Saturday 31 July 2021

डॉ.दीपक म्हैसकर लिखित 'कोविड मुक्तीचा मार्ग' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन !

डॉ.दीपक म्हैसकर लिखित 'कोविड मुक्तीचा मार्ग' पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन !


मुंबई - निवृत्त विभागीय आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांचे सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी कोरोना काळातील सर्व वाटचालीचे संकलन करून लिहिलेल्या ‘कोविड मुक्तीचा मार्ग’ या पुस्तकाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

याप्रसंगी मुख्यमंत्री म्हणाले की, गेले दीड-पावणेदोन वर्षांपासून आपण सर्वजण कोविडचा मुकाबला करतो आहोत. या सगळ्या प्रवासात आपण वेगवेगळ्या समस्यांना तोंड दिले, वेगवेगळी आव्हाने स्वीकारली, अनेक पावले उचलली. आज दुसऱ्या लाटेचा मुकाबला करत असताना तिसऱ्या संभाव्य लाटेची पण शक्यता आहे, अशा वेळी आपल्या सर्व अनुभवांचे संकलन आवश्यक आहे.

जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढीला आपण या संकटाचा मुकाबला कसा केला त्या विषयी विस्तृत माहिती मिळू शकेल.

कोविडच्या विषाणूमध्ये देखील उत्परिवर्तन होत आहे, आणि या विषाणूंच्या नवीन नवीन अवतारामुळे जगामध्ये आव्हाने उभी राहिली आहेत. आज आपल्या आजूबाजूच्या देशांमध्ये देखील परत एकदा संसर्ग वाढताना दिसतो आहे. कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्यांना देखील संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे आपल्याला खूप सावध राहावे लागेल आणि आरोग्याच्या नियमांचे चांगले पालन देखील करावे लागणार आहे.

या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना कोरोनाविषयक कामासाठी पुढील चांगली दिशा मिळेल, अशी आशा देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

सेवानिवृत्तीनंतर देखील स्वस्थ न बसता राज्य शासनाला या कोरोना संकटांमध्ये मदत करण्याच्या डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या वृत्तीचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी कौतुक केले. प्रारंभी डॉ. म्हैसेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात कोविड मुक्तीचा मार्ग हे पुस्तक लिहिण्यामागचा हेतू सांगितला.

राज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा व मुंबईतील पत्रकारांना लोकल प्रवास खुला करावा या मागण्यांसाठी -- मुंबई मराठी पत्रकार संघाची; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

राज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा व मुंबईतील पत्रकारांना लोकल प्रवास खुला करावा या मागण्यांसाठी --

मुंबई मराठी पत्रकार संघाची; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल


मुंबई, शनिवार : राज्यातील पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा, त्यांना फ्रंटलाईन वर्कर्सचा दर्जा द्यावा आणि मुंबईतील पत्रकारांना लोकल प्रवास खुला करावा या मागण्यांसाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री. नरेंद्र वि. वाबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. 
या संदर्भात दि. 30 जून 2021 रोजी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबई मराठी पत्रकार संघाने न्यायालयात जाण्याचा इशारा शासनाला दिला होता. पत्रकारांचा अत्यावश्यक सेवांमध्ये समावेश करावा, त्यासाठी त्यांच्या आस्थापनाचे अथवा मुंबई मराठी पत्रकार संघाचे ओळखपत्र ग्राह्य धरावे, क्युआर कोड असलेल्या युनिव्हर्सल ट्रॅवल पास सिस्टममध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून मुंबईतील पत्रकारांचा आणि पत्रकारितेतर कर्मचाऱ्यांचा समावेश करावा, पत्रकारांना लोकल रेल्वेतून फिरण्याची मूभा मिळावी आदी मागण्या या पत्रात करण्यात आल्या होत्या. पत्रकारांच्या या विविध मागण्यांसाठी दि. 22 डिसेंबर 2020 पासून सातत्याने पत्रकार संघ प्रयत्न करीत असून मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात वारंवार पत्र व्यवहारही केला आहे. मात्र आपल्या एकाही पत्राची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली नसल्याचे या पत्रात मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. 
पत्रकारांच्या न्याय्य मागण्या 7 जुलै 2021 पर्यंत राज्य सरकारने मान्य न केल्यास मुंबई उच्च न्यायालयात अथवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार श्री. वाबळे यांनी या पत्रात व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर आज मुंबई मराठी पत्रकार संघाने मुंबई उच्च न्यायालयात राज्यातील तमाम पत्रकारांच्या वतीने जनहित याचीका दाखल केली. या याचिकेचे कामकाज पाहण्याची जबाबदारी संघाचे मानद विधी सल्लागार डॉ. अ‌ॅड.निलेश पावसकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. 
 
प्रसिद्ध साठी                                              
विष्णू सोनवणे 
कार्यवाह

कल्याण ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच.. विधुत कार्यालयावर धडकले विध्यार्थी व नवतरुण.. वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून ऊर्जा मंत्र्यांना साकडे...

कल्याण ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरूच..
विधुत कार्यालयावर धडकले विध्यार्थी व नवतरुण..
वीज पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून ऊर्जा मंत्र्यांना साकडे...                      


टिटवाळा, उमेश जाधव -: कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात सध्या वारंवार विधुत पुरवठा खंडित होत असुन, ग्रामीण भागातील जनता कमालीची त्रस्त झाली आहे. या कोरोना महामारीमुळे सर्व नागरिक घरीच असून वर्क फ्रॉर्म होम,(घरूनच काम करतात) तसेच शालेय विध्यार्थी व तरुण वर्ग, शिक्षक, नागरिक ऑफिसचे कामे ऑनलाईन पद्धतीने करतांनाचे चित्र सर्वत्र दिसत आहे. 


असे असतानाही तालुक्याच्या काही भातात दोन ते तीन दिवस वीज गायब असते तर, काही ठिकाणी वारंवार वीज पुरवठा खंडित होत असतो. त्यामुळे आमचे खुप नुकसान होत आहे. ग्रामीण भागात नेहमीच विद्युत पुरवठा मोठ्या प्रमाणात खंडित होतो. या कारणास्तव अत्यावश्यक सेवेतीळ दुकानें, हॉस्पिटल, पाणी पुरवठा योजना यांवर या मोठा परिणाम होत आहे. पावसाळ्यात घरासभोताली साप, विंचू व इतर विषारी प्राणी निघत असून, जीव मुठीत धरून नागरिकांना जिवन जगावे लागते.


लहान मुळे, वृद्ध आजारी माणसे ही लाईट नसल्याने रात्र भर झोपत नसून त्यांच्या आरोग्यवर देखील याचा परिणाम होत आहे. या सर्व मागण्यासाठी ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य व मुख्य कार्यकारी अभियंता कल्याण, विद्युत कार्यालाय मांडा टिटवाळा, कल्याण ग्रामीणचे उप कार्यकारी अभियंता धिरजकुमार धुवे यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. यावेळी कल्याण ग्रामीणचे राष्ट्रवादी काँगेस पार्टीचे सरचिटणीस राम सुरोशी, उपध्यक्ष विलासजी सोनावले, रायते ग्रामपंचायत उपसरपंच हरेश पवार, ग्रामपंचायत सदस्या वैशाली पवार, ओबीसी सेलचे पदाधिकारी भगवान पवार, मनोज कोर, शरद पवार, श्रीकांत तारमळे, अनिकेत सोनावले, प्रयाग सोनावले, करण सोनावले, प्रणय सोनावले,भांवेश सोनावले, शालेय विध्यार्थी पार्थ सुरोशी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

पुरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली भामटे व समाजकंटक सक्रिय !

पुरग्रस्तांना मदत करण्याच्या नावाखाली भामटे व समाजकंटक सक्रिय !

ठाणे : कोणतीही आपत्ती कोसळली की, ज्याप्रमाणे दानशूर व्यक्ती, संस्था पुढे येऊन सढळ हस्ते मदत करतात, त्याचप्रमाणे काही भामटे, समाजकंटक या परिस्थितीचाही पुरेपूर गैरफायदा घेतात. राज्यात आलेल्या महापुरामुळे काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले असून त्यांना मदत करण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना फसविले जात आहे. विविध संस्थांच्या नावे समाजमाध्यमांवर जाहिराती करून मदत वस्तू आणि पैशाच्या स्वरूपात स्वीकारली जात असल्याने महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

पुरामध्ये झालेली जीवितहानी आणि वित्तहानी याबाबतचे फोटो आणि त्यासोबत सामाजिक संस्थांच्या नावाचा वापर करून वस्तू आणि पैसे स्वीकारले जात आहेत. काही संस्थांच्या नावाचे प्रोफाइल तयार करून ती संस्था आपणच चालवीत असल्याचे भासविले जात आहे. विशेष म्हणजे, यामध्ये पैसे ऑनलाइन स्वीकारण्यासाठी संस्थांच्या ऐवजी वैयक्तिक खात्याचा तपशील दिला जात असल्याचे दिसून आले आहे.

पोलिसांनी केलेले आवाहन :- 
१) समाजमाध्यमांवर, इंटनेटरवरील खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.

२) कुणाच्याही प्रोफाइलवर, लिंक वर क्लिक करू नका.

३) मदत करण्यापूर्वी संस्था अधिकृत असल्याची खात्री करा.

४) शहानिशा केल्याविना समाजमाध्यमांवर मदतीचे संदेश व्हायरल करू नका.

५) ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करताना बँक खाते, डेबिट कार्डचा तपशील देऊ नका.

६) फसवणूक झाल्यास किंवा शंका आल्यास स्थानिक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे किंवा येथे www.cybercrime.gov.in तक्रार नोंदवा

समाजहितासाठी झटणारा कार्यकर्ता- 'शरद भावे' महाराष्ट्र शासनातर्फे विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती !

समाजहितासाठी झटणारा कार्यकर्ता- 'शरद भावे' 

महाराष्ट्र शासनातर्फे विशेष कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती !



     
        रत्नागिरी जिल्हातील दापोली  तालुक्यातील मु.शिरसेश्वर येथील सुपूत्र मुंबई येथे वास्तव्यास असणारे समाजसेवक 'शरद लक्ष्मण भावे' अतिशय दिलदार, निस्वार्थी, कष्टाळू, भितभाषी, मनमिळावू  आहेत. दापोली तसेच कुणबी समाजामध्ये ते लोकप्रिय आहेत. अशा सर्वगुणसंपन्न, प्रतिभाशाली गरजवंतांच्या हाकेला घरच्या माणसासारखा धावून जाणारा जनसेवक, विशेष कार्यकारी अधिकारी शरद भावे म्हणजे एक आदर्शवत जीवन मानावे लागेल. अशा या प्रसिद्धी पासून दूर राहिलेल्या चैतन्यमय व्यक्तिमत्त्वाच्या कार्याचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रमाणित प्रयत्न ....]

          दापोली तालुक्यातील निसर्गरम्य पर्यटकांसाठी सुप्रसिद्ध असलेले शिरसेश्वर गावातील  'शरद भावे' यांची ओळख खरं तर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विक्रोळी -घाटकोपर यांच्या होणाऱ्या अनेक कार्यक्रमांमुळे झाली. शरद भावे यांच्या सहवासाने आम्हाला खूप चांगल्या  माणसांचा सहवास लाभला हे विसरुन  चालणार नाही. शरद भावे यांचे कार्य सर्वसामान्यनांना न्याय/हक्क मिळाला म्हणून असुन हजारो नागरिक त्यांच्या सेवेचा लाभ घेत आहेत. महाराष्ट्र शासनाने त्यांची नुकतीच विशेष कार्यकारी अधिकारी (एस.ई.ओ) म्हणून नेमणूक जिल्हा अधिकारी मुंबई उपनगरतर्फे (अनु.क्र.४४२५)[नोंदणी क्र.२०१९/२३/६०८१९५४५१२३१/०३] नेमणूक पत्र व ओळखपत्र देऊन केली आहे. त्यांची ही नेमणूक दि.१९/४/२०२४ पर्यंत आहे.

