Tuesday 26 January 2021

कल्याण तालुक्यातील आपटी गावचे सुपूत्र डॉ रविंद्र शिसवे यांना प्रशासकीय उंत्तूग कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकांने सन्मानित !!

कल्याण तालुक्यातील आपटी गावचे सुपूत्र डॉ रविंद्र शिसवे यांना प्रशासकीय उंत्तूग कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकांने सन्मानित !! 


कल्याण (संजय कांबळे) : नदी आमच्या उशाला, पण कोरड पडली घशाला, अशी ओळख असलेल्या जेमतेम ५०/६० घरे दिसणा-या कल्याण तालुक्यातील आपटी या छोट्याशा खेडेगावाला राज्यात नव्हे तर देशात व देशाबाहेर पोहोचवणारे डॉ रविंद्र अंनता शिसवे या पहिल्या आगरी समाजातील भारतीय पोलीस सेवा अर्थात (IPS) परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या सुपूत्राला प्रशासनातील उंत्तूग कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदकांने सन्मानित करण्यात येणार असल्याने हा ठाणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा मानला जात असून या सन्मानाने संपूर्ण कल्याण तालुका व आपटी गावात दिवाळी साजरी केली जात आहे.


कल्याण पासून अवघ्या ८ते १० किलोमीटर अंतरावर आपटी हे छोटेसे खेडेगाव वसले आहे. उल्हास नदीच्या काठावर हे गाव वसल्याने शेती हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय. दुसरा याला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय!
गावाच्या बरोबर मध्यभागातून मुख्य रस्ता जात असल्याने खालची आळी व वरची आळी असे दोन भाग झाले आहेत. मुख्य पिक भात तर उन्हाळ्यात कारली, भेंडी, मिरची, काकडी, अशी भाजीपाला पिके घेऊन ते बोजे उल्हासनगर बिर्लागेट किंवा कल्याण येथे विकणे. व यातून येणाऱ्या पैशातून घरखर्च चालवणे हा दिनक्रम, आपटी हे खेडेगाव असल्याने येथे सोयीसुविधा ची पूरती बोंबाबोंब, रस्ते, गटारे, दिवाबत्ती शिक्षण याची दैणी अवस्था.?
पण याच गावातील अंनता शिसवे यांनी गरीबीवर मात करुन उच्च शिक्षण पूर्ण करून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मॅनेजर पर्यंत मजल मारली तर त्यांच्या पत्नी १६७९ मध्ये सरपंच, १९९० मध्ये झेडपी सदस्य, नंतर कल्याण पंचायत समितीच्या सभापती आणि शेवटी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशी पदे मिळाल्याने गावाचा चेअरा मोहरा बदलला, गावात रस्ता, गटारे, दिवाबत्ती, गणेशघाट, समाजहाॅल आदी सुविधा निर्माण केल्या.
याच गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत  रविद्र शिसवे यांचे इयता ४थी पर्यंत शिक्षण झाले. पुढे शिक्षणासाठी ५/७ किलोमीटर अंतरावरील रायते विभाग हायस्कूल रायते किंवा मग इतर ठिकाणी. शाळा लाब असल्याने अनेकांनी पुढील शिक्षण थांबविले. परंतु रवि यांनी प्राथमिक शाळा कळवा, ठाणे, यांनतर वझे ज्युनियर कॉलेज मुंलूड, व बारावी उत्तीर्ण  झाल्यानंतर बेळगाव येथील मेडिकल कॉलेज मध्ये प्रवेश घेतला. तेथे बी एम एस उर्तीर्ण केल्यानंतर ठाणे जिल्हा परिषदेच्या डोळखांब येथे वैद्यकीय सेवेसाठी रुजू झाले. काही काळ येथे सेवा देत असले तरी तेथे त्यांचे मन रमेना आणि अशातच त्यांच्या जिवनाला कलाटणी देणारी घटना घडली. त्यांचा अंत्यत जवळचा भाऊ, सखा, सोबती, मित्र दिनेश पांडुरंग शिसवे याचे अपघातात निधन झाले हा मृत्यू त्यांनी तसेच पत्रकार संजय कांबळे यांनी अंत्यत जवळून पाहिला. व एक मोठा निर्णय घेतला.यापुढे वैद्यकीय सेवा बस्स झाली असे ठरवून डॉ शिसवे यांनी यूपीएससी अभ्यास सुरू केला. दिवसांचे कित्येक तास अभ्यासात घालवले. प्रथम अपयश आले. पण त्यावर मात करून दुसऱ्या प्रयत्नात २००२ मध्ये संपूर्ण भारतात ते ५३ वे व महाराष्ट्रातून दुसरे आले. हा आनंद सर्वांसाठी इतका मोठा होता की शब्द अपुरे पडत होते. त्यांना प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जावे लागले. तेथे आय पी एस निवड करुन देशातील नामांकित सरदार वल्लभाई पटेल इन्स्टिटय़ूट मध्ये ट्रेनिंग सुरू केले. ते संपल्यानंतर त्यांना पहिली पोस्ट मिळाली ती सांगली जिल्ह्य़ातील जत येथील. 
यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून गडचिरोली, पोलिस अधीक्षक गोंदिया, सिंधुदुर्ग, बुलढाणा, सांगली आणि सांगलीवरुन मुंबई अतिरिक्त पोलीस कमिशनर, मुंबई दक्षिण, मुंबई मध्य अशी उत्कृष्ट सेवा बजावल्यानंतर त्यांची पुणे शहरातील सह आयुक्त म्हणून बदली झाली. 
कारण हा काळ त्यांच्यासाठी अंत्यत कठीण व त्यांची परीक्षा घेणारा ठरला. याच काळात पुणे शहरात कोरोनाच्या भयानक संकटाने डोके वर काढले होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठे व प्रसंगी कठोर निर्णय घेणे आवश्यक होते. पण अशाही परिस्थितीत ते कुंटूबापासून दूर राहून देशसेवा करीत होते. अखेरीस यात ते यशस्वी झाले. आज पुणे शहर, जिल्हा कोरोना मुक्त झाला आहे यामध्ये सह आयुक्त डॉ रविंद्र अनंता शिसवे यांचा सिंहाचा वाटा आहे. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. आणि याच प्रशासनातील अतुलनीय व उत्तुंग कामगिरी बद्दल भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी त्यांना सर्वोच्च असे राष्ट्रपती पदक जाहीर झाले हे ठाणे जिल्ह्यासाठी पर्यायाने कल्याण तालुक्यासाठी अभिमानाची घटना आहे. त्यांना मिळालेल्या या गौरवाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. तसेच आपटी गावचे ग्रामस्थ, सदस्य शाम शिसवे, गजानन शिसवे, ठिडीसीचे म्हारळ शाखा अध्यक्ष सुभाष मार्के, जनाधार निर्भिड पत्रकार सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा एस के फिल्म प्रोडक्शन हाऊस कल्याण चे प्रमुख संजय कांबळे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्रीमती श्वेता पालवे, तहसीलदार दिपक आकडे, उपसभापती रमेश बांगर, माझी सभापती रंजना केतन देशमुख, पांडुरंग म्हात्रे आदींने आयपीएस डॉ रविंद्र शिसवे यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...