Saturday 30 December 2023

आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनीअर्ज सादर करावेत - जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे

आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी
अर्ज सादर करावेत - जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे

रायगड, प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील सध्या रिक्त असलेल्या आपले सरकार सेवा केंद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://raigad.gov.in,  या वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. रिक्त असलेल्या सर्व आपले सरकार सेवा केंद्रासाठी इच्छुक नागरिकांनी https://raigad.gov.in, या संकेत स्थळावरून अर्जाचा नमुना डाऊनलोड करून सदरचे अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दि.30 जानेवारी 2024 रोजी सायं. 06.00 वा. पर्यंत नोंदणी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्या कार्यरत असलेली सर्व महा ई सेवा केंद्रे, सेतु सुविधा केंद्रे, नागरी सुविधा केंद्रे तसेच संग्राम केंद्रे यांना "आपले सरकार सेवा केंद्र" हे नाव देऊन सर्व कॉमन सर्व्हिस सेंटरचे एकसारखे बँडींग करण्यात आले आहे.

प्रत्येक ग्रामपंचायत व नगरपंचायत क्षेत्रात किमान एक केंद्र स्थापन करण्यात येईल, मात्र 5 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या (2011 च्या जनगणनेनुसार) किमान 2 केंद्रे स्थापन करण्यात येईल. शहरी भागासाठी आपले सरकार केंद्रासाठी महानगरपालिका व नगरपरिषद 10 हजार लोकसंख्येसाठी एक केंद्र स्थापन करण्यात येईल.

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज मागणी, कालावधी 30 दिवस, दि.01 ते 30 जानेवारी 2024, प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जाची छानणी, कालावधी 15 दिवस, दि.31 जानेवारी  ते दि.14 फेब्रुवारी 2024, प्राप्त आपले सरकार सेवा केंद्रांच्या मागणी अर्जावर जिल्हास्तरीय कार्यवाही करिता, कालावधी 15 दिवस, दि.15 फेब्रुवारी ते दि.29 फेब्रुवारी 2024.

रायगड जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण केंद्रांची माहिती :-  एकूण ग्रामीण केंद्र 884, एकूण शहरी केंद्र 105,एकूण-989. ग्रामीण कार्यरत केंद्र- 751,  शहरी कार्यरत केंद्र- 123, एकूण- 874.  ग्रामीण रिक्त केंद्र- 306, शहरी रिक्त केंद्र- 12, एकूण- 318.

रिक्त केंद्रांची संख्या- 318, रिक्त केंद्राची तालुकानिहाय संख्या :-अलिबाग 4, कर्जत 9, खालापूर 10, महाड 75, माणगाव 18, म्हसळा 17, मुरुड 5, पनवेल 39, पेण 20, पोलादपूर 24, रोहा 34, श्रीवर्धन 21, सुधागड 12, तळा 18, उरण 12.

आपले सरकार सेवा केंद्राबाबत माहितीसाठी माहिती व तंत्रज्ञान कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग येथे संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...