             शरद भावे यांचा जन्म शिरसेश्वर येथे १/६/१९६९ रोजी झाला. शरद भावे लहान पणापासूनच शिक्षण, सामाजिक ,सांस्कृतिक ,क्रिडा या क्षेत्रात हुशार होते. खेळातून, अभ्यासातून तर शाळेत शिक्षक, विद्यार्थीवर्गाचा आवडता होते. प्राथमिक/माध्यमिक शिक्षण गावी करुन त्यांनी महाराष्ट्र ज्युनिअर काँलेज दादर या काँलेजमधून १२ वी(काँमर्स) पर्यंतचे शिक्षण घेऊन नोकरी पत्करली. मुंबईत असतानाही शरद भावे यांना ग्रामीण भागातील समस्या जाणवत होत्या. त्यामध्ये बेकारी, स्थानिक महिलांना रोजगार, शिक्षणाची होणारी गैरसोय इ.बाबींचा समावेश होता. त्यासाठी काहीतरी करण्याची भावे यांची धडपड आहे. भावे कै.सौ. सावित्रीबाई भागोजी निमदे सहकारी पतसंस्था (मर्याका.), कै.सौ.सावित्रीबाई भागोजी निमदे चँरिटेबल ट्रस्ट (रजि.), शिरसेश्वर ग्रामविकास मंडळ(रजि.) मुंबईचे सरचिटणीस तर कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा दापोली, शिवाजी स्पोटर्स क्लब(रजि.) मुंबई, लोकसेवा सहकारी संस्था मर्यादित ,भोलेनाथ तरुण उत्साही मंडळ (रजि.) मुंबईचे अध्यक्ष पदी कार्यरत आहेत. आपण ज्या समाजात आपण जन्म घेतला त्या समाजाचे आपण काही तरी देणं लागतो याचे भान शरद भावे  यांना आहे.त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. समाजाची सेवा करणे हे जणू काही आपले आद्य कर्तव्य ठरावे, समाजाची सेवा करण्याचे भाग्य प्रत्येकाच्या नशिबी असते असे नाही.पण भावे  यांना कुणबी सामाज यांच्या माध्यमातून  लाभले. गेली ३० वर्षे ते शैक्षणिक ,कला, क्रिडा, सांस्कृतिक, पर्यावरण या क्षेत्रात कार्यरत आहेत. उपरोक्त संघटनांमध्ये त्यांनी कार्याध्यक्ष, सचिव अशी महत्त्वाची पदे भूषवली आहेत. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन /नियोजन करणे भावे यांना खूप चांगले जमते. भावे यांनी लोकसेवा सहकारी संस्था मर्यादित स्थापन करुन मुंबईसह कोकणात समाजसेवेला सुरुवात केली. घाटकोपर पश्चिम विभागातील भीमनगर भागात (वार्ड क्र.१२७) वास्तव्यास असून कोणत्याही सरकारी पदावर नसतानाही विभागातील गरजूंच्या हाकेला घरच्यांसारखे धावत जाऊन होईल तितकी मदत करतात. विभागातील लोकांना भेडसावणा-या समस्येबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करुन सातात्याने पाठपुरावा करतात. ती समस्या जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यत भावे शांत बसत नाहीत. घाटकोपर विभागांमध्ये रिक्षाचालकांकडून दादागिरी केली जाते. शिवाय भीमनगर व डोंगराळ परिसरात ये-जा करण्यास रिक्षाचालक तयार नसतात. त्यामुळे या विभागातील शालेय विद्यार्थीवर्ग, अपंग, जेष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच आजारी व्यक्तीला खूपच त्रास सहन करावा लागत होता. त्याला पर्याय म्हणून शरद भावे यांनी लोकसेवा सहकारी संस्था मर्यादित तर्फे घाटकोपर स्टेशन ते भीमनगर; भट्टवाडी मार्गे पुन्हा घाटकोपर स्टेशन अशी सकाळ -संध्याकाळ चार-चार तास विभागातील नागरिकांसाठी मोफत टँक्शी सेवा उपलब्ध केली होती. या मोफत प्रवास योजनेचा हजारो नागरिक आज लाभ घेतला. मनसे स्थापनेपासून ते मनसेचे सक्रीय पदाधिकारी आहेत. मनपा वार्ड क्र.१२७ चे शाखाध्यक्ष तर सहा प्रभागात जनहित विभागाच्या संघटक पदी काम भावे यांनी संभाळले आहे. मुंबईसह दापोली येथे अनेक लोकप्रतिनिधींना निवडणूकीत मदत करत विजयी केले आहे. घाटकोपर परिसरात २५ ठिकाणी मोफत वायफाय सेवा, अनेकदा दुष्काळग्रस्तांना मदत, विदर्भातील एका शेतकरी कुटूंबीयांना झी २४ तास च्या आवाहनाला प्रतिसाद देत एक लाखाची मदत, कोकणातील मुंबईकरांना गणेशोत्सव काळात सुखाचा प्रवास व्हावा म्हणून ना नफा-ना तोटा तत्वावर १० गाड्यांची सोय, नागरिकांना वाचनाची आवड निर्माण व्हावी/त्यांना घडामोडी समजाव्यात म्हणून अनेक वाचनालयांना वर्तमानपत्र देणे, शिवजयंती/ साईभंडारा/ डाँ.आंबेडकर जयंती/डाँ.आंबेडकर महापरिनिर्वान दिनानिमित मोफत पाणी/नास्ता वापट, आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन विविध आरोग्य शिबिरे/रक्तदान शिबिराचे आयोजन, विविध क्रिडा स्पर्धेचे आयोजन, विभागातील महिलांचे छोटे -मोठे बचत गट तयार करुन त्यांच्या कुटूंबीयांच्या सक्षम अर्थकारणाला हातभार लागावा म्हणून विशेष सहकार्य, जेष्ठ नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचे लाभ मिळावेत म्हणून जेष्ठ नागरिक ओळखपत्र वाटप, अपगांना स्वःताच्या पायावर उभे करण्यासाठी अपंग स्टाँल वाटप, घराडी-मंडणगड येथील स्नेहज्योती अंध निवासी विद्यालाय येथे विद्यार्थीवर्गाला शैक्षणिक साहित्याचे वाटप, त्यांच्या "बाल महोत्सव" ला ५००० बालगोपालांनी हजेरी लावत उत्स्फुर्त प्रतिसाद दिला होता. कोविड-१९ कालावधीत शरद भावे यांनी घाटकोपर पोलीस ठाणे अंतर्गत उल्लेखनीय काम करत घाबरलेल्या नागरिकांना योग्य मार्गदर्शन करत आवश्यक त्या उपाययोजनाही अंमलात आणल्या. अनेक संस्था, मंडळव प्रसार माध्यमे यांच्यातर्फे त्यांना "कोविड योध्दा" म्हणून  पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
               समाजसेवा हीच ईश्वर सेवा मानून भावे  जमेल तशी जनसेवा करत आहेत.गावांमध्ये विकासात्मक गोष्टींना चालना देणे,आजारी व्यक्तीला उपचारासाठी योग्य  मार्ग दाखवणे,क्रिडा स्पर्धाचे आयोजन करुन स्वतः  सहभागी  होणे,आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन इ.मध्ये शरद भावे कायम सहभाग घेऊन तो कार्यक्रम यशस्वी करतात.समाजकार्यात सहभागी होताना कुटुंबाकडे थोडे दुर्लक्ष होत असले तरी पत्नी,मुले व मित्रपरिवार त्यांना समजून घेत त्यांच्या या जनसेवेला हातभार लावतात.
          कधीही न थकता हसत मुखाने काम करणे हे शरद भावे यांचे वैशिष्ट्य आहे. हसरा व प्रसन्न चेहरा, निःस्वार्थी, निगर्वी आणि सदैव मदतीला तयार असणारे 'शरद भावे' सर्वांनाच आवडतात. कारण नागरी समस्या सोडवणे व लोकोपयोगी उपक्रम राबविणे यासाठी ते विभागात जास्त परिचित आहेत. प्रसंगी सनदशीर/संसदीय मार्गाने लढे देऊन कारवायांना यशस्वीरित्या तोंड देत लोकांच्या अडीअडचणींवर उपाय शोधत ती समस्या मार्गी लावतात. विभागांमध्ये होणारे अपघातांची संख्या लक्षात घेऊन गतीरोधक बसवून घेतले तर ठिकठिकाणच्या कच-याच्या समस्यांवर मात करण्यासाठी स्वःता हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली. डास-मलेरिया  बचाव होण्यासाठी प्रतिबंधक धूरफवारणी नियमित सुरु केली. रस्त्याची दुरावस्था बघून तात्काळ ते खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करुन ते खड्डे बुजवून घेतले. आजवर यशस्वी झालेल्या समाजसेवकांकडून प्रेरणा घेत अनेकदा त्यांचे कौतुक करतात. अभ्यंग सर त्यांचे आदर्श आहेत. त्यांच्याकडूनच सामाजसेवेच्या व्रताची प्रेरणा मिळाली असे भावे सांगतात. आजच्या वेळेला एक व्यक्ती आपल्या बरोबरच्या व्यक्तीचे गुण गाताना फारसे दिसत नाहीत. पण भावे याला अपवाद आहेत. ते सहकारीवर्गाला नेहमी सांगतात की, ध्येय, तत्त्व ,नियोजन, चिकाटी, सहनशीलता, स्वाभिमान याच्याबरोबर कोणतेही काम करण्याची तयारी ठेवल्यास आत्मविश्वास आपोआप येतो.जे-जे लोक निःस्वार्थी भावनेने काम करतात तसेच काम मलाही करायचे असल्याचे भावे कायम सांगतात. त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांना पुरस्कार /सन्मानचिन्ह/सन्मानपत्र देऊन गौरव केलेला आहे.
               प्रत्येक क्षेत्र असे असते तेथे निःस्वार्थी सेवा करणारी माणसे लागतात. जी आजच्याघडीला दुर्मिळ झालेली आहेत. आणि मग 'शरद भावे' यांच्यासारखी माणसे लाभली की त्यांच्या वेळेचा उपयोग सामाजिक संघटनेसाठी करुन घ्यावा व आपली संघटना सर्वांनच्या सहकार्याने मजबूत उभी रहावी असे वाटते. म्हणूनच त्यांच्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची पोचपावती देत महाराष्ट्र शासनाने त्यांची विशेष कार्यकारी अधिकारी पदी (S.E.O) म्हणून दि.१९/४/२०२४ पर्यंत नियुक्ती करत गौरवच केला आहे. अनेक मार्गदर्शन करणारी माणसं, माझे नातेवाईकांकडून मिळालेल्या भरभरुन प्रेम व मार्गदर्शन यामुळेच ही जनसेवा करण्याचा मार्ग सापडला असे भावे आपल्या मित्रपरिवार यांना सांगतात. आम्ही सामाजिक भान असलेल्या या शरद भावे यांचे कार्य पाहून इतकेच म्हणू इच्छितो की,

सूर्याचे तेज येऊ द्या, तुमच्या कर्तृत्वात
चंद्राची शितलता, बहरावी स्वभावात 
कस्तुरीचा सुगंध, दरवळावा सहवासात 
मकरंदाचे माधुर्य, असावे मुखात.
शरद भावे या समाजकार्यकर्त्यास, विशेष कार्यकारी अधिकारी या सेवेसह पुढील वाटचालीत हार्दिक शुभेच्छा...!

शांताराम गुडेकर 
पार्क साईट
विक्रोळी (प.)
भ्रमणध्वनी-९८२०७९३७५९

नाथा शेवाळे यांची जनता दल (से) च्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड !

नाथा शेवाळे यांची जनता दल (से) च्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
        महाराष्ट्र प्रदेश जनता दल(सेक्युलर) युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांची त्याच्या कार्याची दखल घेऊन माजी पंतप्रधान व राष्ट्रीय अध्यक्ष एच.डी.देवेगौडा यांनी जनता दलाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड केली असून त्याच्या स्वाक्षरीने पत्र त्यांना दिल्ली येथील निवासस्थानी देण्यात आले आहे.

