसरे हजारो कार्यकर्त्यांना पोलिसांनी  ताब्यात घेतले आहे. मुंबईतील नागपाडा भागात अनेक रस्ते बंद  करण्यात आले असून अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. 
      मुंबईत कार्यकर्त्यांची आज सकाळपासूनच धरपकड करण्यास सुरुवात झाल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे असली तरी कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन केले जाईल असे वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यात किसान बाग आंदोलन करण्यात येत आहे. मात्र केंद्रातील भाजपसरकार प्रमाणेच राज्यातील आघाडी सरकार हे आडमुठेपणा करत असून त्यांना शेतकऱ्यांना पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन हे आंदोलन यशस्वी होऊ द्यायचे नाही, असा निश्चय आघाडी सरकारने केला असल्याचे आता दिसून येत आहे. त्यामुळे अशाप्रकारे कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या या आघाडी सरकारचा वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध करण्यात येत आहे.

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण !!

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण !! 


कल्याण (संजय कांबळे) छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री आणि गुरू राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्ताने सोनी मराठी या वाहिनीवर सुरू असलेल्या स्वराज्यजननी जिजामाता या सेटवर जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी या मालिकेचे सर्वेसर्वा अभिनेते डॉ अमोल कोल्हे, अभिनेत्री नीना कुलकर्णी उपस्थित होते.
सध्या सोनी मराठी या वाहिनीवर स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका सुरू आहे. 


या मालिकेव्दारे महाराष्ट्राच्या अभिमानाची यशोगाथा, जिजाऊंचे संस्कार, छत्रपती शिवाजी महाराजांना कसे घडविले, हे प्रेक्षकांना पहायला मिळत आहे. नुकतीच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात साजरी झाली. या निमित्ताने विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मात्र स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेच्या सेटवर वृक्षारोपण या मोहिमेचे आॅयडाल अभिनेते सयाजी शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी मालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणारे डॉ अमोल कोल्हे, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची भूमिका करणा-या नानी कुलकर्णी आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे चित्रपट सृष्टीत अंत्यत चांगला मॅसेज गेला आहे. 

समता शिक्षक संघटना आयोजित निबंध स्पर्धा पारेतोषीक प्राप्त शिक्षक ईश्वर महाजन आमदारांच्या हस्ते सन्मानित !

समता शिक्षक संघटना आयोजित निबंध स्पर्धा पारेतोषीक प्राप्त शिक्षक ईश्वर महाजन आमदारांच्या हस्ते सन्मानित !


         बोरघर / माणगांव (विश्वासराव गायकवाड) : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेच्या वतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. त्या स्पर्धेमध्ये देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल चे उपशिक्षक ईश्वर रामदास महाजन यांनी ऑनलाइन शिक्षणाचे फायदे व तोटे यावर निबंध लिहिला होता. त्या निबंधाला माध्यमिक गटातून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक संघटनेच्यावतीने घोषित झाले होते. त्याचे आज वितरण एरंडोल येथे डी एस पी कॉलेजच्या सभागृहात गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण प्रसंगी ईश्वर महाजन यांना पारोळा व एरंडोल तालुक्याचे आमदार चिमणराव पाटील, प्रताप काँलेजचे माजी प्राचार्य डॉ एल.ए.पाटील, प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार, गटशिक्षणाधिकारी अशोकजी बिर्हाडे, संघटनेचे अध्यक्ष प्रा.भरत शिरसाट व विविध मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
     त्यांच्या यशाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष विलासराव पाटील, तहसीलदार मिलींदकुमार वाघ, गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन, जळगांव माध्यमिक पतपेढीचे अध्यक्ष शालीग्राम भिरूड, शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन, मुख्याध्यापक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष विलासराव कोळेकर, समता शिक्षक संघटनेचे अजय भामरे, मिलिंद निकम, सोपान भवरे, क्रिडा संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.पी.वाघ, डि.डी.राजपूत, सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे अध्यक्ष बागूल सर व सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक ,पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले.

गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न !

गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न !


विरार (दीपक मांडवकर / शांत्ताराम गुडेकर) :

           रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे मानले गेले आहे तसा संदेशही दिला जातो. नवीन वर्षाच्या सुरुवातीला गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्यदिव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात एकुण ५६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरासाठी शताब्दी ब्लड बँकने सहकार्य केले. तर या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून गुहागर अडुर मुंबई मंडळाचे सचिव दिलीप हळवे, जनशक्ती दबावचे विषेश प्रतिनिधी (पत्रकार) दीपक मांडवकर, गुहागर पाटपन्हाळे मुंबई जागृती विकास मंडळाचे माजी अध्यक्ष भालचंद्र भेकरे, गुहागर अडुरवावडगाणेश्वर मिरुल विकास मंडळाचे अध्यक्ष दिलीप मांडवकर, साई एकदंत रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष प्रकाश नाडकर व प्रतिष्ठाचे सर्व सभासद उपस्थिती होते. सुरवातीला मिलिंद पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. तर गुहागर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कदम यांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करण्यात आले. सचिव गणेश हळये यांच्या अस गुहागर प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांच्या नेतृत्वाखाली हा सुवर्ण भवैदिव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम पार पडला. गुहागर वाशीयांसाठी खंबीरपणे उभे राहू आणि कधीही रक्ताची गरज भासल्यास ते त्वरित त्यांच्या पर्यंत पोचवू असे मत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष योगेश कदम यांनी व्यक्त केले.

