Thursday 28 January 2021

लाखोंचा थाट 'दिव्यांचा असायचा झगमगाट' पण यंदा कोरोनाने लावली म्हसोबा यात्रेची वाट !! **म्हसा यात्रेत शेकडो वर्षात पहिल्यांदाच शुकशुकाट **

लाखोंचा थाट 'दिव्यांचा असायचा झगमगाट' पण यंदा कोरोनाने लावली म्हसोबा यात्रेची वाट !!                 **म्हसा यात्रेत शेकडो वर्षात पहिल्यांदाच शुकशुकाट ** 


मुरबाड-{मंंगल डोंगरे} : यंदा प्रथमतःच लाखो रुपयांच्या खर्चाच्या झगमगाटात लाखोंच्या जनसमुदायात प्रेक्षणीय ठरणारी महाराष्ट्रातील एकमेव असणारी मुरबाड तालुक्यातील खांबलिंगेश्वर म्हसोबाची यात्रा यंदा पहिल्यांदाच कोरोना संकटामुळे संपुष्टात  येवून यात्रे ठिकाणी शुकशुकाट पहावयास मिळत असुन  शेकडो वर्षांची परंपरा असलेली व संपूर्ण महाराष्ट्रात गुरांचा बाजार म्हणून सुप्रसिद्ध असलेली तालुक्यातील ' म्हसोबाची यात्रा 'यंदा कोरोणाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवल्याने म्हसोबा यात्रेत होणारी करोडो रूपयांची उलाढाल न झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या म्हसोबा मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिसरात शुकशुकाट पसरला आहे.


             तालुक्यातील म्हसा येथे पौष पौर्णिमेपासून भरणाऱ्या म्हसोबाच्या यात्रेत महाराष्ट्रासह गुजरात व कर्नाटक येथून लाखोंच्या संख्येने भावीक येत असतात. या यात्रेत शेतकऱ्यांना उपयोगी शेती अवजारे, बैल, गाई, म्हैशी, घोंगड्या, ब्लॅंंकेट, टोपल्या इ. सह मुलांसाठी खेळणी कपडे इ.ची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व असते. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हाधिकारी यांनी म्हसा परिसरात कलम १४४ लागू केल्याने व यात्रा रद्द केल्याने लाखों भाविकांना यात्रेपासून वंचित राहावे लागले आहे. त्यामुळे दहा ते बारा दिवस चालणाऱ्या या यात्रेतील खरेदी विक्री व्यवहार होणार नाहीत. पर्यायाने स्थानिक ग्रामस्थांसह व्यापारी व शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होणार आहे.                    
** शेकडो  वर्षाची परंपरा असलेली म्हसा याञा कोरोना संकटामुळे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. परंतु दुकानदार, व्यापारी, तसेच जागा मालक आपली जागा भाड्याने देऊन त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षभर आपले कुटूंब चालवत असतात. अशा सर्वांचे खूप मोठे नुकसान होणार असल्याची खंत म्हसा गावचे रहिवासी तथा शिवसेना उपतालुका प्रमुख कचरु म्हारसे, यांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...