 श्री शेवाळे हे जनता दलाचे गेली २५ वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्याची राज्यभर ओळख आहे. ते यापूर्वी प्रदेश जनता दलाचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.त्यावेळी त्यांनी राज्यभर युवकांच्या प्रश्नाबाबत आवाज उठविला असून शेतकरी पेंशन संबंधी यात्रा काढली. शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्यांक, आदिवासी, प्रकल्पग्रस्त या घटकासाठी त्यांनी अनेक लढे उभारले आहेत. त्याच्या या निवडीने महाराष्ट्रातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निश्चित फायदा होणार असल्याने राज्यभरात कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष प्रा.शरद पाटील, प्रधान सचिव प्रताप होगाडे, राष्टीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव पी डी जोशी, अजमल खान, ऍड रेवन भोसले, तसेच मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, संजीवकुमार सदानंद, किरण छिद्रवाल, सुहास बने, किरण शेठ, ज्योती बडेकर, भगवान साळवी आदी पदाधिकारी आणि इतर सामाजिक संघटनांकडून प्रत्यक्ष भेटून, फोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन होत आहे.

चिमुकल्यांना हवा मदतीचा हात: सोशल मिडियावरील अवाहानला तरुणाचा प्रतिसाद !

चिमुकल्यांना हवा मदतीचा हात: सोशल मिडियावरील अवाहानला तरुणाचा प्रतिसाद !


विक्रमगड, अमोल सांबरे (वार्ताहर) : एखाद्या कुटुंबातील कर्ता, कमावता पुरुष अचानक निधन पावला गेल्यावर त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या मुलांचा आधार तुटतो. प्रसंगी त्या कुटुंबाची वाताहत होत असते. अशा कुटुंबाला वेळीतच सावरून आधार आणि मदतीची गरज असते. त्यांना धीर देणे, मदतीचा आधार देणारे समाजातील कोणीच पुढे येत नाही, त्यावेळी असे कुटुंबातील मुलांची दुर्दशा होते. अशी अवस्था चिमणी-पाखर या मराठी चित्रपटातील कथा प्रेक्षकाच्या मनाला चटका लावून गेली. तशीच घटना विक्रमगड तालुक्यातील मुहु रडेपाडा येथे घडली आहे.


   एका कुटुंबाची जबाबदारी असलेल्या घरातील कर्ता असलेला रवींद्र लहाणु रडे या कर्ता पुरुषाचा पाच वर्षापूर्वी मृत्यू झाला, त्यातच आई ही काही वर्षापुर्वी अचानक सोडून गेलेली. अशा अवस्थेत घरात कुणीही कर्ता आणि जबाबदार व्यक्ती नसल्याने दोन लहांग्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
1) रुपेश रवींद्र रडे -वय-14,
2)रोहन रवींद्र रडे- वय-7,
अशी ही चिमुकल्यांची नावे आहेत.

   वडिलांचे पाच वर्षा पुर्वी निधन झाले, त्याचे वडील रवींद्र लहाणु रडे हे मोलमजुरीचे काम करून या चिमुकल्यांची जबाबदारी व देखभाल करत संसाराचा गाड़ा हाकत चिमुकल्याना शिक्षण देत होते. परतुं पाच वर्षांपुर्वी वडीलांचे निधन झाल्याने व त्यातच पतीचे निधन झाल्यानंतर आई ही मानसिक ताणावातुन चिमुकल्यांना सोडून गेल्याने हे चिमुकली आता उघड़यावर पडली आहेत.  या चिमुकल्यांमध्ये कुणीही कमावता नसल्याने पुढील उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

   घरात आजोबा आहेत, त्यांचे वय ७० वर्ष असल्याने ते ही पूर्णतः थकुन गेल्याने मोलमजुरी करू शकत नाहीत.  तात्पुरता स्वरूपात शेजारी असलेले देखभाल करत असुन. या अनाथांच्या करूण कहाणीची चर्चा सध्या विक्रमगड तालुक्यातील महिला वर्गात सुरु असुन चिमुकल्याची कहाणी ऐकुन अनेकांची हृदय पिलवटुन टाकत आहेत. 

    रवींद्र लहानु रडे हा कर्ता पुरुष गेल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. ते मोल-मजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते. या कुटुंबात कोणी कर्ता नसल्याने या कुटुंबाची वाताहत सुरू झाली आहे. त्यातच लहान वयात मुलांचे शिक्षण आणि इतर खर्चासाठी मोलमजुरी शिवाय कोणताच पर्याय उरला नाही..

सोशल मिडियाचा आवाहनाला तरुणांचा प्रतिसाद: -
     घरात कर्ता कोणी नसल्याने कुटुंबाची वाताहत झाल्याने चिमुकल्याना मदतीची गरज असल्याचे ओळखून आणि आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भूमिकेतून शेजारीच राहणारे योगेश रडे या तरुणाने सोशल मीडियाद्वारे मदतीचे आवाहन केले होते, त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील ओंदे गावातील "विक्रांत युवा मित्र मंडळाच्या" तरुणांनी त्यांचा ग्रुप सदस्य रोहित सांबरे याचा वाढदिवस साजरा न करता त्या रक्कमेतुन तातडीने त्यांना एक महीने पुरेल एवढे धान्य, जीवनाश्मक वस्तु डाळ, तांदूळ, तेल, साखर, चहा-पावडर, कडधान्य, अशा अन्य वस्तुंची मदत करत त्यांना सुपुर्द केले.
 या वेळी संजय भगत, रंजित सांबरे, सिद्धार्थ सांबरे, अक्षय सांबरे, विक्रांत सांबरे, सौरभ सांबरे यांनी "विक्रांत युवा मित्र मंडळाच्या" माध्यमातून हा मदतीचा हात देण्यात आला. 
          
ज्ञानाचा दीप उजळावा व पुढील भविष्यासाठी मदतीची गरज:
       प्रत्येकाच्या जीवनात ज्ञानाचा दिवा पेटल्याशिवाय अज्ञान आणि गरिबीचा अंधार दूर होत नाही. अशा वेळी कुटुंबाचा आधार असलेले मजुरी करुन कुटुंबाचा गुजराना करणारे वडिल निधन पावल्याने व त्यातच जवळचे नातेवाईक नसल्याने शेजारीच त्यांचे देखभाल करत आहेत.
1) रुपेश रवींद्र रडे -वय-14,
2)रोहन रवींद्र रडे- वय-7
या लाहांग्याच्या शिक्षणाचा व पुढील भविष्याचा प्रश्न निर्माण झाला असुन यासाठी समोर उभ्या असणाऱ्या आर्थिक अडचणींचा डोंगर पार करण्यासाठी त्याना दानशूर व सामाजिक कार्यकर्त्यांचा आधार हवा आहे. एका आशेचा, ज्ञानाचा दीप उजळावा, व पुढील भविष्यासाठी या अनाथ लहांग्याना मदतीची गरज आहे. या अनाथ व निराधार विद्यार्थ्यांना मदत करायची असेल तर "विक्रांत युवा मित्र मंडळाचे" सिद्धार्थ सांबरे-  9765825454 व अमोल सांबरे-9270266696 या नंबर वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विक्रमगड वार्ताहर-अमोल सांबरे

फोटो-1) सोशल मिडियाच्या आवाहनाला प्रतिसाद देत "विक्रांत युवा मित्र मंडळाच्या" तरुणानी त्यांचा ग्रुप सदस्य रोहित सांबरे याचा वाढदिवस साजरा न करता त्या रकमेची अनाथ चिमुकल्याना मदत करताना विक्रांत युवा मित्र मंडळाचे सदस्य

एकाच वेळी मंत्रालयातील 103 सहाय्यक कक्षाधिकाऱ्यांच्या बदल्या.!

एकाच वेळी मंत्रालयातील 103 सहाय्यक कक्षाधिकाऱ्यांच्या बदल्या.!


भिवंडी,दिं,31अरुण पाटील (कोपर) :
           फोन टॅप प्रकरणातील गोपनिय माहिती विरोधी पक्षाच्या हाती लागल्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अधिकाऱ्यांच्या बदल्याचा धडका लावला आहे. आता मंत्रालयात तब्बल 103 सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या करून सरकारी बाबूंना चांगलाच दणका दिला आहे. तसंच, या आदेशा विरोधात भूमिका घेतल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबई पोलीस दल आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरूच आहे. आता राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातोय तेथील अधिकाऱ्यांची उलबांगडी करण्यात आली आहे.
         मंत्रालयामध्ये एकाच वेळी 103 सहायक कक्ष अधिकारी यांच्या बदल्या करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.  एकाच संयुक्त आदेशाने बदल्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे.  या आदेशामुळे अधिकारी वर्गामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. गृह, सामान्य प्रशासन, उद्योग, शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना या आदेशामुळे मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे, हे आदेश कार्यमुक्तीचे आदेश असून त्याबद्दल संबंधित विभागाला दुसरे आदेश काढण्याची आवश्यकता नाही.
                   सदरील कर्मचाऱ्यांना २ ऑगस्ट २०२१ रोजी बदलीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे. जर अधिकारी रूजू झाल्याचे दिसून आले नाही तर त्यांच्या विरोधात शासन निर्णय २३ डिसेंबर २०१६ शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येईल. बदली झालेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी जर बदली रद्द करणे, शिफारस करणे, दबावासाठी पत्र जोडल्यास त्यांची ही कृती गैरवर्तणूक समजली जाईल आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराच देण्यात आला आहे.
         तसंच, आहरण व संवितरण अधिकारी, अधिदान व लेखाधिकारी यांना कळविण्यात येते की, उपरोक्त कर्मचाऱ्यांचे २ ऑगस्ट २०२१ पासूनचे वेतन कोणत्याही परिस्थितीत पूर्वीच्या विधातून अदा करण्यात येऊ नये अन्यथा त्यांना व्यक्तीश: जबाबदार धरण्यात येईल, अशी कडक सूचनाही देण्यात आली आहे. ज्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची बदली झाली आहे, तिथे रूजु  झाल्यावर तातडीने माहिती सामन्य प्रशासन विभागाला त्वरीत सादर करावी लागणार आहे.

Friday 30 July 2021

शेकापचे ज्येष्ठ नेते मा. आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन!

शेकापचे ज्येष्ठ नेते मा. आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन!



पुणे : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं आज निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज रात्री ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र तेव्हापासूनचं देशमुख यांच्या प्रकृतीत सतत चढ- उतार होत होते. मात्र आज त्यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. आबासाहेब देशमुख यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आत्तापर्यंत चांगली होती. पण आज रात्री ९ वाजता आबासाहेबांचं निधन झालं.'

१० ऑगस्ट १९२६ ला त्यांचा जन्म झाला होता. १९६२ ला त्यांनी सांगोल्यातून सर्वात प्रथम निवडणूक लढवली. त्यानंतर पुढे ते ११ वेळा आमदार झाले. सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. आबा या नावाने ते सगळ्या महाराष्ट्रात परिचित होते. गणपतराव देशमुख यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यापासूनच ते शेतकरी कामगार पक्षातच होते. 

मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्यांवर २१ हजार कोटींहून अधिक खर्च !

मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्यांवर २१ हजार कोटींहून अधिक खर्च !


मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनाकडून गेल्या २१ वर्षांत शहरातील रस्तेबांधणीसाठी तब्बल २१ हजार कोटींहून अधिकचा निधी खर्च झाल्याची धक्कादायक माहिती खुद्द महापालिका प्रशासनानेच दिली आहे. रस्त्यांवर झालेल्या खर्चाची माहिती प्राप्त करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या एका माहिती अधिकार याचिकेवर उत्तर देताना महापालिका प्रशासनाने ही माहिती दिली आहे.

मात्र, शहरातील रस्त्यांची सद्यःस्थिती, दयनीय आणि बिकट अवस्था बघता हजारो कोटींचा हा निधी गेला कुठे? हा सवाल आता सर्वसामान्य मुंबईकर विचारू लागला आहे. मान्सूनची सुरुवात होताच मुंबईत पाणी साचणे आणि रस्त्यांवर खड्ड्यांच्या समस्यामुळे वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईची हीच अवस्था असूनच खड्डे आणि पाणी भरण्याच्या समस्येवर महापालिका प्रशासनाला अद्यापही कुठलीही ठोस उपाययोजना करता आलेली नाही. त्यामुळे दर पावसाळ्यात होणारी शहराची अवस्था पाहता महापालिकेने खर्च केलेले सर्वसामान्यांचे पैसे गेले कुठे? हा प्रश्न उभा राहिला आहे.

