Wednesday, 27 December 2023

घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक पदी इम्रान शेख यांची नियुक्ती !!

घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक पदी इम्रान शेख  यांची नियुक्ती !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या तयारीला सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली सुरू झाल्या असून विभागात कार्यकर्त्यांना पदांची जबाबदारी दिली जात आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुंबईत कार्यकर्त्यांच्या पदनियुक्त्या जाहीर केल्या जात असून घाटकोपर पश्चिम मध्ये देखील युवा कार्यकर्त्यांना पक्षात विशेष संधी दिली जात आहे. युवा कार्यकर्ते इम्रान शेख यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या घाटकोपर पश्चिम विधानसभा समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आल्याचे विभाग प्रमुख सुरेश पाटील यांनी सांगितले. इम्रान शेख हे सामाजिक कार्यकर्ते असून त्यांचे विभागात विविध कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत. विविध आंदोलनात देखील ते मोठ्या संख्येने पक्षात सक्रिय सहभाग घेत आहेत. इम्रान शेख मित्र मंडळात त्यांचे 20 हजार हून अधिक युवक जोडले गेले आहेत. आदिवासी पाडे, गरजू नागरिक, दिव्यांग विद्यार्थी यांच्यासाठी इम्रान शेख विशेष कार्य पाहत आहे. त्यांच्या याच कार्याचा अहवाल पाहून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी त्यांना पक्षात जबाबदारी दिल्याचे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

दाखल जनहित याचिका हायकोर्टाने सुद्धा कायमस्वरूपी निकाली काढली आणि पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनाच दिले चौकशीचे आदेश !!

दाखल जनहित याचिका हायकोर्टाने सुद्धा कायमस्वरूपी निकाली काढली आणि पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनाच दिले चौकशीचे आदेश !! भारतीय संविधाना...