नालासोपारा पूर्व मोरेगाव विभागात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !

नालासोपारा पूर्व मोरेगाव विभागात  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद !


नालासोपारा (दिपक मांडवकर/शांत्ताराम गुडेकर) :                            नालासोपारा पूर्व येथील नागीनदास पाडा मोरेगाव विभागामधील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. कोरोना काळात विभागातील रहिवाशांना अन्नधान्य पुरवठ्यापासून ते अत्याआवश्यक  सेवा देणाऱ्या प्रत्येकांना कोरोना योद्धा पुरस्कार देवून मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले .महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पालघर मा.तालुका अध्यक्ष नितीन मोरे आणि शहर अध्यक्ष अमित नारकर, विभाग अध्यक्ष सुमित पवार, उपविभाग अध्यक्ष मंगेश भालेराव आणि संदीप गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. सर्वं मनसे सैनिकांचे आणि नागरिक यांचे आयोजकांनी मनापासून आभार  मानले.या भव्य रक्तदान शिबिराला  १३५ रक्त दात्यांनी रक्तदान केले. तर विभागातील रहिवाशांना कधीही रक्ताची गरज भासल्यास आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी असून, कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही अशा ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन अमित नारकर यांनी मत व्यक्त केले.

Tuesday 26 January 2021

शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "आपले घाटकोपर सेल्फी पॉइंट" चे उद्घाटन संपन्न !

शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या "आपले घाटकोपर सेल्फी पॉइंट" चे उद्घाटन संपन्न  !


 मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) : 

          शिवसेना नगरसेविका सौ अर्चना ताई भालेराव यांच्या प्रयत्नाने व तसेच माजी नगरसेवक व घाटकोपर पश्चिम समन्वयक शिवभक्त संजय दत्तात्रय भालेराव यांच्या संकल्पनेतून साकारलेले आपले घाटकोपर सेल्फी पॉइंट उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी समन्वयक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुप तसेच ग्राहक संरक्षण कक्ष च्या वतीने संजय भालेराव यांचा सत्कार  सुनील बागवे, यशवंत खोपकर, राजु केलशीकर , सुरेश पांचालकर यांच्याहस्ते करण्यात आला.

कल्याण तालुक्यातील आपटी गावचे सुपूत्र डॉ रविंद्र शिसवे यांना प्रशासकीय उंत्तूग कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकांने सन्मानित !!

कल्याण तालुक्यातील आपटी गावचे सुपूत्र डॉ रविंद्र शिसवे यांना प्रशासकीय उंत्तूग कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकांने सन्मानित !! 


कल्याण (संजय कांबळे) : नदी आमच्या उशाला, पण कोरड पडली घशाला, अशी ओळख असलेल्या जेमतेम ५०/६० घरे दिसणा-या कल्याण तालुक्यातील आपटी या छोट्याशा खेडेगावाला राज्यात नव्हे तर देशात व देशाबाहेर पोहोचवणारे डॉ रविंद्र अंनता शिसवे या पहिल्या आगरी समाजातील भारतीय पोलीस सेवा अर्थात (IPS) परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सुपूत्राला प्रशासनातील उंत्तूग कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकांने सन्मानित करण्यात येणार असल्याने हा ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मानला जात असून या सन्मानाने संपूर्ण कल्याण तालुका व आपटी गावात दिवाळी साजरी केली जात आहे.


