Friday 29 January 2021

ठाणे जिल्ह्यातील एकमेव निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड प्रतिबंधक लसीकरण सुरू !

ठाणे जिल्ह्यातील एकमेव निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोवीड प्रतिबंधक लसीकरण सुरू!


कल्याण (संजय कांबळे) संपूर्ण जगाला हादरून सोडणा-या कोरोना विरोधातील प्रतिबंधक लसीकरणाला ठाणे जिल्ह्यातील एकूण ३३ प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी केवळ तालुक्यातील निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीकरणाची मंजुरी मिळाली असून आज वरप येथील अंगणवाडी कर्मचारी व आरोग्य विभागाच्या आशा वरकर यांना लस टोचण्यात आली.


कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगात हाहाकार माजला होता. अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारने वेळीच सावध उपाययोजना केल्या मुळे कोरोना आटोक्यात आला. यामध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका व मदतनीस, आशा वरकर, ग्रामसेवक यांचा सिंहाचा वाटा आहे. आता कोरोनाला कायमचा हद्दपार करण्यासाठी आरोग्य कर्मचारी यांना राज्यात कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहिम सुरू झाली आहे.


ठाणे जिल्हात ३३प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. परंतु यातील कल्याण तालुक्यातील केवळ निळजे प्राथमिक आरोग्य केंद्रास लसीकरण करण्याची मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार २५ जानेवारी पासून या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सेंटर सुरू झाले आहे. निळजे आणि दहागाव या दोन प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी सांभाळणारे डॉ रमेश राठोड यांच्या नेतृत्वाखाली हे लसीकरण सुरू असून आज म्हारळ, वरप, कांबा आणे भिसोळ, मामणोली, आदी गावातील अंगणवाडी कर्मचारी व आशा वरकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली. यामध्ये श्रीमती वनिता कांबळे, सुधा विशे, सरिता कुर्ले, सिंधू गोंधळे, वैजयंती मोहफे, सुजाता बनकरी, रंजना सुरोशे, आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. 
तर या लसीकरण मोहिमेचे नेतृत्व डॉ रमेश राठोड यांनी केले होते तर यांना सहकार्य दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सायली जाधव, डॉ मेघा चव्हाण, डॉ नेहा मोघे, व्हक्शीनेशन आॅफिसर रुपाली शिंदे, लसटोचक मोनिका गंभीरराव, राजेश थोरात, प्रशांत गुजर, आदी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. 
गेल्या २५ जानेवारी पासून सुरू असलेले हे सेंटर २७,२८ आणि २९ जानेवारी होते. असे या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ रमेश राठोड यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...