Friday 29 January 2021

टिटवाळा परिसरातून दुर्मिळ हिरव्या रंगाच्यागवत्या सापाची सुटका.. छायाचित्र ऋषिकेश चौधरी

टिटवाळा परिसरातून दुर्मिळ हिरव्या रंगाच्यागवत्या सापाची सुटका.. छायाचित्र ऋषिकेश चौधरी 


कल्याण, प्रतिनिधी : टिटवाळा शहरातील म्हसकल गावात काही आदिवासी पाडे आहेत तेथील नागरिक जंगलातून गवत कापायचे काम करत असतात अशाच एका आदिवासी महिलेने गवत आणले असता त्या गवताच्या गंजीतून हिरव्या रंगाचा साप आढळून आल्याने एकच गोंधळ उडाला घरातील महिला व इतर सदस्य भयभीत झाले सुरवातीला या सापाला मारण्याचा प्रयत्न घरातल्या पुरूष मंडळींनी केला परंतू साप डूख धरेल व बदला घेईल या भितीने कोणीच मारले नाही व सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले... 


वॉर रेस्क्यू फाऊडेशन च्या टिटवाळा शाखेच्या हेल्पलाईनवर फोन आल्यावर  स्वप्निल कांबळे, सुमित भडांगे व क्षितिज जाधव या सर्पमित्रांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व गवताच्या गंजीतून सुखरूपपणे सापाची सुटका केली तसेच हा बिनविषारी असून नागरिकांना कोणताच धोका नाही तसेच कोणत्याही साप अथवा वन्यजीव मारल्यावर वनविभागाकडून कडक शिक्षा होईल असे स्वयंसेवकांकडून सांगण्यात आले. साप डूख धरतो या अंधश्रद्धा असल्यानेच आज गवत्या सारख्या निरूपद्रवी सापाचा जीव वाचला गेला आहे असे सर्पमित्र स्वप्निल कांबले यांनी सांगीतले. व ह्या सापाला कल्याण वनविभागाच्या वनपाल एम डी जाधव यांच्या सुपुत केला 

गवत्या सापाची (ग्रीन किलबॅक) पाठ गवतासारखी हिरव्या रंगाची असून तिच्यावर काळे किंवा विखुरलेले पांढरट ठिपके असतात.  गवतात आणि झुडपात राहत असल्यामुळे शरीराचा हिरवा रंग पटकन लक्षात येत नाही. बेडूक आणि टोड हे गवत्या सापाचे भक्ष्य होय. पण क्वचित तो गोगलगायी किंवा लहान पक्षी खातो. त्यांचा मीलनकाल दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये असतो. मादी एका वेळेस ८-१५ अंडी घालते. जून ते सप्टेंबर या महिन्यांत पिल्ले जन्मतात. गवत्या साप सौम्य वृत्तीचा, निरुपद्रवी पण चपळ आहे. त्याला डिवचल्यावर पुष्कळदा तो शरीराचा पुढचा भाग उभारतो आणि मानेचा भाग नागाप्रमाणे चपटा व काहीसा रुंद करून फणा काढल्यासारखा भास करतो. म्हणून काही ठिकाणी त्याला हिरवा नाग असेही म्हणतात. 

ठाणे ग्रामीण भागातील टिटवाळा च्या जंगलात या सापाचा अनेक वर्षांनी अधिवास आढळून आल्याने निर्सगप्रेमीं मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...