भाजप आमदार अमित साटम यांनी दाखल केलेल्या याचिकेवर महापालिकेने या खर्चावर स्पष्टीकरण दिले आहे. १९९७ ते २०२१पर्यंत महापालिकेने रस्ते दुरुस्ती, बांधकामासाठी आणि रस्त्यांवरून खड्डे भरण्यासाठी २१ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. २०१३ ते २०१४ या एका वर्षात सर्वाधिक म्हणजे ३.२०१ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला.

आतापर्यंत अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. मागील अनेक वर्षांपासून मुंबईच्या रस्त्यांवर अनेक निवडणुका पार पडल्या, अनेक वेळा आश्वासने दिली गेली, टीका-टिप्पणी केली गेली, तरी अद्याप गेल्या अनेक वर्षांत खड्ड्यांचा विषय काही संपू शकलेला नाही, हे वास्तव आहे.

पुरग्रस्त भागात वीजबिल वसुलीला स्थगिती ! उर्जामंत्री नितीन राऊत...

पुरग्रस्त भागात वीजबिल वसुलीला स्थगिती ! उर्जामंत्री नितीन राऊत...



मुंबई : महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुराचा मोठा प्रमाणात राज्याला फटका बसला आहे. अनेकांची घरे उद्धवस्त होण्यासह काहींना आपल्या जवळच्या व्यक्तीला या पुराच्या परिस्थितीत गमवाले लागले आहे. अशातच गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेतेमंडळी आता पुरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर येत आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पुरग्रस्तांना दिलासा मिळेल अशी एक मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार नितीन राऊत यांनी असे म्हटले आहे की, पुराचा तडाखा बसलेल्या भागात वीज बिलाच्या वसूलीसाठी स्थगिती देण्यात यावी.

नितीन राऊत यांनी असे म्हटले आहे की, पुराची परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणी नागरिकांकडून वीज बिल वसूल करु नका. तसेच पुरग्रस्त भागातील स्थिती पुर्ववत झाल्यानंतर बिल भरण्यासाठी सुद्धा नागरिकांना सवलत दिली जाईल असे ही राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

पुरग्रस्त भागात वीजबिल वसूलीसाठी विद्यूत म़ंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची 'दादागिरी'!

पुरग्रस्त भागात वीजबिल वसूलीसाठी विद्यूत म़ंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची 'दादागिरी'!


कल्याण, (संजय कांबळे) : आधीच कोरोना महामारीने बेजार झालेल्या नागरिकांना आता पुराचा फटका बसला, अशा विविध संकटात सापडलेल्या पुरग्रस्त नांगरिकांना वीज बील भरा नाहितर लाईट तोडण्यात येईल असा' दम' विद्यूत मंडळाचे अधिकारी व कर्मचारी देत असून त्यांच्या या दादागिरी विरोधात लोकामध्ये संताप पसरला आहे,

गेल्या आठवड्यात कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा, रायते, पावशेपाडा, खडवली, राया ओझर्ली, आदी गावांना उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या नद्यांंना आलेल्या पुराचा मोठा फटका बसलाय, हा पुर इतका भयानक होता की, कल्याण नगर मार्गावरील रायते पुल, भातसा नदीवरील खडवली, पुल आणि काळू नदीवरचा रुंदा पुल मोठ्या प्रमाणात वाहून गेला, तर म्हारळ गावातील शिवाणीनगर, गोदावरी नगर, राधाकृष्ण नगरी, आण्णासाहेब पाटील नगर, बोडकेचाळ, म्हारळ सोसायटी, तर वरप गावातील गावभाग, ओमसाईबाबानगर, शिवशक्ती काँलनी, दुर्गानगर, टाटापावर पावरहाऊस, मोरयानगर, पावशेपाडा रायते, खडवली, आदी भागातील घरात कित्येक तास पुराचे पाणी भरले होते, यामुळे शेतीसह घरांचे नुकसान झाले आहे,

आधीच गेल्या दिड दोन वर्षांपासून कोरोना मुळे अनेकांचा जीव गेला, तर बुहुतेकांचा काम धंदा,नोकरी, व्यापार गेला आहे, त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न सर्वांना पडला आहे, अशातच विद्यूत मंडळाने अव्वाच्या सव्वा बील पाठवणे सुरु केले आहे, लाँकडाऊण काळात कोणत्याही प्रकारचे मिटर रिंडिंग घेतलेले नसतानाही हजारो रुपये बील नागरिकांना पाठवले जाते आहे, यातीलही काही बील नांगरिकांनी इमानेइतबारे भरले होते, पण आता पुन्हा पुरामुळे यांचे कंबरडे मोडले आहे, जनता चारही बाजूंंनी संकटात सापडली आहे, अशा संकटाच्या वेळी विद्युत मंडळांचे अधिकारी व कर्मचारी लोकांनी लाईटबील भरा नाहीतर तूमची लाईक कट करण्यात येईल, तूमच्या वर गुन्हे दाखल करु, पुरग्रस्त आहेत तर काय झाले?बील भरावेच लागेल असे उध्दटपणे,भाषा वापरली जात आहे, त्यामुळे लोकामध्ये संताप निर्माण झाला आहे.

तर दुसरीकडे फार्म हाउस,हाँटेल,धाबे, टप-या येथे बिनदिक्कतपणे आकडे टाकून चोरीची लाईट घेऊन वापरली जाते हे यांना दिसत नाही का? उलट टिटवाळा परिसरातील धाब्यावर विद्युत मंडळांचे वरीष्ठ अधिकारी 'मधीरा' ढोसून पार्टी करत असल्याचे अनेक पत्रकारांनी पाहिले, छुप्या कँमेरात विडिओ शुट करुन ठेवले आहेत. या विरोधात आमदार कुमार आयलानी हे उर्जामत्र्यांकडे पत्रव्यवहार करणार असूंन यामध्ये म्हारळ वरप कांबा या पुरग्रस्त भागातील सक्तीने विजबील वसूली करु नये, त्यांना सावरण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी द्यावा अशी मागणी ही करणार आहेत.

दरम्यान राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी पुरग्रस्त भागात वीजबिल वसूली करु नये असे आदेश दिल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले  आहे, 

प्रतिक्रिया-मी आताच उर्जा मंत्री नितीन राऊत यांना याबाबत सविस्तर पत्र पाठवणार आहे'-कुमार आयलानी, आमदार, उल्हासनगर, विधासभा.

गुटखा विक्रीला अभय ! वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत !

गुटखा विक्रीला अभय ! वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह हवालदार अटकेत !
 

नवी मुंबई : नवी मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरीया व हवालदार इक्बाल शेख यांना 25 हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख असतानाच त्यांनी गुटखा विक्री करण्यास अभय देण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागितली होती. इक्बाल शेख याच्या माध्यमातून ही लाच मागण्यात आली होती. त्यात वरिष्ठांसाठी ७ हजार ५०० व स्वत:साठी ३२ हजार ५०० रुपये शेख याने मागितले होते.

संबंधित व्यापार्‍याने ठाणे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची पडताळणी करण्यात आली.

त्यात तडजोड होऊन २५ हजार रुपये लाच देण्याचे ठरले. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मनोज प्रजापती, योगेश देशमुख यांच्या पथकाने सायंकाळी शेख याला 25 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज छापरीया व शेख या दोघांवरही गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या बोगस पत्रकाराला अटक !

नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या बोगस पत्रकाराला अटक !


अरुण पाटील, भिवंडी -कोपर, दिं.30 :
         पत्रकार असल्याचे सांगून, भिवंडी शहरात राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेशी ओळख निर्माण केली. त्यांनतर या महिलेला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवले. त्यानंतर या अमिषाखाली त्या महिलेवर वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधीत व्यक्तीवर नारपोली पोलीस ठाण्यात अत्याचारासह अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक केली आहे.
             मनोहर विशे (वय 35, रा. पुर्णा, भिवंडी ) असे अटक केलेल्या बोगस पत्रकाराचे नाव आहे. नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या बोगस पत्रकाराला अटक "ओळखीतून पीडिता पडली अमिषाला बळी" भिवंडी तालुक्यातील पुर्णा येथे राहणारा मनोहर विशे हा ग्रामीण भागात पत्रकार म्हणून गेल्या काही वर्षांपासून वावरतो. त्यातच २०१६ साली एका ३५ वर्षीय महिलेशी त्याची ओळख निर्माण केली. त्यांनतर तुला नोकरी लावून देतो, तसेच तुझ्याशी लग्न करतो असे आमिष देवून या महिलेवर बलात्कार केला. आरोपीला पोलीस कोठडी
         गेल्या काही दिवसांपासून महिलेने या व्यक्तीकडे नोकरी व लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र, त्याने लग्नास नकार देऊन महिलेला जातीवाचक शिवीगाळ केली. तसंच, तीला धमकीही दिली. यामुळे भयभीत झालेल्या पीडितेने नारपोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रर दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी मनोहर विशे विरोधात अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्काळ मनोहर विशे याचा शोध घेऊन त्याला काल रात्री अटक केली आहे. आरोपीला  भिवंडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला ३१ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले करीत आहेत.

Thursday 29 July 2021

सोमवारपासून निर्बंधात शिथीलता ! "आरोग्यमंत्री राजेश टोपे" यांची घोषणा..

सोमवारपासून निर्बंधात शिथीलता ! "आरोग्यमंत्री राजेश टोपे" यांची घोषणा..



मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केल्याने उत्साहाचा श्रावण व्यावसायिकांसाठी तसेच व्यवसायावर उपजीविका करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उत्साह घेऊन येणार आहे.

मागील वर्षी मार्चपासून लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने विविध व्यवसायाला सरकारने परवानगी दिली. परंतु, परवानगी दिल्यानंतर निर्बंधाची वेसण घातली होती. यात शिथिलता येईल, या आशेवर व्यापारी, लहान-मोठे दुकानदार होते.

राज्य सरकारने निर्बंध हटविण्यासाठी वेगवेगळ्या लेवल जाहीर केल्या. काही जिल्हात तिसऱ्या लेवलनुसार दुकाने रात्री आठपर्यंत तर हॉटेल्स रात्री दहापर्यंत सुरू करण्यात आले होते. परंतु, हा आनंद केवळ आठवडाभरच टिकला.

आठवड्याभरातच डेल्टा प्लस रुग्णाच्या वाढीमुळे दुकाने, हॉटेल्सच्या वेळा चारपर्यंत करण्यात आला. काही जिल्हात पॉझिटिव्हिटी दर खाली असूनही निर्बंधात शिथिलता आणली जात नसल्याने राज्यातील व्यापाऱ्यांत चांगलाच असंतोष निर्माण झाला होता. आता उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडूनही सकारात्मक चिन्हे मिळाली. त्यानंतर व्यापारी, दुकानदारांनाही निर्बंध शिथिल होण्याचे वेध लागले होते.

गुरुवारी सायंकाळी त्यांच्या कानावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची घोषणा पडली अन् चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. निर्बंधात शिथिलतेचा अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असेही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सोमवारपासून निर्बंधात शिथिलता येण्याची शक्यता असून व्यावसायिक, लहान मोठे दुकानदारांच्या आशा पल्लवित झाल्या.

निर्बंध कायम असलेले ११ जिल्हे यात सध्या अस्तित्वात असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर हे जिल्हे, कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर हे जिल्हे, मराठवाड्यातील बीड तर उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगरमधील निर्बंध कायम राहणार आहेत.

सरकारने पूरग्रस्तांना केली दहा हजारांची मदत जाहीर.!

सरकारने पूरग्रस्तांना केली दहा हजारांची मदत  जाहीर.!


