Saturday 30 January 2021

पोलीस महासंचालकांच्या उपस्थित नियुक्तीपत्र ७४ पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात निवड !

पोलीस महासंचालकांच्या उपस्थित नियुक्तीपत्र ७४ पोलिसांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात निवड !


मुंबई(शांत्ताराम गुडेकर)

               ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ज्या पोलीस अंमलदारांचे करोना कालावधी व तत्पूर्वी पोलीस सेवेत कर्तव्यरत असताना दुर्दैवी निधन झालेले आहे, अशा पोलीस अंमलदारांच्या पाल्यांची अनुकंपा तत्त्वावर पोलीस दलामध्ये निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.त्याप्रमाणे दिनांक २९ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे "पोलीस महासंचालक मान. श्री हेमंत नगराळे" यांच्या हस्ते आज एकूण ७४ पोलीस पाल्याना नियुक्तीपत्र देण्यात आले आहेत.सदर प्रकारे पोलीस पाल्याना अनुकंपा तत्वावर प्रत्यक्ष मा. पोलीस महासंचालक महोदयांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्याचा  ठाणे शहर पोलीस कल्याण विभागाअंतर्गत आयोजित केलेला  राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.

त्याप्रमाणे साकेत या क्रीडांगणावर पार पडलेल्या या कार्यक्रमास नवनियुक्त ७४ पोलीस अंमलदार यांचे समवेत पाल्यांचे नातेवाईक, वरिष्ठ अधिकारी अंमलदार तसेच नागरिक, पत्रकार असे ५०० पेक्षा जास्त नागरिक सहभागी झाले होते.

        मा. पोलीस महासंचालक श्री हेमंत नगराळे यांनी  पदभार स्वीकारलेनंतर अशा प्रकारे प्रेरणादायी आणि पोलीस अधिकारी अंमलदार यांच्या कल्याणार्थ राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमा बाबत  समाधान व्यक्त करुन पूर्ण राज्यभरात अशा प्रकारे उपक्रम राबविणेचा मनोदय  आजच्या कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला आहे.

तसेच करोना कालावधीत ज्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष योगदान दिले आहे त्यांना करोना योद्धा म्हणून विशेष पोलीस पदक देवून गौरव करणे विषयी शासनास प्रस्ताव देणार असल्याचे सांगितले आहे.या कार्यक्रम प्रसंगी नव नियुक्त पोलीस अंमलदार यांनी मनोगत व्यक्त करताना पोलीस प्रशासनाने करोना काळात अडचणीच्या वेळी केलेल्या साहाय्य बाबत आभार व्यक्त करताना पालकांच्या जागेवर पोलीस सेवेत येताना गहिवरुन आल्याचे सांगितले.आजच्या या काहीशा भारावलेल्या आणि प्रेरणादायक कार्यक्रमात मा. पोलीस आयुक्त  विवेक फणसळकर यांनी या काळात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या स्मृती जागवून अतिशय अल्प कालावधीत ही नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल संबधितांचे कौतुक केले

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...