Wednesday, 28 July 2021

टिटवाळयात रस्त्यावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह !!

टिटवाळयात रस्त्यावर आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह !!


टिटवाळा, उमेश जाधव -: कल्याण तालुका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या टिटवाळा पूर्वेकडील बल्याणीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मधुबन सोसायटीच्या परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे टिटवाळा परीसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गणेशनगर येथे राहणारे टेम्पो चालक अक्षय आलाट हे नेहमीप्रमाणे टेम्पोचे भाडे मारून घरी जात असताना रात्री साडे दहा च्या सुमारास सिद्धिविनायक दुकानासमोर त्यांना एक अनोळखी इसम  झोपलेल्या अवस्थेत आढळला. सदर इसम काही हालचाल करीत नसल्याने आलाट यांनी जवळ जाऊन पाहिले. 
त्यांनी सदर इसमास आवाज दिला पण त्याने काहीही प्रतिसाद न दिल्याने त्यांची खात्री झाली की अनोळखी इसम मृत्यू झाला असावा. त्यांनी या घटनेबाबत कल्याण तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन टिटवाळा येथे माहिती दिली. या बेवारस पुरुषाचे वय अंदाजे ४५ वर्ष असून चेंबूर मुंबई येथील आहे. सरळ नाक, रंग गव्हाळ वर्ण, उंची पाच फूट, अंगाने बारीक पोटाच्या उजव्या बाजूस ऑपरेशनची खुण, अंगात राखाडी पिवळसर रंगाचा शर्ट त्यावर चौकटी डिझाईन असून निळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे. तरी असे वर्णन असलेली व्यक्ती कुणाच्या ओळखीत असल्यास अथवा नातेवाईक असल्यास ओळख पटण्यासाठी टिटवाळा पोलीस स्थानकात संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. संपर्क : ०२५१२ ३८१३२0

No comments:

Post a Comment

न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळणे आवश्यक !!

न्हावा ग्रामस्थांना विमानतळ प्रकल्पात नोकरीत प्राधान्य मिळणे आवश्यक !! ** आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांचे मत उरण ...