Saturday, 31 July 2021

नाथा शेवाळे यांची जनता दल (से) च्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड !

नाथा शेवाळे यांची जनता दल (से) च्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
        महाराष्ट्र प्रदेश जनता दल(सेक्युलर) युवा प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांची त्याच्या कार्याची दखल घेऊन माजी पंतप्रधान व राष्ट्रीय अध्यक्ष एच.डी.देवेगौडा यांनी जनता दलाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड केली असून त्याच्या स्वाक्षरीने पत्र त्यांना दिल्ली येथील निवासस्थानी देण्यात आले आहे.

 श्री शेवाळे हे जनता दलाचे गेली २५ वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून त्याची राज्यभर ओळख आहे. ते यापूर्वी प्रदेश जनता दलाचे युवा प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.त्यावेळी त्यांनी राज्यभर युवकांच्या प्रश्नाबाबत आवाज उठविला असून शेतकरी पेंशन संबंधी यात्रा काढली. शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्यांक, आदिवासी, प्रकल्पग्रस्त या घटकासाठी त्यांनी अनेक लढे उभारले आहेत. त्याच्या या निवडीने महाराष्ट्रातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी निश्चित फायदा होणार असल्याने राज्यभरात कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त होत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष प्रा.शरद पाटील, प्रधान सचिव प्रताप होगाडे, राष्टीय उपाध्यक्ष श्रीपतराव शिंदे, सचिव पी डी जोशी, अजमल खान, ऍड रेवन भोसले, तसेच मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, संजीवकुमार सदानंद, किरण छिद्रवाल, सुहास बने, किरण शेठ, ज्योती बडेकर, भगवान साळवी आदी पदाधिकारी आणि इतर सामाजिक संघटनांकडून प्रत्यक्ष भेटून, फोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...