Saturday 30 December 2023

नव्या वर्षाच्या पुर्वसंधेला कांबा-पावशेपाडा येथील सिंमेट गोडाऊनवर पोलिसांची धाड, दोन इसमासह दोन ट्रक ताब्यात !

नव्या वर्षाच्या पुर्वसंधेला कांबा-पावशेपाडा येथील सिंमेट गोडाऊनवर पोलिसांची धाड, दोन इसमासह दोन ट्रक ताब्यात !

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत हद्दीतील पावशेपाडा येथील सिंमेट गोडाऊन वर ठाणे ग्रामीण च्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ दिपाली घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली  कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर व त्यांच्या सहकाऱ्यांनी धाड टाकून नामांकित कंपनीच्या सिंमेट गोणी, दोन ट्रक व सचिन नांगरे आणि राजेश भाटिया या दोघांना ताब्यात घेतले आहे एकूण १२ लाख ६० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नव्या वर्षाच्या पुर्व संध्येला ही कारवाई झाल्यानें पोलिसांचे कौतुक होत आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा येथे झपाट्याने नागरिकरण झाले आहे. शेजारी उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण अशी मोठी शहरे असल्याने या परिसरात अनेक अनाधिकृत, गैर धंदे फोफावले आहेत, अर्थात हे स्थानिक पोलिसांना माहिती नाही असे मुळीच नाही, म्हारळ, कांबा येथे तर अश्या ठिकाणी चाळी व गोडाऊन झाले आहेत की ते सहजासहजी कोणाच्या नजरेस पडणार नाही, कांबा ग्रामपंचायत हद्दीत टाटा पावर हाऊस मागे शेकडो गोडाऊन झाले आहेत, तसेच पाचवामैल पावशेपाडा रस्त्याच्या बाजूला अशीच गोडाऊन झाली आहेत, येथे नक्की काय उद्योग चालतात हे त्यांनाच माहिती ?

पाचवामैल येथील एका गोडाऊन मध्ये अल्ट्राटेक, ऐसीसी, आणि अंबुजा आदी नामांकित सिंमेट कंपनीच्या नावाने मिलावट सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ दिपाली घाटे यांनी स्वतः या मोहिमेवर जाण्याचा निश्चय केला, त्यानुसार कल्याण तालुका पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, म्हारळ पोलीस चौकीचे पीएसआय सुपेकर, देशमुख, मोरे पोका, प्रशांत बडगे आदी सहकारी यांनी या गोडाऊन वर धाड टाकली, यावेळी घटनास्थळी ऐसीसी, अल्ट्राटेक, अंबुजा आदी सिमेंट कंपनीच्या २००,६०० बँगा मिळून आल्या, तसेच दोन ट्रक ज्यामध्ये ऐसीसी, अल्ट्राटेक कंपनीच्या सिंमेट गोणी सापडल्या, एकूण १२ लक्ष, ६० हजार २५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याच्या सह सचिन नांगरे व राजेश भाटिया या दोन इसमानाही ताब्यात घेण्यात आले आहे. यांच्या कडे आवश्यक कागदपत्रे न मिळाल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास पीएसआय हेंमत सुपेकर हे करित आहेत.

अशीच कारवाई टाटा पावर हाऊस मागील गोडाऊन वर एक वर्षांपूर्वी करण्यात आली होती, त्याचे काय झाले हे अद्यापही कळाले नाही. त्यामुळे यावेळी तरी लोकांच्या जीवनाशी, त्यांच्या निवा-याशी मिलावट करून जीवघेणा खेळ करणाऱ्या आरोपीना कडक शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त करुया, नव्या वर्षाच्या पुर्वसंधेला पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !! *संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौ...