Wednesday, 28 July 2021

कल्याण महसून विभागाकडून पूरग्रस्त भागांचे पंचनामे सुरू..! "तहसीलदार दिपक आकडे" यांनी दिले तलाठ्यांना केल्या सूचना.. 'मांडा-टिटवाळ्यात ८१८ घरांचे पंचनामे पूर्ण'

कल्याण महसून विभागाकडून पूरग्रस्त भागांचे पंचनामे सुरू..!

"तहसीलदार दिपक आकडे" यांनी दिले तलाठ्यांना केल्या सूचना.. 'मांडा-टिटवाळ्यात ८१८ घरांचे पंचनामे पूर्ण'


टिटवाळा, उमेश जाधव -: गेल्या तीन-चार  दिवसांत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील काळू, भातसा,  उल्हास व बारवी या नद्यांना पूर येऊन नदीकिनारी आणि खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांच्या घरांचे, शेतीचे तसेच इतर मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. या झालेल्या या नुकसानाचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने व कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांच्या सूचनेनुसार कल्याण महसूल विभागा कामाला लागले आहे.


पुरामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना भरपाई देण्यासाठी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश राज्य शासनाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांनी कल्याण तालुक्यातील पूरग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश सर्व मंडळ अधिकारी व तलाठ्यांना दिले आहेत. त्यानुसार शनिवारपासून पूरग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे करण्यास सुरुवात झालीआहे. त्यामुळे पूरग्रस्तांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. 


कल्याणमधील खडवली, मांडा, टिटवाळा, रायते, कांबा, वरप, म्हारळ, वडवली, अटाळी, आंबिवली आदी परिसरातील घरांमध्ये पाणी शिरल्याने येथील रहिवाशांचे मोठे नुकसान झाले. त्याचे पंचनामे कल्याण तहसीलच्या महसूल विभागाच्या वतीने करण्यास सुरूवात झाली आहे. त्यानंतर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे देखील करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार दीपक आकडे यांनी दिली. 

टिटवाळा येथील जावई पाडा, शिवशाही नगर, वारघडे नगर, बालाजी नगर, रूक्मिणी नगर याठिकाणी पंचनामे झाले असून २५६ लोकांच्या घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. 
तर मांडा येथील वासुंद्री रोड लगत असणाऱ्या सिध्दीविनायक नगर ५६२ घरांचे पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यावेळी मंडळ अधिकारी संजय साळुंखे, तलाठी योगेश पुराणी, तलाठी प्रशांत चौघुले, तलाठी शंकर साळवी, तलाठी संचिन पानसरे व सहाय्यक रोहित गायकर यांनी काम पाहीले.

No comments:

Post a Comment

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !!

न्हावा गावदेवीची भव्य यात्रा मोठ्या भक्ती भावाने साजरी !! ** ३१ तास चाललेल्या पालखी सोहळ्यात ग्रामस्थांनी देवीचे शांततेत दर्शन घेत हजारो भाव...