Sunday 24 January 2021

नांदेडमधील कामेश्र्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर !

नांदेडमधील कामेश्र्वर वाघमारेला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर !


नांदेड : जिल्ह्यातील घोडजच्या कामेश्वर वाघमारे या शाळकरी मुलाला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. शासनाकडून दिला जाणारा हा पुरस्कार 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी ऑनलाइन कामेश्वरला देण्यात येणार आहे. कंधार तालुक्यातील घोडज गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण कामेश्वर वाघमारे या आठवीत शिकणाऱ्या मुलाने वाचवले होते. त्याच्या याच शौर्यासाठी त्याला शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

आपल्या जीवाची पर्वा न करता कामेश्वरने नदीतच्या पाण्यात उडी घेऊन बुडणाऱ्या दोन बालकांचे प्राण वाचवले. गावालगत वाहणाऱ्या नदी पात्रात दुपारच्या वेळेत तीन बालक बुडत असतांना कामेश्वरने पाहिलं. पाहताच क्षणी पाण्यात उडी घेऊन त्याने जिवाच्या अकांताने दोघांना बाहेर काढले. परंतु एका मुलाला वाचवण्यात तो अयशस्वी राहिला, त्याला न वाचवू शकल्याची खंत मात्र कामेश्वरच्या मनात सदैव असल्याचं त्यानं सांगितलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्यासाठी महत्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल शासनाकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. कंधार तालुक्यातील घोडज येथे या वर्षीच्या पावसाळ्यात पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या दोन बालकांचे प्राण इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कामेश्वर वाघमारे याने वाचविले आहेत.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...