Tuesday, 26 January 2021

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजाच्या हस्ते तळबीड या ऐतिहासिक भूमित झेंडावंदन !

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजाच्या हस्ते तळबीड या ऐतिहासिक भूमित झेंडावंदन !


कल्याण, (संजय कांबळे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्य दलाचे प्रमुख सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या ऐतिहासिक जन्मभूमीत त्यांचे वंशज लोकनियुक्त सरपंच जयवंतराव मोहिते यांच्या हस्ते तळबीड येथे ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झेंडावंदन करण्यात आले. यावेळी गावातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन्ही छत्रपतींच्या काळात प्रचंड अशा सैन्य दलाचे प्रमुख कराड पासून १३ किमी अंतरावर असलेल्या तळबीड या गावचे हंबीरराव मोहिते हे होते. संभाजी मोहिते यांचा मुलगा ब्रम्हाणजी /हंसाजी म्हणजेच हंबीरराव होय. यांची बहीण सोयराबाई चा विवाह शिवाजी राजाबरोबर झाला होता. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी मोहित्यांना तहहयात तळबीड व बालाघाटाची देशमुखी मिळवून दिली होती. १लाख ५ हजारांचे घोडदळ ३० सरदार आणि ३६ समशेरबहाद्दर योध्दे व १२ गजसेना होती. वाई प्रांतात आदिलशाही सरदार सर्जाखान घुसणार असल्याची खबर हंबीरराव मोहिते यांना मिळाली. पाचवडच्या पुढे आणि वाईच्या दक्षिणेस विचित्र गडाच्या विशाल मैदानावर युध्दाला सुरुवात झाली. तोफेचा एक गोळा थेट रावांच्या देहावरचं येवून फुटला. शरीराचे असंख्य तुकडे आसमंतात विखरले. तो दिवस होता आक्टोंबर १६८७,मराठ्यांच्या आधारस्तंभ निखळला होता हे मराठ्यांनी जिंकले पण सरसेनापती हंबीरराव मोहिते हा धगधगता अग्नीकुंड शांत झाला होता अशा या वीरपुरुषांची शौर्य गाथा सर्वसामान्यांना माहिती व्हावी. यातून त्यांना एक नवी प्रेरणा, प्रखर उर्जा मिळावी या हेतूने रांवाच्या जन्मगावी म्हणजे तळबीड येथे समाधी बांधण्यात आली आहे. माझी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या निधीतून येथे सर्वांग सुंदर प्रेक्षणीय व ऐतिहासिक वास्तू व स्फूर्ती स्थान निर्माण झाले.
अशा या ऐतिहासिक भूमित रांवाचेच वंशज लोकनियुक्त सरपंच जयवंतराव मोहिते यांच्या हस्ते आज ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, महाराणी ताराराणी विद्यालयाचे मुख्याध्यापक व इतर शिक्षकेतर कर्मचारी, जिप शाळेचे मुख्याध्यापक, पशुसंवर्धन अधिकारी डॉ भूतकर, तलाठी ढालाईत, उपसरपंच लालासो वाघमारे, सदस्य दिलीपराव मोहिते, अभीजीत गायकवाड, बबन पाडळे, दुर्गेश मोहिते, सदस्या वैशाली मोहिते, रुपाली चव्हाण, संजीवनी कुंभार, हौसाबाई फाळके, पूनम वाखळे, शोभा चव्हाण, आदी ग्रामस्थ व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

माळशेज घाटा मधील रस्ता डांबरीकरण कामाला सुरूवात !!

माळशेज घाटा मधील रस्ता डांबरीकरण कामाला सुरूवात !! *** आम्ही नगरकर व स्फूर्ती फाउंडेशनच्या मागणीला यश!   मुरबाड, प्रतिनिधी - कल्...