कल्याण पासून अवघ्या ८ते १० किलोमीटर अंतरावर आपटी हे छोटेसे खेडेगाव वसले आहे. उल्हास नदीच्या काठावर हे गाव वसल्याने शेती हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय. दुसरा याला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय!
गावाच्या बरोबर मध्यभागातून मुख्य रस्ता जात असल्याने खालची आळी व वरची आळी असे दोन भाग झाले आहेत. मुख्य पिक भात तर उन्हाळ्यात कारली, भेंडी, मिरची, काकडी, अशी भाजीपाला पिके घेऊन ते बोजे उल्हासनगर बिर्लागेट किंवा कल्याण येथे विकणे. व यातून येणाऱ्या पैशातून घरखर्च चालवणे हा दिनक्रम, आपटी हे खेडेगाव असल्याने येथे सोयीसुविधा ची पूरती बोंबाबोंब, रस्ते, गटारे, दिवाबत्ती शिक्षण याची दैणी अवस्था.?
पण याच गावातील अंनता शिसवे यांनी गरीबीवर मात करुन उच्च शिक्षण पूर्ण करून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मॅनेजर पर्यंत मजल मारली तर त्यांच्या पत्नी १६७९ मध्ये सरपंच, १९९० मध्ये झेडपी सदस्य, नंतर कल्याण पंचायत समितीच्या सभापती आणि शेवटी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी पदे मिळाल्याने गावाचा चेअरा मोहरा बदलला, गावात रस्ता, गटारे, दिवाबत्ती, गणेशघाट, समाजहाॅल आदी सुविधा निर्माण केल्या.
याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत  रविद्र शिसवे यांचे इयता ४थी पर्यंत शिक्षण झाले. पुढे शिक्षणासाठी ५/७ किलोमीटर अंतरावरील रायते विभाग हायस्कूल रायते किंवा मग इतर ठिकाणी. शाळा लाब असल्याने अनेकांनी पुढील शिक्षण थांबविले. परंतु रवि यांनी प्राथमिक शाळा कळवा, ठाणे, यांनतर वझे ज्युनियर कॉलेज मुंलूड, व बारावी उत्तीर्ण  झाल्यानंतर बेळगाव येथील मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तेथे बी एम एस उर्तीर्ण केल्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या डोळखांब येथे वैद्यकीय सेवेसाठी रुजू झाले. काही काळ येथे सेवा देत असले तरी तेथे त्यांचे मन रमेना आणि अशातच त्यांच्या जिवनाला कलाटणी देणारी घटना घडली. त्यांचा अंत्यत जवळचा भाऊ, सखा, सोबती, मित्र दिनेश पांडुरंग शिसवे याचे अपघातात निधन झाले हा मृत्यू त्यांनी तसेच पत्रकार संजय कांबळे यांनी अंत्यत जवळून पाहिला. व एक मोठा निर्णय घेतला.यापुढे वैद्यकीय सेवा बस्स झाली असे ठरवून डॉ शिसवे यांनी यूपीएससी अभ्यास सुरू केला. दिवसांचे कित्येक तास अभ्यासात घालवले. प्रथम अपयश आले. पण त्यावर मात करून दुसऱ्या प्रयत्नात २००२ मध्ये संपूर्ण भारतात ते ५३ वे व महाराष्ट्रातून दुसरे आले. हा आनंद सर्वांसाठी इतका मोठा होता की शब्द अपुरे पडत होते. त्यांना प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जावे लागले. तेथे आय पी एस निवड करुन देशातील नामांकित सरदार वल्लभाई पटेल इन्स्टिटय़ूट मध्ये ट्रेनिंग सुरू केले. ते संपल्यानंतर त्यांना पहिली पोस्ट मिळाली ती सांगली जिल्ह्य़ातील जत येथील. 
यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली, पोलिस अधीक्षक गोंदिया, सिंधुदुर्ग, बुलढाणा, सांगली आणि सांगलीवरुन मुंबई अतिरिक्त पोलीस कमिशनर, मुंबई दक्षिण, मुंबई मध्य अशी उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर त्यांची पुणे शहरातील सह आयुक्त म्हणून बदली झाली. 
कारण हा काळ त्यांच्यासाठी अंत्यत कठीण व त्यांची परीक्षा घेणारा ठरला. याच काळात पुणे शहरात कोरोनाच्या भयानक संकटाने डोके वर काढले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे व प्रसंगी कठोर निर्णय घेणे आवश्यक होते. पण अशाही परिस्थितीत ते कुंटूबापासून दूर राहून देशसेवा करीत होते. अखेरीस यात ते यशस्वी झाले. आज पुणे शहर, जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे यामध्ये सह आयुक्त डॉ रविंद्र अनंता शिसवे यांचा सिंहाचा वाटा आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आणि याच प्रशासनातील अतुलनीय व उत्तुंग कामगिरी बद्दल भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांना सर्वोच्च असे राष्ट्रपती पदक जाहीर झाले हे ठाणे जिल्ह्यासाठी पर्यायाने कल्याण तालुक्यासाठी अभिमानाची घटना आहे. त्यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. तसेच आपटी गावचे ग्रामस्थ, सदस्य शाम शिसवे, गजानन शिसवे, ठिडीसीचे म्हारळ शाखा अध्यक्ष सुभाष मार्के, जनाधार निर्भिड पत्रकार सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस कल्याण चे प्रमुख संजय कांबळे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे, तहसीलदार दिपक आकडे, उपसभापती रमेश बांगर, माझी सभापती रंजना केतन देशमुख, पांडुरंग म्हात्रे आदींने आयपीएस डॉ रविंद्र शिसवे यांचे अभिनंदन केले आहे.

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजाच्या हस्ते तळबीड या ऐतिहासिक भूमित झेंडावंदन !

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजाच्या हस्ते तळबीड या ऐतिहासिक भूमित झेंडावंदन !


