Sunday 31 January 2021

'संदीप ओंबासे' यांना क्रीडा जीवनगौरव पुरस्कार !

'संदीप ओंबासे' यांना क्रीडा जीवनगौरव पुरस्कार !


कल्याण :- ताइक्वांडो या खेळामध्ये केलेल्या भरीव कामगिरी ची दखल घेत वर्ल्ड बुद्धिस्ट व आंबेडकर राईट मिशन, भारत व कल्याण तालुका जर्नालिस्ट वेलफेअर असोसिएशन यांच्यावतीने मूकनायक शताब्दी सांगता सोहळा मुंबई पत्रकार भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता..


या पुरस्कार सोहळ्यामध्ये संदीप यशवंतराव ओंबासे, सचिव -  तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांना महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष 'मा.श्री नानाभाऊ पटोले' यांच्या शुभहस्ते *क्रीडा जीवन गौरव* हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले... प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री रामदासजी आठवले, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ किशोरी पेडणेकर, डॉ. रामप्रसाद मोरे, दैनिक लोकधारा चे संपादक श्री प्रदीप जगताप, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी साहेबराव सुरवाडे व आदी मान्यवर उपस्थित होते.

संदिप ओंबासे..यांनी महाराष्ट्रात तायक्वांदो हा ऑलम्पिक क्रिडा प्रकार खोलवर रुजवण्यात खूप मोठे योगदान दिले आहे...

1994 ला जर्मनी (वेसेल) येते झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते, भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे तर्फे मणीपूर (इम्फाळ) येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते तसेच आतापर्यंत 22 राज्य, 8 राष्ट्रीय व 2 आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा मान त्यांना मिळाला. 

सध्या ते तायक्वांदो असोसिएशनचे ऑफ महाराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हजारो खेळाडू तयार झाले आहेत. या खेळाची जागतिक संघटना वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन या संघटनेच्या जागतिक सभा  2016 ला रशिया येते संपन्न झाली होती आणि यासाठी  भारतातुन संदीप ओंबासे यांना उपस्थित राहण्याचा मान मिळाला होता....

या खेळासाठी त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  संदीप ओंबासे
त्यांच्या अनुपस्थितीत हा पुरस्कार चिरंजीव स्वप्निल संदीप ओंबासे यांनी स्वीकारला...

No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...