भिवंडी, दिं.29,अरुण पाटील, कोपर :
         राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणआणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारने पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची  मदत जाहीर केली आहे. दरम्यान आनंदाची बातमी म्हणजे शुक्रवार पासून म्हणजेच उद्यापासून 10 हजारांची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी दिली.
          विजय वडेट्टीवार यांनी या मदती संदर्भातली माहिती दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीनं मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. रोख रकमेचं वाटप केलं तर पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्या पासूनच पूरग्रस्तांच्या थेट खात्यात हे पैसे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
     तातडीनं पंचनामे करुन 8 दिवसात अहवाल देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हा अहवाल केंद्राला पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत. या पावसामुळे 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचंही ते म्हणाले.
               नांदेडमध्ये 80 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून तिथे एकाच दिवशी 166 मिलीमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी तर 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयनाच्या परिसरात 48 तासात 1072 मिलीमीटर पाऊस झाला आणि 17 टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. ढगफुटीपेक्षा हे भयानक आहे. निसर्गाचं बॅलन्स बिघडल्याची ही परिस्थिती आहे. म्हणून अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा ! "बंगालच्या उपसागरात निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा"

हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा !
"बंगालच्या उपसागरात निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा"


पुणे : राज्यांत पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुढील २४ तासांत राज्यातील किनारपट्टी भागांत काही ठिकाणी मुसळधार, तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. कोकणातही मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. दरम्यान पुढील ५ दिवसांत राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबच्या पट्टा तयार झाल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर त्याचा परिणाम यला मिळेल. त्यामुळे येत्या चार ते पाच दिवसांत अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडेल. त्यादृष्टीने पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई रायगड, पालघर, रत्नागिरी मुसळधार पावसाचा अंदाज घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे २९ जुलैपासून ते २ ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्याच्या इतरही भागांत हलक्या पावसाच्या सरी बरसणार आहेत.

त्यामुळे विश्रांती घेतलेला पाऊस राज्यभरात पुन्हा सक्रिय होताना यला मिळणार आहे. कोकण मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार तर ठाणे, पालघरमधील बऱ्याच भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. पुढील पाच दिवस पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई रायगड, पालघर, रत्नागिरी या भागातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे

डोंबिवलीत भरवस्तीत चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! "ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलची कारवाई"

डोंबिवलीत भरवस्तीत चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

"ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलची कारवाई"



सुशिक्षित आणि सांस्कृतिक नगरी अशी डोंबिवलीची ओळख. मात्र यात डोंबिवलीत भरगच्च लोकवस्तीतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. लॉजिंग अँड बोर्डिंगमध्ये सेक्स रॅकेट चोरी-छुपे चालू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईतून उघडकीस आले आहे. या लॉजिंग अँड बोर्डिंगवर टाकलेल्या छाप्यात तेथील चार तरुणींची सुटका करण्यात आली. तर या कारवाईत लॉजिंग-बोर्डिंगच्या व्यवस्थापकासह 6 जणांना अटक करण्यात आली.

डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना रोडला सांगर्ली चौकात बालाजी दर्शन इमारतीत साईराज लॉजिंग अँड बोर्डींग आहे. या लॉजमध्ये सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती मिळताच ठाण्याच्या अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलने सोमवारी रात्री अचानक याठिकाणी छापा टाकला. यावेळी चार तरूणी तेथे वेश्याव्यवसाय करताना आढळून आल्या. या लॉजमध्ये पोलिसांनी बोगस गिऱ्हाईक पाठवून प्रथम खात्री केली होती.

पोलिसांनी छाप्यादरम्यान सदर लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि तरुणींच्या पुरवठादार दोन दलालांच्या तावडीतून 4 तरुणींची सुटका केली. या अवैध मार्गाला लागलेल्या या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.

या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात लॉजिंग-बोर्डिंगचा व्यवस्थापक, रोखपाल, दोन वेटर आणि दोन दलालांच्या विरोधात या प्रकरणी 376 (2), 370 (3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 4 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

पुरग्रस्तांचे अश्रू पुसणा-या मराठमोळ्या अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले कडून दहा कोंटीची मदत, बाँलिवूडवाले कुठे लपले?

पुरग्रस्तांचे अश्रू पुसणा-या मराठमोळ्या अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले कडून दहा कोंटीची मदत, बाँलिवूडवाले कुठे लपले?


कल्याण, (संजय कांबळे) : अभिनयासह सामाजिक क्षेत्रात सतत आघाडीवर असलेल्या लाखात एक देखणी अशी सुंदर मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले यांनी नुकताच सांगली कोल्हापूर या पुरग्रस्त भागाचा दौरा केला यावेळी उध्वस्त झालेला संसार बघून त्यांच्या डोळ्यांंच्या कडा पानावल्या़च, परंतु ते लपवून समोर ढाय मोकळून आक्रोश करणाऱ्या 'त्या' माऊलीला उराशी कवटाळून तिचें अश्रू पुसण्याचे काम तिने केले. 


ऐवढ्यावरचं न थांबता या पुरग्रस्तांंचे संसार पुन्हा एकदा नव्याने उभें रहावेत म्हणून दिपाली भोसले-सय्यद चँरिटेबल ट्रस्ट च्या वतीन तब्बल सुमारे १० कोटी रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली. अशा या गुणी अभिनेत्रीचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. तर मुंबई-महाराष्ट्राच्या जीवावर मोठे झालेले'बाँलिवूडवाले'कुठे लपले आहेत? असाही संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.


महाराष्ट्रात काही मोजकेच अभिनेते, अभिनेत्री आहेत की ज्यांनी चित्रपट क्षेत्रातासह सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे, नाम,फांऊंडेशन चे जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर, मंकरंद अनासपुरे, प्रंशात दामले, जयवंत वाडकर, असे कितीतरी नावे घेता येईल, परंतु अभिनेत्री मध्ये गेल्या काही वर्षापासून सतत चर्चेचे नाव म्हणजे अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद, यांचेच आहे, त्याची कारणे देखील तसीच आहेत, कुठे नैसर्गिक आपत्ती आली, कुठे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तेथे दिपाली सय्यद पोहचल्या नाहीत असे कधी झाले नाही. नुकताच त्यांनी सांगली-कोल्हापूर, भुदरगड, गारगोटी या पुरग्रस्त भागाचा दौरा केला, केवळ इतरांनप्रमाणे शो शाईनिंग न करता पुरग्रस्त भागात घरोघरी जाऊन संसार उध्वस्त झालेल्या माऊलींच्या आक्रोशाला उराशी कवटाळून तिचें अश्रू पुसून धिर देण्याचे काम केले, ऐवढ्यावरचं न थांबता पुरग्रस्तांंचे संसार नव्याने उभें रहावेत म्हणून दिपाली भोसले सय्यद चँरिटेबल ट्रस्ट तर्फे तब्बल१०कोटी रूपयांची मदत जाहीर केली. या वरुन या गुणी अभिनेत्रीची सामाजिक बांधिलकी दिसून आली.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा पिंडच सामाजिकतेचा, समाजसेवेचा वसा घेतलेल्या या अभिनेत्रीचा प्रवास तसा खडतरच झाला, लोकांच्या मदतीसाठी धाऊन जाणे, हे स्वभावातच असल्याने, तसेच त्यांच्यात मिसळून काम करण्याची वृत्ती, "स्टार" असूनही पाय जमिनीवर असल्याने त्या कलारषिकासह, सर्वसामान्य जनतेच्या हद् य सिंहासनावर अधिराज्य गाजवत आहेत, लाखो करोडो फँन असलेल्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा जन्म १ एप्रिल १९७८ मध्ये कुर्ला मुंबई येथे मराठमोळ्या कुंटूबात झाला. प्रसिद्ध अशा नांलदा विद्यापीठातून फाईन आर्ट डिग्री घेतल्या नंतर त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले, 'जाऊ तिथे खाऊ' हा त्यांचा पहिला चित्रपट, १९९०च्या दशकात टिव्ही मालिका बंदिनी व समांतर भरपूर गाजल्या ,त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या, मुंबईचा डबेवाला, लाडी गोडी, होऊन जाऊद्या, करायला गेलो एक, ढोलकीच्या तालावर, उचला रे उचला, वेलकम द जंगल, आणि मला एक चाणसं हवा, असे ३० हून अधिक चित्रपट यांनी केले.

मे २००८ मध्ये त्यांनी बाँबी खान यांच्याशी लग्न केल्याने त्या दिपाली भोसल्यांच्या सुफिया जहागीर झाल्या. पण तरीही त्यांनी आपली ओळख दिपाली सय्यद-भोसले अशीच ठेवली.

सामाजिक कार्यातदेखील तितक्याच आत्मविश्वासाने काम केले, अहमदनगर येथील साकळाई उपसा सिंचन योजना पुर्ण व्हावी म्हणून ९आँगस्ट या क्रांती दिनी आमरण उपोषण केले, यावेळी अभिनेत्री मानशी नाईक, सीमा कदम, माधुरी पवार, श्रेया परदेशी, सायली परहाडकर, यांनी या उपोषणाला पाठिंबा दिला होता.अखेरीस या उपोषणाला यश येवून महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी सुमारे ५ कोटी रुपये निधी मंजूर केला. यामुळे अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा सामाजिक कार्यात ठसा उमटला 

यांनतर सन २०१९मध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर येथे आलेल्या पुराच्या वेळी अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी या भागास भेट देऊन दिपाली सय्यद भोसले चँरिटेबल ट्रस्ट च्या वतीने सुमारे ५ कोटींची मदत दिली, तसेच पुरग्रस्त भागातील मुलीच्या लग्नाकरिता प्रत्येकीच्या नावावर ५० हजार रुपये टाकले. त्यामुळे पालकांच्या डोक्यावरील ओझ कमी झाले. तर आता कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड, गारगोटी तालुक्यातील पुराचा फटका बसलेल्या भागाचा दौरा केला .यावेळी डोळ्यादेखत काडी काडी जमवून उभा केलेला संसार पाण्यात वाहून गेल्याने आक्रोश करणाऱ्या' त्या' माऊलीला उराशी कवटाळून तिचें अश्रू पुसण्याचे काम दिपाली ने केले, तसेच या पुरग्रस्तासाठी सुमारे १० कोटी रुपयांची मदत ट्रस्ट च्या वतीने जाहीर केली,

तसे पाहिले तर मुंबई ने अनेक बाँलिवूड स्टारना करोडपती बनवले, मात्र जेव्हा महाराष्ट्रावर संकटे येतात, तेव्हा हे कोठे लपून बसतात, मदत करणे तर सोडा पण साधीसुधी सहानुभूती व्यक्त करत नाहीत अशावेळी त्यांना त्यांची जागा दाखवला हवी तर सदैव नैसर्गिक आपत्ती असो, मुलीचा प्रश्न असो, किंवा कोणतेही सामाजिक काम असो ,तत्परतेने तेथे जाऊन त्यांच्या दु:खात सहभागी होणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री दिपाली सय्यद-भोसले यांच्या सारख्यांंना महाराष्ट्राने डोक्यावर घ्यायला काय हरकत आहे, अशा या गुनवान अभिनेत्री ला मानाचा 'सलाम'

प्रतिक्रिया : "मी या भागाचा दौरा केला तेव्हा भयानक चित्र दिसत होते, सर्वत्र चिखल, घरे वाहून गेलेली, काही कोसळली, आक्रोश करणा-या माताभगिनी, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आले, तरीही ते लपवून मी त्यांचे अश्रू पुसले, त्यांना आधाराची गरज होती, आहे,लवकरच मी कोकणाचा दौरा करणार आहे" -दिपाली सय्यद-भोसले

Wednesday 28 July 2021

महाराष्ट्रात आज कोरोनाबाधित रुग्णसंख्या सात हजाराच्या आत !

महाराष्ट्रात आज कोरोनाबाधित रुग्णसंख्या सात हजाराच्या आत !



मुंबई : महाराष्ट्रात दिवसभरात ६ हजार ८५७ नवे कोरोना रुग्ण आणि २८६ मृत्यू झाले. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ६ हजार १०५ जण दिवसभरात बरे झाले. महाराष्ट्राचा मृत्यूदर २.१० टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १३.२६ टक्के, रिकव्हरी रेट ९६.५३ टक्के आहे. राज्यात झालेल्या ४ कोटी ७३ लाख ६९ हजार ७५७ कोरोना चाचण्यांपैकी ६२ लाख ८२ हजार ९१४ पॉझिटिव्ह आल्या. 

राज्यातील ४ लाख ८८ हजार ५३७ जण होम क्वारंटाइन तर ३ हजार ३६४ जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाबाधीत झालेल्या ६२ लाख ८२ हजार ९१४ जणांपैकी ६० लाख ६४ हजार ८५६ जण झाले बरे. महाराष्ट्रात कोरोनामुळे १ लाख ३२ हजार १४५ मृत्यू तर सध्या महाराष्ट्रात ८२ हजार ५४५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

कल्याण महसून विभागाकडून पूरग्रस्त भागांचे पंचनामे सुरू..! "तहसीलदार दिपक आकडे" यांनी दिले तलाठ्यांना केल्या सूचना.. 'मांडा-टिटवाळ्यात ८१८ घरांचे पंचनामे पूर्ण'

कल्याण महसून विभागाकडून पूरग्रस्त भागांचे पंचनामे सुरू..!

"तहसीलदार दिपक आकडे" यांनी दिले तलाठ्यांना केल्या सूचना.. 'मांडा-टिटवाळ्यात ८१८ घरांचे पंचनामे पूर्ण'


टिटवाळा, उमेश जाधव -: गेल्या तीन-चार  दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील काळू, भातसा,  उल्हास व बारवी या नद्यांना पूर येऊन नदीकिनारी आणि खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे तसेच इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. या झालेल्या या नुकसानाचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने व कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांच्या सूचनेनुसार कल्याण महसूल विभागा कामाला लागले आहे.


पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांना दिले आहेत. त्यानुसार शनिवारपासून पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यास सुरुवात झालीआहे. त्यामुळे पूरग्रस्तांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. 


कल्याणमधील खडवली, मांडा, टिटवाळा, रायते, कांबा, वरप, म्हारळ, वडवली, अटाळी, आंबिवली आदी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे कल्याण तहसीलच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक आकडे यांनी दिली. 

टिटवाळा येथील जावई पाडा, शिवशाही नगर, वारघडे नगर, बालाजी नगर, रूक्मिणी नगर याठिकाणी पंचनामे झाले असून २५६ लोकांच्या घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. 
तर मांडा येथील वासुंद्री रोड लगत असणाऱ्या सिध्दीविनायक नगर ५६२ घरांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यावेळी मंडळ अधिकारी संजय साळुंखे, तलाठी योगेश पुराणी, तलाठी प्रशांत चौघुले, तलाठी शंकर साळवी, तलाठी संचिन पानसरे व सहाय्यक रोहित गायकर यांनी काम पाहीले.

टिटवाळयात रस्त्यावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह !!

टिटवाळयात रस्त्यावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह !!


टिटवाळा, उमेश जाधव -: कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या टिटवाळा पूर्वेकडील बल्याणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मधुबन सोसायटीच्या परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे टिटवाळा परीसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेशनगर येथे राहणारे टेम्पो चालक अक्षय आलाट हे नेहमीप्रमाणे टेम्पोचे भाडे मारून घरी जात असताना रात्री साडे दहा च्या सुमारास सिद्धिविनायक दुकानासमोर त्यांना एक अनोळखी इसम  झोपलेल्या अवस्थेत आढळला. सदर इसम काही हालचाल करीत नसल्याने आलाट यांनी जवळ जाऊन पाहिले. 
त्यांनी सदर इसमास आवाज दिला पण त्याने काहीही प्रतिसाद न दिल्याने त्यांची खात्री झाली की अनोळखी इसम मृत्यू झाला असावा. त्यांनी या घटनेबाबत कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन टिटवाळा येथे माहिती दिली. या बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ४५ वर्ष असून चेंबूर मुंबई येथील आहे. सरळ नाक, रंग गव्हाळ वर्ण, उंची पाच फूट, अंगाने बारीक पोटाच्या उजव्या बाजूस ऑपरेशनची खुण, अंगात राखाडी पिवळसर रंगाचा शर्ट त्यावर चौकटी डिझाईन असून निळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे. तरी असे वर्णन असलेली व्यक्ती कुणाच्या ओळखीत असल्यास अथवा नातेवाईक असल्यास ओळख पटण्यासाठी टिटवाळा पोलीस स्थानकात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. संपर्क : ०२५१२ ३८१३२0

मुरबाड तालुक्यातील प्रतिनियुक्त्या रद्द करून तात्काळ रिक्त पदे भरा !!

मुरबाड तालुक्यातील प्रतिनियुक्त्या रद्द करून तात्काळ रिक्त पदे भरा !!

**स्मरण पत्राद्वारे माजी सभापती श्रीकांत धुमाळ यांनी केली मुख्य कार्यकारी अधिका-यांकडे मागणी **


मुरबाड, (मंगल डोंगरे) : गाव विकासाचा केंद्र बिंदू असणाऱ्या मुरबाड पंचायत समिती मध्ये  ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक शासकीय कर्मचारी आणि अधिका-यांची रिक्त पदे असुन ब-याचश्या अधिकारी वर्गाकडे प्रतिनियुक्त्यांवर मुरबाड पंचायत समितीचा गाडा ब-याच दिवसांपासुन चालवला जात आहे. 


या गंभीर बाबीची दक्षता घेत तत्कालीन सभापती श्रीकांत धुमाळ यांनी  मुख्यकार्यकारी अधिकारी ठाणे यांचे कडे लेखी पत्राद्वारे मागणी करून  मुरबाड तालुक्यातील हि रिक्त पदे तात्काळ भरा आणि प्रतिनियुक्त्या रद्द करा. असे सांगितले, होते.त्यावेळी त्यांना तसे हो म्हणून सांगण्यात आले होते. मात्र त्यांचा सभापती पदाचा कार्यकाळ संपुन दुसरी व्यक्ती त्या खुर्चीत विराजमान झाली. तरी जिल्हा दरबारी ह्या समस्येची गांभीर्याने दखल घेण्यात आली नाही. मात्र उच्च विद्याविभूषित आणि ग्रामपंचायत सदस्य ते सरपंच आणि स्वच्छ सुंदर ल आदर्श गावाचे निर्माते असणारे मुरबाड पंचायत समितीचे तत्कालीन सभापती श्रीकांत धुमाळ यांना हि गोष्ट स्वस्त बसु देत नाही.  म्हणून त्यांनी पुन्हा एकदा मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना स्मरणपत्र देवुन मुरबाड तालुक्यातील ग्रामसेवक आणि सहाय्यक कनिष्ठ व सहाय्यक वरिष्ठ अधिकारी यांची  रिक्त पदे  तात्काळ भरावित.आणि पर्यायी व्यवस्था म्हणून केलेल्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली आहे.
             सध्याच्या परिस्थितीत ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात ग्रामसेवकांची सर्वात जास्त रिक्त पदे आहेत.एकेका ग्रामसेवकाकडे दोन-तीन ग्राम पंचायतींचा कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना धड कुठल्या एका ग्रामपंचायतीचा कार्यभार  सांभाळता येत नाही.याशिवाय नागरिकांची कामे हि वेळेवर होत नाही. प्रसंगी ग्रामीण भागातून नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी हेलपाटे मारावे लागतात. ते आर्थिक द्रुष्टीने परवडण्यासारखे नसते.शिवाय ग्रामसेवक वर्ग कुठल्याही एका ठिकाणी उपलब्ध होत नाही. आणि  प्रतिनियुक्त्यांवर नेमलेल्या अधिका-यांकडे दोन-तीन खात्यांचा अतिरिक्त भार. सोपवलेला असतो. त्यामुळे अधिकारी वर्गाला सुद्धा लोकांची कामे वेळेत पुर्ण करता येत नाही. म्हणून जनतेचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी व वेळेत कामे पुर्ण करण्यासाठी तालुक्यातील रिक्त पदे भरुन प्रतिनियुक्त्या ही  तात्काळ रद्द कराव्यात .प्रत्येक स्वतंत्र खात्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावे. असे स्मरणपत्र मुरबाड पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान गटनेते श्रीकांत धुमाळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी ठाणे यांना दिले असुन ,ठाणे जि.प.अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनाही त्याची प्रत रवाना करण्यात आली असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी मंगल डोंगरे यांच्याशी बोलताना श्री.धुमाळ यांनी सांगितले.

कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला ! "हजारो नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास"

कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला !

"हजारो नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास"

कल्याण, २७ जुलै : वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जाणारा कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारी पूल वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. तब्बल २० तासांनी हा पूल खुला करण्यात आला. पुलाच्या खांबाला कोणतेही तडे गेले नसल्याचे तसेच हा उड्डाणपूल सुस्थितीत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आल्याने या पुलावरील वाहतूक सुरू केल्याची माहिती कल्याण शहर वाहतूक यांनी दिली.

हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरु झाल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गांधारी पुलाच्या खांबाला तडे गेल्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे सोमवारी रात्री १० वाजल्यापासून इथली वाहतुक पूर्णपणे बंद करण्यात आली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कल्याण कार्यालयातील उपअभियंता प्रशांत मानकर यांनी सांगितल्याप्रमाणे आज दुपारी अधिकाऱ्यांनी केलेल्या पाहणीत पुलाला कोणतेही तडे गेलेले नसून पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या काळ्या कापडाने सर्व गोंधळ उडाल्याचे समोर आले.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हिरवा कंदील दिल्यानंतर आज संध्याकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा खुला करण्यात आल्याची माहिती ट्रॅफिक एसीपी उमेश माने पाटील यांनी दिली. तसेच वाहतुक बंद करण्यासाठी घालण्यात आलेले बॅरिकेट्सही तातडीने बाजूला करण्यात आले.

हा पूल वाहतुकीसाठी पुन्हा सुरू झाल्याने पुला पलीकडे राहणाऱ्या गावातील हजारो नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पूल सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.


ठाणे -मुंब्रा येथील एका तरुणाचा सापाशी खेळतांना सर्पदंशाने मृत्यू.!

ठाणे -मुंब्रा येथील एका तरुणाचा सापाशी खेळतांना  सर्पदंशाने मृत्यू.!


अरुण पाटील, दिं.28, भिवंडी, (कोपर ) ;
              विषारी साप हाताळन्याचे कौशल्य नसताना देखील सापा सोबत खेळताना एका तरुणाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे.
         ठाण्यातील - मुंब्रा परिसरात ही घटना घडली आहे. सर्पदंशानंतर या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
                 मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहम्मद शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मुंब्रा परिसरात रहात होता. मुंब्रा परिसरात असलेल्या डोंगराळ भागात पावसामुळे झाडाझुडपात लपलेले साप पाण्याच्या प्रवाहाने उघड्यावर येतात तसेच या भागात डोंगर माथ्यावर अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर सर्रास दिसून येतो.
           या ठिकाणी मोहम्मद शेख या तरुणाला एक साप दिसला आणि त्याने तो पकडला. सापाला पकडल्यानंतर तो त्याच्या सोबत खेळू लागला. हा सर्व प्रकार मोहम्मद शेख याचे दुसरे मित्र मोबाइल कॅमेऱ्यात शूट करत होते. मोहम्मदने सापाला पकडून तो त्याच्याशी खेळ करत होता या दरम्यान मोहम्मदला स्थानिकांनी फटकारले देखील पण तरीही मोहम्मद काही ऐकत नव्हता. त्याच दरम्यान तीन वेळा मोहम्मदला या सापने दंश केला मात्र त्याला समजले नाही. काही वेळाने मोहम्मदने या सापाला जंगलात सोडून दिले. काही वेळाने मोहम्मदला त्रास होऊ लागला आणि तो बेशुद्ध झाला. यावेळी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मोहम्मदचा मृत्यू झाला.

Tuesday 27 July 2021

मुरबाड मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !!

मुरबाड मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबीर संपन्न !!