कल्याण, (संजय कांबळे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलाचे प्रमुख सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या ऐतिहासिक जन्मभूमीत त्यांचे वंशज लोकनियुक्त सरपंच जयवंतराव मोहिते यांच्या हस्ते तळबीड येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या काळात प्रचंड अशा सैन्य दलाचे प्रमुख कराड पासून १३ किमी अंतरावर असलेल्या तळबीड या गावचे हंबीरराव मोहिते हे होते. संभाजी मोहिते यांचा मुलगा ब्रम्हाणजी /हंसाजी म्हणजेच हंबीरराव होय. यांची बहीण सोयराबाई चा विवाह शिवाजी राजाबरोबर झाला होता. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी मोहित्यांना तहहयात तळबीड व बालाघाटाची देशमुखी मिळवून दिली होती. १लाख ५ हजारांचे घोडदळ ३० सरदार आणि ३६ समशेरबहाद्दर योध्दे व १२ गजसेना होती. वाई प्रांतात आदिलशाही सरदार सर्जाखान घुसणार असल्याची खबर हंबीरराव मोहिते यांना मिळाली. पाचवडच्या पुढे आणि वाईच्या दक्षिणेस विचित्र गडाच्या विशाल मैदानावर युध्दाला सुरुवात झाली. तोफेचा एक गोळा थेट रावांच्या देहावरचं येवून फुटला. शरीराचे असंख्य तुकडे आसमंतात विखरले. तो दिवस होता आक्टोंबर १६८७,मराठ्यांच्या आधारस्तंभ निखळला होता हे मराठ्यांनी जिंकले पण सरसेनापती हंबीरराव मोहिते हा धगधगता अग्नीकुंड शांत झाला होता अशा या वीरपुरुषांची शौर्य गाथा सर्वसामान्यांना माहिती व्हावी. यातून त्यांना एक नवी प्रेरणा, प्रखर उर्जा मिळावी या हेतूने रांवाच्या जन्मगावी म्हणजे तळबीड येथे समाधी बांधण्यात आली आहे. माझी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून येथे सर्वांग सुंदर प्रेक्षणीय व ऐतिहासिक वास्तू व स्फूर्ती स्थान निर्माण झाले.
अशा या ऐतिहासिक भूमित रांवाचेच वंशज लोकनियुक्त सरपंच जयवंतराव मोहिते यांच्या हस्ते आज ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, महाराणी ताराराणी विद्यालयाचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकेतर कर्मचारी, जिप शाळेचे मुख्याध्यापक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ भूतकर, तलाठी ढालाईत, उपसरपंच लालासो वाघमारे, सदस्य दिलीपराव मोहिते, अभीजीत गायकवाड, बबन पाडळे, दुर्गेश मोहिते, सदस्या वैशाली मोहिते, रुपाली चव्हाण, संजीवनी कुंभार, हौसाबाई फाळके, पूनम वाखळे, शोभा चव्हाण, आदी ग्रामस्थ व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Monday 25 January 2021

गर्व हिंदूत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुप आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद !

गर्व हिंदूत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुप आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त  प्रतिसाद !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :

              शिवसेनाच्या माध्यमातुन आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हाँट्सअप ग्रुपच्या माध्यमातुन एक हात मदतीचा हा महत्वपुर्ण उपक्रम गोरगरिबांसाठी सुरु करुन कोवीड-१९ काळात या समुहाने अनेकांना मदतीचा हात दिला. रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन या समुहातर्फे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आवाहन नुसार श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून राजे शिवाजी विद्यालय संकुल, हिंदू कॉलनी, दादर पुर्व येथे पार पडलेल्या भव्य रक्तदान शिबिराला राक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान शिबिरास उद्घाटन प्रसंगी मराठी सिने अभिनेत्री दीपाली जगताप खासदार विनायक राऊत, मुंबई उपमहापौर सुहास वाडकर, माजी महापौर महादेव देवळे, नितिन नांदगांवकर यांची उपस्थिती लाभली. रक्तदात्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान केले. सर्व रक्तदात्यांचे कमेटी मेंबर यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. संतोष पाटील, सूर्यकांत कडू, रवींद्र जाधव, यशवंत खोपकर, अवि राऊत, दिलीप गावडे, अनिल कांबळे, वसंत सोनावणे, रमेश वागावकर, दत्तात्रय घुले, सुरेश कोरगावकर , सौ समिता बागकर, विशाल कोर्लेकर यांनी हे रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. या अगोदरही ग्रुपतर्फे डोंबिवली येथील जोशी काका यांना २१,०००/- रु.मदत कोरोना काळात करण्यात आली. आता मुंबई मध्ये रक्तपुरवठा कमी असल्या मुळे हे रक्तदान शिबिर घेण्यात आल्याचे ग्रुपचे पदाधिकारी संस्थापक संतोष पाटील, संचालक सुर्यकांत कडू, अध्यक्ष रविंद्र जाधव, उपाध्यक्ष यशवंत खोपकर यांनी सांगितले. कारण रणभूमीवर जाऊन देशासाठी रक्त साडणे प्रत्येकाला शक्य नाही. मात्र तेवढेच पुण्यकार्य सहज शक्य आहे रक्तदान केल्याने मिळू शकते. शिवाय जी लहान मुले थँलिसिमीया या आजाराने त्रस्त आहेत त्यांना आयुष्यभर दर १५ दिवसांनी रक्त घ्यावे लागते. त्यांना हे रक्त प्राप्त झाले तर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होऊ शकतो. म्हणून "रक्तदान...सर्व श्रेष्ठ दान.."रक्तदान करा..जीवन वाचवा.. असा संकल्प करत हे शिबिर आयोजकांतर्फे घेण्यात आले.

मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने साडेतीन कोटी रुपयांचे सात बंधारे मंजूर !

मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने साडेतीन कोटी रुपयांचे सात बंधारे मंजूर !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगाव तालुक्याच्या गोरेगाव विभागातील हरकोलकोंड नदीवर आमदार भरत शेठ गोगावले साहेबांच्या प्रयत्नाने मंजूर करून आणण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. 
      यावेळी माननीय लोकप्रिय कार्यसम्राट आमदार गोगावले यांनी पुढे बोलताना सांगितले की ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणखी बंधारे या विभागात मंजूर करून आणण्यात येतील. आपण पदाधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करावा या बंधाऱ्यामुळे या भागातील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.     
      शासनाच्या घर तिथे नळ या योजनेचा महिलांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे या योजनेमुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे आणि जनतेला मुबलक पाणी मिळणार आहे. आपण ही योजना जनतेच्या सहकार्याने व्यवस्थित रित्या पूर्णत्वाकडे सर्वजण मिळून काम करूया असे आमदार भरत शेठ गोगावले म्हणाले. या विभागाने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे त्यामुळे कायमच या भागाला आम्ही विकास कामांच्या बाबतीत सर्वात जास्त झुकते माप देण्याचा प्रयत्न करत आहोत. 
       आपण संघटनेच्या पाठीवर कायमच असे ठाम राहाल त्याची अपेक्षा करतो तसेच    कोरोना काळात रखडलेली उर्वरित कामे देखील लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी खास करून महिलांनी आमदार साहेबांचे आभार मानले. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित पंचायत समिती सदस्य माजी सभापती सुजित शिंदे आणि या भागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

माणगांव येथील नुतन मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाचा जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न !

माणगांव येथील नुतन मध्यवर्ती प्रशासकीय  जलसंपदा भवनाचा जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माननीय लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नाने रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात साकारलेल्या भव्य दिव्य मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साो यांच्या  हस्ते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साो यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय कुमारी अदिती ताई तटकरे, लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले, माननीय आमदार अनिकेत तटकरे, रा. कॉ. जिल्हा अध्यक्ष, मा आ सुरेश लाड, जलसंपदा मुख्य अभियंता मा श्री तिरमनवार, रायगड जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती माननीय सौ गीताताई जाधव, पंचायत समिती सभापती माननीय अलका ताई जाधव, माणगांव नगराध्यक्षा माननीय योगिता चव्हाण, मा प्रभाकरदादा उभारे, जलसंपदा विभागाचे अभियंते, कर्मचारी वर्ग, माणगांव, तळा, रोहा, अलिबाग, म्हसळा, श्रीवर्धन इत्यादी तालुक्याचे सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, रा. काँ. चे मान्यवर पदाधिकारी आणि माणगांव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरीक, पत्रकार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यास अनेक प्रतिष्ठित दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 
       सदर लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी मुख्य अभियंता माननीय श्री तिरमनवार यांनी प्रास्ताविक केले. त्या नंतर माननीय लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले यांनी माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील साो यांचे कुंभे काळ प्रकल्प आणि प्रकल्प ग्रस्तांच्या विस्थापितांच्या व्यथा आणि प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले. या नंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय कुमारी अदिती ताई तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आजचा दिवस आपल्या साठी अभिमानाचा आहे. कारण आज माणगांव येथे दक्षिण रायगड च्या प्रशासकीय तथा जलसंपदा भवनाच्या भव्य वास्तूचे लोकार्पण होत असून या जलसंपदा भवनाच्या माध्यमातून लोकहिताचे प्रशासकीय कामकाज सुरू होणार आहे. या नंतर  लोकप्रिय खासदार माननीय सुनील तटकरे साो यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, या मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाची ही सुंदर भव्य दिव्य वास्तू माणगांव च्या सौंदर्यात भर टाकणार आहे. या मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाच्या माध्यमातून दक्षिण रायगड मधील पिण्याच्या पाण्या बरोबर भविष्यातील उद्योगांसाठी लागणार्या पाण्याची तरतूद करण्यात येईल. या नंतर त्यांनी माणगांव शहरातून जाणाऱ्या सुमारे एक किलोमीटर कालव्याच्या दुरुस्ती चे काम, माणगांव तालुक्यातील कुंभे काळ प्रकल्प, जिल्ह्यातील विविध तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नद्या उदाहरणार्थ काळनदी, सावित्री नदी, कुंडलिका नदी, रायगड जिल्ह्यातील डोळवहाळ बंधारा, पन्हळघर धरण, दक्षिण काशी तिर्थक्षेत्र श्री हरिहरेश्वर, सांबर कुंड इत्यादी क्षेत्रांच्या विकासा संदर्भात धावता परामर्श घेऊन सह्याद्री पर्वतरांगेतील कडे कपारीतून नैसर्गिक रित्या रायगड जिल्ह्यात नद्यांच्या माध्यमातून वाहणारे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला संवर्धन करून ठेवता येईल यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे. या साठी माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील साो यांच्या कडे अर्जव केली. 
      या नंतर माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील साो आपल्या भाषणात उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही सगळे भाग्यवान आहात. कारण सुनील तटकरे यांच्या सारखे कार्यक्षम खासदार तुम्हाला लाभले आहेत. जर आम्हाला सुनील तटकरे यांच्या सारखे कार्यक्षम खासदार लाभले असते तर आम्ही अजून प्रगती केली असती.  नंतर त्यांनी माननीय लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साो यांनी रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च स्तरावर वारंवार केलेले प्रयत्न, पाठपुरावा आणि माणगांव तालुक्यातील या भव्य दिव्य प्रशासकीय जलसंपदा भवन वास्तूचे सर्व श्रेय माननीय खासदार सुनील तटकरे यांना जाते. पुढे आपल्या भाषणात ते म्हणाले की, निसर्गाची सर्वात मोठी देण कोणाला मिळाली असेल तर म्हसळा, श्रीवर्धन आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याला. रायगड जिल्ह्याच्या विकासा संदर्भात माननीय आमदार भरत शेठ गोगावले, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय अदिती ताई तटकरे आणि माननीय खासदार सुनील तटकरे यांनी सुचविले ल्या सर्व सूचनांची दखल घेऊन माझ्या माध्यमातून शासनस्तरावर सर्व प्रयत्न केले जातील अशी हमी देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. 
      माणगांव तालुक्यातील सदर प्रशासकीय जलसंपदा भवनाच्या अंतर्गत पाच उप विभागांचे प्रशासकीय कामकाज सुरू राहणार आहे. या वास्तूचे कामकाज सन २०१४ ते २०१८ या कालावधीत सुरु होते. हे भव्य दिव्य प्रशासकीय जलसंपदा भवन माणगांव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी माणगांव तहसील कार्यालयाच्या आणि माणगांव पंचायत समितीच्या शेजारी असल्याने नागरिकांना खूप सोईस्कर होणार आहे.

नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण !

नवीन पत्रीपुलाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण !


कल्याण - येथील जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या व कल्याण पूर्व – पश्चिमेला जोडणाऱ्या नव्या पत्री पुलाचे लोकार्पण आज मा. मुख्यमंत्री ना.श्री. उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन पद्धतीने तसेच राज्याचे पर्यावरण, पर्यटन तथा राजशिष्टाचार मंत्री ना.श्री.आदित्य ठाकरे तसेच नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.


या लोकार्पण सोहळ्यासमयी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री ना एकनाथ शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या पत्री पुलाचे बांधकाम पुर्णत्वास नेण्याकरिता अनेक समस्या आणि अडचणींवर मात करत अहोरात्र मेहनत करणारे एमएसआरडीसी विभाग तसेच रेल्वे प्रशासन अधिकारी व कर्मचारी, पोलीस दल, कंत्राटदार आणि कामगार यांचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मन:पूर्वक आभार व्यक्त केले.

कल्याण व डोंबिवली शहरांतर्गत वाहतुकीच्या दृष्टिने अतिशय महत्वाचा असलेला हा पूल नागरिकांकरिता खुला झाल्याने आता पूल परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर सुटणार असून नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार गणपत गायकवाड, आमदार प्रमोद पाटील, आमदार डॉ. बालाजी किणीकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.राधेश्याम मोपलवार, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, कल्याण डोंबिवली मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, रेल्वे प्रशासन तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे वरीष्ठ अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची दुर्गा फाउंडेशनची मागणी !

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्याची दुर्गा फाउंडेशनची मागणी !


प्रकाश संकपाळ, नवी मुंबई - कुळ कायद्याचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नारायण नागु पाटील यांनी देशात पुकारलेल्या आंदोलनामुळे १९५७-६० या काळात कष्टकरी गरीब शेतकऱ्यांना 'कसेल त्याची जमीन' या कुळकायद्यानुसार जमिनीचा हक्क मिळवून दिला होता.
नवी मुंबईतीलआगरी, कोळी,कराडी,कुणबी व आदिवासी या समाजाचे शेती व मासेमारी हेच पारंपरिक व्यवसाय होते.कुळ कायद्यानुसार मिळालेल्या हक्काच्या जमिनी १९७० च्या दशकात शासनाने सिडकोमार्फत कवडीमोलाच्या बाजारभावाने संपादीत केल्या त्यामुळे नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त भूमिहीन झाले, पर्यायाने प्रकल्पग्रस्ताचे रोजगार, व्यवसाय, उत्पन्नाचे साधन नष्ट झाले.
शासनाने सिडकोमार्फत प्रकल्पग्रस्ताना देशोधडीला लावले असताना नवी मुंबईतून तत्कालीन खासदार दि.बा.पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली  पुकारलेल्या आंदोलनाची व या आंदोलनात शेतकऱ्यांनी दिलेल्या बलिदानाची शासनाने गंभीर दखल घेऊन शेतकऱ्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्यात विकास योजना राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला.
प्रकल्पग्रस्ताना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार दि.बा. पाटील यांचे मोठे योगदान असल्यामुळे त्यांना प्रकल्पग्रस्ताचे कैवारी म्हणून संबोधले जाते.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्ताच्या संपादित जमिनीवर आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आलेल्या विमानतळास 'दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नाव देण्यात यावे अशी मागणी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शोभाताई भोईर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारण? पिण्याच्या पाण्यात टाकले औषध, मुरबाड तालुक्यातील घोरले गावातील प्रकार !!

