Friday, 30 July 2021

शेकापचे ज्येष्ठ नेते मा. आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन!

शेकापचे ज्येष्ठ नेते मा. आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन!



पुणे : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं आज निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज रात्री ९ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

सोलापूरमधील अश्विनी रुग्णालयात काही दिवसांपूर्वी त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया पार पडली होती. मात्र तेव्हापासूनचं देशमुख यांच्या प्रकृतीत सतत चढ- उतार होत होते. मात्र आज त्यांचे नातू डॉ.अनिकेत देशमुख यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी याबाबत माहिती दिली आहे. आबासाहेब देशमुख यांच्या जाण्याने आमच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. राजकारणामध्ये ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलं त्यांच्या सगळ्यांसाठीच हा मोठा धक्का आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आबासाहेबांची प्रकृती आत्तापर्यंत चांगली होती. पण आज रात्री ९ वाजता आबासाहेबांचं निधन झालं.'

१० ऑगस्ट १९२६ ला त्यांचा जन्म झाला होता. १९६२ ला त्यांनी सांगोल्यातून सर्वात प्रथम निवडणूक लढवली. त्यानंतर पुढे ते ११ वेळा आमदार झाले. सर्वाधिक वेळा आमदार होण्याचा विक्रमही त्यांच्याच नावावर आहे. आबा या नावाने ते सगळ्या महाराष्ट्रात परिचित होते. गणपतराव देशमुख यांनी राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यापासूनच ते शेतकरी कामगार पक्षातच होते. 

No comments:

Post a Comment

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !!

श्री गोरक्षनाथ महाराज उत्सव सोहळ्याचे आयोजन !! पेण, (पंकजकुमार पाटील) - खारेपाट भागातील विठ्ठल नगर या गावात दरवर्षी प्रमाणे नाथस...