Thursday, 29 July 2021

सरकारने पूरग्रस्तांना केली दहा हजारांची मदत जाहीर.!

सरकारने पूरग्रस्तांना केली दहा हजारांची मदत  जाहीर.!


भिवंडी, दिं.29,अरुण पाटील, कोपर :
         राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कोकणआणि पश्चिम महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर राज्य सरकारने पूरग्रस्तांना 10 हजार रुपयांची  मदत जाहीर केली आहे. दरम्यान आनंदाची बातमी म्हणजे शुक्रवार पासून म्हणजेच उद्यापासून 10 हजारांची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार  यांनी दिली.
          विजय वडेट्टीवार यांनी या मदती संदर्भातली माहिती दिली आहे. वडेट्टीवार म्हणाले की, पूरग्रस्तांना तातडीनं मदत जाहीर केली आहे. पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून 10 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. रोख रकमेचं वाटप केलं तर पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे उद्या पासूनच पूरग्रस्तांच्या थेट खात्यात हे पैसे जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
     तातडीनं पंचनामे करुन 8 दिवसात अहवाल देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. हा अहवाल केंद्राला पाठवण्याचे आदेश देण्यात आलेत. या पावसामुळे 4 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचंही ते म्हणाले.
               नांदेडमध्ये 80 हजार हेक्टर शेतीचं नुकसान झालं असून तिथे एकाच दिवशी 166 मिलीमीटर पाऊस पडला. काही ठिकाणी तर 400 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर कोयनाच्या परिसरात 48 तासात 1072 मिलीमीटर पाऊस झाला आणि 17 टीएमसी पाणी साठ्याची वाढ झाली. ढगफुटीपेक्षा हे भयानक आहे. निसर्गाचं बॅलन्स बिघडल्याची ही परिस्थिती आहे. म्हणून अनेक समित्यांचा अभ्यास करावा लागणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...