Monday 25 January 2021

मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने साडेतीन कोटी रुपयांचे सात बंधारे मंजूर !

मृद व जलसंधारण विभाग अंतर्गत कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नाने साडेतीन कोटी रुपयांचे सात बंधारे मंजूर !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माणगाव तालुक्याच्या गोरेगाव विभागातील हरकोलकोंड नदीवर आमदार भरत शेठ गोगावले साहेबांच्या प्रयत्नाने मंजूर करून आणण्यात आलेल्या सात बंधाऱ्यांच्या कामाचा आज शुभारंभ करण्यात आला. 
      यावेळी माननीय लोकप्रिय कार्यसम्राट आमदार गोगावले यांनी पुढे बोलताना सांगितले की ग्रामस्थांच्या मागणीनुसार आणखी बंधारे या विभागात मंजूर करून आणण्यात येतील. आपण पदाधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा करावा या बंधाऱ्यामुळे या भागातील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे.     
      शासनाच्या घर तिथे नळ या योजनेचा महिलांना मोठ्या प्रमाणात उपयोग होणार आहे या योजनेमुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे आणि जनतेला मुबलक पाणी मिळणार आहे. आपण ही योजना जनतेच्या सहकार्याने व्यवस्थित रित्या पूर्णत्वाकडे सर्वजण मिळून काम करूया असे आमदार भरत शेठ गोगावले म्हणाले. या विभागाने शिवसेनेवर भरभरून प्रेम केले आहे त्यामुळे कायमच या भागाला आम्ही विकास कामांच्या बाबतीत सर्वात जास्त झुकते माप देण्याचा प्रयत्न करत आहोत. 
       आपण संघटनेच्या पाठीवर कायमच असे ठाम राहाल त्याची अपेक्षा करतो तसेच    कोरोना काळात रखडलेली उर्वरित कामे देखील लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी खास करून महिलांनी आमदार साहेबांचे आभार मानले. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित पंचायत समिती सदस्य माजी सभापती सुजित शिंदे आणि या भागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...