Wednesday, 28 July 2021

ठाणे -मुंब्रा येथील एका तरुणाचा सापाशी खेळतांना सर्पदंशाने मृत्यू.!

ठाणे -मुंब्रा येथील एका तरुणाचा सापाशी खेळतांना  सर्पदंशाने मृत्यू.!


अरुण पाटील, दिं.28, भिवंडी, (कोपर ) ;
              विषारी साप हाताळन्याचे कौशल्य नसताना देखील सापा सोबत खेळताना एका तरुणाचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला आहे.
         ठाण्यातील - मुंब्रा परिसरात ही घटना घडली आहे. सर्पदंशानंतर या तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
                 मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोहम्मद शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. तो मुंब्रा परिसरात रहात होता. मुंब्रा परिसरात असलेल्या डोंगराळ भागात पावसामुळे झाडाझुडपात लपलेले साप पाण्याच्या प्रवाहाने उघड्यावर येतात तसेच या भागात डोंगर माथ्यावर अनधिकृत झोपड्या बांधण्यात आल्या आहेत. या परिसरात वन्य प्राण्यांचा वावर सर्रास दिसून येतो.
           या ठिकाणी मोहम्मद शेख या तरुणाला एक साप दिसला आणि त्याने तो पकडला. सापाला पकडल्यानंतर तो त्याच्या सोबत खेळू लागला. हा सर्व प्रकार मोहम्मद शेख याचे दुसरे मित्र मोबाइल कॅमेऱ्यात शूट करत होते. मोहम्मदने सापाला पकडून तो त्याच्याशी खेळ करत होता या दरम्यान मोहम्मदला स्थानिकांनी फटकारले देखील पण तरीही मोहम्मद काही ऐकत नव्हता. त्याच दरम्यान तीन वेळा मोहम्मदला या सापने दंश केला मात्र त्याला समजले नाही. काही वेळाने मोहम्मदने या सापाला जंगलात सोडून दिले. काही वेळाने मोहम्मदला त्रास होऊ लागला आणि तो बेशुद्ध झाला. यावेळी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, मोहम्मदचा मृत्यू झाला.

No comments:

Post a Comment

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...