ग्रामपंचायत निवडणुकीतील राजकारण? पिण्याच्या पाण्यात टाकले औषध, मुरबाड तालुक्यातील घोरले गावातील प्रकार !!


कल्याण (संजय कांबळे) : गाव तसं चांगलं पण वेशीला टांगल, या सत्तर ऐंशीच्या दशकातील मराठी सिनेमात राजकारणामुळे एका समृद्ध गावाची कशी वाट लागते हे अंत्यत मार्मिकपणे दाखवले आहे. नेमके असेच राजकारण मुरबाड तालुक्यातील घोरले गावात घडले आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांच्या भागात जाणाऱ्या पाईपलाईन मध्ये "कॅनाल" नावाचे औषध टाकल्याचा आरोप गावातील सामाजिक कार्यकर्ते अंनता भोईर, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य संजय भोईर, अलका घायवट आणि कविता मुकणे यांनी केला असून याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी भोईर ग्रामस्थांनी केली आहे. तर घटनास्थळी, पोलिस, आरोग्य कर्मचारी, मुरबाड पंचायत समितीचे अधिकारी, ग्रामसेवक पोहचले आहेत. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.


मुरबाड तालुक्यातील घोरले हे गाव मुरबाडी नदीच्या काठावर वसलेले आहे. पोटगाव, बरडपाडा आणि घोरले अशी तीन गावांची मिळून ग्रुप ग्रामपंचायती तयार झाली असून या गावांची लोकसंख्या सुमारे २ ते ३ हजाराच्या आसपास आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरचे पाणी १० हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या साठवण टाकीत जमाकरुन पाईपलाईन नळकनेक्शन द्वारे गावाला पुरवले जाते. घोरले गावात भोईर व चौधरी असे दोन मोठे गट आहेत.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भोईर गटाचे संजय दशरथ भोईर, श्रीमती अलका भगवान घायवट, आणि कविता ज्ञानेश्वर मुकणे असे तिन्ही उमेदवार निवडून आले तर तर चौधरी गटाचे उमेदवारांचा पराभव झाला. याहूनही महत्त्वाचे म्हणजे येथील एकमेव मागासवर्गीय उमेदवार श्रीमती अलका भगवान घायवट हे एकच घर असलेल्या सदस्याला उमेदवारी देऊ नये आपण निवडणूक बिनविरोध करू असेही या गटाचे म्हणणे होते. पण गेली ३०/४० वर्षे हे घर आमच्या खांद्याला खांदा लावून काम केले. आमच्याशी एकनिष्ठ राहिले त्यामुळे आम्ही त्यांना सोडू शकत नाही अशी रास्त भूमिका भोईर गटाने घेतली व येथेच वादाला सुरुवात झाली. अखेर निवडणूका झाल्या व भोईर गटाचे पुर्ण पॅनेल निवडून आले. त्यामुळे गावातील वातावरण गरम होते.
अशा वेळी भोईर व चौधरी या दोन्ही भागाला वेगवेगळा पाणीपुरवठा होत असताना केवळ भोईरांच्या लाईनीला येणाऱ्या पाण्याचा उग्र वास येवू लागल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यांनी ताबडतोब गावातील ग्रामस्थांना व ग्रामपंचायत सदस्य यांना ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनी पाण्याची टाकी तपासली परतू त्या पाण्याला वास येत नव्हता. फक्त भोईरांच्या पाईपलाईन मध्ये कोणीतरी जाणूनबुजून औषध टाकल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना, मुरबाड पंचायत समितीच्या अधिकारी रमेश अवचार, यांना सांगितले. त्यानुसार गटविकास अधिकारी रमेश अवचार यांनी घोरले गावास भेट देऊन ग्रामसेवक केवणे, आरोग्य कर्मचारी यांना पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांनी पंचनामा करून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. तर हा सर्व प्रकार  निवडणूकीच्या राजकारणातून कोणीतरी केल्याचा  गंभीर आरोप भोईर कंपनीने केला आहे. तर दोषींवर कडक कारवाई करुन त्अयांचेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी मुरबाड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांच्या कडे केली आहे. तर याबाबत येत्या एक दोन दिवसात घोरले गावातील दोन्ही गटाला बोलावून ग्रामस्थांची बैठक बोलावण्यात येणार आहे असे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराडे यांनी सांगितले. .
दरम्यान भोईर कंपनीने जातीभेद नष्ट करण्याच्या दृष्टीने मागासवर्गीय एक घर असताना त्यांना बिनविरोध सदस्य म्हणून निवडून दिले. तसेच आदिवासी समाजाला देखील प्रतिनिधित्व दिल्याने भोईर कंपनीचे मुरबाड तालुक्यातून कौतुक केले जाते आहे. 

Sunday 24 January 2021

अप्सरा आली फेम अभिनेत्री माधुरी पवार ने जिंकली कर्जतकरांची मने, पुन्हा येण्याचे दिले आश्वासन !

अप्सरा आली फेम अभिनेत्री माधुरी पवार ने जिंकली कर्जतकरांची मने, पुन्हा येण्याचे दिले आश्वासन !


