Monday, 26 July 2021

कल्याण तालुक्यात सर्दी तापाचा पूर, खाजगी सरकारी दवाखाने हाऊसफुल्ल!

कल्याण तालुक्यात सर्दी तापाचा पूर, खाजगी सरकारी दवाखाने हाऊसफुल्ल!


कल्याण, (संजय कांबळे) : उल्हास, बारवी, भातसा आणि काळू या नद्याचा पुर येवून गेल्या नंतर कल्याण तालुक्यात विविध प्रकारच्या साथीच्या आजाराने डोकं वर काढलं असून गोवेली ग्रामीण रुग्णालयासह इतरही खाजगी दवाखाने पेंशट नी हाऊसफुल्ल झाले आहेत.


गेल्या दोन दिवसापूर्वी कल्याण तालुक्यातील बारवी, काळू, भातसा आणि उल्हास नदीना पूर आले होते, नदी नाले, एकत्र येवून जणू काय मानवजातीवर हल्ला केला असे वाटत होते, वरुणराजा इतका कोपला की त्यांच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला त्यानें आडवे केले. काहींना बरोबर घेऊन गेले, यातून रस्ते, शेती,घरे लाईटचे पोल,वायरी,, अथवा वस्तू असे काही ही वाचले नाही, खडवली, राया ओझर्ली, रायते, घोटसई मानिवली, म्हारळ, वरप,कांंबा, या गावातील, मोरयानगर, गावभाग,ओमसाईबाबानगर, शिवशक्ती काँलनी, शिवाणी नगर, आण्णासाहेब पाटील नगर,म्हारळ सोसायटी, राधाकृष्ण नगरी, आदी परिसरातील घरामध्ये पाणी भरले,कल्याण मुरबाड मार्गावर म्हारळ सोसायटी, बंजरंग हार्ड वेअर,मारुती मंदिर,टाटा पावर हाऊस, मेरिडियन स्कूल, सीएनजी पंप रायते पुल, आदी  ठिकाणी पाणी भरले होते, तसेच अनेक सखल भागात पाणी भरले पण ,पुराचे पाणी ओसरल्यावर मात्र कच-याचे ढिग सर्वत्र दिसत होते. त्यामुळे सगळ्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे,

जागोजागी कच-याचे ढिग,पाण्याचे डबके, गटारे, नाले, यामुळे डास, मच्छर,दूषित पाणी, त्यातच पुराच्या वेळी पावसात भिजल्याने ,शेतीच्या कामातून थकलेले, चिंबभिजलेले लहान मुले, तरुण, वयोवृद्ध स्त्री पुरुष सर्दी, ताप,खोकला,ने आजारी पडले आहेत. आज गोवेली ग्रामीण रुग्णालयात पेंशट नी तूफान गर्दी केली होती, यासह प्राथमिक आरोग्य केंद्र खडवली, दहागाव, निळजे येथेही पेंशट मोठ्या प्रमाणात होत, तसेच बिर्लागेट, धोबीघाट,टिटवाळा येथील खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल झाल्याचे दिसून येत होते. त्यामुळे आधीच कोरोना चे संकट त्यात आता हे सेम लक्षणें असणारे विविध आजार ,आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढवणार आहे.

No comments:

Post a Comment

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम...

शिक्षण स्वाभिमानी संघटना आणि श्रमिक (मु.) पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम... मुरबाड- (योगेश्वरी मणी)  येथील जिल्हा परिषद प्राथमिक ...