Tuesday, 27 July 2021

मनसेने पर प्रांतीयांच्या विरोधातील भूमिका बदलायला हवी --चंद्रकांत पाटील.

मनसेने पर प्रांतीयांच्या विरोधातील भूमिका बदलायला हवी --चंद्रकांत पाटील.


भिवंडी,( कोपर ) दिं.27, अरुण पाटील :
         मनसे आणि भाजप आगामी काळात युती करतील अशा चर्चा रंगत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या मुलाखतीची एक लिंक पाठवली आहे. मनसेशी युती करायला आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही पण राज ठाकरे यांनी परप्रांतियांच्या विरोधातील भूमिका बदलायला हवी असं मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं होतं. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीतची लिंक चंद्रकांत पाटील यांना पाठवली आहे.
            यामध्ये पर प्रांतीयांच्या विरोधात माझी काय भूमिका आहे हे तुम्ही पहावं असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे. पण चंद्रकांत पाटील हे सध्या पूर परिस्थितीचा आढावा घेत असल्यामुळे अद्याप त्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण मनसे आणि भाजप मधील या हालचालींमुळे दोन्ही पक्षांमध्ये युती होईल असं बोललं जात आहे.
            खरंतर, राज्यात शिवसेना आणि भाजप या दोन पक्षांची युती तुटल्यानंतर आता भाजप मनसेसोबत युती करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यात नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची धावती भेट झाली . या भेटीनंतर युतीच्या चर्चा आणखी रंगल्या. त्यात आता राज ठाकरेंनी पाठवलेल्या लिंकमुळे पुढे काय घडामोडी होतील  हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
        पर प्रांतीयांबाबत आपण मांडलेल्या भूमिकेचा विपर्यास करण्यात आल्याचे सांगून राज ठाकरे यांनी बिहारमध्ये झालेले त्यांचे भाषण ऐकल्याचा सल्ला आपल्याला दिला, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. 'तुमच्या भाषणाची लिंक द्या, मी शांतपणे ती ऐकेन आणि त्यातील मुद्द्यांवर विचार करीन,' असे आपण राज यांना सांगितल्याचेही पाटील म्हणाले होते. त्यामुळे राज ठाकरे यांनी पाठवलेल्या लिंकनंतर दोन्ही पक्षांमध्ये घरोबा होतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

No comments:

Post a Comment

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम...

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम... मुरबाड- (योगेश्वरी मणी)  येथील जिल्हा परिषद प्राथमिक ...