कल्याण (संजय कांबळे) : झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय शो अप्सरा आली ची विजेती आणि सध्या गाजत असलेल्या तूझ्यात जीव रंगला फेम मराठी गुणी अभिनेत्री माधुरी पवार हिने आपल्या अदाकारी ने समस्त कर्जतकरांची मने जिंकली. यावेळी चाहत्यांनी केलेल्या विनंती वरून आपण पुन्हा इकडे जरुर येवू असे आश्वासन पवार यांनी दिले.


मकरसंक्रांती निमित्त आयोजित हळदी कुंकू समारंभ व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे व खास आकर्षण म्हणून झी टिव्ही वाहिनीवरील अप्सरा आली या रिअ‍ॅलिटी शोच्या विजेती आणि तूझ्यात जीव रंगला फेम मराठी गुणी अभिनेत्री माधुरी पवार उपस्थित होत्या कर्जत जिल्हा अहमदनगर येथील श्रीमती हर्षदा अमृत काळदाते व काळदाते परिवारांने आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभात अप्सरा आली या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स दिला. यावेळी उपस्थित हजारो महिला व युवतींना अभिनेत्री माधुरी पवार हिने थिरकायला लावले. त्यामुळे उपस्थित युवती कडून वारंवार वन्समोर ची मागणी होत होती. तेव्हा चाहत्यांचे प्रेम बघून माधुरी पवार यांनी आपल्या दमदार आवाजात समस्त कर्जतकरांचे आभार मानले व पुन्हा कर्जत ला यायचे असेल तर नक्की येईन असे आश्वासन दिले. त्यामुळे उपस्थित ही भारावून गेले. अशा अंत्यत सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाला महिलांची व युवतीची संख्या मोठ्या प्रमाणात होती.

नांदेडमधील कामेश्र्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर !

नांदेडमधील कामेश्र्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर !


नांदेड : जिल्ह्यातील घोडजच्या कामेश्वर वाघमारे या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ऑनलाइन कामेश्वरला देण्यात येणार आहे. कंधार तालुक्यातील घोडज गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण कामेश्वर वाघमारे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने वाचवले होते. त्याच्या याच शौर्यासाठी त्याला शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आपल्या जीवाची पर्वा न करता कामेश्वरने नदीतच्या पाण्यात उडी घेऊन बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण वाचवले. गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात दुपारच्या वेळेत तीन बालक बुडत असतांना कामेश्वरने पाहिलं. पाहताच क्षणी पाण्यात उडी घेऊन त्याने जिवाच्या अकांताने दोघांना बाहेर काढले. परंतु एका मुलाला वाचवण्यात तो अयशस्वी राहिला, त्याला न वाचवू शकल्याची खंत मात्र कामेश्वरच्या मनात सदैव असल्याचं त्यानं सांगितलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. कंधार तालुक्यातील घोडज येथे या वर्षीच्या पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन बालकांचे प्राण इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कामेश्वर वाघमारे याने वाचविले आहेत.

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेला शानदार सुरुवात !

जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेला शानदार सुरुवात !


कल्याण :- संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमी व स्पोर्ट्स केयर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय खेळाडू संदीप ओंबासे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून स्वर्गीय यशवंतराव ओंबासे यांच्या स्मरणार्थ ठाणे जिल्ह्यातील चौथी 10 वर्षाखालील खेळाडूंसाठी मास्टर ट्रॉफी T-20 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून आज या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र युथ कांग्रेस चे उपाध्यक्ष ब्रिजकिशोर दत्त, आंतरराष्ट्रीय खेळाडू व ताइक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे सचिव संदीप ओंबासे, कल्याण जेल सुप्रिडेंट श्री दिलीपसिंग गिरासे, नगरसेवक श्री सुरेंद्र आढाव, दिव दमन कोर्ट चे न्यायाधीश श्री अमित कोकाटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले  या प्रसंगी संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे संचालक संतोष पाठक व प्रशिक्षक महेंद्र देशमुख, परेश हिंदुराव, मंगेश ब्रिड व आदी मान्यवर उपस्थित होते.


ही स्पर्धा 24 जानेवारी ते मार्च 15  पर्यंत संतोष स्पोर्ट्स क्रिकेट अकॅडमीचे क्रीडांगण, डॉन बॉस्को शाळे जवळ आधारवाडी कल्याण  येथे चालणार असून या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील टॉप 16 संघांना प्रवेश देण्यात आलेला आहे.
गेल्या चार वर्षापासून ठाणे जिल्ह्यामध्ये 10 वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून या स्पर्धेमधून छोट्या मुलांना क्रिकेटमध्ये वाव मिळावा तसेच छोट्या खेळाडूंनी क्रिकेटमध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले..असे स्पोर्ट्स केअर फाउंडेशन चे सचिव अविनाश सर यांनी सागितले..

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !!

सार्वजनिक वाचनालय कल्याण आयोजित बालशिबिराचा शुभारंभ !! कल्याण, प्रतिनिधी : मुलांच्या संस्कारक्षम वयातच वाचन संस्कारासोबत इतर संस...