Saturday 30 January 2021

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ५ शहरात होणार थेट प्रक्षेपण !

९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ५ शहरात होणार थेट प्रक्षेपण !


नाशिक, प्रतिनिधी - गोखले शिक्षण संस्थेच्या आवारात लोकहितवादी मंडळातर्फे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. ते अधिकाधिक रसिकांपर्यंत पोचविण्याचा मंडळाचा मानस आहे. त्यासाठी मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये केले जाईल, अशी माहिती संमेलनाचे निमंत्रक तथा मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी दिली आहे.

दरम्यान, स्थळनिश्‍चितीनंतर सर्व्हेअर्सच्या माध्यमातून कामांनी वेग घेतला आहे. नाशिकमधील मराठी साहित्य संमेलन हा एक लोकोत्सव करण्याचा संकल्प लोकहितवादी मंडळाने सोडला असून, कोरोनानंतरच्या काळात होणारे हे संमेलन म्हणूनच महत्त्वाचे आहे. लोकांनी दिलेला प्रत्येक रूपया आमच्यासाठी महत्त्वाचा आणि अमूल्य आहे. तो सत्कारणी लावला जाईल, असे जातेगावकर यांनी सांगितले.

सध्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात केवळ पन्नास टक्के उपस्थितीला परवानगी आहे. मात्र केंद्र सरकार फेब्रुवारीमध्ये ही सवलत वाढविण्याची शक्यता असल्याने संमेलनाला ७५ टक्के अथवा शंभर टक्के उपस्थितीला परवानगी मिळू शकते.लोकसहभागातून साजरा होणाऱ्या सोहळ्यातील प्रत्येक रूपया सत्कारणी लावत नाशिकमध्ये होणारे तिसरे साहित्य संमेलन यशस्वी करणार, असा विश्‍वासही जातेगावकर यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...