Thursday 28 December 2023

भारत निवडणूक आयोगाकडून पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ !!

भारत निवडणूक आयोगाकडून पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ !!
मुंबई, प्रतिनिधी :- भारत निवडणूक आयोगाने 01 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि.29 मे व दि.25 सप्टेंबर 2023 च्या पत्राने जाहीर केला आहे. त्यानुसार दावे व हरकती निकाली काढण्याचा अंतिम दि.26 डिसेंबर 2023 हा होता. भारत निवडणूक आयोगाकडून पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ देण्यात आलेली असून, सुधारित पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

सुधारित कार्यक्रमाचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे :- शुक्रवार दि.12 जानेवारी 2024 दावे व हरकती निकाली काढणे, बुधवार, दि.17 जानेवारी 2024 मतदार यादीचे Health Parameter तपासणे आणि अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी घेणे, डेटा बेस अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करणे, सोमवार दि.22 जानेवारी 2024  अंतिम प्रसिध्दी असा आहे.

   प्रारुप मतदार यादी दि. 27 ऑक्टोबर 2023 रोजी प्रसिध्द झाली आहे. नागरिकांनी प्रारुप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे याची खात्री करणे आवश्यक आहे. बऱ्याचवेळा मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत असतात. तरी आपले नाव, पत्ता, जन्म दिनांक, वय, मतदार संघ इत्यादी तपशिल सुध्दा अचूक आहे याची खात्री करावी. हा तपशिल https://electoralsearch.eci.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच Voter Helpline App वर पाहता येईल.

    सर्व नागरिक दि.05 जानेवारी 2024 पर्यंत नाव नोंदणी, वगळणी व दुरुस्ती इत्यादी साठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा Voter Service Portal Beta (https://voters.eci.gov.in/)., Voter Portal https://voterportal.eci.gov.in/ , Voters Helpline App (VHA) मोबाइल अॅप  उपलब्ध आहे. तसेच ऑफलाईन अर्ज  संबंधित मतदार नोंदणी कार्यालय (तहसीलदार कार्यालय), मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे करता येणार आहेत.

   तरी सन 2024 मध्ये येवू घातलेल्या निवडणुकांमध्ये मताधिकार बजावण्यासाठी ही महत्वाची संधी असल्याने पात्र नव मतदारांनी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी, असे आवाहन निवडणूक विभागातर्फे करण्यात आले.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...