Monday 25 January 2021

माणगांव येथील नुतन मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाचा जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न !

माणगांव येथील नुतन मध्यवर्ती प्रशासकीय  जलसंपदा भवनाचा जलसंपदा मंत्री मा. जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा संपन्न !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : माननीय लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नाने रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यात साकारलेल्या भव्य दिव्य मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाचा लोकार्पण सोहळा सोमवार दिनांक २५ जानेवारी २०२१ रोजी महाराष्ट्र राज्याचे विद्यमान जलसंपदा मंत्री माननीय जयंत पाटील साो यांच्या  हस्ते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साो यांच्या अध्यक्षतेखाली रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय कुमारी अदिती ताई तटकरे, लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले, माननीय आमदार अनिकेत तटकरे, रा. कॉ. जिल्हा अध्यक्ष, मा आ सुरेश लाड, जलसंपदा मुख्य अभियंता मा श्री तिरमनवार, रायगड जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती माननीय सौ गीताताई जाधव, पंचायत समिती सभापती माननीय अलका ताई जाधव, माणगांव नगराध्यक्षा माननीय योगिता चव्हाण, मा प्रभाकरदादा उभारे, जलसंपदा विभागाचे अभियंते, कर्मचारी वर्ग, माणगांव, तळा, रोहा, अलिबाग, म्हसळा, श्रीवर्धन इत्यादी तालुक्याचे सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, रा. काँ. चे मान्यवर पदाधिकारी आणि माणगांव तालुक्यातील प्रतिष्ठित नागरीक, पत्रकार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या लोकार्पण सोहळ्यास अनेक प्रतिष्ठित दिग्गजांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. 
       सदर लोकार्पण सोहळा कार्यक्रम प्रसंगी मुख्य अभियंता माननीय श्री तिरमनवार यांनी प्रास्ताविक केले. त्या नंतर माननीय लोकप्रिय आमदार भरत शेठ गोगावले यांनी माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील साो यांचे कुंभे काळ प्रकल्प आणि प्रकल्प ग्रस्तांच्या विस्थापितांच्या व्यथा आणि प्रश्नांकडे लक्ष वेधून घेतले. या नंतर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय कुमारी अदिती ताई तटकरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, आजचा दिवस आपल्या साठी अभिमानाचा आहे. कारण आज माणगांव येथे दक्षिण रायगड च्या प्रशासकीय तथा जलसंपदा भवनाच्या भव्य वास्तूचे लोकार्पण होत असून या जलसंपदा भवनाच्या माध्यमातून लोकहिताचे प्रशासकीय कामकाज सुरू होणार आहे. या नंतर  लोकप्रिय खासदार माननीय सुनील तटकरे साो यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, या मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाची ही सुंदर भव्य दिव्य वास्तू माणगांव च्या सौंदर्यात भर टाकणार आहे. या मध्यवर्ती प्रशासकीय जलसंपदा भवनाच्या माध्यमातून दक्षिण रायगड मधील पिण्याच्या पाण्या बरोबर भविष्यातील उद्योगांसाठी लागणार्या पाण्याची तरतूद करण्यात येईल. या नंतर त्यांनी माणगांव शहरातून जाणाऱ्या सुमारे एक किलोमीटर कालव्याच्या दुरुस्ती चे काम, माणगांव तालुक्यातील कुंभे काळ प्रकल्प, जिल्ह्यातील विविध तालुक्यातून बारमाही वाहणाऱ्या नद्या उदाहरणार्थ काळनदी, सावित्री नदी, कुंडलिका नदी, रायगड जिल्ह्यातील डोळवहाळ बंधारा, पन्हळघर धरण, दक्षिण काशी तिर्थक्षेत्र श्री हरिहरेश्वर, सांबर कुंड इत्यादी क्षेत्रांच्या विकासा संदर्भात धावता परामर्श घेऊन सह्याद्री पर्वतरांगेतील कडे कपारीतून नैसर्गिक रित्या रायगड जिल्ह्यात नद्यांच्या माध्यमातून वाहणारे आमच्या हक्काचे पाणी आम्हाला संवर्धन करून ठेवता येईल यासाठी शासनाने प्रयत्न केले पाहिजे. या साठी माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील साो यांच्या कडे अर्जव केली. 
      या नंतर माननीय जलसंपदा मंत्री जयंत पाटील साो आपल्या भाषणात उपस्थितांना उद्देशून म्हणाले की, तुम्ही सगळे भाग्यवान आहात. कारण सुनील तटकरे यांच्या सारखे कार्यक्षम खासदार तुम्हाला लाभले आहेत. जर आम्हाला सुनील तटकरे यांच्या सारखे कार्यक्षम खासदार लाभले असते तर आम्ही अजून प्रगती केली असती.  नंतर त्यांनी माननीय लोकप्रिय खासदार सुनील तटकरे साो यांनी रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उच्च स्तरावर वारंवार केलेले प्रयत्न, पाठपुरावा आणि माणगांव तालुक्यातील या भव्य दिव्य प्रशासकीय जलसंपदा भवन वास्तूचे सर्व श्रेय माननीय खासदार सुनील तटकरे यांना जाते. पुढे आपल्या भाषणात ते म्हणाले की, निसर्गाची सर्वात मोठी देण कोणाला मिळाली असेल तर म्हसळा, श्रीवर्धन आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याला. रायगड जिल्ह्याच्या विकासा संदर्भात माननीय आमदार भरत शेठ गोगावले, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री माननीय अदिती ताई तटकरे आणि माननीय खासदार सुनील तटकरे यांनी सुचविले ल्या सर्व सूचनांची दखल घेऊन माझ्या माध्यमातून शासनस्तरावर सर्व प्रयत्न केले जातील अशी हमी देऊन त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. 
      माणगांव तालुक्यातील सदर प्रशासकीय जलसंपदा भवनाच्या अंतर्गत पाच उप विभागांचे प्रशासकीय कामकाज सुरू राहणार आहे. या वास्तूचे कामकाज सन २०१४ ते २०१८ या कालावधीत सुरु होते. हे भव्य दिव्य प्रशासकीय जलसंपदा भवन माणगांव तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी माणगांव तहसील कार्यालयाच्या आणि माणगांव पंचायत समितीच्या शेजारी असल्याने नागरिकांना खूप सोईस्कर होणार आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...