मुरबाड, (मंगल डोंगरे) : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुरबाड येथील वैश्यसमाज हाँलमध्ये भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


       या शिबीरात तज्ञ फिजिशियन, सर्जन, स्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ज्ञ, व अस्थिरोग तज्ञ, डॉक्टयांच्या उपस्थितीत उच्च रक्तदाब, मधुमेह, स्तनाचा कँन्सर, योनीमार्गाचा कँसर, हिमोग्लोबिन, मासिक पाळी, बालकांचे कुपोषण, सारख्या आजारांवर तपासणी करण्यात आली. यामध्ये जवळपास 350 नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. तर रक्तदान हे श्रेष्ठ दान,नव्हे तर जीवनदान हे खरे करण्यासाठी कुठल्याही प्रसंगी समाजातील कुठल्याही घटकाला रक्ताची गरज भासते. प्रसंगी आपला जिवही गमवावा लागतो. असा प्रसंग कोणावरही ओढावु नये.म्हणून तालुक्यातील  151 तमाम नवतरुण शिवसैनिकांनी रक्ताची गरज लक्षात घेऊन रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी जोपासली. आजचा हा कार्यक्रम शिवसेना मुरबाड शहर शाखेतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रति पंढरपूर धानिवलीचे कमलनाथ नवनाथ महाराज, शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, शिवसेना नेते सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, अल्पेश भोईर, जि.प.सदस्या रेखाताई कंटे, मुरबाड तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, विधानसभा क्षेत्र संघटक आप्पा घुडे, जि.प उपाध्यक्ष सुभाष पवार, मुरबाड शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे, युवासेना ता.प्रमुख  प्रशांत मोरे, मुरबाड शहर युवा सेना प्रमुख पंकज दलाल, माजी नगरसेवक नितीन तेलवणे, तालुका महिला आघाडी प्रमुख उर्मिला लाटे, शहर प्रमुख जयश्री संमेळ, विशाल बिडवी, मयूर रोठे, उमेश हुमणे, यांसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवा सेना, व महिला आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

ऍक्सॉन हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या धमणीच्या फुग्याची किचकट न्यूरो इंटरव्हेशनल शस्रक्रिया यशस्वी ! "मेंदू विकार तज्ञ् इंटरव्हेशनल न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश किनगे यांच्या ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या धमणीच्या फुग्याची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आली".

ऍक्सॉन हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या धमणीच्या फुग्याची किचकट न्यूरो इंटरव्हेशनल शस्रक्रिया यशस्वी !

"मेंदू विकार तज्ञ्  इंटरव्हेशनल न्यूरॉलॉजिस्ट डॉक्टर निलेश किनगे यांच्या ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मध्ये मेंदूच्या धमणीच्या फुग्याची किचकट शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात आली". 


जळगाव : आसोदा येथील उज्वला मनोज चौधरी (वय ४८) यांना सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उलटी होऊन, चक्कर येऊन पडल्याने मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाला. 


त्यांना ऍक्सॉन ब्रेन हॉस्पिटल मध्ये दाखल केल्या नंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सिटी स्कॅन केल्यावर मेंदू मध्ये रक्तस्त्राव झाल्याचे लक्षात येताच डॉक्टर निलेश किनगे यांनी मेंदूची ऍन्जोग्राफी केली. त्यात उज्वला मनोज चौधरी यांच्या मेंदूच्या एका धमणी मध्ये वाइड नेक ऍन्युरिज्म (फुगा) झाला असल्याचा निष्कर्ष निघाला. डॉक्टर निलेश किनगे आणि त्यांच्या चमूने सलग ३ तास शस्त्रक्रिया करून मेंदूच्या धमणी मधील फुग्यात जाळी बसवली ज्याला  स्टेण्ट असिस्टेड कोइलिंग असे म्हणतात. या आधी अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना पुणे अथवा मुंबई जावे लागत होते. पण आता डॉक्टर निलेश किनगे मेंदूवरील अशा किचकट शस्त्रक्रिया जळगाव मध्येच यशस्वीपणे पार पाडत आहे.  

काय आहे वाइड नेक ऍन्युरिज्म?

या मध्ये रुग्ण्याच्या मेंदूतील वाहिनी मध्ये जन्मतःच  लहान किंवा मोठी मान असलेले फुग्यासदृश्य वाक  निर्माण होतात आणि अचानकपणे ते फुटल्यास त्यातून रक्तस्त्राव झाल्यास रुग्ण दगावू शकतो. अशा प्रकारच्या फुग्यांमध्ये मांडीतून तार टाकून तो मेंदूच्या धमणी पर्यंत पोहोचवून त्या फुग्यात जाळी बसवली जाते.  लहान मानेचा असल्यास कोइलिंग पद्धतीने शस्त्रक्रिया होते आणि फुगा मोठ्या मानेचा असल्यास  स्टेण्ट असिस्टेड कोइलिंग पद्धतीने शस्त्रक्रिया होते. या शस्त्रक्रियेमुळे मेंदूत रक्तस्त्राव होण्याची शक्यता उरत नाही. अशी हि आधुनिक जीवनदान देणारी शस्त्रक्रिया आहे.

भिवंडीतील "नागरी हक्क संघर्ष समिती"ने दिले मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांला निवेदन.!

भिवंडीतील "नागरी हक्क संघर्ष समिती"ने दिले मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांला  निवेदन.!


भिवंडी, दिं.28, अरुण पाटील-कोपर :
        ठाणे भिवंडी कल्याण " मेट्रो प्रकल्प 5 च्या कशेळी ते  अंजूर फाटा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत   " नागरी हक्क संघर्ष समिती "ने लेखी निवेदन देऊन  लवकरात लवकरच खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण करण्याचे मागणी केली आहे. त्या वेळी प्रकल्प अधिकारी श्री.सिंग यांनी काम लवकरात लवकर करू असे आश्वासन दिले आहे दिले आहे.
      या प्रसंगी मेट्रोचे अधिकारी साळुंखे साहेब , नारपोली पोलीस ठाण्याचे निवृत्त पोलीस अधिकारी श्री अशोक जगताप, मेट्रोच्या वतीने चर्चेला उपस्थित होते .
         " नागरी हक्क संघर्ष समिती " च्या वतीने ड्याशिंग नेतृत्व असलेले श्री. नंदन पाटील माजी सरपंच दापोडे, ए टी पाटील, समाज सेवक, मनेश तरे, माजी सरपंच गुंदवली, कोपर गावचे विद्यमान उपसरपंच श्री.भारत गुरूनाथ पाटील ,श्री. संजय पाटील, पुर्णा गावचे माजी सरपंच अनिल खंडागळे साहेब, महिला सदस्या भारती भोईर मॅडम उपस्थित होत्या.
*या सात दिवसात रस्ता दुरूस्ती चे काम पुर्ण केले जाईल , असे आश्वासन मेट्रो प्रकल्प अधिकारी  श्री.सिंग  यांनी सांगितले.
         जर रस्त्याचे कामाला सुरुवात  " न " केल्यास पुन्हा जण आंदोलन करण्याचा इशारा श्री. नंदन पाटील यांनी मेट्रो अधिकाऱ्यांना दिला आहे.
  ( नागरी हक्क संघर्ष समितीचे मान्यवर  )

अखेर आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ,वरप गावांना दिली भेट, अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदारांचा पुढाकार !

अखेर आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ,वरप गावांना दिली भेट, अनेक प्रश्न सोडविण्यासाठी तहसीलदारांचा पुढाकार !


कल्याण, (संजय कांबळे) : गेली अनेक वर्षे उल्हास नगर विधानसभा मतदारसंघात असलेल्या म्हारळ, वरप,कांबा या तीन गावांकडे दुर्लक्ष केलेले आमदार कुमार आयलानी यांनी आज अखेरीस म्हारळ, वरप  या गावाचे  मंडळांचे अध्यक्ष योगेश देशमुख यांच्या प्रयत्नाने या गावांना भेट देऊन येथील अडचणी, समस्या, व प्रश्न जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या, यावेळी त्यांचेबरोबरोबर कल्याण तहसीलदार दिपक आकडे, तलाठी श्रीमतीअमृता बडगुजर, कल्याण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विक्रम चव्हाण आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा ही तिन गावे आहेत, गेल्या दिडदोन वर्षात कोरोनाकाळात किंवा पुराच्या वेळी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार कुमार आयलानी यांनी या गावाकडे दुर्लक्ष केले होते, त्यामुळे ग्रामस्थांनमध्ये कमालीचा रोष आहे, आमदार दुर्लक्ष करित असल्याने स्थानिक कार्यकर्ते देखील नाराज होते, त्यांची मोठी अडचण व्हायची, तरीही ते त्यांच्या पातळीवर लोकांचे प्रश्न सोडवित होते.


आता गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे म्हारळ, वरप,कांबा या गावातील अनेक भागात पाणी भरुन लोकांचे नुकसान झाले आहे, तसेच एम एम आरडीने बांधलेला रस्ता, अर्धवट राहिलेली कामे यामुळे म्हारळ गावात सखल भागात पाणी भरले होते, त्यामुळे लोकप्रतिनिधी नी आपली विचारपूस, चौकशी करावी असे या परिसरातील नांगरिकांना वाटत होते, हे ओळखून या विभागाचे मंडळ  अध्यक्ष योगेश देशमुख यांनी आमदार कुमार आयलानी यांनी या गावांना भेट देण्याची विंनती केली. 

त्यानुसार आज आमदार कुमार आयलानी यांनी प्रथम म्हारळ गावात भेट दिली, यावेळी समाजसेवक महेश देशमुख यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, याप्रंसगी, व्यापारी मंडळी नी आमदार यांना निवेदन दिले, तर महेश देशमुख यांनी एम एम आरडीचे भोंगळ कारभारा विषयी लक्ष वेधले, तसेच एम एस बी, पोलीस ठाण्याबाबत अडचणी मांडल्या, मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी शिवाणींगर, राऊतचाळ, गोदावरी नगर, राधाकृष्ण नगरी,आण्णासाहेब पाटील नगर,बोडके चाळ,आदी भागातील नांगरीकांच्या अडचणी आमदार महोदया समोर मांडल्या, तर माजी सरपंच प्रमोद देशमुख यांनी लसीकरणा बाबतीत प्रश्न उपस्थित केला.

गावातील लोकांचे पुराच्या पाण्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी यावेळी तहसीलदारांकडे करण्यात आली, त्यांनी देखील तशा सूचना तलाठी अमृता बडगुजर यांना दिल्या, त्यामुळे लोकांमध्ये समाधान पसरले.

यांनतर आमदार कुमार आयलानी यांनी म्हारळ गावाच्या मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्यांची पाहणी केली,म्हारळ सोसायटी, सोनी लाँज जवळील नाला,ट्रू व्हाँली समोरील मुख्य नाला यांची पाहणी केली, व पाणी तुंबण्यांची कारणे जाणून घेतली,यावर उपाय म्हणून सर्व विभागांचे प्रमुख, तसेच ग्रामपंचायत यांची एक मिंटिंग आयोजित करून एक प्लॅन तयार करावा, असा निर्णय घेण्यात आला.

आमदार कुमार आयलानी यांचा म्हारळ दौरा आटोपल्यावर, वरप ग्रामपंचायतीला भेट देण्यात आली, यावेळी कचरा टाकण्याच्या जागेचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला, यावर तहसीलदार दिपक आकडे यांनी या तीन गावांचा हा मोठा प्रश्न आहे, भविष्यात तो अडचणी चा ठरणार आहे, त्यामुळे कांबा गावातील सरकारी जागा शोधा ,या तिन्ही ग्रामपंचायतीचे ठराव घ्या, मी व आमदार महोदय आम्ही जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर याची भेट घेऊन हा प्रश्न कायचा निकाली काढतो असे अश्वासन त्यांनी यावेळी दिले.यावेळी म्हारळ येथील पाहणी दौऱ्यात माझी सभापती, रंजना देशमुख, जिप सदस्या वैशाली शिंदे,वृशाली शेवाळे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद देशमुख, योगेश देशमुख, समाजसेवक महेश देशमुख जितू देशमुख,महेश खोत, सदस्या अमृता देशमुख अस्मिता जाधव,,, विकास पवार, आदी मंडळी उपस्थित होते.

मनसेने पर प्रांतीयांच्या विरोधातील भूमिका बदलायला हवी --चंद्रकांत पाटील.

मनसेने पर प्रांतीयांच्या विरोधातील भूमिका बदलायला हवी --चंद्रकांत पाटील.


