Thursday, 28 January 2021

संत गजानन महाराज मंदिरात सत्कार सोहळा !

संत गजानन महाराज मंदिरात सत्कार सोहळा !


अमळनेर प्रतिनिधी - अमळनेर शहरातील भाविकांचे श्रध्दास्थान, मुंदडा नगर भागातील दादासाहेब सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात श्रीमती सोनाली अविनाश भामरे ग्रामसेविका धुळे नंदुरबार ग.स.पतपेढीच्या निवडणूकीत 5146 मतांनी निवडून आल्या. व महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्यकार्यकारणी सदस्य पदी दैनिक साईमतचे अमळनेर तालुका प्रतिनिधी ईश्वर रामदास महाजन यांची निवड झाली त्याबद्दल मंदिराच्या सभागृहात संस्थानचे अध्यक्ष प्रा.आर.बी.पवार यांनी शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.


          सत्कार प्रसंगी श्रीमती सोनाली भामरे, व पत्रकार ईश्वर महाजन यांनी संत गजानन महाराज संस्थेच्या वतीने आमचा सत्कार केल्याबद्दल संस्थेचे आम्ही सदैव ऋणी राहू असे सांगितले.यावे यावेळी धुळे नंदुरबार ग.स पतपेढीचे रोखपाल आर.एस.पाटील, रविंद्र पवार, प्राचार्य एल.जे.चौधरी, विश्वास पाटील, रघूनाथ पाटील, मोहीत पवार,महेश पाटील, संजय साळुंखे, प्रदीप शिंगाणे,कदम व गजानन परीवारातील महीला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

सिद्धार्थ महाविद्यालयात 'इस्त्रायलची संस्कृती, राष्ट्रभक्ती व युद्धाविषयी भूमिका' यावर कार्यशाळा संपन्न !

सिद्धार्थ महाविद्यालयात 'इस्त्रायलची संस्कृती, राष्ट्रभक्ती व युद्धाविषयी भूमिका' यावर कार्यशाळा संपन्न ! सिद्धार्थ वाणि...