भिवंडी,( कोपर ) दिं.27, अरुण पाटील :
         मनसे आणि भाजप आगामी काळात युती करतील अशा चर्चा रंगत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या मुलाखतीची एक लिंक पाठवली आहे. मनसेशी युती करायला आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही पण राज ठाकरे यांनी परप्रांतियांच्या विरोधातील भूमिका बदलायला हवी असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीतची लिंक चंद्रकांत पाटील यांना पाठवली आहे.
            यामध्ये पर प्रांतीयांच्या विरोधात माझी काय भूमिका आहे हे तुम्ही पहावं असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पण चंद्रकांत पाटील हे सध्या पूर परिस्थितीचा आढावा घेत असल्यामुळे अद्याप त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण मनसे आणि भाजप मधील या हालचालींमुळे दोन्ही पक्षांमध्ये युती होईल असं बोललं जात आहे.
            खरंतर, राज्यात शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची युती तुटल्यानंतर आता भाजप मनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची धावती भेट झाली . या भेटीनंतर युतीच्या चर्चा आणखी रंगल्या. त्यात आता राज ठाकरेंनी पाठवलेल्या लिंकमुळे पुढे काय घडामोडी होतील  हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
        पर प्रांतीयांबाबत आपण मांडलेल्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगून राज ठाकरे यांनी बिहारमध्ये झालेले त्यांचे भाषण ऐकल्याचा सल्ला आपल्याला दिला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. 'तुमच्या भाषणाची लिंक द्या, मी शांतपणे ती ऐकेन आणि त्यातील मुद्द्यांवर विचार करीन,' असे आपण राज यांना सांगितल्याचेही पाटील म्हणाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी पाठवलेल्या लिंकनंतर दोन्ही पक्षांमध्ये घरोबा होतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

Monday 26 July 2021

कल्याण तालुक्यात सर्दी तापाचा पूर, खाजगी सरकारी दवाखाने हाऊसफुल्ल!

कल्याण तालुक्यात सर्दी तापाचा पूर, खाजगी सरकारी दवाखाने हाऊसफुल्ल!


कल्याण, (संजय कांबळे) : उल्हास, बारवी, भातसा आणि काळू या नद्याचा पुर येवून गेल्या नंतर कल्याण तालुक्यात विविध प्रकारच्या साथीच्या आजाराने डोकं वर काढलं असून गोवेली ग्रामीण रुग्णालयासह इतरही खाजगी दवाखाने पेंशट नी हाऊसफुल्ल झाले आहेत.


गेल्या दोन दिवसापूर्वी कल्याण तालुक्यातील बारवी, काळू, भातसा आणि उल्हास नदीना पूर आले होते, नदी नाले, एकत्र येवून जणू काय मानवजातीवर हल्ला केला असे वाटत होते, वरुणराजा इतका कोपला की त्यांच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला त्यानें आडवे केले. काहींना बरोबर घेऊन गेले, यातून रस्ते, शेती,घरे लाईटचे पोल,वायरी,, अथवा वस्तू असे काही ही वाचले नाही, खडवली, राया ओझर्ली, रायते, घोटसई मानिवली, म्हारळ, वरप,कांंबा, या गावातील, मोरयानगर, गावभाग,ओमसाईबाबानगर, शिवशक्ती काँलनी, शिवाणी नगर, आण्णासाहेब पाटील नगर,म्हारळ सोसायटी, राधाकृष्ण नगरी, आदी परिसरातील घरामध्ये पाणी भरले,कल्याण मुरबाड मार्गावर म्हारळ सोसायटी, बंजरंग हार्ड वेअर,मारुती मंदिर,टाटा पावर हाऊस, मेरिडियन स्कूल, सीएनजी पंप रायते पुल, आदी  ठिकाणी पाणी भरले होते, तसेच अनेक सखल भागात पाणी भरले पण ,पुराचे पाणी ओसरल्यावर मात्र कच-याचे ढिग सर्वत्र दिसत होते. त्यामुळे सगळ्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे,

जागोजागी कच-याचे ढिग,पाण्याचे डबके, गटारे, नाले, यामुळे डास, मच्छर,दूषित पाणी, त्यातच पुराच्या वेळी पावसात भिजल्याने ,शेतीच्या कामातून थकलेले, चिंबभिजलेले लहान मुले, तरुण, वयोवृद्ध स्त्री पुरुष सर्दी, ताप,खोकला,ने आजारी पडले आहेत. आज गोवेली ग्रामीण रुग्णालयात पेंशट नी तूफान गर्दी केली होती, यासह प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली, दहागाव, निळजे येथेही पेंशट मोठ्या प्रमाणात होत, तसेच बिर्लागेट, धोबीघाट,टिटवाळा येथील खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आधीच कोरोना चे संकट त्यात आता हे सेम लक्षणें असणारे विविध आजार ,आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवणार आहे.

महाड, पोलादपूर भागातील पूरग्रस्तांना ठाणे महानगरपालिकेची मदत रवाना !

महाड, पोलादपूर भागातील पूरग्रस्तांना ठाणे महानगरपालिकेची मदत रवाना !


ठाणे : रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर येथे पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतकार्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य, घनकचरा, पाणी विभागाचे १०० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी आज रवाना करण्यात येत असल्याची माहितीभ महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली. राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेची विविध पथके महाडला रवाना होत आहेत. महापालिका आयुक्तांच्या नियंत्रणाखाली स्थानिक जिल्हा प्रशासन, अतिरिक्त आयुक्त(१) व अतिरिक्त आयुक्त (२) यांच्या समन्वयाने ही पथके मदत कार्य करणार आहेत.
या विविध पथकातंर्गत आरोग्य पथक पाठविण्यात येणार असून या पथकामध्ये कोविड, साथ रोग आणि ताप सर्वेक्षणासाठी स्वतंत्र वैद्यकीय पथके पाठविण्यात येणार आहेत. या पथकांसोबत १० हजार रॅपीड ॲंटीजन टेस्टींग कीटस्, मलेरिया, डेंग्यू, लेप्टोस्पायरोसीस टेस्टींग कीटस्, तीन डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय आणि मोठ्या प्रमाणात औषध साठा पाठविण्यात येणार आहे. साफसफाई, फवारणीसाठी सफाई कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, फायलेरिया कर्मचारी तसेच त्यांच्यासोबत २४ पंप, ४ स्प्रेईंग मशीन, ४ फॉगिंग मशीन, सोडियम हायपोक्लाराईड व फवारणीसाठी लागणारे सर्व रसायणे आदीसह सुसज्ज ९० कर्मचाऱ्यांचे पथक पाठविण्यात येत आहे. तेथील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी १० हजार लिटर्स पाण्याचा एक टॅंकर आणि स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा १० हजार लिटर्स क्षमतेचा एक टॅंकर असे एकूण दोन टॅंकर पाठविण्यात येत आहे.

तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे दोन ट्रक, रेशनिंग, किटस्, ५ हजार सतरंजीही पाठविण्यात येणार आहेत. मृत जनावरांचे पंचनामे करून त्यांची तातडीने विल्हेवाट लावता यावी यासाठी महापालिकेच्या पशू वैद्यकीय अधिकारी आणि त्यांची टीमही रवाना होत असून या सर्व पथकांसोबत महापालिकेच्या ८ ते ९ मिनी बसेस, दोन डंपर, २ ट्रक, ४ जीप आणि इतर साहित्य पाठविण्यात येणार आहे. दरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ठाणे महानगरपालिकेच्या टीडीआरएफ जवानांचे एक पथक पहिल्या दिवसांपासून मदत कार्यात गुंतले असून खुद्द पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे महापौर नरेश गणपत म्हस्के हे दोन दिवस महाड येथे तळ ठोकून मदत कार्यावर लक्ष ठेवून होते. महापालिकेची ही विविध पथके उपनगर अभियंता गुणवंत झांबरे आणि आगार व्यवस्थापक दिलीप कानडे यांच्या अधिपत्त्याखाली रवाना होणार असून ही पथके स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने मदत कार्य करणार आहेत. 

शोक सभेचे आयोजन !

शोक सभेचे आयोजन !


टिटवाळा, उमेश जाधव -: येथील दुग्ध,शेती व हॉटेल व्यावसायिक मारूती देशेकर यांचे नुकतेच १९ जूलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. या निमित्ताने ३१ जूलै रोजी शोकसभेचे आयोजन केले आहे.

टिटवाळा एज्युकेशनल कल्याणकारी फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय देशेकर यांचे वडील कै. मारूती देशेकर यांचे शनिवार दिनांक १९ जूलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्याचे वय ६२ वर्षे होते. त्यांच्या अंत्ययात्रेला सामाजिक, राजकीय व आर्थिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशेकर यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाची छाया पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी सुलाई, संतोष, विनोद, विजय असे तीन मुल व एक मुलगी, तीन सूना व नातवंडे असा परीवार आहे. त्यांचे उत्तरकार्य शनिवार दिनांक ३१ जुलै रोजी राहत्या घरी होणार असून, त्याच दिवशी सकाळी  ११ वा शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

Sunday 25 July 2021

दिलासादायक; राज्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला !

दिलासादायक; राज्यात रुग्णवाढीचा वेग मंदावला ! 


मुंबई, २५ जुलै : महाराष्ट्रात आज दिवसभरात ६ हजार ८४३ नवे कोरोना रुग्ण आढळले आणि १२३ मृत्यू झाले. राज्यातील कोरोना रुग्णांपैकी ५ हजार २१२ जण दिवसभरात बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर २.०९ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट १३.३७ टक्के, रिकव्हरी रेट ९६.३३ टक्के आहे. आतापर्यंत राज्यात झालेल्या ४ कोटी ६८ लाख ४६ हजार ९८४ कोरोना चाचण्यांपैकी ६२ लाख ६४ हजार ९२२ पॉझिटिव्ह आल्या. कोरोनामुळे राज्यात ५ लाख १७ हजार ३६२ जण होम क्वारंटाइन आणि ३ हजार ५०६ जण संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाबाधीत झालेल्या ६२ लाख ६४ हजार ९२२ पैकी ६० लाख ३५ हजार २९ जण बरे झाले.

राज्यात १ लाख ३१ हजार ५५२ कोरोनामृत्यू झाले आणि महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांपैकी ३ हजार ३५६ जणांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे राज्य शासनाने सांगितले. सध्या महाराष्ट्रात ९४ हजार ९८५ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

महामारीमुळे मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम ! देशात वयाच्या दहाव्या वर्षापासून मुले सोशल मीडियावर सक्रिय !

महामारीमुळे मुलांच्या शिक्षणावर नकारात्मक परिणाम ! देशात वयाच्या दहाव्या वर्षापासून मुले सोशल मीडियावर सक्रिय !


दिल्ली : नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (एनसीपीसीआर) ने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राबविलेल्या लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या वापरावर अभ्यास केला आहे.

यात असे आढळले की, 10 वर्षांपेक्षा कमी वयाची मुलेदेखील सोशल मीडियावर सक्रिय आहेत.
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सच्या अभ्यासानुसार, देशात दहा वर्षांखालील 37.8% मुलांचे फेसबुक अकाउंट आहे. समान वयोगटातील 24.3 टक्के मुले इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. एनसीपीसीआरचे म्हणणे आहे की, हे विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे तयार केलेल्या निकषांच्या अगदी विरोधात आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर खाते उघडण्याचे किमान वय 13 वर्षे वयोमर्यादेची अट आहे.

एनसीपीसीआरने केलेल्या अभ्यासानुसार  बर्‍याच मुलांना त्यांच्या पालकांच्या मोबाइल फोनद्वारे सोशल मीडिया आणि इंटरनेटवर एंट्री मिळते. या अभ्यासामध्ये एकूण 5,811 जणांचा समावेश होता. यामध्ये 3,491 मुले, 1534 पालक, 786 शिक्षक आणि 60 शाळांचा समावेश करण्यात आला आहे.
सर्वेक्षणात असे सांगितले गेले आहे की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बर्‍याच प्रकारचे कंटेंट आहेत, त्यापैकी बर्‍याच मुलांसाठी ते योग्य नाहीत. म्हणूनच यासंदर्भात योग्य निरीक्षण व कठोर नियमांची आवश्यकता आहे.

सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांना असे वाटते की, साथीच्या आजारामुळे त्यांचे शिक्षण प्रभावित झाले आहे आणि ऑनलाईन शिक्षण पुरेसे नसून ते चांगल्या पद्धतीने होतही नाहीये.

मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्मालाटेची शक्यता : बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी

मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्मालाटेची शक्यता : बचावासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी मुंबई, प्रतिनिधी  :- उद्या बुध...